पक्षांतर करून आलेल्या नेत्यांवर भिस्त
दिल्ली, लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपाने आतापर्यंत 400 हून अधिक उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. चारशे पार जागा जिंकण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच पक्षाने 116 आयात नेत्यांना तिकीट दिलेले आहेत. भाजपाचे तब्बल 28 टक्के उमेदवार दुसऱ्या पक्षांतून आलेले आहेत. आतापर्यंत भाजपाने 417 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यापैकी एकूण 116 उमेदवार दुसऱ्या पक्षांतून भाजपामध्ये दाखल झालेले आहेत. देशातील सर्वांत मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. तेथे आतापर्यंत 64 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे यातील 20 जागांवर निवडणुकीपूर्वी अन्य पक्षातून भाजपामध्ये आलेल्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केवळ या राज्यातच नाही तर तामिळनाडूत 11, पश्चिम बंगाल व ओडिशात प्रत्येकी आठ व महाराष्ट्रात सात आयाराम-गयारामांना भाजपाने तिकीट दिले आहे.
21 राज्यांत पक्षांतर करून
आलेल्यांना देण्यात आले तिकीट भाजपाने 18 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांत
अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांना तिकीट दिले आहे. पक्षाच्या 417 उमेदवारांपैकी 116 जणांनी अलीकडेच पक्षात प्रवेश केला आहे.
■ तब्बल 27.82 टक्के उमेदवार मूळ भाजपाचे
नाहीत. पुद्दुचेरीत पक्षाचा एकमेव उमेदवार दुसऱ्या पक्षाचा आहे.
त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशात पक्षाचे 6 पैकी 5
उमेदवार पक्षांतर करून आलेले आहेत. तेलंगणात
भाजपाने 17 उमेदवार उभे केले असून, त्यापैकी 12
जण दुसऱ्या पक्षातून भाजपामध्ये आलेले आहेत.
सहा राज्यांत 50 टक्के
आयात उमेदवार सहा राज्यांत भाजपा पक्षांतर करून आलेल्या
नेत्यांवर अवलंबून आहे. आंध्र प्रदेशात 83 टक्के,
दादरा आणि नगर हवेली, हरयाणात 60 टक्के,
पुद्दुचेरीत 100 टक्के, तेलंगणात 70.59 टक्के आणि
पंजाबमधील 66 टक्के उमेदवार निवडणुकीपूर्वी अन्य
पक्षातून भाजपामध्ये आलेले आहेत.
चंद्रपूर – भारतीय जनता पक्षाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचे कणखर नेतृत्व, देशभरात विकासाचा झंझावात, ‘सबका साथ, सबका विकास व सबका विश्वास’ हे धोरण यशस्वीपणे राबविल्या गेल्याने भाजपाला मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांमध्ये निर्विवाद बहूमत प्राप्त झाल्याने चंद्रपूर महानगरात भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत विजयाचा जल्लोष साजरा केला. नागरीकांना मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.
भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद कडू, युवा नेते रघुवीर अहीर, यांच्या नेतृत्वात दि. 03 डिसेंबर 2023 रोजी कस्तुरबा चौक (गिरणार) येथे साजरा झालेल्या या विजयोत्सवात राजेंद्र अडपेवार, गिरीष अणे, सुरेश भाकरे, विनोद शेरकी, गणेश गेडाम, राजेंद्र खांडेकर, राहुल घोटेकर, सविता कांबळे, पुष्पाताई उराडे, चंद्रकला सोयाम, रेणुकाताई घोडेस्वार, शेख जुम्मन रिजवी, अरविंद कोलणकर, राजू येले, रवी चहारे, ललित गुलानी, सय्यद चाँद, स्वप्नील मुन, विशाल गिरी, स्वप्निल कांबळे, मोनिषा महातव, चेतन शर्मा, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी या विजयोत्सवात सहभाग घेतला.
या प्रसंगी भाजप कार्यकर्त्यांनी ‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जिंदाबाद’ चे नारे देवून तीन राज्य केवल झॉंकी है, लोकसभा अब बाकी है । असे नारे देवून परिसर दणाणून सोडला.