PostImage

Avinash Kumare

Today   

PostImage

Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नमो शेतकरी योजनेचे 2 हजार …


Namo Shetkari Yojana: नवीन वर्षात शेतकऱ्यांना मोठी दिलासादायक बातमी मिळणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत पाच हप्ते वितरित करण्यात आले आहेत.

रिपोर्ट्सनुसार, नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभेल आणि त्यांच्या शेतीविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी मोठी मदत मिळेल.

 

योजनेची वैशिष्ट्ये

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर तयार करण्यात आली आहे. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये, म्हणजेच प्रत्येक चार महिन्यांनी 2000 रुपयांच्या स्वरूपात, शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात.

 

पात्रता आणि लाभा

  • शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी पात्र असणे आवश्यक आहे.
  • आधार कार्ड, बँक खाते, आणि जमीनधारक प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे पूर्ण असणे गरजेचे आहे.

रिपोर्ट्सनुसार, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये जमा होईल. याआधी, 5 ऑक्टोबर 2024 रोजी, या दोन्ही योजनांचे हप्ते एकाच दिवशी पात्र शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले होते, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

Rahul Bisen

Today   

PostImage

Women Love Older Men: ना उम्र की सीमा हो! आखिर …


Women Love Older Men: कहते हैं, प्यार करने की कोई उम्र नहीं होती। प्यार हर समय जवां रहता है। लेकिन आजकल एक ट्रेंड तेजी से उभर रहा है। लड़कियां अपने से ज्यादा उम्र के पुरुषों को पसंद करने लगी हैं, चाहे वह शादी के लिए हो या डेटिंग के लिए। आखिर ऐसा क्यों हो रहा है? क्या वजह है कि लड़कियां अपने से बड़े उम्र के पुरुषों की तरफ ज्यादा आकर्षित होती हैं? आइए, इस ट्रेंड के पीछे छिपे कारणों को समझते हैं।

महिलाओं का बड़े उम्र के पुरुषों के साथ रिश्ते बनाना हमेशा चर्चा का विषय रहा है। हालांकि, यह कोई नई बात नहीं है। विकासवादी और सामाजिक दृष्टिकोण से महिलाओं की यह पसंद स्वाभाविक है। लेकिन आज भी, अगर कोई लड़की उम्र में बड़े व्यक्ति के साथ रिश्ता बनाती है, तो समाज उसे अक्सर 'गोल्ड डिगर' का टैग दे देता है। इसके बावजूद, लड़कियां लगातार रूढ़ियों को चुनौती दे रही हैं और अपनी पसंद को खुलकर स्वीकार कर रही हैं।

 

लड़कियों के बड़े उम्र के पुरुषों को पसंद करने के 4 प्रमुख कारण

1. जीवन का अनुभव (Life Experience)
लड़कियां ऐसे पार्टनर की तलाश करती हैं, जो जीवन के प्रति परिपक्व दृष्टिकोण रखता हो। बड़ी उम्र के पुरुष जीवन के अनुभवों से भरपूर होते हैं, जो उन्हें ज्यादा समझदार और सहनशील बनाता है। वे छोटी-छोटी बातों पर लड़ाई-झगड़ा करने के बजाय समस्या का समाधान निकालने में विश्वास रखते हैं। यही अनुभव लड़कियों को उनकी ओर आकर्षित करता है।

2. दिखावा पसंद नहीं (Genuineness)
लड़कियां जीवनसाथी चुनने से पहले सतर्क रहती हैं और दिखावे से दूर रहना पसंद करती हैं। अक्सर कम उम्र के लड़के महंगी गाड़ियों, ब्रांडेड कपड़ों और अपनी लाइफस्टाइल का दिखावा करते हैं। जबकि बड़े उम्र के पुरुष अपनी वास्तविकता के साथ जीते हैं, जो लड़कियों को ज्यादा वास्तविक और भरोसेमंद लगता है।

3. वफादारी की भावना (Loyalty)
कम उम्र के लड़कों की तुलना में बड़े उम्र के पुरुष ज्यादा स्थिर और वफादार माने जाते हैं। लड़कियों को यह डर रहता है कि कम उम्र के लड़के किसी और के साथ अफेयर में पड़ सकते हैं, जबकि बड़े पुरुष इस मामले में अधिक गंभीर और जिम्मेदार होते हैं।

4. आर्थिक और भावनात्मक सुरक्षा (Financial & Emotional Security)
लड़कियां फाइनेंशियल स्टेबलिश पुरुषों के साथ खुद को ज्यादा सुरक्षित महसूस करती हैं। साथ ही, बड़े पुरुष अपनी परिपक्वता और समझदारी के कारण उन्हें भावनात्मक सहारा भी प्रदान करते हैं। यह दोनों पहलू लड़कियों को बड़े उम्र के पुरुषों की ओर खींचते हैं।


PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday   

PostImage

अमित शहानी डॉ. आंबेडकरांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात शनिवारी वंचितचे …


 

आरमोरी ,

 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी आरमोरी वतीने वडसा रोड टी पाईंट चौक आरमोरी येथे तीव्र निदर्शने करण्यात आले.

         गृहमंत्री शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भाने फॅशन म्हणून आंबेेडकर आंबेडकर असे घेण्यापेक्षा देवाचे नांव घेतले तर सात जन्म स्वर्गात जागा मिळेल, असे मनुवादी वक्तव्य केल्याने तामाम जगभरातील व देशातील डॉ आंबेडकरांना मानणा-या अनुयायांच्या भावना दु:खावल्यामूळे तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

        देशाचे गृहमंत्री शहा हे जोपर्यंत आपल्या संविधानीक पदाचे राजीनामा देत नाही तोपर्यंत देशभरात तिव्र आंदोलने होणार आहेत. अशा बेजबाबदार गृह मंत्र्याला संविधानीक पदावर राहण्याचा अधिकार नाही.

      म्हणून वंचित बहुज आघाडी, व भारतीय बौध्द महासभा वतिने आरमोरी तिव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले.

      वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञा निमगडे, आरमोरी विधानसभेचे प्रमुख राजरतन मेश्राम, ज्येष्ठ नेते भीमराव शेंडे, यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी शाह यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी कुमता मेश्राम महिला आघाडी तालुकाध्यक्ष, लता बारसागडे,संध्या रामटेके, भारती मेश्राम, राधा हुमणे कल्पना ठवरे संप्रति मेश्राम वासुदेव अंबादे मीना सहारे, दुर्गा मेश्राम भावना बारसागडे ज्योती उंदीरवाडे, ताराचंद बनसोड, जगदीश दामले, पुष्पा उमाजी रामटेके, नर्मदा मेश्राम, माधुरी बांबोडे, सिद्धार्थ साखरे, व इतर बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday   

PostImage

कर्करोगावर रशियाची लस; शतकातील सर्वात मोठा शोध


 

मॉस्को :कर्करोगासारख्या आजारावर लस शोधून काढल्याचा व चालू शतकातील हा सर्वात मोठा शोध असल्याचा दावा रशियाने केला आहे. एमआरएनए प्रकारातील ही लस पुढील वर्षाच्या प्रारंभीच्या महिन्यात वापरात येणार असल्याची रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीतील रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे संचालक आंद्रे कॅप्रिन यांनी दिली आहे.

 

त्यांनी सांगितले की, रुग्णाच्या ट्यूमरपासून मिळालेल्या आनुवंशिक घटकांचा वापर करून ही लस विकसित करण्यात आली. तिचा प्रत्येक डोस तयार करण्यासाठी रशियाला २ लाख ४४ हजार रुपयांचा खर्च येणार आहे. (वृत्तसंस्था)

 

अमेरिका, ब्रिटनमध्येही प्रयोग सुरू

 

कर्करोगावर लस तयार करण्याचे पाश्चिमात्य देशांतही प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी मेंदूच्या कर्करोगावरील रुग्णांवर एका लसीच्या चाचण्या केल्या होत्या.

 

त्याचे आश्वासक परिणाम दिसून आले होते. या रुग्णाच्या प्रतिकारशक्तीत लस टोचल्यानंतर दोन दिवसांत उत्तम वाढ झाली होती. ब्रिटनमध्ये त्वचेच्या कर्करोगावरील लसीच्या चाचण्या सुरू असून त्यांचे निष्कर्षही आश्वासक आहेत. या विकारावर लस तयार करण्याच्या प्रयत्नांत रशियाने आघाडी घेतल्याचे सध्याचे चित्र आहे.

 

रशियाच्या लसीविषयी पाश्चिमात्य देशांना शंका

 

■ रशियाने कर्करोगावरील लस तयार केल्याची घोषणा केली असली तरी तिची परिणामकारकता किती आहे याबद्दल पाश्चिमात्य देशांच्या संशोधकांच्या मनात शंका आहे.

 

■ कर्करोगाचे अनेक प्रकार असून त्यातील नेमक्या कोणत्या प्रकारासाठी ही लस उपयोगात येईल याची अधिक माहिती हाती आल्यानंतरच त्याविषयी अधिक काही सांगता येईल, अशी भूमिका काही शास्त्रज्ञांनी घेतली आहे.

 

संशोधकांचा दावा काय?

 

रशियाने कर्करोगावर लस तयार केल्याचे जाहीर केले असले तरी नेमक्या कोणत्या प्रकारच्या कर्करोगावर लस वापरली जाणार याची माहिती दिलेली नाही. लस कर्करोगाच्या पेशींची ओळख पटवून त्या नष्ट करण्याचे काम प्रभावी करेल असा रशियाच्या संशोधकांचा दावा आहे. ट्यूमरची वाढ होण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या पेशींवर लस प्रभावी ठरेल, असे लस संशोधकांनी सांगितले.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday   

PostImage

मृत अर्भक प्रकरण; पतीसह सासूला अटक


 

गडचिरोली:  शहरातील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दाखल झालेल्या गरोदर मातेने मृत अर्भकाला जन्म दिला. त्यामुळे प्रसूती महिलेचा पती व सासूने मृत अर्भकाला शहरातील कन्नमवार वॉर्डातील एका खुल्या जागेत खड्डा खोदून गाडल्याची घटना 25 नोव्हेंबर रोजी घडली. मात्र, भटक्या कुत्र्यांनी मृत अर्भकाचा मृतदेह बाहेर काढल्याने हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले. शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अखेर 20 दिवसांच्या कालावधीनंतर शहर पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करत मंगळवारी (दि. 17) मृत अर्भकाचा मृतदेह पुरणाऱ्या पती व सासूला ताब्यात घेतले.

 

एटापल्ली तालुक्यातील एका गरोदर मातेला 24 नोव्हेंबर रोजी गडचिरोलीच्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. त्याच रात्री गर्भवती महिलेने मृत मुलाला जन्म दिला. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत बाळाला घरी नेण्याचा सल्ला दिला. मात्र, गरोदर महिलेच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मृत बाळासाठी वाहनाने गावी परतणे, त्यांना शक्य झाले नाही. सदर कुटुंब पहिल्यांदाच गडचिरोली शहरात आले होते. त्यामुळे त्यांनी मृत बाळाला दफन करण्याचा निर्णय घेतला. 25 नोव्हेंबर रोजी शहरातील कन्नमवार वॉडांतील एका मोकळ्या जागेत खड्डा खोदून मृत बाळाला पुरले. त्यानंतर कुटुंबिय गावी परत गेले. मात्र मोकाटश्वानांनी बाळाचा मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणाची माहिती मिळताच, गडचिरोली शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून याप्रकरणी तपास सुरू केला. दरम्यान, याप्रकरणी मंगळवारी गरोदर महिलेचा पती आणि सासूला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय चव्हाण, महिला पोलिस उपनिरीक्षक विशाखा म्हेत्रे, पोलिस कर्मचारी ताजुद्दीन गोवर्धन आदींनी केली.

 

 

 

सरकारी, खासगी रुग्णालयांची केली तपासणी

 

शहरातील कन्नमवार वॉर्डात नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आल्यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून गांभीर्याने तपास सुरू केला. तपासादरम्यान शहर पोलिसांच्या पथकाने शहरातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांसह अंगणवाडी सेविका व आशा सेविकांची चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान जिल्हा महिला व बाल रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एटापल्ली तालुक्यातील एका महिलेने मृत नवजात बाळाला जन्म दिल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी वेगाने तपास सुरू करून याप्रकरणी गर्भवती महिलेचा पती आणि सासूला ताब्यात घेतले आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday   

PostImage

वैरागड येथून मोहफूल दारू जप्त


वैरागड : आरमोरी तालुक्यातीलवैरागड येथे मोहफुलांपासून दारू बनवून विक्री करणाऱ्या महिलेस १८ रोजी आरमोरी पोलिसांनी पकडले.

 

 

 

 

यावेळी १९ लिटर दारू जप्त केली. सुनीता श्रावण मुंगीकोल्हे (४५, रा. सती मोहल्ला, वैरागड) ही घरात मोहफुलापासून दारू बनवून विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावरून आरमोरी ठाण्याच्या पोलिसांनी धाड टाकली. यावेळी १९ लिटर दारू जप्त करण्यात आली. याबाबत सुनीता मुंगीकोल्हे विरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

 

 

दरम्यान, या कारवाईमुळे विक्रेत्यांची पाचावर धारण बसली आहे. कारवाईचे सत्र सुरूच राहणार आहे.

 

 


PostImage

Vaingangavarta19

Yesterday   

PostImage

गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ दलासमोर दोन नक्षलवादी यांनी केले आत्मसमर्पण


गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ दलासमोर दोन नक्षलवादी यांनी केले आत्मसमर्पण 

 शासनाने जाहिर केले होते एकुण 08 लाख रूपयांचे बक्षिस.

अशोक वासुदेव खंडारे/ मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९


आष्टी:-

दोघांपैकी एकाचा गेल्या 30 वर्षापासुन माओवादी संघटनेत सक्रिय सहभाग होता

शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 680 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी जहाल माओवादी नामे 1) रामसु दुर्गु पोयाम ऊर्फ नरसिंग (ए.सी.एम), वय 55 वर्ष, रा. गट्टानेली, ता. धानोरा, जि. गडचिरोली व 2) रमेश शामु कंजाम ऊर्फ गोविंद ऊर्फ रोहित (दलम सदस्य), वय 25 वर्ष, रा. वेडमेट्टा, जि. नारायणपूर (छ.ग.) यांनी गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले.आत्मसमर्पित जहाल माओवादी सदस्याबाबत माहिती

 रामसु दुर्गु पोयाम ऊर्फ नरसिंग
 दलममधील कार्यकाळ
 शासन 1992 मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 1995 पर्यंत कार्यरत होता. सन 1995 मध्ये काकुर दलममध्ये राहुन सन 1996 पर्यंत माओवाद्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांना सुरक्षा देण्याचे काम करीत होता.
 सन 1996 ते 1998 पर्यंत पुन्हा टिपागड दलममध्ये कार्यरत होता.
 सन 1998 मध्ये माड एरीया (छ.ग.) येथे बदली होऊन सप्लाय टिममध्ये सन 2001 पर्यंत कार्यरत होता.
 सन 2001 ते 2002 पर्यंत प्रेस टिममध्ये प्रशिक्षणाकरीता कार्यरत होता.
 सन 2002 मध्ये एरीया कमिटी मेंबर (एसीएम) पदावर पदोन्नती होऊन माआवाद्यांसाठी कृषी कामाकरीता मौजा कोडतामर्का गाव परिसरात सन 2005 पर्यंत कार्यरत होता.श्व सन 2002 मध्ये एरीया कमिटी मेंबर (एसीएम) पदावर पदोन्नती होऊन माआवाद्यांसाठी कृषी कामाकरीता मौजा कोडतामर्का गाव परिसरात सन 2005 पर्यंत कार्यरत होता.
 सन 2005 ते 2010 या कालावधीत मौजा डुमनार, फरसगाव व कोडेनार या गावांमध्ये माओवाद्यांसाठी कृषीची कामे करत होता.
 सन 2010 ते आजपावेतो कुतुल आणि नेलनार दलममध्ये एरीया कमिटी मेंबर (एसीएम) पदावर कार्यरत होता.

कार्यकाळात केलेले गुन्हे
रामसु दुर्गु पोयाम ऊर्फ नरसिंग याच्यावर आजपर्यंत एकुण 12 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 06 चकमक, 05 खुन, व 01 दरोडा इ. गुन्ह्रांचा समावेश आहे.
रमेश शामु कंजाम ऊर्फ गोविंद ऊर्फ रोहित दलममधील कार्यकाळ सन 2019 मध्ये मिलिशिया म्हणून माओवाद्यांची कामे करत होता. सन 2020 मध्ये चेतना नाट- मंच (सिएनएम) येथे सदस्य पदावर भरती होऊन कार्यरत.
 सन 2021 मध्ये कुतुल दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन आजपावेतो कार्यरत.

■ कार्यकाळात केलेले गुन्हे, हिंसक घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याची पडताळणी करणे सुरु आहे.

□ आत्मसमर्पित होण्याची कारणे.

■ गडचिरोली पोलीस दलाच्या आक्रमक माओवादविरोधी अभियानामुळे माओवादी कारवायांचे कंबरडे मोडले आहे.

■ दलममधील सोबतच्या सदस्यांना पोलीसांकडून अटक करण्यात आल्याने व घरातील सर्व सदस्य व नातेवाईकांनी आत्मसमर्पण करण्यासाठी प्रवृत्त केल्यामुळे.

■ दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे लागतात.

प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वतःसाठीच वापरतात.

जनतेच्या विकासासाठी कधीच वापरले जात नाही.

□ वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.

□ वरीष्ठ माओवादी नेते पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून आमच्याच निष्पाप बांधवांना ठार मारायला सांगतात.

■ शासनाने जाहिर केलेले बक्षिस.

□ महाराष्ट्र शासनाने रामसु दुर्गु पोयाम ऊर्फ नरसिंग याच्यावर 06 लाख रूपयाचे बक्षिस जाहिर केले होते.

□ महाराष्ट्र शासनाने रमेश शामु कंजाम ऊर्फ गोविंद ऊर्फ रोहित याच्यावर 02 लाख रूपयाचे बक्षिस जाहिर केले होते.शासनाकडुन रमेश शामु कंजाम ऊर्फ गोविंद ऊर्फ रोहित याला एकुण 4.5 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी फक्त यावर्षात 20 जहाल माओवाद्यांसह सन 2022 ते आतापर्यंत एकुण 33 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई श्री. संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, श्री. अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, श्री. अजय कुमार शर्मा पोलीस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्री. सुजीत कुमार, प्रभारी समादेशक, 37 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणाया माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.


PostImage

Sajit Tekam

Dec. 20, 2024   

PostImage

आश्रमशाळा अधीक्षकांसाठी कामाचे तास निश्चित करण्याची आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र …


मुंबई: आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई यांना आश्रमशाळांमधील अधिक्षक आणि स्त्री अधिक्षीकांच्या कामाचे तास निश्चित करण्यासाठी निवेदन पाठविण्यात आले आहे. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या आरोग्य, भोजन, आणि निवास व्यवस्थेची जबाबदारी अधिक्षकांवर असते. परंतु, या कामासाठी ठराविक वेळ निश्चित नसल्याने मानसिक व शारीरिक ताण वाढत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.

 

अधिक्षकांच्या कामाचे स्वरूप:

  • विद्यार्थ्यांचे शिक्षण व दैनंदिन जीवनाची जबाबदारी सांभाळणे.
  • आजारी विद्यार्थ्यांची देखभाल व वेळेवर उपचार पुरविणे.
  • 24 तास वसतिगृहात हजर राहून विविध कार्ये करणे.

 

मुख्य मागण्या:

पोलिस व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे अधिक्षक व स्त्री अधिक्षीकांना रोटेशन पद्धतीने कामाचे तास निश्चित करावेत, जेणेकरून त्यांना कुटुंबासाठी वेळ देता येईल. याशिवाय, कामाचे तास कमी करण्यासाठी स्वतंत्र पदनिर्मितीची मागणी करण्यात आली आहे.

विभागीय नेत्यांचे सहकार्य:

विभागीय अध्यक्ष श्री. ताडाम, सचिव श्री. बरडे, चंद्रपूर प्रकल्प अध्यक्ष श्री. मुरकुटे, आणि भामरागड/अहेरी प्रकल्प अध्यक्ष श्री. मारकवार यांनी या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे.

सरकारला विनंती:
मागण्या पूर्ण केल्यास अधिक्षक व स्त्री अधिक्षीकांचा मानसिक ताण कमी होईल आणि त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.


PostImage

Jitesh Chouhan

Dec. 20, 2024   

PostImage

Bhopal IT Raids Update: 52 किलो सोना, 60 KG चांदी …


Bhopal IT Raids Update: भ्रष्टाचार का एक चौंकाने वाला मामला सामने आया है, जहां आरटीओ विभाग का एक पूर्व सिपाही, महज 7 साल की नौकरी में अरबपति बन गया। नौकरी छोड़ने के एक साल बाद जब उसके ठिकानों पर लोकायुक्त ने छापा मारा, तो उसकी बेशुमार संपत्ति देखकर हर कोई हैरान रह गया।

भ्रष्टाचार का भंडाफोड़
लोकायुक्त की टीम ने भोपाल के पॉश अरेरा कॉलोनी स्थित सौरभ शर्मा के घर पर छापेमारी की। इस दौरान 2.85 करोड़ रुपए कैश, 60 किलो सोना, और नोट गिनने की सात मशीनें बरामद की गईं। जांच के दौरान पता चला कि सौरभ शर्मा ने नौकरी छोड़ने के बाद भी कई जगहों पर भारी निवेश किया हुआ था।

ये भी पढे : Bihar News: 7वीं क्लास का स्टूडेंट अचानक बन गया करोड़पति, बैंक खाते में आ गए 87 करोड़ रुपये, जानिए क्या पूरा मामला?

जंगल में मिली लावारिस गाड़ी से और खुलासा
छापेमारी के बाद देर रात आयकर विभाग ने भी मामले में हस्तक्षेप किया। भोपाल के पास मेंडोरी जंगल में खड़ी एक लावारिस गाड़ी से 52 किलो सोना और करीब 10 करोड़ रुपए कैश बरामद हुए। यह गाड़ी चेतन सिंह गौर के नाम पर पंजीकृत है, जो सौरभ शर्मा के सहयोगी बताए जा रहे हैं।

कुल संपत्ति का आकलन
अब तक लोकायुक्त और आयकर विभाग की संयुक्त कार्रवाई में लगभग 1 अरब रुपए की संपत्ति जब्त की जा चुकी है। इसमें करोड़ों का सोना-चांदी, कैश और अचल संपत्तियां शामिल हैं।

साधारण नौकरी, असाधारण दौलत
सौरभ शर्मा को अनुकंपा के आधार पर आरटीओ विभाग में नौकरी मिली थी। उसने केवल सात साल तक नौकरी की और फिर इस्तीफा दे दिया। इतने कम समय में इतनी संपत्ति जुटा लेना लोगों को हैरान कर रहा है।

संपत्ति और जीवनशैली पर नजर
सौरभ शर्मा के घर से चार लग्जरी एसयूवी गाड़ियां बरामद हुईं, जिनमें से एक में 80 लाख रुपए कैश मिला। उसका घर करीब 2 करोड़ रुपए का बताया जा रहा है। इसके अलावा, वह 20,000 वर्गफीट में एक स्कूल का निर्माण भी करवा रहा था।

जांच जारी
भोपाल की डीसीपी (जोन-1) प्रियंका शुक्ला ने बताया कि जांच में लावारिस गाड़ी के मालिक चेतन सिंह गौर का नाम सामने आया है। यह पता लगाने की कोशिश की जा रही है कि इतनी बड़ी रकम और संपत्ति कहां से आई और इसे लावारिस क्यों छोड़ा गया।


PostImage

Dipak Indurkar

Dec. 20, 2024   

PostImage

Chandrapur News: समृद्धी महामार्गासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील 76 गावांच्या जमिनी होणार …


Chandrapur News: नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाने आता वर्धा जिल्ह्यातील सेलडोह इंटरचेंजपासून चंद्रपूर जिल्ह्यातील नवेगाव (मोरे) मार्गे दुर्ग-हैदराबाद महामार्गाला जोडण्याचे नियोजन केले आहे. या शीघ्र द्रुतगती मार्गाच्या निर्मितीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील अनेक गावांमध्ये रस्ते विकास महामंडळ आणि बांधकाम विभागाने मार्किंग पूर्ण केले आहे.

 

76 गावांतील शेतजमिनींचे अधिग्रहण

या प्रकल्पासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, कोरपना, आणि पोंभूर्णा या सात तालुक्यांतील 76 गावांतील शेतजमिनी अधिग्रहित करण्यात येणार आहेत. यामुळे 2,000 हून अधिक शेतकऱ्यांवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. काहींची संपूर्ण शेती गेली आहे, तर काही शेतकऱ्यांचे शेताचे भागीय क्षेत्र अधिग्रहित होणार आहे.

जमिनी अधिग्रहित झाल्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहेत. शेती हा त्यांच्या उपजीविकेचा मुख्य स्रोत असल्याने पुढील काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

 

शेतजमिनींचा अधिग्रहण होणाऱ्या गावांची यादी

वरोरा तालुका:
बोडका, चक मकसूर, चक कवडापूर, सुमठाणा, मांडवगुन्हाड, बोरगाव, शिवणफळ, पांढरतळा, आसाळा, पाचगाव, पिजदुरा, बोरगाव देश, सालोरी, खातोडा, वलनी वनग्राम, परसोडा, जामगाव, जाम खुर्द.

भद्रावती तालुका:
चोपन रीठ, गोटाळा रिठ, खंडाळा रिठ, कोंडा, कुरोडा, विज्ञासन, कुनाडा, टोला, चारगाव, लोणार रिठ, डोरवासा, तेलवासा, पिंपरी, घोनाड, मुरसा, बोरगाव रिठ.

चंद्रपूर तालुका:
शेणगाव, पांढर कवडा, धानोरा, पिंपरी, वढा.

कोरपना तालुका:
भोयेगाव, नांदगाव, कोराडी, नवेगाव, निमणी.

राजुरा तालुका:
वरोडा, हिरापूर, चिंचोली, चिंचोली खुर्द, अंतर्गत खु, गोवरी, माथरा, धोपटाळा, बामनवाडा, चुनाळा, गडपडखामी.

बल्लारपूर तालुका:
आष्टी, कळमना, जोगापूर, जेवरा, कोर्टी मक्ता, पळसगाव, किन्ही, कवडजी.

पोंभूर्णा तालुका:
चक घनोटी १, चक घनोटी २, घनोटी तुकूम, बोर्डी रिठ, कसरगट्टा, पोंभूर्णा, चक पोंभूर्णा, आष्टा, वेळवा चेक, नवेगाव चेक, चक खापरी, नवेगाव मोरे, चक ठाणेनेवासना, घाटकुळ.

समृद्धी महामार्गाने विकासाच्या दृष्टीने मोठा टप्पा गाठला आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा विचार करूनच हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण होऊ शकतो.


PostImage

Blogs with Nili

Dec. 20, 2024   

PostImage

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! संक्रांतीला मिळणार मोठे गिफ्ट, …


Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी संक्रांतीनिमित्त एक आनंदाची बातमी आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांच्या हफ्त्याचे पैसे कधी मिळणार, याबद्दलच्या शंकेला आता पूर्णविराम मिळाला आहे. संक्रांतीपूर्वी फडणवीस सरकारने लाडक्या बहिणींना खास गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे.

हे देखील वाचा : Sarkari Yojana: या योजने अंतर्गत सरकार देणार व्यवसाय सुरू करण्यासाठी सबसिडी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे दोन्ही हफ्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावर संक्रांतीपूर्वी जमा होतील, अशी खात्रीलायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यांमध्ये 3,000 रुपये जमा होणार आहेत. राज्यभरातून लाडकी बहीण योजना अतिशय चांगला प्रतिसाद मिळवत आहे आणि विधानसभा निवडणुकीतही या योजनेने महायुतीसाठी मोठे यश मिळवून दिले आहे.

जुलै महिन्यापासून लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक मदत दिली जात आहे. जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांमध्ये एकूण 7,500 रुपये लाभार्थींच्या खात्यावर जमा झाले आहेत. आता डिसेंबर आणि जानेवारीच्या हफ्त्यांसह 3,000 रुपये मिळाल्यानंतर, लाडक्या बहिणींच्या खात्यातील एकूण रक्कम 10,500 रुपये होईल.

सुत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील लाडक्या बहिणींना पुढील आर्थिक मदतीसाठीही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत. मार्च महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2,100 रुपयांचा वाढीव हफ्ता देण्याचा निर्णय होईल. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी हा आणखी एक मोठा दिलासा ठरणार आहे.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 19, 2024   

PostImage

Pratap Sarangi : संसदेत भाजपचा खासदार जखमी, राहुल गांधींवर धक्का …


 

भाजपचे खासदार प्रताप सारंगी जखमी झाले आहेत. राहुल गांधी यांनी धक्का दिल्यामुळे मी जखमी झालो, असं भाजप खासदार सारंगी यांचा दावा आहे. “मी शिड्यांवर उभा होतो. राहुल गांधी यांनी एका खासदाराला धक्का दिला. तो खासदार माझ्या अंगावर पडला. त्यामुळे मी पडलो आणि जखमी झालो” असा दावा प्रताप सारंगी यांनी केला.

 

 

प्रताप सारंगी यांच्या आरोपावर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी म्हणाले, “हो, मी केलय, ठीक आहे. धक्का-बुक्कीने काही होत नाही. मला संसदेच्या आता जायचं होतं. संसदेत जाणं माझा अधिकार आहे. मला थांबवण्याचा प्रयत्न झाला. मला संसदेत आत जाण्यापासून रोखण्यात आलं. भाजप खासदार धक्का बुक्की करत होते”

 

 

राहुल गांधी काय म्हणाले?

 

राहुल गांधी म्हणाले की, “हे संसदेच प्रवेशद्वार आहे. भाजपचे खासदार मला ढकलत होते. धमकावत होते. भाजप खासदारांनी प्रवेशद्वार रोखून धरलं होतं. ते मला सतत ढकलत होते, धमकावत होते”

 

अमित शाह यांच्याविरोधात आज आंदोलन

 

अमित शाह यांच्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप आहे. या संबंधी आज इंडिया आघाडी प्रोटेस्ट मार्च सुरु आहे. राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधान केलं. त्या वक्तव्याविरोधात अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी इंडिया आघाडीने केली आहे. त्यासाठी हा प्रोटेस्ट मार्च सुरु आहे. त्यांनी माफी मागावी अशी सुद्धा मागणी आहे. संसदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेपासून मकर द्वारपर्यंत हा प्रोटेस्ट मार्च आहे.

 

 

काँग्रेसने काय म्हटलं?

 

इंडिया आघाडीचे खासदार निळे कपडे घालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेपासून मकर द्वारपर्यंत चालत जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलाय असा काँग्रेसचा आरोप आहे. त्यांचा गुन्हा अक्षम्य आहे, सगळं तंत्र त्यांना वाचवण्यासाठी कामाला लागलं आहे असं काँग्रेसने म्हटलं


PostImage

Vaingangavarta19

Dec. 19, 2024   

PostImage

अखेर घरमालकच निघाला रशिदच्या खुनाचा मारेकरी


अखेर घरमालकच निघाला रशिदच्या खुनाचा मारेकरी 

चार दिवसांनंतर झाला उलगडा 

अशोक वासुदेव खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता 

आष्टी:- येथे किरायाने वास्तव्यास असलेल्या एका दीव्यांग वृद्धाची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या करण्यात आली .ही घटना १५ तारखेला उघडकीस आली त्यानंतर पोलिसांनी आपला तपास सुरू केला.त्यामध्ये रशिदचा खून पोलिसांच्या माहिती प्रमाणे निष्पन्न झाले .   
 आष्टी पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार मृतकाचे आपल्या नातेवाईकांना मी गावाला येणार आहे.असे सांगितले होते. दिनांक १० डिसेंबरला रशीद आणि आरोपी खुशाल कुकुडकार यांच्यामध्ये घरभाड्यवरून वाद सुरु झाला .तू घरसोडून जात आहे मला घरभाड्याचे पैसे देणार नाही तर  तू पैसे दिल्याशिवाय जाऊ नकोस त्यावरून मयत रशीद ने आरोपीच्या पत्नीवरुन काही तरी अपशब्द बोलल्यामुळे खुशाल याचे मनात खुप राग आला. त्यामुळे त्याने रशिदच्या डोक्यावर लोखंडी रॉड ने डोक्यावर प्रहार केला.त्यांनतर त्याचे समाधान न झाल्यामुळे त्याने सत्तुर ने त्याचा गळा चिरला व तो मृत झाल्याचे पाहून त्याच्या खोलीतून बाहेर निघून रशीद च्या खोलीला बाहेरुन कुलूप ठोकले आणि याठिकाणी कोणताच प्रकार घडेलेला नाही अशा स्थितीत आरोपी वावरत होता. रशिदच्या नातेाइकांना मी स्वतः गावाकडे येणार आहे अशी माहिती दिल्यामुळे रशिद का आला नाही म्हणून वारंवार त्याच्या फोन ला संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा मोबाईल बंद असल्यामुळे पाच दिवसांनंतर रशीद का आला नाही म्हणून त्याचे नातेवाईक नागपूर वरुन आष्टीत दाखल झाले त्यामुळेच सदर गुन्ह्याचा खुलासा झाला आष्टी पोलीसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी त्यांच्या ताब्यात ठेवण्यात आला आहे 
या तपासात गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक लोढा , उपविभागीय अधिकारी अजय कोकाटे , यांच्या मार्गर्शनाखाली तपाशिय अधिकारी पोलीस निरीक्षक विशाल काळे, साहाय्यक पोलीस उपनरीक्षक सोमनाथ पवार , महिला पोलिस उपनिरीक्षक भाग्यश्री जगताप , पोलीस उपनिरीक्षक प्रतीक्षा वणवे , पोलीस शिपाई रवींद्र मेदाळे, प्रवेश राऊत , पराग राजूरकर , प्रकाश बोरकुटे , प्रताप तोगरवार , प्रमोद दुर्गे , संतोष नागुलवार तसेच त्यांचे सहकारी टीम यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 19, 2024   

PostImage

मेडिकल कॉलेज पदभरतीतील गैरव्यवहार टाळून भरती पारदर्शक करा : अन्यथा …


स्थानिकांना प्राधान्य द्या :

- डीन ला आजाद समाज पार्टीचा घेराव..

 

गडचिरोली : जिल्ह्यात मेडिकल कॉलेज मंजूर होऊन या वर्षी त्याला सुरवात होत झाले ही गौरवाची बाब असून याबाबत आजाद समाज पार्टीच्या वतीने भेट घेऊन मेडिकल महाविद्यालय प्रशासकाचे अभिनंदन केले आणि महाविद्यालयात सद्या होत असलेल्या पदभरती बाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले.

 

वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पदभरती प्रक्रिया सुरु असून BVG private limited या एजेन्सी कडे हा टेंडर देण्यात आला आहे. 649 पदांची एकूण भरती असून 32 पदे आतापर्यंत भरण्यात आली व जवळपास 600 पदे अद्याप भरायचे बाकी असल्याचे महाविद्यालयाचे प्रशासक डॉ. अविनाश टेकाडे यांनी सांगितले. 

   भरती संदर्भात जाहिरात प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली नाही असा सवाल उपस्थित केला असता शासनाचे वरच्या स्तरावरून ते करार केले आहेत व आम्हाला तसें काही आदेश किंवा अधिकार नाहीत असे डॉ. टेकाडे यांनी सांगितलं. 

BVG कंपनी च्या वतीने विपुल मस्के हे जिल्ह्यातील भरती प्रक्रिया सांभाळत असल्याचे सांगण्यात आले. 

 

निवेदनात म्हटले आहे की पदभरती मध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुद्धा चालू आहे अशी चर्चा चालू असून ही बाब अतिशय गंभीर आहे. जर असे काही घडत असेल तर तातडीने ते थांबवून त्याबाबत खुलासा करून भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी. मागणी आजाद समाज पार्टीने केली. प्रशासक डॉ. टेकाडे यांचेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी सांगितले.

 

जर गैरव्यवहार झाले असे आमच्या निदर्शनात आले तर याचे परिणाम फार गंभीर होतील., असा इशारा आजाद समाज पक्षाचे अध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा प्रभारी धर्मानंद मेश्राम, कार्याध्यक्ष विनोद मडावी, संघटक हंसराज उराडे, तालूका सचिव नितेश वेस्कडे, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार, पत्रकार चक्रधर मेश्राम उपस्थित होते.

 

👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽

राज बन्सोड 

जिल्हाध्यक्ष, आजाद समाज पार्टी 

गडचिरोली


PostImage

Shivendra Daharwal

Dec. 19, 2024   

PostImage

Mumbai Boat Accident: समुद्र में समा गया पूरा परिवार, ईलाज …


Mumbai Boat Accident: मुंबई के गेटवे ऑफ इंडिया से एलिफेंटा जा रही एक नौका को नौसेना की स्पीड बोट ने टक्कर मार दी। इस हादसे में 13 लोगों की मौत हो गई, जिसमें तीन नौसेना के कर्मचारी भी शामिल थे। वहीं, 101 लोग सुरक्षित बचा लिए गए। लेकिन इस दर्दनाक घटना में नासिक के पिंपलगांव बसवंत से इलाज कराने मुंबई आए एक परिवार की पूरी तरह से मौत हो गई।

नाव दुर्घटना में राकेश अहिरे, उनकी पत्नी हर्षदा अहिरे और पांच वर्षीय बेटे निधेश अहिरे की जान चली गई। यह परिवार दो दिन पहले अस्थमा के इलाज के लिए मुंबई आया था। अस्पताल में इलाज के बाद, वे समुद्री सफारी का आनंद लेने के लिए गेटवे ऑफ इंडिया पहुंचे थे। परंतु उनकी खुशी इस दर्दनाक हादसे के साथ समाप्त हो गई।

अहिरे परिवार बुधवार शाम को गेटवे ऑफ इंडिया के पास एक यात्री नाव पर सवार हुआ था। इसी दौरान नौसेना की स्पीड बोट ने उनकी नाव को टक्कर मार दी। राकेश अहिरे की मौके पर ही मौत हो गई, जबकि उनकी पत्नी और बेटे को गंभीर चोटों के कारण अस्पताल ले जाया गया, जहां उन्होंने दम तोड़ दिया।

राकेश अहिरे का परिवार पिंपलगांव बसवंत का निवासी था। उनके पिता नाना अहिरे का कंस्ट्रक्शन व्यवसाय है। राकेश पिछले कई वर्षों से अस्थमा से पीड़ित थे और समय-समय पर इलाज के लिए मुंबई जाते थे। उनकी शादी सात साल पहले कल्याण की हर्षदा से हुई थी। पांच साल पहले उनके बेटे निधेश का जन्म हुआ।

अहिरे परिवार की इस असामयिक और दर्दनाक मौत से गांव में शोक की लहर दौड़ गई है। पिंपलगांव बसवंत के लोग इस हादसे को लेकर गहरे सदमे में हैं। परिवार और गांववालों के लिए यह एक ऐसा दुख है, जिसे समय भी नहीं भर पाएगा।


PostImage

Rahul Bisen

Dec. 19, 2024   

PostImage

Guava or Apple Which is Better: सेब या अमरूद: जानिए …


Guava or Apple Which is Better: शरीर को स्वस्थ और पोषण से भरपूर बनाए रखने के लिए फलों का सेवन जरूरी है। सेब और अमरूद दो ऐसे फल हैं, जो हर मौसम में आसानी से मिल जाते हैं और सेहत के लिए बेहद फायदेमंद माने जाते हैं। खासकर सर्दियों के मौसम में अमरूद अधिक पसंद किया जाता है। लेकिन अगर सवाल यह उठे कि सेब और अमरूद में से कौन सा फल सेहत के लिए ज्यादा बेहतर है, तो इसका जवाब देना थोड़ा मुश्किल है। आइए जानते हैं दोनों के पोषण और फायदों की तुलना।

 

पोषण की तुलना

  • सेब:
    100 ग्राम सेब में लगभग 52 कैलोरी होती है। यह फाइबर, विटामिन सी और एंटीऑक्सीडेंट से भरपूर होता है। सेब वजन घटाने और दिल की सेहत के लिए फायदेमंद है। इसके एंटीऑक्सीडेंट दिल की बीमारियों और कैंसर जैसी समस्याओं से बचाव में मदद करते हैं।
  • अमरूद:
    100 ग्राम अमरूद में लगभग 68 कैलोरी होती है। यह विटामिन सी, फाइबर और पोटैशियम का बेहतरीन स्रोत है। सेब के मुकाबले अमरूद में चार गुना ज्यादा विटामिन सी पाया जाता है, जो इम्यूनिटी को बढ़ाने में मदद करता है।

 

फाइबर और पाचन में कौन बेहतर?

अमरूद में सेब की तुलना में ज्यादा फाइबर होता है, जो पाचन तंत्र को मजबूत करता है और कब्ज की समस्या से राहत दिलाता है। सेब में भी फाइबर मौजूद होता है, लेकिन उसकी मात्रा थोड़ी कम होती है।

 

डायबिटीज और वजन घटाने में मददगार

  • डायबिटीज:
    अमरूद का ग्लाइसेमिक इंडेक्स सेब से कम होता है, जिससे यह डायबिटीज के मरीजों के लिए बेहतर विकल्प बनता है। यह ब्लड शुगर को नियंत्रित रखने में मदद करता है।
  • वजन घटाना:
    अमरूद और सेब दोनों ही वजन घटाने में सहायक हैं। हालांकि, अमरूद में शुगर की मात्रा कम होने के कारण यह ज्यादा फायदेमंद माना जाता है।

 

अन्य स्वास्थ्य लाभ

  • सेब:
    इसमें मौजूद एंटीऑक्सीडेंट दिल की बीमारियों से बचाने और कैंसर के खतरे को कम करने में मदद करते हैं।
  • अमरूद:
    इसमें लाइकोपीन, विटामिन ए और पोटैशियम होता है, जो आंखों की रोशनी बढ़ाने और हड्डियों को मजबूत बनाने में मदद करता है।

अगर आप अपनी डाइट में फाइबर और विटामिन सी को शामिल करना चाहते हैं, तो अमरूद आपके लिए बेहतरीन विकल्प है। वहीं, सेब हल्का और आसानी से पचने वाला फल है, जो दिल की सेहत और वजन घटाने में मदद करता है। बेहतर यह है कि अपनी डाइट में दोनों फलों को शामिल करें और उनके अलग-अलग फायदों का लाभ उठाएं।


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 19, 2024   

PostImage

आष्ठात मोहफुलाच्या दारूचा अड्डा उद्ध्वस्त


 आरमोरी तालुक्यातील आष्ठा शिवारातील तलावाजवळ राजरोस सुरू असलेल्या मोहफूल दारूचा अड्डा येथील पोलिसांनी उद्ध्वस्त केला. यात तिघांना रंगेहाथ पकडून ५३ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एका आरोपीने पोबारा केला. ही कारवाई १६ डिसेंबरला केली.

 

कालिदास रामा मडावी एकनाथ तुळशीराम दाणी, नंदकिशोर राजीराम कोल्हे (तिघे रा. जोगीसाखरा, ता. आरमोरी) अशी आरोपींची नावे आहेत, तर संतोषसिंग जुनी (रा. बीएसएनएल टॉवरजवळ, आरमोरी) हा फरार आहे.

 

संतोषसिंग जुनी हा आष्ठा शिवारात तलावाच्या पाळीजवळ मोहफुलांपासून दारू बनवत असल्याची माहिती आरमोरी पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी तेथे धाड टाकली. यावेळी दारूसह सडवा असा सुमारे ५३ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

 

तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, मुख्य आरोपी संतोषसिंग जुनी हा मात्र हाती लागला नाही. पोलिस अंमलदार हंसराज धस यांच्या फिर्यादीवरून आरमोरी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. तपास हवालदार निळकंठ कोकोडे करीत आहेत.

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 19, 2024   

PostImage

पैसे परत मागणाऱ्या तरुणास मारहाण


 

आरमोरी : हातउसने दिलेले पैसे परत मागण्यास गेलेल्या तरुणास काठीने मारहाण केल्याची घटना डोंगरसांगवी (ता. आरमोरी) येथे १७ डिसेंबरला घडली. याबाबत आरमोरी ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

 

 

 

 

प्रवीण पंढरी पाल (२५, रा. डोंगरसांगवी) असे जखमीचे नाव आहे. तो वाहनचालक म्हणून काम करतो. काही दिवसांपूर्वी त्याने गावातीलच लिना भुजंग रोहणकर या युवतीला ३३ हजार रुपये हातउसने दिले होते. तिने पैसे परत देण्यास नकार दिला. त्यामुळे प्रवीण पाल हा १७ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता लिनाच्या घरी पैशासाठी गेला. यावेळी तिचे वडील भुजंग गोपाळ रोहणकर यांना त्याने सर्व हकीकत सांगून पैसे परत देण्याची मागणी केली. त्यावर त्यांनी शिवीगाळ करुन काठीने मारहाण केली. आरमोरी ठाण्यात दिलेल्या गुन्हा नोंद झाला.

 

 


PostImage

M S Official

Dec. 19, 2024   

PostImage

Chandrapur News: आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म


Chandrapur News: राजुरा तालुक्यात मंगळवारी (दि. 17) एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आठवीत शिकणाऱ्या 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. ही मुलगी एका खासगी शिकवणीसाठी जात होती, जिथे तिचा शिक्षकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

गणेश मोरे (23) असे आरोपी शिक्षकाचे नाव असून, त्याने या मुलीला आपल्या जाळ्यात ओढले व अत्याचार केला. या घटनेमुळे मुलगी गर्भवती झाली. सुरुवातीच्या काळात तिच्या प्रकृतीत कोणताही त्रास जाणवला नाही, त्यामुळे कुटुंबीयांना काहीच संशय आला नाही. मात्र, दोन दिवसांपूर्वी पोटदुखीची तक्रार केल्यावर तिला रुग्णालयात नेण्यात आले आणि सत्य समोर आले.

प्रथम राजुरा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मुलीला चंद्रपूरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे तिची प्रसूती झाली आणि तिने एका बाळाला जन्म दिला.

पालकांनी याबाबत राजुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे आरोपी गणेश मोरेवर भारतीय दंड संहिता कलम 376 (3), 376 (2) आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.


PostImage

Vaingangavarta19

Dec. 19, 2024   

PostImage

परभणी घटनेच्या निषेधार्थ आष्टी येथे निषेध आंदोलन


परभणी घटनेच्या निषेधार्थ आष्टी येथे निषेध आंदोलन


अशोक वासुदेव खंडारे /मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

आष्टी:- परभणी येथे देशद्रोही समाजकंटकाने केलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेच्या निषेधार्थ व शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलिसांनी केलेल्या हत्येच्या निषेधार्थ   बुधवार दिनांक 18.12.2024 रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक आष्टी येथील चौकात महिलांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले

 संविधान हाच या देशाचा धर्मग्रंथ असून भारत देश संविधानावर चालतो.संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलीस अधीकाऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबास भरीव आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे व भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची राज्य व केंद्र सरकारने खबरदारी घ्यावी अशा विविध मागण्या आंदोलकर्त्यांच्या कडून करण्यात आल्या
यावेळी निकीता निमसरकार, राखी मडावी,इंदिरा गोंगले,माधूरी जोडे, साहील साखरकर, ममता साव, कवडू डोर्लीकर, रेखा राजपूत, रेखा सुनतकरी, अशोक साव, यांच्या सह आष्टी येथील बहुसंख्य महिला व पुरुष उपस्थित होते आष्टी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता