PostImage

Shubham gawas

Nov. 20, 2023   

PostImage

चला जाणून घेऊ तुलसी विवाह महत्व !


 

प्राचीन काळात जालंधर नावाचा राक्षस चारीकडे खूप उत्पात करत होता. राक्षस वीर आणि पराक्रमी होता. त्याच्या साहस असल्यामागे कारण होते त्याच्या पत्नी वृंदा हिचे पतिव्रता धर्म. तिच्या प्रभावामुळे तो सर्वव्यापी होता. परंतू जालंधराच्या या उपद्रवामुळे त्रस्त देवगण प्रभू विष्णूंकडे आले आणि संरक्षणासाठी याचना करू लागले. त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वृंदा हिचे पतिव्रता धर्म भंग करण्याचा निश्चय केला. इकडे वृंदाचे सतीत्व नष्ट झाल्यामुळे देवतांशी युद्ध करत असताना जालंधरचा मृत्यू झाला. वृंदाला ही गोष्ट लक्षात आल्याक्षणी तिने क्रोधित होऊन प्रभू विष्णूंना श्राप दिला की ज्या प्रकारे छळ करून तुम्ही मला पती वियोग दिला आहे त्याचप्रमाणे तुमच्याही पत्नीचा छळपूर्वक हरण होऊन स्त्री वियोग सहन करण्यासाठी तुम्हाला मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागेल. असे म्हणत वृंदा पतीसोबत सती गेली. ज्या जागी ती सती गेली त्या जागी तुळशीचे झाडं उत्पन्न झाले.

 

एका इतर प्रसंगाप्रमाणे वृंदाने रागात विष्णूंना श्राप दिला की माझे सतीत्व भंग केल्यामुळे तुम्ही दगड व्हाल. त्या दगडाला शालिग्राम म्हणतात. तेव्हा विष्णू म्हणाले की हे वृंदा तुझ्या सतीत्वाचे फल म्हणून तू तुळस बनून माझ्यासोबत राहशील. माझ्यासोबत तुझा विवाह लवणाऱ्यांना पुण्य लाभेल. तेव्हापासून तुळसविना शालिग्राम किंवा विष्णूंची पूजा अपुरी मानली जाते. शालिग्राम आणि तुळशीचा विवाह प्रभू विष्णू आणि महालक्ष्मीच्या विवाहाचे प्रतिकात्मक विवाह आहे.