मोठी बातमी
पोलीस नक्षल चकमकीत १५ नक्षलवाद्यांना कंठस्नान, अधूनमधून चकमक सुरूच..
विजापूर :-
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पोलीस नक्षल चकमकीत १५ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले असून यात एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेला जयराम ऊर्फ चलपतीही मारला गेला आहे. रविवारी रात्रीपासून ते आज मंगळवारच्या सकाळपर्यंत अधूनमधून गोळीबार सुरू आहे. सदरची कारवाई छत्तीसगड आणि ओडिशा पथकाद्वारे करण्यात आली. यात १० संघ एकत्र येत ओडिशातील ३ पथके, छत्तीसगड पोलिसांचे २ पथके आणि सीआरपीएफची ५ पथके या कारवाईत सहभागी होती. जवान परिसरात शोध मोहिमेवर असतांना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. गारियाबंदचे एसपी निखिल राखेचा, ओडिशाचे नुआपाडा एसपी राघवेंद्र गुंडाला, ओडिशाचे डीआयजी नक्षल ऑपरेशन अखिलेश्वर सिंह आणि कोब्रा कमांडंट डीएस कथैत यावर देखरेख करीत आहेत. चकमकीची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारीही मैनपूरला पोहोचले. सुरक्षेच्या कारणास्तव भातीगढ स्टेडियमचे छावणीत रूपांतर करण्यात आले. परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते. त्याचवेळी ३ आयईडीही जप्त करण्यात आले. कुऱ्हाडी घाटातील भालू दिग्गी जंगलात १ हजार जवानांनी सुमारे ६० नक्षलवाद्यांना घेरले आहे. त्यामुळे नक्षली मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
वर्तविण्यात येत आहे.
वडील करतो अवैध दारु विक्री तर मुलगा करतो रेतीची तस्करी, यांच्यावर कारवाई करणारा तरी कोन? परिसरात खमंग चर्चा
आरमोरी:
आरमोरी शहरापासून काही अंतरावर असलेल्या जोगीसाखरा मार्गावरील एका नदीतिरावर जंगल परिसरात एक प्रख्यात दारुविक्रेता सर्रासपणे खुलेआम दारुची विक्री करीत असताना संबंधित विभाग आंधळेपणाची भूमिका बजावत असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर या दारूविक्रेत्याच मुलगा लगतच्याच नदीपात्रातून रात्री, दिवसा सर्रास रेतीची तस्करी करीत असल्याची खमंग चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे संबंधित विभाग सदर पिता-पुत्राचा शोध घेऊन कारवाई करण्याचे धाडस दाखविणार काय? असा सवाल जनतेकडून विचारला जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात कायद्याने दारुबंदी असली तरी शहरासह गामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मोहफुल, देशी, विदेशी दारुचा महापूर वाहत आहे. संबंधित विभाग मात्र लहान विक्रेत्यांवर कारवाई करून मोठ्या विक्रेत्यांची जणुकाही पाठराखण करीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आरमोरी शहरासह ग्रामीण भागात खुलेआम अवैध दारुविक्री सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. शहरापासून जवळव असलेल्या
जोगीसाखरा मार्गावरील नदीपात्रात या परिसरातील एक प्रख्यात दारूविक्रेता खुलेआम दारूची विक्री करीत असतानाही त्याच्यावर कारवाई करण्यास संबंधित विभाग आंधळेपणाची भूमिका बजावत आहे. याचे नेमके कारण काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. इतकेच नव्हे तर सदर प्रख्यात दारूविक्रेत्याचा मुलगा दिवसरात्र लगतच्याच नदीपात्रातून रेती तस्करी करीत असतानाही संबंधित विभागाकडून अजूनपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. एकंदरीत
• अवैधरित्यार रेती तस्करी करणाऱ्यावर पाळत ठेवून कारवाई करण्यासाठी एक भरारी पथक तयार करण्यात आले आहे. रेती तस्कराचा शोध घेऊन कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे. सदर भरारी पथक रात्री-बेरात्री सुद्धा गस्त घालण्याचे काम करीत आहे. पथकामार्फत रेती तस्करावर कारवाई करण्याचे काम सुरू आहे. यात कुणाचीही गय केली जाणार नाही.
-सी. एच. नागापुरे, मंडळ अधिकारी, आरमोरी
आरमोरी शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शासकीय, निमशासकीय बांधकामासह खासगी बांधकामे अविरत सुरू आहेत. रेती घाटाचे लिलाव झाले नसतानाही या बांधकामास रेती येते कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्या तो प्रख्यात पिता व रेती तस्करी करणारा त्याचा पुत्र यांच्यावर संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आरमोरी शहरासह ग्रामीण भागातील जनतेकडून केली जात आहे.
छत्तीसगड-ओडिशा सीमेवरील गरियाबंद जिल्ह्यात झालेल्या चकमकीत 20 नक्षलवादी ठार आहेत. अद्याप चकमक सुरु आहे, असे वृत्त ANIने दिले आहे. दरम्यान, १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला एक नक्षलवादीही या चकमकीत ठार झाल्याचे छत्तीसगड पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
छत्तीसगडमधील गरियाबंद जिल्ह्यात झालेल्या चकमकीत जवानांनी 20 नक्षलवाद्यांना ठार केले. मोठा शस्त्र साठाही जप्त करण्यात आले आहे. कुल्हाडी घाटावरील भालू डिग्गी जंगलात चकमक सुरुच आहे. सुरक्षा दलांचे सुमारे एक हजार जवानांनी या मोहिमेत सहभागी आहेत.
ओडिशा-छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलींची चकमक झाली. संयुक्त आंतरराज्यीय कारवाई रात्री उशिरापासून सुरु हाेती," असे ओडिशा पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे. ओडिशाच्या नुआपाडा जिल्ह्याच्या सीमेपासून फक्त 5 किमी अंतरावर असलेल्या छत्तीसगडमधील कुलारीघाट राखीव जंगलात संयुक्त कारवाईत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या 20 झाली आहे. "माओवाद्यांच्या मृतांची संख्या वाढू शकते. मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे," असेही पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
1 कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलीचा खात्मा
मृत 20 नक्षलींमध्ये सोमवारी ठार झालेल्या दोन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. या चकमकीत 1 कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलवादीही ठार झाला आहे, अशी माहिती छत्तीसगड पोलिसांनी दिली. तसेच कोब्रा युनिटचा एका जवान जखमी झाला आहे. ओडिशाचे पोलीस महासंचालक योगेश बहादूर खुरानिया यांनी 'पीटीआय'शी बोलताना सांगितले की, "गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे, ओडिशा पोलिस, छत्तीसगड पोलिस आणि सीआरपीएफ यांचे संयुक्त ऑपरेशन सोमवारी (२० जानेवारी) रात्री नवापारा आणि छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्याच्या सीमेवर शोध मोहिम राबवली. ही कारवाई ओडिशा आमच्या सीमेपासून सुमारे 5 किमी अंतरावर गरियाबंद येथे करण्यात आली. पहाटेच्या सुमारास नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला. दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या आहेत, मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा, आयईडी जप्त करण्यात आले आहेत. परिसरात अजूनही शोध मोहिम सुरु आहे."
अल्पवयीन मुलानेच केली वडिलाची हत्या, मुलाला आईने पुरावे नष्ट करण्याकरिता केली मदत
नागपूर : वडिलांच्या दारूच्या व्यसनाला व त्यानंतर होणाऱ्या छळवणूकीला कंटाळून एका अल्पवयीन मुलाने टोकाचे पाऊल उचलले. त्याने वडिलांचा गळा आवळून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्याच्या आईने पुरावे नष्ट करण्यासाठी त्याची मदत केली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे.
मुकेश शंकरराव शेंडे (५७) इंगोलेनगर, हुडकेश्वर असे मृतकाचे नाव आहे. ते ताराचंद भोंगाडे यांच्या घरी पत्नी उर्मिला व १७ वर्षीय मुलासह भाड्याने राहत होते. त्यांचा एक मुलगा बाहेरगावी नोकरी करतो. शेंडे हे एका हार्डवेअरच्या दुकानात कामाला होते व त्यांना दारूचे व्यसन होते. त्यातूनच ते पत्नी तसेच मुलाला शिवीगाळ करून मारहाण करायचे. त्यांच्या या वागणुकीला दोघेही कंटाळले होते. १९ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता शेंडे दारू पिऊन घरी गेले व नेहमीप्रमाणे त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते परत दारू पिण्यासाठी बाहेर गेले व रात्री दहा वाजता परतले. नशेत त्यांनी पत्नी व मुलाला परत शिवीगाळ सुरू केली. तेव्हा मायलेक जेवण करत होते. त्यांच्या या वागण्याला अल्पवयीन मुलाने विरोध केला असता शेंडे संतापले. त्यांच्यात भांडण झाले व झटापट सुरू झाली. त्यात अल्पवयीन मुलाने शेंडे यांना गादीवरून खाली ढकलले. खाली पडल्यामुळे त्यांच्या नाकातून रक्त निघायला लागले. आता वडील काय करतील या भितीपोटी अल्पवयीन मुलाने थेट टॉवेल उचलला व गळा आवळत शेंडे यांची हत्या केली. हा प्रकार पाहून शेंडे यांची पत्नी हादरली. मात्र आता मुलाला वाचविणे आवश्यक आहे. या विचारातून त्यांनी पुरावा नष्ट करायला त्याची मदत केली. त्यांनी शेंडे यांचा मृतदेह पोत्यात भरला. तसेच घटनास्थळावरील रक्ताचे डाग फिनाईलने पुसले. शेंडे यांचे चुलत मंगेश यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.
दहावीत असतानादेखील करायचा काम -
आरोपी अल्पवयीन मुलगा हा दहावीत शिकतो. तो अभ्यासात चांगला असला तरी घरची परिस्थिती बेताचीच असल्याने तो सुटीच्या दिवशी कामावर जायचा. उन्हाळ्याच्या सुटीतदेखील तो दुकानांमध्ये काम करून घरखर्चात मदत करत होता. वडील दारूच्या व्यसनापोटी घराकडे दुर्लक्ष करत आहेत हे पाहून तो नेहमी चिडायचा.
नदीत फेकणार होते मृतदेह -
हत्येनंतर मायलेकाने शेंडे यांचा मृतदेह पांढऱ्या रंगाच्या पोत्यात भरला व तो दोन्ही बाजूंनी शिवला. मृतदेह नदी किंवा नाल्यात फेकण्याचे ठरविले. बंटीने मदतीसाठी एका जवळच्या मित्राला फोन केला. मात्र मित्राने त्याची मदत न करता त्याला पोलिसांत जाऊन सर्व प्रकार कबूल करण्याचा सल्ला दिला. त्याच्या सल्लावरून मायलेकांनी हुडकेश्वर पोलीस ठाणे गाठले.
हळदवाही येथे क्षयरोग मुक्त भारत अभियान अंतर्गत एक्स-रे तपासणी शिबिर
प्रमोद झरकर/ उपसंपादक
घोट:-
प्राथमिक आरोग्य केंद्र घोट अंतर्गत उपकेंद्र हळदवाही येथे क्षयरोग मुक्त भारत अभियाना अंतर्गत एक्स-रे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
100 दिवस क्षयमुक्त भारत अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आले या वेळी क्षयरोग या आजाराबद्दल माहिती देऊन , क्षयरोग लक्षणे , उपचार , तपासणी व त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले ,तसेच LCDC बद्दल माहिती देऊन कुष्ठरोग मुक्त महाराष्ट्र याविषयी डॉ. विवेक हजारे यांनी माहिती सांगून सर्वांनी अभियान कालावधीत आपले तपासणी करून घेण्यात यावे असे आवाहन केले.IDA कार्यक्रम माहिती देण्यात येऊन सर्वांनी हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्याचा सेवन करावे जेणे करून हत्तीरोग आपल्याला होणार नाही तसेच निक्षयमित्र , प्रोटीन युक्त आहाराचे महत्त्व क्षयरोग रुग्णाला किती महत्वाचे आहे हे पटवून देण्यात आले . या वेळी सौ. निता पुडोजी सरपंच ग्रा. पं हळदवाही, डॉ. विवेक हजारे वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र घोट , डॉ शितल चाटे (CHO), डॉ शिवानी खेडकर (MO MMU टीम ) विलास कुभारे जिल्हा क्षयरोग पर्यवेक्षक , एक्स- रे टीम सनजली क्षकिरण तज्ञ , मयुरी कोरीवार , निखिल मेश्राम , मनोज बागमारे क्षयरोग पर्यवेक्षक, विलास कस्तुरे आरोग्य निरीक्षक, पुरुषोत्तम चलाख आरोग्य पर्यवेक्षक , डेविड पेंद्राम ,सौ . ऐश्वर्या भैसारे,सूरज राहुलवार, व्यंकटेश गौरावार आरोग्य सेवक , धरती भडके आरोग्य सेविका , सौ. प्रीती उईके आरोग्य सेविका ,कू दिक्ष्या बावणे आरोग्य सेविका , दुषांत गेडाम वाहन चालक,आशा ताई जयश्री अलोने , इंदिराबाई मधमवार व इतर कर्मचारी व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते
ट्रक मागे घेत असतांना प्रवासी ॲटोला लागली धडक, ॲटो झाले पलटी तिन गंभीर चार जखमी
आष्टी : येथून येनापूरकडे जाणाऱ्या
ऑटोला कोनसरी मेटल कंपनीच्या दुसऱ्या गेटजवळ ट्रकने धडक दिली. तेव्हा ॲटो पलटला या धडकेत ऑटोत बसलेले सात जण जखमी झाले. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. गंभीर जखमींना गडचिरोली रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
सरोबला सुभाष हलदर (४५) रा. दुर्गापूर, रामचंद्र गंगाराम मडावी (६५), निर्मला रामचंद्र मडावी (५५), देलिना दीपक मडावी (३) तिघेही रा. सोमणपल्ली असे गंभीर जखमींची नावे आहेत. कोनसरी येथील लोहखनिज़ प्रकल्पाच्या दुसऱ्या गेटजवळ ट्रक मागै घेतला जात होता. दरम्यान, रस्त्याने जात असलेल्या ऑटोला ट्रकच्या मागच्या पल्ल्याची धडक बसली. यात ऑटो उलटला. त्यातील तिघांना गंभीर मार लागल्याने गडचिरोली येथे रेफर केले तर चौघांना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. तिघांच्या पायाला मार लागला तर तीन वर्षांच्या मुलीच्या डोक्याला मार लागलेला आहे. ऑटोचालक ऑटो घेऊन पळून गेला. त्याचा शोध आष्टी पोलीस घेत आहेत
२ अस्वलांचा वाहनचालकावर हल्ला, ईसम गंभीर
चंद्रपूर:-
जिल्हा चारही बाजूने वन क्षेत्राने व्याप्त असल्याने सतत जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना घडत आहेत. वन्य प्राणी जंगलातील अधिवास सोडून शहरी भागात येत असल्याने मानवी जीवनाला आता धोका निर्माण होत आहे.
चंद्रपुरातील थर्मल पॉवर स्टेशन मधील अल्ट्राटेक ऐश लोडींग प्लांट जवळ २० जानेवारीला वाहन चालकावर २ अस्वलीनी हल्ला केला हि घटना सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली, या हल्ल्यात वाहनचालक रघुनाथ यादव वय ५२ जखमी झाला आहे
सकाळी रघुनाथ यादव हे झुडपी भागात शौचासाठी गेले होते त्यावेळी अचानक २ अस्वलीनी त्यांच्यावर हल्ला केला, अचानक झालेल्या या हल्ल्याने यादव घाबरून गेले, त्यांनी काही वेळ अस्वलाचा प्रतिकार करीत आरडाओरड सुरु केल्याने कामगार वर्गाने तात्काळ यादव यांच्याकडे धाव घेतली. कामगार वर्ग आल्याने अस्वलीनी पळ काढला.
सीएसटीपीएस मध्ये दररोज असंख्य वाहने येतात मात्र ऐश प्लांट येथे वाहन चालकांसाठी शौचालयाची व्यवस्था नाही, त्यामुळे हे चालक झुडपी भागात शौच करण्याकरिता जात असल्याने त्याठिकाणी प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असून यामुळे हा हल्ला झाला असल्याचे बोलले जात आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सीएसटीपीएस मध्ये अस्वलांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे, या भागात सीसीटीव्ही लावण्यात आला आहे व अस्वल सीसीटीव्ही दिसून येतात, मागील २ महिन्यात तिघांवर अस्वलीने हल्ला केल्याची घटना घडली आहे.
अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेले वाहनचालक रघुनाथ यादव यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या सीएसटीपीएस मध्ये वनविभागाने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे.
गडचिरोली :: आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथे आदर्श फाउंडेशन च्या वतीने सुरु करण्यात आलेल्या अभ्यासिकेचे लोकार्पण गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
मोबाईल सोशल मीडिया च्या काळात तरुण पिढीचा वेळ चुकीच्या गोष्टीसाठी खर्ची होत असून तरुणांना सोशल मीडिया चे वेळ लागले आहे, तरुनांचा वेळ सत्कामी खर्ची करण्याकरीता त्यांच्यामध्ये वाचणाची गोडी निर्माण करावी लागेल आणि त्यासाठी गाव तिथे वाचनालय संल्पना रुजवून गावागावात अभ्यासिका निर्माण करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी यावेळी केले.
तर महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी अभ्यासिकेच्या माध्यमातून चांगले अधिकारी घडून फक्त आपल्या गावाचाच नाही तर जिल्ह्याचाही नाव लौकिक करणारे अधिकारी घडावे अशी इच्छा व्यक्त केली.
या उदघाट्न सोहळ्यास तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी आरमोरी मिलिंद खोब्रागडे, पोलीस निरीक्षक प्रताप लामतुरे, सरपंच देलनवाडी प्रियंकाताई कुमरे, माजी सरपंच रामनंदन गेडाम, उपसरपंच देलनवाडी त्रिलोकजी गावतुरे,विजयजी ठवरे, प्रदीपजी बोळणे, उपसरपंच उराडी राधेश्याम दडमल, रत्नाकर धाईत, व्ही.डी. बावणकर, दिगेश्वर धाईत, जांभळे साहेब सह इतर मान्यवर गावातील प्रतिष्ठित नागरिक व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
भामरागड,दिं. २० जानेवारी २०२५:
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल अविकसित भामरागड भागात भारतीय जनता पक्षाच्या "घर चलो" विशेष सदस्यता नोंदणी मोहिमेला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या अभियानाची जोरदार सुरुवात झाली.
अभियानाचा हेतू आणि आवाहन म्हणजे "समर्थ भारत आणि विकसित भारतासाठी भाजपाचा भाग बना," असे आवाहन अशोकजी नेते यांनी नागरिकांना केले. या मोहिमेच्या माध्यमातून स्थानिक जनतेपर्यंत पक्षाची उद्दिष्टे आणि विकासाची दृष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सदस्य नोंदणी प्रक्रिया ही ऑनलाइन नोंदणीसाठी: ८८००००२०२४ या क्रमांकावर मिस कॉलद्वारे नोंदणी होत असुन ऑफलाइन नोंदणी: भामरागड हा अतिदुर्गम भाग असल्याने या भागात मोबाईल नेटवर्क नसल्याने विशेष फॉर्मद्वारे नोंदणी प्रक्रिया राबवली गेली जात आहे.
या कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हा व तालुका स्तरावरील विविध पदाधिकाऱ्यांसह महिला आघाडी, सहकार आघाडी, नगरसेवक आणि शक्ती केंद्र प्रमुख यांची उत्साही उपस्थिती होती.
या अभियानाला जेष्ठ नेते व ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,महिला आघाडीच्या प्रदेश सचिव रेखाताई डोळस, सहकार आघाडीचे प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल बिशवास, भामरागड न.पं.च्या नगराध्यक्षा रामबाई कोमटी महाका, तालुकाध्यक्ष अर्जुन अलाम, महामंत्री तपेश हलदार, ता.उपाध्यक्ष जाधव हलदार,नगरसेवक सरजू सेडमेक,माजी नगरसेविका रंजु सेडमेक,पोर्णिमा मडावी,लाहेरी शक्ती केंद्र प्रमुख दिनेश घोसरे, ता.उपाध्यक्ष राजेंद्र मडावी, ताडगांवचे जेष्ठ नेते राजुभाऊ तिर्थगीरवार, कमलेश अधिकारी तसेच भामरागडतील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
भामरागडच्या नागरिकांनी मोहिमेला दिलेला प्रतिसाद हा भाजपाच्या विकासाभिमुख दृष्टिकोनाचा परिणाम मानला जात आहे. या मोहिमेमुळे पक्षाची ताकद स्थानिक स्तरावर वाढत असून जनतेशी थेट संवाद साधण्याचे उद्दिष्ट साध्य होत आहे.
अशा अभियानांच्या माध्यमातून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात विकासाची नवीन पहाट उगवेल, असा विश्वास भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केला.
देसाईगंज : ब्रम्हपुरी वरून देसाईगंजला मोटारसायकलनेयेत असताना नदीच्या पुलाच्या समोर स्मशान घाटाच्या बाजूला दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज २० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. जगन मलगाम रा.फरी असे जखमीचे नांव आहे.
अपघात एवढा गंभीर होता की मोटारसायकल उंच रस्त्याच्या खाली पडली व जगन मलगाम हे गंभीर जखमी होऊन झाडीमध्ये अडकून पडले होते.
बाजूलाच स्मशान घाटात प्रेतावर अंत्यसंस्कार सुरु होते. सर्व लोकं झाडीत अडकलेल्या जखमी मोटारसायकल स्वाराकडे बघत होते. पण त्याला त्या झाडीमधून काढण्यासाठी कुणाचीही हिम्मत झाली नाही. तेवढ्यात देसाईगंज येथील देवदूत
म्हणून परिचित असलेले जसपालसिंग चावला यांना सदर अपघाताबद्दल माहिती मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब ना करता घटनास्तरावर धाव घेतली व विक्रम माखरे यांच्या मदतीने गंभीर जखमी अवस्थेतील जगन मलगाम यांना त्या झाडीतून काढले व स्वतः च्या मोटारसायकलवर देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात भरती केले.
अगदी वेळेवर जखमी अपघातग्रस्ताला भरती केल्यामुळे जगन मलगाम यांचे प्राण वाचवणारे जसपालसिंग चावला यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
गडचिरोली, ता. २०: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीना कायमस्वरुपी रोजगार द्यावा, विद्यावेतनात वाढ करुन ते नियमित व वेळेवर द्यावे या मागण्यांसाठी आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
गडचिरोली जिल्ह्यात ऑगस्ट २०२४ पासून २ हजार ३०० मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी वेगवेगळ्या २७ आस्थापनांवर कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती सहा महिन्यांसाठी करण्यात आली होती. परंतु फेब्रुवारी २०२५ मध्ये हा कालावधीत संपणार आहे. त्यामुळे आम्हाला जुन्याच आस्थापनेवर कायम करावे, या प्रमुख मागणीसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षार्थीनी मोर्चा काढला. या मोर्चात जिल्हाभरातील २ हजारांहून अधिक प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दशरथ कोवे, उपाध्यक्ष चरण बन्सोड, सचिव पंकज नैताम आदींच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.
धारदार शस्त्राचा धाक दाखवून प्रेमविरांना लुटले
- पीडितेच्या तक्रारीवरून दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल
चंद्रपूर:-
धारदार शस्त्राचा धाका दाखवून प्रेमविरांना ६ हजार ८०० रुपये लुटणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध वरोरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. सदर घटना १८ जानेवारी ला दुपारी ४ वाजता चंद्रपूर नागपूर महामार्गावरील वरोरा येथून ४ किमी अंतरावर असलेल्या महाकाली कॉलनीजवळ घडली.
निखिल सुभाष तुरणकर (२६) रा. आनंदवन चौक, वरोरा हा छत्रपती चौक, वणी येथे असलेल्या बजाज फायनान्स कंपनीच्या विक्री विभागात कार्यरत आहे. त्याचा मित्र प्रेम गोहणे याच्या नातेवाईकाला फायनान्सवर दुचाकी खरेदी करायची होती. त्यामुळे प्रेम याचा बोलण्यावरून वरून तो वरोरा येथे आला. मात्र येथे आल्यावर त्याला सध्या वाहन खरेदी करायचे नसल्याचे लक्षात आल्याने तो एका मुलीला भेटायला गेला. तेथून वरोरा तहसील मुख्यालयापासून चार किमी अंतरावर असलेल्या महाकाली कॉलनीजवळ दोघेही उभे राहून बोलत होते.
दुपारी ४ वाजता काळ्या रंगाच्या पल्सर वर ३० व ३५ वयोगटातील दोन तरुण आले. ते घटनास्थळी पोहोचताच दोन तरुणांपैकी एकाने निखिलच्या गालावर चापट मारून त्याच्या खिशातील १ हजार ८०० रुपये हिसकावले. हे बघताच आजूबाजूला बसलेले प्रेमी युगुल पसार झाले. यानंतर त्यांनी दोघांकडे आणखी पैशांची मागणी सुरू केली असता, त्यांनी आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. हे ऐकून एका तरुणाने पल्सरमध्ये ठेवलेले धारदार शस्त्र काढून निखिलच्या पोटावर ठेवले आणि पैशाची मागणी करू लागला.
या अनपेक्षित घटनेने निखिल आणि मुलगी खूपच घाबरले होते पण दोघेही सोडायला तयार नव्हते. त्यामुळे रोख रक्कम नसल्याने निखिलने फोन नंबर देण्यास सांगितले. त्यानंतर एका तरुणाने मोबाईल स्कॅनर दाखवला आणि त्यात निखिलने ५ हजार रुपये ट्रान्सफर केले. तेथून निघताना दोन्ही तरुणांनी कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या निखिलने वरोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ज्यामध्ये स्कॅनरमध्ये सूरज बालाजी गहाणे हे नाव दिसले होते आणि त्याने आपल्या सहकाऱ्याला गोलू असे संबोधित केले होते. निखिलच्या तक्रारीवरून वरोरा पोलिसांनी सूरज गोहणे आणि गोलू यांच्याविरुद्ध कलम ३ (५), ३१२, ३५१ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास वरोरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार अजिंक्य तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल नवघरे करीत आहेत.
गडचिरोली : तालुक्याच्या अमिर्झा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेची शाखा आहे. या बँकेत परिसराच्या दहा गावांतील नागरिकांची बँक खाती आहेत; येथे व्यवहार करण्यासाठी किंवा माहिती विचारण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना बँक व्यवस्थापकाकडून हीन दर्जाची व अपमानास्पद वागणूक दिली जाते. यामुळे ग्राहक त्रस्त आहेत.
अमिर्झा येथे चांभार्डा, मरेगाव, मौशिखांब, मुरमाडी, भिकारमौशी, आंबेटोला, आंबेशिवणी, जेप्रा, राजगाटा, धुंडेशिवणी, कळमटोला, पिपरटोला, बोथेडा आदी गावांतील ग्राहक बँकेतून पैसे काढणे व जमा करण्याकरिता येतात. माहिती विचारल्यानंतर त्यांना योग्य व सन्मानजनक वागणूक देणे गरजेचे आहे; परंतु येथील बैंक व्यवस्थापकासह येथील कर्मचारीसुद्धा ग्राहकांना उद्धट वागणूक देतात. व्यवस्थापकाची सध्या मनमानी सुरू आहे.
नवीन खाती काढण्यासाठी कुणी गेले असता, कशासाठी खाते काढता, असे उलट बोलतात, असा आरोप अमिर्झासह चांभार्डा येथील ग्राहकांचा आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी केली.
कर्नाटक येथे धान रोवणीसाठी गेलेल्या मजूरांचे दलालाने पैसे थकविले ,आ.विजय वडेट्टीवार यांनी दिला मदतीचा हात
मजुरांचा परतीचा झाला मार्ग मोकळा
सिंदेवाही : कर्नाटक
राज्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी व सिंदेवाही तालुक्यातील २१ मजूर हे धानपीक रोवणीच्या कामासाठी सुमारे १ महीन्यापुर्वी गेले होते. त्याठिकाणी महीनाभर काम केल्यानंतर मजूरीचे पैसे त्यांना तिथं घेऊन जाणाऱ्या कर्नाटकातील कंत्राटदाराने मजूरांना दिलेच नाही. व तो पसार झाला. त्यामुळे मजूरांकडे गावाकडे परत यायला देखील पैसे नव्हते. ते सगळे संकटात सापडले होते. अशा स्थितीत संकटात सापडलेल्या मजूरांनी कृउबा संचालक प्रभाकर सेलोकर, माजी नगरसेवक डॉ. नितीन उराडे, शहर काँग्रेस सचिव पुष्पाकर बांगरे यांच्याशी संपर्क साधून आपली व्यथा सांगितली.
सदरची बाब ह्या तिन्ही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांना कळवली असता लगेचच त्यांनी आपल्या यंत्रणेमार्फत सदर मजूरांपर्यत आर्थिक मदत पोहचवली. व महाराष्ट्रातील आपल्या स्वगृही पोहचण्यासाठी लागणारा खर्च व संपूर्ण सहकार्य देखील आपण करणार असल्याचे सांगितले.
कर्नाटक राज्यात गेलेल्या मजूरांमध्ये प्रकाश भोयर, तुळशीदास भोयर, माधूरी भोयर, सुनिता कन्नाके रा. आक्सापुर, दिनेश मेश्राम, स्वप्नील मेश्राम, पायल मेश्राम, आशा मेश्राम रा. गडबोरी, देविदास भानारकर, वैशाली सामुसाकडे, गिता भानारकर, रंजू भानारकर रा. मोटेगाव, अशोक जुमनाके, प्रशांत जुमनाके, वंदना जुमनाके, सायली जुमनाके रा. खातगाव, संदीप ठाकरे, वनिता ठाकरे, शिल्पा ठाकरे रा. गिरगाव, चंद्रभागा सामुसाकडे रा. नवरगाव, निशा मेश्राम रा. पाडरवाणी यांचा समावेश आहे. हे सर्व मजूर आता परतणार असुन आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने हे सर्व शक्य झालं आहे. त्यामुळे सर्व मजूरांनी आमदार विजय वडेट्टीवार यांचे आभार देखील व्यक्त केले आहेत.
पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तिन तरुणांना बसने दिली धडक,तिघेही तरुण ठार
बीड; मोची पिंपळगाव फाट्यावर बसच्या धडकेत तीन युवक ठार बीड परळी रस्त्यावर बीड शहरापासून पाच किलोमीटर असलेल्या मोची पिंपळगाव फाट्यावर सकाळी 6 वाजता पोलीस भरती सराव व व्यायाम करण्यासाठी गेलेल्या घोडके राजुरी गावातीलच तीन युवकांना बसणे उडवले, या दोघेजण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाल्याने त्याला बीड येथील शासकीय रुग्णालयात
उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजुरी गावातील पाच विद्यार्थी हे सकाळी व्यायाम करण्यासाठी बीड परळी रस्त्यावर आले असता बस क्रमांक MH 14BT 1473 या बसणे तिघांना उडवले यात 1) ओम सुग्रीव घोडके वय 19 वर्ष, 2) विराट बाब्रुवान घोडके वय 18 वर्ष 3) सुबोध बाबासाहेब मोरे वय 19 वर्ष सर्व रा. घोडके राजुरी याना बसणे उडवल्याने ओम घोडके विराट घोडके जागीच ठार झाले तर सुबोध मोरे हा जखमी असल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आणले असता उपचारादरम्यान याचा देखील मृत्यू झाल्याचे समजते. हा अपघात एवढा भीषण होता की रस्त्यावर रक्त, मांसाचा सडा पडला होता. बस काही अंतरावर जाऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात गेली. या अपघातामुळे घोडकाराजुरी गावावर शोककळा पसरली असून घोडका राजुरी गावातील नागरिकांची बीड शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती.
अधिक तपास पोलीस करीत आहेत
सावंतवाडी येथील प्रसिद्ध आरती मासिकातर्फे दरवर्षी कथा व कविता स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यंदा आयोजित करण्यात आलेल्या "ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर, पुणे पुरस्कृत उत्कृष्ट कवितास्पर्धा -२०२४" मध्ये झाडीपट्टीतील साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांच्या "पेरते व्हा" या कवितेस द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आल्याचे "आरती" मासिकाचे संपादक प्रणव भागवत व भारत गावडे यांनी कळविले आहे.
पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम,प्रमाणपत्र व दिवाळी अंक भेट अशी असून वरील कविता आरती दिवाळी अंक- २०२४ मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे मागील वर्षी याच संस्थेच्या कथा व कविता लेखन स्पर्धेत चुडाराम बल्हारपुरे यांच्या 'श्रृंखला' या कथेस द्वितीय क्रमांकाचे व 'रानगर्भ फुलत आहे ' या कवितेस प्रथम पुरस्कार प्राप्त झाले.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा.अरुण बुरे, योगेश गोहणे, प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर, प्रा. डॉ. जनबंधू मेश्राम,प्रा. डॉ.राजकुमार मुसणे, प्रा. नवनीत देशमुख (साहित्यिक), मधुश्री प्रकाशनचे प्रा. पराग लोणकर (प्रकाशक) , डॉ. एस. एन.पठाण, डॉ. परशुराम खुणे, नरेश बावणे, उपसंपादक देशोन्नती, व इतर साहित्यिक मित्रांनी अभिनंदन केले आहे.
गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदासाठी ईच्छा बोलून दाखविल्यानंतर गडचिरोलीचे पालकमंत्री पद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होईल हे स्पष्ट झाले होते.. मुख्यमंत्री एखाद्या जिह्याचे पालकमंत्री घेणे हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडत आहे. जिल्ह्यात, आरोग्य, रस्ते, सार्वजानिक वाहतूक व्यवस्था, यासारखे मूलभूत सुविधांचे प्रश्न आवासून उभे असून गेल्या अडीच वर्षाच्या त्यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी याकडे फारसे लक्ष दिले नाही.. किमान पुढील पाच वर्ष तरी ते याकडे लक्ष देतील या अपेक्षेने गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक नजरा लावून बसले आहे. गडचिरोली सारख्या बहुल आदिवासी भागात आता मुख्यमंत्र्यांनी पालक मंत्री हे पद भूषवल्यामुळे आता तरी गडचिरोली सारख्या आदिवासी जिल्ह्याचे विकास होईल याच नजरेत सर्व नागरिक बघून राहिले आहे.
Saif Ali Khan Attack: क्या बॉलीवुड स्टार सैफ अली खान पर हमला करने वाला आरोपी बांग्लादेशी है?
मुंबई में हाल ही में हुए इस हाई-प्रोफाइल मामले ने सभी का ध्यान खींचा है। आरोपी मोहम्मद शहजाद को मुंबई अपराध शाखा ने ठाणे के कंदलवन जंगल से गिरफ्तार किया। कोर्ट में पेशी के दौरान, पुलिस ने दावा किया कि आरोपी बांग्लादेशी है और सिर्फ छह महीने पहले भारत आया है। लेकिन, आरोपी के वकील के बयान ने पूरे मामले को पलट दिया।
मुंबई के पॉश इलाके में सैफ अली खान पर अचानक हमला हुआ।
पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए आरोपी को ठाणे के जंगल से गिरफ्तार किया।
कोर्ट में पेशी के दौरान पुलिस ने कहा कि आरोपी बांग्लादेश से अवैध तरीके से भारत आया है।
लेकिन, मामला तब दिलचस्प हो गया जब आरोपी के वकील ने कोर्ट में चौंकाने वाला बयान दिया
"मोहम्मद शहजाद पिछले सात साल से भारत में रह रहा है। पुलिस का यह दावा कि वह छह महीने पहले आया है, पूरी तरह से झूठ है।"
उन्होंने यह भी जोड़ा कि:
"पुलिस ने बिना किसी नोटिस या ठोस सबूत के उसे गिरफ्तार किया है। यह सुप्रीम कोर्ट के दिशा-निर्देशों का उल्लंघन है।"
फैंस की चिंता: सैफ अली खान के प्रशंसक सोशल मीडिया पर उनकी सुरक्षा को लेकर सवाल उठा रहे हैं।
बॉलीवुड का सवाल: क्या सेलिब्रिटी की सुरक्षा पर और ध्यान देने की जरूरत है?
कानूनी विशेषज्ञों का नजरिया: आरोपी की नागरिकता को साबित करना पुलिस के लिए बड़ी चुनौती बन सकता है।
इस मामले की अगली सुनवाई में सच्चाई सामने आने की उम्मीद है। आरोपी की नागरिकता और हमले के पीछे की मंशा का खुलासा करना पुलिस के लिए बड़ी जिम्मेदारी है।
आप इस घटना के बारे में क्या सोचते हैं? क्या आरोपी बांग्लादेशी है या मामला कुछ और है? अपनी राय कमेंट सेक्शन में जरूर बताएं। ताजा अपडेट्स के लिए हमारे साथ जुड़े रहें।
एटापल्ली : तालुक्यातील उडेरा येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मार्फत खरीप पणन हंगाम 2024-2025 धान खरेदी केंद्राचे उदघाटन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते फित कापून धान खरेदी सुरूवात करण्यात आले आहे.या धान खरेदी कार्यक्रमला आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी प्रमुख उपस्थित होते.
अधिकृत केंद्रावराच धान विक्री करा ज्या शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाला आहे.त्यांनी आपल्या धान विक्री करावे आणि ज्यांच्या ऑनलाइन नोंदणी झाले नाही.त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी आणि कोणीही शेतकरी यापासून वंचित राहू नये आणि शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांनी केले.
यावेळी राहुनू गावडे,कुमरेट्टी,अजय गावडे,सुरेश पुंगाटी,राकेश अग्गुवारसह गावातील शेतकरी तसेच स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरक्षाबलों ने हाल ही में छत्तीसगढ़ के बीजापुर में तेलंगाना सीमा पर नक्सलियों के खिलाफ बड़ी कार्रवाई को अंजाम दिया था। इस दौरान 16 जनवरी को हुई मुठभेड़ में 12 हार्डकोर माओवादियों को ढेर कर दिया था। जिसमें से 5 महिला और 7 पुरुष नक्सली थे। यह मुठभेड़ करीब 13 घंटों तक चली थी और इस ऑपरेशन को 3 हजार से ज्यादा जवानों ने अंजाम दिया था। अब नक्सलियों ने इस मुठभेड़ को लेकर एक नया खुलासा किया है।
दरअसल पुलिस ने इस मुठभेड़ में 12 नक्सलियों के मारे जाने का दावा किया था। लेकिन हाल ही में माओवादियों ने एक प्रेस नोट जारी कर इसमें 18 नक्सलियों के मारे जाने की बात कही है। नक्सलियों की ओर से जारी प्रेस नोट में कहा गया है कि इस मुठभेड़ में मोस्ट वांटेड नक्सली दामोदर उर्फ चोखा राव भी मारा गया है, जो कि कमांडर स्टेट कमेटी मेम्बर और तेलंगाना स्टेट कमेटी का चीफ था। साथ ही उस पर 50 लाख रुपए का इनाम भी घोषित था। इसके अलावा PPCM हुंगी, देवे, जोगा और नरसिंह राव भी मारे गए हैं।
बता दें कि इस मुठभेड़ में जवानों ने 12 नक्सलियों के शव बरामद किए थे, लेकिन नक्सलियों ने 18 माओवादियों के मारे जाने की जानकारी प्रेस नोट में दी है। मुठभेड़ के बाद सुरक्षाबलों ने मौके से आधुनिक हथियार, राकेट लॉन्चर, वायरलेस सेट और विस्फोट भी बरामद किए थे, जिनका उपयोग नक्सली हमेशा बड़े हमलों की तैयारी के लिए करते थे।
बस्तर के आईजी पी. सुन्दरराज ने बताया था कि यह मुठभेड़ पामेड़, बासागुड़ा और उसूर क्षेत्र के जंगलों में हुई थी। यह इलाका माओवादी गतिविधियों का गढ़ माना जाता है। सुरक्षाबलों को मुखबिर से सूचना मिली कि जंगल में नक्सलियों की मौजूदगी है। इसके बाद तीन जिलों सुकमा, बीजापुर और दंतेवाड़ा के हजारों जवानों ने इलाके को चारों ओर से घेर लिया था। ऑपरेशन में डीआरजी सुकमा, डीआरजी बीजापुर, डीआरजी दंतेवाड़ा और एसटीएफ कोबरा की 204, 205, 206, 208, 210 और CRPF की 229 बटालियन शामिल थीं।
शव और भारी मात्रा में हथियार हुए थे बरामद
मुठभेड़ के बाद मारे गए नक्सलियों के शवों को जिला मुख्यालय लाया गया था, इन नक्सलियों में PLGA बटालियन नंबर 1 और सेंट्रल रीजनल कमेटी (CRC) के सदस्य शामिल थे। सुरक्षाबलों ने नक्सलियों के शवों के पास से अत्याधुनिक हथियार और हथियार बनाने के उपकरण भी जब्त किए। जवानों को सूचना मिली थी कि मारुड़बाका और पुजारीकांकेर के जंगलों में भारी संख्या में हथियारबंद नक्सली छिपे हैं। सुरक्षाबलों ने इलाके की घेराबंदी कर ज्वाइंट ऑपरेशन को अंजाम दिया।