PostImage

सुपर फास्ट बातमी

July 19, 2024   

PostImage

बेरोजगारीला कंटाळून तरुण संपवतात जीवन


 

 

■ काँग्रेसचे 'एक्स'वरून मोदी सरकारवर टीकास्त्र..!

 

दर तासाला दोन बेरोजगारांच्या आत्महत्या

 

 

 

नवी दिल्ली: विविध प्रकल्पांतून मोठ्या प्रमाणावर रोजगार देण्याचे आश्वासन देणाऱ्या एनडीए सरकारला काँग्रेसने आरसा दाखवला आहे. देशातील बेरोजगारीचा दर तब्बल ९.२ टक्क्यांनी वाढला असून बेरोजगारीला कंटाळून देशात दर तासाला दोन आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक सत्य काँग्रेसने एक्सवरून केलेल्या पोस्टमध्ये अधोरेखित केले आहे. रोजगार मिळत नसल्याने तरुण, तरुणी प्रचंड चिंताग्रस्त आहेत, परंतु मोदींना त्यांचे दुःख दिसत नाही. ते उलटसुलट आकडे पसरवण्यात व्यस्त आहेत. आम्ही रोजगार देण्यात गेल्या ४ ते ५ वर्षांचा विक्रमही मोडला आहे, असे धडधडीत असत्य मोदी

 

उघडपणे मांडत आहेत, अशा शब्दांत काँग्रेसने मोदींवर जळजळीत टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान उद्योगांना उद्ध‌वस्त केले. रोजगाराच्या संधी संपवल्या. मोदी सरकारच्या धोरणांमुळे तरुण बेरोजगारीच्या दलदलीत ढकलला गेला. परंतु, नरेंद्र मोदी यांना तरुणांना जे भोगावे लागत आहे त्याचे काहीच वाटत नाही, त्यांना काहीच फरक पडत नाही. मोदी आपल्याच दुनियेत मरत आहेत. आपल्या मित्रांना श्रीमंत बनवण्यामध्ये व्यस्त आहेत. नरेंद्र मोदी यांनी तरुणांना डेरोजगार करून देशाला उद्ध‌वस्त केले, हेच सत्य आहे. असे टीकास्त्र काँग्रेसने एक्सवरून मोदींवर सोडले आहे.

 

८३ टक्के तरुण बेरोजगार

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी जे मांडत आहेत ते सत्य नाही. उलट देशात तब्बल ८३ टक्के तरुण बेरोजगार आहेत.

 

३० लाख सरकारी पदे रिक्त असून २० ते २४ वर्षांच्या तरुणांचा बेरोजगारीचा दर ४४.४९ टक्क्के इतका

 

आहे. भारतातील तरुणांना नोकऱ्या मिळवण्यासाठी रशिया आणि इस्रायलला जाणे भाग पडत आहे. अशा

 

अनेक बाबी काँग्रेसने एक्स'वरून मांडल्या आहेत. मेक इन इंडिया आणि स्टार्टअपचा डंका वाजवणारे मोदी

 

सरकार भारतातील तरुणांना रोजगार देण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे आंतरराष्ट्रीय श्रम संघटना आणि

 

इन्स्टिट्युट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या अहवालातून उघड झाले आहे.