श्री रतन टाटा यांच्या जाण्याने सम्पूर्ण भारतवासी दुःखाचे अश्रू वाहत आहेत कारण ते सामान्य लोकांसाठी खूप मोठे देव माणूस होते. त्याना सामान्य माणसाच्या गरजा, दुःख, वेदना या सगळ्या गोष्टी कळत होत्या. म्हणूनच त्यांची इमेज एक वेगळीच तयार झाली. त्याना त्यांच्या अफाट संपती चा अजिबात घमण्ड नव्हता. म्हणूनच ते सामान्य जनतेसाठी एक हिरो होते.
खरच त्यांच्या जाण्याने अख्या भारत रडला आहे.
पण आता श्री रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर नोएल टाटा यांच्या खाद्यांवर आता टाटा समूहाची जबाबदारी आली आहे. नोएल टाटा, टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष आहेत. त्यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड झाली. मुंबईत टाटा ट्रस्टच्या बैठकीत हा निर्णय झाला. सध्या नोएल टाटा हे सर दोराबजी टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. आता त्यांच्या खाद्यावर टाटा ट्रस्टची जबाबदारी आली आहे. 100 देशांमध्ये विस्तारलेल्या टाटा समूहाच्या व्यावसायिक साम्राज्याचे नेतृत्व ते करतील. टाटा समूह आज 39 लाख कोटींचा आहे.
भारतातील मोठे उद्योगपती म्हणून नावलौकिक असलेल्या रतन टाटा यांचा मृत्यू झाल्यानंतर आता टाटा समूहाचे अध्यक्षपद कुणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं.
रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा (67) यांचा या पदासाठी विचार करण्यात आला आहे.
रतन टाटा यांचे वडील नवल टाटा यांची दुसरी पत्नी म्हणजे सिमोन टाटा यांचे नोएल टाटा सुपुत्र आहेत.
नोएल हे टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, व्होल्टाज् अँड टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन आणि टाटा स्टील आणि टायटन कंपनी लिमिटेडचे व्हाईस-चेअरमन आहेत.
नोएल टाटा यांची तीन मुलेदेखील टाटा समूहाशी निगडीत असलेल्या काही धर्मादाय संस्थांच्या मंडळावर आहेत.
नोएल टाटा यांचे सुपुत्र नेव्हिल हे स्टार बझारचे प्रमुख आहेत. त्यांची मुलगी लिया टाटा या गेटवे ब्रँड सांभाळत आहे. त्यांची दुसरी मुलगी माया टाटा यांच्याकडे टाटा डिजीटलची जबाबदारी आहे.
“माझ्या सहकारी विश्वस्तांनी माझ्यावर टाकलेल्या जबाबदारीमुळे मी अत्यंत सन्मानित आणि नम्र आहे. रतन टाटा आणि टाटा समूहाच्या संस्थापकांचा वारसा पुढे नेण्यास मी उत्सुक आहे. एक शतकापूर्वी स्थापन झालेली टाटा ट्रस्ट ही सामाजिक हिताचे काम करण्यासाठी एक अद्वितीय साधन आहे. या पवित्र प्रसंगी, आम्ही आमच्या विकासात्मक आणि परोपकारी उपक्रमांना पुढे नेण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीत आमची भूमिका निभावण्यासाठी स्वतःला पुन्हा समर्पित करतो,” नोएल टाटा यांनी टाटा ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या नियुक्तीबद्दल सांगितले. आपल्या पहिल्याच संबोधनात राष्ट्रहिताची बात करत नोएल टाटा यांनी टाटांचा आणि रतन टाटांचा वारसा पुढे नेण्याचा दृष्टीकोन समोर ठेवला.
अश्याच प्रकारच्या नवनवीन ताज्या बातम्या व सरकारी योजनेची माहिती नोकरी संदर्भात विस्तृतपणे जाणून घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा...