PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 31, 2023   

PostImage

Bhandara news: अज्ञात वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ प्रवचनकारांचा मृत्यू चप्राड पहाडीजवळील …


 

लाखांदूर : नातलगाकडील कार्यक्रमआटोपून स्वगावी दुचाकीने परत येणारे ज्येष्ठ प्रवचनकार पांडुरंग इस्तारी राऊत (वय ७०, रा. मेंढा) यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास घडली. लाखांदूर ते वडसा राष्ट्रीय महामार्गावरील चप्राड पहाडीनजीक हा अपघात घडला.

 

पोलिस सूत्रानुसार, शनिवारी सकाळी पांडुरंग राऊत आपल्या दुचाकीने नातलगाकडे कार्यक्रमासाठी तालुक्यातील किन्ही येथे गेले होते. नातलगाकडील कार्यक्रम आटोपून सायंकाळच्या सुमारास स्वगावी परतत असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.

 

या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात घडल्याचे पाहून अज्ञात वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची माहिती या मार्गावरील प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ पांडुरंग यांना उपचारासाठी

 

लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय ठाकरे यांनी मृत घोषित केले.

 

या अपघाताची माहिती लाखांदूर पोलिसांना होताच ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अनिल मांदाळे, हवालदार संतोष चव्हाण, अंमलदार ओमकार सपाटे, वाहन चालक जितेंद्र खरकाटे आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

 

घटनेतील मृतक पांडुरंग हे धार्मिक वृत्तीचे होते. तालुक्यात अनेक ठिकाणी आयोजित भागवत सप्ताहात पठण आणि प्रवचन करत असल्याने त्यांची महाराज म्हणून पंचक्रोशीत ख्याती होती.यांच्या अपघाती निधनाचे वृत्त परिसरात पसरताच मेंढावासीयांसह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 26, 2023   

PostImage

Bhandara news: प्रेमात पडल्याच्या संशयावरून भावाने बहिणीची केली गळा आवळून …


मोहाडी : पोलीस स्टेशन वरठी अंतर्गत येत असलेल्या सोनुली येथे प्रेमात पडल्याच्या संशयावरून भावाने बहिणीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजतादरम्यान उघडकीस जाली, वरठी पोलिसांनी मोठ्या सीताफिने आरोपी आशिष गोपीचंद बावनकुळे (२२) याला अटक केली तर अश्विनी गोपीचंद बावनकुळे (२०) असे मृतक बहिणीचे नाव आहे. बरठी जवळील सोनुली येथील गोपीचंद बावणकुळे हे मुळचे लाखनी येथील रहिवासी होते. काही वर्षाअगोदर ते सासरी सोनुली येथे आले होते. मृतक अश्विनी ही नागपूर येथे बिएससीचे शिक्षण घेत होती. 

 

दोन दिवसाअगोदर ती गावी आली होती. अश्विनी ही गावातील एका तरुणाच्या प्रेमात पडली होती. याची कुणकुण भाऊ आशिष याला लागली होती. पाच कारणावरुन दोघा बहिण-भावात नेहमीच चारित्र्याच्या संशयावरुन खटके उडत होते. दि.२४ डिसेंबर रोजीनातेवाईकांकडे लग्न कार्यक्रम असल्यानेव डील हे कन्हान येथे गेले होते. तर आईल ग्न कार्यक्रमानिमित्त साकोलीकडे गेली होती. पटनेच्या दिवशी घरी कोणीच नसतांना प्रेमात पडल्याच्या संशयावरुन दोघा बहिण-भावात कडाक्याचे भांडण झाले. भांडण विकोपाला जाऊन भाऊ आशिष याने तिचा गळा आवळून हत्या केली. कुटुंबियांनी नैसर्गिक मृत्यूचा बनाव करुन तिला वरठी येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. अश्विनीचा मृत्यू संशयास्पद असल्याने याची माहिती वरठी पोलिसांना मिळताच ठाणेदार अभिजीत पाटील यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठून प्रेत ताब्यात घेतले. शवविच्छेदनाल अश्विनीचा मृत्यू नैसर्गिक नसून तिचा गळा आवळून मृत्यू झाल्याचे निश्पत्र होताच पोलिसांनी या घटनेतील आरोपी नाऊ आशिष याला तत्काळ अटक केली, पोलिसांनी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला, पोलिसांनी आरोपीला दि. २५ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वरठी चे ठाणेदार अभिजीत पाटील करीत आहेत. गोपीचंद बावणकुळे यांच्या कुटुंबात एक मुलगा व एक मुलगी होती. या घटनेत मुलीच्या मृत्यूने व मुलाच्या अटकेनेगोपीचंद बावणकुळे यांच्या कुटूंबावर मोठा आघात पोहचला आहे.

 

भावाचा मोबाईलवर स्टेट्स

 

आरोपी भाऊ आशिष याने आपल्या मोबाईलवर आज आमचेकडे अंत्यसंस्कार आहे. असा स्टेट्स ठेवला होता. मोबाईलवर स्टेट्स पाहुन गावातीलच मावशीचा मुलगा धावत आशिष याच्या घरी गेला. तेव्हा समोरील दार बंद होता. मात्र घरातून मोठ्याने गाण्याचा आवाज येत होता. दार ठोठावला असता प्रतिसाद मिळाला नसल्याने त्याने मागेहून दार उघडला. तेव्हा अश्विनीचे प्रेत पडलेले होते. तर आशिष गाणे ऐकत बसला होता.