Today Follow
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
गडचिरोली, ता. २०: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीना कायमस्वरुपी रोजगार द्यावा, विद्यावेतनात वाढ करुन ते नियमित व वेळेवर द्यावे या मागण्यांसाठी आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
गडचिरोली जिल्ह्यात ऑगस्ट २०२४ पासून २ हजार ३०० मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी वेगवेगळ्या २७ आस्थापनांवर कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती सहा महिन्यांसाठी करण्यात आली होती. परंतु फेब्रुवारी २०२५ मध्ये हा कालावधीत संपणार आहे. त्यामुळे आम्हाला जुन्याच आस्थापनेवर कायम करावे, या प्रमुख मागणीसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षार्थीनी मोर्चा काढला. या मोर्चात जिल्हाभरातील २ हजारांहून अधिक प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दशरथ कोवे, उपाध्यक्ष चरण बन्सोड, सचिव पंकज नैताम आदींच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.
Today Follow
धारदार शस्त्राचा धाक दाखवून प्रेमविरांना लुटले
- पीडितेच्या तक्रारीवरून दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल
चंद्रपूर:-
धारदार शस्त्राचा धाका दाखवून प्रेमविरांना ६ हजार ८०० रुपये लुटणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध वरोरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. सदर घटना १८ जानेवारी ला दुपारी ४ वाजता चंद्रपूर नागपूर महामार्गावरील वरोरा येथून ४ किमी अंतरावर असलेल्या महाकाली कॉलनीजवळ घडली.
निखिल सुभाष तुरणकर (२६) रा. आनंदवन चौक, वरोरा हा छत्रपती चौक, वणी येथे असलेल्या बजाज फायनान्स कंपनीच्या विक्री विभागात कार्यरत आहे. त्याचा मित्र प्रेम गोहणे याच्या नातेवाईकाला फायनान्सवर दुचाकी खरेदी करायची होती. त्यामुळे प्रेम याचा बोलण्यावरून वरून तो वरोरा येथे आला. मात्र येथे आल्यावर त्याला सध्या वाहन खरेदी करायचे नसल्याचे लक्षात आल्याने तो एका मुलीला भेटायला गेला. तेथून वरोरा तहसील मुख्यालयापासून चार किमी अंतरावर असलेल्या महाकाली कॉलनीजवळ दोघेही उभे राहून बोलत होते.
दुपारी ४ वाजता काळ्या रंगाच्या पल्सर वर ३० व ३५ वयोगटातील दोन तरुण आले. ते घटनास्थळी पोहोचताच दोन तरुणांपैकी एकाने निखिलच्या गालावर चापट मारून त्याच्या खिशातील १ हजार ८०० रुपये हिसकावले. हे बघताच आजूबाजूला बसलेले प्रेमी युगुल पसार झाले. यानंतर त्यांनी दोघांकडे आणखी पैशांची मागणी सुरू केली असता, त्यांनी आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. हे ऐकून एका तरुणाने पल्सरमध्ये ठेवलेले धारदार शस्त्र काढून निखिलच्या पोटावर ठेवले आणि पैशाची मागणी करू लागला.
या अनपेक्षित घटनेने निखिल आणि मुलगी खूपच घाबरले होते पण दोघेही सोडायला तयार नव्हते. त्यामुळे रोख रक्कम नसल्याने निखिलने फोन नंबर देण्यास सांगितले. त्यानंतर एका तरुणाने मोबाईल स्कॅनर दाखवला आणि त्यात निखिलने ५ हजार रुपये ट्रान्सफर केले. तेथून निघताना दोन्ही तरुणांनी कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या निखिलने वरोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ज्यामध्ये स्कॅनरमध्ये सूरज बालाजी गहाणे हे नाव दिसले होते आणि त्याने आपल्या सहकाऱ्याला गोलू असे संबोधित केले होते. निखिलच्या तक्रारीवरून वरोरा पोलिसांनी सूरज गोहणे आणि गोलू यांच्याविरुद्ध कलम ३ (५), ३१२, ३५१ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास वरोरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार अजिंक्य तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल नवघरे करीत आहेत.
Today Follow
गडचिरोली : तालुक्याच्या अमिर्झा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेची शाखा आहे. या बँकेत परिसराच्या दहा गावांतील नागरिकांची बँक खाती आहेत; येथे व्यवहार करण्यासाठी किंवा माहिती विचारण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना बँक व्यवस्थापकाकडून हीन दर्जाची व अपमानास्पद वागणूक दिली जाते. यामुळे ग्राहक त्रस्त आहेत.
अमिर्झा येथे चांभार्डा, मरेगाव, मौशिखांब, मुरमाडी, भिकारमौशी, आंबेटोला, आंबेशिवणी, जेप्रा, राजगाटा, धुंडेशिवणी, कळमटोला, पिपरटोला, बोथेडा आदी गावांतील ग्राहक बँकेतून पैसे काढणे व जमा करण्याकरिता येतात. माहिती विचारल्यानंतर त्यांना योग्य व सन्मानजनक वागणूक देणे गरजेचे आहे; परंतु येथील बैंक व्यवस्थापकासह येथील कर्मचारीसुद्धा ग्राहकांना उद्धट वागणूक देतात. व्यवस्थापकाची सध्या मनमानी सुरू आहे.
नवीन खाती काढण्यासाठी कुणी गेले असता, कशासाठी खाते काढता, असे उलट बोलतात, असा आरोप अमिर्झासह चांभार्डा येथील ग्राहकांचा आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी केली.
Today Follow
कर्नाटक येथे धान रोवणीसाठी गेलेल्या मजूरांचे दलालाने पैसे थकविले ,आ.विजय वडेट्टीवार यांनी दिला मदतीचा हात
मजुरांचा परतीचा झाला मार्ग मोकळा
सिंदेवाही : कर्नाटक
राज्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी व सिंदेवाही तालुक्यातील २१ मजूर हे धानपीक रोवणीच्या कामासाठी सुमारे १ महीन्यापुर्वी गेले होते. त्याठिकाणी महीनाभर काम केल्यानंतर मजूरीचे पैसे त्यांना तिथं घेऊन जाणाऱ्या कर्नाटकातील कंत्राटदाराने मजूरांना दिलेच नाही. व तो पसार झाला. त्यामुळे मजूरांकडे गावाकडे परत यायला देखील पैसे नव्हते. ते सगळे संकटात सापडले होते. अशा स्थितीत संकटात सापडलेल्या मजूरांनी कृउबा संचालक प्रभाकर सेलोकर, माजी नगरसेवक डॉ. नितीन उराडे, शहर काँग्रेस सचिव पुष्पाकर बांगरे यांच्याशी संपर्क साधून आपली व्यथा सांगितली.
सदरची बाब ह्या तिन्ही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांना कळवली असता लगेचच त्यांनी आपल्या यंत्रणेमार्फत सदर मजूरांपर्यत आर्थिक मदत पोहचवली. व महाराष्ट्रातील आपल्या स्वगृही पोहचण्यासाठी लागणारा खर्च व संपूर्ण सहकार्य देखील आपण करणार असल्याचे सांगितले.
कर्नाटक राज्यात गेलेल्या मजूरांमध्ये प्रकाश भोयर, तुळशीदास भोयर, माधूरी भोयर, सुनिता कन्नाके रा. आक्सापुर, दिनेश मेश्राम, स्वप्नील मेश्राम, पायल मेश्राम, आशा मेश्राम रा. गडबोरी, देविदास भानारकर, वैशाली सामुसाकडे, गिता भानारकर, रंजू भानारकर रा. मोटेगाव, अशोक जुमनाके, प्रशांत जुमनाके, वंदना जुमनाके, सायली जुमनाके रा. खातगाव, संदीप ठाकरे, वनिता ठाकरे, शिल्पा ठाकरे रा. गिरगाव, चंद्रभागा सामुसाकडे रा. नवरगाव, निशा मेश्राम रा. पाडरवाणी यांचा समावेश आहे. हे सर्व मजूर आता परतणार असुन आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने हे सर्व शक्य झालं आहे. त्यामुळे सर्व मजूरांनी आमदार विजय वडेट्टीवार यांचे आभार देखील व्यक्त केले आहेत.
Today Follow
पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तिन तरुणांना बसने दिली धडक,तिघेही तरुण ठार
बीड; मोची पिंपळगाव फाट्यावर बसच्या धडकेत तीन युवक ठार बीड परळी रस्त्यावर बीड शहरापासून पाच किलोमीटर असलेल्या मोची पिंपळगाव फाट्यावर सकाळी 6 वाजता पोलीस भरती सराव व व्यायाम करण्यासाठी गेलेल्या घोडके राजुरी गावातीलच तीन युवकांना बसणे उडवले, या दोघेजण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाल्याने त्याला बीड येथील शासकीय रुग्णालयात
उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजुरी गावातील पाच विद्यार्थी हे सकाळी व्यायाम करण्यासाठी बीड परळी रस्त्यावर आले असता बस क्रमांक MH 14BT 1473 या बसणे तिघांना उडवले यात 1) ओम सुग्रीव घोडके वय 19 वर्ष, 2) विराट बाब्रुवान घोडके वय 18 वर्ष 3) सुबोध बाबासाहेब मोरे वय 19 वर्ष सर्व रा. घोडके राजुरी याना बसणे उडवल्याने ओम घोडके विराट घोडके जागीच ठार झाले तर सुबोध मोरे हा जखमी असल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आणले असता उपचारादरम्यान याचा देखील मृत्यू झाल्याचे समजते. हा अपघात एवढा भीषण होता की रस्त्यावर रक्त, मांसाचा सडा पडला होता. बस काही अंतरावर जाऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात गेली. या अपघातामुळे घोडकाराजुरी गावावर शोककळा पसरली असून घोडका राजुरी गावातील नागरिकांची बीड शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती.
अधिक तपास पोलीस करीत आहेत
Yesterday Follow
सावंतवाडी येथील प्रसिद्ध आरती मासिकातर्फे दरवर्षी कथा व कविता स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यंदा आयोजित करण्यात आलेल्या "ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर, पुणे पुरस्कृत उत्कृष्ट कवितास्पर्धा -२०२४" मध्ये झाडीपट्टीतील साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांच्या "पेरते व्हा" या कवितेस द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आल्याचे "आरती" मासिकाचे संपादक प्रणव भागवत व भारत गावडे यांनी कळविले आहे.
पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम,प्रमाणपत्र व दिवाळी अंक भेट अशी असून वरील कविता आरती दिवाळी अंक- २०२४ मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे मागील वर्षी याच संस्थेच्या कथा व कविता लेखन स्पर्धेत चुडाराम बल्हारपुरे यांच्या 'श्रृंखला' या कथेस द्वितीय क्रमांकाचे व 'रानगर्भ फुलत आहे ' या कवितेस प्रथम पुरस्कार प्राप्त झाले.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा.अरुण बुरे, योगेश गोहणे, प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर, प्रा. डॉ. जनबंधू मेश्राम,प्रा. डॉ.राजकुमार मुसणे, प्रा. नवनीत देशमुख (साहित्यिक), मधुश्री प्रकाशनचे प्रा. पराग लोणकर (प्रकाशक) , डॉ. एस. एन.पठाण, डॉ. परशुराम खुणे, नरेश बावणे, उपसंपादक देशोन्नती, व इतर साहित्यिक मित्रांनी अभिनंदन केले आहे.
Yesterday Follow
गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदासाठी ईच्छा बोलून दाखविल्यानंतर गडचिरोलीचे पालकमंत्री पद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होईल हे स्पष्ट झाले होते.. मुख्यमंत्री एखाद्या जिह्याचे पालकमंत्री घेणे हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडत आहे. जिल्ह्यात, आरोग्य, रस्ते, सार्वजानिक वाहतूक व्यवस्था, यासारखे मूलभूत सुविधांचे प्रश्न आवासून उभे असून गेल्या अडीच वर्षाच्या त्यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी याकडे फारसे लक्ष दिले नाही.. किमान पुढील पाच वर्ष तरी ते याकडे लक्ष देतील या अपेक्षेने गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक नजरा लावून बसले आहे. गडचिरोली सारख्या बहुल आदिवासी भागात आता मुख्यमंत्र्यांनी पालक मंत्री हे पद भूषवल्यामुळे आता तरी गडचिरोली सारख्या आदिवासी जिल्ह्याचे विकास होईल याच नजरेत सर्व नागरिक बघून राहिले आहे.
Yesterday Follow
Saif Ali Khan Attack: क्या बॉलीवुड स्टार सैफ अली खान पर हमला करने वाला आरोपी बांग्लादेशी है?
मुंबई में हाल ही में हुए इस हाई-प्रोफाइल मामले ने सभी का ध्यान खींचा है। आरोपी मोहम्मद शहजाद को मुंबई अपराध शाखा ने ठाणे के कंदलवन जंगल से गिरफ्तार किया। कोर्ट में पेशी के दौरान, पुलिस ने दावा किया कि आरोपी बांग्लादेशी है और सिर्फ छह महीने पहले भारत आया है। लेकिन, आरोपी के वकील के बयान ने पूरे मामले को पलट दिया।
मुंबई के पॉश इलाके में सैफ अली खान पर अचानक हमला हुआ।
पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए आरोपी को ठाणे के जंगल से गिरफ्तार किया।
कोर्ट में पेशी के दौरान पुलिस ने कहा कि आरोपी बांग्लादेश से अवैध तरीके से भारत आया है।
लेकिन, मामला तब दिलचस्प हो गया जब आरोपी के वकील ने कोर्ट में चौंकाने वाला बयान दिया
"मोहम्मद शहजाद पिछले सात साल से भारत में रह रहा है। पुलिस का यह दावा कि वह छह महीने पहले आया है, पूरी तरह से झूठ है।"
उन्होंने यह भी जोड़ा कि:
"पुलिस ने बिना किसी नोटिस या ठोस सबूत के उसे गिरफ्तार किया है। यह सुप्रीम कोर्ट के दिशा-निर्देशों का उल्लंघन है।"
फैंस की चिंता: सैफ अली खान के प्रशंसक सोशल मीडिया पर उनकी सुरक्षा को लेकर सवाल उठा रहे हैं।
बॉलीवुड का सवाल: क्या सेलिब्रिटी की सुरक्षा पर और ध्यान देने की जरूरत है?
कानूनी विशेषज्ञों का नजरिया: आरोपी की नागरिकता को साबित करना पुलिस के लिए बड़ी चुनौती बन सकता है।
इस मामले की अगली सुनवाई में सच्चाई सामने आने की उम्मीद है। आरोपी की नागरिकता और हमले के पीछे की मंशा का खुलासा करना पुलिस के लिए बड़ी जिम्मेदारी है।
आप इस घटना के बारे में क्या सोचते हैं? क्या आरोपी बांग्लादेशी है या मामला कुछ और है? अपनी राय कमेंट सेक्शन में जरूर बताएं। ताजा अपडेट्स के लिए हमारे साथ जुड़े रहें।
Yesterday Follow
एटापल्ली : तालुक्यातील उडेरा येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मार्फत खरीप पणन हंगाम 2024-2025 धान खरेदी केंद्राचे उदघाटन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते फित कापून धान खरेदी सुरूवात करण्यात आले आहे.या धान खरेदी कार्यक्रमला आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी प्रमुख उपस्थित होते.
अधिकृत केंद्रावराच धान विक्री करा ज्या शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाला आहे.त्यांनी आपल्या धान विक्री करावे आणि ज्यांच्या ऑनलाइन नोंदणी झाले नाही.त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी आणि कोणीही शेतकरी यापासून वंचित राहू नये आणि शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांनी केले.
यावेळी राहुनू गावडे,कुमरेट्टी,अजय गावडे,सुरेश पुंगाटी,राकेश अग्गुवारसह गावातील शेतकरी तसेच स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Yesterday Follow
सुरक्षाबलों ने हाल ही में छत्तीसगढ़ के बीजापुर में तेलंगाना सीमा पर नक्सलियों के खिलाफ बड़ी कार्रवाई को अंजाम दिया था। इस दौरान 16 जनवरी को हुई मुठभेड़ में 12 हार्डकोर माओवादियों को ढेर कर दिया था। जिसमें से 5 महिला और 7 पुरुष नक्सली थे। यह मुठभेड़ करीब 13 घंटों तक चली थी और इस ऑपरेशन को 3 हजार से ज्यादा जवानों ने अंजाम दिया था। अब नक्सलियों ने इस मुठभेड़ को लेकर एक नया खुलासा किया है।
दरअसल पुलिस ने इस मुठभेड़ में 12 नक्सलियों के मारे जाने का दावा किया था। लेकिन हाल ही में माओवादियों ने एक प्रेस नोट जारी कर इसमें 18 नक्सलियों के मारे जाने की बात कही है। नक्सलियों की ओर से जारी प्रेस नोट में कहा गया है कि इस मुठभेड़ में मोस्ट वांटेड नक्सली दामोदर उर्फ चोखा राव भी मारा गया है, जो कि कमांडर स्टेट कमेटी मेम्बर और तेलंगाना स्टेट कमेटी का चीफ था। साथ ही उस पर 50 लाख रुपए का इनाम भी घोषित था। इसके अलावा PPCM हुंगी, देवे, जोगा और नरसिंह राव भी मारे गए हैं।
बता दें कि इस मुठभेड़ में जवानों ने 12 नक्सलियों के शव बरामद किए थे, लेकिन नक्सलियों ने 18 माओवादियों के मारे जाने की जानकारी प्रेस नोट में दी है। मुठभेड़ के बाद सुरक्षाबलों ने मौके से आधुनिक हथियार, राकेट लॉन्चर, वायरलेस सेट और विस्फोट भी बरामद किए थे, जिनका उपयोग नक्सली हमेशा बड़े हमलों की तैयारी के लिए करते थे।
बस्तर के आईजी पी. सुन्दरराज ने बताया था कि यह मुठभेड़ पामेड़, बासागुड़ा और उसूर क्षेत्र के जंगलों में हुई थी। यह इलाका माओवादी गतिविधियों का गढ़ माना जाता है। सुरक्षाबलों को मुखबिर से सूचना मिली कि जंगल में नक्सलियों की मौजूदगी है। इसके बाद तीन जिलों सुकमा, बीजापुर और दंतेवाड़ा के हजारों जवानों ने इलाके को चारों ओर से घेर लिया था। ऑपरेशन में डीआरजी सुकमा, डीआरजी बीजापुर, डीआरजी दंतेवाड़ा और एसटीएफ कोबरा की 204, 205, 206, 208, 210 और CRPF की 229 बटालियन शामिल थीं।
शव और भारी मात्रा में हथियार हुए थे बरामद
मुठभेड़ के बाद मारे गए नक्सलियों के शवों को जिला मुख्यालय लाया गया था, इन नक्सलियों में PLGA बटालियन नंबर 1 और सेंट्रल रीजनल कमेटी (CRC) के सदस्य शामिल थे। सुरक्षाबलों ने नक्सलियों के शवों के पास से अत्याधुनिक हथियार और हथियार बनाने के उपकरण भी जब्त किए। जवानों को सूचना मिली थी कि मारुड़बाका और पुजारीकांकेर के जंगलों में भारी संख्या में हथियारबंद नक्सली छिपे हैं। सुरक्षाबलों ने इलाके की घेराबंदी कर ज्वाइंट ऑपरेशन को अंजाम दिया।
Jan. 18, 2025 Follow
आरमोरी, (ता.प्र). शहरातील ब्रह्मपूरी मार्गावरील जीवानी राईसमिल समोर वास्तव्याने राहत असलेल्या एका व्यक्तीच्या घरासमोरील रस्त्यावर ट्रक उभे केल्याप्रकरणी संबंधिताने विचारणा केली असता ट्रक मालकाने शिवीगाळ केल्या प्रकरणी बुधवारी (दि.15) आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रोहित नामदेव नाणे (28, रा.आरमोरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
शहरातील ब्रह्मपूरी मार्गावरील जिवानी राईस मिलसमोर वास्तव्याने राहत असलेले सेवानिवृत्त पोस्ट मास्तर जगदीश गंगाधर निमजे (70) घरासमोर रोहित नाणे यांनी ट्रक उभा केला. यामुळे त्यांना आवागमनास त्रास होत असल्याने याबाबत त्यांनी नाणे यास जाब विचारला. यावर आरोपीने फिर्यादीच्या घराच्या संरक्षण भिंतीजवळ येत त्यांना शिवीगाळ करून तू
घराबाहेर निघ, तुला चिरून काढतो, अशी शिविगाळ करण्यास सुरुवात केली. यादरम्यान फिर्यादीच्या पत्नीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तिलाही शिवीगाळ केली. याप्रकरणी जगदीश निमजे यांनी थेट आरमोरी पोलिस ठाणे गाठून आरोपी नाणे याच्याविरोधात तक्रार दाखल केली. यावरून आरमोरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार नीलकंठ कोकडे करीत आहेत.
Jan. 18, 2025 Follow
अमरावती, ब्युरो. शहरातील पत्रकार कॉलनीतील ग्रीन जीममध्ये बसलेल्या अल्पवयीन प्रेमीयुगुलांना बाहेर काढण्यात आले. मात्र या अल्पवयीन मुलाने काही तरुणांनासोबत घेऊन एका कुटुंबासह इतर नागरिकांना मारहाण केली. या घटनेनंतर प्रचंड गोंधळ उडाला होता. अखेर परिसरातील रहिवाशांनी गाडगेनगर पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. 15) तक्रार दिली. - बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास - पत्रकार कॉलनीतील ग्रीन जीमजवळ एक - मुलगा आणि दोन मुली बसले होते. दरम्यान काही वेळाने एक मुलगा व मुलगी तेथे - पोहोचले. त्यांचे अंधाराचा फायदा घेत - अश्लील कृत्य केले. हा प्रकार त्या परिसरात - राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आला. - त्यावेळी त्यांनी या मुला-मुलींना हटकले. त्यानंतर या परिसरातील काही महिला रात्रीचे
जेवण आटोपून बाहेर फिरत होत्या. शाळेच्या ड्रेसवर असलेल्या मुली महिलांना दिसल्या. त्यावेळी त्यांनीही या मुला-मुलींना हटकले. त्यामुळे अल्पवयीन मुलगा संतापला आणि तो तेथून निघून गेला. परंतु त्याने काही वेळातच त्याने आपल्या काही सहकाऱ्यांना लाठ्या-काठ्या घेऊन बोलावून घेतले. दरम्यान, त्याने या परिसरातील अनंता मस्करे हेमंत मस्करे, वसंता मस्करे आणि त्यांच्या मुली पलक आणि अभिजित सव्वालाखे यांना मारहाण केली. त्यामुळे ते जखमी झाले. दरम्यान, त्यांनी आवारात उभ्या असलेल्या कारवर दगडफेक केली. हा गोंधळ पाहून परिसरातील नागरिक गोळा झाले. या हल्ल्याने संपूर्ण नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर काही तरुणांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jan. 18, 2025 Follow
. दिल्ली, निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधकाम हा अजामीनपात्र गुन्हा ठरवावा. रस्ते कंत्राटदार आणि अभियंत्यांना अपघातांसाठी जबाबदार धरून तुरुंगात पाठवले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केले. उद्योग संघटना कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. गडकरी म्हणाले की, रस्ते अपघातांमध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. सदोष रस्ते बांधकाम हा अजामीनपात्र गुन्हा ठरवावा आणि रस्ते कंत्राटदार, सवलतीधारक आणि अभियंत्यांना अपघातांसाठी जबाबदार धरून तुरुंगात पाठवावे, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे 2030 पर्यंत रस्ते अपघातातील मृत्यू निम्म्याने कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2023 मध्ये
देशात पाच लाख रस्ते अपघात झाले, ज्यामध्ये 1,72,000 लोकांचा मृत्यू झाला. गडकरी म्हणाले, यापैकी 66.4 टक्के किंवा 1,14,000 लोक 18-45 वयोगटातील होते, तर 10,000 मुले होती. हेल्मेट न घातल्यामुळे 55,000 लोकांचा मृत्यू झाला आणि सीट बेल्ट न घातल्यामुळे 30,000 लोकांचा मृत्यू झाला. महामार्गांवरील ब्लॅक स्पॉट्स (अपघात प्रवण ठिकाणे) दुरुस्त करण्यासाठी महामार्ग मंत्रालय 40,000 कोटी रुपये खर्च करत असल्याचेही गडकरी म्हणाले. देशात चालकांची तीव्र कमतरता दूर करण्यासाठी प्रशिक्षण आणि फिटनेस सेंटर्स स्थापन करण्यासाठी उद्योग आणि इतर संबंधित संस्थांना सरकारसोबत भागीदारी करण्याचे आवाहन गडकरी यांनी केले.
Jan. 18, 2025 Follow
गडचिरोली :- नेहरू युवा केन्द्र युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकार व केंद्रीय रिजर्व पोलिस दल यांचे संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील ५० आदिवासी युवकांची तुकडी कोचीन (केरळ) येथे होणाऱ्या आदिवासी युवा आदान प्रदान कार्यक्रमासाठी आज रवाना करण्यात आली.
खासदार डॉ. नामदेव किरसान व केंद्रीय रिजर्व पोलिस दलाचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा यांनी कोचीन कडे प्रस्थान करण्याऱ्या युवकांना हिरवी झेंडी दाखवूव रवाना केले.
डेप्युटी कमांडंट सुमित वर्मा, जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे, सुनील चडगुलवार, रुपेश टिकले, गौरव येणप्रेड्डीवार, अनुप कोहळे यावेळी उपस्थित होते.
खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी युवकांशी संवाद साधताना आपण महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहात त्यामुळे या संधीचा लाभ घेऊन आपल्या गडचिरोली जिल्ह्याचे नाव उंचवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार केंद्रीय पोलीस दलाचे पोलिस निरीक्षक अनंत जगदाळे यांनी मानले.
ह्या वर्षी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली, अहेरी आणि भामरागड ह्या तीन तालुक्यातील ४५० युवा भारतातील ९ वेगवेगळ्या शहरांना भेट देणार आहेत. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आदिवासी तरुणांना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची जाणीव करून देणे आणि त्यांना विविधतेतील एकतेची संकल्पना आत्मसात करणे, त्यांना विकासात्मक उपक्रम आणि औद्योगिक प्रगतीची जाणीव करून देणे आणि आदिवासी तरुणांना इतर क्षेत्रात प्रवृत्त करणे हा आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख उपक्रमांमध्ये घटनात्मक अधिकारी, मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्तींसोबत संवाद सत्रे, पॅनल चर्चा, व्याख्यान सत्र, आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत उपक्रम, वक्तृत्व स्पर्धा, कौशल्य विकास, करिअर मार्गदर्शनाशी संबंधित उद्योग भेटी, महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक स्थळांच्या भेटींचा समावेश आहे.
Jan. 18, 2025 Follow
गडचिरोली दि: :-जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे आज भेट देऊन रुग्णालयातील विविध विभाग आणि सुविधा यांची पाहणी केली. भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसोबत संवाद साधून रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांबाबत माहिती घेतली. त्यांनी आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी आकस्मिक विभाग, अपघात विभाग, ट्रॉमा वार्ड, बाह्य रुग्ण विभाग, डायलेसिस युनिट, केमोथेरपी विभाग, ऑक्सीजन प्लांट आणि औषध भांडार यासह रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली. त्यांनी आकस्मिक आणि अपघात विभागातील उपलब्ध उपकरणे आणि सुविधा तपासून पाहिल्या. बाह्य रुग्ण विभागातील औषध पुरवठा व त्याची वैधता याबाबत सविस्तर चर्चा केली आणि औषधीची वैधता व त्यांचे परवाने प्रमाणपत्र तपासूनच पुरवठा करण्याचे निर्देश दिले.
एनसीडी विभागामध्ये तपासणीसाठी शुगर आणि रक्तदाब तपासणी किट उपलब्ध असल्याची खात्री केली. दंत चिकित्सा विभागामध्ये उपलब्ध रूट कॅनल, बॉयोप्सी आदी सेवा तसेच उपकरणांची कार्यक्षमता तपासली. रुग्णालयाच्या ऑक्सीजन प्लांटची माहिती घेऊन त्याच्या कार्यक्षमतेची खात्री केली.
याशिवाय, जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील डायलेसिस युनिटच्या विस्ताराची आवश्यकता ओळखून तालुकास्तरावर अधिक खाटांची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव सुचवला.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी रुग्णालयात मेडिकल स्टोअर निर्माण करण्याची मागणी केली.
जिल्हाधिकारी श्री पंडा यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित विषयांचा आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्यात जिल्हा शल्य चिकित्सक व अधिष्ठात्यांसमवेत संयुक्त बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले.
यावेळी जिल्हाधिकारी यांच्या समवेत उपविभागीय
अधिकारी राहुल मीना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी एच. विके (किलनाके), तसेच सामान्य रुग्णालयातील प्रभारी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. मनिष मेश्राम, प्रभारी निवासी वैद्यकीय अधिकारी ( बाहय संपर्क )बागराज धुर्वे, तसेच रुग्णालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Jan. 18, 2025 Follow
अभ्यास करीत नाही म्हणून भिंतीवर डोके आपटून व गळा दाबून जन्मदात्या बापानेच नऊ वर्षीय मुलाचा केला खून
पुणे : बारामती तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील होळ येथील नऊ वर्षी मुलाची बापानेच हत्या केल्याचे समोर आले आहे, बारामती तालुक्यातील होळ येथील पियुष विजय भंडलकर या नऊ वर्षीय बालकाचा त्याच्याच वडिलांनी अभ्यास करत नाही म्हणून रागाच्या भरात मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुलगा अभ्यास करत नाही यामुळे वडीलांनी मुलाला रागाच्या भरात भिंतीवर डोके आपटून आणि गळा दाबून त्याचा खून केला. १४ जानेवारी ला दुपारी अडीच वाजता राहत्या घरी ही घटना घडली आहे. त्यानंतर हा सर्व प्रकार लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वडगाव निंबाळकर पोलिसांनी या खुनाचे रहस्य उलघडत वडील विजय गणेश भंडलकर, मयत पियुषची आजी शालन गणेश भंडलकर आणि संतोष सोमनाथ भंडलकर या तिघांवर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडील विजय भंडलकर यांनी मुलगा पियुष याला तू अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतो, तू तुझ्या आईच्या वळणावर जावून माझी इज्जत घालवणार दिसतोयस, असे म्हणत त्याला हाताने मारहाण केली. राग अनावर झाला अन् त्यांनी त्याचा गळा दाबून त्याला भिंतीवर आपटले. यात त्याचा मृत्य झाला. पियुषची आजी हे सर्व पाहत होती पण तिने मुलगा विजयला अडवले नाही. त्यानंतर विजय याच्या सांगण्याप्रमाणे पियुष हा चक्कर येवून पडला आहे, अशी खोटी माहिती तिने दिली.
संतोष भंडलकर याने डॉ. भट्टड यांच्या दवाखान्यात पियुषला नेल्यानंतर तेथे विजय याच्या सांगण्यावरून पियुष हा चक्कर येवून पडल्याची खोटी माहिती दिली. डॉक्टरांनी पियुष याला होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेवून जाण्याचा सल्ला दिला. मात्र तेथे न नेता आणि मयताबाबत गावातील पोलीस पाटील अथवा इतर कोणालाही काहीही न सांगत नातेवाईकांना बोलावून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताचे शवविच्छेदन न करता थेट अत्यंविधीची तयारी केली.
पोलिसांना खबऱ्याकडून ही माहिती समजताच पोलिसांनी अंत्यविधी थांबवत पियुष याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बारामतीला नेला आणि त्यानंतर तपासात त्याच्या वडिलांनीच पियुषची हत्या केल्याचं समोर आले आहे. या प्रकरणी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Jan. 18, 2025 Follow
जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध महिलेला केली बेदम मारहाण व काढली गावातून धिंड
अमरावती : जादूटोण्याच्या संशयावरून मेळघाटातील
रेट्याखेडा या गावातील एका ७७ वर्षीय वृद्ध महिलेला बेदम मारहाण करून तिची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार चिखलदरा तालुक्यातील रेट्याखेडा येथे उघडकीस आला आहे. या महिलेच्या गळ्यात चपलांचा हार घालून गावातून फिरवण्यात आले.
तिच्या अंगाला गरम सळाखीचे चटकेही देण्यात आले. काही दिवसांपुर्वी अमरावतीत जातपंचायतीच्या आदेशाचे पालन केले नाही, म्हणून महिलेसह तिच्या कुटुंबाला बहिष्कृत करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यातच आता ही नवीन घटना समोर आली आहे.
मेळघाटातील अमानुष छळाची घटना गेल्या ३० डिसेंबर रोजी घडली. पीडित वृद्ध महिलेचा मुलगा आणि सून हे रोजगारासाठी गावापासून दूर राहतात. ४ जानेवारी रोजी त्यांना या घटनेची माहिती मिळाली.
त्यानंतर काल शुक्रवारी पीडित महिलेने कुटुंबासह
जिल्हाधिकारी कार्यालय गाठून तक्रार दाखल केली. त्यानंतर तिच्यावरील अत्याचाराला वाचा फुटली. पोलिसांत तक्रार दाखल करूनही न्याय न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागले, असे पीडित महिलेच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
ही वृद्ध महिला ३० डिसेंबरला रेट्याखेडा येथील तिच्या घरात एकटीच होती. ती पहाटे घराबाहेर आल्यानंतर शेजारी राहणाऱ्या दाम्पत्याने तिला पकडून ठेवले. पीडित वृद्ध महिला आमच्या घराच्या आजूबाजूला जादूटोणा करीत असल्याचा आरोप या दाम्पत्याने केला. त्यानंतर एका व्यक्तीने तिला काठीने मारहाण केली. इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तिच्या डोक्यावर गाठोडे ठेवून तिची गावातून धिंड काढण्यात आली. नंतर गावातून बाहेर काढण्यात आले. या प्रकरणामध्ये गावातील पोलीस पाटील देखील सहभागी झाला होता. या दरम्यान पीडित महिलेचा अमानुष छळ करण्यात आला. तिला गरम सळाखीने चटके देण्यात आले, असे तक्रारीत नमूद आहे.
पीडित महिलेसह तिचा मुलगा, सून यांनी शुक्रवारी अमरावती गाठून जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली. या तक्रारीची प्रत राज्य महिला आयोग, पोलीस
महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक आणि धारणीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहे. अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले आहे.
राज्य सरकारने २०१३ साली जादूटोणा, अघोरी कृती, नरबळी आणि काळी जादू याच्या विरोधात कायदा संमत केला. या कायद्यात १२ कलमे आहेत. तरीही या घटना थांबलेल्या नाहीत. अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे सगळ्यांत जास्त शोषण होते, हे दिसून आले आहे.
Jan. 18, 2025 Follow
गडचिरोली :- स्वामित्व योजनेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या जमिनीच्या सीमांचे निर्धारण होऊन मालकी हक्काची सनद मिळाली आहे. यामुळे जमिनीशी संबंधित वाद त्वरित निकाली लागतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील 50 लाखाहून अधिक घरमालकांना मालमत्ता कार्डांचे ऑनलाईन वितरण आज करण्यात आले. या योजने अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील 60 गावांमधील 10,449 मालमत्ता धारकांना 8,156 मालमत्ता कार्डांचे (सनद) वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित कार्यक्रमात हा वितरण सोहळा पार पडला. यावेळी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते सनद वाटप कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले.
कार्यक्रमाला खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षक नंदा आंबेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवी कनसे, आणि श्री. प्रशांत वाघरे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पंडा यांनी यावेळी सांगितले की, स्वामित्व योजनेमुळे मालमत्तेच्या कायदेशीर मालकीची खात्री होऊन कर्ज मिळणे सुलभ झाले आहे. या योजनेचा लाभ 100 टक्के नागरिकांना मिळवून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. यासाठी भूमी अभिलेख व ग्रामपंचायत विभागाने जोमाने प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार डॉ. मिलिंद नरोटे व प्रशांत वाघरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षक नंदा आंबेकर यांनी केले. त्यांनी सांगितले की, ड्रोनच्या साहाय्याने गावठाणातील मिळकतींचे अचूक मोजमाप, नकाशा व मालमत्ता पत्रक तयार करण्यात आले आहे. स्वामित्व योजनेचे फायदे सांगताना त्यांनी योजनेमुळे मालकी हक्कासह सुरक्षिततेची हमी मिळाल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना व्यसनमुक्ती व स्वच्छतेची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाला विविध गावचे सरपंच, ग्रामस्थ तसेच भूमी अभिलेख आणि ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Jan. 18, 2025 Follow
एका २१ वर्षीय तरुणीने विहिरीत उडी घेऊन संपविली जीवनयात्रा
मुर्तिजापूर : तालुक्यातील हिरपुर सिरसो रोडवरील मनोज ढगे यांच्या शेतातील विहिरीत एका 21 वर्षीय तरुणीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 16 च्या मध्यरात्री घडल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कामावरून घरी परत आल्यानंतर तिच्या आईसोबत थोडी बाचाबाची झाली असता ती रागाच्या भरात घरून निघून गेली. त्यानंतर आई व मामा यांनी तिचा बराच शोध घेतला परंतु ती कुठेच दिसून आली नाही. मात्र 17 जानेवारी 2025 सकाळच्या दरम्यान गावातील एका शेतात एका व्यक्तीचे प्रेत विहिरीत तरंगत असल्याची बातमी पसरली असता घटनास्थळी मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस दाखल होऊन गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला.
मृतक मुलीचे नाव नम्रता विनोद गर्दे वय २१ वर्ष रा .मुर्तीजापूर असे असून
सतीश नामदेव भगत, वय 52 वर्ष, धंदा मजुरी, राहणार सांजापूर, तालुका मूर्तिजापुर जिल्हा. अकोला यांच्या तक्रारीनुसार पोलीसांनी घटना स्थळी धाव घेतली
मुर्तीजापुर ग्रामीण भागात राहणारे सदर कुटुंब आपल्या उदरनिर्वाह करिता मोल मजुरी करून मुर्तीजापुर येथील बँक कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होते. तक्रारदार यांची बहीण कांचन विनोद गर्दे एक मुलगा नामे आदर्श व दोन मुली, मोठी मुलगी वैष्णवी व लहान नम्रता असे त्यांचे नाव असून मोठ्या मुलीचे लग्न झालेले आहे व नम्रता ही 21 वर्षीय दुसरी मुलगी मुर्तीजापूर येथील मातृसेवा हॉस्पिटल येथे काम करीत होती. दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान मनोज ढगे यांनी फोनवर माहिती दिली, की हिरपूर सिरसो रोडवरील शेताजवळ तुझ्या भाचीची स्कुटी गाडी उभी आहे व शेतातील विहिरीच्या काठावर एक बॅग ठेवली आहे तरी तू येऊन पहा अशी माहिती मनोज ढगे यांनी दिली.
मनोज ढगे यांच्या शेतातील विहिरीमध्ये बॅटरीच्या उजेडात पाहिले असता विहिरीच्या पाण्यात एक प्रेत तरंगात होते. कपड्यावरून व तिच्या पायातील बुटावरून आपली भाची नामे नम्रता विनोद गर्दै वय 21 वर्ष राहणार मुर्तीजापुर असल्याची खात्री झाली. त्यानंतर नागरिकाच्या साहाय्याने पोलिसांनी प्रेत विहिरीच्या बाहेर काढले कॉलेज बॅग मधील लर्निंग लॉयसन्स वरून खात्री करण्यात आली कि ही 21 वर्षीय मुलगी नम्रता गर्दे आहे
16 जानेवारी 2025 रोजी नेहमीप्रमाणे सकाळी 9 वाजता कामावर गेलेली नम्रता नेहमीप्रमाणे रात्री 8 वाजता घरी परत आली नाही म्हणून तिच्या आईने हॉस्पिटलमध्ये फोन करून विचारणा केली असता ती 7 वाजून 45 मिनीटांनी हॉस्पिटल मधून गेल्याची समजले त्यानंतर आपल्या बहिणीने शोधाशोध केली व मला सुद्धा फोन केला की नम्रता तुझ्याकडे हिरपूरला आली आहे का? विचारपूस केली असता बहिणीने सांगितले की तिला थोडी बोलली होती व ती आतापर्यंत घरी आली नाही असे सांगितले असता सतीश भगत (मामा) यांनी शोधाशोध केला असता ती हिरपूर येथील मनोज ढगे यांच्या शेतात विहिरीमध्ये बुडून मरण पावली असल्याची माहिती मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली.
Jan. 18, 2025 Follow
मूलचेरा : तालुक्यातील भगतनगर येथील सार्वजनिक श्रीश्री राधागोविंद भजन मंदिर येथे आयोजित अष्टमप्रहार महानाम संकीर्तन व भागवत प्रवचन कार्यक्रमाला आविसं,काँग्रेस समन्वयक अहेरी विधानसभा क्षेत्र व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी उपस्थित राहून पूजन करत आशीर्वाद घेतले.
मुलचेरा तालुक्यात बंगाली बांधवांची संख्या मोठी असून येथील अनेक गावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम घेतले जातात.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भगतनगर येथे अष्टमप्रहार महानाम संकीर्तन व भागवत प्रवचनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असता.आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते पार पडले.तसेच मंदिरास विधिवत पूजन करत आशीर्वाद घेतले.
यावेळी सुकुमार गोविंदास,नितेश मलिक,वसीम चक्रवत्री,संजय बॅनर्जी,राम मिस्त्री,बनवली मशनव,पूलक तालुकदर ग्रामपंचायत सदस्य,उल्लू व्यापारीसह परिसरातील नागरिक तसेच स्थानिक नागरिक,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.