बालाघाट। मध्य प्रदेश के बालाघाट में स्वदेशी रोजगार मेला कार्यक्रम में शामिल होने पहुंचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव ने कहा कि हमारी सरकार प्रदेश के बजट को आगामी 5 साल में 7 लाख करोड़ तक ले जाने का लक्ष्य रखा गया हैं। उन्होंने कहा कि हमारी प्रदेश में जब सरकार बनी तो सवा तीन लाख करोड़ का बजट था और अब हमने उसे साढ़े 3 लाख करोड़ रूपये कर दिया हैं। आगे यह लक्ष्य पांच साल में 7 लाख करोड़ का हैं।
बता दें कि मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव आज बालाघाट प्रवास पर थे। इस अवसर पर वे स्वदेशी जागरण मंच द्वारा आयोजित स्वदेशी रोजगार मेला में शामिल हुए। इस मेला में विविध प्राइवेट कंपनियों में रोजगार पाने वाले युवाओं को नियुक्ति पत्र प्रदान किया गया। रोजगार मेला की सराहना करते हुए मुख्यमंत्री ने कहा कि मेला का यह भाव है कि हम नौकरी मांगने वाले नहीं, नौकरी देने वाले बने। हमारे पास कोई नौकरी मांगने आए,इस मूलमंत्र का यह भाव बहुत अच्छा हैं। सीएम मोहन ने कहा कि मेला का उद्देश्य अपने रोजगार को बढ़ावा देने के साथ ही अपनी संस्कृति को भी आगे बढ़ाना हैं।
मुंबई - 'कंतारा' या चित्रपटामुळे लोकप्रियतेच्या कळसावर पोहोचलेला अभिनेता ऋषभ शेट्टीच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. आगामी चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘द प्राईड ऑफ भारत - छत्रपती शिवाजी महाराज’ असं या चित्रपटाचं नाव आहे. संदीप सिंग या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. निर्मात्यांनी अलीकडंच या चित्रपटाचं एक लक्षवेधी पोस्टर शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि इतर तपशील जाहीर केले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत 'ऋषभ'चा नवा लूक
निर्मात्यांनी नुकतेच चित्रपटाचं एक पोस्टर रिलीज केलं आहे. यामध्ये ऋषभ शेट्टीचा लूक समोर आला आहे. छत्रपती शिवाजीच्या लूकमध्ये ऋषभ कमालीचा शांत दिसत आहे. हातात तलवार घेऊन ऋषभ आपल्या पारंपारिक रूपातील शिवाजी महाराजांचे उत्तम प्रकारे प्रतिनिधित्व करताना दिसत आहे. पोस्टर शेअर करताना, निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, "आमचा सन्मान भारताचा महान योद्धा राजा - प्राइड ऑफ इंडिया: द एपिक गाथा ऑफ छत्रपती शिवाजी महाराज".
चित्रपट कधी प्रदर्शित होणार
निर्मात्यांनी पोस्टरच्या कॅप्शनमध्येच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. त्यांनी पुढे लिहिलंय की, "हा केवळ एक चित्रपट नाही - हा एका योद्धाच्या सन्मानार्थ एक युद्धगर्जना आहे. ज्या छत्रपतींनी सर्व अडचणींशी लढा दिला, बलाढ्य मुघल साम्राज्याला आव्हान दिलं आणि कधीही विसरता येणार नाही असा वारसा निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराजांची अनोळखी कहाणी उलगडत असताना एका वेगळ्या सिनेमॅटिक अनुभवासाठी आणि मॅग्नम ऑपस अॅक्शन ड्रामासाठी सज्ज व्हा. हा चित्रपट 21 जानेवारी 2027 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे."
मुंबई:-मुंबई पालिका निवडणूक होईपर्यंत भाजप एकनाथ शिंदे यांना गोंजारेल आणि निवडणुकीतील हेतू साध्य झाल्यानंतर भाजप जे करायचं ते करेल, असं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मुंबईतील माजी नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते. तर सध्या सुरू असलेल्या नाट्यात एकनाथ शिंदेंच्या मागे भाजपची मोठ्या शक्ती असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले. पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना सूचना देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेना गोंजारेल, निवडणुकीत हेतू साध्य झाल्यानंतर भाजप जे करायचेय ते शिंदेंचं करतील. आरएसएसचा आव आणून त्याखाली भाजपने वेगवेगळ्या यंत्रणा राबवल्या. आरएसएस पत्रक वाटाण्यापुरती होती. सध्या सुरु असलेल्या सत्ता स्थापनेत शिंदेंच्या मागे दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती आहे. पण आपण मुंबई महापालिका जिंकायाचीच आहे. उद्धव ठाकरेंकडून लवकरच राज्यातील पदाधिकाऱ्यांचे शिबिर बोलावण्यात येणार आहे.”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
डोंबिवली : पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्याने दुसरीशी लग्न केले; पण तिला अंधारात ठेवून तिसरीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आणि लग्न करून तिची फसवणूक करणाऱ्याला विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीण पान्हेरकर (४२), असे अटक आरोपीचे नाव आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस सुनावली आहे. कोठडी
याप्रकरणी पीडित महिलेने तक्रार दिली की, प्रवीण याने त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे आणि त्याने दुसऱ्या एका महिलेबरोबर लग्न केल्याचे लपवले. तसेच गुंगीचे औषध देऊन आपल्यावर लैंगिक अत्याचार केला आणि अश्लील फोटो काढले. या फोटोच्या आधारे तो वारंवार तिला ब्लॅकमेल करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत असे आणि लग्न केले होते. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने विष्णूनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार यांनी दिली.
वडधा: आरमोरी तालुक्यातील कुरंडीमाल ग्रामपंचायतमध्ये शिपाई पदावर कार्यरत अमृत सुखदेव सराटे (३०) हा शौचासाठी बाहेर जातो, असे सांगून गेला परंतु तो परतलाच नाही. गेल्या १५ दिवसांपासून त्याचा शोध न लागल्याने काळजी वाढली आहे.
१६ नोव्हेंबरला सकाळी सहा वाजताच्या सुमारास अमृत हा पत्नीला शौचास जातो म्हणून निघून गेला. मात्र, बऱ्याच वेळानंतरसुद्धा तो परत आला नाही. त्यानंतर कुटुंबातील व्यक्ती त्यांचा इतरत्र शोध घेतला परंतु तो कोठेही आढळून आला नाही. त्यामुळे बेपत्ताची तक्रार नोंदवली आहे.
भाऊबीजेपासून शक्यः माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्ट संकेत
मुंबई : लाडकी बहीण योजनेतील मानधनात १५०० रुपयांवरून २१०० रुपये इतकी वाढ पुढील वर्षी दिवाळीपासून केली जाईल असे स्पष्ट संकेत माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी दिले.
मुनगंटीवार म्हणाले की, आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आणि - जाहीरनाम्यात आम्ही मानधन वाढीचेआश्वासन दिले होते. ते आश्वासन आम्ही पूर्ण करू. हे आश्वासन पूर्ण केले नाही तर आमची प्रतिमा देशभरात खराब होईल. मी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. आपण शब्दावर ठाम राहायला हवे.
मी महायुतीच्या जाहीरनामा समितीचा अध्यक्ष होतो. त्यामुळे आम्ही दिलेली आश्वासन पूर्ण करणार आहोत. आमच्या महायुती सरकारमध्ये लाडक्या बहिणांना २१०० रुपये देण्याची क्षमता आहे. जानेवारी की जुलै किंवा कोणत्या महिन्यापासून वाढ करायची याबाबत चर्चा करण्यात येईल. आम्ही गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना सुरू केली होती. त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो.
आरमोरी, (ता.प्र). अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री 6 दुकानाचे शटर तोडून एकूण 34 हजार 700 रुपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना आरमोरी शहरात रविवारी (दि. 1) रात्री घडल्याने शहरवासींमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील दुकान लाइनमधील दुकानदार शनिवारी (दि. 30) रात्री 8.30 वाजतानंतर आपापली दुकाने बंद करून घरी परतले. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चंदू किराणा दुकानाचे शटर तोडून काउंटरमध्ये ठेवलेले एकूण 10 हजार रुपये, अनिरुद्ध रमेश निमजे यांच्या मेडिकल दुकानातील 15 हजार रुपये, वैभव मोटघरे यांच्या मोबाइल दुकानाच्या काउंटरमधील 5 हजार 900 रुपये, वैभव मोटघरे यांच्या मोबाइलच्या दुकानातील 2300 रुपये किमतीचा वन प्लस कंपनीचा इयर बर्ड, प्रीतम निमजे यांच्या पॅथॉलॉजी लॅबमधील टेबलमध्ये ठेवलेले 1000 रुपये, भोजराज दहिकर यांच्या फर्निचर दुकानाच्या काउंटरमधून 500 रुपये रोख असे एकूण 34 हजार 700 रुपये लंपास केले. दुसऱ्या दिवशी रविवारी सर्व दुकानदार नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी गेले असता, दुकानात चोरीझाल्याचे उघडकीस आले.
एकाच रात्रीसहा दुकानांमध्ये चोरी झाल्याने व्यापा- यांसह शहरवासीयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेबाबत आरमोरी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी सर्व सहा दुकानांचा पंचनामा करून अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सपोनि प्रताप लामतुरे, पोहवा विशाल केदार करीत आहेत.
चोरीच्या घटनेने दहशतीचे वातावरण
आरमोरी शहरात रविवारी (दि. 1) झालेल्या दुकानफोडी व चोरीच्या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरावर आळा बसवणारी यंत्रणा ठप्प झाली का, अशी चर्चा आरमोरीवासींमध्ये केली जात आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही होताहेत चोऱ्या
आरमोरी शहराच्या मुख्य चौकात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. आरमोरी पोलिस प्रशासनातर्फे शहरात गस्तीसुद्धा केली जाते. प्रशासनातर्फे एवढ्या सुविधा असतानादेखील शहरात होत असलेलेचोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
दिल्ली, वृत्तसंस्था. केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरिराज सिंह यांनी बांगलादेश हिंसाचारावर विरोधकांच्या मौनाचा समाचार घेतला आहे. या मुद्द्यावर त्यांनी केवळ इंडिया अलायन्सच्या बड्या नेत्यांवरच नव्हे तर ऑल इंडिया मजलिस ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावरही हल्ला चढवला. तसेच राहुल गांधी, अखिलेश यादव बांगलादेशातील हिंसाचारावर कधी बोलणार अशी टीका केली.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना गिरीराज सिंह बांगलादेशातील हिंसाचारावर बोलताना, बांगलादेशात ज्या प्रकारे हिंदूंवर अत्याचार होत आहेत ते पाहून भारत सरकारनेही त्यांना फटकारले आहे, आता लोकांनीही यात हस्तक्षेप करायला हवा. असे मलावाटते. भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीराज सिंह इथेच थांबले नाहीत. एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचा उल्लेख करत त्यांच्यावरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, ओवैसी अशी व्यक्ती आहे जी राष्ट्रगीताच्या वेळी सभागृहात उपस्थित नसते. तो संविधानविरोधी आहे. बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत, पण ते या मुद्द्यावर एकदाही तोंड उघडत नाहीत.
पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावरच त्यांची जीभ उघडी होती. आपल्या वक्तव्यात केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, ना राहुल गांधी बांगलादेशच्या मुद्द्यावर काहीही बोलत नाहीत आणि अखिलेश यादव कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देत नाहीत.
आंतरराष्ट्रीय समुदायाला 'हे' आवाहन
गिरीराज सिंह यांनी बांगलादेश हिसाचारावर आंतरराष्ट्रीय समुदायाने पुढेयेऊन बोलण्याचे आवाहनही केले आहे. ते म्हणाले, बांगलादेशात आता कट्टरतावादी वर्चस्व गाजवत आहेत. त्याठिकाणी हिंदूंवर अत्याचार होत आहेत. कायदेशीर मार्गानेही त्यांना भारतात येण्याची परवानगी दिली जात नाही. हिंदू संतांना तुरुंगात टाकले आहे. ते लोक तिथे कोणत्या स्थितीत राहतात माहीत नाही. आता वेळ आली आहे की जगातील लोकांनी बांगलादेशातही हस्तक्षेप केला पाहिजे.
गडचिरोली : एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस मुख्यालयात कार्यरत हवालदारावर बलात्कार व बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. गडचिरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत २ डिसेंबरला ही घटना उघडकीस आली.
बंडू गेडाम (५२,रा. नवेगाव ता. गडचिरोली) असे त्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. तो पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे. एका अल्पवयीन मुलीने त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. उपअधीक्षक अजय जगताप, पो.नि.रेवचंद सिंगनजुडे यांच्यापुढे मुलीने आपबिती सांगितली. त्यानंतर सायंकाळी बंडू गेडामविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या खाकी वर्दीतीलच कर्मचाऱ्यावरच लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाल्याने जिल्हा पोलिस दलाच एकच खळबळ उडाली आहे.
गडचिरोली,(जिमाका):-जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील बालके/विध्यार्थी यांच्या पुढील तपासणी, निदान निश्चिती, थेरेपी, उपचार, त्याचप्रमाणे उच्च स्तरीय बाल विशेषज्ञ सल्ला/सेवा, गरजेनुसार उच्च स्तरीय चाचणी/तपासणी व शस्त्रक्रिया करिता तृतीय स्तरीय संदर्भ सेवा इत्यादींकरिता राज्यशासनाच्या मार्गदर्शकानुसार “द्वितीय स्तरीय संदर्भ सेवा कक्ष” म्हणून बालआरोग्य विभाग “डीस्ट्रीक अर्ली इंटरवेन्शन सेंटर” (डीईआयसी), जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे स्थापित आहे.
सदर डीईआयसीयेथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम तसेच इतर तालुक्याच्या ठिकाणाहून प्राथमिक तपासणी दरम्यान आढळून आलेले बालके/विद्यार्थी ज्यांना पुढील तपासणी, निदान निश्चिती, त्याचप्रमाणे उच्च स्तरीय बाल विशेषज्ञ सल्ला/सेवा, उच्चस्तरीयउपचार, अश्या द्वितीय स्तरीय सेवांची गरज असते अश्या बालकांची डीईआयसी (द्वितीय स्तरीय संदर्भ सेवा कक्ष) येथे नोंदणी केली जाते. डोळ्याचे आजार असलेल्या बालकांच्या डोळ्याचे निदान निश्चिती साठी बाल नेत्र विशेषज्ञ सल्ला आवश्यक असणाऱ्या बालकांकरिता दि.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी ‘विशेषज्ञ बाल डोळे तपासणी शिबीर’ आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये साराक्षी नेत्रालय नागपूर येथील उच्च स्तरीय बाल नेत्र विशेषज्ञ चमू उपस्थित झाली. शिबिर मध्ये जिल्ह्यातील एकूण ९४ बालकांची तपासणी करण्यात आली. त्यांचा पालकांना डोळ्यांच्या आजाराबाबत, शस्त्रक्रियेबाबत समुपदेशन, मार्गदर्शन करण्यात आले. यापैकी ज्या बालकांना शस्त्रक्रियेची गरज आहे या बालकांच्या विशेष चाचण्या करून शस्त्रक्रियेकरिता पात्र बालकांना तृतीय स्तरावर संदर्भित करण्याचे नियोजन होणार असून काही नवजात बालकांना शिघ्र हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याने लवकरात लवकर या चिमुकल्यांना शस्त्रक्रियेकरिता उच्चस्तरावर संदर्भित करण्याचे नियोजन झालेले आहे.
या सर्व सेवा निशुल्क आणि मोफत तसेच बाहेरील तज्ञ जिल्ह्यातच उपलब्ध झाल्याने बालकांचे पालक समाधानी आहेत.
लहान बालकांच्या डोळ्यासंदर्भात, दृष्टीसंदर्भात वेळीच आणि लवकर हस्तक्षेप करणे गरजेच आहे. तसे न केल्यास मूल्यांच्या वाढीच्या टप्प्यावर परिणाम होण्याचे संकेत असते. व भविष्यात मोठ्या संकटांना समोर जाव लागू शकतो.
सदर ‘विशेषज्ञ बाल डोळे तपासणी शिबीर’ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीशकुमार सोळंके, डॉ.धुर्वे सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ.आखाडे जिल्हा महिला व बाल रुग्णालय यांच्या नियोजनाखाली पार पडले. शिबिराच्या यशस्वीतेकरिता डीईआयसीतील अधिकारी, कर्मचारी यांनी मेहनत घेतली. असे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, डॉ.माधुरी किलनाके यांनी कळविले आहे.
गडचिरोली : १ डिसेंबर या जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून या वर्षीचे घोषवाक्य “मार्ग हक्काचा सन्मानाचा" या आधारावर जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक माधुरी किलनाके यांच्या अध्यक्षतेखाली आज करण्यात आले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने जनजागृती रॅली काढण्यात आली. तर डॉ नागदेवते यांनी एडस् विरोधी शपथेचे वाचन केले. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी "मार्ग हक्काचा सन्मानाचा" या आधारावर जिल्ह्यातील एचआयव्ही एड्स बाधीत रुग्णांना मिळणाऱ्या सोयी सुविधा तसेच शासनाच्या योजना याविषयी माहिती देऊन एड्स प्रतिबंध करण्यासाठी सर्वतोपरी कार्य करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणेने कार्य करावे, यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत आखाडे. डॉ. दुर्वे, डॉ. साखरे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महेश भांडेकर, CSO डॉ. अभिषेक गव्हारे, जिल्हा महिला व बाल सामान्य रुग्णालय अधीसेविका, एआरटी, ICTC व विहान प्रकल्पाचे कर्मचारी यांची उपस्थीती होती.
एडस् विरोधी शपथ घेऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. ही रॅली जिल्हा महिला व बाल रुग्णालय ते गांधी चौक, कारगिल चौक मार्गे परत जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे समाप्त करण्यात आली. रॅली मध्ये महाविद्यालयीन व नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीनी एचआयव्ही/एड्स संदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टीने विविध घोषवाक्य म्हणून व माहिती पत्रक वाटप करून जनजागृती करण्यात आली. तसेच नर्सिंग कॉलेज जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील विद्यार्थ्यांच्या मार्फतीने पथनाटय सादर करण्यात आले व बस स्थानक येथे जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन आयसीटीसी समुपदेषक राजेश गोंडाणे यांनी तर पाहुण्यांचे आभार अधीसेविका रामटेके यांनी मानले.
गडचिरोली : गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केंद्रीय अर्थमंत्री ना. निर्मला सितारामन यांची दिल्ली येते संसद भवनाच्या कार्यालयात भेट घेतली.
गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्र अतिदुर्गम व मागास क्षेत्र असल्याने लोकसभा क्षेत्रातील बहुतांश भागात अद्याप पायाभूत सुविधाचा विकास झालेला नाही, बऱ्याच गावात रस्ते, वीज, आरोग्य केंद्र नाही, त्यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमावावा लागते. लोकसभा क्षेत्रात रोजगाराचे कोणतेही मोठे साधन नसल्याने लोकसभा क्षेत्रात बेरोजगारीचेही प्रमाण वाढत आहे, अश्या परिस्थिती गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राच्या सर्वांगीन विकासासाठी व लोकसभा क्षेत्रातील जनतेच्या समस्याच्या निराकरणा करीता केंद्र शासनाच्या वतीने किमान 10 हजार कोटी रुपयाच्या आर्थिक पॅकेज ची मदत करावी अशी मागणी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी या भेटी दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कडे केली.
राज्यातील मतमोजणी होऊन एक हप्ता उलटून गेला तरी पण नव्या सरकारचा गटन होऊ शकले नाही किंवा राज्याच्या मुख्यमंत्री कोण ? यावर सुद्धा शिक्का मुहूर्त होऊ शकला नाही.म्हणजे दाल में कुछ काला है,अशी अवस्था सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपाची झालेली आहे.
काळजीभाऊ मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे जरी वरवर म्हणत असतील की भाजपाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे परंतु ते मनातून नाराज आहेत,हे स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवते.माननीय एकनाथ शिंदे भाजपाच्या वरिष्ठ नेत्याकडे मुख्यमंत्री नाही तर मग गृहमंत्री पद आम्हाला मिळाले पाहिजे अशी मागणी केली परंतु भाजपाने याही गोष्टीला दुजोरा दिलेला नाही.
राज्यात जरी भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेला असला तरी पण केंद्र सरकारमध्ये एकनाथ शिंदेचे सात खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये सामील आहेत.चंद्राबाबू नायडू,नितेश कुमार नंतर एकनाथ शिंदे चा नंबर लागतो.आजच्या घडीला सात हा आकडा अल्पसा वाटत असला तरी पण केंद्र सरकारसाठी सात हा आकडा खूप मोठा आहे.एकनाथ शिंदे यांनी आपला पाठिंबा काढून घेतला तर सर्वच पक्ष आपला डोका कधी वर काढतील आणि केंद्रातील मोदी सरकार कधी गडगडेल याची कल्पना न केलेली बरी ही आजची वस्तुस्थिती आहे आणि याला भाजपाचे वरिष्ठ पातळीवरचे नेते सुद्धा नाकारू शकत नाही.
धरलं तर चावत,सोडलं तर पडतो अशी अवस्था आजच्या घडीला निर्माण झालेली आहे.केंद्र सरकार एकनाथ शिंदेंना ईडी किंवा अन्य कोणत्याही संस्थेचा धाक दाखवून एकनाथ शिंदेंना रोखू शकत नाही आणि म्हणूनच भाजपा जरी राज्यात मोठा पक्ष ठरला असला तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अजून पर्यंत जाहीर केलेला नाही.काहीतरी तोडगा काढावा आणि राज्यात नव्या सरकारचा गटन करून जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी ,एवढीच अपेक्षा राज्यातील भोळी भाबडी जनता अपेक्षुण आहे.
घोसरी: शेतशिवारात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेवर शेतात दबा धरून असलेल्या वाघाने हल्ला केला. परंतु सोबतच्या महिलांनी आरडाओरडा केल्यामुळे वाघ पळून गेला. वाघाच्या हल्ल्यात रसिका अंकुश कुमरे (२८) रा. पिपरी देशपांडे ही गंभीररीत्या जखमी झाली आहे. ही घटना रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
पोंभुर्णावनपरिक्षेत्राअंतर्गत चकठाणा- पिपरी देशपांडे-गोवर्धन शेतशिवारात मागील अनेक दिवसांपासून वाघाची दहशत असून शेती हंगाम अडचणीत असलेले आहे. दिवसेंदिवस वाघाचे वावर वाढलेले असल्याने वन्यप्राणी-मानव संघर्ष होण्याची भीती व्यक्त करून वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्र सहायक अजय बोधे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी महिलेला उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचार केले जात आहे.
मुंबई: माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी घटनापिठावर बसून घटनाबाह्य काम करून या देशात आग लावली आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
राऊत म्हणाले, चंद्रचूड यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष (शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षफुटीचे प्रकरण) उत्तर प्रदेशमधील संभलचे प्रकरणअसेल या बाबतीत 'प्रार्थनास्थळ कायदा, १९९१ च्या माध्यमातून घटनाबाह्य काम करून देश पेटवला आहे. महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारला त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे संरक्षण दिले आहे. त्याच घटनाबाह्य सरकारचे काळजीवाहू सरकार महाराष्ट्रात उभे आहे. हे काळजीवाहू सरकार देखील संविधानविरोधी आहे. या सगळ्याला चंद्रचूडच जबाबदार आहेत.
संजय राऊत म्हणाले, २६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत संपली आहे. त्यामुळे २६ नोव्हेंबर रोजीमहाराष्ट्रात नवे सरकार अस्तित्वात येणे गरजेचे होते. घटनेनुसार ते आवश्यक्त होते. आता या भाजपावाल्यांचे भाडोत्री कायदेपंडित येतील, कुठलेही कागद दाखवतील आणि हे काळजीवाहू सरकार कसे योग्य आहे ते सांगतील. मात्र, आज महायुतीच्या जागी महाविकास आघाडी असती तर एव्हाना या लोकांनी राष्ट्रपती राजवट लागू केली असती. महायुतीला बहुमत मिळूनही अद्याप त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. निवडणुकीचा निकाल लागून आठ दिवस झाले आहेत. त्यांच्याकडे बहुमत आहे तरी त्याचा मुख्यमंत्री कोण हे ठरलेले नाही. भारतीय जनता पार्टीचा विधिमंडळ पक्षनेता देखील ठरलेला नाही. इतका मोठा पक्ष, इतके मोठे नेते, इतके मोठे बहुमत आहे तरीदेखील त्यांना विधिमंडळाचा नेता निवडता आलेला नाही. ते सरकार स्थापनेचा दावा करू शकलेले नाहीत. इतकेच काय तर सरकार स्थापनेसाठी कोणी राज्यपालांना भेटले देखीलनाही आणि राज्यपाल देखील हे सगळे चालू देत आहेत.
संजय राऊतांची माजी सरन्यायाधीशांवर टीका
शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, राज्यात खूप गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. घटनेचा मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. या सगळ्याला माजी सरन्यायाधीश चंद्रचूड जबाबदार आहेत. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग या घटनात्मक पेचाला जबाबदार आहेत.
नागपूर : विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सायंकाळी ५ ते रात्री ११.३० वाजेदरम्यान वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून महाविकास आघाडी आणि इतर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. या वाढलेल्या मतदानावरून तसेच अनेक मतदारसंघात अनेक उमेदवारांना समान मते तर कुठे ईव्हीएम अधिक मते आणि प्रत्यक्ष मतदान कमी अशी आकडेवारी समोर आल्याने निवडणूक प्रक्रियेवर संशय निर्माण झाला आहे. तर काँग्रेसने तर निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे. मात्र, नागपूर जिल्ह्यातून केवळ एका उमेदवाराने ईव्हीएम आणि व्हीव्हीपीपॅटमध्ये नोंदवलेल्या मतदानाचा डेटा म्हणजेच मेमरी व्हेरिफिकेशनशी जुळण्याची विनंती अर्ज निवडणूक आयोगाकडे केला आहे.
ईव्हीएम आणि व्हीव्हीपीपॅटच्या मेमरी व्हेरिफिकेशनसाठी प्रती मशीन ४० हजार रुपये आणि त्यावर १८ टक्के जीएसटी इतकी रक्कम जमा करावी लागते. आयोगाच्या तांत्रिक तज्ज्ञांची टीम सर्वांसमोर डेटाची पडताळणी करते. तक्रार योग्य असल्याचे आढळल्यास, म्हणजे ईव्हीएम डेटा आणि स्लिपमध्ये तफावत आढळल्यास, कारवाई केली जाते आणि संपूर्ण शुल्क तक्रारदाराला परत केले जाते. तक्रार मान्य न झाल्यास शुल्क जप्त केले जाईल.
मतमोजणीनंतर सात दिवसांत पडताळणीसाठी अर्ज करणे आवश्यक होते. ईव्हीएम डेटा म्हणजेच मेमरी आणि व्हीव्हीपॅट स्लिप ४५ दिवसांसाठी सुरक्षित ठेवली जाते. कुणाचा आक्षेप असेल तर न्यायालयात धाव घेण्यासाठी हा अवधी दिला जातो. त्यामुळे ४५ दिवसांनंतरच ईव्हीएमची तपासणी होईल.
मतमोजणी २३ नोव्हेंबरला झाली. ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत शनिवारी संपली. लोकशाहीत निवडणुका पारदर्शक पद्धतीने व्हायला हव्यात, अशी अपेक्षा असताना ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका प्रभावित होत असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार होत आहेत. विविध संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. ईव्हीएमबाबत वेळोवेळी शंका व्यक्त करण्यात आली. यंत्र असल्याने त्यात गडबड होण्याची शक्यता वर्तवत हॅक करण्याचा दावा अनेकांनी केला. हा वाद लक्षात घेता बॅलेट पेपरवर मतदान करण्याची मागणी केली जात आहे.
नागपूर जिल्ह्यातील १२ पैकी केवळ तीन ठिकाणी काँग्रेस विजयी झाली आहे. काँग्रेसचे दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गिरीश पांडव यांनी सात ईव्हीएम आणि व्हीव्हीपीपॅटच्या पडताळणीसाठी अर्ज केला आहे. त्यासाठी त्यांनी तीन लाख रुपये जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले आहेत. दरम्यान, रविवारी ईव्हीएम विरोधात काँग्रेसने नागपुरात बाईक रॅली काढली. यात माजी मंत्री सुनील केदार यांनी पुढाकार घेतला. परंतु त्यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपीपॅटच्या पडताळणीसाठी अर्ज केला नाही.
महाराष्ट्र राज्यातील राजकारणात मिनटामिंटांनी नव नवे समीकरण समोर येताना दिसून येतोय आणि दिसायलाच पाहिजे यालाच राजकारण म्हणतात राज्यात भारतीय जनता पक्ष सर्वात जास्त जागा जिंकून उदयास आलेला पक्ष ठरला म्हणून सहाजिकच राज्याच्या राजकारणात या पार्टीचा मुख्यमंत्री होणार म्हटल्यावर काही वाव ठरणार नाही.
परंतु यंदाच्या राजकारणात कही खुशी कही गम असं म्हणायला काहीच हरकत नाही.कारण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूचा विचार करायला गेला तर त्यांचा चेहरा पडलेला दिसून येतो आणि ते स्वगावी निघून गेलेत.म्हणजे ते नाराज आहेत.हे राज्यातील सामान्य जनता देखील ओळखली आहे,त्यांच्या नाराजीचा कारण काय?
आणि दुसरीकडे विचार करायला गेला तर राज्यात भारतीय जनता पक्षाची बाजू आजच्या घडीला भक्कम आहे. आणि सोबत अजित पवारांची राष्ट्रवादी सोबतीला आहे.म्हणजे मुख्यमंत्री निवडीचा प्रश्न काहीसा गंभीर नाही तर भाजपासाठी सोने पे,सुहागा आहे.म्हणजे यावेळी मुख्यमंत्री भाजपाचा होणार यात काही दुमत नाही.
म्हणून एकनाथ शिंदे जरी नाराज असतील तरी परंतु त्यांच्या नाराजीत सुद्धा भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन येत्या ५ डिसेंबर रोजी शपथविधीच्या कार्यक्रम जाहीर करून राज्याचा मुख्यमंत्री हा भाजपाचा होणार हे जाहीर करण्यात आलेला आहे.
शपथविधी राज्याची राजधानी मुंबई येथे घेण्याचं ठरलं असून,आझाद मैदान हे ठिकाण सुद्धा ठरविल्या गेला आहे आणि 5 डिसेंबर लाच शपथविधी सोहळा पार पडणार यात काहीही दुमत नाही.
एकनाथ शिंदे जरी आजच्या घडीला नाराज दिसत असले तरी पण ते सुद्धा यात सहभागी होतील यात काही शंका नाही कारण राजकारणात रुसवा फुगवा हा चालायचाचं कारण यालाच राजकारण म्हणतात.
|| आनंद हा जीवनाचा || सुगंधापरी दरवळे ||
छत्तीसगड-तेलंगण सीमेवर ग्रेहाऊंड्स फोर्सने एका महिला नक्षलवाद्यांसह ७ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. जवानांनी घटनास्थळावरून ए-47 आणि इतर शस्त्रेही जप्त केली आहेत. सकाळपासून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रकरण तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यातील इटुनगरम पोलिस स्टेशन परिसरातील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चकमकीनंतर सुरक्षा दलांनी सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे. असे सांगण्यात येत आहे की नक्षलवादी काही मोठे गुन्हे घडवून आणण्याच्या योजना आखत होते, परंतु जवानांनी त्यांना चकमकीत ठार केले. या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील बस्तरला जाणार आहेत.
ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटली
ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे. यामध्ये तेलंगणा राज्य समिती सदस्य, विभागीय समिती सदस्य, क्षेत्र समिती सदस्य आणि 2 पक्ष सदस्यांचा समावेश आहे. सुरक्षा दलांनी सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या वर्षात राज्यात 207 हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या दौऱ्यापूर्वी नक्षल कारवाया तीव्र झाल्या
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात छत्तीसगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. बस्तर येथे ऑलिम्पिक क्रीडा कार्यक्रमाच्या समारोप समारंभाला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय नक्षलवाद संपवण्याच्या रणनीतीबाबत अमित शहा प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्याआधी जवानांनी नक्षल कारवाया तीव्र केल्या आहेत.
कोरचीः तालुका मुख्यालयापासून १५ किलोमीटर अंतरावरील अतिदुर्गम आंबेखारी जंगल परिसरात झाडूचे गवत तोडण्यासाठी गेलेल्या महिलेला अर्धवट पुरलेला मानवी सांगाडा आढळून आला. ही घटना २९ नोव्हेंबरला घडली. तथापि, ज्या महिलेला हा सांगाडा आढळला तिचा मुलगा पाच महिन्यांपासून बेपत्ता आहे. त्यामुळे हा सांगाडा त्याचा असल्याचा संशय तिने व्यक्त केला आहे. यामुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी सांगाडा ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.
आंबेखारी गावातील महेश कडयामी (२२) हा जुलै महिन्यामध्ये मायालघाट येथे अक्षय मडावी सोबत मासेमारीसाठी गेला होता. त्या दिवसापासून तो बेपत्ता आहे. त्याची आई दुलमाबाई कडयामी (५०) या गावाजवळील जंगलात झाडू बनविण्यासाठी सिंधीच्या पाने तोडण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हात्यांना अर्धवट जमिनीत पुरून ठेवलेला सांगाडा आढळला. तिला हा महेशचा सांगाडा असावा असा संशय आहे. कोरची पोलिसांना याबाबत माहिती दिली असून तहसीलदार प्रशांत गड्डम यांच्या उपस्थितीत पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांनी हा सांगाडा ताब्यात घेतला.
यावेळी उपनिरीक्षक प्रवीण बुंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रेया बुद्धे व स्थानिक नागरिक उपस्थित होते. दरम्यान, पंचनामा करुन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
डीएनए चाचणी करणार
सांगाड्याच्या हाडाचे नमुने डीएनए तपासणी करिता ताब्यात घेतले असून ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर हा सांगाडा नेमका कोणाचा हे समोर येणार आहे. सर्व शक्यता पडताळून तपास केला जाईल, असे पो.नि. शैलेंद्र ठाकरे यांनी सांगितले.
गडचिरोली : दुचाकीवरून पाठलाग करीत बसमधून प्रवास करणाऱ्या ४ ते ५ अल्पवयीन व प्रौढ विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या दोन टवाळखोर तरुणांना गुरुवारी पोलिसांनी जेरबंद केले. शहरात हा प्रकार घडला. मात्र, पोलिसांनी रोमिओंना अद्दल घडविल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.
तरुणांमध्ये स्टायलिश आणि वेगळे दिसण्याची क्रेझ वाढली आहे. अशातही तरुणांद्वारे शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थिनींची टवाळखोरी करण्याचे प्रकार शहरात वाढीस आले आहे. शाळकरी विद्यार्थिनींना पाहून गाणी गुणगुणणे, मुलींना इशारे देणे, चुकीचे हातवारे करून त्यांचा पाठलाग करून मुलींना मानसिक त्रास दिला जात आहे. काही तरुण बिनदिक्कत विद्यार्थिनींची छेड काढत आहेत. असाच प्रकार शहरात उघडकीस आला.
पोलिसांच्या कारवाईनंतर उपद्रवी तरुणांमध्ये दहशत पसरली आहे. राज कुलशीदास चव्हाण, रा. नवेगाव (१९) व मंथन भाऊराव खोब्रागडे, रा. कृष्णनगर, जि. चंद्रपूर, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक आरती सासवडे यांनी ही कारवाई केली.
🟠टवाळखोरांची थेट कारागृहात रवानगी
गडचिरोली पोलिसांनी हे प्रकरणगांभीर्याने घेत राज चव्हाण आणि मंथन खोब्रागडे या दोन्ही टवाळखोऱ्यांना तत्काळ अटक केली. त्याच्याविरुद्ध भारतीय न्यायिक संहितेच्या कलम ७८, ३५१, ३ (५) आणि पोक्सोच्या कलम १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींची रवानगी कारागृहात झाली.
🟠कनेरी फाट्यावरून करत होते पाठलाग
चंद्रपूर जिल्ह्यातून राज्य परिवहन महामंडळाची बस गडचिरोलीच्या दिशेने येत होती. दरम्यान, कनेरी फाटा येथे ४ ते ५ शाळकरी मुली बसमध्ये चढल्या. विद्यार्थिनींना बसमध्ये चढताना पाहून संबंधित दोन युवकांनी दुचाकीवरून बसचा पाठलाग करून गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक गाठला. पाठलाग करताना युवकांनी विद्यार्थिनींना वेगवेगळे अश्लील हावभाव करीत छेड काढण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही, तर इंदिरा गांधी चौकात येताच आरोपी युवकांनी पुन्हा विद्यार्थिनींसह गैरवर्तन करण्यास सुरुवात केली.