PostImage

Sujata Awachat

July 16, 2024   

PostImage

Baby Aadhar Card: बाळ जन्मत:च करा आधार नोंदणी, नाही तर …


Baby Aadhar Card: आधार कार्ड हे महत्त्वाच्या सरकारी कागदपत्रांपैकी एक आहे. बँकेपासून ते शाळेतील ऍडमिशनपर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड पुरावा म्हणून गरजेचे आहे. त्यामुळे नवजात बालकांचे आधार क्रमांक नोंदणीचे आदेश सरकारने दिले आहेत; मात्र नवजात बालकांच्या आधार नोंदणीला लोक फारसा प्रतिसाद देत नाही.

हे देखील वाचा : Kids Health: मुलांमध्ये डोळ्यांचा त्रास वाढण्याचे ही आहेत 3 कारणे

 

Baby Aadhar Card: तर योजनांचा लाभ नाही

आधार कार्ड नसल्यास अनेक सरकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही. सरकारी कागदपत्रांसोबतच आणि बऱ्याच कामांसाठी  आधार कार्डची गरज पडते. आता UIDAI ने लहान बाळांचे Baby Aadhar Card बनवण्याच्या नियमात बदल केला आहे.

हे देखील वाचा : Parent Child Relationship: बच्चों को कुछ कहने से पहले ये 4 बातें जरूर जान लीजिए

 

 

Baby Aadhar Card: या कागदपत्रांची गरज

पाच वर्षांखालील लहान बाळांसाठी बायोमेट्रिक माहिती गरजेची नसते. बाल आधारसाठी पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड अथवा सार्वजनिक वितरण प्रणाली फोटो कार्ड, वोटर आयडी, शस्त्राचे लायसन्स, भारत सरकारद्वारे जारी फोटो आयडी प्रूफ, मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेचे ओळखपत्र, नरेगा रोजगार कार्ड, फोटो क्रेडिट कार्ड, पेंशनर फोटो कार्ड, स्वातंत्र्य सैनिक फोटो कार्ड, शेतकरी पासबुक, लग्नाचा पुरावा, नावात बदल केल्याचा पुरावा आवश्यक आहे.

 

Baby Aadhar Card: जन्मताच आधार क्रमांक नोंदणी

बालकांच्या आधार कार्ड नोंदणीसाठी पालकांना आवश्यक दस्तावेजासह सेतू केंद्रात जावे लागते. कोणत्याही शासकीय रुग्णालयात आधार क्रमांक नोंदणीची सुविधा नाही.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.