लहान भावाने आई - वडीलांना माझ्याकडे द्या अशी केला मोठ्या भावावर खटला दाखल
सातारा:-
सातारा न्यायालयात एक ह्रदयस्पर्शी खटला समोर आला आहे वयोवृद्ध झालेल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी मोठा भाऊ मला संधीच देत नाही त्या साठी लहान भावाने न्यायालयात मोठ्या भावा विरूद्ध दावा ठोकला. वयाची 90 वर्ष पार केलेल्या आईवडिलांना माझ्याकडे सुपूर्त करावे. मी ही त्यांचा मुलगा आहे. माझाही आईवडिलांना सांभाळण्याचा अधिकार आहे. माझ्या आईवडिलांची माझा मोठा भाऊ अत्यंत उत्तम प्रकारे गेली २५ वर्ष सेवा करत आहे. आता मोठा भाऊही वयस्कर झाला आहे. त्याला आता आईवडिलांना नीट सांभाळताना त्रास होईल. तेव्हा येथून पुढे मला आईवडिलांची सेवा करण्याची संधी द्यावी. आईवडिलांचे खुप प्रेम मोठ्या भावाच्या घराला मिळाले आहे. आता माझ्या मुलांनाही आजोबा आजीचा सहवास लाभला पाहीजे व आम्हाला आमच्या दैवताची सेवा करता आली पाहीजे. माझा मोठा भाऊ अत्यंत मोठ्या मनाचा आहे. त्यांने आईवडिलांचा अत्यंत चांगला सांभाळ केला आहे. पण आता तोच थकला आहे. मला त्याचीही चिंता वाटते. त्याचीही सेवा मला करायची आहे. तेव्हा मला माझे आईवडील हवे आहेत. आई-वडिलांना सांभाळण्यासाठी दोन्ही भाऊ कोर्टात भांडत आहेत, हा विलक्षण प्रकार आहे. आईवडिलांना न साभांळणाऱ्या नालायक अवलादींच्या गालफडात लावलेली ही जबरदस्त चपराक आहे. जज साहेब तर चकीतच झाले. जेथे आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारा जमाना असताना तेथे ही श्रावणबाळे कशी जन्माला आली? जजला निकाल देता येइना. त्यांनी आईवडिलानाच विचारले, आपली काय ईच्छा आहे? तेव्हा ते म्हणाले जज साहेब आपणच सांगा काय ते. तेव्हा जजने निकाल लहान भावाच्या बाजूने दिला. आईवडिलांना लहान भावाच्या ताब्यात दिले. तसा मोठा भाऊ धायमोकलून रडू लागला. आईवडिलांना दुरावणार याचे त्याला खुप दु:ख झाले. धन्य ते आईवडिल, ज्यांनी इतके उच्च संस्कार मुलांना दिले. या कलियुगात आईवडिलांना मारहाण करणारे जन्माला आले आहेत. आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारे आय.आय.टी. इजिनियर्स आहेत, सनदी अधिकारी व नोकरदार कर्मचारी आहेत, उच्चभ्रू डाॅक्टर्स आहेत. विशेष म्हणजे मुलांवर संस्कार घडवण्याची जबाबदारी असलेले शिक्षक शिक्षिका आहेत. कळस म्हणजे न्यायनिवाडा करणाऱ्या न्यायाधिशांचे आई वडिल वृध्दाश्रमात आहेत. या देशात शिकून परदेशात नोकरी करणारे महाभाग आहेत. जे देशसेवा करायची सोडून परकियांचे नोकरदार झाले आहेत. परत आईवडीलांना विसरले आहेत. परदेशात ज्यांची मुले आहेत अशा कित्येकांची अवस्था निपुत्रिकांसारखी झालेली आहे. शेतकरी आत्महत्या करतात पण आईवडिलांना सांभाळतात. पण या शिक्षित, उच्चशिक्षित अवलादी पार बिघडल्या आहेत. कृतघ्न झाल्या आहेत. आईवडिलांच्या अंत्यविधीला या अवलादी हजर देखिल राहत नाहीत. वरील घटना आजकालच्या बिघडलेल्या मुलांना बोध देणारी आहे. वृध्दाश्रमात झालेली वाढ ही भारतीय संस्कृतीची सर्वात मोठी अधोगती आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहीली जयंती रणपीसे यांनी केली साजरी
पुणे:-
डॉ बाबासाहेब यांचा पहिला वाढदिवस पुण्यात प्रथम 14 एप्रिल 1928 रोजी रणपिसे यांनी साजरा केला. इतकेच नव्हे तर या जन्मदिवस समारंभाचे ते जणू शिल्पकारच ठरले. बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा त्यांनीच सुरू केली. खडकी पत्र विभाग दलित मंडळाचे अध्यक्ष असताना जयंतीचे औचित्य साधत त्यांनी बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून प्रभात फिल्म कंपनीच्या रथातून, उंटावरून प्रचंड मिरवणुका काढल्या होत्या.
यानंतर खडकी भागात प्रत्येक वस्तीत आंबेडकरांची जयंती साजरी व्हायला लागली. या सर्व वस्त्यांचे भाऊसाहेबांनी एकीकरण घडवून दलित मंडळाची स्थापना केली, या मंडळातर्फे आंबेडकरांची जयंती भव्य प्रमाणात साजरी केली. 24 ऑगस्ट 1958 रोजी रणपिसे यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळीने पुणे शहरात त्यांचा सत्कार समारंभ घडवून आणला होता. बाबासाहेबांची पहिली जयंती साजरी करत या उपक्रमाची सुरुवात करणाऱ्या भाऊसाहेबांनी विद्यार्थ्यांसोबतच अस्पृश्यवर्गाची जी बहुमोल सेवा केली त्याबद्दल संपूर्ण आंबेडकरी समाज त्यांचा सदैव ऋणी राहील यात शंका नाही.
लेखक – मिलिंद मानकर सर.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींचे संग्राहक
गडचिरोली जिल्ह्यातील चार नामवंत व्यक्तींना "महाराष्ट्र रत्न" पुरस्काराने केले सन्मानित
प्रविण तिवाडे/कार्यकारी स़ंपादक वैनगंगा वार्ता १९
चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील चार नामवंत व्यक्तींना त्यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल "महाराष्ट्र रत्न" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे दर्पण पत्रकार व संपादक संघटना, रेल्वे यात्रा मजदूर संघ आणि विश्व ह्यूमन राईट्स यांच्या संयुक्त विद्यमाने समृद्ध सीडीसीसी बँक, वरोरा नाका, नागपूर रोड, चंद्रपूर येथे भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्यातील विविध भागांतील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, कलाकार आणि सेवाभावी संस्था प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सन्मानित करण्यात आलेल्या व्यक्तीः
मोहम्मद आरिफ पटेल वरिष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्तेप्रल्हाद मेश्राम - कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानमेरी विल्सन - समाजसेवा क्षेत्रातील कार्यबाबू कुरेशी - सामाजिक कार्य व पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदान या चारही व्यक्तींनी गडचिरोली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले असून त्यांच्या कार्यामुळे जिल्ह्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर सकारात्मक बदल घडून आले आहेत. पुरस्कार प्रदान कार्यक्रमात त्यांचे विशेष सत्कार करण्यात आले आहेत
निकृष्ट नाली बांधकामावर कारवाईची मागणी - माहिती अधिकार कार्यकर्त्याची गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार
प्रवीण तिवाडे ) कार्यकारी स़पादक वैनगंगा वार्ता १९
अहेरी:- गडचिरोली जिल्ह्यातील आंबटपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत पंधरावा वित्त आयोगाच्या निधीतून भिका नंदा सिडाम ते गणपत तलांडे यांच्या घरापर्यंत करण्यात आलेल्या नाली बांधकामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ता विश्वदीप वाळके यांनी केला आहे. त्यांनी दिनांक ९ एप्रिल २०२५ रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मूलचेरा यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करत दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, सदर नाली बांधकाम अंदाजपत्रकानुसार न करता अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून, या कामात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यांनी सरपंच, ग्रामसेवक, कंत्राटदार आणि अभियंता यांची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
सदर तक्रारीची प्रत विभागीय आयुक्त नागपूर, जिल्हाधिकारी गडचिरोली तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही माहितीस्तव पाठवण्यात आली आहे.
या तक्रारीमुळे आंबटपल्ली ग्रामपंचायतीतील निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे.
४ लाख २० हजाराची लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता, वरीष्ठ सहायक व परीचर या यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक
चंद्रपुर :- ठेकेदाराचे काढुन दिलेली बिले व बाकी असलेली बिले काढून देण्याकरिता ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद चंद्रपुर हर्ष यशोराम बोहरे, वरिष्ठ सहाय्यक सुशील मारोती गुंडावार, परिचर मतीन शेख यांना ४ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक.
तक्रारदार हे जिवती, जि. चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांचा ठेकेदारीचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी नुसार त्यांचे महाराष्ट्र शासनाच्या "जल जीवन मिशन" कार्यक्रम अंतर्गत तालुका जिवती आणि राजुरा येथील एकूण २३ गावांमध्ये पाणीपुरवठा संबंधी केलेल्या कामांपैकी १० गावांतील कामांचे बिले ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर येथे मंजुरीकरीता सादर केले होते, त्यापैकी ५ गावांचे कामांचे एकुण ४३ लाख रूपयांचे बिले तक्रारदार यांना मिळाले. सदर काढुन दिलेली बिले व बाकी असलेली बिले काढून देण्याकरिता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर येथील कार्यकारी अभियंता बोहरे यांनी स्वतः करीता ४,००,०००/-रूपयेची मागणी करून सदर रक्कम त्यांचे वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांचेकडे देण्यास सांगीतले. तसेच वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांनी स्वतः करीता २०,०००/- रूपयेची मागणी केली. असे दोघांचे मिळून एकुन ४,२०,०००/-रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची बोहरे, कार्यकारी अभियंता व वरिष्ठ सहायक. सुशील गुंडावार, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर यांना ४,२०,०००/-रु. लाच देण्याची ईच्छा नसल्याने बोहरे व सुशील गुंडावार, यांचे विरुध्द ला.प्र.वि. कार्यालय चंद्रपूर येथे तक्रार दिली.
प्राप्त तक्रारीवरून दिनांक ०७/०४/२०२५, ०९/०४/२०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान आलोसे. हर्ष बोहरे, कार्यकारी अभियंता व वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी तक्रारदार यांना ४,२०,०००/-रु. लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून दिनांक १०/०४/२०२५ रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान आलोसे क्र. २ सुशील गुंडावार यांनी लाच रक्कम ४,२०,०००/- रूपये पंचासमक्ष स्वतः स्विकारून त्यापैकी २०,०००/- रूपये स्वतः करीता वेगळे काढुन उर्वरीत ४,००,०००/-रूपये आलोसे क्र. ३) मतीन शेख यांना आलोसे क्र. १) हर्ष बोहरे यांना देण्यास सांगीतल्याने आलोसे क्र. ३) मो. मतीन शेख यांनी आलोसे क्र. २) श्री. सुशील गुंडावार यांचे सांगणेवरून आलोसे क्र. १) श्री. हर्ष बोहरे यांचे घरी नेउन दिली. सदरची लाचरक्कम स्वीकानारे आलोसे क्र. १ व २ यांना ताब्यात घेण्यात आले असुन आलोसे क्र. १ यांना लाचरक्कम नेउन देणारे आलोसे क्र. ३ यांना ताब्यात घेण्यात आले असून आज दिनांक ११/०४/२०२५ रोजी पो.स्टे. रामनगर, जि. चंद्रपूर येथे आरोपी लोकसेवक यांचे विरूध्द गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु आहे.
सदरची कार्यवाही ही डॉ. श्री. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर, सचिन कदम कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर, संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, ला.प्र.वि. चंद्रपूर, तसेच कार्यालयीन स्टॉफ पो. नि. जितेंद्र गुरनूले, पो. हवा. हिवराज नेवारे, नरेशकुमार नन्नावरे, रोशन चांदेकर, पो.अं. अमोल सिडाम, प्रदीप ताडाम, वैभव गाडगे, म.पो.अं. पुष्पा काचोळे, चा.पो.अं. सतिश सिडाम, संदिप कौरासे यांनी यशस्वी पार पाडली आहे.
स्री शिक्षणाचे जनक: महात्मा जोतीराव फुले
कृष्णकुमार आंनदी -गोविंदा निकोडे गुरुजी गडचिरोली
(11 एप्रिल: महात्मा जोतीराव फुले जयंती विशेष.)
गडचिरोली:-
महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म दि.११ एप्रिल १८२७ रोजी झाला. हे एक भारतीय समाजसुधारक, समाजप्रबोधक, विचारवंत, समाजसेवक, लेखक, तत्त्वज्ञ आणि क्रांतिकारी कार्यकर्ते होते. त्यांना महात्मा फुले आणि जोतिबा फुले म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. सप्टेंबर 1873मध्ये त्यांनी महाराष्ट्रात सत्यशोधक समाज नावाची संघटना स्थापन केली. त्यांनी स्त्रियांच्या आणि मागासलेल्या आणि अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी अनेक कामे केली. समाजातील सर्व घटकांना शिक्षण देण्याचे ते खंबीर पुरस्कर्ते होते. ते भारतीय समाजात जात-आधारित विभाजन आणि भेदभावाच्या विरोधात होते.
स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणे, बालविवाहाला विरोध करणे, विधवा विवाहाला पाठिंबा देणे हे त्यांचे मूळ उद्दिष्ट होते. म.फुले यांना समाजाला कुप्रथा, अंधश्रद्धेच्या पाशातून मुक्त करायचे होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांना शिक्षण देण्यात, महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यात घालवले. १९व्या शतकात महिलांना शिक्षण दिले जात नव्हते. फुले यांना स्त्री-पुरुष भेदभावापासून वाचवायचे होते. त्यांनी पुण्यात मुलींसाठी भारतातील पहिली शाळा बांधली. त्यावेळच्या स्त्रियांच्या दयनीय अवस्थेमुळे फुले खूप व्यथित आणि दु:खी झाले होते, म्हणूनच त्यांनी समाजात क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचा दृढ निश्चय केला. त्यांनी स्वतः त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या.
सुरुवातीचे जीवन: महात्मा ज्योतिबा फुले एका वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचे कुटुंब अनेक पिढ्यांपूर्वी साताऱ्याहून पुण्यात आले आणि फुलांचे गजरे बनवू लागले. त्यामुळे माळीच्या कामात गुंतलेली ही माणसे 'फुले' म्हणून ओळखली जायची. ज्योतिबांनी काही काळापूर्वीपर्यंत मराठीतून शिक्षण घेतले, ते सोडून दिले आणि नंतर वयाच्या २१व्या वर्षी इंग्रजीमध्ये सातवीचे शिक्षण पूर्ण केले. सन १८४०मध्ये त्यांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी झाला, त्यानंतर त्या स्वत: प्रसिद्ध समाजसेविका झाल्या. पती-पत्नी दोघांनीही दलित आणि स्त्री शिक्षण क्षेत्रात एकत्र काम केले. ते एक कष्टकरी आणि सामाजिक कार्यकर्ता होते.
कार्यक्षेत्र: त्यांनी विधवा आणि महिलांच्या कल्याणासाठी खूप काम केले, त्यासोबतच त्यांनी शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठीही खूप प्रयत्न केले. ज्योतिबांना संतांची चरित्रे वाचण्याची खूप आवड होती. जेव्हा देवासमोर सर्व स्त्री-पुरुष समान असतात, तेव्हा उच्च-नीच असा भेद का असावा, हे त्यांना कळून चुकले होते. स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी फुले यांनी सन १८४८मध्ये शाळा उघडली. या कामासाठी देशातील पहिली शाळा होती. मुलींना शिकवण्यासाठी त्यांना शिक्षक मिळाला नाही, म्हणून त्यांनी स्वतः काही दिवस हे काम करून पत्नी सावित्री फुले यांना पात्र बनवले. काही लोकांनी सुरुवातीपासूनच त्यांच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, पण फुले पुढे सरकत असताना त्यांनी वडिलांवर दबाव आणून पती-पत्नीला घराबाहेर काढले, यामुळे त्यांचे काम काही काळ थांबले, पण लवकरच त्यांनी मुलींसाठी एकामागून एक तीन शाळा उघडल्या.
महात्मा पदवी: गरीब आणि दुर्बलांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्योतिबांनी सन १८७३मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांची समाजसेवा पाहून सन १८८८मध्ये मुंबईत एका विशाल सभेत त्यांना "महात्मा" ही पदवी देण्यात आली. ज्योतिबांनी ब्राह्मण-पुरोहिताविना विवाह विधी सुरू केला आणि त्याला मुंबई उच्च न्यायालयानेही मान्यता दिली. ते बालविवाहाच्या विरोधात होते आणि विधवा पुनर्विवाहाचे समर्थक होते. आपल्या हयातीत त्यांनी गुलामगिरी, तृतीय रत्न, छत्रपती शिवाजी, राजा भोसलेंचा पवाडा, शेतकऱ्यांचा आसूड, अस्पृश्यांचा टाहो अशी अनेक पुस्तकेही लिहिली. महात्मा ज्योतिबा आणि त्यांच्या संघटनेच्या संघर्षामुळे सरकारने "कृषी कायदा" मंजूर केला. धर्म, समाज आणि परंपरा यांचे सत्य समोर आणण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली.
सन 1८८३मध्ये स्त्रियांना शिक्षण देण्याच्या महान कार्यासाठी, त्यांना तत्कालीन ब्रिटिश भारतीय सरकारने "स्त्री शिक्षणाचे जनक" म्हणून गौरवले. दि.२८ नोव्हेंबर १८९० रोजी वयाच्या ६३व्या वर्षी पुणे येथे त्यांचे दुःखद निधन झाले.
// पावन जयंतीपर्वावर म. राष्ट्रपितामह जोतीराव फुलेजींना शतदा विनम्र अभिवादन //
चारचाकीच्या धडकेत सायकलस्वार दूध विक्रेता जागीच ठार
गडचिरोली-चामोर्शी महामार्गावरील वाकळी फाट्यावर अपघात
प्रवीण तिवाडे
गडचिरोली : गडचिरोली ते चामोर्शी महामार्गावरील वाकडी फाट्याजवळ भरधाव वेगाने चामोर्शीकडे जाणाऱ्या कारने गडचिरोली येथे दूध विकायला जात असलेल्या सायकलस्वाराला जोरदार धडक दिली. यात सायकलस्वार जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवार (दि.11) आज सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, सकाळी गडचिरोलीकडून चामोर्शीकडे जात असलेल्या मारुती कंपनीच्या वॅगनार (क्रमांक सीजी 08, एयू 8932) कारने गडचिरोली येथे दूध विकायला जात असलेल्या वाकडी येथील विनायक भोयर यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. यात भोयर यांना जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर कार ही छत्तीसगड राज्यातील असून चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.अधीक तपास गडचिरोली पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक करीत आहेत
पोलीसच जर ड्रग्स चा व्यवसास करीत असतील न्याय तरी मागायचे कुठे?
भाईंदर : एकीकडे देशात ड्रग्स विरोधात कारवाई करून समूळ नष्ट करण्यासाठी शासन काम असताना कुंपनच शेत खात असल्याचा प्रकार मुंबई महसूल गुप्तचर संचनालय यांनी कारवाई केल्यानंतर समोर आला आहे. मिरा- भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालयात नयानगर पोलीस ठाण्यात काम करणार्या एका पोलीस हवालदाराच्या लातूर जिल्ह्यातील मूळ गावी शेतात पत्राशेडमध्ये ड्रग्स फॅक्टरी उभारण्यात आली होती. त्यानंतर मुंबई येथे अंमली पदार्थ दाखल गुन्ह्यात तपास करत असताना एका पोलीस कर्मचार्याला अटक करण्यात आली आहे. तर दुसर्या पोलिसाचा शोध सुरू आहे. तर यात काही वरिष्ठ पोलीस अधिकार्यांचा सहभाग असल्याचा दाट संशय असल्याचा व्यक्त केला जात आहे.( Bhayander News: Drug factory in police officer’s field)
मुंबई येथील महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) पुणे येथील त्यांच्या प्रादेशिक युनिट्सच्या मदतीने लातूर जिल्ह्यात ड्रग्स बनविण्याचा कारखान्यासह मुद्देमाल जप्त करत कारवाई केली आहे. त्यात पोलिसांनी कारखान्यात काम करणार्या तिघांना आणि मिरारोड आणि मुंबई परिसरात ड्रग्स पुरवठा करून विक्री करणार्या मुद्दू नावाच्या व्यक्तीला हटकेश येथून मंगळवारी ताब्यात घेतले आहे. तर नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेत काम करणारे पोलीस हवालदार प्रमोद केंद्रे हे आपल्या मूळ गावी रोहिना येथून मागच्या १५ दिवसांपासून वैद्यकीय रजेवर होते. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अपघात करून पळण्याचा प्रयत्न फसला
पथकाने छापा टाकून संशयितास पकडले आणि शेतात छापा टाकला. त्यात येथील एका शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये ड्रग्ज बनविण्यासाठीचे साहित्य आढळले. त्यानंतर या पथकाने एकास ताब्यात घेतले. त्यानंतर कारमधून लातूरच्या दिशेने ते निघाले होते. लातूररोड येथील एका हॉटेलजवळ आल्यानंतर कारमध्ये पाठीमागे बसलेल्या संशयित आरोपीने अचानक चालकाला मारहाण करण्यास सुरूवात केली. कारचे स्टेअरिंग वळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कारमधील पथक प्रमुखांच्या प्रसंगावधानामुळे त्यास पळून जाता आले नाही. मात्र, भरधाव वेगातील कारने एका दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीचे नुकसान झाले आणि महसूल गुप्तचर संचनालयाच्या अधिकार्यांना थोडीफार किरकोळ जखमा झाल्या. त्यानंतर याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय कार्यालय चाकूरचे सहाय्यक पोलीस अधिक्षक, बी. चंद्रकांथ रेड्डी यांनी माहिती दिली आहे.
हिश्याच्या वाटणी वरुण स्वताच्या भावाला जीवानीशी केले ठार
भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बाळद खुर्द येथे घराचे वाटणीत जास्त हिस्सा मागतो या कारणावरून धक्काबुक्की करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. हातात लाकडी दांडके घेऊन तरुणाच्या चेहऱ्यावर व छातीवर मारहाण करून त्याच जीवे ठार मारल्याची घटना दि.८ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी भडगाव पोलिसांनी तातडीने धाव घेऊन संशयित बाप आणि मयताच्या भावाला अटक याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी- सुनिल लोटन पाटील वय (५४) धंदा शेती व पोलीस पाटील, रा. बाळद खु. ता भडगांव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,बाळु राजेंद्र शिंदे (नाईक) (वय २६)रा. बाळद खु ता. भडगांव जि. जळगांव हा घराचे वाटणीत जास्त हिस्सा मागतो याकारणावरुन बाळु राजेंद्र शिंदे (नाईक) यास धक्काबुक्की करुन लाथाबुक्कयांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच हातात लाकडी दांडके घेवून बाळु राजेंद्र शिंदे (नाईक) याच्या चेहऱ्यावर व छातीवर मारहाण करुन त्यास जीवे ठार मारले.
भडगाव पोलीस स्टेशनला बाप व भाऊ १)भारत राजेंद्र शिंदे, वय २२ वर्ष २) राजेंद्र रामचंद्र शिंदे, वय ४८ वर्ष, दोन्ही रा. बाळद खु ता. भडगांव जि.जळगांव. यांच्याविरुद्ध गु.र.न १२३/२०२५ बी.एन.एस.१०३(१), ११५ (२), ३५२,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश म्हस्के व पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र चव्हाण हे करीत आहे.
डीपी खाली कचरा कुंडी खाली कचरा कुंडी असल्यागत नागरिकांनी कचरा टाकून जाळल्यामुळे इलेक्ट्रिक वायर जळाले , सहा तास विद्युत पुरवठा ख़डीत
आष्टी (प्रतिनिधी)## येथील वार्ड क्रं.१ मध्ये बाजारवडी जवळ असलेल्या डीपी च्या खाली नागरिकांनी कचराकुंडी असल्यासारखे कचरा टाकून जाळला त्यामुळे इलेक्ट्रिक वायर जळाले . आणि बराच वेळ विद्युत पुरवठा खंडित झाला त्यामुळे नागरिकांना गर्मीमुळे चांगलाच त्रास सहन करावा लागला.
येथील बाजार वाडीत असलेल्या इलेक्ट्रिक डिपी मधून या वॉर्डातील नागरिकांना विद्युत पुरवठा केला जातो. या डीपी च्या खाली नागरीक घरातील केरकचरा आणून टाकतात . बराच कचऱ्याचा ढीग जमा झाल्याने तो जाळण्यात आला त्यामुळे डीपी मधून आलेले वायर जळुन खाक झाले. आणि विद्युत पुरवठा खंडित झाला. नागरिकांना बराच काळ गर्मी मध्ये बसून उष्णतेचा त्रास सहन करावा लागला.
येथील वॉर्डातील काही नागरीक डीपी च्या खाली कचरा जमा करीत आहे. ग्राम पंचायती मार्फत त्या ठिकाणी कचरा कुंडी ठेवण्याची व्यवस्था करावी . याबाबत ग्राम पंचायत चे सरपंच यांना विचारणा केली असता येथील नागरिकांना वारंवार डीपी च्या खाली कचरा न टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या.तरी पण नागरीक त्याच ठिकाणी कचरा टाकत आहे. याबाबत पोलिसांना सूचना देऊन कचरा टाकण्याऱ्यावर कारवाही करण्याची मागणी केली आहे.
आष्टी चामोर्शी मार्गावरील अनखोडा सोसायटी जवळ बाईक व ट्रकचा अपघात , अपघातात दुचाकीस्वार ठार
आष्टी प्रतिनिधी
आष्टी चामोर्शी महामार्गावरील 353 नॅशनल हायवे आष्टी पासून जवळच असलेल्या अनखोडा बस स्टॉप जवळ सुमारे आठ वाजून पंधरा मिनिटांनी आष्टी वरून उमरी गावला जात असताना आणि ट्रक हा गडचिरोली वरून आष्टी कडे येत असताना अनखोडा येथील सोसायटीच्या जवळ भीषण अपघात झाला त्या अपघातामध्ये दुचाकी चालक होमेश विकास अलगमकार वय २१ राहणार उमरी तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली याला ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे नेण्यात आले व त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले व ट्रक चालक
रामहीत शिंग यादव वय ५५ राहणार डोखटनिया जिल्हा गाजीपूर उत्तरप्रदेश असे ट्रक चालकाचे नाव आहें ट्रक क्रमांक MH 34 B ग 7905 असून सदर घटनेची माहिती मिडताच पोलीस निरीक्षक विशाल काळे स्वतः आपल्या कर्मचाऱ्यांसोबत दाखल होऊन स्वतःच्या गाडीमध्ये सदर व्यक्तीला ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे पोहोचवण्यासाठी मदत केली व सदर घटनेची तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे
विहिरीचे खोदकाम करणाऱ्या मजुरांवर कोसळला मातीचा ढिगारा- दोन मजुरांचा मृत्यू तर एका मजुराचे वाचले प्राण
सिरोंचा :- जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील जानमपल्ली येथे शेतातील विहिरीचे खोदकाम करतांना अचानकपणे तीन मजुरांच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाला तर एक मजूर थोडक्यात बचावला असल्याची घटना आज, मंगळवार ८ एप्रिल रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली. कोंडा समय्या वय ३६ वर्षे रा.
जानमपल्ली, ता. सिरोंचा व उप्पूला रवी वय ३१ वर्षे रा. जानमपल्ली, ता. सिरोंचा अशी मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यु झालेल्या मजुरांची नावे आहेत. तर संतोष कोनम वय ३२ वर्षे रा. जानमपल्ली हा थोडक्यात बचावला आहे.
माहितीनुसार, सिरोंचा तालुक्याच्या जानमपल्ली येथील शेतकरी धन्नाडा समक्का या शेतकऱ्याच्या शेतात विहीर बांधकामाचे काम सुरू असून आज, मंगळवारी सकाळच्या सुमारास विहिरीच्या आतमध्ये तीन मजुरांद्वारे खोदकाम सुरू होते. सदर विहिरीचे खोदकाम हे जवळपास ५० फूट खोलपर्यंत जाऊन पाण्यासाठी आणखी खोदकाम करीत असतांना अचानकपणे खालच्या स्तरातील माती व वरच्या स्तरावरील माती
तिन्ही मजुरांवर कोसळली. त्यामुळे कोंडा समय्या व उप्पूला रवी मातीच्या ढिगाऱ्याखाली बराच काळ दबल्या गेले. अशातच तिसरा मजूर संतोष कोनम हा अर्धवट दबल्या गेल्याने माती ओढण्यासाठी विहिरीच्या नजीक असलेल्या मजुरांनी त्याला दोरखंडाणे ओढून बाहेर काढले. लागलीच सदरची घटना ग्रामस्थांच्या लक्षात येताच पोलीस प्रशासन, स्थानिक पदाधिकारी यांनी बचाव कार्य सुरू केले. मात्र, बराच वेळ मातीच्या ढिगाऱ्याखाली राहिल्याने दोन्ही मजुरांचा मृत्यू झाला. सदर घटनेचा पुढील तपास सिरोंचा पोलीस प्रशासन करीत आहे.
कोनतेही वाहण नसतांना ड्रंक अँड ड्राईव्ह'च्या नावाखाली दुर्गापूर पोलिसांनी पायदळ तळीरामाला कोंबले वाहणात
चंद्रपूर (दुर्गापूर) – दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मंगळवारी रात्री एक विचित्र प्रकार घडला. मेजर गेटजवळील एका बिअर बारसमोर दोन पोलिसांनी थेट बारसमोर आपले वाहन लावून, बिअर बारमधून बाहेर पडणाऱ्या एका पायदळ तळीरामाला 'दारू पिऊन आहेस, गाडीत बस' म्हणत पोलिस वाहनात कोंबले. ही संपूर्ण घटना समोर असलेल्या नागरिकांच्या उपस्थितीत घडली.
दारू पिऊन गाडी चालवणे हा दंडनीय अपराध आहे. मोटार वाहन कायद्याचे कलम १८५ मद्यपान करून वाहन चालविण्यास प्रतिबंधित करते आणि हे कृत्य दंडनीय गुन्हा आहे. मात्र, संबंधित व्यक्ती कोणतेही वाहन चालवत नव्हती. तो फक्त रस्त्याने पायदळ घरी जात होता. अशा अवस्थेत त्याला 'ड्रंक अँड ड्राईव्ह'च्या कारणाखाली पोलीस स्टेशनकडे घेऊन जाण्यात आले. यामुळे उपस्थित लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्या व्यक्तीला पाहून इतर तळीरामही घाबरून गेले.
मेजर गेट परिसरात केवळ ५०० मीटर अंतरातच सुमारे १० पेक्षा अधिक बिअर बार, वाईन शॉप्स आणि देशी दारूचे ठिकाणे आहेत. या ठिकाणी पोलीस वाहनं नेहमी उभी दिसतात. मात्र तपासणी न करता आणि कुठल्याही कायदेशीर कारणाशिवाय, अशाप्रकारे पायदळ चालणाऱ्या तळीरामाला थेट वाहनात कोंबण्याची ही कृती गंभीर मानली जात आहे.
यावेळी संबंधित व्यक्तीने "दारू पिऊन घरी जात होतो, गाडी नव्हती, तरीही उचलून नेत आहेत, मग दारू प्यायचंच नाही का?" असा सवाल करत आपली नाराजी व्यक्त केली.या घटनेवरून अनेक तर्क-वितर्क उपस्थित झाले आहेत. संबंधित व्यक्तीला पोलीस स्टेशनपर्यंत नेले की वाटेतच काही 'व्यवहार' होऊन सोडून दिले, याची चर्चा परिसरातील मद्यपी करताना दिसले.
स्थानिक नागरीक आणि ग्राहकांच्या मते, पोलीस कारवाई ही कायदेशीर चौकशीच्या आधारेच व्हावी, अन्यथा ही जबरदस्ती मानली जाईल. प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी देखील यानंतर जोर धरत आहे.
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना रिपब्लिकन पक्षाचे वतीने अभिवादन.
गडचिरोली -- रिपब्लिकन पक्षाचे सेनानी तथा राज्यसभेचे माजी उपाध्यक्ष दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्मृती ना निमित्त बुधवार दिनांक ९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८ वाजता इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे वतीने अभिवादन करण्यात आले.
रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास निंबोरकर यांच्या हस्ते बॅरिस्टर खोब्रागडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व मेणबत्ती प्रज्वलित करून दिवंगत नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा विजय असो अश्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
याप्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे, ज्येष्ठ आदिवासी कार्यकर्ते वसंत कुलसंगे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस प्रा. गौतम डांगे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश दुधे, सचिव प्रा. राजन बोरकर, मराठा सेवा संघाचे डॉ. सुरेश लडके, महिला आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या सुरेखाताई बारसागडे, जिल्हाध्यक्ष नीता सहारे, शहर अध्यक्ष वनमाला झाडे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र रायपुरे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुखदेव वासनिक, प्रेमेंद्र सहारे, सिद्धार्थ रामटेके, लहूजी रामटेके यांचेसह बरेच मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
मार्कंडा देवस्थान येथील मार्कंडेश्वराचे जिर्णोद्धाराचे काम पुर्णत्वास का होईना ? मनोज हेजीप यांची जिल्हाधिकारी यांचे कडे केली मागणी
चामोर्शी:-
गेल्या अनेक वर्षापासून मार्कंडेश्वर मंदिर पुरातत्व विभागाकडून अपूर्ण बांधकाम यावर स्थानिक क्षेत्रातील भाविकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता अयोध्या मंदिर दोन वर्षात पूर्ण होते मग विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेश्वराचं जिर्णोद्धाराचे काम का होत नाही अश्या बोचक्या प्रतिक्रिया तालुक्यातील भाविक भक्तांनी दिलेल्या आहेत गेल्या दहा वर्षापासून मार्कंडेश्वराच्या जीर्णोद्वाराच्या कामाला सुरुवात झाली मात्र आज पावतो काम अपूर्ण राहिला आहे केंद्रातील व राज्यातील शासनकर्ते यांच्या नाकर्तेपणामुळे विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेश्वराचं मंदिर अजूनही अपूर्ण अवस्थेत असल्याने जनतेत संतापाची लाट पसरलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला बांधकाम उघड्यावर पडलेला पाहून श्री संत मुरलीधर महाराज यांनी सदर बांधकामाचा विडा उचललेला आहे आणि जोपर्यंत माझ्या मार्कंडेश्वराचा बांधकाम पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही माझं मरण आलं तरी चालेल पण तेही मार्कंडेश्वरा तच अशी संताप जनक प्रतिक्रिया श्री संत मुरलीधर महाराज यांनी दिली आहे त्यांनी पत्रकार परिषदेला आव्हान करून सांगितले की जोपर्यंत माझ्या मार्कंडेश्वराचा बांधकाम पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही तालुक्यातीलच नव्हे तर सर्व गडचिरोली जिल्ह्यातील भाविक भक्तांमध्ये जनजागृती करून मोठा जन आंदोलन उभा करणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे
मार्कंडेश्वर आजचा बांधकाम पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात आला असून कुठल्याही प्रकारची निविदा काढली जात नसून त्यात प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचेही पत्रकार परिषदेत सांगितले सदर बांधकामावर कोणतेही लोकप्रतिनिधींचे लक्ष नसून स्थानिक बांधकाम जीर्णोद्धार समितीला कोणतेही बांधकाम पाण्याचा अधिकार नाही किंवा त्यांना त्या परिसरात फिरण्यासाठी बांधकाम पाहण्यासाठी मज्जाव करण्यात येते हे स्थानिकांचे किंवा पदाधिकाऱ्यांचे दुर्भाग्यच समजावे लागते स्थानिक बांधकामांमध्ये शिल्पकलेन कोरीव असे बांधकाम केलेले पौराणिक दगड किंवा शिल्पकला असलेले जुने दगड वापरले जात नसून त्यात बाहेरून बोलाविले गेलेले दगड वापरण्यात येत असल्याने येथील बांधकाम बंद करण्यात यावे आणि शिल्प करला कोरी व कोरीव दगड वापरण्यात यावे अशी स्थानिक भाविकांची मागणी होत आहे जो जोपर्यंत बांधकामाला सुरुवात होणार नाही तोपर्यंत मार्कंडेश्वरातील स्थानिक जनता स्वस्त बसणार नाही अशी मागणी मार्कंडेश्वर देवस्थान पुजारी श्री मनोज हे जी प यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे
आष्टी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजीत पवार गटाचा महिला पक्ष प्रवेश व सदस्य नोंदणी मेळावा संपन्न.
डॉ.सोनल कोवे मुळे पक्षाला नवी उभारी,महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण
आष्टी :-
आष्टी येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर व आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या आदेशाने आणी महिला जिल्हाध्यक्ष डॉ.सोनल कोवे व सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाने आणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला जिल्हाउपाध्यक्ष सौ.पुष्पा बुर्ले यांच्या नेतृत्वात सदस्य नोंदणी व महिला पक्षप्रवेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर होते तर अध्यक्ष म्हणून महिला जिल्हाध्यक्षा डॉ.सोनल कोवे तर प्रमुख पाहुणे म्हणून सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम होत्या.
कार्यक्रमात असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आणी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणीला सुरुवात झाली.
आष्टी येथिल अनेक युवक, युवती, महिला यांनी पुष्पा बुर्ले व प्रणय बुर्ले यांच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश केले.
मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, डॉ.सोनल कोवे व तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी पक्षाच्या ध्येय धोरणाबाबत माहिती समजावून सांगितले व पक्षाच काम यापेक्षा अजून जोमाने वाढला पाहिजे याकरिता रीतसर मार्गदर्शन केले.
त्यावेळी जिल्हा सरचिटणीस लौकिक भिवापुरे, जिल्हाउपाध्यक्ष डॉ.नोमेश जुवारे, जिल्हासंघटन सचिव डॉ.हेमंत भाकरे, महिला जिल्हा कार्याध्यक्ष सारिका गडपल्लीवार, गडचिरोली शहराध्यक्ष अमोल कुळमेथे, महिला चामोर्शी तालुकाध्यक्ष रुपाली दुधबावरे, जिल्हासचिव कपिल बागडे, पुरुषोत्तम खेडेकर, बंडू मेश्राम, संदीप सोयाम, अशोक बुर्ले, रमेश बुर्ले आदी कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.
तर सर्व मान्यवरांचे तसेच सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्येंकटेश बुर्ले यांनी मानले.
रानडुकराने केला घात पोलीस हवालदार पती -पत्नीसह दोन्ही मुले ठार
वर्धा:-
रानडुकराने घात केल्यामुळे. एक हसरं चौकोनी कुटुंब संपले. वर्धा तालुक्यातील तरोडा येथे हा अपघात सोमवारी रात्री घडला. त्यात वडनेर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रशांत वैद्य, त्यांची पत्नी व दोन मुलं ठार झाले आहेत. प्रशांत वैद्य यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पण आज सकाळी सात वाजता त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याचे वडनेर ठाणेदार लोकरे यांनी सांगितले. प्राप्त माहितीनुसार वैद्य हे कुटुंबासह मांडगाव येथील श्रीराम मंदिरात उत्सव व महाप्रसाद कार्यक्रमासाठी आले होते. सोबत पत्नी प्रियंका वैद्य तसेच मुलगा प्रियांश ६ व मुलगी माही वर्ष ३ हे पण होते.
महाप्रसाद कार्यक्रम आटोपून ते आपल्या एम एच ४० ३६०३ या क्रमांकाच्या स्विफ्ट गाडीने परत निघाले होते. वर्ध्याकडे येत असतांना मांडगावजवळ रस्त्याच्या मधोमध रानडुक्कर गाडीपुढे आले. त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गाडी समोरून येणाऱ्या टँकरला धडकली. मोठा अपघात घडला.
घटनास्थळीच पत्नी व मुलाचा मृत्यू झाला. तर प्रशांत मधुकर वैद्य व त्यांची मुलगी रुग्णालयात मरण पावले. रात्री ११ वाजता ही घटना घडल्याचे समजते. तरोडा हायवे वर हा अपघात घडला. टँकर एम एच ०९ सी व्ही २१८५ या गाडीस अपघातग्रस्त स्विफ्ट डिझायर ही गाडी वेगात धडकल्याने हा अपघात घडल्याचे सांगितल्या जाते.
अपघातस्थळी पोलीस उपनिरीक्षक सपाटे, भोगे व काकडे हे पोहचले होते. जखमी झालेल्यांना प्रथम सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केल्या गेले होते.
अपघात घडल्याचे माहित होताच लगतचे गावकरी धावून आले. त्यांनी पोलीस विभागास माहिती देत रुग्णवाहीका बोलावून घेतली. त्वरित रुग्णालयात पाठविण्यात आले. वैद्य हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागपूरच्या रुग्णालयात पाठविण्यात आले होते.
पण त्यांचा जीव वाचविण्यात अपयश आले. प्रशांत वैद्य हे आपल्या कुटुंबासोबत वर्धेतील प्रताप नगर भागात निवापण त्यांचा जीव वाचविण्यात अपयश आले. प्रशांत वैद्य हे आपल्या कुटुंबासोबत वर्धेतील प्रताप नगर भागात निवासी होते. एकाच अपघातात सर्व कुटुंब उध्वस्त झाल्याने सर्वत्र शोक व हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
अपघातग्रस्त कारची स्थिती समोरून चेंदामेंदा झाल्यागत आहे. सोमवारी रात्री झालेला हा अपघात भयावह असल्याचे घटनास्थळीचे चित्र आहे. या अपघातास कारण ठरलेला रानडुक्कर पण तिथेच ठोस बसल्याने मृत झाला.
रूंजीने घेतले पैकीच्या पैकी गुण व राज्यात आली प्रथम त्या गावासाठी ठरली गौरवाची बाब
साकोली : शहरातील जिल्हा परिषद इंग्रजी प्राथमिक शाळा क्र. २ येथील इयत्ता दूसरीची विद्यार्थीनी रूंजी संग्रामे ही भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेत २०० पैकी २०० गुण घेत महाराष्ट्र राज्यात प्रथम आली आहे. ही साकोलीसाठी अत्यंत गौरवाची बाब असून सर्वप्रथम साकोली गटशिक्षणाधिकारी विजय आदमने यांनी त्या मुलीचे विभागातर्फे कौतुकास्पद अभिनंदन केले आहे.
जानेवारी २०२५ ला भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली. यामध्ये इयत्ता २ रीची रूंजी सुधाकर संग्रामे हिने अक्षरशः २०० पैकी २०० गुण प्राप्त करून महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान राखला. ही साकोली शहरासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. रूंजी संग्रामे ही शासकीय शाळेतील विद्यार्थीनीने महाराष्ट्रात साकोलीचे नाव चमकविले त्याबद्दल पंचायत समिती, जि. प. शाळा साकोली केंद्र प्रमुख डि. ए. थाटे, सहा. शिक्षक पल्लवी लुथडे, पी. एस. देशपांडे, उमेश भस्मे, आशा वलथरे, लता इळपाते, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष योगराज मुंगमोडे, उपाध्यक्ष सौ. बावणे, जि. प. केंद्रीय शाळा मुख्याध्यापक डी. डी. वलथरे, शिक्षक एम. व्ही. बोकडे, चेतन बोरकर, टी. आय. पटले, चित्ररेखा इंगळे, शालिनी राऊत, श्रद्धा औटी आणि साकोली मिडीया नेटवर्क व समस्त पंचायत समिती शिक्षकवृंद यांकडून रूंजी संग्रामे हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नोंदीमध्ये 19000 क्विंटल धान्य, आणि प्रत्यक्ष गोदामात केवळ 3000 क्विंटल धान्य, उर्वरित धान्य कोणाच्या घशात
गडचिरोली:-
महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था केंद्राच्या नोंदीमध्ये 19000 धान्य क्विंटल खरेदी दाखवलेली आहे. मात्र त्या ठिकाणी 3000 क्विंटल धान्य शिल्लक आहे. बाकी धान्य गेले कुठे? असा प्रश्न सामान्य जनतेतून उपस्थित होत आहे. खरेदी केंद्रावरील बारदान्यामध्ये सुद्धा तफावत आढळून आलेली आहे. दीड कोटी रुपयाचा धान्य घोटाळा झाल्याचे संशय आहे. प्रादेशिक व्यवस्थापक सोपान सांबरे यांनी केंद्राचे अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांना नोटीस बजावून केंद्राला शील ठोकले आहे. या घटनेमुळे धान्य घोटाळा करणाऱ्या माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. चालू वर्षाची खरेदी सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. देऊळगाव येथील खरेदी केंद्रावर 2023 24 वर्षांमध्ये खरीप हंगामा बऱ्याच प्रमाणात अनियमितताआढळल्याचे माहिती आहे. खरेदी केंद्रावर 2024-25 या चालू हंगाम वर्षामध्ये याची सुद्धा चौकशी होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र या घोटाळ्याची व्याप्ती वाढणार आहे. जिल्ह्यातील संपूर्ण आदिवासी विविध कार्यकारी संस्था फेडरेशन खरेदी केंद्रावर चालू वर्षांमध्ये एकूण झालेली धान्याची खरेदी आणि शिल्लक धान्यसाठा याची चौकशी करावी यामुळे खरेदी केंद्रावरील प्रत्यक्ष वस्तुस्थिती ही दिसून येईल असे सुद्धा सामान्य जनतेतून बोलले जात आहे.
९ एप्रील रोजी बुद्धगया मुक्तीसाठी राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन
गडचिरोली - बुद्धिष्ट इंटरनेशनल नेटवर्क आरपीआय, भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय किसान मोर्चा, राष्ट्रीय बेरोजगार मोर्चा व विविध संघटनाच्या वतीने ९ एप्रील २०२५ बुधवारला दुपारी १२ वाजता बुद्धगया मुक्तीसाठी राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.
इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथून रॅली काढून राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे. ईव्हीएम हटाओ ओबीसींची जातनिहाय जनगणना करा,
शेतकऱ्यासाठी एमसपी गॅरंटी कायदा लागू करा खाजगीकरण रद्द करून नोकर भरती सुरु करा, महापुरुषाचा वेळोवेळी अप अपमान करणे थांबवा आदी मागण्याकडे वेधण्यासाठी लक्ष राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे.
या आंदोलनात गडाचिरोली जिल्ह्यातील जनतेने हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी केले आहे