PostImage

Vaingangavarta19

Yesterday   

PostImage

आष्टी येथील हरीश चायनीज सेंटरला लागली आग, वेळीच अग्निशमन पोहचल्याने …


आष्टी येथील हरीश चायनीज सेंटरला लागली आग, वेळीच अग्निशमन पोहचल्याने मोठा अनर्थ टळला 


आष्टी :-
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील हरीश चायनीज सेंटरला आग लागली मात्र वेळीच अग्निशमन पोहोचले व मोठा अनर्थ टळला ही घटना आज दि.२ जानेवारी ला दुपारच्या सुमारास घडली 
 आष्टी येथील प्रकाश बोभाटे यांचे भाडेकरू हरीश विश्वास यांचे हरीश चायनीज सेंटर आहे दुपारच्या सुमारास सिलेंडर च्या गॅस गळतीमुळे आग लागली तेव्हा आष्टी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न चालविले होते तेव्हा 
घटनेचे गांभीर्य ओळखून 
श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टीचे अध्यक्ष पवन  रामगिरकर ,सचिव संदीप  तिवाडे, कोषाध्यक्ष देवाभाऊ बोरकुटे, प्रणय व्‍यंकटी बुर्ले  जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस   यांनी  लायड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर  एस.व्येकटेश्वरन यांच्याशी संपर्क करून तात्काळ अग्निशामक वाहनाला घटनास्थळी पाठविण्याचे माहिती दिली  त्यावेळी एस व्यंकटेशवरण  यांनी कर्मचारी मृणाल वाकुडकर व अग्निशमन दलाची गाडी व  कर्मचारी यांना पाठवून आग विझविली  लायड्स मेटल्स यांच्या मदतीने एक मोठा भीषण अपघात होता होता वाचलेला आहे.


PostImage

Vaingangavarta19

Yesterday   

PostImage

वेमुलवाडा येथे देवदर्शनासाठी जात असलेल्या वाहनाच्या अपघातात एका महीलेचा मृत्यू …


वेमुलवाडा येथे देवदर्शनासाठी जात असलेल्या वाहनाच्या अपघातात एका महीलेचा मृत्यू तर पंधरा जण गंभीर जखमी

 

अहेरी : 
वेमुलवाडा येथे देवदर्शनासाठी जात असलेल्या वाहनाच्या अपघातात एका महीलेचा मृत्यू तर पंधराजन गंभीर झाल्याची घटना घडली 
अहेरी तालुक्यातील वेलगूर येथील कांताबाई सूर्यभान मराठे असे मृत महिलेचे नाव आहे वेलगूर येथील मजूर तेलंगणा राज्यातील करीमनगर येथे कापूस वेचणीसाठी गेले होते. काल नवीन वर्षच्या निमित्याने देवदर्शनसाठी वेमूलवाडा येथे जात असतांना चार चाकी वाहनाचा सिरसिल्ला जवळ अपघात झाले होते. या अपघातात कांताबाई मराठे यांचा जागीच मृत्यू झाला.

विशेष म्हणजे कांताबाई मराठेसह वेलगूर येथील आनंदराव मराठे, गंगुबाई मराठे, कविता पालोजवार, रेखा गाताडे, लक्षमीबाई मंडरे, वनिता सातारे, भिकू सातारे, उषा मराठे, सुनंदा राऊत, माया मराठे, ज्योती मराठे, विमल मराठे, निर्मला मंडरे, सुधाकर गदेकर, सुरेखा गदेकर हे सर्व कापूस वेचणीसाठी घेले होते. या सर्वांनी देवदर्शनसाठी जात असतांना हा अपघात झाला. अपघातात कांताबाई जागीच ठर झाल्या आणि इतर पंधरा जण गंभीर जखमी झाले त्यांना करीमनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे 

या गंभीर अपघाताची माहिती गावाकडे नातेवाईकांना मिळाली  मात्र त्यांना करीमनगर जाण्यासाठी आणि तिकडे उपचारासाठी होणाऱ्या खर्चासाठी खूप अडचण भासत होती. त्यावेळी त्या नातेवाईकांनी आविसं, काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांचा भेट घेऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सांगितली तेव्हा कंकडालवारांनी त्या नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती बघून त्यांना जाण्यासाठी तसेच दवाखान्यात उपचारासाठी आर्थिक मदत केली आहे.

यावेळी मदत करतांना अजय कंकडालवार सोबत अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मारपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, राकेश सडमेक, प्रमोद गोडसेलवार, प्रकाश दुर्गे आदी उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Yesterday   

PostImage

जन्मदात्या आई वडिलांची मुलानेच केली निघृण हत्या


  जन्मदात्या आई वडिलांची मुलानेच केली निघृण हत्या

 

नागपूर 

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर दुहेरी हत्याकांडाने हादरले आहे. मागील काही दिवसांपासून नागपूर शहरात सुरू असलेल्या हत्याच्या घटनेमुळे नागपूरकर दहशतीत आहेत.नागपूर शहरातील कपिल नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका इंजिनिअर मुलाने आपल्या जन्मदात्या आई - वडिलांची निघृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना खसाळा कॅम्पसमध्ये घडली असून लीलाधर डाखोडे आणि अरुणा डाखोडे अशी हत्या करण्यात आलेल्याची नावे असून आरोपी हा त्याचाच मुलगा उत्कर्ष डाखोडे आहे.

प्राप्त माहितीनुसार, हत्या करण्यात आलेले लीलाधर डाखोडे हे कोराडी थर्मल प्लांटमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करतात. तर अरुणा डाखोडे या विनोबा भावे नगर येथील एका खाजगी शाळेत प्राथमिक शिक्षिका होत्या. आरोपी उत्कर्ष हा 6 वर्षांपासून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. वारंवार अपयश आल्याने उत्कर्षच्या पालकांनी अभ्यास सोडून शेती करण्याचा सल्ला देत होते. पण उत्कर्ष अभियांत्रिकी पूर्ण करण्याच्या त्याच्या आग्रहावर ठाम होता. मात्र आरोपी उत्कर्षला एमडीचे व्यसन होते आणि या व्यसनामुळे त्याला अभ्यास करता येत नव्हता. आई- वडिलांच्या सततच्या समजुतीमुळे तो चिडला आणि रागाच्या भरात त्याने आपल्या आई-वडिलांची हत्या करण्याचा घातक प्लॅन केला.हत्या करण्यापूर्वी आरोपी उत्कर्ष याने 26 डिसेंबरला सकाळच्या सुमारास आपली धाकटी बहीण सेजल हिला कॉलेजला सोडले होते. सेजल BAMS चे शिक्षण घेत होती आणि ती वर्धा रोडवर असलेल्या कॉलेजमध्ये जाते.

उत्कर्षने बहिणीला कॉलेजला सोडल्यानंतर खासाळ येथील आपल्या घरी पोहोचला, तिथे 1.00 वाजताच्या दरम्यान त्याने प्रथम आपल्या जन्मदात्या आई अरुणाचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तो आपल्या वडिलांची घरी येण्याची वाट पाहू लागला. 5.00 वाजताच्या दरम्यान वडील लीलाधर त्यांच्या ड्युटीवरून घरी आले त्याचवेळी आरोपी मुलाने आपल्या वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. दोन्ही हत्या केल्यानंतर आरोपीने घराला कुलूप लावून वडिलांची गाडी आणि मोबाईल फोन घेऊन कोराडी येथे राहणाऱ्या आपल्या मामाकडे गेला आणि तेथून आपल्या बहिणीला फोन करून सांगितले की तो काही दिवसांसाठी ध्यान करायला बंगलोरला जात आहे व बहिणीला काकाकडे सोडून दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्कर्ष मंगळवारी रात्री त्यांच्या घरी आला आणि त्याने जोरात दरवाजा ठोठावण्याचा बहाणा केला. त्यानंतर बुधवारी सकाळी ते पुन्हा कोराडीला काकांकडे झोपायला गेले असता, शेजाऱ्यांना उग्र वास येऊ लागल्याने त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून आत तपासले असता घरभर रक्ताने माखलेले अरुणा व लीलाधर यांचे मृतदेह अखंड अवस्थेत आढळून आले. प्राथमिक तपासादरम्यानच खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यामुळे पोलिसांनी उत्कर्षला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या आई- वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी उत्कर्षला अटक केली असून पोलीस घटनेचा पुढील अधिक तपास आहे.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Yesterday   

PostImage

सावधान ! समोर धोखा आहे


गडचिरोली हा उद्योग विरहित जिल्हा म्हणून नावारूपास आलेला जिल्हा आहे आणि अशा उद्योग विरहित जिल्ह्यात आता एमआयडीसी निर्माण करून या जिल्ह्यामध्ये उद्योग निर्मितीला सुरुवात झालेली आहे.परंतु एकीकडे उद्योगपती निर्माण होणार आहे तर दुसरीकडे या या भागातील शेतकरी संपूर्णपणे जमीन दस्त होणार आहे,कारण शेतकऱ्यांच्या जमिनी आता उद्योगपत्यांच्या दावणीला बांधले जाणार आहे.

मान्य आहे उद्योग निर्मिती करण्याची म्हटल्या करायची म्हटल्यावर जमीन पाहिजे आहे परंतु उद्योग निर्मितीसाठी शेतकरी नागडा होणार आहे,म्हणजे त्याच्या पोटाची भाकर हिरावली जाणार आहे.उद्योगपती शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेणार आहे त्या बदल्यात त्यांना पैसे देणार आहे परंतु पैसा काही टिकून राहणारी वस्तू नाही.म्हणजे या भागातील शेतकरी हा नागडा होऊन एक दिवस रस्त्यावरती येण्याचा प्रकार आहे.

 ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगपती खरेदी करणार आहे त्या कुटुंबातील एकाला नोकरी मिळेल या गोष्टी आपण मान्य करू परंतु एका बापाला तीन मुले आहेत तर तिन्ही मुली-मुलांना नोकरी मिळणार नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि समजा नोकरी मिळाली तर त्याचा पद कोणता मिळेल हे मात्र नक्की सांगता येणार नाही,कारण कौशल्य विकासावर शिक्षण घेणारी विद्यार्थी बोटावर मापन इतपत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या नशिबी कंपनी मधल्या टीकास आणि पावडा घेऊन दिवसभर राब राब राबण्याचं काम मिळणार आहे,म्हणजे पोटाची भाकर जाणारच आहे आणि तूट पूजा पगाराची नोकरी देऊन सांत्वन करण्याचा प्रकार आहे.

  गडचिरोली हा जंगलाने व्यापलेला जिल्हा आहे.जल,जंगल व जमीन हा या जिल्ह्याचा नारा आहे आणि हा नारा उद्योगपतीच्या दावणीला बांधला जाणार आहे.म्हणजे मुळासकट उकडून फेकल्या जाण्याचा प्रकार आहे.एवढ्या मोठ्या जंगलाने व्यापलेला जिल्हा आहे तर इथले उद्योग सुद्धा जंगलाशी निगडित असायला पाहिजे म्हणजे जमीन अबाधित राहिली असती.शेतकरी रस्त्यावर आला नसता,जंगल जसेच्या तसे राहिले असते आणि समोर गडुळ होणारा पाणी सुद्धा शुद्ध राहिला असता.म्हणजे साप मेला असता आणि काठी सही सलामत राहिली असती,परंतु समोर धोका आहे ! 


PostImage

Jitesh Chouhan

Yesterday   

PostImage

Success Story: इंजीनियर की नौकरी छोड़, शुरू किया कुछ ऐसा, …


Success Story: पुणे से करीब 90 किलोमीटर दूर स्थित दौंड के रहने वाले समीर डोंबे Sameer Dombe ने वह कर दिखाया, जिसकी किसी को उम्मीद नहीं थी। मैकेनिकल इंजीनियरिंग में नौकरी छोड़कर उन्होंने अंजीर Fig की खेती में कदम रखा और आज सालाना 1.5 करोड़ रुपये का कारोबार खड़ा कर लिया है। पारंपरिक खेती को आधुनिक दृष्टिकोण के साथ अपनाते हुए समीर ने सुपरमार्केट और ऑनलाइन प्लेटफॉर्म्स के जरिए अंजीर Fig बेचने का नया तरीका अपनाया। उनकी इस अनोखी पहल ने उन्हें सफलता की नई ऊंचाइयों तक पहुंचाया।

 

परिवार के खिलाफ लिया बड़ा फैसला

समीर Sameer Dombe ने 40,000 रुपये महीने की नौकरी को छोड़कर खेती करने का साहसिक निर्णय लिया। हालांकि, उनके परिवार और दोस्तों ने उनके इस फैसले का विरोध किया। परिवार को डर था कि खेती में वह सफल नहीं होंगे और उनकी सामाजिक प्रतिष्ठा पर असर पड़ेगा। लेकिन, समीर अपने फैसले पर अडिग रहे। उन्होंने अपने पारंपरिक व्यवसाय को आधुनिक तरीकों से आगे बढ़ाने की ठानी।

 

खेती में किया नया प्रयोग

समीर Sameer Dombe के लिए खेती नई नहीं थी, क्योंकि उनका परिवार पहले से ही खेती करता था। उन्होंने 2.5 एकड़ जमीन में अंजीर की खेती शुरू की। बाजार में सीधे फल बेचने के बजाय उन्होंने अंजीर को 1 किलो के पैकेट में पैक कर सुपरमार्केट में बेचना शुरू किया। 'पवित्रक' ब्रांड के नाम से अंजीर बेचते हुए समीर ने पुणे, मुंबई, दिल्ली और बेंगलुरु जैसे बड़े शहरों में अपनी पहचान बनाई। ग्राहकों से सीधे जुड़ने के लिए उन्होंने पैकेट पर अपना संपर्क नंबर दिया, जिससे उन्हें बल्क ऑर्डर मिलने लगे।

 

लॉकडाउन के दौरान भी कमाई जारी

जब लॉकडाउन के दौरान कई व्यवसाय ठप हो गए थे, तब भी समीर Sameer Dombe ने ऑनलाइन ऑर्डर के जरिए लाखों रुपये कमाए। उन्होंने वॉट्सऐप और अन्य ऑनलाइन माध्यमों से सीधे ग्राहकों तक पहुंच बनाई। इस दौरान उन्होंने 13 लाख रुपये का व्यापार किया।

दौंड क्षेत्र की भौगोलिक स्थितियां अंजीर की खेती के लिए आदर्श हैं। यहां की मिट्टी, जल निकासी और वाष्पीकरण स्तर अंजीर की बेहतर पैदावार सुनिश्चित करते हैं। समीर ने इस क्षेत्र की विशेषताओं का पूरा लाभ उठाया और अंजीर की खेती को एक नया आयाम दिया।


PostImage

Dipak Indurkar

Yesterday   

PostImage

CBSE Recruitment 2025: 12वी पास उमेदवारांसाठी नवीन वर्षात सरकारी नोकरीची …


CBSE Recruitment 2025: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत खास ठरणार आहे. सरकारी नोकरी ही लाखो लोकांसाठी स्थैर्य आणि सुरक्षिततेचे प्रतीक आहे. अशा वेळी केंद्रिय माध्यमिक शिक्षक मंडळाने (CBSE) मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे, जी अनेक तरुणांसाठी नोकरी मिळवण्याची संधी देणार आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

चला तर मग जाणून घेऊया या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करता येईल. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, तसेच अर्ज प्रक्रिया कशी असेल याची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

 

भरतीचा तपशील:

सीबीएसईने ज्युनिअर असिस्टंट आणि सुपरिटेंडेंट पदांसाठी 212 रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

  • सुपरिटेंडेंट पदे: 142
  • ज्युनिअर असिस्टंट पदे: 70

 

शैक्षणिक पात्रता:

  • सुपरिटेंडेंट पदासाठी: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदवी आवश्यक.
  • ज्युनिअर असिस्टंट पदासाठी: 12वी पास असणे आवश्यक.

याशिवाय, उमेदवाराला हिंदी आणि इंग्रजी टायपिंगमध्ये प्रवीणता असावी.

 

वयोमर्यादा:

  • ज्युनिअर असिस्टंट: 18 ते 27 वर्षे.
  • सुपरिटेंडेंट: 18 ते 30 वर्षे.

आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

 

अर्ज प्रक्रिया:

इच्छुक उमेदवारांना 31 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट www.cbse.gov.in ला भेट द्या.

भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्णतः वाचून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरा.

सरकारी नोकरीसाठी पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करून अर्ज करा आणि आपल्या करिअरला नवीन दिशा द्या!

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

Blogs with Nili

Yesterday   

PostImage

Bhandara News: थरारक घटना! बारच्या काउंटरवरच तरुणाच्या डोक्यात घातला सत्तूर


Bhandara News: नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातील बार आणि हॉटेल्समध्ये लगबग सुरू असताना, शास्त्री चौकातील एका बारमध्ये एक थरारक घटना घडली. काउंटरवर दारू पित बसलेल्या इम्रान इस्माईल शेख (वय 35, राहणार मेंढा) या तरुणावर चौघांनी सत्तूरने हल्ला केला. या हल्ल्यात इम्रान गंभीर जखमी झाला असून, सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

31 डिसेंबरच्या रात्री इम्रान बारच्या काउंटरवर दारू पित बसलेला असताना, प्रभाकर ऊर्फ कम्पो श्याम चंदनबाटवे (वय 23), विवेक ऊर्फ डोमा विदेश कोडापे (वय 19), अविनाश ऊर्फ अवि अमरसिंग धोत्रे (वय 24) आणि त्यांच्या आणखी एका साथीदाराने बारमध्ये प्रवेश केला. सर्वजण शस्त्रास्त्रांनी सज्ज होते. त्यांनी सत्तूरने इम्रानच्या डोक्यावर वार केला.

हल्ला एवढा जबरदस्त होता की इम्रान रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला, मात्र त्यापैकी एकाने सत्तूर घटनास्थळीच टाकून दिला, जो पोलिसांनी जप्त केला आहे.

31 डिसेंबरच्या रात्री घटना केल्यानंतर चौघेही पळून गेले. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, ते बायपास मार्गावर लपून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून तिघांना रात्री दोन वाजता अटक करण्यात आली. मात्र, चौथा आरोपी अद्याप फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

बारमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या चौघांवरही भारतीय न्याय संहितेच्या कलम 109 आणि 3 (5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

वर्षभरापासून होता वादा

इम्रान आणि प्रभाकर यांच्यात गेल्या वर्षभरापासून वाद सुरू होता. या वादातून ते नेहमीच एकमेकांना धमक्या देत असत. इम्रान हा नेहमी शास्त्री चौकातील बारमध्ये बसून ग्राहक व्यवस्थापन पाहत असे. घटनेच्या दिवशीही तो काउंटरवर दारू पित बसलेला असताना, या चौघांनी त्याच्यावर हल्ला करण्याची संधी साधली.

हल्ल्यानंतर इम्रानला प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्याच्या गंभीर अवस्थेमुळे नातेवाईकांनी त्याला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले.


PostImage

Zadipatti VC News and Business

Yesterday   

PostImage

सिरोंचा येथे भाजपा सदस्य नोंदणी कार्यशाळा


दिं.०१ जानेवारी २०२५

सिरोंचा येथे भाजपा सदस्य नोंदणी कार्यशाळेला आले असता यावेळी मा. खा. अशोकजी नेते यांचा चेनूर तेलंगणा येथे सत्कार करण्यात आले.

चेनूर, तेलंगणा -भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा  माजी खासदार अशोकजी नेते यांचा चेनूर येथील न.प.चे चेअरमन नवाज उद्दीन साहेब यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांसह भव्य सत्कार करण्यात आले.

 या प्रसंगी उद्या, दिनांक ०२ जानेवारी २०२५ रोजी सिरोंचा येथे होणाऱ्या भाजपा सदस्य नोंदणी मोहिमेची व कार्यशाळेत येण्याची ही  घोषणा याप्रसंगी करण्यात आली.

यावेळी  जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्रजी ओल्लालवार, जिल्हा उपाध्यक्ष दामोदर एरिगेला, चेनूर न.प.चे चेअरमन नवाज उद्दीन, माजी सरपंच सादनबोईन कृष्णा,भाजपाचे युवा नेते शारिक भाई तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते..


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 1, 2025   

PostImage

तब्बल 11 नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण


गडचिरोली : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला. मागील ३८ वर्षापासून नक्षल चळवळीत सक्रिय असलेली जहाल नक्षलवादी, दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य आणि नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य भूपती याची पत्नी विमला सिडाम उर्फ तारक्का हिच्यासह ११ नक्षलवाद्यांनी बुधवारी गडचिरोली पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्यात १ डीकेएसझेडसीएम, ३ डीव्हीसीएम, २ एसीएम व ४ दलम सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण ८६ लाख ५ हजार रुपयांचे बक्षीस होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांना संविधानाची प्रत देऊन त्यांचा सत्कार केला.

 

 

दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य तारक्का ही मागील ३८ वर्षापासून नक्षल चळवळीत होती. नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य भूपती याची ती पत्नी आहे. तिच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस होते. विमला चंद्रा सिडाम उर्फ तारक्का उर्फ वत्सला उर्फ तारा डीकेएसझेडसीएम, सुरेश उईके उर्फ चैतू उर्फ बोटी, डीव्हीसीम कुतुल एरिया कमिटी व त्याची पत्नी कल्पना गणपती तोर्रेम उर्फ भारती उर्फ मदनी (डीव्हीसीएम), अर्जुन तानू हिचामी उर्फ सागर उर्फ सुरेश डीव्हीसीएम राही दलम व त्याची पत्नी सम्भ पांडू मट्टामी उर्फ बंडी (एसीएम डी. के. झोन डॉक्टर टीम), वनिता सुकलू धुर्वे उर्फ सुशीला (एसीएम भामरागड दलम), निशा बोडका हेडो उर्फ शांती उपकमांडर पेरमिली दलम, श्रुती उलगे हेडो उर्फ मन्ना, सदस्य कंपनी क्रमांक १०, शशिकला पतीराम धुर्वे पश्चिम सबझोनल प्रेस टीम सदस्य, सोनी सुक्कू मट्टामी राही दलम सदस्य, आकाश सोमा पुंगाटी उर्फ वत्ते सदस्य प्लाटून नंबर ३२ यांचा आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.

 

 

संविधानविरोधी आणि देशविरोधी कृत्यामुळे आपला विकास होत नाही, हे नक्षलवाद्यांच्या लक्षात आल्यामुळे अनेक जण देशाची व्यवस्था आणि संविधानावर विश्वास ठेवून मुख्य प्रवाहात येत आहेत, असे फडणवीस म्हणाले. जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग करीत असलेल्या विकासकामांमुळे मागील चार वर्षात नक्षल चळवळीत एकही नवीन भरती झाली नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याप्रसंगी विविध चकमकींमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.

 

कोण आहे तारक्का?

६२ वर्षीय तारक्का नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य तसेच दंडकारण्य विभागाच्या वैद्यकीय पथकाची प्रमुख होती. अहेरी तालुक्यातील किष्टापूर येथील मूळ रहिवासी असलेली तारक्का ही मागील ३८ वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रिय होती. तिची प्रचंड दहशत होती. अनेक चकमकी आणि खुनांमध्ये तिचा सहभाग होता.

 

लाहेरी-मलमपोडूर चकमकीचे नेतृत्व

८ नोव्हेंबर २०१० रोजी लाहेरी-मलमपोडूर गावांमध्ये झालेल्या चकमकीत १७ पोलीस शहीद झाले होते. या चकमकीचे नेतृत्व तारक्काने केले होते. शिवाय त्याची चित्रफितही तिने प्रसारित केली होती. या चकमकीच्या वेळी नक्षलवाद्यांनी सामान्य महिला व पुरुषांच्या वेशभूषेत पाने तोडत असल्याचे भासवून पोलिसांवर हल्ला केला होता. भामरागड आणि एटापल्ली तालुक्यातील दुर्गम गावांमधील आदिवासींमध्ये तारक्का सामान्य महिलेसारखी वावरत असे. त्यामुळे तिच्यावर कुणी संशयही घेत नसे. परंतु वय वाढल्याने मागील काही वर्षांपासून ती अबुजमाडमध्ये वास्तव्यास होती.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 1, 2025   

PostImage

तर मग विजय वड्डेट्टीवारांचे ते आरोप बिन बुडाचे !


बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड्यात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू वाल्मीक कराड यांच्यावर आरोप करण्यात आला आणि वाल्मीक कराड स्वतः पुणे येथे पोलिसांसमोर शरांगती पत्करले.

 संतोष देशमुख हत्याकांडातील सर्व पुरावे धनंजय मुंडे यांनी नष्ट केले आणि नंतरच वाल्मीक कराड आत्मसमर्पण केले असा आरोप राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला मग वडेट्टीवार यांच्या आरोपात तथ्य आहे काय ? किंवा वडेट्टीवार यांचे आरोप बिन बुडाचे आहेत काय ?तर मग या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हायला पाहिजे तरच आरोपात तथ्य आहे.

तरच सत्य जनतेसमोर येईल आणि तपास योग्य रीतीने झाला नाही तर सत्य जनतेसमोर येणार नाही.सत्य समोर यायलाच पाहिजे कारण राज्यात दिवसा ढवळे होणारे हत्याकांड यावर आळा बसेल की नाही तर असले प्रकार दिवसेंदिवस वाढत जाणारेच ठरणार आहेत का,असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

 शेळी जाते जीवाशी अन खाणारा म्हणतो वातड असल्या प्रकारची पुनरावृत्ती होऊन राज्यात जाती-जातीमध्ये मतभेद निर्माण होऊन दंगली घडायला फारसा वेळ लागणार नाही.मग एक दिवस महाराष्ट्र देखील युपी बिहार युपी बिहार या राज्याशी तुलना होण्यास विलंब लागणार नाही महत्त्वाचं कारण हेच आहे की अशा पद्धतीने खून दरोडे बलात्कार होत राहिले तर नीर अपराध लोकांना नाहक आपला जीव गमवावा लागेल आणि तसं झालं तर फक्त पश्चातापाशीवाय दुसरा कोणताच पर्याय उरलेला नसेल.

|| तुका म्हणे उभे रहा,जे जे होते ते ते पहा ||


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 1, 2025   

PostImage

बैलबंडीला धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू


 

पळसगाव (पि.): बैलबंडीलाधडकल्याने दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ३१) दुपारी ४ वाजेच्या सुमारास चिमूर तालुक्यातील शिरपूर- बोथली मार्गावर घडली. महेश माणिक सहारे (२०, रा. बोथली) असे मृताचे नाव आहे. मृताची आई हेमलता सहारे (४५) ही जखमी असून उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पुढील उपचारार्थ हलविण्यात आले आहे.

 

बोथली येथील महेश सहारे हा आई हेमलताला सोबत घेऊन एम. एच. ३४,ए. यु. ९१३५दुचाकीने क्रमांकाच्या बोथलीवरून नेरीकडे जात होता. दरम्यान धानाची मळणी करून एक बैलबंडी गावाकडे परत जात होती. दुचाकीची बैलबंडीला जोरदार धडक दिली. या धडकेत महेशचा जागीच मृत्यू झाला तर आई हेमलता जखमी झाली. पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे हलविण्यात आले आहे.

 

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 1, 2025   

PostImage

मेहुणीशी संबंध हे अनैतिकच पण बलात्कार म्हणू शकत नाही


पुणे: अनैतिक संबंधातून हत्या, बलात्काराचे आरोप अशी प्रकरणे वेळोवेळी समोर येत असतात. नुकताच पुण्याच्या आमदाराच्या मामाचा अशाच अनैतिक संबंधातून खून करण्यात आला होता. अलाहाबादमधील एका दाजी-मेहुणीच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने त्यांच्यातील संबंध अनैतिक आहेत पण ते बलात्काराच्या श्रेणीत नाहीत, असे म्हणत दाजीला जामिन दिला आहे. 

 

नात्याने ही तरुणी मेहुणी लागते. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारिरीक शोषण केल्याचा आरोप दाजीवर ठेवण्यात आला होता. यावर कोर्टाने दोघांतील प्रेम संबंध अनैतिक जरी असले तरी हा लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा होत नाही, असे म्हटले आहे. 

 

आरोपी दाजीविरुद्ध भादंवि कलम ३६६, ३७६, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने आपल्या मेहुणीला लग्न करण्याचे आश्वासन दिले आणि नंतर तिला पळवून नेल्याचा आरोप आहे. आरोपीने अलाहाबाद उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने भाष्य केले.

 

मुलगी प्रौढ आहे आणि तिचे प्रेमसंबंध होते, यावरही न्यायालयाने विचार केला. दाजीला जुलै 2024 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. त्या आधारे न्यायालयाने त्यांची याचिका मान्य करून त्यांना जामीन मंजूर केला.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 1, 2025   

PostImage

वर्षभरात १७ मुलींना पळविले, १३ बलात्कार, १५ विनयभंगाच्या घटना !


 

गडचिरोली :आजकाल महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कार्य करीत आहेत. अनेक क्षेत्रात त्या पुरुषांच्याचही समोर आहेत. मात्र महिलाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन अद्यापही बदलला नसून 15 महिलावरील अन्याय, अत्याचाराचा सिलसिला अद्यापही कायमच असल्याचे 0 वर्षभरात गडचिरोली जिल्हा मुख्यालयी असलेल्या शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या महिलाविषयक गुन्ह्यावरून निदर्शनास आले आहे. मंगळवारी २०२४ हे वर्ष संपत असतांना गडचिरोली पोलिस ठाण्याच्या

हद्दीत मावळत्या वर्षात मुलींना पळवून नेण्याच्या १७ घटना घडल्या आहेत. १३ बलात्काराच्या तसेच १५ विनयभंगाच्या घटनांचीही नोंद करण्यात आली आहे.

 

जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या गडचिरोली शहर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात येणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण तसे कमीच असल्याचे दिसुन येते. दारू तस्करी वअन्य बाबतीत लहान सहान गुन्हे दाखल होत असतात. मात्र वर्षभरात तब्बल ७७१ गुन्ह्यांचीनोंद करण्यात आली असल्याची माहिती गडचिरोली शहरा पोलिस ठाण्यातून प्राप्त झाली आहे.

 

 

दारूबंदी कायद्याअंतर्गत सर्वाधिक ४७२ गुन्हे दाखल

 

गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र शेजारच्या चंद्रपूर व अन्य जिल्ह्यातून तसेच नजीकच्या तेलंगणा, छत्तीसगड राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जात असते. पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या आदेशानुसार दारू तस्करी रोखण्यासाठी पोलिस दल कार्यरत आहे. गडचिरोली पोलिस ठाण्यात २०२४ या वर्षभरात दारूबंदी कायद्याअंतर्गत सर्वाधिक ४७२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दारू तस्करांना पकडल्यानंतर त्यांना लवकरच जामीन मिळत असतो. यामुळे दारू तस्कर निर्वावले आहेत. दारूबंदी कायद्यात सुधारणा करून दारूतस्करी करतांना पकडल्यानंतर त्यांना तातडीने जामीन न देता किमान वर्षभर कारागृहात डांबण्यात यावे. यामुळे दारूतस्करीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.

 

 

१. जुगार कायद्याअंतर्गत १२, ड्रग कायद्याअंतर्गत २. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत २, ईतर भादंवि अंतर्गत ३. अन्न व भेसळ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ३ गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. याशिवाय इतरही गुन्हे दाखल करण्यात आली आहेत,

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 1, 2025   

PostImage

काकाच्या हल्ल्यात पुतण्या गंभीर जखमी


भामरागड : काकूला मारहाण करतअसलेल्या काकाला वाचविण्यास गेलेल्या पुतण्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. यात चेहऱ्यावर मोठी दुखापत झाली. ही घटना २६ डिसेंबरला मन्नेराजाराम येथे घडली. याबाबत ३० रोजी काकावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला.

 

सोनू गौरा सडमेक (२५, रा. मन्नेराजाराम) असे जखमीचे नाव आहे. २६ रोजी रात्री साडेआठ वाजता काकू शोभा यांना काका रमेश निमय्या सडमेक याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी काका-काकूचेभांडणसोडविण्यासाठी सोनू सडमेक हा सरसावला.

 

 

यावेळी रमेश सडमेक याने त्याच्यावर कुऱ्हाडीने वार केला. यात सोनू याच्या चेहऱ्यावर व डोळ्यावर गंभीर दुखापत झाली. यानंतर त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी जबाब नोंदवून गडचिरोली ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १०९ अन्वये गुन्हा नोंद केला. तपास उपनिरीक्षक दीपक करत आहेत. चव्हाण

 

 


PostImage

Pawar Interprises

Jan. 1, 2025   

PostImage

Subsidy On DAP: सरकार का बड़ा फैसला! DAP के लिए …


Subsidy On DAP: केंद्र सरकार ने किसानों के लिए बड़ी राहत का ऐलान करते हुए डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) खाद पर अतिरिक्त सब्सिडी की घोषणा की है। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव ने बताया कि मोदी सरकार ने 3850 करोड़ रुपये के वन टाइम स्पेशल सब्सिडी पैकेज को मंजूरी दे दी है।

इस फैसले के तहत डीएपी की कीमत में कोई बदलाव नहीं होगा। किसानों को 50 किलोग्राम की डीएपी खाद की बोरी पहले की तरह 1350 रुपये में ही उपलब्ध होगी। अतिरिक्त लागत को सरकार वहन करेगी, जिससे किसानों को बाजार की अस्थिरता का बोझ नहीं उठाना पड़ेगा।

केंद्रीय मंत्री ने बताया कि भू-राजनीतिक कारणों और वैश्विक बाजार में अस्थिरता के चलते डीएपी की कीमतों में उतार-चढ़ाव हो रहा है। रेड सी जैसे समुद्री मार्गों पर जारी संघर्ष के कारण जहाजों को लंबे मार्गों का उपयोग करना पड़ रहा है, जिससे उर्वरकों की कीमतों पर दबाव बढ़ा है। इसके बावजूद, सरकार ने यह सुनिश्चित किया है कि भारतीय किसानों को इन चुनौतियों का सामना न करना पड़े।

2014 से 2023 तक, सरकार ने 1.9 लाख करोड़ रुपये की उर्वरक सब्सिडी दी है, जो 2004-2014 के मुकाबले दोगुने से अधिक है। यह कदम किसानों की आर्थिक सुरक्षा और उर्वरकों की सुलभता सुनिश्चित करने के लिए उठाया गया है।

केंद्रीय मंत्री ने यह भी बताया कि पीएम फसल बीमा योजना के तहत 2023-24 में 4 करोड़ किसानों का बीमा किया गया, जिसमें 55% गैर-ऋणी किसान शामिल हैं। यह योजना देश की सबसे बड़ी नीतिगत पहल है, जो फसल बुवाई से कटाई तक प्राकृतिक आपदाओं और विपरीत मौसम की वजह से होने वाले नुकसान से किसानों को सुरक्षा प्रदान करती है।

यह योजना 23 राज्यों और केंद्र शासित प्रदेशों में लागू है और इसमें 20 लिस्टेड बीमा कंपनियां शामिल हैं। इसके तहत किसानों को उनकी फसल के हर चरण में व्यापक सुरक्षा मिलती है।


PostImage

Sajit Tekam

Jan. 1, 2025   

PostImage

Gold Rate Today: नवीन वर्षात सोने-चांदी स्वस्त की महाग? जाणून …


Gold Rate Today: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात काहीसा चढ-उतार दिसून आला आहे. 2024 च्या शेवटी सोनं आणि चांदीने चांगला परतावा दिला होता, आणि 2025 मध्येही आर्थिक धोरणांवर आणि फेडरल बँकेच्या निर्णयांवर सर्वांचे लक्ष राहणार आहे.

 

सोनं-चांदीच्या दरात बदल

आज सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किंमतींमध्ये 440 रुपयांची घट दिसून आली, परंतु दिवसाच्या सुरुवातीला 78,800 रुपयांवर स्थिरावली आहे. मागील वर्षभरात सोन्याने 23.5 टक्क्यांची वाढ नोंदवली असून, सध्या ते 78,950 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं आहे.

चांदीच्या किंमतींमध्येही काहीशी घट झाली असून, आज ती 89,700 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली आहे. मागील सत्रात चांदी 91,700 रुपयांवर होती, परंतु आज 2,000 रुपयांनी घट नोंदवली आहे.

 

Gold Rate Today: सोन्याचे आजचे दर

  • 22 कॅरेट सोनं: 71,500 रुपये प्रति 10 ग्रॅम
  • 24 कॅरेट सोनं: 78,000 रुपये प्रति 10 ग्रॅम
  • 18 कॅरेट सोनं: 58,500 रुपये प्रति 10 ग्रॅम

1 ग्रॅम सोनं

  • 22 कॅरेट: 7,150 रुपये
  • 24 कॅरेट: 7,800 रुपये
  • 18 कॅरेट: 5,850 रुपये

8 ग्रॅम सोनं

  • 22 कॅरेट: 57,220 रुपये
  • 24 कॅरेट: 62,400 रुपये
  • 18 कॅरेट: 46,800 रुपये

PostImage

Shivendra Daharwal

Jan. 1, 2025   

PostImage

UP News Hindi: नए साल के पहले दिन हत्याकांड से …


UP News Hindi: उत्तर प्रदेश की राजधानी लखनऊ में नए साल के पहले दिन हुए सामूहिक हत्याकांड ने सभी को हिला कर रख दिया है। शहर के एक होटल में एक ही परिवार की मां और चार बहनों की हत्या का मामला सामने आया है। इस खौफनाक घटना का आरोप परिवार के बेटे अरशद पर लगा है, जिसे पुलिस ने हिरासत में ले लिया है।

घटना लखनऊ के एक होटल शरणजीत में हुई, जहां आगरा से आया यह परिवार रुका हुआ था। कुल सात सदस्य होटल के कमरे नंबर 109 में ठहरे थे। इनमें से मां अस्मा (45) और उनकी चार बेटियों—आलिया (9), अल्शिया (19), अक्सा (16), और रहमीन (18)—का खून कर दिया गया।

पुलिस सूत्रों के मुताबिक, सभी मृतकों के गले और कलाई पर धारदार हथियार से किए गए वार के निशान मिले हैं। शुरुआती जांच में यह सामने आया है कि मृतकों को पहले नशीला पदार्थ दिया गया, जिससे वे बेहोश हो गए। इसके बाद उनके हाथ की नसें काट दी गईं, जिससे उनकी मौत हुई।

अरशद (24) को पुलिस ने हिरासत में लिया है। पूछताछ के दौरान वह केवल इतना कह रहा है कि, "यह हमारा पारिवारिक मसला है।" पुलिस इस बयान का मतलब समझने की कोशिश कर रही है। इस मामले में पिता बदर पर भी शक की सुई घूम रही है, लेकिन वह फिलहाल फरार है।

प्रारंभिक जांच में पारिवारिक विवाद को इस हत्याकांड की वजह बताया जा रहा है। पुलिस को शक है कि पारिवारिक कलह के कारण बेटे ने यह घातक कदम उठाया। अधिकारियों ने कहा कि पोस्टमार्टम रिपोर्ट आने के बाद घटना के पीछे की असली वजह साफ हो पाएगी।


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 1, 2025   

PostImage

दोन दुचाकींच्या धडकेत तिघे जखमी


 

गडचिरोली : दोन दुचाकींचीसमोरासमोर धडक बसल्याने दुचाकीस्वार तिघे जखमी झाल्याची घटना गडचिरोलीपासून दोन किमी अंतरावर कठाणी नदीपुलाजवळ सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. हा अपघात बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.

धनराज बोलिवार (५२) रा. उपरी, रवी वासेकर (४८), मोहन वाकुडकर (४८) दोघेही रा. भान्सी, ता. सावली जिल्हा चंद्रपूर अशी जखमींची नावे आहेत. यातील मोहन वाकुडकर हा गंभीर जखमी आहे. हे तिघेही दुचाकीने मिरची तोडण्यासाठी मजूर गोळा करण्यासाठी गोगावकडे जात होते.तिघेही दारू पिऊन तर्र होते.

दरम्यान, चालक धनराज बोलिवार याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांच्या दुचाकीची दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या धडकेत तिघेही जमिनीवर कोसळले. यात तिघांच्याही डोक्याला मारला लागला. मोहन हा बेशुद्ध पडला

होता. नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिकेने तिघांनाही जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.

गडचिरोली-आरमोरी या राष्ट्रीय महामार्गावर अपघात घडल्याने जखमींना बघण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती.

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 1, 2025   

PostImage

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


 

Happy New Year Messages In Marathi : प्रत्येक वर्ष येतं आणि निघून जातं. आपण येणाऱ्या वर्षाकडून खूप अपेक्षा ठेवतो, जे काही हवं आहे ते मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करतो. येणाऱ्या वर्षाचे स्वागत तुम्ही जल्लोषात करत असाल. धमाल, मस्ती, मनोरंजनाला उधाण आली असेल, पण त्याचबरोबर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठीही तुम्ही उत्सूक असाल. नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तजन सगळ्यांना नवीन वर्षाच्या खास शुभेच्छा द्यायच्या असतील, चला तर मग, करूया सुरुवात….सर्वांच्या मनात सर्वांसाठी असावं प्रेम, येणारा प्रत्येक दिवस आणो आनंदाचा क्षण, नव्या उमेदीसोबत सगळं दुःख विसरून करा नव्या वर्षाला वेलकम!

 

 

 

 

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 

1. प्रत्येक आनंद प्रत्येक पावलावर तुला मिळो,

 

जगातील प्रत्येक यश तुझ्याकडे येवो,

 

या नव्या वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

 

2. नववर्षाची सकाळ होताच तुमचं आयुष्यही व्हावं प्रकाशमय ही प्रार्थना करू,

 

नववर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप चांगलं जावो या हार्दिक शुभेच्छा

 

3.नवीन वर्षातील नवीन सकाळ,

 

नवीन संध्याकाळ, नवीन वर्षातील नवीन स्वप्नं,

 

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 

3 जुनं वर्ष होत आहे सगळ्यांपासून दूर,

 

यश आणि आनंद सगळ्यांना मिळो भरपूर,

 

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 

4 .माझी इच्छा आहे की येणारे 12 महिने सुख मिळो,

 

52 आठवडे यश आणि 365 दिवस मजेदार जावोत माझ्या मित्र-मैत्रिणींना,

 

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 

5 . सूर्यासारखी प्रकाशमान होवो तुझं आयुष्य चांदण्यासारखं चमकावं तुझं नशीब,

 

माझ्या शुभेच्छा तुझ्यापाठी कायम असतील,

 

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 

6. येणारं हे नववर्ष तुम्हा सगळ्यांना चांगले जावो,

 

ईश्वराची कृपा तुमच्यावर राहो.

 

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 

 

नवीन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा

 

1. नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयं, नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं, नवी नाती, नवं यश, नवा आनंद. कधी अपूर्ण, कधी संपूर्ण, नवा हर्ष, नवं वर्ष…!

 

नवीन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा

 

2. सरले ते वर्ष, गेला तो काळ, नवी सुरूवात, नवा आनंद घेऊन आलं 2025 साल, नवीन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा

 

3. जे गेलं ते वर्ष विसरून जा, नव्या वर्षाला आपलंस करा, देवाकडे करतो हीच प्रार्थना या नव्या वर्षात होवो सर्व स्वप्नांची पूर्ती तुमच्या नवीन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा

 

4. नववर्ष तुमच्या जीवनातील दुखाःचा नाश करू दे नव्या सुखांना तुमच्या आयुष्यात आणू दे नवीन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा.

 

 

नवीन वर्षाच्या शुभेच्छा कुटुंबासाठी

 

1. कुटुंब हे सर्वात मोठं गिफ्ट आहे जे सगळ्यांना मिळालं आहे. हे नवं वर्ष तुमच्यासाठी कुटुंबासोबत अजून चांगल्या आठवणी देणारं जावं. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 

2.नवं वर्ष येवो घेऊन येवो सुखाचा प्रकाश,नशिबाची दारं उघडावी,देव राहो तुमच्यावर प्रसन्न,

 

हीच प्रार्थना आहे देवाकडे तुमच्या चाहत्याची, नववर्षाभिनंदन।।

 

3. तुम्ही जिथे जाल तिथे करा फ्लाय ऑल टियर, सर्व लोकांचे व्हा तुम्ही डिअर,

 

तुमचा मार्ग राहो ऑलवेज क्लियर आणि देव तुम्हाला देवो झक्कास न्यू ईयर. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 

4. मी खूप लकी आहे की, मला चांगली आणि प्रेमळ फॅमिली मिळाली.त्यांच्या चेहऱ्यावर सदैव असंच हसू कायम राहो,2025 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 

5. तुझ्यासारखी आई असणं ही देवाचीच कृपा आहे. मला देवाचे खूप खूप आभार मानायचे आहेत.

 

तुझा आशिर्वाद या नव्या वर्षातही माझ्यासोबत कायम राहो आई. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 

6. हॅपी न्यू ईयर टू आईबाबा, माझ्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी ऋणी आहे. तुम्हाला दोघांनाही खूप खूप प्रेम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 

मित्र-मैत्रिणी, आप्तजनांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 

1.नववर्ष तुमच्या जीवनातील दुखाःचा नाश करू दे आणि नव्या सुखांना तुमच्या आयुष्यात आणू दे. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

2.आशा आहे तुम्हाला नव्यावर्षात प्रत्येक दिवशी यश मिळो, प्रत्येक दिवस आनंदी असो. हॅपी न्यू ईयर.

 

3. मित्रांनो, उद्या करायचं ते आज करा आणि आज करायचं ते आत्ता.

 

मग उद्याऐवजी आजच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 

3. नववर्ष तुमच्यावर करो नव्या संधीची बरसात, प्रत्येक पावलावर तुम्हाला मिळो यश आणि आनंद साजरा करण्याचं कारण, हॅपी न्यू ईयर.

 

4. नवे वर्ष येवो घेऊन यशाचा प्रकाश, उघडू दे नशीबाचा दरवाजा, हीच आहे प्रार्थना तुमच्या आमच्या कुटुंबासाठी. नवीन वर्षाच्या शुभेच्छा

 

5. आम्ही राहतो तुमच्या मनात, दुसरं कोणी शुभेच्छा देवो ना देवो आमच्याकडून सर्वात आधी हॅपी न्यू ईयर 2025 च्या तुम्हाला शुभेच्छा अपरंपार

 

6. या वर्षाच्या सूर्याचा अस्त होण्यापूर्वी आणि जुनं कॅलेंडर भिंतीवरून काढण्यापूर्वी,दुसऱ्या कोणी तुम्हाला विश करण्यापूर्वी मी तुम्हाला देत शुभेच्छा. तुमच्यासाठी येणारं 2025 वर्ष जावो जबरदस्त, नववर्षाभिनंदन.

 

 

 


PostImage

Avinash Kumare

Jan. 1, 2025   

PostImage

Chandrapur News: मूल हत्याकांडाचे धक्कादायक कारण आले समोर, या कारणाने …


Chandrapur News: 'दोन दिवसांत रितिक शेंडे तुझा गेम करणार,' अशी माहिती मिळाल्यानंतर भीतीपोटी मित्रांच्या मदतीने रितिकची हत्या केल्याचे आरोपी राहुल पासवान याने कबूल केले आहे, Mul murder Case असे तपास अधिकारी अमितकुमार आत्राम यांनी मंगळवारी (दि. ३१) माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

मैत्रीतून निर्माण झालेला वाद

पोलिसांच्या माहितीनुसार, मृतक रितिक शेंडे आणि आरोपी राहुल पासवान हे एकमेकांचे मित्र होते. रितिक सतत राहुलकडे खर्रा आणि दारूसाठी पैसे मागत होता. टायर पंक्चर दुरुस्ती करून उदरनिर्वाह करणाऱ्या राहुलला या खर्चासाठी पैसे देणे शक्य नव्हते. त्यामुळे तो रितिकपासून दूर राहण्याचा प्रयत्न करू लागला.

रितिकने राहुलला धमकावत त्याच्याकडून पैसे वसूल करण्याचा प्रयत्न केला. काही मित्रांच्या मदतीने राहुलला मारहाणदेखील केली. हा त्रास सतत चालू असताना, एका मित्राने राहुलला सांगितले की, 'दोन दिवसांत रितिक तुला टपकवणार आहे.' या भीतीमुळे राहुलने भूषण चचाणे आणि अजय गोटेफोडे यांच्या मदतीने रितिकची हत्या केली.

तपासात असे स्पष्ट झाले की, रितिकच्या हत्येमागे राहुल पासवान, भूषण चचाणे आणि अजय गोटेफोडे हे मुख्य आरोपी आहेत. या तिघांनी मिळून शुक्रवारी रितिकची हत्या केली.

 

संजयपाजीला धमकी का दिली?

हत्येच्या मागील आणखी एक धक्कादायक कारण म्हणजे संजयपाजी पटवा याला दिलेली धमकी. राहुलने एकदा रितिकला पैसे दिले नाहीत, त्यामुळे रितिकने संजयपाजीला राहुलला मारण्यासाठी बोलावले. संजयपाजीने राहुलला रेल्वे फाटकाजवळ बोलावून त्याला मारहाण केली, ज्यात राहुलचा एक दात तुटला. हा राग मनात ठेवून राहुलने रितिकची हत्या केली आणि नंतर संजयपाजीला व्हॉट्सअॅप कॉल करून 'रितिक का काम खतम हुआ, अब तेरी बारी है,' अशी धमकी दिली.