सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे.राज्यातील भगिनींचा विचार केला तर खूपच सुंदर योजना आहे.अशी योजना या आधीच सुरू व्हायला पाहिजे होती परंतु उशिरा का होईना परंतु छान योजना आहे.
मात्र काही जाचक अटी लादल्या गेल्या आहेत.जसे की अधिवास प्रमाणपत्र,पंधरा वर्षांपूर्वीचा शिधापत्रिका,जन्माचा दाखला,शाळा सोडल्याचा दाखला,हे या योजनेमध्ये नको आहेत.कारण राज्यात अशा कितीतरी लाडक्या बहिणी आहेत की त्यांना जन्माचा दाखला या जन्मी तर मिळणार नाहीच परंतु पुढच्या जन्मी सुद्धा मिळणार नाही,असं म्हणायला हरकत नाही आणि याच जाचक अटिंमुळे राज्यात कितीतरी लाडक्या बहिणी वंचित राहू शकतात.
किंवा पंधरा वर्षांपूर्वीची शिधापत्रिका हि सुद्धा जाचक अट आहे.कारण ज्यांच्या लग्नाला 14 वर्षे झालेली आहेत किंवा 10 ते 12 वर्षे लग्न होवून झाले आहेत,अशा कितीतरी लाडक्या बहिणी आहेत.म्हणजे आजचा विचार करायला गेला तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
अशा पद्धतीमुळे राज्यातील लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहू शकतात आणि म्हणून राज्यातील एकही लाडकी बहिण या योजनेपासून वंचित राहू नये,असे वाटत असेल तर वरील सर्व अटी शिथिल करावे अशी विनंती रमेश चौखंडे यांनी राज्य सरकारकडे विनंती करतो आहे.
खरं म्हणजे राज्यातील सर्वच लाडक्या बहिणी योजनेकडे मोठ्या कुतुहलाने पाहत आहेत.सगळीकडे एकच चर्चा मग तो शहरी भाग असो किंवा ग्रामीण.म्हणून राज्यातील सर्वच लाडक्या बहिणीला याचा लाभ मिळायलाच पाहिजे.
महाराष्ट्र सरकारने कृषी पंप धारकांचे थकीत वीज बिल माफ करण्याचे पावसाळी अधिवेशनात घोषणा केली.हे राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब आहे.राज्यातील शेतकऱ्यांना आनंदच झाला आहे परंतु सरकारने जशी थकीत वीज बिल माफीची घोषणा केली,हे जरी खरं असलं तरी,त्या घोषणेची अंमलबजावणी होणे हेही तितकच महत्त्वाची बाब आहे.
राज्यातील सरकारचे धोरण जनतेला माहित आहे आणि आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील जनतेने दाखवून दिले आहे आणि त्यामुळेच उशिरा का होईना पण सरकारला सूध जावून बुध आली,असं म्हणायला काहीही हरकत नाही.
पण काही का ? असेना.राज्यातील कृषी पंप धारकांची एवढीच अपेक्षा आहे की थकीत विज बिल माफीचा जी.आर. काढून लवकरात लवकर अंमलबजावणी व्हायला पाहिजे हीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
वीज बिलाचा भरणा केलेला नाही म्हणून कित्येक शेतकऱ्यांची लाईट कापल्या गेली आहे.विज बिल भरू शकत नाही,एवढी बिकट अवस्था राज्यातील शेतकऱ्यांची आहे.म्हणून लवकरात लवकर अंमलबजावणी झाली तर आपली कापल्या गेलेली कनेक्शन जोडल्या जाईल अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात विजेचा प्रश्न गंभीर आहे.ग्रामीण भागात भारणीयमनाचा आधीच फटका बसतोय,वेळोवेळी लाईट ये जा करिता राहते अशा अनेक अडचणींना तोंड देता-देता नाकीनव येते आणि अशाही परिस्थितीत स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याचे काम खाजगी कंपन्यांना दिले गेले आहे,म्हणजे एकावं ते नवलचं.
स्मार्ट प्रीपेड मीटर लावल्यामुळे त्याचा भार वीज ग्राहकांनाच सोसावा लागणार आहे.त्यामुळे स्मार्ट प्रीपेड मीटर (मोबाईल) रिचार्ज योजना त्वरित बंद व्हायला पाहिजे आणि जनतेने सुद्धा सरकारचे असे मनसुबे हाणून पाडायला पाहिजे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने संपूर्ण राज्यात ग्राहकाच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच विज गळती रोखण्यासाठी राज्यभर वीज मीटर बसविण्याची तयारी सुरू केली आहे.केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने नॅशनल स्मार्ट ग्रिड मिशन या योजने अंतर्गत संपूर्ण देशभर स्मार्ट मीटर बसविण्याचा कार्यक्रम 17 ऑगस्ट 2019 च्या अधिसूचनेनुसार जाहीर केला आहे.त्यामुळे ग्राहकाच्या खिशाला हमखास कात्री लागणार आहे,म्हणजे यामुळे ग्राहकांवर परिणाम होणार आहे.
स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेमुळे ग्राहकांना पूर्वीसारखी वीज मिळणे कठीण आहे.असल्या प्रकारामुळे ग्राहकांची डोकेदुखी वाढणार आहे. वीज ग्राहकांना आतापर्यंत वीज मीटर प्रमाणे बिल भरावे लागत होते परंतु आता मोबाईल रिचार्ज प्रमाणे आगाऊ पैसे मोजावे लागतील. तेव्हा कुठं वीज वापरता येणार नाही.
खिशाला कात्री लागणाऱ्या योजना वेळीच बंद पडायला पाहिजे नाहीतर अशा योजनांमुळे सामान्य माणूस पूर्णपणे नागडा झाल्याशिवाय राहणार नाही.आधीच महागाईने जीवन जगणं कठीण होऊन गेलाय म्हणून वीज ग्राहकांना माझी कळकळीची विनंती आहे वेळेत सावध व्हा,सारा-सार विचार करा आणि सरकारचे असले मनसुबे हाणून पाडा नाहीतर ही सरकार नावाची जमात सामान्य माणसाला बोकळल्या शिवाय राहणार नाही,म्हणून आजच सावध व्हा.
||जागो ग्राहक जागो||
काल पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात बऱ्याच जागा गमवाव्या लागल्या.म्हणजे विरोधी पक्षाने चारी मुंड्या चित करीत भाजपाच्या नाकावर लिंबू पिळून दणदणीत विजय मिळविला.म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारत राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे,तो योग्य की अयोग्य ?
माझ्या मते तो योग्यच आहे.देवेंद्र फडणवीस यांनी आज नाही तर कालच राजीनामा द्यायला पाहिजे होता.कारण राज्यात भारतीय जनता पक्ष हा नंबर एकचा पक्ष आहे,परंतु देवेंद्र फडणवीस सारख्या हेकेखोर माणसामुळे पक्षाला वाईट दिवस अनुभवायला मिळत आहेत आणि राज्यातील नेतृत्व जर का फडणवीसाकडे राहिले तर भविष्यात वाटण्याच्या अक्षदा लावायला सुद्धा भाजपा शिल्लक राहणार नाही,म्हणून हा राजीनामा योग्यच आहे.
देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचा राज्यातील नंबर १ एक चा नेता.बुद्धीने हुशार आहे, चाणाक्ष आहे याबद्दल दुमत नाही परंतु त्यांच्या अंगी कूटनीती ठासून भरलेली आहे.सुळीचे राजकारण करण्यात अग्रेसर आहे आणि ज्या ओबीसी बांधवांच्या भरोशावर पक्ष मोठा झालेला आहे त्याच ओबीसी नेत्यांची कदर करीत नाही.म्हणून पक्षाला मरगडीचे दिवस आलेले आहेत,म्हणून हा राजीनामा योग्यच आहे.
देवेंद्र फडणवीसांन कडे जेव्हापासून पक्षाने जबाबदारी दिली त्या दिवसापासून तर आजपर्यंत पक्षाला नुकसान सहन करावे लागत आहे. म्हणजे पक्षाला वाईट दिवसांचा सामना करावा लागतो आहे,म्हणून राज्याची जबाबदारी दुसऱ्या वजनदार माणसाकडे सोपवावी जेणेकरून पक्षाला सुखाचे दिवस येतील आणि त्यासाठी हा राजीनामा योग्यच आहे.
राज्यातील विरोधी पक्ष आजपर्यंत गाड झोपेत होते.निद्रावलेल्या अवस्थेत असलेले विरोधक आता डोळ्यासमोर निवडणुका दिसायला लागल्या अन् आता जागे झाले आहेत.
राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांना निवडणुका पाहून आता शेतकऱ्यांबद्दल कळवळ वाटू लागली आणि आता बोंब मारत सुटले आहेत की,कापसाला 14 हजार रुपये भाव द्या.अरे कापसाला 14 हजार रुपये भाव मागणाऱ्यांनो आज पर्यंत कुठे गेला होतात ? शेतकऱ्यांचा कापूस कधीचाच विकून झालाया.आधी का नाही तुटून पडलात सत्याधाऱ्यांवर की.
शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे मग आत्ताच कशी काय शेतकऱ्यांची आठवण आली.कारण समोरून निवडणुका आहेत म्हणूनच ना.शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती असती तर एवढे दिवस झोपेचे सोंग घेऊन गप्प का बसला होतात.वास्तविक राज्यातील सरकारची कामगिरी पाहता किंवा सरकारच्या उदाशीन धोरणामुळे विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळालं होतं,सरकार विरोधी रान पेटवून शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवता आली असती.परंतु तसं न करता विरोधी पक्ष मुंग गिळून गप्प होते.आता समोर निवडणुका दिसायला लागल्या,अन हे लोक आपल्या तुंनतून वाजवायला सुरुवात करायला लागले.परंतु आता वेळ निघून गेली कितीही सहानुभूती दाखविण्याचे प्रयत्न केले तरी पण विरोधकांच्या हातात काहीही लागणार नाही आणि हे सत्य आहे.
कारण गडचिरोली जिल्ह्यात मोजक्याच ठिकाणी भारनियमन सुरू आहे आणि कित्येक शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट झाली आहेत.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भारनियमना विरोधात दोन दा मोर्चा काढून शासना विरोधात आपला आक्रोश व्यक्त केला,तेव्हा शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्याचे काम जिल्ह्यातील विरोधी पक्षाचे होते.परंतु हे पक्ष देखील कृषी पंप धारकांच्या अब्रूचे दिंडवडे पाहण्यातच स्वतःला धन्य मानत (समजत) होते,
मग तेव्हा का नाही आली शेतकऱ्यांची आठवण फक्त निवडणुका आल्या की शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती दाखवायचे आणि निवडणुका संपल्या की तुझा माझा काहीही संबंध येत नाही म्हणून हात वर करायचे.परंतु हा राज्यकर्त्यांच्या फाजीलपणा असून तोच त्यांच्या मानगुटीवर बसणार आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या भरोशावर आजपर्यंत सत्ता उपभोगले आणि सत्ता मिळाली की त्याच शेतकऱ्यांना केरकचरा समजायला लागलात,तोच शेतकरी आता सुज्ञ झालेला आहे. शेतकरी तुमचे पूर्ण सोंग ओळखून आहे आणि तुमच्या भूलथापांना आता बळी पडणार नाही तर तुम्हाला तुम्हची जागा दाखवायला सज्ज झाला आहे.
विरोधी पक्षातील पुढार्यांना आजपर्यंत आपाआपली पक्ष टिकवून ठेवण्यातच स्वतःला धन्य समजत गेले.जनतेचे काही सोयर सुतकच यांना नव्हते आता निवडणूक दिसायला लागल्या आणि आता त्यांना जागा आली म्हणजे आता बाबुराव जागा झाला,अशी म्हणण्याची वेळ जनतेवर आली.
महाराष्ट्राच्या इतिहासात दोन स्थानिक राजकीय पक्षांचे अस्तित्व मिटवण्यासाठी भाजप ने जी ताकद लावली होती, त्यास अखेर यश मिळत गेले. अनेक यंत्रणा मदतीला असल्यामुळे त्यात व्यत्यय येणेदेखील अशक्य होते. भारतीय जनता पक्षाला कमालीचा आनंद वाटत असला, तरी जनतेला काय वाटते हे महत्त्वाचे आहे. कारण पक्षाचे फक्त चिन्ह गेले, तरी विचारांचे अस्तित्व आणि सामर्थ्य जात नसते.
विश्वासघातकी, बेईमानी आणि संधीसाधू राजकारणाची त्रिसूत्री सध्याच्या राजकारणात दिसते. पण 'नॅनो 'वर 'बीएमडब्ल्यू'चा लोगो लावला की, 'नॅनो' 'बीएमडब्ल्यू' होत नाही, हे सर्वच राजकीय पक्षांनी लक्षात ठेवले पाहिजे. सध्या या महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे किंबहुना या देशांमध्ये काय चाललंय, हे पाहून नवी पिढी राजकारणात येईल की नाही शंकाच आहे. सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. अवघ्या महाराष्ट्राचे कल्याण करण्याची संधी समोर असताना सुडाच्या राजकारणाचे सुरुंग पेरले गेले आहेत. राज्यातले राजकारण अत्यंत गलिच्छ पातळीवर आणून ठेवले आहे. सत्तेची महत्त्वाकांक्षा आणि आभाळाला भिडलेला अहंकार राज्याची वाट लावतोय!
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर मराठा समाजाचा एकमेव सामाजिक राजकीय प्रतिमा असलेला नेता म्हणजेच शरद पवार. शिवसेनेबरोबर आता त्यांचाही पक्ष गायब करून टाकण्यात आला. सामान्य जनतेला हा प्रकार आवडला की नाही हे मतपेटीतूनच कळेल. देशामधील लोकशाहीची मूल्य आणि संविधानामधील विविध प्रकारच्या तरतुदी पायदळी तुडवल्या गेल्या आहेत हे मात्र नक्की.
दादांनी पक्ष पळवला व भाजपसोबत गेले. त्यांची तरी काय चूक? विरोधात राहून चौकशीचा ससेमिरा मागे लावून घेऊन निरर्थक दोन-तीन वर्षाकरिता जेलवारी करण्यापेक्षा सत्तेत राहून क्लिनचिट मिळणार असेल, तर मग कसले काका अन् कसले काकांचे उपकार? शेवटी या वयात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसारखे एक दिड वर्ष जेलमध्ये जाण्यापेक्षा सत्तेतील दिवस काय वाईट? बहुदा हाच प्रॅक्टिकल विचार अजितदादांनी केला असेल. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना दोष देण्यापेक्षा या सर्वामागचे कर्ते-करविते ओळखले पाहिजेत. ज्या राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांवर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, त्यांनाच सर्व आरोपांसहित महाराष्ट्रातील सत्तेत सामील करत मोठ्या दिमाखात व जोशात महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्रीपद बहाल केले. त्यामुळे कसले आले तत्त्व आणि कसले आले विचार. सत्ता हाच पुढे जाण्याचा व विकासाचा सोपा मार्ग आहे, हे लक्षात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पक्षचिन्हावर अजितदादा पवार गटाचा दावा मान्य करत निवडणूक आयोगाने शरद पवार गटाच्या विरोधात निकाल दिला. शिवसेनेचा घटनाबाह्य निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादीचा निकाल काय लागणार? याचा अंदाज मुरब्बी नेत्यांना आधीच आलेला होता. सध्या घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झालेला आहे. सरकार किंवा विधिमंडळ यांचा थेट संघर्ष सर्वोच्च न्यायालयाबरोबर होत आहे. संविधानाला वाचवायची जबाबदारी आता सर्वोच्च न्यायालय व शेवटी जनतेलाच करावी लागणार आहे. राजकारणात, समाजकारणात विकृती प्रस्थापित होताना दिसते आहे. महाराष्ट्राची सामाजिक व राजकीय घडी विस्कटली आहे. जिथं फुलं वेचली तिथं गोवऱ्या वेचायची वेळ आली आहे. जो महाराष्ट्र अनेक चळवळींनी, समाजसुधारकांच्या त्यागाने, संताच्या शिकवणीने घडला आहे, तो उद्ध्वस्त होतो की काय? अशी शंका येत आहे.
त्यामुळे उरलेल्या भ्रष्ट व सुमार नेत्यांच्यात फडणवीस मोठे दिसू लागलेत. निरंकुश सत्ता हातात असल्याने विरोधी पक्षातले भ्रष्ट नेते त्यांच्यासमोर वाकू लागलेत. भाजपासह विरोधी पक्षातले नेतेही फडणवीसांना शरण जाऊ लागले.त्यामुळे आता यांचा निकाल ही जनताच करेल.
चिमूर :-
विदर्भ कुर्मि समाज केंद्रीय कार्यकारिणीची सभा दि.4 फेब्रुवारीला नागपूर येथे संपन्न झाली.या सभेतील चर्चा नुसार महीला विभाग प्रदेश अध्यक्ष पदी सौ.पायल विवेक कापसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या पुर्वि पायल कापसे यांनी समाजाच्या चिमुर तालुकाध्यक्ष,चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वी रित्या सांभाळली असुन त्याच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रदेशाध्यक्ष पदी निवडीचा निर्णय केंद्रीय समितीने घेतला.
या सोबतच त्या मानवाधिकार संघटन दिल्लीच्या विदर्भ अध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळत असून सृश आसरा फाऊंडेशन व अ माॅडल्स ड्रिम्सच्या मुख्य संचालक ही आहेत.
सौ.पायल कापसे यांची निवड झाल्याबद्दल कुर्मी समाजाच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
काल झालेल्या आमदार अपात्रतेबाबत विचार करायचा झाल्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वर खूप मोठा अन्याय झाला,असंच म्हणावं लागेल.कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र व्हायला पाहिजे, परंतु तसं न होता ते सर्व आमदार पात्र ठरविण्यात आले.परंतु उद्धव ठाकरे यांच्या घरात देर हे पर,अंधेर नही. आज तर राज्याच्या निवडणुका झाल्या तर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार.
काल-परवा जो महाराष्ट्रामध्ये आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल,उभ्या देशाला अचंबित करणारा ठरला.कारण राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदेचा गट म्हणजे ते १६ आमदार अपात्र होतील हीच, आशा संपूर्ण महाराष्ट्राला होती.परंतु जी अशा महाराष्ट्रातील जनतेला होती आणि ती चकणाचूर झाली.कारण जे अपात्र होते तेच पात्र ठरले.म्हणजे नापास होणारेच पास झाले,असंच म्हणायची वेळ आली.
वास्तविक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे १६आमदार पात्र ठरवून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटांवर खूप मोठा अन्याय झाला आहे.कारण उभ्या महाराष्ट्राला अचंबित करणारा निकाल विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केला. या निर्णयामुळे देशातील कायदे तज्ञ सुद्धा विचारात पडले आहे,अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.परंतु हा निर्णय चुकीचा आहे.सत्ता येते सत्ता जाते पण असला घाणेरडा राजकारण कोणीही करू नये,कारण अशा प्रकारामुळे महाराष्ट्राची आन-बान,शान धुळीस मिळू शकते.महाराष्ट्र संतांची भूमी आहे छत्रपती शिवरायांची विचारधारा जोपासणारा महाराष्ट्र आहे.
या निकालामुळे उद्धव ठाकरे यांचा पराजय झाला,असं राज्यातील सत्ताधार्यांना वाटत असेल तर तो चुकीचा अंदाज आहे.कारण या निकालामुळे विजय उद्धव ठाकरेंचा झालेला असून,सत्ताधारी यांचा पराजय झालेला आहे.कारण दुसऱ्यांचे मन दुखवून जो आनंद मिळतो तो काय कामाचा ? आनंदाची उधळण जरूर करा,परंतु राज्यातील फोडाफोडीचे राजकारण आधी संपुष्टात आणा आणि मगच आनंद व्यक्त करा,कालच्या निकालामुळे काही वेळासाठी उद्धव ठाकरे व्यतीत झाले असतील,
परंतु समोर जास्त काळासाठी आनंदी होतील आणि उभा महाराष्ट्र बघत राहील,कारण या निकालामुळे उद्धव ठाकरे ची प्रतिष्ठा,मान,सन्मान दुप्पट झालेला आहे आणि आजच्या घडीला जरी निवडणुका घ्यायची वेळ आली तरी परंतु उद्धव ठाकरेच बाजी मारणार आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार.ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात तो माणूस आजच्या घडीला उद्धव ठाकरे सोबत आहे,म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होणार.
आज गडचिरोली येथे महिला सशक्तीकरणाच्या नावाखाली राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या जाहीर सभेचे भव्य-दिव्य देखावे आयोजित करून 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजविण्याचा केविलवाना प्रयत्न करण्यात आला.सकाळी 10.00 वाजताचा कार्यक्रम 3.30 वाजता पार पडला,मात्र सकाळपासून उपाशी आलेल्या माझ्या भगिनीला नाश्ता व जेवन दिले आणि त्यासोबतच प्रत्येकी एक साडी देऊन महिलेला सशक्त करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच राज्याचे मुख्यमंत्री साडी वाटप कार्यक्रम हाती घेऊन, गडचिरोली शहरात एकनाथाने एक प्रकारे दुकान मांडण्याचा प्रयत्न केला.
आज दिनांक ९ जानेवारी रोजी गडचिरोली येथील एमआयडीसी ग्राउंड वर,राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांची भव्य जाहीर सभा सकाळी १० वाजता होणार होती परंतु तब्बल ५.३० तास उशिरा म्हणजे ३.३० वाजता जाहीर सभेला सुरुवात झाली.पुढे होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजविणे हाच मुख्य उद्देश,परंतु महिला सशक्तीकरणाच्या नारा देत महिलांच्या रूपाने सभेला गर्दी खेचण्याचा प्रयत्न होता.
उद्देश कोणताही असो पण जाहीर सभा लोकसभेच्या निवडणुकीचीच होती हे,जाहीरपणे कोणी बोलायला तयार नसेल तरी पण सरकारचा उद्देश स्पष्ट आहे. चामोर्शी तालुक्याच्या जरी विचार करायचं झाल्यास तब्बल ८८ बस गाड्यांचे व्यवस्था करून महिलांची गर्दी खेचण्यात राज्य सरकार यशस्वी झाली,असा तूर्तास म्हणायला हरकत नाही.
सकाळी ९ वाजता ज्या त्या गावावरून बसेस सोडण्यात आल्या आणि उपाशी तापाशी माझ्या भगिनी जाहीर सभेची तयारी म्हणून रवाना झाल्या.नाश्ता व जेवणाची जरी व्यवस्था करण्यात आली,ही गोष्ट जरी सत्य असली तरी कार्यक्रमाचा वेळ बघता दिवसभर ताटकळत बसलेली माझी भगिनी ची काय अवस्था झाली असेल याचा विचार ना आयोजकाला आहे अन ना राज्याच्या मुख्यमंत्री महोदयाला आहे.म्हणजे आंधळा दळतय आणि कुत्रं पीठ खातय ,अशी अवस्था ताटकळत बसलेल्या महिलेची झाली आहे आणि हे वास्तव्य आहे.
गडचिरोली येथील कार्यक्रम शासनाचा आणि शासनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या महिलांना साडी वाटप कूणी केला ? लायल मेटल कंपनीचे मालक प्रभाकरने.म्हणजे विचार करा कार्यक्रम शासनाचा उपस्थिती मुख्यमंत्र्यांची आणि साडी वाटप कंपनी करतंय,म्हणजे कथा कूणाची अन व्यथा कूणाला,अशी परिस्थिती असल्यामुळे कार्यक्रमाचे आयोजक कोण ? हे सांगण्याची गरज नाही,असा याचा अर्थ होतो.
वास्तविक शासनाचा उपक्रम चांगला आहे,हेतू स्पष्ट आहे,समोर लोकसभेच्या निवडणुका आहेत सभेला उपस्थित महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम आहे. नाश्ता,जेवण मिळाला,सर्व ऑल्-वेल असलं तरी,दिवसभर जी महिला ताटकळत कार्यक्रमात उपस्थित आहे,जरा तिच्या सुद्धा विचार व्हायला पाहिजे.जो आनंद चेहऱ्यावर घेऊन सकाळी सात वाजता घरून बाहेर पडली आणि आता तिच्या चेहऱ्याकडे एकदा डोकावून बघा म्हणजे कार्यक्रमाची रूपरेषा लक्षात येईल.तिचे मनोगत एकदा ऐकून बघा, जो आनंद तिच्या चेहऱ्यावर होता तो केव्हाचाच निघून गेला आहे,तिच्या आनंदावर नुसता विरजण पडलाय आणि ती कशासाठी आली ? आपली फसगत झाली याची जाणीव होऊ लागली.
दिवसभर ताटकळत राहण्याच्या सार्थ अभिमान उराशी बाळगून मिळालेल्या साडीचा जरी विचार केला असेल तरी पण गडचिरोली शहरात एकनाथाने दुकान मांडला,याची जाणीव झाली आणि कंटाळलेल्या मनाला धीर देत गावाकडे येण्यासाठी नाजूक पावलाला सावरत गावाच्या दिशेने निघाली.
आज्च्या घडीला महाराष्ट्र राज्याचा राजकारण या विषयावर चर्चा करावी किंवा त्याच्याकडे गांभीर्याने बघ्त्च राह्व अस राजकारण आपल्या महाराष्ट्र राज्यात घडला आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आणि महाराष्ट्र विधानसभेचा विरोधीपक्षनेता कोण यांच्या चर्चा करायला गेल तर चर्चा संपायाच्या आधीच मुख्यमंत्री बदलेला आप्ल्याला पहायाला मिळाल आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा विरोधिपक्षनेते देवेन्द्र फडणवीस होते एक आठवड्याला कालाविधि संपला आणि मुख्यमंत्री बद्लाचे वारे सुरू झाले आणि मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे विराजमान झाले आणि विरोधीपक्षनेते असलेले फडणवीस उपुख्यमंत्री झाले आणि लगेच उपुख्यमंत्री असलेले अजित पवार विरोधीपक्षनेते झाले.
काही दिवसांचा कालावीधी संपला आणि पुन्हा अजित पवार उमुख्यमंत्री पदी विराजमान झाले आणि आता विरोधीपक्षनेते विजय वडे्टीवार झाले. परंतू मनात अशी शंका येते, महाराष्ट्र राज्याच सर्व राजकारण विरोधीपक्षनेता या पदावर अवलंबून राहिला आहे. राज्याचं राजकारण या एकाच पदावर घोंघावत आहे म्हणून मनातील कुजबुज सांगायला लागली की आजचे विरोधीपक्षनेते कदाचित उद्याचे उपुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील हे ही सांगता येणार नाही. एवढी पॉवर आज विरोधीपक्षनेते या पदावर आहे आणि हा राजकारण आहे काहिही होवू शकतो. बघत राहा सुखी राहा एवढीच शुभेच्या महाराष्ट्रातील जनतेला.
हिट अँड रन कायदा केंद्र सरकारने नव्याने लागू केला असून,यामुळे खाजगी वाहन चालकांवर अन्याय करणारा कायदा असून.त्या कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी किंवा असा कायदा रद्द व्हावा, अशा प्रकारची मागणी घेऊन खाजगी वाहन चालकांनी वाहतूक बंद करून जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार अवलंबल्या गेल्यामुळे संपूर्ण राज्यातील पेट्रोल पंपावर पेट्रोल,डिझेलचा तुटवडा असल्याकारणामुळे पेट्रोल,डिझेल मिळणे आता कठीण झाले आहे.
हिट अँड रन या कायद्यामुळे खाजगी वाहन चालक सर्वात आधी अडचणीत येत असल्यामुळे,त्यांनी असा बंद पुकारला आहे. या कायद्यात अशी तरतूद केल्या गेली आहे की,खाजगी वाहन चालकांच्या हाताने एखादा अपघात झाला तर ड्रायव्हर वर सात लाख रुपयांचा जुर्माना अन्न दहा वर्षांचा कारावास अशी तरतूद केल्या गेली आहे. ही आम्हाला मालकाकडून पगारच दहा ते बारा हजार रुपये मिळतो आहे,तर आम्ही सात लाख रुपये कोणत्या भरोशावर जुर्माना भरू, अशी खंत खाजगी वाहन चालक बोलून दाखवत आहेत. तूटपूंज्या पगारावर आम्ही काटकसरी करून कसातरी संसाराच्या गाडा चालवतोय ,त्यातल्या त्यात असा नवीन कायदा आम्हाला जगू देणार नाही,अशी खंत खाजगी वाहन चालकांनी बोलून दाखवली.
त्यामुळे हे प्रकरण चिघळण्याची परिस्थिती दिसून येत असल्यामुळे,पंपावर पेट्रोल भरण्यासाठी मोठमोठ्या रांगाच्या रांगा लागल्या असून जनतेचे हाल होताना दिसून येत आहेत.मुख्य म्हणजे आता पंपावर पेट्रोल मिळणे हे देखील बंद होणार आहे कारण राज्यातील बरेच पेट्रोल पंप रिकामे झाले असून आता पेट्रोल मिळणे सुद्धा बंद झाले आहे.धकाधकीच्या काळात वाहनांची संख्या वाढली असल्यामुळे जनतेचे हाल होताना दिसून येत आहे.असा जीवांवर उठणारा कायदा जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत गाड्यांची वाहतूक सुरु होणार नाही,असा खाजगी वाहन चालक वर्गाचा म्हणणं आहे.
जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी फक्त आजच्या दिवस पुरेल इतका पेट्रोलचा साठा उपलब्ध असल्यामुळे,उद्यापासून जनतेचे जास्त हाल होतील असा अंदाज वर्तविला जात आहे.तरी परंतु ग्रामीण भागातील टू व्हीलर बांधवांना अशी विनंती करतो की,अशा पेट्रोल महागाईच्या काळात शक्यतोवर खूपच आवश्यक आहे अशाच ठिकाणी मोटार सायकलवर जाण्याचा विचार करावा हीच आग्रहाची विनंती
उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष चा उपक्रम
उमेद तालूका अभियान व्यवस्थापन कक्ष च्या वतीने सोमवार ला पंचायत समिती चिमूर आवारात दिवाळी फराळ पाच दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या दिवाळी फराळ प्रदर्षानीचे उद्घाटन प स संवर्ग विकास अधिकारी राजेशकुमार राठोड व विस्तार अधिकारी(कृषी) पंचायत समिती यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले.
दिवाळीनिमित्त विविध वस्तूची खरेदी करताना ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेले खाद्यपदार्थ, आकाश दिवे, उटणे यांची खरेदी करून ग्रामीण भागातील महिलांच्या उत्साह वाढवावा व त्यांच्या उत्पन्नात वाढ करावी असे आवाहन संवर्ग विकास अधिकारी राजेशकुमार राठोड यांनी केले. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्वयंसहायता समूह कार्यरत असून यातील अनेक महिला नाविन्यपूर्ण वस्तूची निर्मिती करतात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांकडून विविध खाद्यपदार्थ व सजावटीच्या वस्तू विक्रीस ठेवल्या आहेत. पंचायत समिती चिमूर परिसरात दिनांक 6 नोव्हेबर ते 10 नोव्हेबर या पाच दिवसीय कालावधीमध्ये दिवाळी फराळ महोत्सव राहनार करण्यात आहे या पाच दिवसांमध्ये विविध वस्तू विक्रीस असणार आहेत भेट देणाऱ्या ग्राहकांनी ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू खरेदी कराव्यात जेणेकरून ग्रामीण भागातील महिलांच्या घरातही आनंद पोहोचेल असे आवाहन तालुका अभियान व्यवस्थापक राजेश बारसागडे यांनी केले.
दरम्यान कार्यक्रमाला मेघदीप ब्राम्हणे, रजनी खोब्रागडे, हेमचंद बोरकर, ईश्वर मेश्राम, सुधीर ठेंगरी, दिपाली दोडके, स्वप्ना उराडे, पुंडलीक गेडाम, श्री. नितेश मेश्राम, किरणकुमार मेश्राम, नितेश संगेल प्रीती डोंगरे आदी उमेदच्या टीमने परिश्रम घेतले
मालेवाडा जेतवन बुद्ध विहारात अशोका विजयादशमी
जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे "अशोका विजयादशमी दिनाच्या" कार्यक्रम प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना बौद्ध पंच कमेटी, मालेवाडा चे सचिव आशिक रामटेके म्हणाले की, सद्याची जागतिक युद्धजन्य परिस्थिती, धर्मांधतेला आलेला उत, तरुणाईची व्यसनाधीनता व नैराश्याकडे होत असलेली वाटचाल अशी एकंदरीत परिस्थिती बघता यातून जीवनाचा यशस्वी मार्ग शोधण्याकरिता तथागताच्या धम्म शिकवणीशिवाय पर्याय नाही.
बौद्ध धम्मातील महत्वपूर्ण प्रसंग व उत्सव हा धम्माचा सांस्कृतिक वारसा असून तो जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य व काळाची गरज आहे. याप्रसंगी तथागत बुद्ध, प्रियदर्शी सम्राट अशोक, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांचे हस्ते अभिवादन करुन सामूहिक त्रिशरण- पंचशील घेण्यात आले. अशोक विजया दशमी बौद्ध धम्मीयांचा पुजनीय व पवित्र सण शुभ व मंगल दिन, मानवांच्या दुःखमुक्तीचा दिवस, धम्मविजयाचा आदर्श दिवस, बौद्ध साहित्यामध्ये सर्वात मोठे महत्त्व असलेला दिवस, एक आदरणीय व अनुकरणीय दिवस, समता, स्वातंत्र्यता, बंधुता व मैत्रीच्या संगमाचा दिवस, असत्यावर सत्याचा विजय दिवस, क्रूरतेवर व पशुतेवर सत्धम्माचा विजय दिवशी यावेळी गंगाधर गजभिये, ईश्वर ठवरे, मारोती बहादुरे, भाऊराव गजभिये, दादाजी रामटेके, प्रदीप मेश्राम, विलास मेश्राम, राजेंद्र गजभिये, योगेश मेश्राम,निलेश मेश्राम,प्रशिक बहादुरे ,आयु. भिमाबाई गजभिये, काजल ठवरे, वंदना मेश्राम, रत्नमाला भिमटे, संघमित्रा मेश्राम, सुनंदा रामटेके, विद्या रामटेके, शोभा चव्हाण, शोभा गजभिये, सत्यफुला चव्हाण, शांताबाई रामटेके, भावना शेंडे, आदी मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते.
वहानगांव येथील मृतक परिवारांची सांत्वन भेट
शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे मृत्युचे प्रमाण वाढत आहे. एकीकडे शासन शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी योजना देत आहे तर दुसरीकडे पाणी पुरवठा करण्यासाठी दिवसभरात विज पुरवठा न करता शेतकऱ्याला रात्री विज पुरवठा करत आहे. रात्रीच्या वेळेला शेतात पाणी करणे म्हणजे जीव धोक्यात घालन्याचा प्रकार आहे. असाच प्रकार तालुक्यातील वाहनगांव येथील शेतकरी नितीन रामचंद्र जुगनाके वय ३१ वर्ष हे दिनांक २३ ऑक्टोबर सोमवार ला रात्री ११ वाजताच्या दरम्यान शेतात पिकाला पाणी करण्यासाठी गेले होते त्यांच्या पायाला सर्पाने दंश केला असता त्याचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती होताच वहानगांवातील शेतकऱ्यांच्या घरी भेट देत परिवाराचे सांत्वन करत मृतक शेतकऱ्यांच्या परिवारासोबत असल्याचे चिमूर विधान सभा क्षेत्राचे समन्वयक तथा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी महासंघचे उपाध्यक्ष डॉ सतिश वारजूकर यांनी सांगीतले.
मृतक नितीन आणि मंगेश दोन्ही भाऊ शेतात पाणि करत होते. मृतकाला सर्प दंश झाल्याचे लक्षात येताच नितीन ने सोबत असलेले मोठे बंधू मंगेश जुमनाके याना सांगितले कसेबसे ते घरी परत आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना लगेच उपचारासाठी चिमूर येथील उपजिल्हाला रुग्णालयात दाखल केले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. यावेळी मृतकांच्या घरी भेट देतांना कांग्रेस नेते कमलसिंग अंधरीले, युवक कांग्रेस अध्यक्ष नागेद्र चट्टे, कांग्रेस कार्यकर्ते रुपचंद शाश्त्रकार, सरपंच प्रशांत कोल्हे, स्वप्नील मुंगले, इरफान पठाण,ग्यानसिंग अंधरीले, डोमाजी थुटे, प्रमोद दोडके, ज्ञानकसिंग अंधरीले, सजीत सब्जीत सिंग अंधरिले, अरुण मसराम आदी उपस्थित होते,
महाराष्ट्राच्या राजकारणात आत्तापर्यंत अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. सरकार आलं पडलं पुन्हा आलं या सर्व गोंधळात सामान्य माणूस भरडला जातो. राज्यातील जनतेचे अनेक प्रश्न असताना राजकीय नेते मात्र स्वत:चा स्वार्थ साधताना दिसतात. जनतेचं कोणाला काहीच पडलेलं दिसत नाही. अनेक ठिकाणी नागरिक राजकारण्यांवर संताप व्यक्त करताना दिसतात.
महाराष्ट्रातील राजकारणाला वैतागून तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संतप्त झालेल्या इगतपुरी तालुक्यातील अधरवड गांवच्या नागरिकांनी राजकारण्यांना थेट गांवात यायची बंदी घातली आहे. गावकऱ्यांनी सर्व पक्षातील नेत्यांना पुढाऱ्यांना गावात येण्यास बंदी घातली असून जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांना आम्ही गावात प्रवेश देणार नाही, अशी भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आहे.
चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष आता फक्त मराठा आरक्षण लक्ष अशा पद्धतीचा बॅनरवर लिहिण्यात आला आहे. व ते बोर्ड गांवयाच्या येऊन निषेध व्यक्त करण्यात आला.जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांना आम्ही गावात प्रवेश देणार नाही राज्यातले अनेक.राज्यातील अनेक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी मराठा समाजाचे आहेत. तरीही मराठा समाजाची परिस्थिती नीट नाही. त्यांना मूलभूत गोष्टींसाठी भांडावं लागत आहे, ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पक्षाच्या नेत्यांनी येऊ नये, असा आक्रमक पावित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. प्रतिक्रिया मराठा समाजाचा शैक्षणिक विचार केला तर मार्क्स असतांना व परिस्थिती नसतांना अवाढव्य रक्कम मोजावी लागते त्या मुळे शिक्षणात समाज अधोगतीला चालला असून समाज उभा करायचा असेल मराठा समाजाला नोकरी ,शैक्षणिक आरक्षण देणे गरजेचे असल्याचे गावकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या.
यावेळेस गांवातील सरपंच ज्ञानेश्र्वर डमाळे, ग्रा.पं.सदस्य उमेश ब-हे, पोलीस पाटील . ज्ञानेश्वर ब-हे, ज्येष्ठ नागरिक सुरेश ब-हे,डॉ.घन: श्याम ब-हे सामाजिक कार्यकर्ते नवनाथ धोंडू ब-हे, नवनाथ ब-हे,संदीप ब-हे,भाऊसाहेब ब-हे,बाळू ब-हे, विष्णू राक्षे,सोपान तळेकर, सोमनाथ ब-हे,अजय ब-हे,सुदाम ब-हे आणि गांवातील सर्व सकल मराठा समाज समाजातील तरुण कार्यकर्ते उपस्थित होते...
चिमूर तालुका वंचित बहुजन आघाडीने दिले महामहीम राज्यपाल यांना विविध मागण्यांचे निवेदन -
चिमूर अप्पर जिल्हाधीकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा
देशातील अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय समाजाच्या नागरिकांचे अधिकार, राजकिय, सामाजिक आरक्षण, लोकशाही, संपवण्याचा घाट रचून शेटजी भटजींचे राज्य निर्माण करण्याचे प्रयत्न भाजपा सरकार कडून सुरू असून राज्यात बहुजन समाज स्वतःला असुरक्षित समजत असून जातींच्या, धर्माचा नावावर आपापसात लढवल्या जात आहे त्यामुळे बहुजन समाजाचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी चिमूर तालुका वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर येऊन ईव्हीएम हटाव, संविधान बचाव या प्रमुख मागणीसाठी बुधवारला आक्रोश मोर्चा काढून शासनाचा निषेध करण्यात आला.
शहरातील वडाळा ( पैकु ) संविधान चौकातून भदंत ज्ञानज्योति महाथेरो ,भदंत धम्मचेती, महाराष्ट्र प्रदेश सदस्य कुशलभाऊ मेश्राम, डॉ रमेशकुमार गजभे, अरविंद सांदेकर, राजेश बोरकर, जयदीप खोब्रागडे,महिला जिल्हाध्यक्ष कविता गौरकर, यांच्या मार्गदर्शनात चिमूर तालुका वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष बाळासाहेब बन्सोड, वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष शुभम मंडपे यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
देशातील सर्वच निवडणूका बॉलेट पेपर वर घेण्यात यावी,तीन पिढ्याची अट रद्द करण्यात यावी,केजी टू पीजी शिक्षण मोफत करण्यात यावी,६२ हजार शाळेचे खाजगीकरण रद्द करावे, सर्व जातीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, कंत्राटी भरतीचा जिआर रद्द करण्यात यावा, अश्या अनेक मागण्या घेऊन मोर्चाचे आयोजन करण्यात आले, मोर्चात सरकारच्या विरोधात घोषणा देत मोर्चा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येत धडकला
अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापुढे मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत करण्यात आले
दरम्यान मोर्चेकर्यांना भदंत महाथेरो ज्ञानज्योति, उमरेड विधानसभा समनव्यक राजू मेश्राम, डॉ बाळासाहेब बन्सोड, कुशलभाऊ मेश्राम, डॉ रमेशकुमार गजभे, शुभम मंडपे, अरविंद सांदेकर,अल्काताई मोटघरे, आदींनी मोर्चाला संबोधित केले कार्यक्रमाचे संचालन प्रकाश मेश्राम यांनी केले दरम्यान शिस्टमंडळाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल रमेश बैस यांना पाठविण्यात आले मोर्चाच्या यशस्वीतेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले
-----------------------------
ईव्हीएम ची केली होळी -
मोर्चाची मुख्य मागणी एव्हीएम हटाव,देश बचाव ही असल्याने, मोर्चेकर्यांनि तहसील कार्यालयापुढे प्रतिकात्मक एव्हीएम ची होळी करून ईव्हीएम हटवण्याची मागणी करण्यात आली.
- राष्ट्रसंत तुकडोजी पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा प्रकरण
राष्ट्रसंत तुकडोजी पतसंस्थेत अकरा महिन्यांपूर्वी आर्थिक घोटाळा झाला. याची लेखी तक्रार उपलेखापरिक्षक सुधाकर लांडगे यांनी चिमूर पोलीसात दिली होती पोलीसांनी तपासाअंती १६ लोकांवर विवीध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचेकडे वर्ग करन्यात आले. आर्थिक गुन्हे शाखाने १६ आरोपीपैकी फक्त तिन आरोपींनाच अटक केली. मात्र या प्रकरणातील आर्थिक घोटाळ्यात जे मुख्य सुत्रधार आरोपी आहेत त्यांच्यावर सर्व प्रकारची कारवाई न करता आर्थिक गुन्हे शाखाने संस्थेच्या संचालकांची उलट तपासणी सुरु केली असुन विवीध बँकेतील खात्यावर बंदी घालून मालमत्ता विषयी माहिती घेत असल्याचे संस्थेचे संचालक यांनी मंगळवार ला पतसंस्थेच्या कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत सांगीतले.
संस्थेचे माजी उपाध्यक्ष अरुण मेहरकुरे, अमोल मेहरकुरे, अतुल मेहरकुरे व माजी व्यवस्थापक मारोती पेंदोर आणि इतरांनी पतसंस्थेत सात करोड 65 लाख 33 हजार 450 रुपयाचा आर्थिक घोटाळा केला असल्याची तक्रार सहकारी संस्थाचे उपलेखा परिक्षक राजेश लांडगे यांनी नऊ वर्षांच्या कालावधीत संस्थेचा लेखा जोखा तपासणी करून चाचणी लेखापरिषण अहवाल पत संस्थेला सादर केला असता निदर्शनास आले. त्यानुसार उपलेखा परिक्षक राजेश लांडगे यानी पोलीसात लेखी तक्रार दाखल केली पोलीसांनी तपासाअंती १६ आरोपी वर गुन्हे दाखल केले. त्यांच्यावर संपूर्ण कारवाई न करता संचालकावर सुडबुद्धीने कारवाई करण्याचे षडयंत्र निर्माण करून संचालकाची मालमत्ता रजिस्ट्री ऑफीस व विवीध बँकेत असलेल्या खात्यावर बंदी घालत मालमत्तेची माहिती घेत मालमत्ता जप्त करून मालमतेचा लिलाव करण्याचा डाव आर्थिक गुन्हे शाखा तर करीत नाही ना असाही प्रश्न पतसंस्थेच्या संचालकात निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे पतसंस्थेच्या संचालकांना मानसीक बौद्धीक शारीरीक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. कोनाचे देवान घेवान कसे करायचे या विवंचनेत संस्था संचालक आहेत. यामूळे या प्रकरणाची परिवारातही अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र यात माजी संचालक रमेश खेरे यांनी या आर्थिक घोटाळा प्रकरणापूर्वीच राजीनामा दिला आहे त्यांचा संबध पतसंस्थेशी नसताना त्यांचे बॅक खाते गोठवीन्यात आले. ते पूर्ववत सुरु करावे अशी मागणी केली आहे. यात संचालकांचा दोष नसताना आर्थिक गुन्हे शाखेने त्रास देने सुरु केले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने संचालकाविरुद्ध कारवाई थांबवावी मुख्य आरोपीसह इतर आरोपीची चौकशी करून त्यांना अटक करावी अन्यथा तिव्र आंदोलन करन्यात येईल असा इशारा पतसंस्थेच्या संचालकांची पत्रकार परिषदेतून दिला आहे. यांच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विभागीय पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी चंद्रपूर, पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांना पाठवीन्यात आल्या आहेत. पत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष पुंडलीक मांढरे, संचालक अर्जुन कारमेंगे, विनोद शिरपुरवार, उमेश कुंभारे, बबन बन्सोड, मोहन हजारे, प्रविण वैद्य, रमेश खेरे आदी उपस्थित होते
----------------------------------
आर्थिक घोटाळ्यात जे काही आरोपी आहे त्यांच्यावर कारवाई करने सुरू आहे. संचालकाची मालमत्ता जप्तीची कारवाई ही MPID कडून सुरु आहे जोपर्यंत ठेवीदारांचे पैसे परत मिळनार नाही तो पर्यंत संस्था व संस्थेचे संचालक यांची प्रॉपर्टी जमा करण्याचे प्रावधान शासनाला आहे. संस्थेच्या आर्थिक घोटाळ्यात जे संचालक नव्हते त्या संचालकांचे खाते चुकीने बंद करण्यात आले आहे आता ते खाते पूर्ववत सुरू करण्यात आले. पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी सुरु आहे.
आयुष नोपाणी
सहायक पोलीस अधिक्षक आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर
शिक्षक भारती करणार शासनाच्या धोरणाचा निषेध
हल्ली राष्ट्रीय कार्याच्या नावाखाली शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. शिक्षकांना अध्यापन सोडून इतर कोणतीही अशैक्षणिक कामे सांगायला नको आहे .पण सध्या अध्यापन सोडून इतर सर्व अशैक्षणिक कामे करुन घेतली जात आहेत हे दुर्दैवी आहे. आम्हाला शिकवू द्या अशी शिक्षकांना मागणी करावी लागत आहे. आजपर्यंत शिक्षक भारतीच्या माध्यमातून व शिक्षक आमदार कपिल पाटीलयांचे मार्गदर्शनात आणि म. रा. प्रा. शिक्षक भारती अध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे बंद करावीत या मागणीसाठी शासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केलेला आहे. पण शासन दखल घेत नसल्यामुळे शिक्षक भारतीच्या वतीने ५ सप्टेंबर शिक्षक दिनी शिक्षक शासनाच्या या धोरणाचा निषेध म्हणून शाळेत दिवसभर काळ्या फीती लावून अध्यापन करण्यात येणार आहे.
५ सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन हा दिवस देशातील प्रत्येक शिक्षकांसाठी महत्वाचा असतो. या दिवशी शिक्षकांचा देशभर गौरव व सन्मान होत असतो.पण अशैक्षणिक कामाच्या ओझ्यात शिक्षक भरडला जात आहे. आम्हाला शिकवू द्या अशी शिक्षकांची मागणी आहे. अशैक्षणिक कामे आणि ऑनलाईन कामांमुळे शिक्षक बेजार झाला आहे. अशैक्षणिक कामांचा निषेध करण्यासाठी शिक्षक काळ्या फिती लावून शासनाचा निषेध करणार असल्याची माहिती शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुरेश डांगे यांनी दिली आहे.
संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा
अखिल भारतीय शिंपी समाज चिमूर च्या वतिने आयोजित संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा कार्यक्रम रविवार ला चिमूर येथील श्रीहरी बालाजी देवस्थान येथे पार पडला. दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग संघटक धनराज मुंगले यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी माजी सदस्य जिल्हा परिषद ग्रजानन बुटके, शिंपी समाज अध्यक्ष नेमाजी बोबडे, शिंपी समाज उपाध्यक्ष राजू लोनारे , काँग्रेस नेते कृषणा तपासे, कोषाध्यक्ष राजेंद्र खाडे, युवक मंडळ चिमूर अध्यक्ष संदिप कावरे, उपाध्यक्ष निखिल डोईजळ , सदस्य अभिजीत बनगे , प्रशांत डवले , राकेश कापसे, देविदास पसारे , दिवाकर चिंचोलकर , गोवींद गोहणे , आदी शिंपी समाज बांधव उपस्थित होते .
नेर- पुणे येथील ससून रुग्णालयाचे एच.ओ. डी. व नेरचे भूमिपुत्र डॉ. आर. टी. बोरसे यांनी क्षयरोग ( टी. बी.) व एच. आय. व्ही. या आजारावर प्रतिबंधात्मक म्हणून अँटी रिप्ट्रो वायरस ट्रीटमेंट शोधून काढली, त्यामुळे देशातील व जगभरातील अनेक रुग्णांना जीवनदान मिळणार आहे. हे काम मोलाचे व अभिमानास्पद आहे. यापूर्वी स्वाईन फ्लू या साथीच्या आजाराच्या वेळी ही त्यांनी मोठे योगदान दिले होते. त्यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी त्यांचे कौतुक करून सत्कार केला होता. आज नेर येथे त्यांच्या निवासस्थानी आले असता त्यांचे अभिनंदन व सत्कार करतांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व नेरचे भूमिपुत्र डॉ.योगेंद्र नेरकर व नेर चे माजी सरपंच शंकरराव खलाणे, निवृत्त बँक अधिकारी प्रकाश खलाणे, माजी ग्रा. पं. सदस्य आर. डी. माळी,सुरेश सोनवणे,भाजपचे गुलाबराव बोरसे, विद्युत कर्मचारी सदाशिव सोनवणे,पत्रकार संतोष ईशी, सुरज खलाणे व राकेश अहिरे आदी.