PostImage

Chunnilal kudwe

Aug. 28, 2023   

PostImage

चिमूर येथे १० सप्टेंबर ला भव्य दही हंडी स्पर्धा


सिने अभिनेत्री अमृता खानविलकर यांची उपस्थिती

 

भांगडिया फॉउंडेशनच्या वतीने 10 सप्टेंबर रविवार ला सायंकाळी 4 वाजता चिमूर येथील नेहरू विद्यालयाच्या प्रांगणात भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध सिने अभिनेत्री चंद्रमुखी फेम अमृता खानविलकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या दही हंडी स्पर्धाचे उद्धघाटण माजी आमदार मितेश भांगडीया करनार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चिमूर  विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया उपस्थीत राहनार आहेत.

 

चिमूर विधानसभा क्षेत्रात मागील दहा वर्षापासुन सामाजिक  क्षेत्रासह विवीध क्षेत्रात भांगडिया फॉउंडेशन चे मोठे योगदान आहे या फॉउंडेशनच्या माध्यमातून जनतेच्या हिताचे विविध कार्यक्रम, उपक्रम राबवील्या जातात. दरवर्षी प्रमाने याही वर्षी शहरात दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे. या स्पर्धेचे प्रथम बक्षीस 33,333 रुपये तर द्वितीय बक्षीस 22,222 रुपये आहे राहणार आहे तरी या दहीहंडी स्पर्धेला विदर्भातील जास्तीत जास्त गोविंदा पथकानी नोंदणी करण्याचे आवाहन भांगडिया फॉउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.


PostImage

pramod abhiman raut

Aug. 22, 2023   

PostImage

आमदार बंटी भांगडिया यांचा "एक हात मदतीचा"


 

आ. बंटी भांगडिया यांनी दिली खडसंगी जिल्हा परिषद सर्कल मधील आपद्ग्रस्तांना घरपोच मदत आर्थिक मदत

चिमूर प्रतिनिधी :-

        चिमुर तालुक्यातील बोथली (वाहनगाव) येथील रहिवाशी सायत्रा निळकंठ ढोक हिला औषधोपचार करीता आर्थीक मदत सुपुर्द केले. भिवकुंड येथील पुष्पा वामन ननावरे हिचे पती रानडुकराच्या हल्ल्याने मरण पावले असता त्यांचे निवासी सांत्वन भेट. परसोडी येथील देविदास गोविंदा भोयर यांचे अतिवृष्टीने शेतातील विहिरीचे बांधकाम खचले असता आर्थीक मदत सुपुर्द केले.

      संबंधितांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने खर्च करायचा कसा हा प्रश्न कुटुंबियासमोर निर्माण झाला. कुटुंबीयांनी स्थानिक भाजप पदाधिकारी मार्फत किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र यांना  आर्थिक मदतीची मागणी केली असता बंटी भांगडिया यांनी कोणताही विचार न करता भाजपा तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे यांच्या मार्गदर्शनात सदरहू आर्थीक मदत पाठविण्यात आली.

       रेंगाबोडी येथील कन्हैय्या देवराव मदन यांच्या मुलीच्या औषधोपचार करीता आर्थिक मदत देण्यात आली मात्र  मदनकडचे घरी कोणीही नसल्यामुळे, त्यांचे सुपुर्द करण्याकरिता रेंगाबोडी येथील अर्जुन थुटे यांचेकडे आर्थिक मदत  ठेवण्यात आली.

       यावेळी भाजपायुमोचे  महामंत्री रोशन (मोनू) बंसोड, बुथ  अध्यक्ष सुरेश मांडवकर, बोथलीचे सरपंच देठे, रमेश कंचर्लावार, राकेश कामडी, पवन निखाडे, भाजपा जेष्ठ नेते अर्जुन थुटे, तसेच शेजारील मंडळी उपस्थीत होते.


PostImage

pramod abhiman raut

Aug. 21, 2023   

PostImage

आमदार बंटी भांगडियावर तेलंगणा राज्यातील प्रचाराची जबाबदारी


 

चिमूरचे आमदार बंटी भांगडिया करीत आहेत तेलंगणात प्रचार

चिमूर प्रतिनिधी :-

       आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांचे चिमूर विधानसभा क्षेत्रातील न भूतो असे विकासकार्य व कुशल नेतृत्वात भाजपाचे मजबूत संघटन, पक्ष बळकटीकरण ह्या सारख्या अनेक गोष्टींची भाजप आणि पक्षाच्या वरिष्ठांनी दखल घेत. तेलंगणा राज्यातील कागजनगर या विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपाच्या प्रचाराची मोठी जबाबदारी आमदार बंटी भांगडिया यांच्याकडे सोपविण्यात आली. 

       या प्रचार दौऱ्याला मागील दोन दिवसापासून सुरवात झाली असून, पक्ष संघटनेच्या वतीने एकूण ८ दिवस विविध स्थानी, पक्ष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यानुसार कागजनगर विधानसभेच्या विविध क्षेत्रातील भागांमध्ये जाऊन भाजपा व मित्र पक्ष, पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि प्रचार दौऱ्यात सहभाग घेतला. यावेळी मागील दोन दिवसापासून चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया हॆ तेलंगणा राज्यात तळ ठोकून असून प्रचारात धोबीपछाड मारली जात आहे. तेलंगणात ते प्रत्येक गाव पिंजून काढत प्रचाराला सुरवात केली असून अधिक प्रबळ असं नेत्रुत्व आमदार बंटी भांगडिया हॆ करीत आहेत.

         यावेळी आमदार बंटी भांगडिया हॆ सिरपूर, कागजनगर विधानसभा क्षेत्र पिंजून काढत असून, आमदार बंटीभांगडियानी भारतीय जनता पक्षाचे आसिफाबाद जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीनिवास यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी आमदार बंटी भांगडिया यांचे औक्षण करीत उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. दरम्यान, आमदार बंटी भांगडियानी श्रीनिवास कुटुंबीयांशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या.

      तसेच सिरपूर, कागजनगर विधानसभा क्षेत्रात आमदार बंटी भांगडियानी आज प्रथम श्रावण सोमवार व नागपंचमी निमित्त इसगाव, कागजनगर येथील पुरातन श्री शिव मंदिर देवस्थानाला सदिच्छा भेट देऊन पूजाअर्चा केली.

       यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, टिमु बलदुवा, माजी सभापती/नगरसेवक न.प. चिमूर सतीश जाधव व अन्य कागजनगर भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

pramod abhiman raut

Aug. 17, 2023   

PostImage

स्वातंत्रदिनी चिमूर तालुक्यात भाजपा युवा मोर्चाने काढली "तिरंगा रॅली"


 

हजारो युवकांची उपस्थिती ; डीजे च्या तालावर तालुक्यात दुमदुमली रॅली

चिमूर प्रतिनिधी :-

       शासनाचे हर घर तिरंगा असे शासन आदेश मागील वर्षापासून धोरण राबविण्यात येत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मनात राष्ट्र प्रेम निर्माण व्हावे याकरिता प्रत्येक घरोघरी स्वातंत्र दिनी तिरंगा लावण्यात आला असून चिमूर तालुक्यात सुध्दा मागील वर्षीपासून आमदार बंटी भांगडिया यांच्या उपस्थितीत चिमूर क्रांती भुमीतील तालुक्यात तिरंगा रॅली काढण्यात येत आहे. यापण 15 ऑगस्ट स्वातंत्रदिनी हजारो युवकांच्या उपस्थितीत चिमूर, भिसी, शंकरपूर, नेरी या गावातून तिरंगा रॅली काढण्यात आली.

     सदर तिरंगा रॅलीचे आयोजन भाजपा नेते समीर राचलवार यांच्या मार्गदर्शनात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रत्येक गावागावातून स्वयंस्फुर्तीने हजारो युवकांनी आपआपली दुचाकी घेऊन  उपस्थिती लावली होती. 

      सदर रॅली बालाजी महाराजांचे दर्शन घेऊन चिमूर गदगाव मार्गावर असणाऱ्या कॉटन इंडस्ट्रीज येथून तिरंगा रॅली ला सुरवात करण्यात आली. यावेळी चिमूर येथील मुख्य मार्गाने डीजे च्या तालावर रॅली भिसी येथे पोहचली असता, येथून सुध्दा शेकडो युवक रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी आमदार बंटी भांगडिया यांच्या हस्ते जयस्तंभ चौकातील शिलालेखाचे अनावरण करण्यात आले. यानंतर मार्गावर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार टाकून रॅली शंकरपूर मार्गस्थ झाली होती. शंकरपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वातंत्र दिनाचे नारे देण्यात येऊन रॅली जांभूळघाट मार्गे नेरी ला निघाली होती. नेरी वरून चिमूरला तिरंगा रॅली पोहचली व रॅलीचा शहीद क्रांती भूमीत सांगता करण्यात आली.

    तिरंगा रॅली महामार्गाने जात असतांना ताडोबासाठी येणारेजाणारे पर्यटक व शेतात असणारे शेतमजूर तिरंगा रॅलीला हात दाखवून उत्तम प्रतिसाद देत होते. त्याच आशेने आमदार बंटी भांगडिया सुध्दा हात देऊन दाद देत होते. यावरून बंटी भांगडिया आगे बढो हम तुम्हारे साथ है याप्रमाणे असा उत्तम आशावाद मिळत होता. यावेळी भाजपाचे भाजपा तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजपा युवा नेते समीर राचलवार, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव मनीष तुम्पल्लीवर, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष संजय नवघडे,भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालू पिसे, शहर अध्यक्ष बंटी वनकर, माजी सभापती प्रकाश वाकडे, रोशन बनसोड, प्रमोद श्रीरामे, अमित जुमडे, श्रेयश लाखे, भूषण सातपुते, विक्की कोरेकर, गोलू मालोदे, प्रमोद श्रीरामे, प्रफुल कोलते, संदीप पिसे, किशोर मुंगले, लीलाधर बनसोड, सलीम शेख, ईत्यादी भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

pramod abhiman raut

Aug. 17, 2023   

PostImage

भिसी येथील जयस्तंभ चौकातील शिलालेखाचे आ. बंटी भांगडिया यांचे हस्ते …


 

चिमूर प्रतिनिधी :-

       भिसी ही पुरातन नगरी आहे. येथील नागरिकांनी स्वातंत्र्य लढ्यात घेतलेल्या सक्रीय सहभागाची इतिहासात लेखी नोंद आढळत नसली तरी सन 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं ती आठवण चिरंतन ठेवण्यासाठी 1947 मध्ये भिसी येथे उभारलेला जयस्तंभ अजूनही बाजार चौकात उभा आहे. याच जयस्तंभाशेजारी भिसी नगर पंचायतीच्या वतीने स्वातंत्र्यविरांच्या सन्मानार्थ एक शिलालेख बांधण्यात आला आहे. या शिलालेखाचे अनावरण आज (15 ऑगस्ट 2023) स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्या हस्ते दुपारी एक वाजता करण्यात आले.

      याप्रसंगी नगर पंचायत भिसीच्या मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड, भिसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश राऊत, पोलीस उपनिरीक्षक सचिन जंगम, भाजपा नेते मनोहर मुंगले, गोपाल बलदुआ, किशोर मुंगले, रामू जाजू व भिसी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

pramod abhiman raut

Aug. 14, 2023   

PostImage

चिमूरात उद्या आमदार बंटी भांगडिया यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली


 

तर 16 तारखेला शहीद स्म्रुतीदिन सोहळा

चिमूर प्रतिनिधी 

      चिमूर येथे आज 15 ऑगस्ट 2023 स्वातंत्रदिनानिमित्त चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य तिरंगा चिमूर शहारासह चिमूर, भिसी, शंकरपूर, जांभुळघाट, नेरी, चिमूर  अशी भव्य रॅली निघणार आहे. ही रॅली चिमूर कॉटन इंडस्ट्रीज एमआयडीसी चिमूर येथून सकाळी 10 वाजता मुख्य मार्गाने भव्य तिरंगा रॅली निघणार आहे. 

रॅलीत आमदार बंटी भांगडिया यांच्या प्रमुख उपस्थितीसह हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. असे भाजपा नेते समीर राचलवार यांनी सांगितले आहे. तरी, सदर तिरंगा रॅलीत  सर्वांनी सहभागी व्हावे. असे आवाहन चिमूर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

     16 ऑगस्ट रोजी शहीद स्म्रुती दिन सोहळा
    चिमूर क्रांतीभूमी ही शहिदांची क्रांती भूमी असून या क्रांती भूमीत दरवर्षी 16 ऑगस्ट ला शहीद स्म्रुती दिन सोहळा आयोजन केले जाते. यावर्षी  अभ्यंकर मैदान चिमूर येथे शहीद स्म्रुती दिन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा सुध्दा स्म्रुती दिन कार्यक्रम करण्यात येणार आहे. या तरी या कार्यक्रमाला चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांचे सह अन्य मान्यवर उपस्थित राहून शहीद विराना अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.

       सदर कार्यक्रमात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून शहीद वीरांना नमन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला चिमूर परिसरातील जनतेनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा चिमूर तालुकाच्या वतीने करण्यात आले आहे


PostImage

pramod abhiman raut

Aug. 14, 2023   

PostImage

भक्तनिवास बांधकामासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल भिसी वासीयांतर्फे आमदार …


 

चिमूर तालुका प्रतिनिधी :-

      आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी चिमूर तालुक्यातील श्री विठ्ठल रुखमाई मंदिर, देवस्थान भिसी येथे भक्तनिवास बांधकामासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल देवस्थान समिती व समस्त भिसी वासीयांतर्फे आमदार बंटी भांगडियाचे चिमूर येथील निवासस्थानी माता-भगिनींनी उत्स्फूर्तपणे औक्षण केले. त्यांनंतर, ज्येष्ठांनी पेढे भरवून व भव्य पुष्पहाराने अभिनंदन केले. तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती, भगवी टोपी, शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट देऊन त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला आणि विशेष आभार व्यक्त केले. दरम्यान, आमदार बंटी भांगडियानी ज्येष्ठांना शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ भेट देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला.

       यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, श्री विठ्ठल-रुखमाई देवस्थानचे अध्यक्ष गरीबाजी निमजे, सचिव - मनोहरजी मुंगले, भाजपा नेते - बापुरावजी बोमेवार, डोमळुजी ठोंबरे, गोपाल बलदुवा, समीर राचलवार, किशोर मुंगले, निलेश गभणे, अभय मुंगले, सुनिल खवसे, लीलाधर बनसोड, किशोर नेरलवार, शेखर ठोंबरे, विनोद खवसे, संजय डूकरे, विनोद खेडकर, सागर श्रीरामे, पत्रूजी पडोळे, धनराज खेरे, विलास बानकर, जगदिश बोमेवार, बंडू तुंबेकर, अनिल नागपुरे, विलास दिघोरे, हरिश्चन्द्र नागपुरे, धनराज खेरे, रफिक शेख, सलाम पठाण, हरिश्चन्द्र पडोळे, नथुजी गेडाम, रजनीकांत मुंगले, ईश्वर रामटेके, खोमदेव कामडी, पुंडलिक येरुणकर, गोविंदा पाटील, काकपुरे सर, जगदिश कुमरे, विनाताई अहेर, काकपुरे ताई, योगिता गोहणे, पुष्पाताई मुंगले, मंजुश्री मुंगले, साधना मुंगले, शशिकला तुंबेकर, मनीषा खवसे, सरिता गोहणे, यमुना मुंगले, पौर्णिमा मुंगले, शारदा मुंगले, दुर्गा मेश्राम व अनेक भिसी वासीय नागरिक आणि भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.