PostImage

विदर्भ फायर न्यूज

Dec. 23, 2024   

PostImage

गडचिरोली, चंद्रपूरचे पालकमंत्रिपद नक्षलवाद्यांना संपवण्यासाठी नाही, तर... मलिदा मिळावा


मुंबई : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले आहे. मात्र आता पालकमंत्रिपदावरून चढाओढ सुरू होणार आहे. का६ी मंत्र्यांनी आधीच पालकमंत्रिपदावर दावे केले आहेत. पालकमंत्रिपदासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात का रस्सीखेच असते यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी यावर बोलताना मोठे विधान केले असून मलिदा मिळावा यासाठी पालकमंत्रिपद हवं असल्याचं म्हटलं आहे. त्यासोबतच दोन जिल्ह्यांची नावे घेत काही लोकांना कायम तिथले पालकमंत्रिपद हवे असल्याचं ते म्हणाले.

 

 

बीडमध्ये कोणत्याही मुंडेंना मिळालं तर सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळणार आहे का? परभणीचे पालकमंत्रिपद अबकला मिळाले तर सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळू शकतो का? कल्याणमध्ये पालकमंत्रिपद मिळालं तर मराठी माणसावर अन्याय झाला तो दूर होणार आहे का? हा फक्त एक सत्ता आपल्याकडे रहावी. त्या भागातील आर्थिक व्यवहारांची सूत्र आपल्याकडे रहावीत. कोणत्या पक्षाचं नाव घेत नाही. गडचिरोलीचं पालकमंत्रिपद काही लोकांना कायम हवं असतं. नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी नाहीतर गडचिरोलीमध्ये हजारो करोडो रूपयांचे खाणीचे उद्योग आहेत त्यातून मलिदा मिळावा यासाठी पालकमंत्रिपद हवं असतं हे माझं आकलन आहे, याच्यावर कोणीही टीका करू शकतं, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

 

 

गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये वनसपंत्तीचा प्रचंड नाश सुरू आहे. त्यातला वाटा आपल्याला मिळावा म्हणून त्या भागातील पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू आहे आणि असते. हे माझे संपादक पत्रकार म्हणून आकलन आहे. तुम्हाला चुकीचं वाटेल पण ज्यांना हे पाकमंत्रिपद हवंय त्यांच्यासोबत आणि कार्यकर्त्यांसोबत खासगीत बोला तुम्हाला ते हेच सांगतील. मुंबईचं पालकमंत्रिपद मंगलप्रभात लोढा किंवा अन्य कोणाला मिळाल्यावर मराठी माणसांना स्वस्त घरे मिळणार आहेत का? मुंबईतील मराठी माणसाची पीछेहाट थांबणार आहे का? गृहनिर्माण खाते हे त्यांच्या लॉबिमधील बिल्डरांचं धन व्हावं त्यातून आपल्याला लाभ व्हावा म्हणून ही खाती ओढाताण केली जाते, असं संजय राऊत म्हणाले.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Dec. 2, 2024   

PostImage

चंद्रचुडांनी देशात आग लावली


 

मुंबई: माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी घटनापिठावर बसून घटनाबाह्य काम करून या देशात आग लावली आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

 

राऊत म्हणाले, चंद्रचूड यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष (शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षफुटीचे प्रकरण) उत्तर प्रदेशमधील संभलचे प्रकरणअसेल या बाबतीत 'प्रार्थनास्थळ कायदा, १९९१ च्या माध्यमातून घटनाबाह्य काम करून देश पेटवला आहे. महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारला त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे संरक्षण दिले आहे. त्याच घटनाबाह्य सरकारचे काळजीवाहू सरकार महाराष्ट्रात उभे आहे. हे काळजीवाहू सरकार देखील संविधानविरोधी आहे. या सगळ्याला चंद्रचूडच जबाबदार आहेत.

 

संजय राऊत म्हणाले, २६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत संपली आहे. त्यामुळे २६ नोव्हेंबर रोजीमहाराष्ट्रात नवे सरकार अस्तित्वात येणे गरजेचे होते. घटनेनुसार ते आवश्यक्त होते. आता या भाजपावाल्यांचे भाडोत्री कायदेपंडित येतील, कुठलेही कागद दाखवतील आणि हे काळजीवाहू सरकार कसे योग्य आहे ते सांगतील. मात्र, आज महायुतीच्या जागी महाविकास आघाडी असती तर एव्हाना या लोकांनी राष्ट्रपती राजवट लागू केली असती. महायुतीला बहुमत मिळूनही अद्याप त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. निवडणुकीचा निकाल लागून आठ दिवस झाले आहेत. त्यांच्याकडे बहुमत आहे तरी त्याचा मुख्यमंत्री कोण हे ठरलेले नाही. भारतीय जनता पार्टीचा विधिमंडळ पक्षनेता देखील ठरलेला नाही. इतका मोठा पक्ष, इतके मोठे नेते, इतके मोठे बहुमत आहे तरीदेखील त्यांना विधिमंडळाचा नेता निवडता आलेला नाही. ते सरकार स्थापनेचा दावा करू शकलेले नाहीत. इतकेच काय तर सरकार स्थापनेसाठी कोणी राज्यपालांना भेटले देखीलनाही आणि राज्यपाल देखील हे सगळे चालू देत आहेत.

 

संजय राऊतांची माजी सरन्यायाधीशांवर टीका

 

शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, राज्यात खूप गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. घटनेचा मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. या सगळ्याला माजी सरन्यायाधीश चंद्रचूड जबाबदार आहेत. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग या घटनात्मक पेचाला जबाबदार आहेत.

 

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 17, 2024   

PostImage

Sanjay Raut: शिंदे गटाचे नेते लफंगे, पळपुटे, गुलाम असून, ईडीला …


कराड: दिल्लीत मुजरे घालण्यात दीड वर्षे घालवणारे मुख्यमंत्री दिल्लीचा गुलाम माणूस. शिंदे गटाचे नेते लफंगे, पळपुटे, गुलाम असून, ईडीला घाबरून पळालेले हे लोक सत्तेसाठी हपापलेले आणि डरपोक आहेत , आम्ही लढू आणि त्यांना गाढू असा हल्लाबोल शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी चढवला.सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी राजनीदेवी यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाल्यामुळे पाटील परिवाराचे सांत्वन करण्यासाठी संजय राऊत कराडमध्ये आले होते. तिथून बाहेर पडल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भेटीवेळी तातडीने उपस्थित झालेल्या माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते.शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे व संजय शिरसाठ आदी नेत्यांनी केलेल्या बोचाऱ्या टिकेसंदर्भात पत्रकारांनी छेडले असता खासदार राऊत यांनी टिकाकारांबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एकूणच शिंदे गटावर टीकेची झोड उठवली.

 

शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांच्या टिकेला उत्तर देताना, होय. आम्ही गावोगावी जावून डोंबाऱ्याचाच खेळ करू आणि डोंबाऱ्याच्या चाबकाने (हंटर) शिंदे गटाच्या नेत्यांना फोडून काढू असा इशारा राऊत यांनी दिला.दादा भुसे यांच्या टीकेवर बोलताना कोण दादा भुसे? असा प्रश्न करून, त्यांचीच मान वाकडी होण्याची वेळ आल्याचा टोला राऊतांनी लगावला. आम्ही ताठ मानेचे आहोत. शिवसेना प्रमुखांनी ताठ मानेने जगायला शिकवलं. म्हणूनच शिवसेना ताठ मानेने जगणारी संघटना आहे. शिवसेना तुमच्यासारख्या लफंग्यांची टोळी नसून, तुम्ही सारे पळपुटे आहात, शिंदे गटाला माझी भीती वाटते, आणि ती वाटायलाचा पाहिजे, २०२४ हे वर्ष सुरु झाले असून, त्यातील निवडणुकात सत्य लवकरच कळेल असा घणाघात राऊतांनी केला. विधानसभेत शिंदे गटाचा एकही आमादार दिसणार नाही, लिहून ठेवा असा दावा इथेही खासदार राऊत यांनी बोलून दाखवला.

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करताना, संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्याला काय गांभीर्याने घेताय? दिल्लीत मुजरे घालण्यात दीड वर्षे घालवणारा हा दिल्लीचा गुलाम माणूस आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण, आचरण काय आहे का त्याच्याकडे? सवाल राऊत यांनी केला.भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत आसलेल्या महायुतीच्या मेळाव्यासंदर्भात विचारले असता, छत्रपती महायुतीचे नेते. त्यांनीं ज्या पक्षात आपण आहोत त्या पक्षाशी इमान राखले पाहिजे असा चिमटा खासदार संजय राऊत यांनी काढला.