PostImage

Ujjwala kale

Feb. 12, 2024   

PostImage

'लाल सलाम'सिनेमासाठी रजनीकांत यांनी 1 का मिनिटांसाठी 1कोटी रूपये घेतले …


मुंबई : रजनीकांतच्या प्रत्येक चित्रपटाची चाहते आतुरतेनं वाट पाहत असतात. त्यांचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांमध्ये वेगळीच क्रेझ असते. त्यांचा प्रत्येक सिनेमा रिलीज होताच थिएटरबाहेर मोठमोठे पोस्टर्स लागतात, त्याला दुधानं अभिषेक घातला जातो.चाहतेही चित्रपटांना चांगला प्रतिसाद देतात. पण नुकतंच रजनीकांत यांचा रिलीज झालेला सिनेमा 'लाल सलाम'ला फारसा प्रतिसाद मिळत नाहीये. रजनीकांत यांच्या इतर चित्रपटांप्रमाणे 'लाल सलाम' ला प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतने दिग्दर्शित केलेला 'लाल सलाम' हा पहिलाच चित्रपट आहे. पण बॉक्स ऑफिसवर मात्र हा सिनेमा फार चांगली कमाई करताना दिसत नाही. पण असं असलं तरी या सिनेमासाठी रजनीकांत यांच्या मानधनात कोणतीही कमतरता आलेली नाही. त्यांनी या चित्रपटात कॅमिओसाठी खूप मोठी फी आकारली आहे. हा आकडा ऐकून तुम्ही फारच चकित व्हाल.

 

वृत्तांवर विश्वास ठेवला तर, 'लाल सलाम'मध्ये रजनीकांत यांची फक्त 40 मिनिटांची भूमिका आहे. ज्यासाठी त्यांनी प्रत्येक मिनिटासाठी फी आकारली आहे. रजनीकांत यांनी चित्रपटात केवळ अभिनयच केला नाही तर चित्रपटाच्या संवादांमध्येही मदत केली. मात्र, चित्रपट प्रदर्शित होऊन 4 दिवस झाले असून चित्रपटाने केवळ 10 कोटींची कमाई केली आहे. 80 ते 90 कोटी रुपये इतकं बजेट असलेल्या या सिनेमासाठी रजनीकांत यांनी बजेटच्या तुलनेत खूपच जास्त फी आकारली आहे.

 

TrackTollywood.com च्या बातमीनुसार, चित्रपटात रजनीकांत यांची केवळ 30 ते 40 मिनिटांची भूमिका आहे. ज्यासाठी त्यांनी 1 मिनिटासाठी 1 कोटी रुपये आकारले आहेत. म्हणजेच पूर्ण भूमिकेसाठी रजनीकांत यांनी जवळपास 40 कोटी रुपये फी घेतली आहे. अभिनयासोबतच त्यांनी चित्रपटाचे संवाद लिहिण्यासाठी देखील मदत केली आहे.

 

लाल सलाम बद्दल बोलायचे तर हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे ज्यात विष्णी आणि विक्रांत मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ९ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

 

विष्णू विशाल, विक्रांत आणि रजनीकांत अभिनीत दिग्दर्शक ऐश्वर्या रजनीकांत यांच्या 'लाल सलाम' मधून हा एक महत्त्वाचा सामाजिक संदेश दिला गेला आहे. 'लाल सलाम' बॉक्स ऑफिसवर बॉलीवूड चित्रपट 'तेरी बातों में उल्झा जिया' आणि रवी तेजाचा तेलुगु चित्रपट 'ईगल' यांच्याशी टक्कर देत आहे. मात्र, ते दोन चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाहीत.

 

लायका प्रॉडक्शनच्या सुबास्करा अल्लिराजा यांनी निर्मित, लाल सलाममध्ये विघ्नेश, लिव्हिंग्स्टन, सेंथिल, जीविता, केएस रविकुमार आणि थंबी रामय्या यांच्याही सहाय्यक भूमिका आहेत. विशेष म्हणजे क्रिकेटचे दिग्गज कपिल देव देखील या चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसले आहेत. पण तरीही हा चित्रपट लोकांना थिएटरकडे आकर्षित करू शकलेला नाही.