PostImage

सुपर फास्ट बातमी

July 2, 2024   

PostImage

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना, महिलांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन , …


 गडचिरोली दि. 2 : महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिला / मुलींना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील महिलांनी 15 जुलै पूर्वी अर्ज करून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

             ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिला टप्प्यात १ ते १५ जुलै या कालावधीत लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे. यासाठी पात्र महिला अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, परिवेक्षिका, मुख्यसेविका, सेवा सुविधा केंद्र यांच्या सहाय्याने अर्ज करू शकतात. यांनतर या प्रतिनिधींनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज शासनास सादर होतील. तसेच, ज्या महिला स्वत: ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात त्यांच्यासाठी ‘नारी शक्ती दूत’ हे ॲप सुरू करण्यात आले आहे.

 

योजनेचा उद्देश : 1) महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, 2) त्यांचे आर्थिक - सामाजिक पुनर्वसन करणे, महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे, 3) महिला व मुलींच्या सशक्तीकरणास चालना मिळणे, 4) महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे.

 

लाभार्थी पात्रता : 1) वय 21 ते 60 वर्षे असणारी महिला. 2) महाराष्ट्र राज्याची रहिवासी महिला. 3) विवाहित, विधवा, घटस्फोटित परित्यक्त्या, निराधार महिला. 4) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लक्ष पेक्षा कमी असणे गरजेचे.

 

अपात्रता : 1) कुटुंबातील सदस्य आयकर दाता असल्यास, 2) सरकारी नोकरी, 3) आजी/माजी आमदार/खासदार 4) कुटुंबाच्या मालकीची 5 एकर पेक्षा जास्त जमीन असणारे, 6) चार चाकी गाडी असणारे.

 

अर्ज करण्याची पद्धत : अर्ज नि:शुल्क अंगणवाडी सेविका यांचेकडे भारता येईल. अर्ज विहित नमुन्यात भरून व त्याला आवश्यक कागद जोडून अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सेतू केंद्र, वार्ड अधिकारी यांना देता येईल. वरील सर्वांकडून अर्ज ऑनलाईन भरून घेता येईल. लाभार्थ्याला स्वत: ‘नारी शक्ती दूत’ हे ॲपवर अर्ज करता येईल. 

 

आवश्यक कागदपत्रे : योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्याचे आधारकार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र / महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपर्यंत असावे), बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

 

 अडचणी असल्यास येथे करा संपर्क : अर्ज भरतांना काही समस्या असल्यास नजिकच्या अंगणवाडी केंद्रावर तसेच महिला हेल्प लाईन 181 वर संपर्क करावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी कळविले आहे. 

०००००


PostImage

Rushi Sahare

Nov. 4, 2023   

PostImage

Maharashtra News - व्हॉइस ऑफ मीडिया’ अधिवेशनाच्या लोगोचे प्रकाशन ! …


मुंबई  : देशभरातील क्रमांक एकची संघटना असलेल्या  ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या राष्ट्रीय संघटनेचे महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन येत्या 18 व 19 नोव्हेंबरला बारामती येथील गदिमा सभागृहात पार पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्या हस्ते कृषी मंत्री दादा भुसे, मंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत या अधिवेशनाच्या लोगोचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, कोषाध्यक्ष चेतन बंडेवार, मंत्री शंभूराजे देसाई व संघटनेच्या राज्य कार्यवाहक  यास्मिन शेख प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील लोगोचे प्रकाशन केले.
बारामती येथे होणाऱ्या या अधिवेशनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्यासह अनेक मान्यवरांची या अधिवेशनाला उपस्थिती राहून मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय ज्येष्ठ पत्रकारांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या अधिवेशनाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रियाताई सुळे, माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण यांची देखील उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे. 
अधिवेशनाची वेगाने तयारी होत असून अधिवेशनाला येणाऱ्या पत्रकारांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
---
संघटनेची कामगिरी कौतुकास्पद : मुख्यमंत्री
जेमतेम तीन वर्षाच्या काळात संघटनेने पत्रकारांसाठी व त्यांच्या समस्या निवारण्यासाठी केलेले नियोजन महत्त्वपूर्ण असून शासन दरबारी पाठपुरावा देखील वेगाने होत आहे. या अधिवेशनातून राज्यभरातील पत्रकारांच्या समस्या जाणून घेता येतील व त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल.
------
तळमळ महत्वाची : शरद पवार

मोजकेच पत्रकार वगळता राज्यातील हजारो पत्रकार बांधवांना अनेक समस्या, अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या माध्यमातून होत असलेले प्रयत्न व विशेष म्हणजे पत्रकारांबद्दलची तळमळ ही महत्त्वाची बाब आहे. अधिवेशनातून त्यांच्या समस्यांना निश्चितच वाचा फुटेल. आमच्यासारख्या नेत्यांनाही एकाच वेळी हजारो पत्रकारांना भेटता येईल याचा आनंद आहे.
-------
अधिवेशनाचे फलित 
होईल :  अजित दादा 

एवढ्या मोठ्या संख्येने राज्यभरातून पत्रकार बारामतीत येणार ही आनंदाची बाब आहे. सर्व पत्रकारांचे स्वागत आहे त्यांच्या समस्या मार्गी लागण्यासाठी अधिवेशनातून एकजुटीने होणारे प्रयत्न निश्चितच फलदायी ठरतील.
…….


PostImage

Rushi Sahare

Oct. 23, 2023   

PostImage

Gadchiroli News - तुमच्याकडेही असेल 5 रुपयांची अशी नोट, तर …


गूगल वर प्रकाशित बातमी आहे.


आता तुम्हाला एक पाच रुपयांची नोट लखपती बनवू शकते. खरंतर जुन्या नोटा आणि चलनी नाण्यांच्या लिलावातून मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे. देशात विशिष्ट नोटा आणि नाण्यांचा संग्रह करणारे खूप शौकिन आहेत.

आपल्या छंदासाठी अनेकजण नाणी आणि नोटांसाठी लाखो रुपये मोजण्यास तयार असतात. समजा आता तुमच्याकडे पाच रुपयांची नोट असेल तर तुम्ही घरी बसून 6 लाख रुपयांची कमाई निश्चितपणे करू शकता. त्यासाठी तुम्हाला काही नियम आणि अटी मान्य कराव्या लागतील.

समजा तुम्ही 5 रुपयांची नोट ठेवली असल्यास तर सर्वात अगोदर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्याव्या लागणार आहेत, त्यानंतरच तुम्हाला त्या नोटेची विक्री करता येईल. यामध्ये सर्वात अगोदर या नोटेच्या पुढील बाजूस अनुक्रमांक लिहिलेला असावा, समजा तुम्ही काही कारणास्तव नोट विकण्याची संधी गमावली तर तुम्हाला पश्चात्ताप करावा लागणार आहे. जाणून घ्या याबाबत

जाणून घ्या 5 रुपयांच्या नोटेची खासियत

5 रुपयांच्या नोटेची विक्री करण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे खूप गरजेचे आहे. सर्वात अगोदर म्हणजे या नोटेच्या पुढील बाजूस अनुक्रमांक 786 लिहिलेला असणे गरजेचे आहे. खरं तर, अनुक्रमांक 786 मुस्लिम समाजात खूप भाग्यवान आणि खूप पवित्र मानण्यात येतो.

तसेच इस्लामिक धर्माच्या लोकांना देखील आनंद आणि समृद्धीसाठी अनुक्रमांक 786 असणाऱ्या नोटा खरेदी करायला खूप आवडतात. समजा जर तुमच्याकडे ही नोट असेल तर नोट विक्री करण्यास उशीर करू नका. ही नोट तुम्ही सहज 6 लाख रुपयांना विकू शकता. इतकेच नाही तर तुम्ही अशा 3 नोटा ठेवल्या असतील तर तुमचे 18 लाख रुपये कमावण्याचे स्वप्न साकार होईल.