काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या आरोपानंतर कारवाई
भोपाळ, . मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनी दलित सरपंचाला तिरंगा ध्वज फडकवण्यास नकार देणाऱ्या पंचायत कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी पंचायत विभागाच्या कर्मचाऱ्याची सेवा समाप्त केली आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर समिती चौकशी करत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बिओरा तहसीलच्या तरणा ग्रामपंचायतीत शुक्रवारी ही कथित घटना घडली, त्यानंतर काँग्रेसचे राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह यांनी सरपंचावर दलित असल्यामुळे
भेदभाव केल्याचा आरोप केला होता. जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अक्षय टेमरवाल यांनी शनिवारी रात्री सांगितले की, तरेणा ग्रामपंचायतीचे रोजगार सहाय्यक लखन सिंग सोंधिया यांनी प्रजासत्ताक दिनी गावाच्या सरपंचाऐवजी अन्य कोणीतरी ध्वजारोहण केले.