PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 12, 2024   

PostImage

पोलीस ठाण्यात नागरिकांना भीती नाही तर न्याय मिळावा


 

नाशिक : नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उ‌द्घाटन फीत कापून गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांच्यासमवेत मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री दादा भूसे उपस्थित होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलीस ठाण्यात नागरिकांना भीती नाही तर न्याय मिळावा हा आमचा प्रयत्न आहे,असे प्रतिपादन गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

 

 

देवेंद्र फडणवीसांनी पोलीस ठाण्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी स्वतः पोलीस ठाण्यातील खुर्चीवर बसत 'मी अपेक्षा करतो हे पोलीस ठाणे जनसामान्यांना न्याय देण्याचे काम करेल, असे लिहीत पोलीस दलाला शुभेच्छा दिल्या आहेत. पोलीस ठाण्याच्या आकृतीबंधासाठी नवीन नियम,

 

पोलीस स्टेशनही वाढवण्यात येतील. सीसीटीएनएस प्रणालीच्या माध्यमातून सर्व कामकाज ऑनलाईन झाले आहे. कोणालाही एफआयआरमध्ये बदल करता येत नाही. नुसती चांगली बिल्डिंग करून फायदा नाही, पीआयला सांगतो ईथे कामही चांगल व्हायला पाहिजे. कामही सुंदर केले पाहिजे. नाशिकचे सीपी चांगले काम करतायत, गुंड गुंडगिरी करणार नाही, यासाठी ते काम करतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 19, 2024   

PostImage

२० विद्यार्थिनींसोबत केले अश्लील वर्तन


नाशिक : जिल्ह्यातील एका आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनी प्रसूत झाल्याची घटना ताजी असतानाच आदिवासी विकास विभागाच्या आणखी एका एकलव्य निवासी शाळेतील इयत्ता सातवीतील १५ ते २० विद्यार्थिनींशी तेथील शिक्षकाने अश्लील वर्तन केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल आदिवासी विभागाने घेतली असून, संबंधित शिक्षकास तडकाफडकी निलंबित करण्यात आले, तर दोन शिक्षिकांची नियुक्तीदेखील रद्द करण्यात आली.

 

जिल्ह्यातील एका आदिवासी एकलव्य निवासी शाळेतील शिक्षक विद्यार्थिनींना शिकवण्याच्या बहाण्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श करीत होता. त्याच्याकडून असे प्रकार वारंवार सुरू होते. सुरुवातीला या मुलींनी फारसे लक्ष दिले नाही; परंतु काही मुलींनी धाडस करून पालकांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. याप्रकरणी कळवण प्रकल्प कार्यालयाच्या विशाखा समितीने चौकशी केली.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 31, 2023   

PostImage

संभाजी ब्रिगेर्डसह वंचीतने उधळला मुक्त विद्यापीठातील कलश पूजनाचा कार्यक्रम


 

अयोध्येतील राममंदिराकडे जाण्यासाठी निघालेल्या मंगल कलशाची पूजा होत असताना त्यासाठी यशवन्तराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित मंगल पूजनाचा कार्यक्रम वंचीत बहुजन आघाडीसह संभाजी ब्रिगेर्डच्या कार्यकर्यांनी उगळून लावला . 

रामाला आमचा विरोध नाही . मात्र विद्यापीठ शासकीय जागा असून त्या ठिकाणी हा कार्यक्रम कसा घेतला जातो याबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले . 

नाशिकमध्ये येणाऱ्या या मंगल कलशाचे ठिकठिकाणी स्वागत करण्याचे कार्यक्रम शनिवारी नासिक शहरात आयोजित करण्यात आले होते . त्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विंनती केल्यामुळे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यासाठी विद्यापीठाच्यावतीने सगळ्यांना आमंत्रणही पाठविण्यात आले होते . मंगल कलश ठेवल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होण्यासाठी कांही अवधी शिल्लक असतानाच दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळी येत या कार्यक्रमाला आक्षेप घेतला . त्यानंतर थोड्याच वेळात हा कार्यक्रम आवरण्यात आला . यासंर्भात विद्यापीठाच्यावतीने उशिरापर्यंत कोणतीही भूमिका मांडण्यात आली नव्हती . 

मंगल कलश अक्षदा कार्यक्रम धार्मिक असताना शासकीय जागेत त्याचा कार्यक्रम घेता येणार नाही अशी भूमिका घेत या कार्यक्रमाला आमचा विरोध नाही , मात्र त्यासाठी जागा चुकीची आहे . जर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे त्यासाठी जागा नसेल तर आम्ही जागा उपल्ध करून देऊ . अशी भूमिका घेत त्यांनी हा कार्यक्रम उधळून लावला . त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सदस्य चेतन गांगुर्डे , संभाजी ब्रिगेर्डचे संतोष गायधनी यांसह पदाधिकारी उपस्थित होते . 

मुक्त विद्यापीठाची जागा प्रशासकीय आहे . भारतीय राज्यघटनेच्यता सूचनांनुसार अशा ठिकाणी धरणीक कार्यक्रम घेता येत नाही . विद्यापीठाने त्यासाठगी परिपत्रक कसे काढलं? यासंदर्भात तक्रार करण्यात येऊन पुढील कारवाईसाठी आम्ही प्रयत्न करणार असून कुलगुरूंना राज्यघटनेची प्रथा देणार आहोत असे चेन गांगुर्डे यांनी सांगितले . 

-०-