PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 31, 2024   

PostImage

Aheri news: दारू पिऊन प्रशिक्षणाला गेलेल्या शिक्षकावर गुन्हा ,मद्यपान करणारे …


 

बेशिस्त वर्तन अंगलट : कारणे दाखवा

 

 अहेरी : अहेरी विधानसभा क्षेत्रातील मतदान पथकातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत असताना या प्रशिक्षणात सहभागी काही मतदान केंद्राध्यक्ष मद्य प्राशन करून असल्याचे निदर्शनास आले. 'लोकमत'ने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संबंधित अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. मात्र, याबाबत खुलासा सादर करण्यात न आल्याने अखेर नायब तहसीलदार नाना दाते यांच्या फिर्यादीवरून प्रशिक्षणार्थी शिक्षकावर मंगळवारी गुन्हा दाखल झाला.

 

आलापल्ली येथील आयटीआयमध्ये २७ ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण सुरू असताना हा प्रकार उजेडात आला. आता कारणेदाखवा नोटीस बजावल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात आली. लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१चे कलम १३४ अन्वये बुधवारला अहेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. देवलमरी येथील भगवंतराव आश्रमशाळेतील शिक्षक श्रावण वासेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

मद्यपान करणारे कर्मचारी धास्तावले...

 

 निवडणूक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे अहेरी उपविभागातील कर्मचारी धास्तावले आहेत. दुर्गम, अतिदुर्गम भागात निवडणुकीसारख्या महत्त्वाच्च्या वेळी काही कर्मचारी बेशिस्त वर्तन करत असल्याचे यापूर्वी देखील उघडकीस आलेले आहे.

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 30, 2024   

PostImage

एकमेकांना वाचविताना तीन मित्रांचा बुडून मृत्यू


 

 अहेरी : सहलीचा आनंद लुटतानाच एकाला नदीत पोहण्याचा मोह आवरता आला नाही व तो पाण्यात उतरला. तो खोल पाण्यात बुडत असतानाच दूसरा मित्र वाचवायला गेला. दुसराही मित्र बुडताना पाहून तिसरा मित्र पाण्यात शिरला व दोघांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिसराही बुडाला. तिघांनाही जलसमाधी मिळाली. ही घटना शनिवार, २६ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र - तेलंगणाच्या सीमेवरील प्राणहिता नदीत घडली. मात्र, तिसरा मृतदेह सोमवारी सापडला, जहीर हुसेन, मोहम्मद इरशाद, मोहम्मद मोहिद रा. बेज्जूर (तेलंगणा) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मित्रांची नावे आहेत. हे तिघेही मित्र विशीतील होते.

 

 

तेलंगणाच्या हद्दीतील बेज्जुर परिसरातील प्राणहिता नदीत तीन मित्र सहलीसाठी आले व बुडाल्याची माहिती तेलंगणा पोलिसांना मिळताच त्यांनी गडचिरोली जिल्हा पोलिसांची मदत घेतली. जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम. रमेश, यतिशदेशमुख, श्रणिक लोढा यांच्या मार्गदर्शनात अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे यांनी प्राणहिता पोलिस उप मुख्यालयातील रबर मोटार बोटसह पोलिस कर्मचाऱ्यांचा चमू पाठविला. बेज्जुरचे पीएसआय विक्रम यांनी रविवारी शोधमोहीम राबवून दोघांचे मृतदेह रविवारी हस्तगत केले, तर तिसरा मृतदेह मंचेरियालजवळ सापडला.

 

 

सोमवारी जहीर हुसेन मोहम्मद मोहीद मोहम्मद इर्शाद२५ किमीवर सापडला मृतदेह बेज्जूर येथील तिघेही मित्र कामकरून शिक्षण घेत होते. यापैकी दोघेजण चप्पल विक्रीच्या दुकानात, तर एकजण मोबाइल विक्रीच्या दुकानात काम करीत होता. दोघांचे मृतदेह हे जवळच मिळाले; परंतु तिसऱ्याचा मृतदेह घटनास्थळापासून २५ किमी वाहत आला. शोधकार्यावेळी पोलिसांची दमछाक झाली.

 

 

 


PostImage

MH 33 NEWS

Oct. 28, 2024   

PostImage

जनतेच्या उद्धारासाठी मी लढणारच:राजे अम्ब्रिशराव आत्राम जोरदार शक्ती प्रदर्शन करत …


 

अहेरी:- आपल्या अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यांची झालेली अधोगती,वाढलेली बेरोजगारी,रस्त्यांची झालेली दुरवस्था लक्षात घेता तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी आणि जनतेच्या उद्धारासाठी मी लढणार असल्याचं संकल्प करीत माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

२८ ऑक्टोबर रोजी राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी हजारोंच्या उपस्थितीत राणी रुख्मिनी महल येथून भव्य रॅली काढत 'हम भी किसींसे कम नहीं' हे दाखवून दिले. सुरुवातीला त्यांनी कै. राजे सत्यवानराव महाराज यांच्या स्मृती समाधी स्थळाला अभिवादन केले.त्यानंतर कै.राजे विश्वेश्वरराव महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करत त्याच चौकात उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.यावेळी राजामाता राणी रुख्मिणी देवी,युवा नेते अवधेशराव बाबा आत्राम,विक्की बाबा आत्राम,राजे समर्थक आणि पाचही तालुक्यातील हजारो नागरिक उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आयोजित सभेत राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी करत मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि भाग्यश्री आत्राम यांच्यावर तोफ डागली.गेल्या पाच वर्षात अहेरी विधानसभा क्षेत्राला खड्ड्यात टाकून मला तिकीट मिळू नये म्हणून बाप लेकीने मोठा गेम केला.पैशाने तिकीट विकत घेऊन पैश्याची उधळण करत ही निवडणूक जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असले तरी ही निवडणूक आता जनतेनी हातात घेतली आहे.त्यामुळे तिकीट मिळाल्याच्या आनंदात तुम्ही कितीही फटाके फोडा २३ तारखेला आम्ही फटाके फोडणार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.एका खाजगी कंपनीच्या मांडीवर बसून पैशाने आणि माझ्या कार्यकर्त्यांना धमकावून ही निवडणूक जिंकणार असे तुम्हाला वाटत असेल तर जनता नक्कीच तुम्हाला धडा शिकवणार आहे. त्यामुळे आता ही निवडणूक आपल्या स्वतःच्या आणि आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी असून तुमच्यासाठीच मी ही निवडणूक लढवणार आहे.येत्या २० नोव्हेंबर रोजी विरोधकांना योग्य धडा शिकवा असे त्यांनी आवाहन त्यांनी केले.यावेळी राजेंचा भाषण ऐकून त्यांच्या समर्थनार्थ एकच जल्लोष केला.

दरम्यान कै.राजे विश्वेश्वरराव महाराज चौकातून ढोल ताश्यांच्या गजरात आणि आदिवासी पारंपरिक नृत्याने भव्य शक्ती प्रदर्शन करत पोलीस स्टेशन समोर पर्यंत रॅली काढण्यात आली.त्यांनतर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यातील त्यांचे समर्थक मोठ्या उत्साहात जल्लोषाने 'राजे साहब आगे बढो हम तुम्हारे साथ है' चे नारे देत समर्थन जाहीर केले.

*जनता हीच माझी तिकीट*

मला पक्षाची उमेदवारी मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले आहेत.माझ्यासाठी कुठलाही पक्ष नको आणि पक्षाचा चिन्हही नको.माझी जनता हीच माझी तिकीट आहे.जनता आशीर्वाद दिल्यास मला विधिमंडळ गाठता येणार आहे.विद्यमान मंत्र्यांनी कितीही पैसा, पॉवर,कार्यकर्त्यांना धमक्या देऊन मला रोखण्याचा प्रयत्न केला तरी

'मै झुकेगा नही साला' असा डायलॉग मारून त्यांनी विरोधकांना एक प्रकारचा चॅलेंज दिला आहे.!


PostImage

MH 33 NEWS

Oct. 13, 2024   

PostImage

काँग्रेसचे नेत्या सोनाली कंकडालवार यांची पांचाळ समाज शारदा देवी मंडळाला …


 

अहेरी : शहरातील ब्राम्हमगरु मंदिर येथे पांचाळ समाज शारदा देवी मंडळाला काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी भेट देऊन शारदा मातेच्या विधिवात पूजा अर्चना,आरती देऊन देवीची दर्शन घेतले.दर्शना दरम्यान सोनालीताईंनी शारदा मातेच्या चरणी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना केले.यावेळी सोनालीताई सोबत शहरातील समस्त महिला वर्ग उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 13, 2024   

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या …


 

अहेरी : तालुक्यातील जामगाव येथील जिल्हा परिषद शाळेजवळील चौकात हिंदवी स्वराज्य संस्थेचे संस्थापक व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविणार असून याचे भूमिपूजन काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजय कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी या दोघांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी जामगांव येथे शिवाजी महाराजांचा पुतळ्या उभारण्यात यावी म्हणून जामगांव येथील समस्त नागरिकांनी काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांच्याकडे अनेकदा मागणी केले होते.जामगाव येथील नागरिकांच्या मागणीला दाद देत अजयभाऊ कांकडलवार यांनी स्व:खर्चाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याची ग्रामस्थांना आश्वासन दिले होते.

ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनानुसार  शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे बांधकामाचे भूमिपूजन केले.महापुरुषांच्या पुतळे बसविण्यासाठी शासन कडून निधी उपलब्ध न झाल्याने शेवटी काँग्रेसनेते अजय कंकडालवार यांनी पुढाकार घेत स्व:खर्चाने पुतळा बांधकाम सामोरे आले.अजयभाऊ कंकडलवार यांचे या कामाप्रती येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त आश्वासन पूर्ती केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

यावेळी माजी उपसरपंच अशोक येलमुले,वांगेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप मडावी,ग्रामपंचायत सदस्य वंदना दुर्गे,माजी जि.प.सदस्य सुनीता कूसनाके,ग्रामपंचायत सदस्य राजू दुर्गे,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,ग्रामपंचायत सदस्य गर्गमताई,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,ओमकार पोट्टे,व्यंकटेश धानोरकर,अरविंद निखाडे,सुरेश आत्राम,हनुमंतू डोके,शंकर आर डोके,मधुकर सांमरे,सदाशिव धानोरकर,श्रीनिवास डोके,अशोक जुनघरे,प्रवीण पिपरे,शुभम धानोरकर,राकेश ठोंबरे,राजेश ठोंबरे,श्रावण पोटे,विनोद डोके,सत्यनारायण सामरे,सुनील चापले,राहुल निखाडे,आनंदराव धानोरकर,अक्षय पोटे,चंपत चौधरीसह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 11, 2024   

PostImage

फ्रेंड्स क्लब नवदुर्गा मंडळ जवळ कंकडालवार परिवाराकडून महाप्रसाद कार्यक्रम आयोजित...!


 

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील दरवर्षी प्रमाणे यंदाही नवदुर्गाचे प्रतिष्ठापणा केले आहे.काल नवदुर्गा मंडळ येथे महाआरती कार्यक्रम आयोजित केले.आयोजित महाआरती कार्यक्रमला काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार आणि काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनाली कंकडालवार यांनी उपस्थित दर्शवून दुर्गा मातेच्या विधिवात पूजा अर्चना,आरती देऊन दर्शन घेतले.

विशेष म्हणजे या वर्षी फ्रेंड्स क्लब नवदुर्गा मंडळ जवळ माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचा कडून महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केले आहे.महाप्रसाद कार्यक्रमला परिसरातील व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसाद आस्वाद घेतले.त्यावेळी आरती दरम्यान अजय कंकडालवार व सोनाली कंकडालवार यांनी दुर्गा मातेच्या चरणी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना केले.तसेच नवदुर्गा मंडळाला वर्गणीही देण्यात आली.

यावेळी अजय कंकडालवार सोबत अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,चंदू बेझालवार,स्वप्नील मडावी,बबलू शेख,चिंटू आत्राम,जावेदभाऊ,रिंकू आत्राम,वाहन चालक सचिन पंचार्य,वाहन चालक प्रमोद गोडसेलवारसह परिसरातील भाविक तसेच गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 10, 2024   

PostImage

आवलमरी येथील भाजप व रा.कॉ.(अजित पवार)गटाचे युवा कार्यकर्त्यांचे काँग्रेस पक्षात …


 

 

अहेरी : तालुक्यातील आवलमरी येथील भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार)गटाचे युवा कार्यकर्त्यांनी आप आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केले.

 

सदरहू पक्ष प्रवेश अहेरी येथील कंकडलवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला असून पक्षप्रवेश केलेल्या सर्व नवोदित कार्यकर्त्यांची काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा समन्वयक अजयभाऊ कंकडलवार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हनमंतू मडावी यांनी पक्षाचे दुपट्टे अन् पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अहेरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षात इतर पक्षांचे कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात इंनकमिंग सुरू असल्याने याची फायदा येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

आवलमरी येथील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सरपंच मारोती मडावी,ग्रामपंचायत सदस्य देवाजी आत्राम,बक्कय्या तलांडी, वेंकटी मोंडी,संद्रम लवंन्ना, मुल्ला तलांडी,अरुण तलंडी,आनंदराव तलांडी,पोचम चटारे, रजनीकांत तमाजुलवार,शंकर मडावी,वसंत तोरेम,वेंकटस्वामी तिरून्हारीवर,मल्लय्या दोंतुलवार,धनंजय सूनतकर आदींनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश घेतले.

 

पक्षप्रवेशा दरम्यान आवलमरीचे ग्रामपंचायत सरपच अक्षय पोरतेट,उपसरपंच चिरंजिव मिरवेलवार,येरमनार येथील उपसरपंच विजय,शैलेश कोंडगोरले,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चल्लावर काका,राजू दुर्गे,ग्रामपंचायत सदस्या वंदना दुर्गे आदी मान्यवर उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 6, 2024   

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उरते परिवाराला आर्थिक मदत...!


 

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली वार्ड क्रमांक 5 येथील रहिवाशी दीपक रामचंद्र उरते ( वय 36 वर्ष ) यांच्या ब्रेन ऑपरेशनसाठी नागपूर येथील खाजगी पोक्स हॉस्पिटल येथे भर्ती झाले उरेत परिवार आज पर्यंत खाली वर पडून दीपकला ऑपरेशनसाठी पैसे ठेवले होते.मात्र उरेत परिवार अंत्यत गरीब असून त्यांना पुढील उपचार व औषधसाठी खूपच अडचण भासत होती.

आलापल्ली येथील त्यांचे नातेवाईकांना संपर्क करून त्याची आर्थिक परिस्थिती सांगितले होते.आज उरते कुटुंबातील काही सदस्य आणि त्यांचे नातेवाईक काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांना भेटून त्यांची आर्थिक अडचण बाबत सांगितले होते.कंकडालवारांनी उरेत कुटुंबाची अडचण बघून दीपकला पुढील औषध उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे.

यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,व्येकटेश धानोरकर तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत चुटूगुंटा,बालाजी मडावी,प्रभाकर मडावी,संतोष कोरेत,विनोद तलांडी,राकेश उरेत,अमोल उरेत,कपिल अर्का,दीपक मडावी,अविनाश आत्राम,महेश,रुपेश आत्राम,भूषण डेकाटेसह आदी उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Aug. 1, 2024   

PostImage

पर्यायी रस्त्याची व्यवस्था करा : माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार!


 

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली ते सिरोंचा व आलापल्ली ते भामरागड मार्गावर पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे.या ठिकाणी नागरिकांना आवागमन करण्यासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे. 

अहेरी तालुक्यातील अनेक विकासकामे सुरू आहे.आलापल्ली ते सिरोंचा व आलापल्ली ते भामरागड मार्गावर पुलंचे बांधकाम करण्यात येत आहे.सदर काम पर्यायी रस्ते तयार न करताच सुरू करण्यात आल्याने पावसाळ्यात परिसरातील नागरीकांना नाहक त्रास सहन करावं अलगाता आहे.

परिसरातील नागरिकांना रहदारीसाठी व आरोग्य सुविधेकरीता तालुका व जिल्हास्तरावर जाणे कठीण झाले आहे.त्याकरीता या दोन्ही मार्गावर पुलांचे व रस्त्यांचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार यांना काळ्या यादीत टाकुन संबंधीतावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा व होणाऱ्या त्रासाला जवाबदार असणाऱ्या कंत्राटदारावर नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी. 

१५ दिवसात कार्यवाही व पक्का रस्त्याचे पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अन्यथा १३ ऑगस्ट २०२४ पासून आलापल्ली - सिरोंचा, आलापल्ली भामरागड, आलापल्ली अहेरी व आलापल्ली आष्टी या चारही मार्गावर राष्ट्रीय कांग्रेस पक्ष तर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असा इशाराही पत्राद्वारे माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

अप्पर जि्हाधिकारी श्री. विजय भाकरे साहेब यांना निवेदन देताना श्री.अजयभाऊ कंकडालवार सहीत माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलाडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,माजी उपसरपंच अशोक येलमुले राकेश सडमेकसह आदी उपस्थित होते


PostImage

MH 33 NEWS

July 22, 2024   

PostImage

अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्यांची तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत …



    
अहेरी : मागील चार - पाच  दिवसांपासून सगळीकडे संततधार पाऊस सुरू असून त्यामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने याची फटका सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना सुध्दा खूप मोठ्या प्रमाणात बसले असून संततधार पाऊस व पूरजन्य परिसथितीमुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यातील अनेक  नागरिकांचे घरांचे पडझड झाली असून तसेच शेतकऱ्यांचे सुध्दा अतोनात नुकसान झाली असून सरकार व  संबंधित विभागाने नुकसानीची पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी काँगेस नेते व जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आह.
  
संततधार पावसामुळे नुकसान झालेल्यांची आणि पूरजन्य परिस्थितीत अडकलेल्यांची अजयभाऊ कांकडलवार यांनी स्वतः आपल्या कार्यकर्त्यांसमवेत भेटी देत आपल्यापरीने मदत कार्याला सुरुवात केली आहे.तसेच त्यांनी नागरिकांसाठी आपल्या स्वतःची चोवीस तास हेल्पलाईन सेवा सुध्दा सुरू केली आहे.

अजयभाऊ कंकडालवार यांनी आज पूरग्रस्त गावांना भेट देऊन तेथील नागरिकांची अडीअडचणी जाणून घेतले.तसेच अनेक नुकसान ग्रस्तांना आपल्यापरीने आर्थिक मदतीचे हात दिले.

पूरग्रस्त गावांची पाहणी दरम्यान कंकडालवार यांचे समवेत माजी जि.प.सदस्य अजय नैताम,इंदारमचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य गुलाबराव सोयाम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,राकेश सडमेक,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवार,नरेश गर्गमसह काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.