दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर येथे पार पडला असून अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे त्याचे स्वागत आहे.परंतु आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये प्रत्येक मंत्र्यांना अडीच वर्षाचा कालावधी बहाल करण्यात आलेला आहे.त्याची सुद्धा स्वागत करण्यात येत आहे,तरी परंतु ज्या मंत्र्यांना शपथविधी मुळे अडीच वर्षाचा कालावधी देण्यात येत आहे,त्याबद्दलही काही आक्षेप नाही.परंतु तोच निकष प्रत्येकाला लागू असायला हवा आणि मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला सुद्धा लागू करायला पाहिजे.
महत्त्वाची बाब सुद्धा हेच आहे की मंत्रिमंडळ विस्तारामध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला आमदारांना संधी मिळायला पाहिजे होती,परंतु तसं होताना दिसत नाही.पाणी कुठे मुरतय हेच कळायला मार्ग नाही.परंतु काही का असेना जो निकष राज्यातील मंत्र्यांना लागू करणार आहेत तोच निकष राज्यातील मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला देखील लागू व्हायला पाहिजे,म्हणजे राज्यात निवडून आलेल्या बऱ्याच आमदाराला मंत्रीपदाची झलक अनुभवायला मिळेल आणि त्याच्या कार्यकाळात त्यांना सुद्धा संधीचं सोनं करता येईल.
निवडणुका येतात जातात आणि सत्ता मिळाली की मंत्रीपद देखील मिळणारच मग तो नक्की याच आमदाराला मिळाला पाहिजे,असं नाही. पक्ष आपल्या आमदाराची कुवत लक्षात घेऊनच मंत्रीपद बहाल करण्यात येते परंतु वरच्या पातळीवर जो काही निकष लावल्या जातो तर तोच निकष मुख्यमंत्र्याला सुद्धा लागू व्हायला पाहिजे मग तो कोणी का असेना.राज्यातील जनतेला सुद्धा हीच उत्सुकता लागून आहे की प्रत्येक आमदाराला ही संधी मिळालीच पाहिजे आणि तेही राज्याच्या मुख्यमंत्र्यासहित.
Viral Video: सोशल मीडिया पर एक वीडियो ने तहलका मचा दिया है, जिसमें मेट्रो में सफर कर रहे एक लड़का और लड़की को एक-दूसरे को किस करते हुए देखा जा सकता है। वीडियो में दोनों समाज की परंपरागत मर्यादाओं की परवाह किए बिना अपने पलों में खोए हुए हैं। यह नजारा किसी यात्री ने अपने फोन में कैद कर लिया और इंटरनेट पर अपलोड कर दिया, जिसके बाद यह वीडियो तेजी से वायरल हो गया।
वीडियो में दिख रही लड़की ने बुर्का पहना हुआ है और दोनों मेट्रो में मजे से सफर कर रहे होते हैं। इसी दौरान लड़का अचानक लड़की को किस करना शुरू कर देता है। यह देखकर ऐसा लगता है जैसे वह इस हरकत में पूरी ताकत झोंक रहा हो। लड़की भी इसमें विरोध करने के बजाय उसका पूरा साथ देती नजर आती है। दिलचस्प बात यह है कि वीडियो बन रही है, इसका उन्हें जरा भी एहसास या परवाह नहीं है।
इस वीडियो के वायरल होने के बाद इंटरनेट पर लोगों के मजेदार कमेंट्स की बाढ़ आ गई है। एक यूजर ने तंज कसते हुए लिखा, "विकसित भारत देखना है तो यह सब भी झेलना पड़ेगा। अमेरिका के बराबर बनना है तो खुले विचारों के साथ-साथ इसे भी अपनाना होगा।" वहीं, एक अन्य यूजर ने लिखा, "माशा अल्लाह, लिपस्टिक अंडर द बुर्का।"
सार्वजनिक स्थानों पर इस तरह की घटनाएं अब भारत में आम होती जा रही हैं। कई लोगों का मानना है कि यह नई पीढ़ी के बदलते विचारों और पश्चिमी संस्कृति के प्रभाव का नतीजा है। हालांकि, कुछ लोग इसे सामाजिक मर्यादा के खिलाफ मानते हैं और इसे सार्वजनिक शालीनता के उल्लंघन के तौर पर देखते हैं।
Maggi Noodles: मैगी एक ऐसा नाम जो हर उम्र के लोगों की पहली पसंद है। हल्की भूख लगने पर सबसे आसान और स्वादिष्ट विकल्प के रूप में मैगी ने भारतीय रसोई में खास जगह बनाई है। लेकिन, अगर आप भी मैगी खाने के शौकीन हैं, तो एक खबर आपके लिए चिंता का कारण बन सकती है। नेस्ले, जो मैगी की निर्माता कंपनी है, जल्द ही एक बड़ा फैसला ले सकती है।
खबर है कि मैगी की कीमत में बढ़ोतरी हो सकती है। कंपनी यह फैसला एक जनवरी से लागू कर सकती है। हालांकि, कीमत कितनी बढ़ेगी, इसका अभी खुलासा नहीं हुआ है। अगर ऐसा हुआ तो यह निर्णय मैगी लवर्स के लिए निराशाजनक साबित हो सकता है।
इस बदलाव के पीछे एक बड़ा आर्थिक और कूटनीतिक कारण है। स्विट्जरलैंड ने भारत के साथ अपने व्यापारिक संबंधों में एक बड़ा बदलाव किया है। हाल ही में, स्विट्जरलैंड ने नेस्ले के खिलाफ अदालती फैसले के बाद भारत का "सर्वाधिक तरजीही राष्ट्र" (Most Favored Nation - MFN) का दर्जा निलंबित कर दिया है। इसका सीधा असर भारत और स्विट्जरलैंड के बीच व्यापार पर पड़ेगा।
एमएफएन दर्जा खत्म होने के बाद भारतीय कंपनियों को स्विट्जरलैंड में अधिक टैक्स चुकाना होगा। पहले जहां 5% डिविडेंड टैक्स लगता था, अब इसे बढ़ाकर 10% कर दिया गया है। इस टैक्स बढ़ोतरी से भारतीय कंपनियों का मुनाफा कम होगा।
नेस्ले, जो स्विट्जरलैंड की कंपनी है, को भी भारत में अब ज्यादा टैक्स देना होगा। इससे नेस्ले के प्रोडक्ट्स की उत्पादन लागत बढ़ जाएगी। नतीजतन, कंपनी अपने मुनाफे की भरपाई के लिए मैगी समेत अन्य प्रोडक्ट्स की कीमतें बढ़ा सकती है।
नेस्ले के अन्य प्रोडक्ट्स जैसे किट कैट चॉकलेट, डेयरी प्रोडक्ट्स, बेबी फूड और आइसक्रीम की कीमतें भी बढ़ने की संभावना है। हालांकि, कंपनी ने अभी तक इस बढ़ोतरी की सटीक जानकारी नहीं दी है।
अगर मैगी की कीमत बढ़ती है, तो यह आपको थोड़ी निराश कर सकता है। हालांकि, आप घर पर कुछ अन्य इंस्टेंट नूडल्स ट्राई कर सकते हैं या मैगी का घर पर बना वर्जन तैयार कर सकते हैं। इसके अलावा, नेस्ले के इस फैसले पर नजर बनाए रखना जरूरी है, क्योंकि कंपनी कीमतों को लेकर जल्द ही घोषणा कर सकती है।
भारत और स्विट्जरलैंड के बीच यह नया टैक्स विवाद उपभोक्ताओं की जेब पर भारी पड़ सकता है। ऐसे में नए साल पर मैगी लवर्स को यह झटका सहना पड़ सकता है। अब देखना यह होगा कि नेस्ले अपने इस फैसले को कब लागू करती है और उपभोक्ताओं पर इसका कितना प्रभाव पड़ता है।
Success Story: कोलकाता की सहेली चटर्जी की कहानी उन लोगों के लिए प्रेरणा है, जो साधारण शुरुआत से असाधारण सफलता की उम्मीद रखते हैं। अपने पहले प्रोजेक्ट में मात्र 110 रुपये कमाने वाली सहेली आज सालाना 1.64 करोड़ रुपये की कमाई कर रही हैं। यह सफर उनके दृढ़ संकल्प, मेहनत और डिजिटल मार्केटिंग के गहरे ज्ञान का उदाहरण है।
18 साल की उम्र में सहेली ने अपना करियर शुरू किया। जहां कई युवा नामचीन संस्थानों में पढ़ाई का सपना देखते हैं, वहीं सहेली ने कंटेंट राइटिंग से डिजिटल करियर की नींव रखी। कोलकाता के बेथ्यून कॉलेज से आर्ट्स में ग्रेजुएशन करने के बाद उन्होंने खुद को लगातार नए स्किल्स से लैस किया। धीरे-धीरे कंटेंट राइटिंग से सोशल मीडिया मार्केटिंग और ब्रांडिंग में कदम रखते हुए उन्होंने अपनी एक अलग पहचान बनाई।
सहेली चटर्जी की एजेंसी, एम्बिफेम, उनकी दूरदर्शिता और काबिलियत का नतीजा है। यह डिजिटल मार्केटिंग एजेंसी खासतौर पर ब्रांड्स और व्यवसायों को सोशल मीडिया मार्केटिंग, लॉन्च मैनेजमेंट और परामर्श सेवाएं प्रदान करती है। एम्बिफेम का नाम ही महिलाओं की महत्वाकांक्षा और ताकत को दर्शाता है।
सहेली का डिजिटल साम्राज्य सिर्फ उनके लिए कमाई का जरिया नहीं है। उन्होंने दूसरों को भी डिजिटल दुनिया में कामयाब बनाने का जिम्मा उठाया। Freelance 101 Academy के माध्यम से वह फ्रीलांसरों को प्री-रिकॉर्डेड और लाइव सेशंस के जरिए डिजिटल मार्केटिंग, ब्रांडिंग और स्किल्स डेवलपमेंट सिखाती हैं।
सहेली चटर्जी खुद को 'आपकी मार्केटिंग गर्ल' कहती हैं। उनके सोशल मीडिया पर लाखों फॉलोअर्स हैं, जो उनकी अनकन्वेंशनल सोच और नवाचार को पसंद करते हैं। उनका मानना है कि उन्होंने जो कुछ भी सीखा, वह स्कूल या कॉलेज की शिक्षा से नहीं, बल्कि अनुभवों और अपने प्रयासों से सीखा।
कभी 110 रुपये से शुरू हुए सहेली के सफर ने आज उन्हें करोड़ों की कमाई और अनगिनत लोगों की प्रेरणा बना दिया है। उनकी कहानी न सिर्फ डिजिटल दुनिया में काम करने वालों के लिए, बल्कि हर उस व्यक्ति के लिए प्रेरणादायक है, जो अपने सपनों को हकीकत में बदलना चाहता है।
सहेली चटर्जी ने साबित कर दिया कि हुनर और लगन से हर लक्ष्य को हासिल किया जा सकता है।
Gadchiroli News: चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे घडलेल्या एका धक्कादायक आणि रहस्यमय घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. किरायाने राहत असलेल्या एका 60 वर्षीय दिव्यांग वृध्दाची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी घराला बाहेरून कुलूप लावून फरार झाले.
रशीद अहमद शेख (वय 60, मूळ रा. बुटी बोरी, नागपूर) असे हत्या करण्यात आलेल्या वृध्दाचे नाव आहे. रशीद शेख गेल्या 20 वर्षांपासून आष्टी येथे एका घरात किरायाने राहत होते. पायाने दिव्यांग असलेले रशीद शेख अविवाहित होते आणि त्यांचे नातेवाईक नागपूरच्या बुटी बोरी येथे राहत होते.
गेल्या काही दिवसांपासून त्यांचा फोन न उचलल्यामुळे चिंतेत असलेल्या नातेवाईकांनी 15 डिसेंबर रोजी आष्टी येथे धाव घेतली. घराबाहेर कुलूप असल्याने संशय वाढला. खिडकीतून डोकावून पाहताच त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.
घटनास्थळी तात्काळ पोहोचलेल्या पोलिसांनी घराचे कुलूप तोडून मृतदेह बाहेर काढला आणि उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. प्राथमिक तपासात रशीद यांच्या गळ्यावर आणि पोटावर धारदार शस्त्राने वार केल्याचे आढळले. मृतदेहाशेजारी त्यांचा मोबाईल देखील सापडला, जो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
या निर्घृण हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मारेकऱ्यांनी हत्या केल्यानंतर घराला कुलूप लावून पळ काढल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी काही संशयितांकडे चौकशी सुरू केली असून, लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, अशी माहिती पो.नि. विशाल काळे यांनी दिली आहे.
दिव्यांग वृद्धाचा गळा चिरून खून; घराला कुलूप लावून पळाले आरोपी
चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे घटना
आष्टी,
चामोर्शी : तालुक्यातील आष्टी येथे किरायाने वास्तव्यास असलेले रशीद अहमद शेख ,वय ६० वर्षे याचा अज्ञात इसमाने खून केल्याची घटना दिनांक १५ ला उघडकीस आली. रशिदने आपल्या नातेवाईकांना चार पाच दिवसांपूर्वी दूरध्वनी द्वारे मी गावाकडे येणार अशी माहिती दिली होती.त्यांनतर चार पाच दिवस होऊनही तो न आल्यामुळे व त्याचा फोन न लागत असल्यामुळे नातलगांना शंका येऊन ते स्वतः नागपूर येथून आष्टीत दाखल झाले व त्याचा फोटो दाखवून सदर व्यक्ती कुठे असतो अशी विचारणा केली.तेव्हा काही चौकातील लोकांनी चामोर्शी मार्गावर असलेल्या खुशाल कुकुडकर यांच्या घरी किरयाने रहात असल्याचे समजले तेव्हा ते त्याठिकाणी गेले असता घराला बाहेरून कुलूप लावून दिसले तेव्हा खिडकी मधून डोकावून पाहले असता त्यांना आत रक्ताच्या थारोळ्यात तो पडलेला दिसला तेव्हा नातलगांनी पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना माहिती दिली.तेव्हा लगेच पोलीस घटनस्थळी दाखल झाले व कुलूप तोडून आतमध्ये बघितले असता रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला दिसून दुर्गंधी पसरलेली होती.त्यानंतर पोलिसांनी उपविभागीय अधिकारी अहेरी यांना पाचारण केले . त्यांनतर उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक व त्यांचे कर्मचारी घराच्या सभोवताल फिरुन चौकशी करण्याकरिता उघडलेल्या दारामधून घरात गेले व त्याचा मृतदेह शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मृतदेहाची दुर्गंधी पसरल्याने ही घटना चार पाच दिवसांपूर्वीची असावी असे बोलले जात आहे. सदर व्यक्तीचा खुन का करण्यात आला व कुणी केला याचा तपास पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी तथा आष्टीचे पोलीस निरीक्षक विशाल काळे व त्यांची चमू करीत आहे. अजूनपर्यंत पूर्ण माहिती कळू शकली नाही.
परभणी येथील प्रकरणात कठोर कारवाई करा
गडचिरोली येथील राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांची मागणी
गडचिरोलीः दि. 16 डिसेंबरः परभणी येथे दिनांक 10 डिसेंबर रोजी भारतीय संवीधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर तसेच आंबेडकरी आंदोलक सोमनाथ सूर्यवंषी या तरुणाच्या मृत्युस जबाबदार असणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गडचिरोली येथील विविध राजकीय पक्ष, सामाजिक, धार्मिक संघटनांनी केली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या नावाने लिहिलेले निवेदन आज 16 डिसेंबर रोजी दुपारी या संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी संजय दैने यांना सादर केले व याबाबत सविस्तर चर्चा केली.
यासोबतच गडचिरोली तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन आदीवासी मुलीवर झालेल्या लैंगीक अत्याचार प्रकरणी जलदगती न्यायालयाव्दारे आरोपीला कडक शिक्षा देउन सदर मुलीला अर्थसहाय्य देण्यात यावे, अशीही मागणी या शिष्टमंडळाने केली.
परभणी येथे दि. 10 डिसेंबर 2024 रोजी भारतीय संवीधानाच्या प्रतीकृतीची समाजकंटक माथेफिरुने विंटबना केली आहे. या देशद्रोही कृत्याचा तीव्र निषेध करीत हे कृत्य करणाऱ्या देशद्रोही समाजकंटकावर देशद्रोह कायद्यानुसार कडक कार्यवाही करण्यात यावी. तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करुन यातील मास्टर माईडंचा शोध घेण्यात यावा व त्याचेवर सुध्दा कारवाई करण्यात यावी. परभणी प्रकरणात आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयील कोठडीत असतांना मृत्यू झालेला आहे. या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच आंदोलन करणाऱ्या नागरीकांवर दाखल केलेल्या केसेस त्वरीत मागे घेण्यात याव्या व आंदोलकांची सुटका करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
गडचिरोली तालुक्यातील एका अल्पवयीन आदीवासी मुलीवर एका नराधमाने लैंगीक अत्याचार केला. या प्रकरणाचा त्वरीत निकाल लागण्याच्यादृष्टीने जलदगती न्यायालयात केस चालविण्यात यावी व आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच सदर मुलीचे आई-वडील अतिशय गरीब असल्याने तिच्या पुढील शिक्षण व संगोपणासाठी शासनाच्या वतीने किमान 50 लक्ष रुपयाचे आर्थिकसहाय्य देण्यात याव, अशीही मागणी करण्यात आली.
शिष्टमंडळात अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सतीश विधाते, बिआरएसपीचे जिल्हा प्रमुख मिलिंद बांबोळे, कम्युनिष्ट पार्टीचे रोहिदास फुलझेले, नारायणसिंग उईके समितीच्या कुसुम अलाम, संविधान फाउंडेशनचे गौतम मेश्राम, भारतीय बौध्द महासभेचे तुलाराम राऊत, आदिवासी एम्पालाईल फेडरेशनचे भरत येरमे, अंध्दश्रंध्दा निर्मुलन समितीचे विलास निंबोरकर, माळी समाज समितीचे हरिदास कोटरंगे, प्रा. गौतम डांगे, आदिवासी युवा परिषदेचे कुणाल कोवे नारीशक्तीच्या जयश्री येरमे, कॉंग्रेसचे तालुकाअध्यक्ष वसंत राऊत, जेष्ठ कार्यकर्ते, समशेर खान पठाण, रजनीकांत मोटघरे, नंदु वाईलकर रिपब्लिकन पक्षाचे ज्योती उंदीरवाडे , प्रदीप भैसारे, प्रल्हाद रायपुरे, अशोक खोब्रागडे, पुण्यवान सोरते, नरेंद्र रायपुरे, लहुजी रामटेकेे, अरविंद वाळके, रेखा तोडासे, मंजू आत्राम, विना उईके, कविता उराडे, शालीनी पेंदाम, सुनिता उसेंडी व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आरमोरी: ठाणेगाव येथील दूध डेअरीवर दूध विकून दुचाकीने गावाकडे परतत असताना समोरून येणाऱ्या तीन चाकी मालवाहू रिक्षाने समोरासमोर धडक दिली. यात दुचाकीचालक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, १५ डिसेंबर रोजी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास वनखी गावाजवळ घडली.
मंथन प्रकाश लाकडे (१९) रा. चामोर्शी (माल) ता. चामोर्शी, असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मंथन हा परगावी आपल्या नातेवाइकाकडे राहून शिक्षण घेत होता. तीन दिवसांपूर्वी चामोर्शी मालयेथे स्वगावी तो आला होता. मंथन हा एम. एच. ३३ ए.एफ. ७५५३ या क्रमांकाच्या मोटार सायकलने सकाळी घरचे दूध डेअरीवर देण्यासाठी ठाणेगावला गेला. डेअरीवर दूध देऊन मोटार सायकलने चामोर्शी माल या आपल्या गावाकडे परतत असताना वनखी ते चामोर्शी माल डांबरी रोडवरील रामदास खेवले यांच्या शेताजवळ समोरून येणाऱ्या एम. एच.
३४ बी. एच. २०२४ क्रमांकाच्या पिवळ्या रंगाच्या तीनचाकी मालवाहू रिक्षाने मंथनच्या मोटरसायकलला समोरासमोर जबर धडक दिली. अपघातात मंथन याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी रिक्षाचालक देवराव शंकर साळुंखे, नेहरूनगर (चंद्रपूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडील गेले धान केंद्रावर; स्वतः नेले दूध
मंथन हा बाहेरगावाहून घरी आला. त्यामुळे वडिलांना उसंत मिळाली व ते रविवारी वैरागड येथील हमीभाव केंद्रावर धान विकण्यासाठी गेले होते. वडिलांच्या जागी मंथनने दूध विक्रीसाठी नेले. मात्र, परतत असताना घात झाला.
गडचिरोली : जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ तसेच महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने सुरू असलेल्या धानखरेदीत लूट सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, प्रशासन मूग गिळून गप्प आहे. या लुटीमागे कोणाचा हात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
हमीभावानुसार धानविक्रीसाठी अनेक शेतकरी आदिवासी विकास महामंडळ तसेच मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर नोंद करीत आहेत. अनेक ठिकाणी धानखरेदीला सुरुवात झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील काही धान खरेदी केंद्रावर सर्रास लूट केली जात असल्याचे आरोप आहेत. केंद्रावर४०.६०० किलो पोतेप्रमाणे धान खरेदी करण्याचे धोरण आहे. मात्र, शेतकऱ्यांकडून ४१.६०० किंवा ४२ किलो धान घेतले जाते. क्विंटलमागे अडीच ते तीन किलोंची शुद्ध लूट केली जात असल्याचा आरोप आहे.
तर पोलिसांत तक्रार करा
केंद्रावर लूट होत असल्यास याचा जाब व्यवस्थापक किवा सचिवांना विचारावा. मापात पाप होत असेल तर यासंबंधीची तक्रार हद्दीतील पोलिस ठाण्यात करावी. धानखरेदी केंद्रावर काटा करताना खरेदीवजनाचे फोटो, व्हिडीओ बनवावेत. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी पोलिस प्रशासनाकडे दाद मागणार आहोत, असे सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार म्हणाले.
देसाईगंज : फर्निचर व्यावसायिकाने सकाळी दुकान उघडून दुपारपर्यंत सुरूच ठेवले. त्यानंतर दुकानातच गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना देसाईगंज शहराच्या गांधी वॉर्डात रविवार, १५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता उघडकीस आली.
उमेश माधव शिंगाडे (४५) रा. गांधीवॉर्ड, देसाईगंज असे आत्महत्या करणाऱ्या व्यावसायिकाचे नाव आहे. उमेश शिंगाडे यांनी आपल्या घरापासूनच जवळपास ३०० मीटर अंतरावर भाड्याच्या खोलीत फर्निचरचे दुकान थाटलेले आहे. नेहमीप्रमाणे रविवारीसुद्धा फर्निचरचे दुकान उघडले. सकाळपासूनच ते दुकानातच होते. दरम्यान, दुपारच्या सुमारास काही व्यक्ती त्यांच्यादुकानात साहित्य खरेदी करण्यासाठी आले; मात्र ते दिसले नाहीत. तेव्हा आतमध्ये जाऊन पाहिले असता उमेश शिंगाडे हे सिलिंगला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले. त्यानंतर देसाईगंज पोलिस स्टेशनला माहिती देण्यात आली. पोलिसांनी त्यांचे शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मात्र, उमेश यांनी आत्महत्या का केली, याबाबतचे कारण कळू शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ आहेत.
काल राज्याची उपराजधानी नागपूर म्हणजे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्य मंत्रिमंडळाचा शानदार शपथविधी पार पडला.जनतेची जी उत्सुकता होती ती काही प्रमाणात शांत झाली,असं म्हणायला काही हरकत नाही.
परंतु काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीत महायुती सरकारने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील एका आमदारांना सुद्धा मंत्रिमंडळात समावेश केला गेला नाही,याचं कारण अजूनही अधांरातच आहे.आणि हा निर्णय या लगतच्या दोन्ही जिल्ह्यांवर अन्याय करणारा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
वास्तविक चंद्रपूर जिल्ह्यातून भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार निवडून आलेले आहेत व सर्वाधिक अनुभव असलेले,त्यांना संसद पटू या सन्मानाने पारितोषिक मिळवणारे जुने नेते,ज्याने विधानसभेचे सात वेळा नेतृत्व केले असे,सुधीर भाऊ मुनगंटीवार.अशा कर्तबगार आणि अनुभवी माणसाला मंत्रिमंडळात स्थान न मिळणे म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचे दुर्दैव आहे,असं म्हणायला काहीही हरकत नाही.
सुधीर भाऊ मुनगंटीवार यांची कार्यशैली अवघ्या महाराष्ट्राला परिचित असून सुद्धा त्यांच्या मंत्रिमंडळात समावेश झालेला नाही म्हणजे संशयाची पाल कुठेतरी चुकचुकते.त्यांना स्थान न मिळणे म्हणजे त्यांना डावलण्याचा प्रकार आहे की काय ? अशी जनमानसात चर्चा रंगताना दिसून येतोय.
गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल व रोजगार भुमुख असलेला जिल्हा असा परिचय जिल्ह्याला लाभला असताना,त्यावरील लागलेला कलंक कदाचित महायुती सरकारने मिटवेल असं वाटत असताना सुद्धा याही जिल्ह्याला मंत्रिमंडळाला स्थान मिळालेला नाही,म्हणजे हा निर्णय जिल्ह्यावर अन्याय करणारा ठरला की काय,असं म्हणायला काही हरकत नाही .
गडचिरोली जिल्ह्यात महायुती सरकारमधील दोन आमदार निवडून आलेले असल्याकारणाने जिल्ह्याला एक तरी स्थानिक मंत्री नेता गरजेचा असताना त्याची निवड न होणे.त्याची निवड होणे आवश्यक होते परंतु तसे झाले नाही.
राज्यातील महायुती सरकारने चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांना मंत्रिमंडळाला स्थान का दिले नाही ? हा आजच्या घडीला चर्चेचा विषय आहे आणि दोन्ही जिल्ह्यावर अन्याय करणारा निर्णय असल्यामुळे याचा महायुती सरकारने गांभीर्यपणे विचार करावा आणि दोन्ही जिल्ह्यांना मंत्रिमंडळात समावेश करून दोन्ही जिल्ह्यावर कुरघोडी ने केलेला अन्याय दूर करावा.
आष्टीत घडली खुनाची घटना, रशिदचा कुणी केला खून पोलीस तपास सुरू
आष्टी (प्रतिनिधी)# आष्टी येथे किरायाने वास्तव्यास असलेले रशीद अहमद शेख ,वय ६० वर्षे याचा अज्ञात इसमाने खून केल्याची घटना दिनांक १५ ला उघडकीस आली.
सदर वृत असे की रशिदने आपल्या नातेवाईकांना चार पाच दिवसांपूर्वी दूरध्वनी द्वारे मी गावाकडे येणार अशी माहिती दिली होती.त्यांनतर चार पाच दिवस लोटूनही तो न आल्यामुळे व त्याचा फोन न लागत असल्यामुळे नातलगांना शंका येऊन ते स्वतः नागपूर येथून आष्टीत दाखल झाले व त्याचा फोटो दाखवून सदर व्यक्ती कुठे असतो अशी विचारणा केली.तेव्हा काही चौकातील लोकांनी चामोर्शी मार्गावर असलेल्या खुशाल कुकुडकर यांच्या घरी किरायाने रहात असल्याचे समजले तेव्हा ते त्याठिकाणी गेले असता घराला बाहेरून कुलूप लावून दिसले तेव्हा खिडकी मधून डोकावून पाहले असता त्यांना आत रक्ताच्या थारोळ्यात तो पडलेला दिसला तेव्हा नातलगांनी पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना माहिती दिली.तेव्हा लगेच पोलीस घटनस्थळी दाखल झाले व कुलूप तोडून आतमध्ये बघितले असता रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला दिसून दुर्गंधी पसरलेली होती.त्यानंतर पोलिसांनी उपविभागीय अधिकारी अहेरी यांना पाचारण केले . त्यांनतर उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक आणि त्यांचे कर्मचारी घराच्या सभोवताल फिरुन चौकशी करण्याकरिता उघडलेल्या दारामधून घरात गेले व त्याचा मृतदेह शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.मृतदेहाची दुर्गंधी पसरल्याने ही घटना चार पाच दिवसांपूर्वीची असावी असे बोलले जात आहे. सदर व्यक्तीचा खुन का करण्यात आला व कुणी केला याचा तपास पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी तथा आष्टीचे पोलीस निरीक्षक विशाल काळे व त्यांची चमू करीत आहे. अजूनपर्यंत पूर्ण माहिती कळू शकली नाही.
Gadchiroli News: देसाईगंज शहराच्या गांधी वॉर्डात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. फर्निचर व्यावसायिक उमेश माधव शिंगाडे (वय 45) यांनी आपल्या दुकानातच गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी, 15 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता घडली.
उमेश शिंगाडे यांनी आपल्या घरापासून 300 मीटर अंतरावर भाड्याच्या खोलीत फर्निचरचे दुकान सुरू केले होते. नेहमीप्रमाणे, त्यांनी रविवारी सकाळी दुकान उघडले होते आणि सकाळपासून दुकानातच होते. मात्र, दुपारच्या सुमारास काही ग्राहक साहित्य खरेदीसाठी दुकानात गेले असता उमेश दिसले नाहीत. ग्राहकांनी दुकानाच्या आत पाहिले असता,सि लिंगला गळफनेल्या अवस्थेतआ ढळले.
तत्काळ देसाईगंज पोलिस स्टेशनला माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. ठाणेदार अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करत आहेत.
सध्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. उमेश शिंगाडे यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, आणि भाऊ आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या आत्महत्येचे कारण शोधणे ही पोलिसांसमोरील मोठी जबाबदारी ठरली आहे.
रेल्वे स्थानकावर असलेल्या प्रवासी शेडला लागली आग, मोठी दुर्घटना टळली.
प्रमोद झरकर उपसंपादक गड़चिरोली
वर्धा:- येथील मुख्य रेल्वे स्थानक संकुलाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या पॅसेंजर शेडला अचानक आग लागल्याने गोंधळ उडाला. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना बुधवार 11 रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. आगीत प्रवासी शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
प्राप्त माहितीनुसार, वर्धा रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ प्रवासी शेड बांधण्यात आले आहे. वर्धा- यवतमाळ रस्त्यावरील रेल्वे स्थानकाच्या मागील प्रवेशद्वाराजवळ हा प्रकार घडला. येथील तिकीट घर हे प्रवासी शेडला लागून आहे. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास या शेडला अचानक आग लागली. त्यावेळी आवारात अनेक प्रवाशांची ये-जा सुरू होती. आग लागताच सर्वत्र पळापळ सुरू झाली. आग विझवण्यासाठी रेल्वे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. वर्धा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा तपास वर्धा रेल्वे पोलिस करत आहेत.
पिकअप वाहनाने दिली दुचाकीला धडक दुचाकी स्वाराचा जागीच करुन अंत्य
जारावंडी
जारावंडी पासून सुमारे 6 किलोमिटर अंतरावर असलेल्या शिरपूर गावाजवळ दुचाकी आणि पिकअप वाहनाच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना घडली असून परिसरात शोककळा पसरवणारी ठरली आहे.
मृत व्यक्तीचे नाव प्रकाश उसेंडी वय 42 वर्ष असून ते शिरपूर (जारावंडी) गावचे रहिवाशी होते. प्रकाश हे परिसरात नावलौकिक प्राप्त समाजसेवक होते आणि त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे अनेकांच्या गळ्यातले ताईत होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.अपघातग्रस्त पिकअप वाहन हे पेंढरी येथील एका प्रचलित व्यापाऱ्याचे असल्याचे समजते. सदर घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक माहितीनुसार वाहनाच्या वेगामुळे हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
प्रकाश उसेंडी यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन लहान मुले आणि आई-वडील असा परिवार आहे. घरातील कर्ता व्यक्ती गमावल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रकाश हे त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक आधार होते, समोरचा तपास जारावंडी पोलीस करीत आहे
Weather Update: राज्यात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीने कहर केला आहे. शनिवारी राज्यात तापमानात मोठी घट झाली, तर पुढील काही दिवसांत तापमान आणखी कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
शनिवारी धुळे जिल्ह्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली, जे 4.4 अंश सेल्सिअस होते. जळगाव जिल्ह्यातही तापमान 8.4 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या जोरामुळे राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पुढील दोन दिवसांत पुणे आणि मुंबईसह संपूर्ण राज्यात कडक थंडी आणि धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुण्यात शनिवारी तापमानात लक्षणीय घट झाली, किमान तापमान 10.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. रविवारी सकाळीही मोठ्या प्रमाणात गारठा जाणवला आणि शहरभर धुके पसरले होते. थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवण्याचे दृश्य पाहायला मिळाले. पुढील पाच दिवस पुण्यात हवामान कोरडे राहील आणि तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात किमान तापमान 9 ते 10 अंशांवर आले आहे. पुढील काही दिवसांत थंडीची लाट आणखी तीव्र होणार असून ती 18 डिसेंबरपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही थंडी वाढत आहे. येत्या काही दिवसांत थंडी आणखी तीव्र होईल. कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील, मात्र थंडी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
IMD च्या मते, उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे तापमान घटत आहे. यासोबतच दक्षिण अंदमान समुद्र आणि लक्षद्वीप भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने राज्यातील थंडी वाढण्यास हातभार लागला आहे.
Vastu Tips: क्या आप जानते हैं कि घर में पैसे रखने का स्थान आपकी आर्थिक स्थिति पर गहरा असर डाल सकता है? वास्तु शास्त्र के अनुसार, घर के कुछ स्थान ऐसे होते हैं, जहां पैसा रखने से नकारात्मक ऊर्जा का संचरण होता है, जिससे गरीबी, कर्ज और अधिक खर्च जैसी समस्याएं उत्पन्न हो सकती हैं। यदि आप इस बारे में अनजान हैं, तो आइए जानते हैं वास्तु के अनुसार उन स्थानों के बारे में, जहां पैसे रखने से बचना चाहिए ताकि धन और समृद्धि हमेशा आपके साथ बनी रहे।
वास्तु शास्त्र में घर की तिजोरी का स्थान बहुत महत्वपूर्ण होता है। तिजोरी को हमेशा एक विशेष दिशा में रखना चाहिए। खासकर इसे अंधेरी जगह पर नहीं रखना चाहिए। अंधेरे स्थान पर तिजोरी रखने से घर में धन की कमी और आर्थिक परेशानियां आ सकती हैं। इसके अलावा, तिजोरी को किसी ऐसे स्थान पर भी न रखें, जहां हवा का संचार न हो, क्योंकि इससे भी आर्थिक संकट हो सकता है। वास्तु शास्त्र के अनुसार, तिजोरी का स्थान घर के उत्तर या उत्तर-पूर्व दिशा में होना चाहिए, क्योंकि इन स्थानों पर सकारात्मक ऊर्जा का प्रवाह होता है, जो धन और समृद्धि को आकर्षित करता है।
घर में पैसे रखने का एक और स्थान जिसे वास्तु शास्त्र में गलत माना जाता है, वह है दीवार के पास। खासकर यदि आपके घर में शौचालय या बाथरूम दीवार के पास स्थित हो, तो वहां पैसे रखना अत्यधिक शुभ नहीं माना जाता। वास्तु के अनुसार, ऐसी जगहों पर पैसा रखने से यह धीरे-धीरे खत्म हो जाता है और फिजूलखर्ची बढ़ती है। इसके परिणामस्वरूप आर्थिक संकट और धन की कमी का सामना करना पड़ सकता है। इसलिए, वास्तु शास्त्र के अनुसार, धन को शौचालय या स्नानघर से दूर रखना चाहिए।
वास्तु के अनुसार, दक्षिण दिशा में पैसा रखना भी गलत माना जाता है। दक्षिण दिशा को यम स्थान माना जाता है, और यहां पैसा रखने से घर में दरिद्रता और धन की कमी हो सकती है। दक्षिण दिशा में धन रखने से आर्थिक तंगी और दरिद्रता के साथ-साथ परिवार की खुशियों पर भी असर पड़ सकता है। इसलिए, वास्तु शास्त्र के अनुसार, घर में धन रखने के लिए उत्तर, उत्तर-पूर्व और पूर्व दिशा सबसे उपयुक्त मानी जाती हैं। ये दिशाएं सकारात्मक ऊर्जा से भरी रहती हैं और घर में समृद्धि और खुशहाली लाती हैं।
शुल्लकचव्या वादातून सख्या लहान भावानेच मोठ्या भावाला पाठविले यमसदनी
छत्रपती संभाजीनगर:- घरगुती वाद विकोपाला जाऊन
छोट्या भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना कुंभेफळ तालुका छत्रपती संभाजीनगर येथे गुरुवारी रात्री घडली. सुनील भाऊसाहेब पवार (३४) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी पोलिसांना याबाबत माहिती मिळाली.सुनील भाऊसाहेब पवार आणि राजू भाऊसाहेब पवार (३०) हे दोघे भाऊ कुंबेफळ येथे राहत. दोघे सख्खे भाऊ मजुरीचे काम करूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह करत. मात्र, अचानक त्यांच्यात कौटुंबिक वादाने कटुता आली. गुरुवारी रात्री वाद विकोपाला जाऊन राजू याने मोठा भाऊ सुनील याचा खून केला. माहिती मिळताच करमाड पोलिस ठाण्याचे फौजदार प्रताप नवघरे हे आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी राजू पवार याला कुंभेफळ परिसरातून ताब्यात घेतले. नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करमाड पोलीस ठाण्यात सुरू आहे.
परीक्षा केंद्रावर विद्यार्थी पेपर लिहित असताना अचानक झाला मृत्यू
बीड:- वर्गात पेपर लिहिता लिहिता एका विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. विद्यार्थ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर शिक्षकांनी तातडीने त्याला दवाखान्यात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच मृत्यूने त्याला गाठले. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.बीएससची परीक्षा देताना परीक्षा कक्षातच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीडच्या के एस के महाविद्यालयात घडली. सिद्धार्थ राजेभाऊ मासाळ (वय २४) असे मृत परीक्षार्थी विद्यार्थ्याचे नाव आहे. परीक्षा सुरू असताना अचानक हा विद्यार्थी कोसळला. त्यावेळी परीक्षा केंद्रावरील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी दवाखान्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापूर्वीच त्याने जगाचा निरोप घेतला.बीड शहरातील सावरकर महाविद्यालयात सिद्धार्थ बीएससी तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तो दिल्ली येथे अभ्यास करत होता. परीक्षा असल्याने तो बीडमध्ये आला. आज सकाळी बीएससीची परीक्षा के एस के कॉलेजला तो परीक्षेसाठी आला होता परीक्षा देत असताना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. शिक्षकांना ही माहिती समजल्याबरोबर त्यांनी तात्काळ हॉस्पिटलला घेऊन आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. त्याचे वडील खाजगी गाडीवर चालक आहेत. तर आई एका दुकानात काम करते. अचानक ही घटना घडल्याने नातेवाईकांना धक्का बसला आहे. शिवाय, परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Sarkari Yojana: शेतीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळालाय. रिझर्व्ह बँकेनं (RBI) शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी कर्जाची मर्यादा 2 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मर्यादा 1.6 लाख रुपये होती. या बदलाची घोषणा कृषी मंत्रालयाने शनिवारी केली, आणि ही नवी मर्यादा 1 जानेवारी 2025 पासून लागू होईल.
आरबीआयनं 2010 मध्ये शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रासाठी विनागॅरंटी कर्ज देण्यास सुरुवात केली. त्यानंतर 2019 मध्ये ही मर्यादा 1.6 लाख रुपये केली गेली होती. आता, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आरबीआयने दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची घोषणा केली आहे. ही सुधारित मर्यादा शेतकऱ्यांना नक्कीच फायद्याची ठरणार आहे, कारण शेतीतील खर्च महागाईमुळे वाढले आहेत.
या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना होईल, असा अंदाज आहे. या कर्जावर शेतकऱ्यांना कमी व्याजदर लागेल, जेव्हा ते 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतात. या कर्जावर 4% टक्के व्याज आकारले जाईल. यामुळे लघु आणि मध्यम शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या खर्चाची झळ कमी होईल.
कृषी क्षेत्राला वित्तीय सहाय्य देण्यासाठी सुधारित व्याज सवलत योजनांनुसार शेतकऱ्यांना अतिरिक्त सवलती दिल्या जात आहेत. या योजनेतून शेतकऱ्यांना फसल उत्पादनासाठी तसेच शेतीसंबंधी इतर आवश्यक खर्चासाठी मदत मिळेल.
केंद्र सरकार शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दोन हजार रुपयांच्या किमतीत आर्थिक मदत देते. याशिवाय, काही राज्य सरकारं शेतकऱ्यांना अधिक सहाय्य देण्यासाठी अतिरिक्त निधी प्रदान करतात.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.