कोहळीटोला येथील घटना
गोंदिया, ब्युरो. भरधाव ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून गावाशेजारी असलेल्या पाण्याच्या बोडीत शिरला. त्यात चालकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सडक अर्जुनी तालुक्यातील कोहळीटोला येथे घडली. किशोर मनोहर लंजे (वय 32) असे मृतकाचे नाव आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील कोहळीटोला येथील उमाकांत लंजे यांच्याकडे ट्रॅक्टर आहे. मंगळवारी त्यांचा मोठा भाऊ किशोर लंजे घरून रात्री 10 वाजताच्या सुमारास ट्रॅक्टर घेऊन गेला होता. तो रात्री परतलाच नाही. बुधवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास गावाशेजारी असलेल्या पाण्याच्या बोडीत ट्रॅक्टर आढळून आला. शोधाशोध केल्यानंतर किशोर लंजे याचा मृतदेहही
आढळून आला. किशोरचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पाण्यात शिरल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलिस हवालदार राऊत करीत आहे.
गोंदिया, ब्युरो. मला आत्ताच दारू दे, अन्यथा तुला ठार मारतो, असे म्हणत गालावर मारले. ही घटना तालुक्यातील डांगोर्ली येथे मंगळवारी रात्री 8 वाजता घडली. तक्रारीवरून आरोपी मदन रंगलाल पाचे (वय 40) याच्याविरोधात रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तालुक्यातील डांगोर्ली येथील गजानन अनंतराम मेश्राम (वय 41) हे मंगळवारी रात्री 8 वाजता आपल्या घरी पत्नी, मुलाबाळांसह जेवण करीत होते. या दरम्यान गावातील आरोपी मदन रंगलाल पाचे तिथे आला व दारूची मागणी केली. यावर गजानन मेश्रामने माझ्याकडे दारू नाही, असे म्हटले.
यावरून आरोपी मदननेआणि गजानन मेश्राम यांच्या घरातील साहित्य फेकून आरडाओरड केली. दारू देत नसल्याच्या कारणावरून गजानन मेश्रामच्या गालावर मारले. तसेच शिवीगाळ करीत तुम्हाला ठार मारतो, अशी धमकी दिली. याप्रकरणी गजानन मेश्राम यांनी आरोपी मदन पाचे विरोधात रावणवाडी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस हवालदार बघेले करीत आहे.
गोंदिया : दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत बिरसी येथे घराच्या हिस्स्यावाट्यावरून तीन आरोपींनी फिर्यादीला काठीने मारून जखमी केल्याची घटना २० जानेवारी रोजीची आहे. फिर्यादी राजकुमार बारिकराम चौधरी (३८) रा. बिरसी याला आरोपीने तुझ्या घरकुलाचे बांधकाम पुर्ण झाले आहे, त्यामुळे माझ्या घराच्या हिस्स्याच्या ठिकाणी तुला कॉलम टाकू देणार नाही, यावरून वाद निर्माण केला तसेच तीन आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केले. तसेच काठीने मारून जखमी केले. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
गोंदिया, ब्युरो. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील एका ग्रामसेवकाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. मोहन - हिंगे (वय 37 ) असे मृतग्रामसेवकाचे नाव आहे.
मोहन हिंगे हे गोंदिया जिल्ह्याच्या देवरी - तालुक्यातील डवकी येथे - ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. ते गुरुवारी आपल्या गावी नवेगावबांधला गेले होते. दुपारच्या सुमारास त्यांनीघरीच गळफास लावला. ही बाब लक्षात आल्यानंतर - घरच्या मंडळींनी त्यांना तातडीने नवेगावबांध येथील ग्रमीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी - तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी - आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून त्यांच्याआत्महत्येचे कारण गुलदस्त्यात आहे
.
गोंदिया : तालुक्यातील एकोडी दांडेगाव येथे टवेरा वाहनाला अपघात होऊन चौघांचा मृत्यू तर पाच ते सहा प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. दोघांचा घटनास्थळी तर दोघांचा रुग्णालयात नेतांना मृत्यू झाला. जखमींना तात्काळ उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व के. टी. एस. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंगाझरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला आहे.
तिरोडा तालुक्यातील करटी बुुजूर्ग येथील साक्षगंध समारंभानिमित्त वऱ्हाडी हे टवेरा वाहनाने गोंदिया तालुक्यातील जुनेवाणी येथे येत असतांना दांडेगावच्या चौकात ही घटना घडली. २६ डिसेंबर रोजी मौजा दांडेगाव येथे गोंदिया तिरोडा महामार्गावर तिरोडा करटी वरुण गोंदिया कड़े मजीतपुर येथे उइके कुटुंबीयच्या घरी साक्षगांधच्या कार्यक्रम निमित्त वरात घेऊन जात असता दांडेगाव येथे भरधाव वेगाने येत असलेल्या टवेरा वाहन (MH 40,A 4243) च्या ड्राइवर अतुल नानाजी पटले (२३) वर्ष राहणार अर्जुनी परसवाड़ा यांनी वेगात असलेल्या वाहनाचे एकदम ब्रेक लावल्यामुळे सदर वाहन हे दोन तीन पलट्या घेत राज्य महामार्गावरील दांडेगाव येथे डाव्या बाजूला लागून असलेल्या रोहिणी प्रसाद बिरणववार (रा. दांडेगाव) यांच्या घराच्या अंगणात विद्युत पोललगत असलेल्या विटांच्या ढिगाऱ्यावर जाउन आदळल्याने मोठा अपघात झाला. वाहनात चालकासह बारा लोक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अपघात स्थळावर दोन महिलांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये छाया अशोक इनवाते (रा. करटी), अनुराधा हरिचंद कावळे (रा. करटी), तसेच एक पंधरा महिन्याच्या चिमुकल्याचा सामान्य रुग्णालय उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका मृताचे नाव कळू शकले नाही. या अपघातात गीता प्रितिचन्द इनवाते (५५ रा. करटी ता. तिरोडा), पदमा राजकुमार इनवाते (५० रा. भुराटोला तिरोडा), बिरजुला गुडन ठाकरे (३५ रा. आरम्भाघोटी जि. बालाघाट), अहिल्याबाई नामदेव कोडवाते (६२ रा. करटी तिरोडा), तसेच वाहन चालक अतुल नानाजी पटले (२३ रा. अर्जुनी परसवाड़ा) यांच्यावर के.टी.एस . जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे उपचार सुरु आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक बनसोडे यांच्या मार्गदर्शनात गंगाझरी पोलिस पथकाकडून सुरु आहे.
गोंदिया : देवरी तालुक्यातील ग्राम पुराडा गेडेवारटोला परिसरातील शेतामध्ये एका तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत व तिथूनच ५ ते सात फुटाच्या अंतरावर एका झाडाखाली युवतीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ही हत्या की आहे की आत्महत्या, याबाबत विविध तर्क लावले जात आहे.
मृत तरुणाचे नाव श्रीकांत कापगते (२२) व मृत तरुणीचे नाव टिकेश्वरी मिरी असल्याचे ग्रामस्थांकडून पोलिसांना कळविण्यात आले आहे. सालेकसा पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपास सुरू केला आहे. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. उत्तरीय तपासणीनंतरच ही हत्या की आत्महत्या, हे स्पष्ट होईल, अशी माहिती सालेकसा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी बोलताना दिली.