Gadchiroli News: गडचिरोली तालुक्यातील दिभना येथे 24 नोव्हेंबर रोजी एका तरुणाचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. आता या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे. विवेक पुंडलिक भरडकर (वय 35) या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाइलमध्ये एक व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्याच्या व त्रासाच्या कारणावरून आत्महत्येस प्रवृत्त होत असल्याचे सांगितले.
विवेक हा गोगाव (ता. गडचिरोली) येथील रहिवासी होता आणि गवंडी काम करायचा. 2013 साली त्याचा विवाह चंद्रपूर जिल्ह्यातील निमगाव येथील अल्का हिच्यासोबत झाला. लग्नानंतर काही काळ त्यांचे आयुष्य सुखकर गेले, मात्र नंतर कौटुंबिक कारणांवरून वाद होऊ लागले. यामुळे काही काळ अल्का माहेरी राहू लागली. नातेवाईकांनी समजावल्यानंतर ती पुन्हा सासरी परतली, पण समस्या संपल्या नाहीत.
16 नोव्हेंबर 2024 रोजी पती-पत्नीत जोरदार वाद झाला. त्यानंतर विवेक कामानिमित्त बाम्हणी येथे गेला, मात्र तो परतलाच नाही. 24 नोव्हेंबरला त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. आत्महत्येपूर्वी विवेकने आपल्या मोबाइलमध्ये एक व्हिडिओ बनवला, ज्यामध्ये त्याने पत्नी सतत चारित्र्यावर संशय घेत असल्याचा व तिच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे.
या व्हिडिओच्या आधारे विवेकचे वडील पुंडलिक भरडकर यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 25 डिसेंबरला भारतीय न्यायसंहितेच्या कलम 108 अंतर्गत विवेकच्या पत्नीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक दीपक मोहिते करत आहेत.
ही घटना समाजातील कौटुंबिक संघर्षांमुळे होणाऱ्या गंभीर परिणामांची जाणीव करून देते. विवेकच्या आत्महत्येने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत आणि या प्रकरणाने सर्वांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले आहे.
गडचिरोली -
महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेल्या सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील बोरगावात 'आधार सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान' च्या वतीने दरवर्षी'आधार साहित्य स्पर्धा' घेण्यात येते. व मराठी साहित्यिकांना त्यांच्या उत्कृष्ट साहित्य निर्मीतीसाठी 'आधार उत्कृष्ट साहित्य पुरस्काराने' पुरस्कृत करण्यात येते. व विजेत्या नऊ नवरत्नांना (साहित्यिकांना) नामवंत साहित्यिकांचे हस्ते सन्मानित करण्यात येते. आधार प्रतिष्ठान च्या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे.
महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात विशेष मानाचा समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराकरीता नाट्य वाड्.मय प्रकारात यावर्षी झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या 'महापूजा' या महानाट्याची उत्कृष्ट नाट्यसाहित्य अंतर्गत 'आधार साहित्य पुरस्कार - २०२४' साठी निवड करण्यात आली.
दि. २३ डिसेंबरला सांगली जिल्ह्यातील बोरगाव ग्राम पंचायत च्या व्यासपीठावर झालेल्या भव्यदिव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष देवदत्त राजोपाध्ये (संस्थापक, अ.भा.म.सा.प. शाखा विटा) व संभाजी पाटील (माजी सभापती, पं.स. तासगाव) यांचे हस्ते, नवनाथ पाटील(भाजप अध्यक्ष विसापूर सर्कल),अशोक पाटील (अध्यक्ष, आधार प्रतिष्ठान), श्रीपाद जोशी (संचालक, आधार प्रतिष्ठान), संजय पाटील (माजी उप सरपंच, बोरगाव), वर्षा पाटील(माजी सदस्य, जि. प. सांगली), दीपाली पाटील (ग्रा.पं. सदस्य, बोरगाव), प्रा. सुनील लाड (स्पर्धा प्रमुख) यांच्या उपस्थितीत या वर्षातील दर्जेदार साहित्यिकांना सन्मानित करण्यात आले. त्यात झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनाही त्यांच्या 'महापूजा अर्थात महासती सावित्री' या नाटकाचे लेखनासाठी "आधार उत्कृष्ट वाड्.मय पुरस्कार -२०२४" या पुरस्काराने सपत्नीक गौरविण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, विजेते साहित्यिक व गावकरी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा.अर्चना लाड यांनी केले.
'महापूजा' हे संपूर्ण झाडीपट्टीत गाजलेले महानाट्य असून या महानाट्याचे १०० च्या वर प्रयोग झालेले आहेत .
-------------------------------------------
विशेष म्हणजे 'महापूजा' नाटकास नुकतेच संत्रा नगरी, नागपूर येथील 'साहित्य विहार' या संस्थेतर्फे राज्यस्तरीय उत्कृष्ट वांड्.मय पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले असून या नाटकास मिळालेला यंदाचा हा दुसरा पुरस्कार आहे. यामुळे संपूर्ण झाडीपट्टीची मान उंचावली आहे.
----------------------------------------------
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, प्रा. अरुण बुरे, योगेश गोहणे, प्रा. यादव गहाणे, प्रा. डॉ. श्याम मोहरकर, प्रा. डॉ. जनबंधू मेश्राम,प्रा. डॉ. योगीराज नगराळे, प्रा.डॉ. राजकुमार मुसणे, डॉ. दिपक चौधरी, रमेश निखारे, नाट्यश्रीचे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, राजेंद्र जरुरकर, प्रा. नवनीत देशमुख(साहित्यिक), मधुश्री प्रकाशनचे प्रकाशक पराग लोणकर, व इतर साहित्यिक व कलावंतांनी अभिनंदन केले आहे.
Manmohan Singh: भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या कालावधीत भारताचे पंतप्रधान म्हणून कार्यरत होते. भारतात अर्थक्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या डॉ. सिंग यांच्या निधनाने देशभर शोककळा पसरली आहे.
२००४ साली मनमोहन सिंग पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना ‘ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ म्हटले गेले. परंतु एरवी गप्प राहणाऱ्या डॉ. सिंग यांनी ते एक सर्वोत्तम पंतप्रधान होते याची नोंद इतिहासात केली. मनमोहन सिंग यांनी केवळ देशाच्या आर्थिक उन्नतीवर लक्ष केंद्रित केले नाही, तर त्यांनी सुरू केलेल्या सामाजिक सुरक्षेच्या अनेक योजना कालजयी ठरल्या. देशाला विकासाच्या रस्त्यावर पुढे घेऊन जाईल, असे महत्त्वाचे साधन म्हणजे शिक्षण, हे ते जाणून होते, म्हणून त्यांनी सहा ते चौदा या वयोगटातल्या प्रत्येक मुलाला शिक्षणाचा मौलिक अधिकार मिळवून दिला. सर्व काही पारदर्शक असेल तर लोकशाही मजबूत होईल, असा त्यांचा विश्वास होता; म्हणून त्यांच्या सरकारने सामान्य माणसाला माहितीचा अधिकार दिला.
कोणी भूकबळी ठरू नये यासाठी खाद्यसुरक्षा कायदा त्यांनी केला. भूसंपादन कायदा तसेच वनअधिकार कायदा ही सुद्धा त्यांच्या कार्यकाळाची देणगी आहे. प्रत्येक ग्रामीण परिवाराला वर्षातून कमीत कमी १०० दिवस काम देण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिनियम त्यांच्या सरकारने आणला. त्यालाच आता मनरेगा या नावाने ओळखले जाते. जगातली ही अनोखी अशी रोजगार योजना आहे. गर्भावस्थेपासून माता आणि बाळाची काळजी घेणारी इंदिरा गांधी मातृत्व योजना त्यांनी आणली. आर्थिक मदत आणि अन्य सामुग्रीची व्यवस्था त्यातून केली गेली.
दिल्ली, कर्नाटकातील बेळगाव येथे सुरू असलेल्या दोन दिवसीय काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला काँग्रेसने नव-सत्याग्रह बैठक असे नाव दिले असून, संविधानाच्या मुद्यावरून भाजपविरोधातील हल्लाबोल आणि प्रचार सुरूच राहणार असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, भाजपच्या राजवटीत संविधान संकटात आहे. भाजप देशातील सर्व घटनात्मक संस्था नष्ट करत आहे. मात्र, काँग्रेसचे संविधान आणि या संस्था वाचवण्याचा संघर्ष शेवटच्या खासदारापर्यंत सुरू राहणार आहे. खर्गे म्हणाले की, त्यांना गांधी-नेहरूंचा वारसा आहे. काँग्रेस आपला प्रचार सुरूच ठेवणार आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या या बैठकीला खर्गे यांच्यासह काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह देशभरातील २०० प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र, प्रकृती अस्वस्थ्यामुळे यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी या कार्यक्रमाला हजर राहिल्या नाहीत. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधीही या बैठकीला हजर राहिल्या नाहीत.
नकाशावरून वाद
येथे उभारण्यात आलेल्या पोस्टरवर असलेल्या भारताच्या नकाशावरून वाद निर्माण झाला आहे. हा नकाशा काँग्रेसने तयार केल्याचे भाजपने म्हटले आहे. त्यात काश्मीरचा भाग कापलेला दाखविण्यात आला आहे. यामध्ये अक्साई चीन आणि पाकव्याप्त काश्मीर दाखवण्यात आलेले नाही. यावरून काँग्रेस देशाच्या अखंडतेला प्राधान्य देण्याऐवजी तुष्टीकरणाला महत्त्व देते हे स्पष्ट होते. भाजपचे राज्यसभा सदस्य सुंधाशु त्रिवेदी म्हणाले की, काँग्रेस किंवा त्यांच्या नेत्यांनी चुकीचा नकाशा दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही.
निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालला आहे
भाजपला सर्व घटनात्मक संस्था काबीज करायच्या आहेत, असे खर्गे म्हणाले. ज्याप्रकारे त्यांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे. या सरकारला सर्व घटनात्मक संस्थांवर एकसारखे वर्चस्व हवे आहे. जे कोर्टाने सांगितले आहे ते सांगितले पाहिजे. ते म्हणाले की, लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास हळूहळू कमी होत आहे.
गडचिरोली : तालुक्यातील दिभना येथे२४ नोव्हेंबर रोजी एका तरुणाचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळला होता. एका महिन्यानंतर या प्रकरणात नवा द्विस्ट आला. पत्नी सतत चारित्र्यावर संशय घेत असल्याने आत्महत्या करत असल्याचा मृताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सासऱ्याच्या फिर्यादीवरुन आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सुनेविरुध्द २५ डिसेंबरला गडचिरोली ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
विवेक पुंडलिक भरडकर (३५, रा. गोगाव ता. गडचिरोली) असे मयताचे नाव आहे. तो गवंडीकाम करायचा. २०१३ मध्ये त्याचा विवाह निमगाव (जि. चंद्रपूर) येथील अल्का हिच्याशी
झाल्या. लग्नानंतर काही दिवस सुखात गेले, नंतर पती पत्नीत कौटुंबिक कारणावरुन खटके उडू लागले. यातून काही दिवस ती माहेरी राहत होती. नातेवाईकांनी समजावल्यानंतर ती परत नांदण्यास आली. दरम्यान, १६ नोव्हेंबर २०२४ रोजी पती-पत्नीत वाद झाला. १७ नोव्हेंबरला रोजी तो बाम्हणी येथे बांधकामावर कामासाठी गेला. नंतर तो परतलाच नाही. २४ नोव्हेंबरला त्याचा मृतदेह आढळला. विवेकने १७ नोव्हेंबरला आपल्या
मोबाइलमध्ये एक व्हिडिओ बनवला होता. त्यात त्याने पत्नी सतत चारित्र्यावर संशय घेते, तिच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे, असे म्हटले होते. या व्हिडिओआधारे पुंडलिक भरडकर यांच्या फिर्यादीवरुन गडचिरोली ठाण्यात आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १०८ अन्वये गुन्हा नोंद झाला. तपास उपनिरीक्षक दीपक मोहिते करत आहेत.
🟠दोन मुली प्रेमाला पारख्या
अल्का व विवेक यांना काव्या व त्रिशा अशा दोन मुली आहेत. कौटुंबिक कलह व संशयातून वडिलांनी आत्महत्या केली, या गुन्ह्यात आईवर गुन्हा नोंद झाला. त्यामुळे या दोन्ही मुली प्रेमाला पारख्या झाल्या आहेत.
आरोपीच्या मोबाईल, लॅपटॉपमधील डेटा कॉपी करण्यास नकार
दिल्ली, वृत्तसंस्था. नागरिकांच्या गोपनीयतेचा सन्मान करा, असे निर्देश देत सर्वोच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयासाठी (ईडी) लक्ष्मणरेखा आखून दिली आहे. संशयित आरोपीच्या फोन किंवा लॅपटॉपमधील डेटा कॉपी करण्यास आणि खासगी वस्तूंना हात लावण्यास सर्वोच्च न्यायालयाने ईडीला मनाई केली आहे. 'लॉटरी किंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सँटियागो मार्टिन याच्या प्रकरणाच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने हे महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. फ्यूचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडने राज्यातील लॉटरी व्यवसाय बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप मेघालय पोलिसांनी केला होता. मेघालय पोलिसांच्या तक्रारीनंतर ईडीने सहा राज्यातील २२ ठिकाणींवर छापेमारी केली होती. यात १२.४१ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती.
काय आहे प्रकरण?
फ्यूचर गेमिंग ही कंपनी सैंटियागो मार्टिनची असून त्याने २०१९ ते २०२४ या काळात १३६८ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी करत राजकीय पक्षांना निधी दिला होता. यातून तृणमूलला सर्वाधिक ५४२ कोटी, द्रमुकला ५०३ कोटी, काँग्रेसला १५४ कोटी
गोपनीयतेचा भंग
मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये कार्यालयीन व खासगी गोपनीय माहितीही असते. ईडी किंवा तपास यंत्रणांनी ही माहिती कॉपी केल्यास गोपनीयतेचा भंग होतो, असा युक्तीवाद करण्यात आला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सँटियागो मार्टिनच्या मोबाईल फोन आणि त्याच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील कोणताही डेटा कॉपी करू नये अशी तंबी ईडीला दिली.
आणि भाजपला १०० कोटींची देणगी मिळाली होती. १३ डिसेंबर, २०२४ रोजी न्यायमूर्ती अभय एस. ओक आणि न्यायमूर्ती पंकज मित्तल यांच्या खंडपीठाने फ्यूचर गेमिंग प्रकरणाची सुनावणी इतर प्रकरणांसह होईल असा निर्णय दिला होता.
मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची मागणी
फ्यूचर गेमिंगच्या याचिकेमध्ये सूचीबद्ध केलेल्या ४ प्रकरणांमध्ये अॅमेझॉन इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी ईडीच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या मागणीला आव्हान देणारी याचिका आणि न्यूजक्लिकचा प्रकरणाचाही समावेश आहे. यात याचिकाकर्त्यांनी दिल्ली पोलिसांनी लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केल्याच्या प्रकरणालाही आव्हान दिले होते. याचिकाकर्त्यान आपल्या घटनात्मक आणि मूलभूत अधिकाराचे संरक्षण करण्याची मागणी केली होती.
भंडारा : एकीकडे शासनाकडून लाडकी बहीण योजना राबवून महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे तर दुसरीकडे मात्र लाडक्या बहिणींना सुरक्षित वातावरण देण्यास शासन असमर्थ ठरत असल्याचे चित्र आहे. परीक्षेत गुण वाढवून देण्यासाठी एका प्राचार्याने विद्यार्थिनींकडे चक्क शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील एका विद्यालयात उघडकीस आला आहे.
विद्यार्थिनींनी आक्रमक भूमिका घेत पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना विद्यालयात बोलावून घेतले आणि सर्वांसमक्ष प्राचार्याने केलेल्या गैरकृत्याचा भंडाफोड केला. त्यानंतर पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्राचार्याला चांगलेच चोपले. पोलिसांनी वेळेत पोहोचून प्राचार्यांना ताब्यात घेतले.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालयात एएनएम आणि जीएनएमच्या २०० विद्यार्थिनी प्रशिक्षण घेत आहेत. या विद्यालयाचे प्राचार्य किरण एस. मुरकुट हे वर्षभरापूर्वी विद्यालयात रुजू झाले. मागील काही महिन्यांपासून एएनएमच्या प्रथम वर्षाला असलेल्या विद्यार्थिनींना प्राचार्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत होती. प्राचार्य त्यांच्यासोबत गैरवर्तन करीत असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. एएनएमच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या पाच विद्यार्थिनी मागील वर्षी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली. या अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींची परीक्षा ५ व ६ नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आली. त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी प्राचार्य मुरकुट यांनी रात्री दोन विद्यार्थिनींना व्हॉट्सअॅपवर पेपर कसे गेले? याबाबत विचारणा केली. त्यावर विद्यार्थिनींनी ‘पेपर चांगले गेले मात्र निकालाची भीती वाटत असल्याचे’ प्राचार्यांना सांगितले. त्यावर प्राचार्यांनी ‘तुम्ही माझी मर्जी राखणार असाल तर मी तुम्हाला पास होण्यासाठी मदत करु शकतो’ असे सांगितले आणि ताबडतोब मॅसेज डिलिट केले. मात्र त्याचवेळी विद्यार्थिनींनी या मॅसेजेसचे स्क्रिनशॉट काढून पालकांना याबाबत माहिती दिली. हा संतापजनक प्रकार कळताच पालकांनी प्राचार्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली.
२६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता दरम्यान पीडित विद्यार्थिनी, संतप्त पालक, सामाजिक कार्यकर्ते प्राचार्याच्या कक्षात धडकून विचारणा केली असता प्राचार्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आधीच संतप्त पालकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्राचार्याला बेदम चोप दिला. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना अन्यायग्रस्त विद्यार्थिनींनी सांगितले की, प्राचार्याकडून त्यांना वारंवार अशाप्रकारे लज्जास्पद वागणूक दिली जात होती. विद्यार्थिनींचे संपर्क क्रमांक मागायचे, मात्र आम्ही त्यांना कधीही इतर मुलींचे संपर्क क्रमांक दिले नाही. या विद्यार्थिनींना त्यांच्याच सोबत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने प्राचार्य सांगतात त्या प्रमाणे वागले तर आपल्याला काहीही होणार नाही, असे बोलून धमकावत असल्याचेही यावेळी सांगितले. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी या विद्यालयातील विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकारही दडपण्यात आला होता.
यावेळी जिल्हा रुग्णालयाचे अनेक अधिकारी व शल्यचिकित्सक डॉ. दीपचंद सोयाम उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे, बाळू ठवकर, उमेश मोहतुरे, विनीत देशपांडे, सतीश सार्वे, विकास मदनकर, अजय मेश्राम, पवन वंजारी, अजित बन्सोड, राधेय भोंगाडे, आकाश ठवकर, रुपेश मारवाडे, मयूर सुर्यवंशी, जयंत बोटकुले, अमोल लांजेवार, मनोज लुटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विद्यालय प्रशासनाला धारेवर धरले. प्राचार्यांच्या कक्षाला सील ठोकण्यात आले
बहिणीला भेटून जाणाऱ्या भावाची ठरली अखेरची भेट
पिकअप च्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर एक गंभीर
प्रमोद झरकर/ उपसंपादक वैनगंगा वार्ता १९
आष्टी:- बहिणीला भेटून जाणाऱ्या भावाची अखेरची भेट ठरल्याची पोलीस स्टेशन अंतर्गत कन्नाळगाव जवळ पिकअप वाहनाने दुचाकीस्वार याला जबरदस्त धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर झाल्याची घटना काल दि २५ डिसेंबर ला सायंकाळी तिन ते चार वाजताचे सुमारास घडली.
मृतकाचे नाव रवी गुरुदास मडावी वय २७ रा. मलकापूर व गंभीर जखमी नितेश गोपिचंद शिडाम हे दुचाकी नंबर एम एच ३३ ई एल ७०३४ ने रवी मडावीच्या बहिणीला भेटायला
जामगीरी येथे गेले होते व भेटभलाई करुण मलकापूर कडे जाताना कन्नाळगाव जवळ समोरुन येणाऱ्या पिकअप क्रमांक एम एच ४० बि एल १२२३ ने जबरदस्त धडक दिली
त्यामध्ये रवी जागीच ठार झाला तर नितेश गंभीर झाला लागलीच घटनेचे गांभीर्य ओळखून पिकअप चालकाने आपल्याच वाहणात त्या दोघांनाही घेऊन चामोर्शी रुग्णालयात दाखल केले तेव्हा रवीला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर गंभीर जखमी नितेश याला गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी पाठविले
सदर अपघाताची नोंद आष्टी येथील पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा वनकर
हे करीत असून मृतदेह चामोर्शी रुग्णालयात असल्याने पंचनामा करून शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
मृतक बहीणीला भेटायला जाऊन परतीच्या प्रवासात असताना अचानक अपघातात मृत्यू झाल्याचं कळताच मलाकापूर येथे व जामगीरी येथे शोककळा पसरली.
फॉरवर्ड करणाराही दोषी ठरविणार
नागपूर: सोशल मिडियावर समाजात असे खोटे आणि द्वेष पसरवणाऱ्यांची आता खैर नाही. जो कोणी समाजविघातक, फेक पोस्ट करेल त्याच्यावर आणि फॉरवर्ड करणाऱ्यालाही दोषी ठरवून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नागपुरातील प्रेस क्लब येथे आयोजित परिषदेत दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तंत्रज्ञानाचा चांगल्या कामासाठी उपयोग न करता वाईट कामासाठी जास्त उपयोग होताना दिसून येत आहे. आजच्या घडीला सायबर गुन्हे ही सध्याची सर्वात आव्हानात्मकबाब आहे. तंत्रज्ञान झपाट्याने वाढत आहे, पण काही कुप्रवृत्तीचे लोक त्याचा अयोग्य वापर करत आहेत. ते लोकांची दिशाभूल करण्याचे काम करतात, खोटे वर्णन तयार करून दोन जातींमध्ये भेदभाव निर्माण करतात, पण आता सर्व गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
यासोबतच मुख्यमंत्र्यांनी अशा लोकांना सुधारण्याचे आवाहन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विदर्भ, राज्य, विकास, शेतकरी यासहविविध प्रश्नांवर भाष्य करत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी सायबर गुन्ह्याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सायबर गुन्हे हे सध्या सर्वात आव्हानात्मक आहे. झपाट्याने वाढत आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, 'सोशल मीडियाच्या माध्यमातून एडिट केलेले व्हिडिओ किंवा खोटे व्हिडिओ पसरवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशागुन्हेगारांवर अंकुश ठेवण्याचे काम सुरू आहे. सध्या आम्ही सर्वांना पकडण्यास सक्षम आहोत. सोशल मीडियाचा आमच्याकडे डिजिटल फुटप्रिंट आहे. जे काही केले जात आहे, ज्याच्या अंतर्गत पोस्ट आणि फॉरवर्ड कोणीही शोधले जाऊ शकते. यासोबतच आता चुकीच्या पद्धतीने पोस्ट करणारी व्यक्तीच नाही तर ती फॉरवर्ड करणारी व्यक्तीही दोषी असेल, असेही फडणवीस म्हणाले.
🟠बीड जिल्ह्यात कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी वक्तव्य केले. बीड जिल्ह्यात कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला. तसेच कुणीही बीड आणि परभणीचे पर्यटन करू नये, असेही फडणवीस म्हणाले.
आरमोरी : आरमोरी पोलिसांनी दिलेल्या प्राप्त माहितीनुसार, आरोपी खुशाल रंदये हा आपल्या घरी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधित तंबाखू विक्रीसाठी बाळगून असल्याची गोपनीय माहिती आरमोरी पोलिसांना न मिळाली. आरमोरी पोलिसांना र माहिती मिळताच आरोपीच्या घरी
पोलिसांनी एका सुगंधित तंबाखू विक्रेत्याच्या घरी धाड टाकून त्याच्याकडून ६९ हजार ७० रुपयांचा तंबाखू हस्तगत करून त्यास अटक केल्याची घटना २३ डिसेंम्बरला दुपारी २ ते २.३० वाजताच्या दरम्यान घडली. खुशाल संजय रंदये (१९) रा. राममंदिर वॉर्ड आरमोरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.
धडक देऊन त्याच्या घराची तपासणी केली असता पहिल्या खोलीत १२ हजार ४०० रूपये किमतीचे ईगल हुक्का शिशा तंबाखूचे सुगंधी तंबाखू असलेले प्रत्येकी २०० ग्रॅम वजनाचे ४० नग पॉकेट, १८ हजार ४० रूपये किमतीचे होला हुक्का शीशा तंबाखूचे प्रत्येकी २०० ग्रॅम
वजनाचे ११० नग पाकीट, २६८० रूपये किमतीचे निघाला हुक्का शीशा तंबाखूचे प्रत्येकी ४० ग्रॅम वजनाचे ४२० नग पाकीट, ११७०० रूपये किमतीचे मजा १०८ शीशा तंबाखूचे प्रत्येकी ५० ग्रॅम वजनाचे ५० नग असा एकूण ६९०७० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
याबाबत अन्नसुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन कार्यालय गडचिरोली येथील कर्मचारी सुरेश तोरेम यांनी आरमोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलीसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी. कैलास गवते, सपोनि. प्रताप लामतूरे, पो. हवा. विशाल केदार, पो.अं. सुरेश तांगडे, पोअं. हंसराज धस यांनी केली.
पाच लाख रुपयांची मोहफुल दारू व सडवा केला नष्ट
आरमोरी :आरमोरी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या घटनेत एकाच दिवशी दोन मोहफुल हातभट्टीवर धाड टाकून पाच लाख रुपयांची मोहफुल दारू व मोहफुल सडव्याची होळी करून नष्ट केल्याची कारवाई दिनांक २४ डिसेंम्बर रोजी दुपारी २ ते ५ च्या सुमारास आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथील वनतलाव व कोसरी डॅम जंगल परिसरात केली. ईश्वरदास देविदास खेडकर (४०) व कैलास विठ्ठल वाढणकर (३४) दोन्ही रा. देलनवाडी ता. आरमोरी अशी फरार आरोपींची नावे आहेत.
आरमोरी तालुक्यातील मौजा देलनवाडी वनतलाव परिसरात तसेच कोसरी डॅम परिसरात मोहफुल हातभट्टी सक्रिय असल्याची गोपनीय माहिती आरमोरी पोलिसांना मिळताच आरमोरी पोलीस पथक, पंच व मुक्तीपथ संघटनेचे पदाधिकारीयांनी मोहभट्टीवर धडक दिली असता ईश्वरदास खेडकर हा आरोपी देलनवाडी वन तलाव परिसरात अवैद्यरित्या मोहा दारू काढीत असल्याचे दिसून आला. पोलिसांनी ४ हजार रूपये किमतीची २० लिटर हातभट्टी मोहा दारू, २ लाख २५ हजार रूपये किमतीचे ४५ नग निळ्या रंगाचे १०० लिटर क्षमतेचे ४५०० लीटर मोहसडवा भरलेले प्लास्टिक ड्रम असा एकूण असाएकूण ०२ लाख २९ हजार रुपयांचा हातभट्टी मोहा दारू व मोहा सडवा मिळून आला. कोसरी डॅम येथील जंगल परिसरात आरोपी कैलास वाढणकर याची मोहभट्टी असल्याचे कळताच पोलिसांनी आपला मोर्चा तिकडे वळविला.
या ठिकाणावरून पोलिसांनी ०२लाख ६५ हजार रुपयांचा हातभट्टी मोहा दारू व मोहा सडवा जप्त केला. दोघाही आरोपिकडूनएकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल आरमोरीपोलिसांनी घटनास्थळी नष्ट करून वापरण्यात आलेल्या सर्व मालाची, प्लास्टिक कॅनांची होळी केली. फिर्यादीचे लेखी फिर्याद वरून दोन्ही फरार आरोपीवर म. दा. का. कलम ६५ (इ) नुसार गुन्हा दाखल केला.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी. कैलास गवते, सपोनि. प्रताप लामतूरे, पो. हवा. विशाल केदार, पो.अं. सुरेश तांगडे, पोअं. हंसराज धस यांनी केली.
गडचिरोली : राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठ महिन्यांपूर्वी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी म्हणून संजय दैने यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. वर्तमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची बदली केल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या सरकारने २४ डिसेंबरला काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. यात गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दैने यांचा देखील समावेश आहे. दैने आठ महिन्यांपूर्वी गडचिरोलीत रुजू झाले होते. परंतु कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली करून वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. अविशांत पांडा या तरुण अधिकाऱ्याच्या हाती गडचिरोलीची सूत्रे सोपविण्यात आली. या अनपेक्षित बदलामुळे राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे. मागच्या सरकारमध्ये शिंदे मुख्यमंत्री असताना दैने यांना संजया मीना यांच्या जागी जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेताच फडणवीस यांनी दैने यांची तडकाफडकी केलेली बदली चर्चेचा विषय ठरत आहे. यातून फडणवीसांनी शिंदेंना शह दिल्याचीदेखील चर्चा आहे.
गेल्या काही दिवसांपासून फडणवीस गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारणार, अशी चर्चा सुरू आहे. स्वत: फडणवीस यांनी बुधवारी नागपुरातील पत्रकार परिषदेत तशी इच्छा असल्याचेही सांगितले. दुसरीकडे, शिंदे हे देखील गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदासाठी उत्सुक आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची बदली करून फडणवीस यांनी आपणच गडचिरोलीचे पालकमंत्री होणार, असे संकेत दिल्याचेही म्हटले जात आहे.
येत्या काही काळात गडचिरोलीला ‘स्टील सिटी’ बनविण्याच्या हालचाली केंद्र आणि राज्य स्तरावर सुरू आहेत. अनेक कंपन्या येथे गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. ही प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी वाजनदार नेत्याला पालकमंत्रिपद देण्यात यावे, अशी मागणी होती. म्हणून मुख्यमंत्री स्वतः ही जबाबदारी घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
आणखी काही अधिकारी लक्ष्य
जिल्हाधिकारी दैने यांच्या कार्यकाळात निवासी जिल्हाधिकारी कार्यालय, खणीकर्म विभाग आणि नियोजन विभाग चर्चेत होते. या विभागात सुरू असलेल्या गोंधळाची दबक्या आवाजात चर्चा होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांना यावर नियंत्रण मिळविता आले नाही. या विभागतील काही अधिकाऱ्यांनी वाळू माफिया, कंत्राटदारांना हाताशी घेत अवैध कामांना मंजुरी दिल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. या सर्व बाबी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्याने ते नाराज आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यानंतर आणखी काही अधिकाऱ्यांची उचलबांगडी होऊ शकते.
नागपूर : चुकीची पोस्ट किंवा चुकीची चित्रफित तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित करणे आणि ती पोस्ट किंवा चित्रफित फॉरवर्ड करणे गुन्हेगारी कृत्य आहे. त्यांच्याविरुद्ध सायबर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि नागपूर पत्रकार क्लब यांच्यातर्फे बुधवारी मुख्यमंत्र्यांशी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते एका प्रश्नावर बोलत होते.
पोस्ट फॉरवर्ड करणारे गुन्हेगार
सायबर गुन्हे हे मोठे आव्हान आहे. तंत्रज्ञानाचा जर चांगला उपयोग आहे. तसेच काही नालायक, दृष्ट लोक त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करीत आहेत. या माध्यमातून ते लोकांना लुबाडण्याचे काम करीत आहेत. समाजात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जाती-जातींमध्ये विद्वेष निर्माण करीत आहेत. राज्यात सायबर जागरूकता अभियान सुरू केले जाणार आहे. आपण ‘सायबर सिक्युरिटी प्लॅटफार्म’ तयार केला आहे, असेही ते म्हणाले. मी सभागृहात नक्षलवाद्यांविषयी बोललो. पण, ते वगळून केवळ संविधानाला मानत नाही. एवढी चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित केली जात आहे. पण, मी सांगू इच्छितो, अशाप्रकारची चित्रफित कोणी केली आणि ती कुणी-कुणी फॉरवर्ड केली, हे लगेच शोधून काढणे शक्य आहे. मोडतोड करून चित्रफित तयार करणारा गुन्हेगार तर आहेच. पण, ते फॉरवर्ड करणार सहआरोप होतो, असा इशाराही फडवीस यानी दिला.
भाजपचे आमदार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यंनी मला पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची संधी आहे. त्या संधीचे सोने करण्याचा माझा प्रयत्न राहील. एक नागपूरकर म्हणून नागपूरकरांची मान नेहमी उंच राहिले, अशा पद्धतीने काम करेन. प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे सरकार चालावे, असे माझा कायम आग्रह राहिला आहे. त्यानुसार राज्याचा कारभार चालवण्यात येईल, असेही ते म्हणाले. राजकारणात कुठल्याही पातळीवर जाऊन आव्हान निर्माण केली जातात. पण, धैर्यपूर्वक त्या आव्हानाला सामोरे गेलो. मी सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाऊ दिली नाही. सत्ता हे सेवेचे माध्यम आहे, असे मी मानतो, असेही म्हणाले.
राज्यभरात सहा नदीजोड प्रकल्पांची कामे हाती घेतली आहेत. यामुळे विदर्भातील १० लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे विदर्भाचा कायापालट होणार आहे. हे प्रकल्प अनेक पिढ्यांवर परिणाम करणारे आहेत. गडचिरोली जिल्हा स्टील सिटी म्हणून उदयास येत आहे. या भागातील नक्षलवाद कमी झाला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
नागपूर : बारावीत असलेल्या विद्यार्थिनीचे वस्तीत राहणाऱ्या एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. बारावीची परीक्षा झाल्यावर त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दोघांच्याही वारंवार भेटी-गाठी होत होत्या. त्यांच्या प्रेमसंबंधाची कुणकुण कुणालाही लागली नव्हती. सर्व सुरळीत सुरु असतानाच मुलीच्या ‘इंस्टाग्राम’वर प्रियकरासोबतचे बरेच व्हिडिओ तिच्या भावाला दिसले. त्याने आईवडिलांशी चर्चा केली आणि थेट पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सोनम (बदललेले नाव) ही आईवडिल आणि भावासह कपीलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. ती बारावीची विद्यार्थिनी आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी तिची आरोपी प्रतिकसोबत ओळख झाली. प्रतिकसुद्धा कपीलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो.
तो बी.ए. तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे. दोघांचेही कॉलेज एकाच रस्त्यावर असल्यामुळे दोघेही एकमेकांशी बोलत होते. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. दोघेही एकमेकांना नेहमी मदत करायचे. प्रतिक हा शिक्षणासह एका खासगी कंपनीत कामाला जात होता. त्यामुळे तो तिला शिक्षणासाठीसुद्धा मदत करीत होता. दोघांच्या मैत्री पुढे वाढली. दोघांच्याही भेटी व्हायला लागल्या. त्याने फेब्रुवारी २०२४ मध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ला सोनमला प्रेमाची मागणी घातली. प्रतिकच्या प्रेमाला तिनेही साद दिली.
दोघांचेही प्रेमसंबंध वाढले. मार्च महिन्यात त्याने सोनमला ‘सरप्राईज पार्टी’ असल्याचे सांगून फिरायला नेले. एका ढाब्यावर तिच्यासोबत जेवण केल्यानंतर तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे प्रतिकने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर त्याने अनेकदा तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दोघांचे प्रेम चांगलेच फुलले.
भावाने व्हिडीओ बघितला
प्रतिक आणि सोनम हे दोघेही वस्तीपासून दूर जाऊन एकमेकांच्या भेटी घ्यायला लागले. सोनमसुद्धा प्रतिकच्या प्रेमात वेडी झाली. तिने प्रियकरासोबत बाहेर फिरायला गेल्यानंतर बरेच व्हिडिओ आणि फोटो काढले. गेल्या काही दिवसांपूर्वीच तिने प्रतिकसोबत एका बगिच्यात फिरत असलेला व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकला. त्यात प्रेमाचे गीतसुद्धा घातले. गेल्या दोन दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवरील व्हिडिओ तिच्या भावाने बघितला. त्याने बहिणीचे प्रेमप्रकरण आईवडिलांना सांगितले.
कुटुंबियांनी तिला विचारणा केली असता तिने प्रतिकसोबत प्रेम असून आम्ही लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले. तसेच शारीरिक संबंध ठेवल्याची कबुली दिली. त्यामुळे चिडलेल्या कुुटुंबीयांनी तिला कपीलनगर पोलीस ठाण्यात नेले. लेखी तक्रारीवरुन पोलिसांनी सोनमच्या प्रियकराविरुद्ध बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला. कपीलनगर पोलिसांनी कुटुंबियांच्या तक्रारीवरुन प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अटक केली. प्रतिक शैलेंद्र वक्ते (२३, रा, कपीलनगर) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.
गडचिरोली.
गडचिरोली येथील झाडीबोली साहित्य मंडळाचे सहसचिव, अंनिसचे कार्यकर्ते, झाडीबोली कवी श्री. उपेंद्र रोहनकर, ह्यांच्या "डोरे रावून अंद्रा" कवितेला नुकताच पहिला (५000/-रु. रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, व प्रमाणपत्र) राष्ट्रीय मराठी बोलीभाषा पुरस्कार जाहीर झाला आहे. सातारा येथील कर्मवीर भाऊराव विद्यापीठातील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागाने ऑक्टोबर, नोव्हेंबर २0२४ मध्ये राष्ट्रीय मराठी, कोकणी बोलीभाषेतील काव्यालेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. ह्या स्पर्धेत महाराष्टात बोलल्या जाणाऱ्या विविध बोलीभाषा आणि त्यात लेखन करणारे अनेक कवी आपल्या कविता पाठवून सहभागी झाले होते.मराठी बोली भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी बोलीभाषा कविता लेखन स्पर्धेचे आयोजन असलेली ही देशातील पहिली स्पर्धा होती.दुसरा क्रमांक लांजा येथील कवियत्री मराठीच्या अभ्यासक विजयालक्ष्मी देवगोजे यांच्या बेळगावी बोलीतील "सासुरवाशीन " कवितेला ( ४000/-रु. रोख सन्मानचिन्ह वं प्रमाणपत्र )तर तिसरा क्रमांक अनिता नंदू बर्गे ह्यांच्या कोकणी बोलीतील "जिनेचे एक पुस्तक" ह्या कवितेला(३000/- रु. रोख सन्मानचिन्ह वं प्रमाणपत्र ) मिळाला आहे.शिवाय दहा उतेजनार्थ बक्षीसमध्ये चंद्रपर जिल्ह्यातील आमडीचे कवी प्रशांत भंडारे ह्यांच्या झाडीबोतील "रोवना" व सुनील बावणे यांच्या "लाव बेकणी" ह्या कवितांचा समावेश आहे.
उपेंद्र रोहनकर हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील आताच्या सावली तालुक्यातील करगांव चक ह्या गावचे.खेड्यात राहून त्यांनी प्राथमिक, उच्च प्राथमिक शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर तालुक्याच्या मूल ह्या गावी हायस्कुल पर्यंतचे शिक्षण घेतले. तेव्हा त्यांना आपल्या बोलीशी सामना करावा लागायचा.बोलीतील शब्दांना शहरातील लोक हसायचे. खाल्लू, घेतलू, आलू, गेलू, नेहमीची भाषा हळूहळू विसरत गेली. जसे संस्कार तशी वागणूक. पण मुलगी जशी आपल्या माहेरला विसरू शकत नाही. तसे संस्कार देणारी आपली माती आपण विसरत नाही. अलीकडे त्यांचा " डोळस व्हायचं" हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे.त्यात त्यांच्या काही बोलीतील कविता आहेत.
गडचिरोली,चंद्रपूर, गोंदिया, भंडारा हा प्रामुख्याने झाडीचा प्रदेश आहे. ह्या भागात झाडीबोली बोलली जाते.इथल्या संस्कृती, कला, नाटक,साहित्यात ही बोली बघायला मिळते. आता केंद्रशासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिला आहे. त्यामुळे हळूहळू विलोपास जात असलेल्या बोलीभाषा आता पुन्हा सक्षमपणे बोलल्या, लिहल्या जातील.बोली टिकल्या तर भाषा टिकतील.आता त्या त्या भागात राहणाऱ्या कवी लेखकांनी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
सदर पुरस्काराबद्दल कवी उपेंद्र रोहनकर ह्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार, झाडीबोलीचे अभ्यासक तथा जेष्ठ साहित्यिक डॉ.हरीशचंद्र बोरकर,झाडीबोलीच्या कवियत्री अंजनाबाई खुणे, केंद्रीय झाडीबोली साहित्य मंडळाचे सदस्य , ग्रामगितचार्य बंडोपंत बोढेकर, ३२ व्या झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष मा. लोकराम शेंडे,गडचिरोली झाडीबोली मंडळाचे अध्यक्ष प्रा. विनायक धानोरकर, सल्लागार डॉ. चंद्रकांत लेनगुरे, उपाध्यक्ष डॉ.प्रवीण किलनाके, सचीव संजीव बोरकर, चंद्रपूर झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्री.अरुण झगडकर,झाडीबोली कवी लक्ष्मण खोब्रागडे. गोंडपिपरी,वरोरा, ब्रम्हपुरी, बल्लारपूर, सिंदेवाही, मंडळातील कविनी शुभेच्छा दिल्या.तसेच
महाअनिसचे विलास निंबोरकर, सायकलस्नेही मंडळाचे प्रा. विलास पारखी, सर्वोदय मंडळाचे प्रा. देवानंद कामडी, गुरुदेव सेवामंडळाचे डॉ. कुंभारे, पत्रकार रोहिदास राऊत, मिलिंद उमरे तसेच विविध संघटना, साहित्य समूहानी अभिनंदन केले आहे.
युवा संकल्प ने गढ़चिरौली जिला कृषि अधीक्षक से पीएमकिसान ऑनलाइन दस्तावेज़ अपलोड सीमा को 2 एमबी तक बढ़ाने की मांग की।
गढ़चिरौली : पी.एम. किसान योजना के तहत कई नागरिकों ने अपना ऑनलाइन पंजीकरण कराया है। चूंकि पार्टू ऑनलाइन डॉक्यूमेंट में पीडीएफ को 200 केबी में अपलोड करना है। इस बिंदु पर दस्तावेज़ स्पष्ट रूप से दिखाई नहीं दे रहा है. इतने सारे नागरिकों के फॉर्म रद्द कर दिए गए हैं. और ऑफिस में उन्हें अक्सर भागदौड़ करनी पड़ती है। दस्तावेज़ अपलोड की अपलोड सीमा को 2 एमबी तक बढ़ाया जाना चाहिए। 2KB में परिवर्तन रजिस्टर एवं पति-पत्नी का आधार कार्ड एवं 16 वर्ष से कम उम्र के बच्चे का आधार कार्ड अपर्याप्त दस्तावेज हैं। सीमा को 2 एमबी तक बढ़ाया जाना चाहिए, इसके लिए उप निदेशक श्री सतीश पवार साहब से अनुरोध किया गया था, जिसमें राहुल भांडेकर, महेंद्र लठारे, रमेश कोठारे, तेजस कोंडेकर, राहुल वैरागड़े और अन्य उपस्थित थे।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा व छत्रपती संभाजी महाराजांच्या खुनाचा बदला महार जातीने घेतला :-डी. के. साखरे
मंगळवेढा :-छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा व छत्रपती संभाजी महाराजांच्या खुनाचा बदला महार जातीने घेतला असल्याचे प्रतिपादन दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष डी. के. साखरे यांनी केले.बुधवार दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी मंगळवेढा येथील श्री. संत चोखामेळा चौकात मनुस्मृती दहन दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी साखरे बोलत होते.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मंगळवेढा शहराध्यक्ष अजय गाडे व बहुजन सत्यशोधक बांधकाम कामगार संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रदीप परकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्वप्रथम भीम सैनिकांच्या डॅशिंग नेत्या पद्मिनी शेवडे यांच्या हस्ते श्री. संत चोखामेळा यांच्या समाधीला पुष्पचक्र अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.पुढे बोलताना साखरे म्हणाले की, ज्या मनुस्मृतीने शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला, विषमतेचा पुरस्कार केला तसेच स्त्रियांना स्वातंत्र्य नाकारले त्या मनुस्मृतीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. 25 डिसेंबर 1927 रोजी रायगडाच्या पायथ्याशी दहन केले. तेव्हापासून हा दिवस संपूर्ण भारतात मनुस्मृती दहन दिन म्हणून साजरा केला जातो.यावेळी बहुजन सत्यशोधक बांधकाम कामगार संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रदीप परकाळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विषमतेविरुद्ध पुकारलेले बंड असून जिवंत आंबेडकरांपेक्षा आज प्रस्थापित मेलेल्या आंबेडकरांनाचं जास्त घाबरतात.तर वंचित बहुजन आघाडीचे अजय गाडे आपल्या भाषणात म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला जगात तोड नसून मनुवादी प्रवृतीचे समूळ उच्चाटन करणे आवश्यक आहे.यावेळी विजय शिकतोडे, समाधान भोसले, सुनिल शेंबडे, ब्रम्हदेव वाघमारे,संदेश लोखंडे,विकास जावळे,नितीन लोकरे, श्रीपती लोकरे, नितीन शेंबडे, नंदू लांडगे,बाबा घनवजिर यांच्यासह मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट कौल देत पुन्हा एकदा बहुमताचा सरकार अस्तित्वात आणल्या गेल्या आणि जनतेच्याही मनात तेच होतं.अगदी लाडक्या बहिणी सहित.मंत्रिमंडळाचा गटन होऊन प्रत्येक मंत्रिमंडळातील मंत्री महोदयांना आपापल्या पदाची जबाबदारी देखील देण्यात आली.
आता महायुतीमध्ये सर्व काही ऑल वेल आहे,असं चित्र होतं परंतु माशी शिंकली ती पालकमंत्री पदावर. महायुतीमध्ये आता पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू झालेली पाहायला मिळतो आहे आणि यातच महायुतीचे तिन्ही घटक पक्ष आप आपला हेकेपणा सोडायला तयार नाहीत.माझ्या पक्षाला अमुक अमुक पालकमंत्री पद मिळालेच पाहिजे हा हेका जोवर सुटत नाही तोवर महायुतीमध्ये सर्व काही ऑल वेल आहे असं म्हणता येणार नाही.
कारण या तिन्ही पक्षातील नेते एकमेकांना पाण्याखाली पाहताना दिसतो आहे.महायुतीमध्ये दुसरे बेत मतभेद म्हणजे मंत्रि महोदयांना जे काही बंगले मिळाली आहेत,त्यावर सुद्धा काही नेत्यांची नाराजी दिसून येतो आहे.
महायुतीमध्ये सत्तेत सहभागी असणारे घटक पक्ष माननीय एकनाथ शिंदेची शिवसेना आणि माननीय अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांचा सरळ सरळ भारतीय जनता पक्षातील नेत्यांवर आरोप आहे की बंगले वाटताना आम्हाला विश्वासात घेतल्या गेलं नाही आणि आम्हा दोन्ही घटक पक्षांना बंगले न देता फ्लॅट देण्यात आले.
महायुतीमध्ये जो काही रस्सीखेचपणा सुरू आहे त्यावर तिन्ही पक्षांनी पक्षातील नेत्यांनी एकत्र बसून किंवा विश्वासात घेऊन त्या निर्णयाची अमलबजावणी करायला पाहिजे.ज्या जनतेने तुमच्या हातात सध्या सत्तेची चाबी दिली,राज्यावर राज्य करायला संधी दिली त्यावर विचार मंथन व्हायला पाहिजे.या रस्सीखेचच्या खेळात तुम्ही मजबूर होऊन जाहल आणि राज्यातील जनता मात्र वाऱ्यावर राहून जाईल.राज्यातील नेते मंडळी खातात तुपाशी आणि भोळी भाबडी जनता राहील उपाशी असं व्हायला नको
Latest Isro Mission: इसरो 30 दिसंबर को अपना नया मिशन, स्पेस डॉकिंग एक्सपेरीमेंट (स्पाडेक्स), लॉन्च करने जा रहा है। इस लॉन्च के साथ ही भारत अंतरिक्ष कार्यक्रम में एक अहम कदम बढ़ाएगा और दुनिया के उन तीन देशों के क्लब में शामिल हो जाएगा, जिनके पास दो अंतरिक्ष यानों या उपग्रहों की डॉकिंग करने की क्षमता है। फिलहाल, अमेरिका, रूस और चीन इस विशेष क्षमता के मालिक हैं। इस मिशन के बाद भारत का नाम भी इन देशों के साथ लिया जाएगा।
यह मिशन, जो ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (पीएसएलवी-सी60) द्वारा श्रीहरिकोटा के सतीश धवन अंतरिक्ष केंद्र से लॉन्च किया जाएगा, इसरो का 2024 का आखिरी मिशन होगा। इसके सफल संचालन से भारत की भूमिका वैश्विक अंतरिक्ष समुदाय में और भी सशक्त हो जाएगी। यह मिशन रिसर्च और अंतरराष्ट्रीय सहयोग के नए द्वार खोलेगा, और अंतरिक्ष में डॉकिंग क्षमताओं का प्रदर्शन करेगा, जो भविष्य के अंतरिक्ष प्रयासों के लिए अत्यंत महत्वपूर्ण है।
इस मिशन का मुख्य उद्देश्य दो अंतरिक्ष यानों के बीच डॉकिंग और अनडॉकिंग के लिए आवश्यक प्रणालियों का परीक्षण करना है। अंतरिक्ष में डॉकिंग एक जटिल और जोखिमपूर्ण प्रक्रिया होती है, जिसमें बहुत ही सटीकता की आवश्यकता होती है। एक छोटी सी चूक भी दुर्घटना का कारण बन सकती है। इस मिशन के तहत, दो अंतरिक्ष यान—चेजर (एसडीएक्स01) और टारगेट (एसडीएक्स02)—की डॉकिंग की जाएगी। इन दोनों यानों का वजन लगभग 220 किलोग्राम होगा। मिशन का उद्देश्य ये सुनिश्चित करना है कि चेजर यान, टारगेट यान का पीछा कर उसे डॉक कर सके।
इसरो के वैज्ञानिकों द्वारा मिशन कंट्रोल से चेसर और टारगेट के बीच की दूरी को सटीकता से नियंत्रित किया जाएगा। दोनों यान पृथ्वी की निचली कक्षा (LEO) में 470 किलोमीटर की ऊंचाई पर स्थापित होंगे और चेजर, टारगेट के पास आते हुए अंततः 3 मीटर की दूरी पर डॉक करेंगे। इस प्रक्रिया के दौरान, अंतरिक्ष यान के बीच इलेक्ट्रिक पावर का ट्रांसफर भी किया जाएगा।
इस मिशन का सफलतापूर्वक संपन्न होना भारत के अंतरिक्ष विज्ञान में एक मील का पत्थर साबित होगा और देश को अंतरिक्ष तकनीकी में प्रमुख खिलाड़ियों में शामिल करेगा।
Success Story: स्वाति भार्गव Swati Bhargava ने हरियाणा के छोटे से शहर अंबाला से निकलकर अपने सपनों को साकार किया और 300 करोड़ रुपये का बिजनेस खड़ा कर सफलता की मिसाल कायम की है। स्वाति ने गोल्डमैन सैक्स जैसी प्रतिष्ठित कंपनी की नौकरी छोड़कर अपना स्टार्टअप शुरू किया, जिसे आज देशभर में पहचाना जाता है। उनके स्टार्टअप कैशकरो (CashKaro) को न केवल ग्राहकों का भरपूर समर्थन मिला, बल्कि उद्योगपति रतन टाटा का भी विश्वास हासिल हुआ। वित्तीय वर्ष 2023-24 में इस प्लेटफॉर्म ने 300 करोड़ रुपये का राजस्व अर्जित किया, और अब यह 500 करोड़ रुपये के लक्ष्य की ओर बढ़ रहा है।
स्वाति का सफर अंबाला से शुरू हुआ। बचपन से ही पढ़ाई में उत्कृष्ट स्वाति को सिंगापुर में 11वीं और 12वीं कक्षा पूरी करने के लिए स्कॉलरशिप मिली। इसके बाद उन्होंने लंदन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स (LSE) में पढ़ाई की। एलएसई से स्नातक होने के बाद, स्वाति ने गोल्डमैन सैक्स में इन्वेस्टमेंट बैंकिंग में नौकरी शुरू की और पांच साल तक वहां काम किया। हालांकि, उनकी महत्वाकांक्षाएं केवल नौकरी तक सीमित नहीं थीं।
स्वाति और उनके पति रोहन भार्गव को CashKaro का विचार हनीमून के दौरान आया। ब्रिटेन में उन्होंने Quidco नाम की एक कैशबैक साइट का उपयोग किया और 10,000 रुपये का कैशबैक पाया। इसी अनुभव ने उन्हें भारत में ऐसा ही एक प्लेटफॉर्म शुरू करने की प्रेरणा दी। 2013 में दोनों ने भारत में कैशकरो की शुरुआत की, जो ग्राहकों को ऑनलाइन खरीदारी पर कैशबैक और कूपन की सुविधा प्रदान करता है।
CashKaro को बड़ा अवसर तब मिला जब रतन टाटा ने इस स्टार्टअप में निवेश किया। स्वाति ने मुंबई के ताज होटल में टाटा को अपना आइडिया प्रेजेंट किया। टाटा ने इसे सराहा और कहा, "एक ऐसे देश में जो पैसे बचाने को प्राथमिकता देता है, आप मुफ्त पैसे दे रहे हैं। इसमें पसंद न करने जैसा क्या है?" टाटा के निवेश से कैशकरो को नई पहचान और मजबूती मिली।
2023-24 तक, कैशकरो ने 300 करोड़ रुपये का राजस्व अर्जित किया। स्वाति का लक्ष्य इसे 500 करोड़ रुपये तक पहुंचाने का है। इसके अलावा, कंपनी जल्द ही आईपीओ लाने की तैयारी में है।
स्वाति भार्गव की कहानी न केवल प्रेरणादायक है, बल्कि यह दिखाती है कि छोटे शहरों से निकलकर भी बड़ी उपलब्धियां हासिल की जा सकती हैं। उनका सफर मेहनत, दूरदृष्टि और सही फैसलों का एक उदाहरण है। आज कैशकरो एक बड़ा ब्रांड बन चुका है, और यह स्वाति की मेहनत और दृढ़ संकल्प का परिणाम है।