सदसद विवेक बुद्धीने आणि देशातील लोकशाही मार्गाने पार पडणाऱ्या निवडणुका शेवटी शेवटी जातीपाती वरच येऊन ठेपतात.मग ग्रामपंचायत पासून तर लोकसभेपर्यंत आणि ज्या सार्वत्रिक निवडणुका जातीपातीवर पार पडत असतील तर तो लोकशाहीच्या हिताचा नाही तर लोकशाहीला घातक आहे.वेळीच खोलवर रुजलेले जातीपातीचे मुळे संपुष्ट नष्ट केल्याशिवाय गत्यंतर उरणार नाही.
निवडणुका जवळ आल्या की राजकारनी जातीपातीच्या राजकारणांकडे वळतात.अगदी त्याचप्रमाणे गडचिरोली विधानसभेचे वर्तमान आमदार आता गडचिरोली येथे कुणबी मेळाव्याचे आयोजन केले आहेत. त्याला आपला अजिबात विरोध नाही,तो त्यांचा प्रश्न आहे.
परंतु सांगायचे इतकेच आहे की गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे वर्तमान आमदार माननीय डॉ. देवराव होळी त्यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात कुणबी समाजाचे किती मिळावे घेतले ? वेळोवेळी मदत करणारा कुणबी समाजाची आमदार होळी साहेबांना झालेली झालेली आठवण माझ्या ऐकिवात नाही.
भेंडाळा परिसरात कृषी पंप धारकांच्या पंपावर भारनियमन लागू आहे.कित्येक निवेदन देऊन जन आंदोलन देखील उभारण्यात आला होता आणि त्यावेळी सुद्धा आंदोलन करणारे बऱ्याच प्रमाणात कुणबी होते मग त्यावेळी होळी साहेबांच्या मनात विचार आले नसतील का ? हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरच आहे.
मेळावे घ्यायलाच पाहिजे.जनतेचे प्रश्न हिरोरीने सोडवायलाच पाहिजे यातच राज्यकर्त्यांचं भला आहे.परंतु ज्या कुणबी समाजाचा मेळावा घेऊन निवडणुकीत रंग भरविण्याच्या प्रयत्न करत आहात,मग त्या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा.परंतु तसं होत नाही गरज सरो आणि वैद्य मरो,ही पुढाऱ्यांची भावना बदलायला पाहिजे.
निवडणुका येतात जातात कोणी जिंकतो तर कोणी हारतो हा मोठा विषय नाही परंतु ज्या समाजाने भरभरून मदत केली त्या समाजाविषयी जागरूकतेची भावना असायला पाहिजे ही एवढीच कळकळीची विनंती समाज बांधवांच्या वतीने आमदार महोदयांना करतो.
ग्रामीण तथा शहरी भागात सरकारने घरकुल मंजूर करून गरिबांना हक्काचं घर दिलय यांचं खूप खूप स्वागत आहे.परंतु पावसाळ्याचे दिवस आले असून सगळीकडे धो-धो पाऊस पडून नदी नाल्यांना पूर आला,पण गोरगरिबांचे घर बांधायचे स्वप्न अधुरेच राहिले.कारण काय ? तर सरकारने घरकुल लाभार्थ्यांना निधीचा वाटप केल्या गेला नाही. त्यामुळे गरिबांचे घर अर्ध्यावरील डाव मोडीला,असं म्हटलं तर नवल वाटणार नाही.
अपूर्ण घर आणि गोरगरिबांचा उकिरड्यावरचा संसार सांभाळताना किती तारेवरची पसरत करावी लागतं हे जर सरकारच्या ध्यानी येत नसेल तर नवलच म्हणावं लागेल.सरकार कदाचित गोरगरिबांची ठट्टा करीत असेल किंवा घरकुल निधी वाटप करायचे आहे याच्या विसर पडलेला असेल.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा माहे जून 2024 चा निधी अजूनही लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही.म्हणजे सरकार गोरगरिबांची मस्करी करीत आहे,असा अंदाज आता सामान्य जनता व्यक्त करताना दिसतो आहे.म्हणून हा निधी लवकरात लवकर वितरित करावा ही मागणी घेऊन रमेश चौखुंडे यांच्या नेतृत्वात तालुक्याचे संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले.निवेदन देते वेळी स्वप्निल मंडल,दामाजी सातपुते भेंडाळा.विनायक पाटील पोरटे वाघोली.तोताजी आभारे,कबीर आभारे घारगाव.मुखरेश्वर चुदरी, केशव चुदरी,सतीश पुटकमवार दोटकुळी.प्रदीप भोय, सतीश पाल एकोडी. मुखरुजी कोहपरे,अनिल वाडगुरे नवेगाव आणि परिसरातील बरेच नागरिक उपस्थित होते.
खड्डे चुकवितांना नियंत्रण सुटल्याने बामनपेठ जवळील दासरवाही नाल्याजवळ दुचाकी झाडावर आदळून एक ठार
आष्टी: खड्डा चुकवितांना नियंत्रण सुटल्याने मोटार सायकल झाडावर आदळून एक जागीच ठार झाल्याची घटना मार्कंडा कंन्सोबा - घोट मार्गावरील बामनपेठ जवळील दासरवाही नाल्याजवळ दिनांक ५ जूलै रोजी सकाळी अंदाजे ९ वाजताच्या सुमारास घडली. मानवेंद्र नरेंद्रनाथ राॅय वय (३८) रा. गांधीनगर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मानवेंद्र नरेंद्रनाथ राॅय हे आपल्या दुचाकीने दुचाकी क्रमांक (एम.एच. ३३ एल ५७५१) या दुचाकीने दिनांक ५ जूलै रोजी सकाळी ७:४५ वाजताच्या दरम्यान गांधीनगर येथून घरून आपल्या मुलास आष्टी जवळील तारसा येथील कारमेल अकाडमीला सोडून परत गावाकडे येत असताना बामनपेठ जवळील दासरवाही नाल्याजवळ खड्डे चुकवितांना नियंत्रण सुटल्याने सरळ मोटारसायकल झाडाला आदळून मानवेंद्र हे जागीच ठार झाले.
मुलगा विवाहित असून १ मुलगा, १ मुलगी, पत्नी असा त्यांच्या पश्चात आप्तपरिवार आहे
चामोर्शी : तालुक्याच्या एकोडी परिसरात मोठ्या प्रमाणात दारूविक्री केली जात असल्याने महिला त्रस्त झाल्या आहेत .पोलिसांनी लक्ष घालून या भागातील दारूविक्री बंद करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.एकोडी परिसरात दारूविक्री चालू असल्याने विविध समस्या निर्माण झाल्या आहेत .काही दिवसापूर्वी महिला मंडळ यांनी दारू विक्रेत्याकडून हमीपत्र लिहून घेत दारूविक्री बंद करण्याचे आव्हान केले,तरीसुद्धा काही विक्रेत्यांनी मुजोरीने लपून दारूविक्री सुरू केली
विदर्भाचे काशी म्हणून ओळखली जाणारी मार्कंडा नगरी येथे संत मुरलीधर महाराज हरणघाट पीठ यांनी मार्कंडेश्वराचे जीर्णोदवाराचे बांधकाम लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे या मागणीसाठी उपोषणाला सुरुवात केले होते आणि थातूर-मातूर आश्वासन देऊन उपोषण सोडायला लावले.
तेव्हापासून आज तागायत 2 टक्के सुद्धा जीर्णोद्वाराचे बांधकाम झालेले नाही.करीता ही गोष्ट नवनिर्वाचित खासदार माननीय नामदेवरावजी किरसाण यांच्या लक्षात आणून देताच खासदारांनी ताबडतोब पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित करीत आज दिनांक 12/6/2024 रोजी आढावा बैठक घेतली.
मंदिराचे बंद पडलेले काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी सूचना देण्यात आली.या कार्यक्रमाला माजी खासदार मारोतरावजी कोवासे,डॉ. नामदेवराव किरसान,काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे,विश्वजीत कोबासे आणि संत मुरलीधर महाराज व परिसरातील 200-300 बाबांचे भक्त उपस्थित होते.
आम्हाला एक महिन्याची मुदत द्या नंतर आम्ही बांधकाम पूर्ण होईपर्यंत काम बंद पडू देणार नाही,अशी ग्वाही पुरातत्त्व विभागाचे अधिकारी श्री मलिक साहेब यांनी विनंती केली.पुरातत्त्व विभागाचे अधिकारी यांच्या विनंतीला मान देत एक महिन्याची मुदत देण्यात आली मात्र एक महिन्यात कामाला सुरुवात झाली नाही तर मी माझा देह त्याग करायला मागेपुढे पाहणार नाही,असा इशारा संत मुरलीधर महाराजांनी दिला.
वैनगंगा नदीकाठी असलेला वेलतुर-तूकूम,वेलतूर रिठ व एकोडी परिसरात मागील काही दिवसांपासून पट्टेदार वाघाचा वावर दिसून आलेला आहे.म्हणजे सांगायचं झाल्यास मागील काही दिवसात एकोडी परिसरात पट्टेदार वाघाने म्हशीचा रेडा सुद्धा ठार केलेला होता आणि काल दिनांक २/०६/२०२४ रोजी सोमनाथ परशुराम मंगर मु.वेलतूर रीठ येथील शेतकऱ्याच्या शेळीच्या बकरा ठार करून पट्टेदार वाघाने आपली उपजीवीका भागविण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे.
ग्रामपंचायत वेलतुर तुकूमचे उपसरपंच दिगंबर काशिनाथ धानोरकर यांनी ही माहिती वन विभागाला मोबाईल फोन द्वारे कळवून झालेल्या घटनेचा पंचनामा करायला भाग पाडले.
वन विभागाचे वनरक्षक यांच्या नेतृत्वात अनिल नैताम यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करण्यात आला.त्यावेळी वेलतुर रिठ परिसरातील 30 ते 35 नवयुवक हातात लाठी घेऊन पट्टेदार वाघाला हाकलून लावण्यासाठी वन विभागाला सहकार्य केले.
विशेष म्हणजे वेलतुर रिठ परिसरात वावरणाऱ्या पत्तेदार वाघाच्या चौकशीसाठी ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला होता.याच परिसरात वाघाचा वावर आहे हे वन विभागाने सिद्ध केलेले आहे.
परंतु मागील काही दिवसांपासून पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातल्यामुळे या परिसरातील एकोडि,सगनापूर,वाघोली,वेलतूर रिठ,कळमगाव व परिसरातील लोक भयभीत झाली असून.वेळीच पट्टीदार वाघाच्या बंदोबस्त करावा अशी परिसरातील जनतेने वनविभागाकडे मागणी केलेली आहे.
या परिसरात कोणतीही जीवित हानी होऊ नये म्हणून वनविभागाचे अधिकारी श्री गोवर्धन साहेब आणि वनपरिक्षेत्र अधिकारी श्री हिनवंत साहेब चामोर्शी यांनी विशेष लक्ष केंद्रित केलेले आहेत.
एकोडी शेतशिवारात वाघाची दहशत.माणसांवर होणारा हल्ला रेडयांवर झाला.भेंडाळा परीसरात एकोडी हा लहानसा लोक वस्ती असलेला गाव आहे.आणि वैनगंगा नदी या गावाच्या काही अंतरावर आहे त्यामुळे येथील शेतकरी कृषी पंपाच्या सहाय्याने दुबार पेरणी करून धान्य व मका असे पिके घेतात.
एकोडी ते बोरघाट रस्त्यावर शेतकरी येणं जाणं करीत असतांना काही शेतकऱ्यांनी पट्टे दार वाघ बघीतला आणि गावातील लोकांना माहिती सांगितली परंतु गावातील लोकांनी हि अफवा आहे,असे समजून त्या कडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला.पण या गेल्या शनिवारी पट्टे दार वाघाचे दर्शन सुध्दा झाले आणि त्याच दिवशी म्हशींचा रेडा अंदाजे एक ते दिड वर्षांचा असेल त्याला वाघाने ठार मारून आपली दिनचर्या भागविली.
रविवारी सायंकाळी शेळ्या चारणारे शेरकी यांच्या ही वस्तु नजरेस पडल्या नंतर पुर्ण पणे विस्वास बसला.वाघाचा वावर असल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली.आणि लगेचच वनसंरक्ष विनोद नैताम यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला.हि शिकार वाघाणेच केली हे त्यांनी पंचासमक्ष कबुल केली.
सदर पंचनामा करताना रमेश चौखुंडे,प्रदिप जगन भोयर,भोजराज पाल,गुणाजी पिठाले,गिरीश धोटे,पुरूषोत्तम रोहणकर,राजुभाऊ पाल, योगेश्वर पाल,उद्धव निकुरे,सतिश पाल आणि कमलाकर भोयर,कुमार निकुरे आणि एकोडी गावातील बरेच नागरिक उपस्थित होते परंतु एकोडी गावात व आजुबाजूच्या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाली आहे.
वाघाने हल्ला केलेला रेडा कुणाच्या मालकीचा आहे अजून पर्यंत समजलेला नाही आहे.ज्या कुणाचं असेल त्यानं आप आपल्या जनावरांची चौकशी करून वनविभागाला सहकार्य करावे.
सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक; जिवीतहानी टळली
आष्टी : -
चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आष्टी - आलापल्ली महामार्गावरील Ashti ग्रामीण रुग्णालयाजवळ आष्टी येथील चौकातून येत असलेल्या ट्रकला सूरजागड कडून लोहखनिजाचा कच्च्या माल वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. हि घटना दिनांक दहा एप्रिल रोजी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेतील दोन्ही ट्रक चालक सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे
ट्रक क्रमांक एम एच ३३ टी ३६८३ हा आष्टी येथील चौकातून आलापल्ली कडे जात होता व ट्रक क्रमांक एम एच ३४बी झेड ३९७३ हा ट्रक सूरजागड येथून लोहखनिजाचा कच्च्या माल घेऊन येत होता या महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते त्यामुळे आष्टी कडून येणाऱ्या ट्रक चालकाने त्या वाहनाचा सुसाट वेग पाहून आपले वाहन उभे ठेवले तरी या उभा ठेवलेल्या ट्रकला सूरजागड कडून लोहखनिजाचा कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिली. असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे
या घटनेची आष्टी पोलिसांना माहिती होताच घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अपघातामुळे खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. या महामार्गावर सूरजागड लोहखनिजाची कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रका मोठ्या सुसाट वेगाने धावत असतात या महामार्गावर तर दुचाकी धारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो या महामार्गावर नेहमी अपघात होतच असतात आजपर्यंत अनेकांचे जीवही गेले आहेत तरी संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात येत नसल्याने सुरजागड लोहखनिजाच्या कच्च्या मालाची वाहतूक करणारे ट्रक चालक हे कोणाच्याच बापाला घाबरत नाही आहेत असे सामान्य नागरिकांकडून बोलल्या जात आहे आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयासमोर एका सुरक्षा रक्षकाची आवश्यकता आहे तरी याठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी अशी मागणी जनसामान्यांतून केली जात आहे
पाऊस आला रे आला... लखमापूर बोरी येथील नाल्यात वाहतात दारूच्या बाटल्या
लखमापूर बोरी :-
गडचिरोली जिल्ह्यात कठोर दारू बंदी असताना चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी इथे जवळपास प्रत्येक गटर नाल्यात मोठ्या संख्येने दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून येत असतात.
अचानक अवकाळी मुसळधार पाऊस आला रे आला की या सर्व रिकाम्या बाटला गावच्या खाल उतार भागाकडे जाणाऱ्या नालीच्या दिशेने म्हणजेच ग्रा.पं. कार्यालय जवळच्या परिसरात प्लास्टिक घन कचऱ्याच्या स्वरूपात जमा होतात.
पोलीस प्रशासनाचे गावाकडे नेहमी लक्ष्य असताना गावात एवढी अफाट दारू कोण विकत असावी , ही दारू बाहेर गावातून आपल्या गावात येत तर नसेल, प्रत्येक नाल्यातून असंख्य दारूच्या रिकाम्या बाटला पोहताना बघून असे ना-ना प्रकारचे प्रश्न उपस्थित होत असतात.
ग्रा.पं. कार्यालयाकडे अचानक शासकीय कर्मचारी किंवा इतर पाहुणे भेट द्यायला गेले की त्यांना कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्यात किंवा परिसरात असे असंख्य दारूच्या रिकाम्या बाटल्या दिसल्यास पाहुणे आपल्या गावाबद्दल चांगले विचार करतील की वाईट विचार करतील...? गावात दारू बंदी असून एवढ्या दारूच्या रिकाम्या बाटल्या येतात कुठून असा प्रश्न महिला वर्गाकडून केला जात आहे.
पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या नेतृत्वात धडक कारवाई
दारसह ३,९६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त
आष्टी: आगामी होणाऱ्या सार्वजीक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चोरट्या मार्गाने होणाऱ्या दारुची वाहतुक यांची माहीती काढुन कारवाई करणेबाबत आदेशित केले असल्याने, त्या अनुषंगाने दि.२९/०३/२०२४ रोजी रात्री अंदाजे ०१/३० वा. दरम्यान रात्रगस्त दरम्यान फिरत असतांना मौजा येणापुर ते जैरामपुर कडे जाणाऱ्या मौजा मुधोली चक नं.०१ येथील मेन रोडवर एका पांढऱ्या रंगाची महिन्द्रा बोलेरो कंपनीची एम.एच ३४ ए.व्हि २१३६ हे वाहन संशयित रित्या फिरतांना दिसुन आल्याने त्यास थांबवुन त्याची दोन पंचासमक्ष तपासणी केली असता सदर वाहनात ९० एम.एल मापाच्या ९६,०००/-रुपयाची देशी दारु व ०३ लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकुण ३,९६,००० (तिन लाख छयानव हजार रु. किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपीतां विरुध्द पौस्टे आष्टी अप क्र.५२/२०२४ कलम ६५ (अ), ८३ मदाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि मंडल करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक निलोत्पल,अप्पर पोलीस अधिक्षक (प्रशासन) चिंता,अप्पर पोलीस अधिक्षक (अहेरी) एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी कोकाटे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक काळे,यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मंडल, जगताप, पोलिस शिपाई राउत, मेंदाळे, येनगंटीवार,यांनी पार पाडली.
लखमापूर बोरी इथे व्यसनाच्या विचाराची पेटविली होळी
चामोर्शी : लखमापूर बोरी इथे अंधश्रद्धा निर्मूलन समिती व नेहरू युवा केंद्र प्रेरित शिवछत्रपती युवक मंडळातर्फे होळी सणाचे औचित्य साधून व्यसनांची करूया होळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील वॉर्ड क्रं. 01 मध्ये सदर कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सर्वांना नशामुक्ती चे माहिती पत्रक हातात देऊन विद्यार्थी, युवकांच्या व बालगोपालांच्या उपस्थितीत विविध प्रकारचे घातक व्यसन करणार नाही व दुसर्यांना पण करू देणार नाही यासाठी सातत्याने प्रयत्न करणार व व्यसनाचे विचार याच होळीत जाळनार अशी प्रतिज्ञा केली.
यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव दिलखुश बोदलकर यांनी मनोगताद्वारे उपस्थिताना मार्गदर्शन केले. तरुणांमध्ये विविध कारणांनी गुटका, बार, तंबाखू तसेच अन्य व्यसनी पदार्थ बिडी, सिगारेट यांचे सेवन व्यसनांमध्ये रूपांतरित होते. तसेच आजकाल बिअर दारू पिणे ही फॅशन बनली आहे. भविष्यात आपल्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम करणाऱ्या या व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहन मंगलताई मेश्राम व उज्वला शेंडे यांनी केले तसेच होळी - रंगपंचमी या सणामुळे समाज परिसरातील सर्व जातीधर्मात , प्रत्येक घरात व मित्र नातेवाईकांत आपुलकीची भावना निर्माण होत असून सर्वजण हे सण आनंदात साजरा करतात त्यामुळे कोणीही भेदभाव न करता सण साजरा करावे असे पण सांगितले.
यावेळेस अंनिस शाखा लखमापूर बोरी चे कोषाध्यक्ष टिकाराम शेंडे शिक्षक तसेच कालिदास मेश्राम, कविता केशव बोदलकर, बाबूराव नैताम, कपिल मडावी, दीपक मेश्राम, सुरज बांगरे, चंद्रहार बोदलकर, स्नेहा बोदलकर, देवाजी वासेकर, वैशाली सोनटक्के, उमेश सोनटक्के तसेच महिला व बालकवर्ग आदी उपस्थित होते.
पोलिसांनी दारुसह एकुण 28,40,000/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त
गडचिरोली: दि 25/03/2024
गडचिरोली जिल्हा हा दारुबंदी जिल्हा असून, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने जिल्हयात अवैध व छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने त्याविरुध्द पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे अवैद्य दारु विक्रीवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये काल दिनांक 24/03/2024 रोजी पोस्टे चामोर्शी हद्दीतील मौजा जंगमपूर जंगल शिवारातील जंगमपूर नाल्याच्या शेजारी 1) जुगल लखन दास, 2) देवदास किसन मंडल, 3) सुब्रातो विश्वास व इतर रा. नेताजी नगर (गाव क्रमांक 74) तह. चामोर्शी, जि. गडचिरोली हे मोहा सळवा फुलाची दारु काढून अवैधरित्या विक्री करत आहेत, अशी गोपनिय बातमीदारंाकडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोस्टे चामोर्शी प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक पुल्लरवार यांच्या नेतृत्वात महिला पोलीस उपनिरीक्षक राधिका शिंदे सह एक पथक चामोर्शी येथून सदर ठिकाणी रवाना करण्यात आले.
पोलीस पथक घटनास्थळावर पोहचताच सदर इसम पळून गेले.त्यानंतर सदर जागेची पाहणी केली असता, घटनास्थळावर 200 लीटर क्षमतेचे 26 प्लॅस्टीकचे ड्रम त्यामध्ये प्रत्येकी 200 लीटर मोहा फुल सडवा असे एकुण पाच हजार दोनशे लीटर अंदाजे किंमत 5,20,000/- चा मुद्देमाल आणि 200 लीटर क्षमतेच्या पांढऱ्या रंगाचे एकुण 116 प्लॅस्टीकच्या थैली त्यामध्ये प्रत्येकी 200 लीटर मोहा सडवा प्रमाणे 23 हजार 400 लीटर अंदाजे किंमत 23,40,000/- मोहा फुल सडवा असे एकुण 28 हजार 400 लीटर अवैध मोहा सडवा बाजार भाव विक्री किंमत 100 प्रती लीटर प्रमाणे एकुण 28,40,000/- चा मुद्देमाल मिळून आला. मुद्देमाल मोक्यावर रीतसर सॅम्पल घेऊन वेळीच घटनास्थळी पंचासमक्ष नष्ट करण्यात आला. त्यानंतर योग्य ती कार्यवाही करुन पोस्टे चामोर्शी येथे आरोपीतांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास मपोउपनि. राधिका शिंदे करीत आहेत.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. व मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) श्री. एम. रमेश सा. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. सुरज जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. विश्वास पुल्लरवार यांचे नेतृत्वात मपोउपनि. राधिका शिंदे, पोहवा/व्यंकटेश येलल्ला, पोअं/संदिप भिवणकर, मपोअं/मनिषा चिताडे, मपोअं/शिल्पा पोटे, चापोअं/सिंधराम यांनी केलेली आहे
राहुल वैरागडे यांच्या मार्गदर्शनातून युवकांनी केली पशु पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था, झाडावर बांधले पानवटे
आष्टी - सध्या दिवसेंदिवस तापमान वाढ होत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी पशु पक्षांचे हाल होत आहेत. पशु पक्षांचे होणारे हे हाल लक्षात घेऊन चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील युवा संकल्प संस्थेचे अध्यक्ष राहुल वैरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव चेतन कोकावार यांनी पुढाकार घेऊन येथील युवकांनी गावातील झाडांना पानवटे बांधून पशु पक्षांच्या पाण्याची सोय केली आहे.
सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे पक्षु पक्षी व वन्य प्राणी यांचे पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन भेंडाळा येथील तरुणांनी एकत्र येऊन पक्षांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या उदात्य हेतुने झाडांना पानवटे बांधून पक्षांना कायमस्वरुपी पिण्याचे पाणी मिळेल असे योग्य नियोजन करूण गावांतील झाडावर बांधण्यात आले आहेत. ग्रामस्थानीही या उपक्रमाला साथ देत नियमित या पानवट्यात पाणी भरून ठेवत आहेत. युवा संकल्प संस्थेचे अध्यक्ष राहुल वैरागडे यांनी पक्षांसाठी घरासमोर पाणी भरून ठेवावे असे आवाहन करीत आहेत. दरवर्षी भेंडाळा येथील तरुणांनी हाती घेतलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.राहुल वैरागडे मार्गदर्शनातून गेल्या सहा वर्षापासून जिल्ह्याच्या विविध भागात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, रोजगार ,आरोग्य,पर्यावरण ,क्रीडा ,मनोरंजन, असे उपक्रम जीवन वासेकर,कृष्णा चलाख, सुबिर मिस्त्री, भूषण नंदगिरीवार, विहान सातपुते, अर्जित दास, यश गुरु, यश, साहिल वासेकर,भैरव चलाख, कार्तिक बोरकुंटवार, अनिकेत वैरागडे, लक्ष्मण चलाख, कुशल मडावी, रोहन वैरागडे , कृष्णा पाटील, सागर जुवारे, कृष्णा कंकलवार, हे उपक्रम घेत असतात.
चपराळात महाशिवरात्री यात्रा ११ मार्च पर्यंत चालणार, तिर्थक्षेत्राचे अध्यक्ष संजय पंदिलवार यांची माहिती
आष्टी येथून १२ किमी अंतरावरील वर्धा व वैनगंगा नदीच्या संगमावरील निसर्गाच्या सानिध्यातील श्री हनुमान मंदिर प्रशांतधाम चपराळा येथे महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवार, ८ मार्चपासून यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हे यात्रा महोत्सव ११ मार्चपर्यंत चालणार असून याठिकाणी भाविकांची गर्दी उसळणार आहे.
महाशिवरात्र महोत्सवादरम्यान घटस्थापना, अभिषेक, ब्रह्मलीन परमपूज्य संत कार्तिकस्वामी महाराज यांच्या समाधीचे पूजन, स्थानिक भजन मंडळांद्वारे भजन, कीर्तन, भागवत कथा व धार्मिक प्रवचन आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रशांतधाम तीर्थक्षेत्राचे अध्यक्ष संजय पंदीलवार यांनी दिली आहे. यात्रेदरम्यान यात्रेकरूंच्या सुविधेसाठी आष्टी, चामोर्शी, गोंडपिपरी, अहेरी येथून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची सुविधा आहे. सोबतच शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त, आरोग्य सुविधा, पार्किंग सुविधा, पिण्याचे पाणी, दर्शन रांगेसाठी सेवकांची व्यवस्था, यात्रा परिसरात वीजपुरवठा आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी नदीवर स्नान करताना, जीवंत विद्युत तारेच्या जवळ फिरताना सतर्कता बाळगावी. तसेच आपत्ती क्षणी पोलीस, विश्वस्त मंडळाला माहिती द्यावी. ११ मार्च रोजी दुपारी वाजता आरती व गोपालकाला तसेच १.३० वाजता मुंबई येथील कल्पना नायर व नायर परिवाराकडून भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
ट्रकने चिरडले दुचाकीस्वारास, एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर
सोनापूर क्रांसिंग जवळ झाला अपघात
चामोर्शी :-
एका ट्रकने दुचाकीला जब्बर धडक दिल्याने एका ईसमाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर झाल्याची घटना आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास चामोर्शी जवळील सोनापूर फाट्यावर घडली चामोर्शी तालुका मुख्यालयापासून ५ किलोमीटर अंतरावरील सोनापूर क्रासिंग जवळ दिनांक ४ मार्च रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास अपघात झाला असून, सुरेश महादेव दुधबावरे, रा - सोनापूर हे आपल्या काही कामा निमित्य MH33 Z 6877 या दुचाकीने चामोर्शीला गेले होते वापस येतांना सोनापूर क्रासिंग जवळ जिंदाल स्टील कंपनीच्या ट्रक CG ०७,BG५५९७ ने बाईकला जब्बर धडक दिली हा अपघात एवढा भयानक होता की इथे सुरेश दुधबावरे यांच्या जागीच मृत्यू झाला . तर लुकेश रामभाऊ दुधबावरे हे गंभीर जखमी आहेत घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे पाठविण्यात आला असून पुढील तपास चामोर्शी पोलिस करीत आहेत
राष्ट्रीय महामार्गावरील जीवघेणे बॅरिकेड्स त्वरीत हटवा, सरपंच निलकंठ निखाडे यांची मागणी
बॅरिकेड्सला दुचाकीची धडक, दुचाकीस्वार गंभीर जखमी
आष्टी - चामोर्शी या 353C या मार्गावरील येनापुर येथे बॅरिकेड्स ला दुचाकीची जबर धडक बसल्याने दुचाकीस्वार गंभीर झाल्याची घटना दिनांक 28 फेब्रुवारी बुधवारी रात्री सव्वा नऊ वाजता घडली
प्रवीण आत्राम वय 30 वर्ष रा. राजगोपालपूर ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे गंभीर जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे.
प्रवीण हा आपल्या दुचाकीने आष्टी कडून राजगोपालपूर कडे जात असताना येनापुर मुख्य रस्त्यावर लावण्यात आलेल्या बॅरिकेड्स ला दुचाकींची समोरून येणाऱ्या वाहनाच्या लाईटमुळे डोळे दिपल्याने जबर धडक दिली यात प्रवीण गंभीर जखमी झाला. त्याला येणापूर येथील रूग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केल्यानंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील रूग्णालयात पाठविण्यात आले.
राष्ट्रीय महामार्गावर बॅरिकेड्स लावण्याची कोणताही परवानगी नसतानाही आष्टी चामोर्शी महामार्गावर विविध ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले हे बॅरिकेड्स जीवघेणे ठरत असताना ते कुणाच्या वरदहस्ताने लावण्यात आले, राष्ट्रीय महामार्गावरील या बॅरिकेड्स मुळे अपघातास आमंत्रण मिळत असुन नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. या मार्गांवरील हे बॅरीकेड्स त्वरित हटविण्यात यावे व कुणाच्या परवानगीने हे बॅरिकेड्स लावण्यात आले याची चौकशी करण्यात यावी व यामुळे अपघात झालेल्या दुचाकीस्वारास आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी सोमनपल्लीचे सरपंच व सरपंच ग्राम संवाद संघाचे तालुका अध्यक्ष नीलकंठ निखाडे यांनी केली आहे.
श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य रस्त्याची साफसफाई करून सामाजिक बांधिलकी जोपासली
चामोर्शी : तालुक्यातील आष्टी येथील श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था ही नेहमी सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असते दिनांक १८ फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजताच्या दरम्यान चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते शिवाजी चौक येथील मुख्य रस्त्याची स्वच्छता करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे
आष्टी येथे श्री छत्रपती शिवस्वराज्य संस्थेच्या वतीने दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती उत्सव साजरी करण्यात येणार आहे या शिवजयंतीच्या उत्सवाला येणाऱ्या शिवभक्तांना पाहून श्री छत्रपती शिवस्वराज्य संस्थेचे अध्यक्ष पवन रामगिरकार यांच्या नेतृत्वात ही स्वच्छता मोहीम राबवली आहे
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आष्टी शहरात श्री छत्रपती शिवस्वराज्य संस्थेच्या वतीने रांगोळी स्पर्धा, किर्तन यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
या स्वच्छाता मोहीमेत श्री छत्रपती शिवस्वराज्य संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष पवन रामगीरकार,सचिव संदीप तीवाडे, उपाध्यक्ष संदीप लोड्डेलीवार, रीतिक पांढरमिसे,प्रतिक रहाटे,देवा बोरकुठे ,आशिष झगडमवार,केतन कोकेरवार,आदित्य सिरपूरवार, गणेश कलाश्रपवार,लाला चावरे,द्रुप पेरकावार,रुपेश येलमुले यांनी या स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला
सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी शाळा हे प्रभावी माध्यम -- माजी प्राचार्य प्रमोद दोंतुलवार यांचे प्रतिपादन , सांस्कृतिक कार्यक्रमात सेवानिवृत्त कर्मचारी व पालकांचा झाला सत्कार :
राजे धर्मराव हायस्कूल चा उपक्रम
आष्टी (प्रतिनिधी) प्रतिकूल परिस्थितीत शाळेचा विकास घडवून शाळेला नावलौकिक प्राप्त झाला .स्नेहसंमेलन कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्हावा.शाळा हे सुसंकृत पिढी घडविण्याचे माध्यम आहे.असे प्रतिपादन माजी प्राचार्य प्रमोद दोंतुलवार यांनी केले. राजे धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातर्फे सांस्कृतिक व बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते उदघाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी आष्टी च्या सरपंच बेबी बुरांडे या होत्या तर
तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य अर्जुन दाते ,सेवानिवृत्त प्राचार्य महादेव उरकुडे ,माजी पोलीस पाटील शंकर मारशेट्टीवार , माजी उपसरपंच सुंदरदास उंदिरवाडे , प्राचार्य एन.एस.बोरकुटे , मुख्याध्यापक केशव खेवले , प्राचार्य डी.डी.रॉय , प्रभारी प्राचार्य रमण पडिशालवार , गोसावी गोंगले आदी उपस्थित होते.
सुरवातीला धर्मराव शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व.राजे विश्वेश्वरराव महाराज ,स्व.राजे सत्यवानराव महाराज , माता सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
पुढे बोलतांना प्राचार्य दोंतुलवार म्हणाले या शाळेतील विद्यार्थी डॉक्टर , इंजिनिअर झाले आहेत.विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श समोर ठेऊन यश प्राप्त करावे.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना माजी प्राचार्य दाते म्हणाले नागरिकांनी इंग्रजी शाळेच्या मागे न लागता मराठी शाळेतूनच मुलांना शिक्षण द्यावे .या शाळेतील बरेच विद्यार्थी उच्च पदावर पोहचले आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना माजी प्राचार्य उरकुडे म्हणाले विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटी ठेऊन चांगला विद्यार्थी बनण्याचा प्रयत्न करावा. सांस्कृतिक कार्यक्रमात आपली छाप उमटवून व शाळेतील विद्यार्थी उच्च पदावर पोहचून शाळेचा नावलौकिक करावे.
याप्रसंगी वर्षभर शाळेमध्ये राबविलेल्या स्पर्धेतील वाचन स्पर्धा , वर्ग सजावट , भाषण स्पर्धा , निबंध स्पर्धा , प्रश्नमंजुषा स्पर्धा , चित्रकला स्पर्धा , आदर्श वर्ग स्पर्धा , आदर्श विद्यार्थी व आदर्श शिक्षक यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डी.डी.रॉय यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.अनिता नलोडे व प्रा.नारायण सालूरकर यांनी केले
तर आभार प्रदर्शन सुधीर फरकाडे यांनी केले.
कार्यक्रमाला पालक ,गावातील नागरिक , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बॉक्स -- यांचा झाला सत्कार
सेवानिवृत्त कर्मचारी --पर्यवेक्षक अरुण नागुलवार , शिक्षक कृष्णाजी पारखी , शिक्षिका छाया नागुलवार , शिक्षक बाबुराव कत्रोजवार , किशोर गोविंदवार , शिक्षक मंडल , लिपिक बंडोपंत मलेलवार , लिपिक गेडाम , शिपाई बंडोपंत अमलपुरीवार
आमदार होळी ज्या विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करीत आहेत,त्याच क्षेत्रातील चामोर्शी तालुक्यात समस्यांचे महापूर असून.आमदार होळी अनभिज्ञ आहेत की काय ? अशी चर्चा जनमानसात सुरू आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात आमदारांचा बळकिल्ला म्हणून ओळखला जाणारा चामोर्शी तालुका. परंतु याच तालुक्यात आमदार साहेब समस्या मिटविण्यास कमकुवत आमदार,म्हणून आता जनमानसात सर्वत्र चर्चा असून,सगळीकडे नाराजीचे सूर उमटतांना दिसतो आहे.
23/1/2024 रोजी गणपूर गावातील ७ महिला मिरची तोडण्यासाठी नदी ओलांडून नावेवर जात असताना,त्यांना जलसमाधी मिळाली.म्हणजे नाव उलटून तब्बल सहा महिला मृत्यूमुखी पडल्या असून.गणपूर गावावर शोककळा पसरली होती.परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या गेली.
ज्या महिला मृत्युमुखी पडल्या त्या नदीचा जलस्तर वाढला म्हणून असला प्रकार घडला आणि हे सत्य हे आहे.पण याला जबाबदार शासन आहे की प्रशासन याचाही विचार व्हायला पाहिजे.
चामोर्शी तालुक्यात कोणसरी व इतर परिसरातील जमिनी भूसंपादन करून शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा प्रकार सुरू असून.त्या विरोधात शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करून 18/1/2024 रोजी चामोर्शी एस.डि.ओ.ऑफिसवर भव्य मोर्चा निघाला व शासनाविरोधात व स्थानिक आमदार विरोधात जन आक्रोश व्यक्त करण्यात आला.
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडा देव येथील मंदिर पुरातत्व विभागाकडून पाडण्यात आला.आठ वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी पण मंदिरांचा काम पूर्ण झाला नाही.
आता 26 तारखेला मार्कंडा येथे मुरलीधर महाराज यांनी बैठक घेऊन,गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मंदिराचा काम त्वरित सुरू करावा अन्यथा भाविकांमार्फत जन आंदोलन उभे करू,असा पवित्रा घेतला आणि परिसरातील भाविक आंदोलनाच्या तयारीत असून,त्यांचा रोष स्थानिक आमदारावरच असल्याचा दिसून येत आहे.
भेंडाळा परिसरातील कृषीपंपधारक शेतकरी भारनियमनामुळेच आमदारावर नाराज आहेत,हे सर्वधूत आहे.
एकंदरीत चामोर्शी तालुक्याच्या विचार करायला गेला तर पुढील निवडणूक आमदार साहेबांना जड जाणार आहे.
वैनगंगा नदीत नाव उलटून सहा महिला बुडाल्या, शोधमोहीम वेगात सुरू आहे
गडचिरोली : वैनगंगा नदीच्या गणपूर (रै.) घाटावरून निघालेली डोंगा पाण्यात बुडाल्याने ६ महिला वाहून गेल्याची घटना आज २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली आहे.या घटनेत एका महिलेचे मृतदेह मिळालेले असून अद्याप ५ महिला बेपत्ता आहेत. तर एका महिलेला वाचविण्यात आले आहे.
सदर महिला मिरची तोडण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्यातील गावात डोंग्याने सहाय्याने जात होत्या. अचानक पाण्यात नाव वाहून गेल्यामुळे सहा महिला आणि नावाडी बुडाले. नावाडी पोहून बाहेर निघाला व एका महिलेला वाचविण्यात आले. चामोर्शी पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. शोधमोहीम वेगात सुरू आहे.