PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 9, 2024   

PostImage

जळालेल्या ट्रान्स्फॉर्मरची होणार लगेच दुरुस्ती! 'इथे' नोंदवा तक्रार..


ट्रान्स्फॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास तत्काळ दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'महावितरण'ला तसे निर्देश दिले आहेत. स्थानिक नागरिकांनी त्यासंबंधीची तक्रार करण्यासाठी 'महावितरण'ने *१८००२१२३४३५* किंवा *१८००२३३३४३५* हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले आहे, शिवाय महावितरणच्या ॲपवरूनही तक्रार नोंदवता येणार आहे.

 

 'महावितरण'ला ट्रान्स्फॉर्मर बिघडल्याची खबर मिळाल्यानंतर किमान तीन दिवसात ट्रान्स्फॉर्मर बदलून तथा दुरुस्त करून दिला जात आहे. तथापि, ट्रान्स्फॉर्मर जळाल्याचे उशिराने समजल्यानंतर प्रत्यक्षात वीज पुरवठा पुन्हा सुरू होण्यास आणखी विलंब होतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. त्यावर तक्रार आल्यानंतर तत्काळ दुरुस्ती करून दिली जात आहे. त्यासाठी ग्राहकांना एक रुपयाही भरावा लागत नाही हे विशेष.

 

*ॲपवरून तक्रार अशी करा...* 

 

● सर्वप्रथम मोबाईलवर 'महावितरण' ॲप उघडा

● नादुरुस्त रोहित्राची माहिती कळवा त्या बटणावर

● ग्राहकाचे नाव नंबर दिसेल त्यावर

● आपले कनेक्शन ज्या ट्रान्सफॉर्मरला जोडले आहे, त्याचा नंबर, गाव, तालुका- जिल्ह्याची माहिती भरलेली दिसेल.

● ट्रान्सफॉर्मर जवळील खूण कोणती, कधीपासून ट्रान्सफॉर्मर बंद आहे आणि कोणता बिघाड दिसतो याची माहिती भरा

● संबंधीत ट्रान्सफॉर्मरचा फोटो काढून अपलोड करा

● नोंद करा किंवा सबमिट हे बटण दाबा

 

याप्रमाणे ट्रान्सफॉर्मरची तक्रार नोंदविली जाईल. त्याची नोंद थेट महावितरणच्या मुख्य सर्वरमध्ये होईल आणि तातडीने दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना एसएमएसद्वारे सूचना दिली जाईल.

 

ट्रान्सफॉर्मर बदलला की, त्याची माहिती ग्राहकाला एसएमएसद्वारे दिली जाते.

 

 


PostImage

SMIT DIGITAL

Aug. 25, 2023   

PostImage

विजेचे बिल चेकद्वारे भरता का? मग ही काळजी नक्की घ्या! …


नागपूर, दि. 25 ऑगस्ट 2023:- महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील वीजग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी दिलेल्या धनादेशांपैकी राज्यभरात दरमहा हजारो धनादेश अनादरीत (चेक बाऊंसहोत असल्याचे दिसून येत आहेत्यामुळे प्रत्येक वीजबिलासाठी विलंब आकार अधिक जीएसटी करासह 885/- रुपयांचा दंड पुढील महिन्याच्या वीजबिलामध्ये इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येत आहे.

 

ऑनलाईन’ सोय उपलब्ध असली तरी अद्यापही अनेक वीजग्राहक दरमहा वीजबिलांचा भरणा धनादेशाद्वारे करीत आहेतधनादेश अनादरीत झालेल्या सर्व ग्राहकांना प्रत्येक वीजबिलासाठी 750/- रुपये बँक अॅडमिनिस्ट्रेशन चार्जेस व त्यावरील 18 टक्के जीएसटी कराचे 135/- रुपये असे एकूण 885/- रुपये आणि विलंब आकार पुढील महिन्याच्या वीजबिलात इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येत आहे.

 

अनादरित झालेल्या एकाच धनादेशाद्वारे अनेक वीजबिलांचा भरणा केलेला असल्यास प्रत्येक वीजबिलासाठी दंडात्मक रक्कम लावण्यात येत आहेयासोबतच धनादेशाद्वारे वीजबिल भरण्याची सोय सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात येत आहेधनादेशावर चुकीची तारीखखाडाखोडचुकीची स्वाक्षरीचुकीचे नावखात्यात संबंधीत रक्कम नसणे आदी कारणांवरून धनादेश अनादरित होत असल्याचे आढळून येत आहेधनादेश दिल्यानंतर तो क्लिअर होण्यासाठी साधारणतः तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागतोधनादेश दिल्यानंतर वीजबिल भरल्याची पावती त्याच दिवशी मिळत असली तरी धनादेशाची रक्कम जमा झाल्याच्या तारखेला वीजबिल भरणा ग्राह्य धरला जातोत्यामुळे मुदतीच्या एक-दोन दिवस आधी दिलेल्या धनादेशाची रक्कम मुदतीनंतर जमा झाल्याने पुढील वीज बिलामध्ये थकबाकी दिसून येतेत्यामुळे ग्राहकाने देय तारखेपूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या तीन दिवस अगोदर धनादेश देणे आवश्यक आहे

 

धनादेशाव्दारे वीज बिलाचा भरणा करतेवेळी धनादेश अकाउंट पेयी आणि 'MSEDCLच्या नावे असावाधनादेश स्थानिक बँकेचा असावा, धनादेशासोबत पावती स्थळप्रत जोडावीस्टॅपल करू नयेयाशिवाय धनादेश पुढील तारखेचा नसावा. धनादेश/ डीडी ने देयकाचा भरणा केल्यासमहावितरणच्या खात्यात रक्कम जमा होण्याची दिनांकभरणा दिनांक म्हणून गृहीत धरल्या जाते. देयक चेक कलेक्शन पेटीत टाकतांना धनादेशाच्या मागे ग्राहक क्रमांक (पी.सी.बि. यु. साहित) लिहावा व स्थळ प्रतीच्या मागे चेकचा तपशील लिहावा. परक्राम्य संलेख अधिनियम (Negotiable Instrument Act) 1881 कलम 138 प्रमाणे धनादेश अनादरीत होणे हा दंडनीय अपराध असून कायदेशीर कारवाईस पात्र आहे. धनादेश ही ग्राहकाने वापरलेली सुविधा आहे त्यामुळे कुठल्याही कारणास्तव त्याचा अनदार झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही ग्राहकाची असल्याचेही महावितरणतर्फ़े स्पष्ट करण्यात आले आहे.

 

महावितरणचे www.mahadiscom.in हे संकेतस्थळ तसेच महावितरण मोबाईल अॅपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा 'ऑनलाईन' भरणा करणे लघुदाब वीजग्राहकांसाठी घरबसल्या शक्य झाले आहेएकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबत सेवा उपलब्ध आहेतसेच डेबिट कार्डयुपीआयभीमइंटरनेट बँकिंगमोबाईल वॉलेटमोबाईल बॅकिंगद्वारे भरणा केल्यास वीजबिलामध्ये 0.25 टक्के (500 रुपयांच्या मर्यादेतसूट देण्यात येत आहेतर क्रेडीट कार्ड वगळता सर्व 'ऑनलाईन'द्वारे होणारा भरणा निशुल्क आहेयासोबतच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिकवाणिज्यिक व घरगुती किंवा सोसायट्यांच्या वीजग्राहकांचे बिल 10 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहेत्यासाठी या ग्राहकांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहेवीजग्राहकांनी धनादेशाऐवजी 'ऑनलाईन'द्वारे वीजबिलांचा भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.