PostImage

Sujata Awachat

Dec. 24, 2024   

PostImage

Today Gold Rate: ब्रेकिंग न्यूज! सोने झाले इतक्या रुपयांनी स्वस्त, …


Today Gold Rate: मंगळवारी सोनं-चांदीच्या दरात घट झाल्याचे समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं $2,630वर पोहोचले होते. तसंच, MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वर सोन्याचा दर 76,300 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास तर चांदी 89,300 रुपयांवर स्थिरावली आहे. डॉलर इंडेक्समध्ये पुन्हा मजबुती आल्याने तो 108वर पोहोचला आहे.

 

सोन्याच्या दरात घसरण

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रुपयांची घट झाली असून ते प्रतितोळा 77,350 रुपयांवर स्थिरावले आहे. लग्नसराईच्या दिवसांत सोन्याच्या दरातील घसरण ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. डिसेंबरपासून लग्नाचा हंगाम सुरू झाल्याने सोन्याच्या मागणीतही वाढ होत आहे.

22 कॅरेट सोन्याच्या दरात देखील 100 रुपयांची घट झाली असून ते 70,900 रुपयांवर स्थिरावले आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 80 रुपयांची घसरण होऊन तो 58,010 रुपयांवर पोहोचला आहे.

 

आजचे सोन्याचे दर (भारतीय बाजारात):

ग्रॅमनुसार किंमत

  • 10 ग्रॅम 22 कॅरेट: ₹70,900
  • 10 ग्रॅम 24 कॅरेट: ₹77,350
  • 10 ग्रॅम 18 कॅरेट: ₹58,010

1 ग्रॅम सोनं:

  • 22 कॅरेट: ₹7,090
  • 24 कॅरेट: ₹7,735
  • 18 कॅरेट: ₹5,801

मुंबई - पुणे सोन्याचे दर:

  • 22 कॅरेट: ₹70,900
  • 24 कॅरेट: ₹77,350
  • 18 कॅरेट: ₹58,010

सोन्याच्या दरात सध्या होत असलेल्या या घसरणीचा उपयोग ग्राहकांनी लग्नसराईच्या खरेदीसाठी करून घ्यावा, अशी शिफारस करण्यात येत आहे.