PostImage

Today Latest News

April 25, 2024   

PostImage

Bhandara News : भरधाव दुचाकी धडकली ट्रकला दोन जागीच ठार …


Bhandara News : नागपूरहून तुमसरमार्गे मध्य प्रदेशातील चिखला येथे स्वगावी जात असताना भरधाव दुचाकी ट्रकला आमोरासमोर आदळली. यात दोन जण ठार तर एक जण गंभीर झाला. ही घटना तुमसर-गोबरवाही मार्गावरील चिचोली- पवनारा येथे मंगळवारला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. विजय धुर्वे रा. चिखला (मध्य प्रदेश), तुफान उईके रा. टेकाडी सुकळी (मध्य प्रदेश) असे अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. समीर वट्टी रा. चिखला असे गंभीर जखमीचे नाव आहे.

दुचाकी चालक विजय धुर्वे हा आपल्या दोघा मित्रांसह ट्रिपल सिट नागपूरवरून काम आटोपून चिखला येथे जात होते. तुमसर-गोबरवाहीकडे जाताना समोरून येणारा भरधाव ट्रक पावसामुळे दिसला नाही. त्यामुळे भरधाव दुचाकी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक क्रमांक सी. जी ०८ ए. एक्स ८१२२ ला धडकली. त्यात दुचाकी चालकासह मागे बसलेला युवक जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.

अपघाताची माहिती तुमसर पोलिसांना मिळताच ते तत्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. गंभीर जखमीला भंडारा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.अपघाताला जबाबदार असलेल्या ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनेचा अधिक तपास तुमसर पोलिस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनात तुमसर पोलिस करीत आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 25, 2024   

PostImage

अपघातात 2 वनकर्मचारी ठार....


रामटेक-तुमसर बायपास मार्गावरील घटना दोघे गंभीर जखमी 

 

भंडारा, ब्युरो. रामटेक तुमसर बायपास मार्गावर कार व पिकअप वाहनात झालेल्या अपघातात पवनीत कार्यरत असलेले 2 वन कर्मचारी ठार झाले. ही घटना 23 जानेवारीच्या रात्री 2 वाजताच्या सुमारास घडली. यात एका कर्मचाऱ्याचा घटनास्थळी तर एकाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. स्वप्नील जाधव (35) आणि मनोज इनवाते (35) असे मृतकाचे नाव आहे. तर दोन अन्य कर्मचारी हे गंभीर जखमी असून त्यांना नागपूर येथील मेडिकल कॉलेज येथे रेफर करण्यात आले आहे.

 

पवनी वनविभाग कार्यालयातील क्षेत्र सहाय्यक स्वप्नील जाधव हे सहकाऱ्यांसह मित्राच्या लग्न सभारंभासाठी कार क्रमांक एम. एच. 33 ए 4932 ने गोंदिया येथे गेले होते. लग्न समारंभाहून परत येताना रामटेक तुमसर बायपास मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमपी 28 जी 4771 क्रमांकाच्या पिकअपने त्यांच्या कारला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, कारचा समोरील भागाचा चुराडा होऊन पिकअपचा मागील भाग वेगळा झाला. 

 

अपघात जवळपास रात्री 1 ते 2 वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. या अपघातात पवनी वनविभागात कार्यरत क्षेत्र सहाय्यक स्वप्नील जाधव (35) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर मनोज इनवाते (35) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर प्रदीप सूर्यवंशी (35) व निकेश कुंभलकर (30) हे गंभीर जखमी असल्याने त्यांना नागपूर मेडिकल कॉलेज येथे रेफर करण्यात आले आहे. अपघातानंतर पिकअप चालक फरार झाल्याची माहिती आहे. फिर्यादी चंद्रभान बाजीराव परतेती यांच्या तक्रारीवरून पिकअप चालकाविरुद्ध रामटेक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 6, 2024   

PostImage

अन्.. उंदराने केली हजारो रुपयांचे नुकसान..!


भंडारा : सकाळच्या सुमारास माजघरात देवापुढे लावलेली दिव्याची पेटती वात उंदीर घेऊन गेल्याने घराला लागलेल्या आगीत साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली. ही घटना शनिवारी, दि.६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास लाखांदूर येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये घडली. या घटनेत बुधेश्वर रघुनाथ रासेकर (४५) यांच्या घरासह घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

बुधेश्वर रासेकर हे आपली आई, पत्नी व २ मुलांसह मागील कित्येक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. दरम्यान, घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास बुधेश्वरने नेहमीप्रमाणे माजघरातील देव्हाऱ्यासमोर दिवा आणि अगरबत्ती लावून पूजा केली होती. काही वेळाने ते मजुरीच्या कामकाजासाठी घराबाहेर निघून गेला. बुधेश्वरची आई सुमित्रा घराबाहेर अंगणात कपडे धूत असताना घरातून धूर निघताना दिसला. तिने घरात जाऊन पाहिले असता घरातील जीवनावश्यक साहित्य जळत असल्याचे दिसून आले. त्यांनी आरडाओरड केल्याने गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत त्यांच्या घरातील जीवनावश्यक साहित्य व नातवंडांची शालेय कागदपत्रे जळून खाक झाली. याप्रकरणी शासन, प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन नुकसानभरपाई मिळण्याची मागणी पीडित कुटुंबीयांनी केली आहे.

महसूल अधिकाऱ्यांनी केला घटनेचा पंचनामा :

घराला आग लागून घरातील साहित्य जळून खाक झाल्याची माहिती लाखांदूर महसूल विभागाला होताच लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांच्या मार्गदर्शनात तलाठी आशिष खामणकर व सहकारी खुशाल दिघोरे यांनी घटनास्थळी पोहोचत घटनेचा पंचनामा केला. या घटनेत पीडित इसमाचे जवळपास २५ हजार रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाल्याची माहिती देण्यात आली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 25, 2023   

PostImage

Bhandara news: रेती तस्करांची तलाठ्याला धक्काबुक्की


मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल , चार आरोपी अटकेत

भंडारा:  रेती तस्कराकडून कारवाई दरम्यान शासकीय कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा केल्याचे प्रकार सातत्याने होत आहेत. असाच प्रकार दि.२२ डिसेंबर रोजी रोहा- बेटाळा मार्गावर घडला. रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई दरम्यान रेती तस्करांनी कारवाई टाळण्यासाठी तलाठ्याला धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणला. तलाठ्याच्या तक्रारीवरून मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

तलाठी कार्तिक सिरसकर हे आपल्या पथकासह दि.२२ डिसेंबर रोजी सकाळी ९.१५ वाजता रोहा- बेटाळा रस्त्यावर कारवाई मोहिमेदरम्यान कर्तव्यावर असताना टिप्पर क्र. एम एच ३६ एए २८४५ याटिप्परमध्ये रेती वाहतूक करताना दिसून आला. 

टिप्पर चालकाला परवानाबाबत विचारपूस केली असता परवाना नसल्याचे आढळून आले. सदर टिप्परवर कारवाईदरम्यान टिप्पर मालक यांनी अन्य दोन व्यक्तींसोबत त्याठिकाणी पोहचून आमच्या टिप्परवर कारवाई करायची नाही, असे बोलून तलाठी कार्तिक सिरसकर यांना धक्काबुक्की केली. तलाठ्याकडून टिप्परची चाबी हिसकावून टिप्पर चालकाला देवून टिप्पर पळवून नेले. आरोपिंनी शासकीय कामात अडथळा आणून तलाठ्याला धक्काबुक्की केली. या प्रकरणी मोहाडी पोलिसात तक्रार नोंदवून आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणाची चारही आरोपिंना अटक केली असून टिप्पर व कार जप्त करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा तपास पोनि. पुल्लरवार करीत आहेत.


PostImage

Armans

Oct. 6, 2023   

PostImage

बंद घर में मिला राजस्व कर्मचारी का शव, तुमसर की …


स्टोरेज: 30 सितंबर की सुबह, तुमसर शहर के श्रीराम नगर में एक बंद मकान में एक महसूल कर्मचारी का शव मिलने से हड़कंप मच गया। मरने वाले व्यक्ति का नाम महेश विट्ठलराव ढाबले (31) था। महेश ढाबले, श्रीराम नगर के निवासी, गोंदिया के तहसील कार्यालय में राजस्व सहायक थे। बताया गया है की उनकी शादी नहीं हुई थी। 
घटना वाले दिन, घर के आसपास रहने वाले लोगों ने खिड़की से उसे मृत पाकर हड़कंप मचाया। मालूम होता है कि महेश ढाबले शराब पीता था। तुमसर पुलिस को इसकी सूचना दी गई है और पुलिस निरीक्षक नीलेश ब्रम्हणे के निर्देशन में पुलिस कांस्टेबल मनोहर शहारे घटना की आगे की जांच कर रहा है।