सेलू येथील लहान विद्यार्थिनीनी पोलिस कर्मचारी बांधवाना राखी बांधून रक्षा बंधन केले साजरे.
सेलू : दि.30 ऑगस्ट 2023 बुधवार रोजी सौ.सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेतील कब आणि बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांनी सेलू पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांच्या परवानगीने हा कार्यक्रम पार पडला. तसेच या कार्यक्रमाला पंजाब येथून व्हीजीटसाठी आलेले गुरमित सिंग, सुरेंद्र सिंग हेही उपस्थित होते. दामिनी पथक प्रमुख सौ.मोरे मॅडम, पो.हे.काँ. ममिलवाड, पो.हे.काँ. जाधव , पो.हे.काँ. मुंडे उपस्थित होते.हा कार्यक्रम घेण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक बेंडसुरे एस.डी. जेष्ठ शिक्षक रत्नपारखी ए. पी. व पांडे यु.जी.यांचे मार्गदर्शन लाभले. संचलन सौ.कुबरे एस.एस.यांनी केले.या कार्यक्रमासाठी महामुनी डी. पी. व सौ. कुंभार आर.डी. यांनी सहकार्य केले.