गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत जिल्हाभरात एकूण ९० आधारभूत केंद्रांवरून यंदाच्या खरीप हंगामात धानाची खरेदी होणार आहे. गडचिरोली क्षेत्रात ५३ व अहेरीत ३७ असे एकूण ९० केंद्र मंजूर झाले असून या केंद्रांवर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू आहे. धानाची आवक सध्या झाली नसली तरी आवक झाल्यावर काटा होणार आहे. विशेष म्हणजे, आदिवासी विकास महामंडळाने धानखरेदीपोटीचे मागील हंगामातील ३० टक्के कमिशन आदिवासी विविध कार्यकारी संस्थांना अदा केले आहे. त्यामुळे यावर्षी धान खरेदीत कुठलीही अडचण नाही, असे महामंडळाच्या गडचिरोली कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक सोपान सांभरे यांनी सांगितले.
आविका संस्थांच्या बऱ्याच मागण्या प्रलंबित होत्या. यामध्ये धानातील तुट, प्रलंबित कमिशन, बारदाना, नुकसान व इतर विषयांचा समावेश होता. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर तोडगा काढतयातील बरेचसे प्रश्न मार्गी लावले. शासनाच्या अनुदानाची प्रतीक्षा न करता महामंडळाच्या निधीतून आविका संस्थांचे गतवर्षीच्या हंगामातील ३० टक्के कमिशन अदा केले आहे. त्यामुळे आविका संस्थांना दिलासा मिळाला असून त्या यंदा धान खरेदी करण्यासाठी तयार झाल्या आहेत.
गोदामात चार लाख बारदाना उपलब्ध
• बारदानाअभावी धान खरेदीमध्ये अडथळा येऊ नये म्हणून महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिककार्यालयाने बारदान्याची व्यवस्था केली आहे. गोदामामध्ये सध्या चार लाख इतका बारदाना उपलब्ध आहे. •
अहेरी कार्यालयाकडेही बारदाना उपलब्ध आहे. त्यामुळे धान खरेदीला सध्यातरी अडचण नाही. बोनसची रक्कम वाढली असल्यामुळे यंदाही जिल्ह्यात महामंडळाची विक्रमी धान खरेदी होणार आहे.
मयालघाट गावातील प्रकार: कर्मचाऱ्यांनी तीनवेळा दिली भेट
कोरची : तालुक्यातील अतिदुर्गम मयालघाट गावातील एका कुटुंबातील दीड वर्षीय बाळाला ताप आला असून डोळ्याजवळ फोडही आलेला आहे; परंतु वडील म्हणतात, मी सरकारी दवाखान्यात नेणार नाही. अनुज शनिराम कोरचा वय दीड वर्ष राहणार मयालघाट असे आजारी त्या चिमुकल्या बालकाचे नाव आहे.
लेकुरबोडी आरोग्य उपकेंद्रांतर्गत मयालघाट येथील वडील शनिराम कोरचा यांच्या बालकास आरोग्य कर्मचाऱ्यांनी मागील आठ दिवसातून तीनदा भेट देऊन औषधोपचार करून पुढील उपचारासाठी चिमुकल्या बाळाला मयालघाट येथील दवाखान्यात नेण्यास सांगितले; परंतु वडिलांनी बालकाला खुर्शीपार येथील एका वैदूकडे गावठी उपचारासाठी नेले होते.
त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम वयाळ, नर्स दर्शना नेवारे, गटप्रवर्तक नूतन उइके आणि आशा वर्कर आदींनी शेतावर जाऊन बालकाला भेट दिली. बालकांची तपासणी करून पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात जाण्यास सांगितले पण वडिलांनी उद्या जातो असे सांगून वेळ मारून नेली.
परत दुसऱ्या दिवशी आरोग्य कर्मचारी शेतावर जाऊन अनुजच्या वडिलांना समजावून सांगितले; परंतु जिल्हा सामान्य रुग्णालयात जाण्यास नकार देऊन मी वैदूकडे औषध उपचार करून आलो असे सांगितले. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना तीनदा भेटीदरम्यानही
सदर बालकाला रुग्णालयात दाखल करता आले नाही अशा परिस्थितीमध्ये बालकावर वेळीच उपचार झाले नाही तर त्याची प्रकृती खालावू शकते उशिरा दवाखान्यात नेल्यानंतर बाळ दगावले तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आजारी बालक, गर्भवती माता व इतर रुग्णांनी वेळीच उपचारासाठी डॉक्टरांकडे जावे व निरोगी राहण्याचे प्रयत्न करावे तसेच गरजेनुसार रुग्णालयात रेफर होण्यास तयार रहावे त्यामुळे आजार बरा करता येईल.
- डॉ. शुभम वायाळ, वैद्यकीय अधिकारी, कोरची.
गडचिरोली दि. 01 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकिच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवली आहे. या व्यवस्थेची पाहणी करण्याकरीता निवडणूक निरीक्षक अनिमेष कुमार पराशर यांनी आज येथील स्ट्राँग रुम, इव्हीएम साठवणूक कक्ष व मतदान केद्रांना भेट दिली.
12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहेत. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात निवडणुकीसंदर्भात चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या अनुषंगाने श्री पराशर यांनी कृषी महाविद्यालय येथील स्ट्राँग रुमची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी सहायक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल मीना, कार्यकारी अभियंता सुरेश साखरवडे व इतर अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
निवडणुक निरीक्षक श्री पराशर यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे स्ट्राँगरूममध्ये सर्व व्यवस्था आहे का याबाबत पाहणी केली. तसेच विद्युत शॉर्ट सर्कीटमुळे मतदानयंत्रांना हानी होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी या कक्षातील व गॅलरीतील तसेच लगतच्या इतर कक्षातील विद्युत पुरवठा बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी सीसीटीवी यंत्रणा, अग्नीरोधक यंत्रणा, डबल-लॉक सिस्टीम व परिसरातील सुरक्षा यंत्रणेची पाहणी केली. स्ट्राँगरुम म्हणून निवड केलेल्या कृषी महाविद्यालयाचा परिसर त्रिस्तरीय बॅरिकेट लावून सुरक्षीत करण्याचे त्यांनी सांगितले.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील इव्हीएम साठवणूक कक्षाला श्री पराशर यांनी भेट देवून तेथील सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. याठिकाणी सिसिटीव्ही, सुरक्षा अलार्म, अग्निशामक यंत्रणा व पुरेसे विद्युत दिवे आहेत का याबाबत पाहणी केली. तसेच इव्हीम साठवणूक कक्षाला भेट देणाऱ्यांच्या नोंदी अभ्यागत नोंदवहीत नोंदविल्या जातात का याबाबत विचारणा करून नोंदवहीची तपासणीही केली.
श्री पराशर यांनी एलआयसी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद प्राथमिक शाळा, पंचायत समिती परिसर व रामनगर येथील पीएम जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा या मतदान केद्रांची पाहणी केली. मतदान केंद्रावर स्वच्छतेसह इतर सर्व आवश्यक सुविधेसोबतच उन्हापासून बचावासाठी शेड व पिण्याच्या पाणी या दोन सुविधा प्रामुख्याने उपलब्ध ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील खर्च निरीक्षण कक्षालाही त्यांनी भेट देवून तेथील नोंदवह्यांची पाहणी केली.
सहायक निवडणूक अधिकारी श्री मीना यांनी निवडणूक निरीक्षक पराशर यांना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
०००००००
गडचिरोली दि. 30 (जि.मा.का.) : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत 12- गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अंतिम दिवशी मिलींद नरोटे व हरिदास बारेकर या दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे लोकसभा मतदारसंघाकरिता आता दहा उमेदवारांमध्ये निवडणूकीची लढत होणार आहे. दरम्यान सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप देखील आज करण्यात आले आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी माहिती दिली.
*हे उमेदवार आहेत रिंगणात :*
नामनिर्देश अर्ज मागे घेतल्यानंतर आता 12- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नाव, पक्ष व चिन्ह पुढीलप्रमाणे आहे.
राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार : अशोक महादेवराव नेते, भारतीय जनता पार्टी (कमळ), डॉ. नामदेव दसाराम किरसान, इंडियन नॅशनल काँग्रेस (हात), योगेश नामदेवराव गोन्नाडे, बहुजन समाज पार्टी (हत्ती).
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार : धीरज पुरूषोत्तम शेडमागे, जनसेवा गोंडवाना पार्टी (करवत), बारीकराव धर्माजी मडावी, बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी (शिट्टी), सुहास उमेश कुमरे,भीमसेना (ऑटोरिक्षा), हितेश पांडूरंग मडावी, वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर).
इतर उमेदवार : करण सुरेश सयाम, अपक्ष (ऊस शेतकरी), विलास शामराव कोडापे, अपक्ष(दूरदर्शन), विनोद गुरुदास मडावी, अपक्ष ( अंगठी)
00000
गडचिरोली तालुकाध्यक्ष पदी थाॅमस शेडमाके.
गडचिरोली : जिल्ह्यातील राजकारणात आंबेडकरी पक्षांचे महत्त्व ठळकपणे असते. मात्र प्रस्थापित पक्ष आंबेडकरी पक्षांना दुय्यम वागणूक देतात. अशा परिस्थितीत राजकीय स्तरावर बहुजन - आंबेडकरी चळवळीचे राजकारण ताकदीने उभे व्हावे व निवडणूकांमध्ये यश मिळवण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागण्याचे आवाहन जिल्हा प्रभारी राज बन्सोड व जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे यांनी केले.
स्थानिक सर्किट हाऊस येथे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, मुख्य मार्गदर्शक जिल्हा प्रभारी राज बन्सोड, तर विशेष अतिथी म्हणून प्रदेश महासचिव भास्कर बांबोळे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बिआरएसपीमध्ये नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या. महिला आघाडीच्या गडचिरोली तालुकाध्यक्ष पदी सविता बांबोळे, तालुका उपाध्यक्ष पदी पौर्णिमा मेश्राम, गडचिरोली महिला शहराध्यक्ष पदी विद्या कांबळे, शहर सचिव म्हणून प्रतिमा करमे, उपाध्यक्ष म्हणून रेखा कुंभारे, कोषाध्यक्ष पदी सोनाशी लभाने, संघटक पदी आवळती वाळके तसेच गडचिरोली बिआरएसपी तालुकाध्यक्ष पदी 'थामस शेडमाके' व तालुका सचिव पदी 'चंद्रकांत रायपुरे', शहराध्यक्ष पदी प्रतीक डांगे, सचिव पदी नागसेन खोब्रागडे, उपाध्यक्ष पदी मिलिंद खोब्रागडे यांची नियुक्ती करण्यात आली.
बैठकीत पक्षाची पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार १५ मार्च रोजी कांशीरामजी जयंती निमित्त नागपूर येथे होणाऱ्या चुनावी महारॅली करीता जिल्ह्यातून ३ हजार कार्यकर्ते सहभागी होण्याचे नियोजन करण्यात आले. व २२ मार्च रोजी 'बिआरएसपी महिला मेळावा' गडचिरोलीत आयोजित करण्याबाबतही या बैठकीत नियोजन करण्यात आले. वडसा, आरमोरी, मुरमाडी, पोटेगाव, पारडी सह जिल्ह्यातील ग्रामीण भागात पक्षाच्या सभा विविध ठिकाणी आयोजित होणार असल्याची माहिती राज बन्सोड यांनी या बैठकीत दिली.
या बैठकीला पक्षाचे जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके, उपाध्यक्ष अरविंद वाळके, सचिव जितेंद्र बांबोळे, युवा आघाडी उपाध्यक्ष प्रफुल रायपुरे, घनश्याम खोब्रागडे, करुणा खोब्रागडे, निर्मला बोरकर, शोभा खोब्रागडे, वंदना खेवले, गोकुळ ढवळे, सुनील बांबोळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
दि. ०५ मार्च २०२४
_________________
राज बन्सोड
जिल्हाप्रभारी BRSP
गडचिरोली
8806757873