चंद्रपूर राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस अरविंद रेवतकर यांनी केली रोडची पाहणी
अनेक दिवसा पासुन नॅशनल हायवे वरील टागोर फाटा ते मार्बत आंबा या रोड चे काम बंद असून या रोड ला मोठ - मोठे खड्डे पडले आहे. या खड्यामूळे ये - जा करणाऱ्या वाहनांना त्रास सहन करावा लागत आहे. या खड्यामूळे अनेक वाहनांचे अपघात झाले आहे. भिसी गावातील सकाळी मार्निंग वाकला जानारे नागरीक, पादचार्यांचे आरोग्य धोक्यात आले असुन कधीही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गाच्या दुर्दशाची माहीती चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटनीस ( अजित पवार गट ) यांना मिळाली असता त्यांनी प्रत्यक्ष हायवे महामार्गाची पाहणी करून या महामार्गावरील त्वरीत खड्डे बुजवून आठ दिवसात मार्ग दुरुस्तीकरण करण्यात यावे अन्यथा चिमूर उपविभागीय कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल असा ईशाराही यावेळी दिला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस भिसी युवा शहर अध्यक्ष अक्षय खवसे किशोर गभणे,पंकज रेवतकर, देवा घुटके, स्वप्निल काळे, जगत तांबे, चेतन पडोळे, हरीश डुकरे, अक्षय नागपुरे, शैलेश आजबलकर, शुभम सहारे, जग्गा मेश्राम, रोशन रेवतकर, सौरभ कामडी, यश कोथळे, आशिष श्रीरामे, निखिल कोथळे, आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
- महामार्गावर बेशरमांची झाड़ लावून बांधकाम विभागाचा केला निषेध
कांपा - चिमूर हा राज्य महामार्ग आहे या रस्त्यावर पडलेले खड्डे हे अनेक दिवसापासुन अपघाताला आमंत्रण देत जिव घेत आहे बांधकाम विभागाकडून हे खड्डे अजूनही बुजविन्यात आले नाही शंकरपूर - कांपा मार्गाची रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता आशि परिस्थिती निर्माण झाली असल्यामूळे येथील स्थानीक महामार्गाविरील रस्त्यात बेशरमांची झाडे लावून बांधकाम विभागाचा निषेध केला आहे.
चिमूर - कांपा या राज्य महामार्गवर 15 गावे बसले आहे तर रस्त्याच्या परिसरात 30 गावे आहेत चिमूर पासुन कांपा गावांचे अंतर 33 किलोमीटर आहे या महामार्गावरील रस्त्याने अनेक चारचाकी दुचाकी वाहने जात असतात. जवळपासच्या सर्व गावांतील नागरिक या महामार्ग रस्त्याचा वापर करतात परंतु या महामार्गावरील रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत शंकरपूर ते कांपा या आठ किलोमीटर च्या अंतरावर तर जीवघेणे खड्डे आहेत या रस्त्यावरून दुचाकी चालविणेही कठीण झाले आहे.
या रस्त्यावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने मुरूम व गिट्टी टाकून दोनवेळा बुजविले परंतु खड्डे आहे तसेच आहे त्यामुळे खड्डे बुजविण्याच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून खड्डे बुजविण्यासाठी आलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे त्यामुळे महामार्गातील रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी परिस्थिती झाली आहे त्यामूळे हा रस्ता होणार की नाही असाप्रश्न निर्माण झाला असून सध्यातरी या रस्त्यावरील खड्डे कायमस्वरूपी बुजविण्यात यावे यासाठी येथील युवकांनी बेशरमांची झाडे लावून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे महामार्गावर बेशरमांची झाडे आमोद गौरकर अशोक चौधरी आशिष चौधरी निखील गायकवाड आशु हजारे गणेश वानकार साधू गेडाम विनोद घरत अमन मेश्राम प्रियंशु वाढई नंदू शेरकी मनोज सहारे रुपेश रंदये बबलू शेख आदिंनी पुढाकार घेत लावले आहे.