ट्रक -दुचाकीच्या अपघातात वृत्तपत्र विक्रेत्याचा जागीच मृत्यू भद्रावती शहरातील घटना
भद्रावती :- आपल्या दुचाकीने सकाळी वृत्तपत्र वितरणाचे काम करीत असताना ट्रकने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात शहरातील एका वृत्तपत्र विक्रेत्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक 7 रोज बुधवार ला सकाळी 9.15 वाजता शहरातील चंद्रपूर-नागपूर हायवे वरील उडान पुलाजवळ घडली. ज्ञानेश्वर एकनाथ इंगोले, वय 50 वर्ष, राहणार शास्त्रीनगर, भद्रावती असे या मृत वृत्तपत्र विक्रेत्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. सदर मृतक हा गेल्या वीस वर्षांपासून वृत्तपत्र विक्रेता म्हणून काम करीत होता. घटनेच्या दिवशी मृतक हा नेहमीप्रमाणे आपल्या एम एच 34 सीसी 7030 या क्रमांकाच्या दुचाकीने सकाळी वृत्तपत्र वितरण करीत असताना उडान पुलाजवळ सी जी 04 पी एफ 14 97 या क्रमांकाच्या नागपूर वरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या केमिकल भरलेल्या ट्रकने दुचाकी ला जबर धडक दिली. यात ज्ञानेश्वर इंगोले यांचा घटनास्थळीत मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
भद्रावती पंचायत समिती अंतर्गत तालुकास्तरीय नाविन्यपूर्ण नवरत्न स्पर्धा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गवराळा येथे आज दिनांक 23 जानेवारी 2024 ला मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन मान. आशुतोष सपकाळ गटविकास अधिकारी पंचायत समिती भद्रावती यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्मा. श्री दिपक पोटे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गवराळा, विशेष अतिथी सन्मा. अनिलभाऊ धानोरकर माजी नगराध्यक्ष भद्रावती , प्रमुख अतिथी सन्मा. डॉ. प्रकाश महाकाळकर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती भद्रावती, कु. कल्पना शिदमशेट्टीवार मॅडम शिक्षण विस्तारअधिकारी , श्री मोरेश्वर विद्ये गटसमन्वयक गटसाधन केंद्र भद्रावती, सौ माया जुनघरे प्र.विस्तार अधिकारी, श्री. भारत गायकवाड केंद्रप्रमुख ढोरवासा तसेच श्री पुंडलिक घुगूल मुख्याध्यापक जि प उच्च प्राथमिक शाळा गवराळा हे उपस्थित होते.
उद्घाटनिय भाषणात सन्माननीय आशुतोष सपकाळ साहेब यांनी भद्रावती शिक्षण विभागाचे कार्य अतिशय उत्तम असून पूर्णतः सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची रूपरेषा, आयोजन व महत्त्व प्रास्ताविक पर भाषणातून मान. डॉक्टर प्रकाश महाकाळकर गटशिक्षणाधिकारी विषद केले. मान. अनिल भाऊ धानोरकर यांनी विद्यार्थीनी मोठे होउनआपले नाव कमवावे असे आवाहन केले.
सदर स्पर्धा या चार वाजेपर्यंत घेण्यात आल्या. लगेच सांय. 4.30 वाजता बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी सन्मा. रणजीतजी यादव I A S , अप्पर जिल्हाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्याला प्रेरणादायी मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी मोठे ध्येय ठेवून उत्तुंग भरारी घ्यावी याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मा. दोहतरे मुख्याध्यापक कर्मवीर विद्यालय भद्रावती उपस्थित होते.
सदर स्पर्धेचे आयोजन मान.डॉ. प्रकाश महाकाळकर गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, सर्व साधन व्यक्ती बीआरसी चे सर्व कर्मचारी ,सर्व शिक्षक जिल्हा परिषद शाळा गवराळा यांच्या सहकार्याने स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्या . उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. छाया खनके विषय तज्ञ भद्रावती यांनी केले तर बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ उर्मिला बोंडे गवराळा यांनी केले.
भद्रावती- स्थानिक किल्ला वॉर्ड, बगळेवाडी येथील रहिवासी व जिल्हा परिषद शाळा ढोरवासा येथील मुख्याध्यापक व प्रभारी केंद्रप्रमुख श्री भारतजी गायकवाड यांचा मुलगा प्रणय हा नुकताच फ्रांस येथील बोरडेक्स युनिव्हर्सिटी येथे जुनीअर सायंटिस्ट या पदावर रुजू होण्यासाठी भद्रावती वरून रवाना झाला आहे.
प्रणय ची बहिन कोमल गायकवाड पण केरळ येथील तिरुअनंतपुरम येथे जुनीअर सायंटिस्ट या पदावर कार्यरत आहे.
एका सर्वसाधारण घरातील मुलाने मिळविलेले हे यश नक्किच प्रशंसनीय असून प्रणय ला वार्षिक 24 लाखाचे पॅकेज मिळणार असून त्याची आई सौ रेखा भारत गायकवाड पण जिल्हा परिषद शाळा विठ्ठलवाडा येथे शिक्षिका आहे.
प्रणय चे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे