PostImage

सुपर फास्ट बातमी

Nov. 4, 2024   

PostImage

Brahmpuri news: धानाचे पूजने गावातील डासखोर नागरिकाने जाळले


 

ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी तालुक्यातील अवघ्या पाच कि. मी अंतरावरील असलेला झिलबोडी येथील रहिवाशी देविदास दमके यांचे अंदाजे दोन-तीन ऐकरातील धान कापून बांधून जमा केलेले धानाचे पूजने याच गावातील डासखोर नागरिकाने जाळल्यामुळे दमके या अत्यंत गरीब कष्टकरी

 

शेतकरी यांची भरून न निघनारी हानी झाली आहे. या जळालेल्या पुजन्यापासुन पंचेवीस ते तीस पोते धानाचे उत्पादन होण्याचा अंदाज होता. या घटनेची पोलिसात तक्रार दाखल केली चौकशी सुरू केली आहे. या कालावधीत दोन तीन दिवस दिवाळीच्या शासकीय सुट्ट्‌या असल्यामुळे महसूल अधिकारी यांना सूचना देण्यात आली नाही.

 

अज्ञात आरोपीवर कारवाईची मागणी

 

ऐन हातात आलेले पिक जळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जळालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणी देविदास दमके यांनी केली आहे. दिवाळीच्या सुट्यामुळे सदर प्रकरणाची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली नाही तरी संबधीत प्रकरणाची चौकशी करून व अज्ञात आरोपी वर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला यावा अशी मागणी केली आहे. (ता.प्र.)

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Sept. 11, 2024   

PostImage

ब्रम्हपुरी: विजेचा करंट लागुन 4 जणांचा मृत्यू


 

ब्रम्हपुरी : दिनांक, ११/०९/२४ ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपुर मेंडकी येथील शेतकरी शेतातील धानाला खत मारण्यासाठी गेले. खत मारता मारता शेतात थ्री फेस लाईन असल्यामुळे कदाचित ओलाव्यामुळे (अर्थिगला) असलेल्या जिवंत करंट मुळे मृत्यू झाला असे बोलले जात आहे.

 

1) नानाजी पुंडलिक राऊत वय, 50 वर्ष

 

2)प्रकाश खुशाल राऊत वय, 40 वर्ष 

 

3)युवराज झींगर डोंगरे वय, 45 वर्ष तिघेही राहणार गणेशपुर व

 

4) पुंडलिक मानकर वय, 60 वर्ष राहणार चिचखेडा

 

यांचा शेतात जागीच मृत्यू झाला. यात दोघे जण सुखरूप बचावले. शेतात एकूण सहा जण काम करीत होते. चौघांच्या च्या मृत्यू मुळे ब्रम्हपुरी तालुका व गणेशपुर येथे शोककळा पसरली आहे.

 

चारही मृतककांचे शव शवविच्छेदनासाठी ब्रह्मपुरी येथे उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Sept. 8, 2024   

PostImage

ब्रह्मपुरी: कॉलेजला निघालेल्या युवकाने नदीत घेतली उडी


ब्रह्मपुरी : दुचाकीने आरमोरी येथील कॉलेजमध्ये निघालेल्या एका युवकाने वैनगंगा नदी उडी घेतली. ही खळबळजनक घटना शुक्रवारी (दि. ६) उघडकीस आली. समीर सोमेश्वर राऊत, (वय २४, रा. हळदा) असे उडी घेतलेल्या युवकाचे नाव आहे. पुलावर दुचाकी व चप्पल आढळल्याने ब्रह्मपुरी पोलिसांनी शोध सुरू केला. मात्र समीरचा अद्याप पत्ता लागला नाही. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

 

ब्रह्मपुरी येथील ३० किमी अंतरावरील हळदा येथील समीर राऊत हा युवक गुरुवारी दि. ५ आरमोरी येथील कॉलेजमध्ये जातो, असे कुटुंबीयांना सांगून दुचाकीने (एम. एच.३४ सी. ए. ०८७८) निघाला. मात्र रात्र होऊनही घरी परत आला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी मित्रांकडून माहिती काढली. कुठेच पत्ता लागला नाही.

 

कुटुंबाने नातेवाइकांकडे चौकशी केली व परिसराची पाहणी केल्यानंतर ब्रह्मपुरी-आरमोरी मार्गावरील वैनगंगा नदी पुलावर दुचाकी व चप्पल आढळली. त्यानंतर ब्रह्मपुरी पोलिसात तक्रार करण्यात आली.

 

शुक्रवारी पोलिसांनी पथक तयार करून नदी पात्राची पाहणी केली. पण समीरचा शोध लागलेला नाही. आज शनिवारी देखील पोलिसांचे पथक दिवसभर नदी काठावर शोध घेत होते. पण पत्ता लागला नाही.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 26, 2024   

PostImage

शेळीला वाचविण्याच्या प्रयत्नात मेंढपाळ बुडाला


 ब्रह्मपुरी येथील दहा किमी अंतरावरील बेलदाटी येथे नहरात पडलेल्या शेळीच्या वाचविण्याच्या प्रयत्नात मेंढपाळाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. मधुकर संपत मेश्राम (५१) असे मृत मेंढपाळाचे नाव आहे. ज्या शेळीच्या वाचविण्याचा मेंढपाळाने प्रयत्न केला ती शेळी मात्र

 

सुखरूप नहरातून बाहेर पडली. बेलदाटी येथील चुना फॅक्टरी शेजारी असलेल्या गोसेखुर्द

 

नहाराजवळ काही सहकाऱ्यांसोबत मधुकर मेश्राम हे शेळ्या चारत होते. दरम्यान, एक शेळी नहरात पडली. नहरातील पाण्याचे वेग अधिक असल्याने तिला निघता येत नव्हते. मधुकर मेश्राम यांनी तिला काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते नहरात उतरले. मात्र पाण्याचा अधिक वेग अधिक असल्याने ते पाण्यात वाहून गेले. यासंदर्भात ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती कळविली. मेंडकी येथील पोलिसांनी शोधकार्य सुरु केले असता काही अंतरावर त्यांचा मृत्यूदेह आढळला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी आहे. घटनेचा पुढील तपास मेंडकी पोलिस करीत आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 26, 2024   

PostImage

कारच्या धडकेत आठ वर्षीय बालकाचा मृत्यू


 ब्रह्मपुरी : येथील गांधीनगरातील क्रीडा संकुलासमोर कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. श्रवण संतोष पवार (८ वर्ष) असे मृतक बालकाचे नाव आहे.

 

 

रविवारी सायंकाळच्या वेळी श्रवण रस्त्यावर सायकल चालावित होता.याचवेळी आर्मी लिहिलेली कार क्रमांक एमएच ३४ बीवाय ९१७४ ने त्याला धडक दिली. या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी त्याचा रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. यावेळी उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली होती.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 18, 2024   

PostImage

पहिला प्रयत्न फसला; दुसऱ्या प्रयत्नात 'एमबीबीएस' तरुणीची आत्महत्या


 

अनेकांनी काढला व्हिडीओ : आत्महत्येचे कारण अस्पष्ट

 

 ब्रह्मपुरी : येथील एका 'एमबीबीएस' पदवीधर तरुणीने वैनगंगा नदीच्या पात्रामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. १६) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या तरुणीने प्रथम नदीत उडी घेतली. पाणी कमी असल्याने ती बचावली, मात्र पुन्हा तिने खोल पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भातील व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. ईशा घनश्याम बिंजवे (२४) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

 

ब्रह्मपुरी येथील रहिवासी डॉक्टर घनश्याम बिंजवे यांची मुलगी ईशा घनश्याम बिंजवे ही मंगळवारी (दि.१६) रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अॅक्टिवाने (क्रमांक एमएच- ४९, झेड- ४१७६) वडसा येथील वैनगंगा नदीच्या पुलावर आली. पुलावर दुचाकी उभी केली. त्या गाडीवर आपल्या चप्पल ठेवल्या. त्यानंतर नदीच्या पुलावरून उडी घेतली. नदीच्या पात्रात पाणी कमी असल्याने ती बचावली. मात्र, आत्महत्या करण्याचा निश्चय करून आल्याने तिने त्याच नदीमध्ये जास्त पाणी असलेल्या ठिकाणी पुन्हा उडी घेतली. यावेळी मात्र पाणी अधिक असल्याने ती वर आलीच नाही. या घटनेचा पुलावरून येणाऱ्या-जाणाऱ्या काहींनी व्हिडीओ काढला. मात्र, वाचविण्यासाठी कुणीही धावले नाही. घटनेनंतर पोलिसांनी तिचाशोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत तिचा शोध लागला नव्हता. बुधवारी सायंकाळी वैनगंगा नदीच्या नीरज गावाजवळील पात्रामध्ये तिचा मृतदेह आढळून आला. तिने आत्महत्या का केली, हे मात्र कळू शकले नाही.

 

 

वाचविण्यासाठी नागरिक धावले असले तर...

 

वैनगंगा नदीच्या पुलावर ईशाने आपली दुचाकी उभी केली. त्यानंतर तिने आत्महत्या केली. या घटनेचा अनेकांनी व्हिडीओ, तर काहींनी फोटो काढले. मात्र, तिला वाचविण्यासाठी कुणीही धावले नाही. पहिल्या प्रयत्नानंतर नागरिकांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित तिचा जीव वाचू शकला असता, असे नागरिकांमधून बोलले जात आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 28, 2024   

PostImage

अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला ठार


 

 

 

 ब्रह्मपुरी : येथील राष्ट्रीय महामार्गाच्या टोल नाक्यापासून काही अंतरावर अन्नपूर्णा ढाब्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. २७) रात्री घडली.

 

मनोरथा शांताराम बावनकुळे (५५, रा. खरबी) मृत महिलेचे नाव आहे. अन्नपूर्णा ढाब्याजवळ विजेचे दिवे नसल्याने या मार्गावर अंधार असतो. बुधवारी रात्री खरबी येथील मनोरथा बावनकुळे ही रात्रीच्या सुमारासरस्त्यावरून जात होती. दरम्यान, अज्ञात वाहनाच्या धडकेत ती जागीच ठार झाली.

 

 

 

ही महिला मतिमंद होती. त्यामुळे कोणत्याही वेळेला रात्री-अपरात्री घराबाहेर निघत असायची, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. या मार्गावर भरधाव वेगाने वाहने दामटली जातात. त्यामुळे यापूर्वी देखील अपघात झाला आहे. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलिस करीत आहेत.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 25, 2024   

PostImage

अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा आरोपी गजाआड


 

ब्रम्हपुरी : तालुक्यातील लाडज येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीला ब्रम्हपुरी पोोलिसांनी राजस्थान मधून अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली. जितेश रामबाबू जागा रा. जयपूर. राजस्थान असे आरोपीचे नाव आहे. लाडज येथील एका अल्पवयीन मुलीला आरोपीने फूस लावून कुटूबियांना न सागता पळवून नेल्याची तक्रार कुटूबियांनी ब्रम्हपुरी पोलिसात दाखल केली होती. 

 

त्यावरून ब्रम्हपुरी पोलिसांनी घटनेचे गांर्भीय लक्षात घेता आरोपीला त्वरीत शोध लावून मुलीला तिच्या कुटूबियांच्या स्वाधीन करून आरोपीवर गुन्हा दाखल केला.

 

सदर कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रह्मपुरी दिनकरठोसरे, पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात पो उपनि निशांत जुनोनकर, सोबत पोलिस हवालदार योगेश, पोलिस शिपाई संदेश, पिएन विजय, मुकेश, प्रमोद, शिल्पा यांच्या पथकाने केली.


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 22, 2024   

PostImage

मेंडकी एसबिआय बँके कडुण दोन लाखाचा विमा परतावा


मेंडकी:-

भारतीय स्टेट बँकेच्या वतीने ग्राहकांच्या संरक्षणा , सुरक्षितते करीता पैश्या च्या देवाण- घेवाना सोबतच विविध विमा योजणा मधुन बँक खातेदारांचें विमा काढण्यात येते . त्यामध्ये मेंडकी एसबीआय शाखे तर्फे पंतप्रधाण जीवण ज्योती , विमा संरक्षण योजणा, अमृत कलश योजणा , पंतप्रधान विमा , अटल पेंशन योजणा अश्या विविध विमा योजणाचीं अंमलबजावणी केली जाते. यामध्ये ग्राहक आपल्या आर्थीक व्यवहार करताना वित्तिय वर्षात वेगवेगळया वयोगटा नुसार वर्षातुण एकवेळा एकल किश्त भरूण स्वतःचा विमा काढतात . याप्रमाणेच मेंडकी भारतीय स्टेट बँके कडुण प्रधाणमंत्री जीवण ज्योती विमा योजणे अंतर्गत मृतक महिला पोर्निमा पांडुरंग लिंगायत वय ४३ राहणार रानबोथली यांनी सन २२-२३ ह्या आर्थिक वर्षात ३३०/- रुपये वार्षीक भरुण स्वतःचा विमा काढला . मागील काही महिन्या पुर्वी प्रदिर्घ आजाराने पोर्निमा लिंगायत यांचा मृत्यु झाला. वारसदार त्यांचे पती पांडुरंग लिंगायत शेतमजुर व सुतारकाम करतात . नुकतेच मेंडकी स्टेट बँकेचे व्यवस्थापक ईशान दयालवार यांचे हस्ते दोन लाखाचा धनादेश देण्यात आले . यावेळी शाखा व्यवस्थापक यांनी मेंडकी एसबीआय च्या समस्त ग्राहकाणां शाखे मार्फत आर्थीक व्यवहारा सोबतच विमा काढण्याचे आवाहण केले.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 21, 2024   

PostImage

ब्रम्हपुरी: सुरबोडी येथील इसमाने रेल्वे रुळावर केली आत्महत्या


ब्रम्हपुरी: सुरबोडी येथील भोजराज मेश्राम (वय अंदाजे ५५) यांनी १९ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी एकच्या सुमारास गावाजवळील रेल्वे रुळावर आत्महत्या केली. पोलिसांनी तात्काळ घटनेवर नियंत्रण मिळवून मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. पोलीस निरीक्षक या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

या अपघातामुळे सुराबोडी मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भोजराज मेश्राम यांच्या निधनाने समाजात शोककळा पसरली आहे. त्याच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये दुःख आहे. भोजराजचे कुटुंबीयही या दु:खाच्या गर्तेत बुडाले आहेत. त्यांनी त्यांच्या प्रिय व्यक्तीला गमावले आहे, ज्यामुळे त्यांना खूप दुःख होत आहे. भोजराजच्या मृत्यूने गावाला मोठा धक्का बसला असून सर्वांचे मनोधैर्य खचले आहे.

 

 


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 21, 2024   

PostImage

चिंचोली (बु.) येथे उर्स मुबारक व शानदार दुय्यम कव्वालीचा कार्यक्रम.


ब्रम्हपुरी /प्रतिनिधी - अल्हाज हजरत सैय्यद मोहम्मद ईकबालशाह बाबा उर्फ बाबाजान कादरी चिशती चिंचोली(बू) ता. ब्रम्हपुरी येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी दि.23 फेब्रुवारी 2024रोज शुक्रवारला रात्रौ 8 वाजता अम्मासाहेब , शफीबाबा, शरीफबाबा यांच्या मार्गद्शनाखाली ऊर्स मुबारक व मान्यवरांचे जाहीर सत्कार तसेच शानदार दुय्यम कव्वालीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.      

                          सदर कार्यक्रमास महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा श्रेत्राचे  आमदार विजयभाऊ  वडेट्टीवार ,खासदार अशोक नेते , आमदार बंटीभाऊ भांगडीया, आमदार किष्णा गजभे , आमदार किशोर जोरगेरवार,आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी नगराध्यक्ष इतेश्याम अली वरोरा, तुषारभाऊ सोम भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य, सतिश वाजूरकर उपाध्यक्ष ओबीसी महासंघ प्रदेश, माजी आमदार अतुलभाऊ देशकर, किसनजी नागदेवे जिल्हाध्यक्ष भाजपा गडचिरोली, विनोद संकत, शंकरलाल अग्रवाल चंद्रपूर, भास्कर डांगे, राकेश जयस्वाल, नानाभाऊ नाकाडे, डा. नामदेव किरसान, महेद्र ब्राम्हणवाडे,उषाताई चौधरी  तहसीलदार ब्रम्हपुरी, दिनकर ठोसरे उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपरी, ठाणेदार अनिल जिट्टवार,स्मिताताई पारधी व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.                          

  अल्हाज हजरत सैय्यद मोहमद ईकबलशाह बाबा उर्फ बाबाजान कादरी व सार्वजनिक मंडळ चिंचोली( बू ) यांच्या वतीने. दरबारी सत्कार सत्कारमूर्ती प्रकाशभाऊ सावकार पोरेद्दीवार अध्यक्ष गडचिरोली ग्रामीण बँक,मोतीलाल कुकरेजा उपाध्यक्ष भाजपा गडचिरोली,घनश्याम जीवनजी कावळे नागपूर , प्रल्हाद धोटे वडसा, नामदेव कुथे जेष्ठ नागरिक चिंचोली(बु) तसेच पाल्य पुरस्कार कु. कूनिका लालाजी पारधी ब्रम्हपुरी, कू. यामिनी किशोर मेश्राम आरमोरी, आलाप तुषार सोम चंद्रपूर, रोशन देविदास दिवटे चिंचोली (बू) यांचा दरबारच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. रात्रौ दहा वाजताच्या दरम्यान असलम मुकरम साबरी सहारनपूर (युपी )व राजा सर्फराज साबारी रायपूर (युपी )यांची दुय्यम कव्वालीचा शानदार कार्यकम होणार आहे. आलेल्या भाविक भक्तांना स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तरी समस्त जनतेनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अल्हाद हजरत सैय्यद ईकबलशाह बाबा उर्फ बाबाजान कादरी च्या वतीने करण्यात आले आहे..


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 13, 2024   

PostImage

एकुलत्या मुलाने केली आत्महत्या


 

अनहेरनवरगाव : ब्रहपुरी तालुकातील अन्हेरनवरगाव येथील आईवडिलांचा एकुलता एक असलेल्या एका युवकाने गळफास घेत जीवनयात्रा संपविली. ही घटना रविवार दि. ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी उघडकीस आली. अंकित राजू लोखंडे (२४) असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे.

 

अंकितने रविवारी सायंकाळी राहत्या घराच्या छताच्या हुकाला गळफास घेतला. यासंदर्भात कुटुंबीयांना कळताच त्यांनी तत्काळ पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून पार्थिव शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. युवकाच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 13, 2024   

PostImage

मुलाने उठवले; आई उठलीच नाही, पतीच्या मारहाणीत मृत्यू! पतीला अटक …


 

ब्रह्मपुरी : पत्नीने शिवीगाळ केली या क्षुल्लक कारणावरून झालेल्याभांडणातून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना ब्रहापुरी तालुक्यातील मालडोंगरी येथे सोमवार, दि. १२ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. हिरकण्या जयदेव पिल्लेवान (५०), रा. मालडोंगरी, असे मृत महिलेचे नाव आहे. जयदेव पिल्लेवान (५५), रा. मालडोंगरी असे आरोपीचे नाव आहे.

 

मागील तीन दिवसांपासून हिरकण्या पिल्लेवान व तिच्या पतीमध्ये भांडण सुरू होते. रविवारी रात्रीसुद्धा पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याचे त्यांच्या मुलाला दिसले. परंतु नेहमीच भांडण आहे, म्हणून त्याने लक्ष दिले नाही. सोमवारी सकाळी झोपुन उठल्यानंतर मुलाला त्याची आई झोपून असलेली दिसली. 

 

तिला हलवून बघितले असता तिचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याने ब्रह्मपुरी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच ब्रहापुरी पोलिसांनी आरोपी जयदेव पिल्लेवान याला ताब्यात घेतले.

 

आरोपीने पत्नीला हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याने डोक्याला मार लागला. यातच तिचा मृत्यू झाला. असे मृतक महिलेच्या मुलाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नागलोत करीत आहेत.

 

 


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 7, 2024   

PostImage

जगदगुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांचा प्रत्यक्ष दर्शन व मार्गदर्शन सोहळा १२ …


ब्रम्हपूरी/तालुका प्रति:-जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज , जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ , नाणीजधाम यांचा प्रत्यक्ष मार्गदर्शन व दर्शन सोहळा दिनांक  १२व १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ .०० वाजता ज.न.म.संस्थान , उपपीठ पूर्व विदर्भ , मोहगाव (झिल्पि) , ता हिंगणा ,   जि . नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे . आपणास .स्वामीजींचे मार्गदर्शन पूर्णतः विनामुल्य असते. आपल्या भागातील दुःख पिडीतांना नाणीजधाम या ठिकाणी आर्थिक , शारीरीक किंवा वेळेअभावी जाता येत नाही . याकरीता स्वामीजी स्वतःच आपल्या भेटीसाठी, येत आहेत .  स्वामीजींच्या प्रत्यक्ष मार्गदर्शन व दर्शन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.उपासक दिक्षा सोमवार दि १२ फेब्रुवारी २०२४ ला व साधक दिक्षा दि 13 फेब्रुवारी २०२४ ला  दिल्या जातील.परिसरातील भक्तांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन ज.न. म . संस्थान , उपपीठ पूर्व विदर्भ , पीठ प्रमुख  राजेंद्रकुमार  भोयर , व्यवस्थापक  प्रविण  परब व चंद्रपूर जिल्हा निरीक्षक राजेश येरने जिल्हाध्यक्ष लडी सर व चंद्रपूर जिल्हा भक्त सेवा मंडळ यांचे कडून करण्यात आले आहे .


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 4, 2024   

PostImage

Brmhapuri: बिअर बार उद्घाटनप्रसंगी बारमालकाकडून मारहाण


ब्रह्मपुरीतील घटना : घरमालकाच्या सांगण्यावर विद्यार्थी गेले जेवायला

ब्रह्मपुरी : शहरातील एका बिअरबारच्या उ‌द्घाटन कार्यक्रमात घरमालकाच्या सांगण्यावरून हजर झालेल्या दोन विद्यार्थ्यांना बारमालकाने भोजनप्रसंगी मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि. ३) उघडकीस आली. या घटनेत एक जखमी झाला. विद्यार्थी शिकत असल्याने त्यांनी या घटनेची तक्रार पोलिसांत नोंदविण्याचे टाळल्याचे समजते. मात्र या प्रकाराची नागरिकांमध्ये चर्चा आहे.

 

ब्रह्मपुरी शहरात बुधवारी (दि. ३१) सायंकाळी जयस्वाल बार अँड रेस्टॉरंट या बिअर बारच्या उ‌द्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बारमालकाने यासाठी शहरातील अनेकांना निमंत्रित केले. बिअर बार परिसराच्या मागे राहत असलेले स्थानिक रहिवासी मनोहर तायडे यांनाही मालकाने बोलावले होते.

तायडे यांच्या घरी काही विद्यार्थी भाड्याने राहून मेसमध्ये जेवण करतात. ते शहरातील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात शिक्षण घेत आहेत. घरमालकाने त्या दोघांनाही माझ्यासोबत कार्यक्रमाला चला, असे सांगितल्याने निमंत्रणावरून घरमालक बिअर बार उ‌द्घाटनाच्या कार्यक्रम हजर झाले.

 

दरम्यान, भोजन सुरू असताना बारमालकाने विद्यार्थ्यांची विचारपूस न करता मारहाण केली. यात एक विद्यार्थी जखमी झाला. ही माहिती परिसरातील युवकांना मिळाल्याने त्यांनी बिअर बारसमोर गर्दी केली. काही युवकांनी बारमालकाला जाबही विचारला. मात्र, शिवीगाळ करून युवकांना हाकलल्याची चर्चा परिसरात पसरताच काही वेळाने देलनवाडी वॉर्डातील काही संतप्त नागरिक बिअर बारसमोर एकत्र आले. हे दृश्य पाहिल्यानंतर उ‌द्घाटनाचा कार्यक्रम आटोपता घेतला.

 

वॉर्डातील नागरिकांच्या संतापाने गुरुवारी (दि. १) बार बंद ठेवण्यात आले होते. या प्रकाराची चर्चा ब्रह्मपुरी शहरात दबक्या आवाजात सुरू आहे.

 

बिअर बारच्या उ‌द्घाटनाप्रसंगी सहा-सात विद्याथीं हे आमच्या समाजाच्या पाहुण्यांसोबत मिळून जेवण करत दिसून आले. त्यामुळे माझ्याकडून चुकीचा प्रकार घडला. माझी चूक लक्षात आली. घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.

- अश्विन ऊर्फ चिंटू जयस्वाल, जयस्वाल बार अँड रेस्टॉरंट, ब्रह्मपुरी