PostImage

News mh33 live

May 29, 2024   

PostImage

कुऱ्हाडीने 3 वेळा वार करून पतीने आपल्या पत्नीचे मुंडके केले …


कुऱ्हाडीने 3 वेळा वार करून पतीने आपल्या पत्नीचे मुंडके केले धडावेगळे

 

 

4 मुलींचे संसार आले उघड्यावर

 

 

*कोरची* :- तालुका मुख्यालयापासून 10 किलोमिटर अंतरावर असलेल्या बेतकाठी येथे रात्री 3 वाजताच्या दरम्यान पत्नी आणि 5 वर्षाची मुलगी झोपेत असताना पती रोहिदास बंजार याने आपल्या पत्नीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने 3 वेळा वार करून धडापासून मान वेगळी करून टाकली ही सर्व घटना 5 वर्षाची मुलगी बघत असताना तिला सुद्धा धमकावल्याची माहिती प्राप्त झाली असून आरोपी रोहिदास राऊत बंजार याला पोलिसांनी अटक केलेली आहे.

 

मृतक अमरोतीन बंझार (वय 33) आणि रोहिदास बंजार (वय 38) यांचे 2009 ला लग्न झाले व त्यांना 4 मुली असून नवव्या वर्गात असलेली सर्वात मोठी मुलगी ही घटनेवेळी छत्तीसगडला आपल्या मामाच्या गावी गेली होती व दोन मझव्या मुली हे आपल्या आजी कडे झोपून होते तर लहान मुलगी आरोपी रोहिदास व आपल्या आई सोबत झोपून होती.

 

यापूर्वी सुद्धा रोहिदास आपल्या पत्नीला मारझोड करतो म्हणून 4 वर्षापूर्वी बेतकाठी येथे गावात बैठक घेऊन त्याची समझूत सुद्धा काढण्यात आली होती परंतु कुठला तरी राग मनात धरून त्या नराधमाने आज आपल्या पत्नीला लहानश्या चिमुकलीच्या समोर अक्षरशः संपवून टाकल्यामुळे या 4 लहान मुलींचे संसार आता उघड्यावर आले असल्याचे दिसून येत आहे. 

 

घटनेनंतर आरोपी यांनी आपली कुऱ्हाड लपविली होती ती कुऱ्हाड कुठे लपविली ती त्या लहान चिमुकलीने पोलिसांना सांगितले व पोलिसांनी आरोपी रोहिदास यास अटक केली असून पुढील तपास पोलीस स्टेशन कोरची चे प्रभारी अधिकारी वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

 

काही महिन्यापूर्वी आरोपी हा बोअर चे काम करण्याकरिता दुसऱ्या जिल्ह्यात गेला होता तिथ त्याने आपल्याच मालकाला सुद्धा मारहाण केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.


PostImage

News mh33 live

April 29, 2024   

PostImage

सलाम! खाकी वर्दीचा रक्तदानासाठी पुढाकार; महाराष्ट्र दिनी शिबिराचं आयोजन


सलाम! खाकी वर्दीचा रक्तदानासाठी पुढाकार; महाराष्ट्र दिनी शिबिराचं आयोजन

 

आष्टी : 'पोलीस' म्हटलं की समाजाच्या संरक्षणासाठी दिवसरात्र राबणारी यंत्रणा, विना परवाना व्यावसायाला निर्बंध घालून सामाजिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी तत्पर असणारी यंत्रणा अशी सर्वसाधारण ओळख आहे. पण त्यापलीकडे ही आपले कर्तव्य आणि जबाबदारी ओळखून गडचिरोली पोलिस दलाच्या माध्यमातून आष्टी पोलिसांनी पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.

ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना आवश्यक वेळी तात्काळ रक्तपुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याची दखल घेत गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या माध्यमातून दिनांक १ मे रोजी पोलीस स्टेशन आष्टी येथे सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन सकाळी ८ वाजता करण्यात येणार आहे. परिसरातील नागरिकांना भविष्यात रुग्णालयात रक्ताची गरज भासल्यास इतरत्र फिरावे लागू नये यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक विशाल काळे यांनी सांगितले तसेच आष्टी परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करून रुग्णाचा जीव वाचवावा असे आवाहनही पोलिस निरीक्षक विशाल काळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आष्टी पोलिसांशी संपर्क साधून रक्तदात्यांनी आपले नाव नोंदणी करून घेण्याचे पोलिस स्टेशन आष्टी कडून आवाहन करण्यात आले आहे


PostImage

News mh33 live

April 9, 2024   

PostImage

पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाने हे पाऊल उचलल्याने मित्रांसह नातेवाइकांनाही …


 

 

आपल्या मित्राला दुरध्वनी ने केला फोन आणि सांगीतले की मी आत्महत्या करतोय

 

 आलापल्ली:+

 असे काय झाले की, त्याला टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करावी लागली हे कोडे आता पोलीसच उलगडणार असे चित्र दिसत आहे

मी आत्महत्या करत आहे, असा कॉल मित्रांना करून पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ७ एप्रिल रोजी रात्री येथील शंकरराव बेझलवार महाविद्यालयाजवळ ही घटना घडली.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, मोहन मोहुर्ले वय ३०, रा.रंगयापल्ली असे मृताचे नाव आहे. अहेरी येथील त्याची सासुरवाडी आहे. त्यामुळे तो अहेरीतच भाड्याने खोली घेऊन पत्नीसह राहत होता. पोलिस होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी तो तयारी करत होता. दरम्यान, कौटुंबिक कारणावरून मोहन मोहुर्ले

त्याचा पत्नीशी वाद होत असे. ७ एप्रिलला रात्री साडेदहा वाजता तो घराबाहेर पडला. गावालगतच्या शंकरराव बेझलवार महाविद्यालयाजवळील एका झाडास गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली.

 

तत्पूर्वी त्याने एका मित्राला फोन करून मी आत्महत्या करीत आहे, असे सांगितले. मित्राने समजावण्याचा प्रयत्न केला व तु कुठे आहेस असे विचारले असता मात्र त्याचे म्हणने न ऐकताच फोन कट केला मित्रांनी रात्री सर्वत्र शोध घेतला पण तो कुठेच आढळला नाही व आठ एप्रिल ला सकाळी महाविद्यालय जवळ असलेल्या झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले 

मोहन मोहुर्ले याने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाने हे पाऊल उचलल्याने मित्रांसह नातेवाइकांनाही हादरा बसला आहे.

 

 आत्महत्येची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे


PostImage

News mh33 live

March 15, 2024   

PostImage

घरकुलाच्या यादीत माझ्या जवळच्या लोकांची नावे समाविष्ट करा,नाहीतर तुम्हाला जगणे …


घरकुलाच्या यादीत माझ्या जवळच्या लोकांची नावे समाविष्ट करा,नाहीतर तुम्हाला जगणे मुश्किल करेल!

 

ग्रामपंचायत सदस्यानी दिली धमकी.

 

या प्रकरणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.

 

यवतमाळ:-यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या दारव्हा तालुक्यातील तरोडा येथील ग्रामपंचायत मध्ये घडलेला प्रकारामुळे महाराष्ट्रात खडबड उडाली आहे. माहितीनुसार सविस्तर वृत्त असे आहे की, दारवा तालुक्यातील तरोडा येथील ग्रामपंचायत मध्ये आपरेटर म्हणून कार्यरत असलेले जया लाभशेटवार यांना तेथील ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या शासनाच्या अनेक योजनेचे कागद शासनाच्या नियमानुसार व सरपंच व ग्रामसेवकांच्या आदेशावरून तयार करावे लागत असतात.असेच मी घरकुलाच्या नावाची यादी तयार करत असताना, तळोदा ग्रामपंचायतचे सदस्य प्रल्हाद बरडे व वर्षा बरर्डे माझ्याकडे घेऊन मला त्यांनी त्यांच्या जवळच्या लोकांचे नावे समाविष्ट करण्यास सांगितली. ती नावे अवैध असल्यामुळे मी ती नावे या घरकुलाच्या नावांच्या यादित समाविष्ट न केल्याने या ग्रामपंचायतीच्या सदस्य प्रल्हाद बरडे व त्यांची पत्नी वर्षा बरडे यांनी मला निश्चितच त्रास देणे सुरू केला. त्यांच्या या त्रासाला न जूमानता मी धाडसीने माझे काम सुरूच ठेवले.परंतू माझा सूड घ्यावा या उदात्त्य हेतूने त्यांनी त्यांच्या जवळील लोकांना सह्या घेऊन 26 जानेवारीला मी महामानवाच्या फोटोला चपला घालून माल्या अर्पण केली असा आरोप करून मला त्रास देणे सुरू केले.आता या त्रासाला कंटाळून मी दारव्हा येथे जाऊन तेथील पोलीस स्टेशनला तक्रार दिली. परंतु दारव्हा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी न केल्यामुळे त्यांचे हैसले बुलंद झाल्यामुळे, येणाऱ्या काळात माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी असे जया लाभसेटवार यांनी मागणी केली. सदर घटनेची चौकशी न झाल्यास यापुढे तिव्र भुमिका घेण्याच्या इशारा जया लाभसेटवार यांनी दिला आहे.


PostImage

News mh33 live

Feb. 23, 2024   

PostImage

आष्टी पोलिसांची धडक कारवाई देशी दारूची अवैध वाहतूक करणारे चारचाकी …


आष्टी पोलिसांची धडक कारवाई

 

 देशी दारूची अवैध वाहतूक करणारे चारचाकी वाहन पकडले ; २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त !

 

चामोर्शी : गडचीरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी चंद्रपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणत देशी - विदेशी दारूचा पुरवठा केला जात असल्याचे दिसून येत आहे. 

  दि.२२ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता गोंडपिपरी हून आष्टी मार्ग गडचीरोली जिल्ह्यात देशी दारूची वाहतूक करणारे वाहन आष्टी पोलिसांनी पकडले त्यामुळे अवैध देशी दारूची तस्करी करणारे मोठे रॅकेट असल्याची दाट शक्यता आहे.

 

 गोंडपिपरी -आष्टी मार्गावर एका चारचाकी वाहनाने अवैध देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती आष्टी पोलिस स्टेशनचे ठाणेदार कुंदन गावडे यांना मिळाली असता पोलीस सहकाऱ्यांना घेवून आष्टी आलापल्ली मार्गावर चौडामपल्ली रस्त्यावर पोलिस तैनात केले. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाची तपासणी करीत असताना एम एच ३४ ए ए ५३६८ क्रमांकाची चारचाकी वाहन भरधाव वेगाने येताना दिसताच अडवून तपासणी केली असतासदर वाहनात खाकी खरड्याच्या बॉक्स मध्ये २ पेट्या देशी दारूच्या सापडल्या ज्यावर रॉकेट देशी संत्रा प्रवरानगर डीस्टीलरी असे लाल रंगाने लिहलेले होते. खोक्यात ९० मिली मापाचे १०० टिल्लू दिसून आले. दोन खोक्यात मिळून एकूण २०० निपा सापडले. प्रति निप ज्याची अवैध किंमत ८० रुपये दराने १६००० रुपये व पांढऱ्या रंगाच्या चार चुंगडी मध्ये देशी दारूच्या २०० नीपा सापडल्या असे एकूण ८०० निपा प्रति नीपची अवैध किंमत ८० रू प्रमाणे ६४,००० रुपये असा एकूण ८० हजार रुपये व चारचाकी वाहनांची किंमत २ लाख रुपये असा एकूण २ लाख ८० हजाराचा मुद्देमाल आष्टी पोलिसांनी जप्त करत आरोपी सागर विलासराव चर्लावार वय ४२ वर्ष रा. गोंडपीपरी जी.चंद्रपूर यावर कलम( ६५ अ )महाराष्ट्र दारू कायदा नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक निलोत्पल,अप्पर पोलीस अधीक्षक चिंता सर, उपविभागीय पोलिस अधिकारी कोकोटे, 

यतिश देशमुख,यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलिस स्टेशनचे ठाणेदार कुंदन गावडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अतुल तराळे,राजू येंनगंटीवार,अतुल तोडासे ,राजूरकर,संतोष नागुलवार यांनी केली आहे.


PostImage

News mh33 live

Feb. 16, 2024   

PostImage

झोपेत असताना पत्नीची कुऱ्हाडीने पतीनेच केली निर्घृण हत्या


 

झोपेत असताना पत्नीची कुऱ्हाडीने पतीनेच केली निर्घृण हत्या

गोंडपिपरी तालुक्यातील खळबळजनक घटना

मध्यरात्रीच्या सुमारास दोन्ही मुले गावातील शेतकऱ्याकडे मजुरीसाठी कापसाची गाडी भरायला गेली असता झोपेत असलेल्या वेडगाव येथील लता दामोदर धुडसे( वय ४० वर्ष ) यांच्यावर पतीनेच वार करून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनगक घटना दि.(१६) शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजता घडली.
गावातील शेतकऱ्याकडे मजुरीसाठी मृतक लता धूडसे यांचे दोन्ही मुले कापूस भरण्यासाठी गेली व मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास घरी काम आटपून परतले असता त्यांची आई ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली बाजूला कुऱ्हाड देखील होती. आणि वडीलांचा शोध घेतला असता कुठेच आढळले नाही. फरार असल्याचे निदर्शनास आले.पत्नीवर आरोपी दामोधर मारोती धुडसे यांनी कुऱ्हाडीने  वार करून निरघुण हत्या केल्याचां अंदाज असून घडलेली माहिती गावकऱ्यांनी लाठी पोलिसांना दिली सकाळी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहे. आरोपीचा शोध लाठी पोलीस घेत आहे.हत्तेचे कारण गुलदस्त्यात असून पोलीस तपास करत आहे.


PostImage

News mh33 live

Feb. 11, 2024   

PostImage

कत्तलीसाठी तेलंगणात जाणाऱ्या ३२ जनावरांची सुटका सात जणांना अटक


कत्तलीसाठी तेलंगणात जाणाऱ्या ३२ जनावरांची सुटका 

 

सात जणांना अटक : गोंडपिपरी पोलिसांची कारवाई

 

गोवंशीय जनावरांची पायदळ तस्करी करणाऱ्या आरोपींना गोंडपिपरी पोलिसांनी दि.(९) शुक्रवारी सायंकाळी चार वाजता दरम्यान ३२ जनावरांची सुटका केली तीन लाख वीस हजाराचा माल जप्त करत याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली .

 

तेलंगणा राज्याची सीमा गोडपिपरी तालुक्याला लागून असल्याने छुप्या मार्गाने वाहनात कोंबून तर कधी पायदळ जनावरांची नेहमीच कत्तलीसाठी तस्करी होत असते.अशातच नव्याने रुजू झालेले ठाणेदार हत्तीगोटे यांना तस्करीची माहिती मिळताच सहकारी मनोहर मत्ते,गणेश पोदाळी,विलास कोवे,संजय कोंडेकर,विजय पवार या पोलिसांसह वढोली गाठून आरोपींना ताब्यात घेत जनावरांची सुटका केली.त्यानंतर १६ जनावरांना बोरगाव येथील कोंडवाड्यात तर उर्वरित १६ जनावरांना धाबा येथील कोंडवाड्यात पाठवण्यात आले.

 

मूल - वढोली विठ्ठलवाडा मार्गे गोवंशीय जनावरांची पायदळ वाहतूक करून आरोपी हे नंदवर्धन नदीघातातून जनावरांना डोंग्याला बांधून प्रवास करत तेलंगणात तस्करी करतात. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा प्राणी अधिनियम १९९५ च्या विविध कलमानुसार गोंडपिपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


PostImage

News mh33 live

Feb. 3, 2024   

PostImage

सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या, पती व सासु-सासऱ्याला अटक


सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या, पती व सासु-सासऱ्याला अटक

 

पिंपरी : नवीन फ्लॅट खरेदी करण्यासाठी माहेरहुन पैसे आणाण्यासाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला. सासरच्या छळाला कंटाळून महिलेने राहत्या घरात सिलींग फॅनला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरून सांगवी पोलिसांनी पती व सासु-सासऱ्याला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.1) दुपारी साडेबारा ते दोन या कालावधीत पिंपळे निलख येथील पंचशिलनगर येथे घडली. 

 

गायत्री किरण माने (वय-26 रा. मुद्रा हाईट्स, पंचशिलनगर, पिंपळे निलख) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मयत गायत्री यांचे वडिल खंडु उत्तम जाधव (वय-49 रा. शिवतीर्थनगर, थेरगाव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन सासु, सासरे परशुराम दिनकर माने, पती किरण परशुराम माने, नणंद यांच्यावर आयपीसी 306, 498 (अ), 323, 34 नुसार गुन्हा दाखल करुन पती, सास-सासऱ्याला अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 26 वर्षीय मुलीचे आरोपी किरण याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर आरोपींनी संगनमत करुन गायत्री हिने नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरहुन दोन लाख आणावेत यासाठी वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला अपमानित केले. तसेच तिला क्रुरपणे व हिनतेची वागणूक दिली. सासरच्या लोकांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून गुरुवारी (दि.1) राहत्या घरी बेडरूममध्ये सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गायत्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पती, सासु-सासऱ्यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खलाटे करीत आहेत


PostImage

News mh33 live

Feb. 3, 2024   

PostImage

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या 

 

 

गडचिरोली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलात खांदेपालट करण्यात आली आहे. राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने ३० जानेवारीला जारी केले. यात नक्षलप्रभावित गडचिरोलीमधील १० अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यांच्या जागी नवे अधिकारी येणार आहेत.

 

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्वजिल्ह्यात कार्यरत असलेल्या तसेच ३० जून २०२४ पर्यंत किंवा त्यापूर्वी चार वर्षांपैकी तीन वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या बदलीपात्र अधिकाऱ्यांची माहिती मागवली होती. यानुसार विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी १३० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले.

 

गडचिरोली पोलिस दलात कार्यरत पोलिस निरीक्षक संदीप पाटील, अमोल फडतारे यांची पिंपरी चिंचवड, प्रमोद बनबळे, अरविंदकुमार कतलाम यांची वर्धा, कपिल गेडाम राज्य गुप्त वार्ता विभाग, कुमारसिंग राठोड छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण), कुंदन गावडे सोलापूर शहर, संदीप मंडलिक नाशिक, श्याम गव्हाणे चंद्रपूर तसेच वादग्रस्त पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांची जालना येथे बदली करण्यात आली आहे.

 

रिक्त झालेल्या १० अधिकाऱ्यांच्या जागी नवे १० अधिकारी येणार आहेत. नागपूर शहर येथील अनिरुद्ध पुरी, विशाल काळे, रवींद्र नाईकवाड, विनोद रहांगडळे, विश्वास पुल्लारवार, छत्रपती संभाजीनगर शहर येथील चंद्रकांत सलगरकर, सोलापूर शहरचे विनोद वाबळे, अजय जगताप, पिंपरी चिंचवड येथील दशरथ वाघमोडे, ठाणे शहरचे अतुल लंबे यांना गडचिरोली जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आली आहे


PostImage

News mh33 live

Jan. 26, 2024   

PostImage

चालक बसलेल्या सिट खालून साप बाहेर निघाला, ट्रॅक्टर पलटी होऊन …


चालक बसलेल्या सिट खालून साप बाहेर निघाला, ट्रॅक्टर पलटी होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला 

 

 

 

किल्लेधारूर : ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर चालक बसलेल्या सिटाखाली साप निघाल्यामुळे चालकाचा ताबा सुटून ट्रॅक्टर पलटी झाले . झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.२५) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास धारूर शहरापासून हाकेच्या अंतरावर केज रोडवर घडली. बळीराम रघुनाथ नाईकवाडे वय २७ वर्षे रा.घागरवाडा असे मयत चालकाचे नाव आहे .

 

 

तालुक्यातील घागरवाडा येथील बळीराम नाईकवाडे हे स्वतःचा ऊस एम एच . १९ ए आर या ट्रॅक्टरच्या माध्यमातून येडेश्वरी कारखान्यास नेहण्यात येत होता . सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर धारूर शहरापासून हाकेच्या अंतरावर हजारी पेट्रोल पंपाजवळ चालक बसलेल्या सिट खालून साप बाहेर निघाला . साप दिसतात चालक गोंधळून गेल्यामुळे त्याचा स्टेरिंगवरील ताबा सुटला . यावेळी उसासह ट्रॅक्टर पलटी झाला . चालकाच्या अंगावर ट्रॅक्टर हेड पडले . यात डोक्याला गंभीर मार लागला होता . या अपघातात चालक बळीराम नाईकवाडे यांचा जागीच मृत्यू झाला . यावेळी साप मात्र त्या ठिकाणी होता . घटनास्थळी जमलेल्या नागरिकांना साप दिसल्यानंतर त्यास मारण्यात आले . अपघातामुळे ऊस रस्त्यावर पडला होता . पोलिसांनी पंचनामा करून वाहतुकीला अडथळा येत असल्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला करण्यात आला . चालकाची नंतर उत्तरीय तपासणीसाठी शव ग्रामीण रुग्णालयात पाठण्यात आले.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 24, 2024   

PostImage

पैशाच्या हव्यासापोटी काकूने दोन चिमुकल्या पुतण्यांना विष देऊन केले ठार


पैशाच्या हव्यासापोटी काकूने दोन चिमुकल्या पुतण्यांना विष देऊन केले ठार

 

 

 

 बीड:- 

एका लालची काकुने आपल्याच दोन चिमुकल्या पुतण्यांना विष देऊन ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे घटनेनंतर बीड गावात संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

पोलिसांनी आरोपींला बेड्या ठोकल्या असून 20 दिवसांनंतर पोलिसांनी हत्येचा उलगडा केला आहे. तनूजा वय 2 वर्ष किशोर अमोल भावले वय 13 महिने अशी मृत बालकांची नावे आहेत. स्वाती उमाजी भावले असं आरोपी काकूचे नाव आहे.

 

 

प्राप्त माहितीनुसार, ही खळबळजनक घटना 29 डिसेंबर 2023 रोजी घडली होती. गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथील तनुजा आणि किशोर या दोन भांवडाची पूर्व वैमनस्यातून हत्या केल्याचे समोर आले आहे. 29 डिसेंबरच्या दुपारी अचानक उलट्या सुरु झाल्यानंतर दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांवर वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. किशोरला बीडच्या रुग्णालयात तर तनुजाला छत्रपती संभाजीनगरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी दोघांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

 

या प्रकरणात सुरुवातीला तलवाडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. काही दिवसांनी ही घटना हत्येची असल्याचे समोर आले. पोलिसांनी घरात चौकशी सुरु केली आणि तपास करीत असताना त्यांना आरोपींचा शोध लागला

 काही महिन्यांपूर्वी शेजारी राहणाऱ्या सखुबाई ज्योतीराम भावले हिने आरोपी स्वाती हिचा सासरा सुखदेव भावले याने माझी लेक वैशाली हिला नांदु दिले नाही म्हणून तिने बदला घेण्याचा चंग बांधला होता. त्यांनी बदला घेण्यासाठी सुखदेव ची सुन स्वाती हिला चार लाख रुपयांचे व त्या घरची मालकीण होण्याचे स्वप्न दाखविले तुने तुझ्या पुतण्यांना ठार केल्यास कुनालाही संशय येणार नाही असीही खात्री दिली त्यामुळे सखुबाई च्या आमिश्याला बळी पडून स्वातीने आपल्या दोन लहान चिमुकल्या पुतण्यांना उंदिर मारण्याचे औषध चाटविले

 असे पोलीस चौकशीतून निष्पन्न झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना ताब्यात घेतले आहे.

 

 

 सखुबाई भावले आणि स्वाती भावले या दोघींनी संगनमताने कट रचला आणि 29 डिसेंबर 2023 रोजी दुपारच्या सुमारास सखुबाई हिने आणून दिलेले उंदिर मारण्याच्या व्यूबमधील औषध स्वाती हिने बोटाने काढून तनुजा आणि किशोर या दोघांना चाटविले, त्यानंतर त्यांना उलव्या झाल्या आणि उपचारा सुरू असतांना दोघांचा मृत्यू झाला. अशी तक्रार मयत मुलांचे वडिल अमोल सुखदेव भावले यांनी तलवाडा पोलिस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून सखुबाई भावले, स्वाती उमाजी भावले यांच्याविरूध्द कलम 302, 102-ब, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


PostImage

ट्रेन लाईव्ह न्यूज

Jan. 20, 2024   

PostImage

पाचोर्‍यात दरोडा! अरे बापरे 7,20,000 लुटले,


पाचोरा शहरातील स्टेट बँक कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी घराची मागील खिडकी तोडून घरात प्रवेश करत 7 लाख 21 हजारांची चोरी करत घरातून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे,
 
   घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले, घराचा संपूर्ण परिसराची त्यांनी पाहणी केली, डॉग पथकाने देखील चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तसेच फिंगर प्रिंट्स घेणारे  पथक देखील थोड्याच वेळात दाखल होत आहेत. पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, पोलीस राहुल बेहेरे, पोलीस प्रकाश शिवदे, पोलीस सचिन पवार, पोलीस सुरेश राजपूत, आदीं चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.


दि. 20 जानेवारी 2024 रोजी रात्री 2 वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील स्टेट बँक कॉलनी भागातील दिनेश तावडे यांचे  घर नं. 15 या घरात त्यांचे संमतीवाचुन कोणीतरी अज्ञात इसमाने घराचे बेडरुमच्या मागील खिडकीचे लोखंडी गज कापुन घरात प्रवेश करुन बेडरुममधील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडुन लॉकरमध्ये ठेवलेले एकुण 7,21,000 रु किंमतीचे 23 तोळे 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व कागदपत्रे तसेच पॅन्टचे खिशातील रोख 7000 रक्कम. असे घरफोडी चोरी करून नेले असल्याने पाचोरा पोलिसात आज दिनांक 20 जानेवारी 2024 शनिवार रोजी अज्ञात इसमांविरुद्ध दिनेश तावडे वय 40 यांचे फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहेत,


PostImage

News mh33 live

Jan. 19, 2024   

PostImage

जालना रेल्वे स्थानकावर रेल्वे स्टेशन वर धावत्या रेल्वे समोर उडी …


 

जालना रेल्वे स्थानकावर रेल्वे स्टेशन वर धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन एका 40 वर्षीय इसमाची आत्महत्या.

 

ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान..

 

 

 

Ancher- आज दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 7;40 च्या दरम्यान धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की जालना रेल्वे स्थानकावरून मनमाड धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस ही आपल्या ठरवलेल्या वेळेप्रमाणे मार्गस्थ झाली त्याचवेळी या अनोळखी इसामाने प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर आलेल्या मराठवाडा एक्सप्रेस समोर उडी घेत आपली जीवन यात्रा संपवण्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे , या घटनेची माहिती तात्काळ रेल्वे पोलिसांना मिळतात त्यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह रेल्वे रुळावरून बाजूला करून तपासणी केली असता या मताच्या खिशात कुठल्याही प्रकारचा ओळखीचा पुरावा आढळून आला नाही मात्र या इसामाने आत्महत्या का केली या हिसामाचे नाव काय हे शोधणे आता रेल्वे पोलीस व पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे टाकले आहे तरी जे कोणी या व्यक्तीला ओळखत असेल त्यांनी जालना रेल्वे पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन रेल्वे पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.


PostImage

news today24.Com.

Nov. 5, 2023   

PostImage

उसाच्या शेतात बाळाला जन्म देऊन आई फरार


 

उसाच्या शेतात बाळाला जन्म देऊन आई 

बाळाला जन्म देऊन त्याची आई फरार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले,अन् त्यांनी बालकाला बजाजनगर येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

 

गंगापूर : गंगापूर तालुक्यातील एकलेहरा येथील उसाच्या शेतात बाळाला जन्म देऊन निर्दयी आई फरार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पुरूष जातीचे अर्भक जखमी अवस्थेत शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना आढळून आले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे फौजदार संदीप शिंदे, गणेश गिरी, महिला पोलीस कर्मचारी संगीता वैद्य यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत नवजात बालकाला सुरक्षितपणे बजाजनगर येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

 

पोलिसांनी घेतली घटनास्थळी धाव : एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या एकलेहरा येथील अनिल शिंदे यांच्या मालकीच्या शेतामध्ये नवजात अर्भक रडत असल्याचा आवाज शेजारील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना आला. ही माहिती शेतमालक अनिल शिंदे यांना देण्यात आली. अनिलनं पुढं होऊन पाहणी केली असता, एका सिमेंटच्या टाकाऊ गोणीच्या पोत्यावर नुकतंच जन्मलेले अर्भक त्याला दिसलं. अनिल यांनी तत्काळ ही माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भकाला पोलीस व्हॅन मधून बजाजनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

 

पोलीस बनले पालक : घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नवजात बाळाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असता बाळाच्या गळ्यावर, पायावर आणि डाव्या हाताच्या मनगटावर किरकोळ जखमा असल्याचं आढळून आलं.पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी बाळासाठी दोन जोडे ड्रेस, पांघरून, दूध आणि औषधी खरेदी केली. दूध पाजताच बाळ शांत झालं. यावेळी खाकी वर्दीच्या आतील माणुसकी पाहून रुग्णालयातील नागरिक आवक झाले.

 

ऊसाच्या शेतालगतच महिलेची प्रसूती : पोलिसांनी परिसराची बारकाईनं पाहणी केली असता ज्या ठिकाणी बाळ आढळून आलं त्या ठिकाणापासून अवघ्या काही अंतरावर रक्त सांडल्याचं दिसलं. त्यावरूनच पोलिसांनी सदरील मातेची या ठिकाणी प्रसूती झाली असावी असा अंदाज वर्तविला आहे. तुर्तास सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येनार आहे

 


PostImage

Rohit

Oct. 16, 2023   

PostImage

12 समृद्धि एक्सप्रेस-वे पर मिनी बस के कंटेनर से टकराने …


पुलिस ने कहा कि महाराष्ट्र के छत्रपति संभाजीनगर जिले, जिसे पहले औरंगाबाद के नाम से जाना जाता था, में समृद्धि एक्सप्रेसवे पर रविवार तड़के एक तेज रफ्तार मिनी बस एक कंटेनर से टकरा गई, जिसमें कम से कम 12 लोगों की मौत हो गई और 23 अन्य घायल हो गए। एक अधिकारी ने समाचार एजेंसी पीटीआई को बताया कि निजी बस में 35 यात्री यात्रा कर रहे थे।यह दुर्घटना मुंबई से लगभग 350 किलोमीटर दूर जिले में एक्सप्रेसवे के वैजापुर इलाके में रात करीब 12.30 बजे हुई। बस चालक ने पहियों पर नियंत्रण खो दिया। अधिकारी ने बताया कि परिणामस्वरूप, बस पीछे की ओर से कंटेनर से टकरा गई। बारह यात्री मारे गये। मृतकों में पांच पुरुष, छह महिलाएं और एक नाबालिग लड़की शामिल है। अधिकारी ने कहा कि 23 अन्य को चोटें आईं और उन्हें एक सरकारी अस्पताल में भर्ती कराया गया। समाचार एजेंसी एएनआई ने पुलिस के हवाले से बताया कि टेंपो नासिक से तीर्थयात्रियों के एक समूह को छत्रपति संभाजीनगर जिले में बाबा तीर्थ तीर्थ स्थल ले जा रहा था। हादसा उस वक्त हुआ जब टेंपो दर्शन के बाद नासिक लौट रहा था।

पुलिस के हवाले से कहा गया है, "इस दुर्घटना में घायल हुए 17 लोगों का इलाज औरंगाबाद के वैली अस्पताल में चल रहा है, बाकी छह घायल लोगों को वैजापुर के ग्रामीण अस्पताल में इलाज के लिए भेजा गया है और इस दुर्घटना में 12 लोगों की मौत हो गई।"


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 23, 2023   

PostImage

शहरात मेरी माटी मेरा देश अंतर्गत रॅली


 पोलिस विभाग व भैय्यु महाराज विद्यालयांचा सहभाग

        चिमूर पोलीस व संत भय्यूजी महाराज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांने मेरी माटी मेरा देश अंतर्गत या कार्यक्रमाच्या अनुसंघाने शहरातील वडाळा - चिमूर या मुख्य मार्गाने बुधवार ला रॅली काढली.
        ९ ऑगस्ट क्रांती दिनाचे पर्वावर मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आले होते दरम्यान चिमूर शहरातील पोलिस विभाग व संत भय्यु महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शहरातील मुख्य मार्गाने रॅली काढून हुतात्मा स्मारक येथे रॅलीची सांगता करन्यात आली दरम्यान हुतात्मा स्मारकातील शहीदांना अभिवादन करण्यात आले यावेळी पोलिस निरीक्षक मनोज गभणे, पोलीस अधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी विद्यार्थी आदी उपस्थीत होते.


PostImage

Sonali Chandekar

Aug. 11, 2023   

PostImage

अकोल्यात दगडाने ठेचून युवकाचा खून!


अकोला येथे तरुणाची हत्या. अकोलाचे जुने शहर पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत हिंगणा फाट्यावर आला या तरुणाचा आरंभ.शेख फारुख शारुख असे मृत तरुणाचे नाव आहेत. यानंतर शाब्दिक बाचाबाची आणि वाद विकोपाला गेला. या शस्त्राने शारुखच्या दगडावर वार केलास्त्राव फारुखची घटना घडली आहे.पोलिसांनी या चाचणीनंतर एका व्यक्तीला एकत्र जोडले आहे. अकोला सत्ताधारी वयोवृद्ध अभियानाचा धाक नसताना आज पुन्हा घडली असून, यातून सुटका उभारली आहे. मृतक तरुण (30)अशी या ओळखीची माहीती जुने शहर समालोचक अधिकारी लेव्हरकर पोलिसी दला घटनास्थळी आहेत.