PostImage

सुपर फास्ट बातमी

Today   

PostImage

घरात पतीचा मृतदेह; तरीही पत्नीने बजावले 'मत' कर्तव्य


 

 अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) : घरातपतीचा मृतदेह, कुटुंबात दुःखाचे सावट सर्वत्र पसरले, जन्मदात्याचे छत्र हरविल्याने मुलीसुद्धा शोकसागरात बुडाल्या. दुःख वियोगात असलेल्या त्या माउलीने व दोन मुलींनी मतदान केंद्रात जाऊन मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. ही घटना येथील वॉर्ड क्रमांक १७ मध्ये घडली.

 

येथील रहिवासी शंकर ग्यानबा लाडे (४७) यांचे बुधवारी सकाळी ६ वाजता निधन झाले. पतीच्या दुःखवियोगात असलेल्या त्या माउलीने मतदान करण्याचा निर्णय घेतला. मृतदेह घरात असताना घरच्या सर्व मंडळींनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. त्यानंतर शंकर लाडे यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

 

पत्नीचा मृतदेह घरात; पतीने केले मतदान

 

कळमडू (ता. चाळीसगाव) : मुलगा लष्करात भरती होऊन कर्नाटकातप्रशिक्षणाला गेलेला, इकडे मतदानाच्या दिवशी पत्नी छायाबाई (४०) यांचे आकस्मिक निधन झाले. हे सर्व दुःख विसरून राजेंद्र नामदेव बच्छे यांनी परिवारातील सदस्यांसह आधी मतदानाचे कर्तव्य पार पाडले, त्यानंतर सायंकाळी चार वाजता पत्नीवर अंत्यसंस्कार केले.

 

● मुलगा देशसेवेसाठी सैनिकी प्रशिक्षणाला बेळगावला असल्याने आईच्या अंत्यविधीला तातडीने येऊ शकत नव्हता. त्यामुळे मुलगी रोहिणी बच्छे हिने मुलाप्रमाणे कर्तव्य पार पाडून आईला अग्नी डाग दिला

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 16, 2024   

PostImage

स्व. मनोहरभाई पटेल स्मृती संपादकीय पुरस्काराणे बबलु मारवाडे यांचे गौरव.


 

गोंदिया श्रमिक पत्रकार संघा तर्फे टिळक गौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित.

 

गोंदिया, दिनांक : 16 ऑगस्ट 2024 : महाराष्ट्र प्रदेश श्रमिक पत्रकार संघाशी सलग्न असलेले श्रमिक पत्रकार संघ गोंदिया यांचे वतीने आज दि.15 ऑगस्ट रोजी गोंदिया येथील राईस मिल असोसिएशनच्या सभागृहात आयोजित टिळक गौरव पुरस्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील उत्कृष्ठ काम करणाऱ्या मान्यवरांचे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.

 

दरम्यान पत्रकारिता पुरस्कार स्पर्धेत स्व. मनोहरभाई पटेल स्मृती संपादकीय पुरस्कार, प्रस्तीपत्र, सन्मान चिन्ह व रोख रक्कम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री. बबलु मारवाडे संपादक राष्ट्रीय हिंदी, बहु भाषिक साप्ताहिक रुद्रसागर न्यूज पेपर व महाराष्ट्र केसरी न्युज डिजिटल यांचे गौरव करण्यात आले, तर श्रमिक पत्रकार संघ गोंदिया यांचे बबलु मारवाडे यांनी मनापासून आभार वेक्त केले. 

 

श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृती निमित्त पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल विविध पुरस्कार तसेच एस.एस.सी. (१० वी) आणि एच. एस.एस.सी (१२ वी) मधील जिल्हयात टॉपर आलेल्या प्रथम, द्वितीय, तृतीय असे गुणवंत विद्यार्थी तसेच गोंदिया क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्था यांचा सत्कार करण्यात आले. 

 

यात श्रमिक पत्रकार संघातर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारात श्रमिक पत्रकार संघ टिळक गौरव पुरस्कार टि.आ.र.पी. न्युज चे संपादक मोहन पवार यांना देण्यात आले. या सोबतच स्व. मनोहरभाई पटेल स्मृती संपादकीय पुरस्कार, स्व. रामकिशोर कटकवार उत्कृष्ट वृत्तवाहिनी पुरस्कार, स्व. स्वातंत्र्य संग्राम सैनिक हिरालाल जैन उत्कृष्ट विकास वार्ता पुरस्कार, स्व. संतोष अग्रवाल स्मृती शोध वार्ता पुरस्कार, श्रमिक पत्रकार संघ उत्कृष्ट छायाचित्र पुरस्कार तसेच सहयोग मल्टी स्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटी लिमिटेड गुणवंत विद्यार्थी पुरस्कार आदि चे वितरण प्रफुल पटेल राज्यसभा सांसद, मनोहर चंद्रिकापुरे आमदार, माजी आमदार राजेंद्र जैन, गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले, आमदार विनोद अग्रवाल, जिल्हा परिषद बांधकाम सभापती संजय टेंभरे, समाज कल्याण सभापती पूजा अखिलेश सेठ, गुड्डू बोपचे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष हाजी अलताफ शेख, उपाध्यक्ष सचिव संजय राऊत यांच्या हस्ते देण्यात आले.

 

कार्यक्रमाचे संयोजक रवि सपाटे, कोषाध्यक्ष हरिश मोटघरे, सहसचिव महेंद्र बिसेन, सदस्य गण महेंद्र माने, विकास बोरकर, मोहन पवार, सुरेश येळे, दिलीप पारधी, बाबाभाई शेख, नविन दहिकर, महेंद्र लिल्हारे, यांच्या अथक प्रयत्नातून कार्यक्रम संपन्न झाले. सदर कार्यक्रमाचे संचालन संजय राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन हरीश मोटघरे यांनी मानले.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 13, 2024   

PostImage

सरपंचाने केली ग्रामसेवकास मारहाण


गोंदिया - सालेकसा तालुक्यातील दरबडा येथील सरपंचाने ग्रामसेवकास केलेल्या मारहाणीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युुनीयन गोंदिया संघटनेच्यावतीने तहसिलदार,पोलीस निरिक्षकांसह जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करुन सरपंचाविरुध्द तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरबडा येथील ग्रामसेवक अरुण सिरसाम हे सालेकसा तहसिल कार्यालयात कार्यालयीन कामाकरीता आले असता त्यांना बाहेर बोलावून सरपंच तमिल टेंभरे यांनी माझ्या मर्जीतील लोकांची नावे अतिवृष्टी नुकसान यादीत वाढविण्याची मागणी केली.त्यावर ग्रामसेवक सिरसाम यांनी यादी प्रशासनाकडे सादर झाल्यामुळे नाव वाढविणे शक्य नसल्याचे सांगितले.नाव वाढविण्याच्या मुद्याला घेऊन सरपंच व सचिव हे तहसिलदार सालेकसा यांच्याकडे आले असता तहसिलदारानीही नाव वाढविता येणार नसल्याचे सांगतिले.त्यामुळे कार्यालयाबाहेर येताच ग्रामसेवकासोबत वाद घालून सरपंचाने आपल्या साथीदारासह मारहाण केल्याचे निवेदनात म्हटले आहे.तसेच देवरी येथील निवडणुक प्रशिक्षण कार्यक्रमाला सुद्दा जाऊ दिले नसल्याचे म्हटले आहे.संविधानिक पदावर असताना सरपंचानी केलेले कार्य चुकीचे असून ग्रामसेवक संघटना या घटनेचा निषेध नोंदवित असून तात्काळ याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात यावे,अशी मागणी निवेदनातून केली आहे.तसेच जोपर्यंत गुन्हा दाखल करुन अटक केली जात नाही,तोपर्यंत ग्रामसेवक संघटनेच्यावतीने जिल्ह्यात कामबंद आंदोलन करतील अशा इशारा दिला आहे.निवेदन सादर करतेवेळी ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन,रामेश्वर जमईवार,कुलदिप कापगते,सालेकसा तालुक्यातील सर्व ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते.