PostImage

Vaingangavarta19

Yesterday    Follow

PostImage

चाकुने सपासप वार करुण निरापराधाचा केला खून


 

 

चाकुने सपासप वार करुण निरापराधाचा केला खून 

 

अमरावती, १५ एप्रिलः
रविनगर परिसरात काल रात्री उशिरा घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण अमरावती शहर हादरून गेले. केटरिंग व्यवसायात कार्यरत असलेले तीरथ वानखेडे यांची काही अज्ञात आरोपींनी चाकूने सपासप वार करून निघृण हत्या केली. ही घटना इंद्रपुरी शाळेजवळ रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार, तीरथच्या पोटात तीन ते चार वेळा धारदार चाकूने वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आज सकाळी ७ वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.पोलिस सूत्रांनुसार, तीरथ यांचा काही ओळखीच्या व्यक्तींशी पूर्वीपासून वाद सुरू होता. काल रात्री काही कारणांवरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला, ज्याचा परिणाम थेट प्राणघातक हल्ल्यात झाला. हा वाद वैयक्तिक आणि पूर्वद्वेषातून झाल्याचा प्राथमिक संशय आहे.
तीन आरोपींची ओळख पटलीः

या प्रकरणात पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू करत तीन आरोपींची ओळख पटवली आहे. आरोपींना पकडण्यासाठी शोधमोहीम राबवली गेली असून यामध्ये पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू करत तीन आरोपींची ओळख पटवली आहे. पोलीस आयुक्त यांचे यांचे मार्गदर्शना खाली दबंग महेंद्र इंगळे यांची टीम तिन्ही आरोपीला अटक केली आहे. आरोपीने कबुली पण दिलेली आहे

तीर्थ वानखेडे हे अमरावतीत केटरिंग व्यवसायात सक्रीय होते आणि समाजात त्यांच्या कामामुळे ओळख निर्माण झाली होती. शांत आणि मनमिळावू स्वभावाचे म्हणून परिचित असलेल्या तीर्थच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे


PostImage

Vaingangavarta19

Yesterday    Follow

PostImage

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून माजी आमदार …


विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून माजी आमदार डॉ.देवराव होळी यांनी समाज मंदीराचे केले भुमीपुजण 

 

प्रवीण तिवाडे कार्यकारी स़पादक वैनगंगा वार्ता १९

आष्टी:-
 भारतरत्न संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी आष्टी येथील मुख्य चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी  अभिवादन केले. आष्टी येथील बौध्द बांधवांनी गावातून रॅली काढून आष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत वंदन केले. यावेळी आष्टी येथील बौद्ध बांधवाची मोठया संख्येत उपस्थिती होती. या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. देवराव होळी यांनी उपस्थित बौध्द बांधवाशी सवांद साधला
व नंतर  त्यांनी आष्टी येथील बौध्द विहार स्थळाला भेट दिली आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात  डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत धम्म चेतना बौद्ध समाज मंडळ वार्ड नंबर १ येथील धम्मभुमीवर त्यांनीच मंजूर केलेल्या समाज भवणाचे  भूमिपूजन केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, माजी जिल्हा परिषद सदस्य  धर्मप्रकाश कुकुडकर, पोलीस निरीक्षक विशाल काळे, पोहवा संतोष नागुलवार, दिलीप बारसागडे, दिलीप चलाख,  सत्यशील डोर्लीकर, रोहन रायपूरे  मंगेश पोरटे, प्रविण तिवाडे ग्रा ‌प‌ सदस्य संतोष बारापात्रे ,कवडू डोर्लीकर, अशोक खंडारे, अशोक साव, तुकाराम दुर्योधन , तेजराज गोंगले ,अनील पाटील, ममता साव, तावाडेताई, ज्वाला पाटील,संध्या हाळके, जीजाबाई  महोरकर विद्या  खंडारे आदीसह धम्म चेतना बौद्ध समाज मंडळाच्या उपासीका व उपासक उपस्थीत होते. धम्म चेतना बौद्ध समाज मंडळाचे ठिकाणी समाज मंदीर  मंजूर केल्याबद्दल आष्टी येथील बौध्द समाजबांधवांनी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचे विशेष आभार मानले आहेत


PostImage

Vaingangavarta19

Yesterday    Follow

PostImage

धक्कादायक ! बापानेच स्वतःच्या १४ वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार…


धक्कादायक ! बापानेच स्वतःच्या १४ वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार…

शिळ-डायघर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल


दि. १५, शिळफाटा (ठाणे) : शिळ-डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या कल्याण फाटा परिसरातील अभयनगर मध्ये असलेल्या अभयनगर चाळ, पोस्ट पडले, ता.जि.ठाणे या ठिकाणी बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. बापानेच आपल्या पोटच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. मुलीच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले व त्यामुळे ती गर्भवती राहून तिची प्रसुती झाली म्हणून शिळ-डायघर पोलीस स्टेशन मध्ये बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या आईने फिर्याद नोंदवली आहे.


आरोपी महेश रामसुंदर जयस्वाल (मुलीचा बाप) ३ ऑगस्ट २०२४ पासून तो ३ एप्रिल २०२५ पर्यंत अभयनगर मध्ये असलेल्या चाळ मध्ये राहत्या घराच्या किचनमध्ये मुलीच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध करीत होता. म्हणजेच ९ महिने तिच्यावर तो अत्याचार करत होता. मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर शिळ -डायघर पोलीस स्टेशन, ठाणे मध्ये आरोपीवर गुन्हा रजि. न. कलम ३७०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ६५ (१), ६८ (अ), ६४(२) (एफ), बालकाचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ६, ८, १२ प्रमाणे कलम लावण्यात आले आहे. दाखल अधिकारी, तपासी अधिकारी सपोनि/ प्रशांत खरात, ( शिळ डायघर पोलीस स्टेशन )यांच्याकडे सध्याही केस आहे. भेट देणारे अधिकारी वपोनि/संदिपान शिंदे, पोनि/गुन्हे जयंत राजूरकर, पोनि/प्रशांत खरात या सर्वांनी ५ एप्रिल २०२५रोजी रात्री १२:२०वा घटनास्थळी भेट दिली.
कल्याण फाटा, पडले, डायघर, शिळ फाटा, खार्डी, देसाई, खिडकाळी, फडके पाडा, शिळ ठाकूरपाडा, भोलेनाथ नगर, या सर्व परिसरातील नागरिक प्रशासन कडे मागणी करत आहेत. आरोपीवर कठोर ते कोठार शिक्षा करण्यात यावी. जेणेकरून पुन्हा या परिसरामध्ये अशी घटना घडणार नाही. हा खटला फास्टट्रॅक वर चालवण्यात यावा. अशी मागणी जोर धरू लागली आहे. समाजामध्ये अशा नराधम बापाला जगण्याचा अधिकार नाही. माणुसकीपणाला लाज वाटावी, मन स्तब्ध करणारी मानवतेला लज्जा वाटेल अशी घृणास्पद घटना आहे.


PostImage

Vaingangavarta19

Yesterday    Follow

PostImage

विश्वतत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य सदैव स्मरणात राहील- डॉ. दशरथ …


 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य सदैव स्मरणात राहील-  डॉ. दशरथ आदे

 

गडचिरोली १५ एप्रिल (जिल्हा प्रतिनिधी) ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाद्वारे महात्मा ज्योतिबा फुले यांचा वारसा पुढे नेला आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य दलित वर्गाच्या उत्थान आणि कल्याणासाठी समर्पित केले. त्यांचे कार्य आणि जीवन इतिहासातील एक मैलाचा दगड म्हणून नेहमीच लक्षात ठेवले जाईल आणि समाजाला मार्गदर्शन करत राहील, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत डॉ. दशरथ आडे यांनी बुधवारी येथे ‘आंबेडकर जयंती कार्यक्रमात केले. 
  येथील  सम्यक समाज समिती, विशाखा महिला मंडळ आणि सम्यक ज्येष्ठ नागरिक संघ यांनी संयुक्तपणे गोकुळ नगर येथील सम्यक बुद्ध विहाराच्या मैदानावर हा कार्यक्रम आयोजित केला होता.
   सम्यक समाज समितीचे अध्यक्ष हंसराज उंदीरवाडे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले तर ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे कवडुजी उंदीरवाडे, सीताराम टेंभुर्णे, विशाखा महिला मंडळाच्या सुमित्रा राऊत, मनीषा वाळके या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
   डॉ. आडे यांनी डॉ. आंबेडकरांनी केलेल्या क्रांतिकारी कार्याचा उल्लेख केला आणि सांगितले की, या महान नेत्याने आणि इतर समाजसुधारकांनी आणलेल्या बदलाचे जतन करण्यासाठी आंबेडकरी आणि मागासवर्गीयांना सध्याच्या काळात खूप सावधगिरी बाळगावी लागेल.
   श्री. रोहिदास राऊत म्हणाले की, डॉ. आंबेडकरांनी लढलेला अन्याय आणि असमानतेविरुद्धचा लढा अद्याप संपलेला नाही आणि सर्व दलित वर्गांना हा लढा नव्या ताकदीने सुरू ठेवावा लागेल. डॉ. आंबेडकरांचे विचार आता समाजातील मोठ्या वर्गाकडून अनुसरले जात आहेत आणि स्वीकारले जात आहेत ही चांगली गोष्ट आहे, असे त्यांनी नमूद केले.
   संजीवनी वानखेडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, नजरिका मशाखेत्री यांनी संचालन केले आणि मनीषा टेंभुर्णे यांनी आभार मानले. याप्रसंगी आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षिसे वाटण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन  कालिदास राऊत यांनी केले. संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौका पर्यंत  एक भव्य रॅली काढण्यात आली आणि महान नेत्याला पुष्पांजली अर्पण करण्यात आली.


PostImage

Vaingangavarta19

Yesterday    Follow

PostImage

बौद्ध विहाराच्या प्रांगणात भीम जयंती साजरी सायंकाळी शहरातून भव्य भीम …


बौद्ध विहाराच्या प्रांगणात भीम जयंती साजरी
सायंकाळी शहरातून भव्य भीम रॅली निघाली

 

सुरेंद्र अलोणे 
अहेरी:- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती येथील बौद्ध विहाराच्या प्रांगणात ज्ञान प्रसारक मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले.
     सकाळी पंचशील ध्वज ज्येष्ठ महिला सुगंदाबाई ओंडरे यांच्या शुभहस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले 
     यावेळी अध्यक्षस्थानी बौद्ध मंडळ अहेरीचे संस्थापक अध्यक्ष नारायणजी अलोणे हे होते तर विचारपीठावर उदघाटिका सुगंदाबाई ओंडरे, ज्ञान प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एकनाथ चांदेकर, सचिव सुरेंद्र अलोणे, सामाजिक कार्यकर्ते रियाज भाई शेख, श्रीकांतजी मद्दीवार, सामाजिक कार्यकर्त्या पौर्णिमा मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
    या प्रसंगी रियाज भाई शेख, सुरेंद्र अलोणे, प्रशांत भिमटे , तानिया अलोणे आदींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकले.तर महिलांनी सामूहिक रित्या उत्कृष्ट भिमगीत गायन केले.
    सायंकाळी अहेरी शहरातून भव्य भीम रॅली काढण्यात आली.यात सिनेट सदस्या तनुश्रीताई  आत्राम , अहेरी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, सोहिल वाळके,  रियाज शेख, नागेश मडावी, ताजू कुळमेथे, कपिल ढोलगे, राहुल गर्गम, संदीप ढोलगे, परशुराम दहागावकर, श्याम ओंडरे, प्रमोद भिमटे, महेंद्र मेश्राम, रामचंद्र ढोलगे, शिवाजी ढोलगे, देवाजी अलोणे, राजानंद दहागावकर, धनराज गोमासे आदी आणि बहूसंख्येने समाज बांधव भीम रॅलीत सामील होते.


PostImage

Vaingangavarta19

April 14, 2025    Follow

PostImage

खलबत्याच्या राडने केला निवृत्त महिला अधिकारी यांचा खून


खलबत्याच्या राडने केला निवृत्त महिला अधिकारी यांचा खून 

 

गडचिरोली : गडचिरोली शहरानजीकच्या नवेगाव (मुरखळा) येथे भरदिवसा जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त अधिकारी महिलेची खलबत्त्याचा रॉड मारुन हत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. कल्पना केशव उंदिरवाडे (६१) असे मृत महिलेचे नाव आहे.

कल्पना उंदिरवाडे यांच्या घरी काम करणारी महिला दिनांक १३ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी गेली असता त्या मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांच्या शरीरावर लोखंडी रॉडने मारहाण केल्याच्या जखमा होत्या. घराचे सर्व दरवाजे उघडे होते. शिवाय टीव्हीही सुरु होता. घरकाम करणाऱ्या महिलेने ही माहिती शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, चामोर्शी मार्गावरील एका पेट्रोल पंपवर काम करणारा कल्पना उंदिरवाडे यांचा जावईदेखील घरी पोहचला. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी रात्री ८ वाजता मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे हे पथकासह घटनेचा तपास करीत आहेत.

सहकारी बँकेविरुद्धच्या आंदोलनात सहभाग

कल्पना उंदिरवाडे आणि त्यांचे पती केशव उंदिरवाडे दोघेही जिल्हा परिषदेत नोकरीवर होते. केशव उंदिरवाडे यांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले, तर कल्पना तीन वर्षापूर्वी निवृत्त झाल्या. त्यांना एक मुलगी आणि एक दत्तक मुलगा असल्याचे सांगितले जाते. मुलाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरी मिळावी, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते, अशी माहिती आहे. दरम्यान, गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीत अनियमितता झाल्याचा आरोप करुन नियुक्त्ती आदेशाप्रमाणे संबंधित उमेदवारांना तत्काळ कामावर रुजू करुन घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुशिक्षित युवक, युवती नोकरभरती संघर्ष कृती समितीने ११ व १२ एप्रिल असे दोन दिवस बँकेसमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात कल्पना उंदिरवाडे यादेखील सहभागी झाल्या होत्या. काल हे आंदोलन संपल्यानंतर आज त्यांची हत्या झाल्याने तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
मृत कल्पना उंदिरवाडे यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या बोटातील ३ अंगठ्या तशाच होत्या. शिवाय अंगावरील अन्य दागिनेही सुरक्षित होते. त्यामुळे त्यांची हत्या चोरीच्या हेतूने झाली नसावी, हे स्पष्ट होते. त्यामुळे हत्या करणारा नेमका कोण? तो जवळचा व्यक्ती असावा? असाही संशय व्यक्त केला जात आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 14, 2025    Follow

PostImage

फुले आंबेडकरांची संयुक्त जयंती होणे हि क्रांतिकारी घटना -- रोहिदास …


फुले आंबेडकरांची संयुक्त जयंती होणे हि क्रांतिकारी घटना -- रोहिदास राऊत

 

गडचिरोली १३ एप्रिल (जिल्हा प्रतिनिधी) प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेच्या विचारांमुळे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरु मानले. आज या दोन्ही महान समाजसुधारकांची जयंती एकत्रितपणे साजरी करणे ही खरोखरच एक क्रांतिकारी गोष्ट आहे आणि त्यामुळे सामाजिक समतेच्या विचाराचा प्रसार होण्यास मदत होईल, असे मत रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांनी व्यक्त केले.
   कुरखेडा तालुक्यातील सोनेरंगी गावात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करतांना ते बोलत होते.
   जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. जीवन पाटील नाट, मुनघाटे महाविद्यालयाचे डॉ. दशरथ आडे, संविधान फाउंडेशनचे गौतम मेश्राम, बौद्ध महासभेचे तुलाराम राऊत, पंचायत समितीचे माजी  प्रभाकर तुलावी, तालुका काँग्रेस समितीचे जयंत हरडे, आदिवासी कार्यकर्ते प्रा. अनिल होळी, नाविन्यपूर्ण शाळेतील  नंदुजी मसराम, गुरुदेव निकोडे, शालिक जनबंधू हे प्रमुख उपस्थित होते.
   श्री. राऊत पुढे म्हणाले की, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब दोघांनीही प्रचंड सामाजिक प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष केला आणि दलित आणि शोषित वर्गाच्या हक्कांसाठी अथकपणे काम करत राहिले. त्यांचे कार्य येणाऱ्या काळात प्रेरणादायी राहील.
   डॉ. दशरथ आडे यांनी नमूद केले की, महात्मा फुले यांनी सुरू केलेली सत्यशोधक चळवळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेला बौद्ध धर्म या आधुनिक इतिहासातील दोन महत्त्वाच्या घटना आहेत. या दोन्ही चळवळी समाजात प्रचलित असलेल्या रूढीवादी जाती व्यवस्थेविरुद्ध बंड म्हणून सुरू झाल्या होत्या. समता आणि बंधुत्वाच्या आदर्शांमुळे दोन्ही चळवळी पुढील पिढ्यांसाठी पुढे जातील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
   श्री. गौतम मेश्राम यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले आणि सांगितले की या राष्ट्रीय दस्तऐवजामुळे लोकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे. नागरिकांना त्यांचे हक्क आणि कर्तव्ये यांची जाणीव करून देण्यासाठी संविधान प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले.
   याप्रसंगी इतर पाहुण्यांनीही आपले विचार व्यक्त केले. रात्री प्रसिद्ध गायक विकी भैसारे यांचा 'उजालाली धम्मज्योत भीम स्वरांची' हा संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

 शरद जांभुळकर यांनी प्रास्ताविक केले, कार्यक्रमाचे संचालन छोटू कोटांगले यांनी केले आणि आभार कृष्णा चौधरी यांनी मानले.


PostImage

Vaingangavarta19

April 12, 2025    Follow

PostImage

एसटी बसने दुचाकीला दिली जबर धडक सात वर्षाचा चिमुकला आईच्या …


 एसटी बसने दुचाकीला दिली जबर धडक सात वर्षाचा चिमुकला आईच्या डोळ्यांदेखत ठार 

 

अमरावती :अमरावती ते बडनेरा मार्गावर जुन्या वस्तीतील सजनाजीबुवा हनुमान मंदिरापासून थोड्या अंतरावर एसटी महामंडळाच्या बसने दुचाकीला जबर धडक दिल्याने सात वर्षाच्या चिमुकल्याचा मागील चाकात येऊन जागीच मृत्यू झाला, तर आई जखमी झाली. हा अपघात शुक्रवारी दुपारी घडला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुद्र मंगेश घीडाणी 7 रा.न्यू प्रभात कॉलनी, नवीवस्ती, बडनेरा असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.

तो अमरावती ते बडनेरा मार्गावरील एका शाळेत पहिल्या वर्गामध्ये शिकत होता. नेहमीप्रमाणे त्याच्या आईने त्याला शाळेत सोडून देण्यासाठी दुचाकीवर घेतले. मार्गातील सजनाजी बुवा हनुमान मंदिराजवळ अचानकपणे MH.14 LX 8863 क्रमांकाच्या बसने दुचाकीला जबर धडक दिली.

दुचाकीवर मागे बसलेला रुद्र हा बसच्या मागील चाकाखाली आला, तर त्याची आई विरुद्ध दिशेने फेकली गेली. अपघात घडल्याचे निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जबर जखमी झालेल्या रुद्रला नागरिकांनी अमरावतीला उपचारासाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात त्याचा मृत्यू झाला.

चिमुकल्याच्या मृत्यूमुळे बडनेरा नवी वस्ती परिसरात शोकमय वातावरण आहे. आईच्या डोळ्यादेखत चिमुकल्याचा मृत्यू झाला. अपघातस्थळी मोठी गर्दी उसळली होती. पोलिसांनी तत्काळ पोहचून परिस्थिती सांभाळली. अपघातास कारणीभूत ठरलेली बस ही अकोला-चंद्रपूर फेरी करीत होती.

चालक दिगंबर मंगल कनाके वय, 41 वर्ष रा. शेखबराज ता. भद्रावती जि. चंद्रपूर याला बडनेरा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रुद्रच्या अपघाती मृत्यूनंतर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 


PostImage

Vaingangavarta19

April 12, 2025    Follow

PostImage

गुप्त धन शोधणारे पोलीसांच्या ताब्यात : १ महिला सह ५ …


 गुप्त धन शोधणारे पोलीसांच्या ताब्यात  : १ महिला सह ५ अटकेत तर १ महिला सह ४ फरार

 

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात गुप्त धन शोधणारी टोळीना वार्डातील लोकांनी पकडुन पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यात १ महिला सहित ४ पुरुषांना पकडले तर १ महिला सहित ३ पुरुष डाव साधून पळून गेले. सदर घटना १० एप्रिल रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास श्यामनगर चंद्रपूर येथील परिवर्तन चौक, नाग मंदिर जवळील खुल्या पटांगणात घडली.


१० एप्रिल रोजी डायल ११२ वर कॉल आला की काही लोक श्यामनगर येथील परिवर्तन चौक, नाग मंदिर जवळील खुल्या पटांगणात खोदकाम करीत आहे. त्यावरून रामनगर पोलीस स्टेशन चे पथक घटनास्थळी रवाना झाले. तिथे वार्डातील लोकांनी आरोपी रोहीत गोपीचंद शर्मा (४७) रा. ७१ गल्ली न. ३ सुखराम कॉलनी पटीयाला राज्य पंजाब ह. मु. वॉर्ड न २ गणेश दादाजी उराडे यांचे घरी किरायाने गोंडपिपरी जि. चंद्रपूर, रवि लहानुजी सिडाम (५३) रा. भद्रनाग वॉर्ड, डॉ. आंबेडकर कॉन्व्हेट जवळ भद्रावती जि. चंद्रपूर, रविकीरण अनाजी इंगोले (४८) रा. थोराना ता. भद्रावती जि. चंद्रपूर, सोनु सदाशिव मांढवगडे (३०) रा. विठ्ठलवाडा ता. गोंडपिपरी जि. चंद्रपुर, सपना भगवान कोसरे (२४) रा. ताडपल्ली ता. शिरपुर जि आदीलाबाद राज्य तेलंगना यांना पकडुन ठेवले होते.

त्यांची पोलीसांनी अधिक चौकशी केली असता आरोपीने सांगितले की त्यांना फरार आरोपी सविता रॉय राशन दुकान वाली हीने सदर ठिकाणी बोलावुन पुजा करण्यासाठी कुवारी मुलगी व मुलगा व खोदकाम करण्यासाठी येथे बोलाविले होते तिथे गुप्त धन जादुटोना करून गुप्त धन सोने काढुन त्यातील काही हिसा आम्हा सर्वांना वाटुन देणार होती आमचे सोबत पळून गेलेले इसमाचे नावे नशा बार वाला त्याचा मोबाईल नंबर क्रमांक ९२२६२१०५९८ चा धारक व इतर दोन अनोळखी ईसम या सर्व आरोपीवर पोलीसांनी महाराष्ट्र नरबळी आणी इतर अमानुष्य अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोना यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उचाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ मधिल अनुसुची मधिल ४ नंबरचा अपराध होत असल्याने आरोपी विरुध्द कलम ३ (२) प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.

पुढील तपास रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार आसिफराजा शेख करीत आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 12, 2025    Follow

PostImage

शेतातील कामे आटपून घरी परतणाऱ्या शेतकऱ्याचा अपघातात मृत्यू


शेतातील कामे आटपून घरी परतणाऱ्या शेतकऱ्याचा अपघातात मृत्यू

मुल तालुक्यातील खेडी – गोंडपिपरी मार्गावरील घटना


गोंडपिपरी : शेतातील कामे आटोपून घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १० एप्रिल रोजी रात्री ८. ३० वाजता मुल तालुक्यातील नवेगाव भुजला – जुनासुर्ला रस्त्यावर घडली. तिरुपती देशमुख असे मृताचे नाव असून, जुनासुर्ला येथील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिरुपती बाबुराव देशमुख (४३ ) हे मूल तालुक्यातील जुनासुर्ला गावात राहत होते.

पाच वर्षांपूर्वी त्याची पत्नी तिच्या दोन मुलींसह सिंदेवाही तालुक्यातील वाढोणा गावात आई – वडिलांच्या घरी माहेरी राहायला गेली. १० एप्रिल रोजी सकाळी जेवण करून तिरुपती आपल्या शेतात कामाला गेले. तेथे काम आटोपून ते परतत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. जुनीसुर्ला चे सरपंच रणजीत समर्थ यांना माहिती मिळताच त्यांचे भाऊ नरेंद्र बाबुराव देशमुख यांनी उपजिल्हा रुग्णालय मुल येथे जाऊन भावाचा मृतदेह ठेवलेला पाहिला. नरेंद्र देशमुख यांच्या तक्रारीच्या आधारे मुल पोलीसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध हिट अँड रन कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मुल पोलीस करत आहे

 

×


PostImage

Vaingangavarta19

April 12, 2025    Follow

PostImage

लहान भावाने आई - वडीलांना माझ्याकडे द्या अशी केला मोठ्या …


लहान भावाने आई - वडीलांना माझ्याकडे द्या अशी केला मोठ्या भावावर खटला दाखल 

सातारा:-

सातारा न्यायालयात एक ह्रदयस्पर्शी खटला समोर आला आहे वयोवृद्ध झालेल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी मोठा भाऊ मला संधीच देत नाही त्या साठी लहान भावाने न्यायालयात मोठ्या भावा विरूद्ध दावा ठोकला. वयाची 90 वर्ष पार केलेल्या आईवडिलांना माझ्याकडे सुपूर्त करावे. मी ही त्यांचा मुलगा आहे. माझाही आईवडिलांना सांभाळण्याचा अधिकार आहे. माझ्या आईवडिलांची माझा मोठा भाऊ अत्यंत उत्तम प्रकारे गेली २५ वर्ष सेवा करत आहे. आता मोठा भाऊही वयस्कर झाला आहे. त्याला आता आईवडिलांना नीट सांभाळताना त्रास होईल. तेव्हा येथून पुढे मला आईवडिलांची सेवा करण्याची संधी द्यावी. आईवडिलांचे खुप प्रेम मोठ्या भावाच्या घराला मिळाले आहे. आता माझ्या मुलांनाही आजोबा आजीचा सहवास लाभला पाहीजे व आम्हाला आमच्या दैवताची सेवा करता आली पाहीजे. माझा मोठा भाऊ अत्यंत मोठ्या मनाचा आहे. त्यांने आईवडिलांचा अत्यंत चांगला सांभाळ केला आहे. पण आता तोच थकला आहे. मला त्याचीही चिंता वाटते. त्याचीही सेवा मला करायची आहे. तेव्हा मला माझे आईवडील हवे आहेत. आई-वडिलांना सांभाळण्यासाठी दोन्ही भाऊ कोर्टात भांडत आहेत, हा विलक्षण प्रकार आहे. आईवडिलांना न साभांळणाऱ्या नालायक अवलादींच्या गालफडात लावलेली ही जबरदस्त चपराक आहे. जज साहेब तर चकीतच झाले. जेथे आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारा जमाना असताना तेथे ही श्रावणबाळे कशी जन्माला आली? जजला निकाल देता येइना. त्यांनी आईवडिलानाच विचारले, आपली काय ईच्छा आहे? तेव्हा ते म्हणाले जज साहेब आपणच सांगा काय ते. तेव्हा जजने निकाल लहान भावाच्या बाजूने दिला. आईवडिलांना लहान भावाच्या ताब्यात दिले. तसा मोठा भाऊ धायमोकलून रडू लागला. आईवडिलांना दुरावणार याचे त्याला खुप दु:ख झाले. धन्य ते आईवडिल, ज्यांनी इतके उच्च संस्कार मुलांना दिले. या कलियुगात आईवडिलांना मारहाण करणारे जन्माला आले आहेत. आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारे आय.आय.टी. इजिनियर्स आहेत, सनदी अधिकारी व नोकरदार कर्मचारी आहेत, उच्चभ्रू डाॅक्टर्स आहेत. विशेष म्हणजे मुलांवर संस्कार घडवण्याची जबाबदारी असलेले शिक्षक शिक्षिका आहेत. कळस म्हणजे न्यायनिवाडा करणाऱ्या न्यायाधिशांचे आई वडिल वृध्दाश्रमात आहेत. या देशात शिकून परदेशात नोकरी करणारे महाभाग आहेत. जे देशसेवा करायची सोडून परकियांचे नोकरदार झाले आहेत. परत आईवडीलांना विसरले आहेत. परदेशात ज्यांची मुले आहेत अशा कित्येकांची अवस्था निपुत्रिकांसारखी झालेली आहे. शेतकरी आत्महत्या करतात पण आईवडिलांना सांभाळतात. पण या शिक्षित, उच्चशिक्षित अवलादी पार बिघडल्या आहेत. कृतघ्न झाल्या आहेत. आईवडिलांच्या अंत्यविधीला या अवलादी हजर देखिल राहत नाहीत. वरील घटना आजकालच्या बिघडलेल्या मुलांना बोध देणारी आहे. वृध्दाश्रमात झालेली वाढ ही भारतीय संस्कृतीची सर्वात मोठी अधोगती आहे


PostImage

Vaingangavarta19

April 11, 2025    Follow

PostImage

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहीली जयंती रणपीसे यांनी केली साजरी


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहीली जयंती रणपीसे यांनी केली साजरी 

 

पुणे:-
डॉ बाबासाहेब यांचा पहिला वाढदिवस पुण्यात प्रथम 14 एप्रिल 1928 रोजी रणपिसे यांनी साजरा केला. इतकेच नव्हे तर या जन्मदिवस समारंभाचे ते जणू शिल्पकारच ठरले. बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा त्यांनीच सुरू केली. खडकी पत्र विभाग दलित मंडळाचे अध्यक्ष असताना जयंतीचे औचित्य साधत त्यांनी बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून प्रभात फिल्म कंपनीच्या रथातून, उंटावरून प्रचंड मिरवणुका काढल्या होत्या.
यानंतर खडकी भागात प्रत्येक वस्तीत आंबेडकरांची जयंती साजरी व्हायला लागली. या सर्व वस्त्यांचे भाऊसाहेबांनी एकीकरण घडवून दलित मंडळाची स्थापना केली, या मंडळातर्फे आंबेडकरांची जयंती भव्य प्रमाणात साजरी केली. 24 ऑगस्ट 1958 रोजी रणपिसे यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळीने पुणे शहरात त्यांचा सत्कार समारंभ घडवून आणला होता. बाबासाहेबांची पहिली जयंती साजरी करत या उपक्रमाची सुरुवात करणाऱ्या भाऊसाहेबांनी विद्यार्थ्यांसोबतच अस्पृश्यवर्गाची जी बहुमोल सेवा केली त्याबद्दल संपूर्ण आंबेडकरी समाज त्यांचा सदैव ऋणी राहील यात शंका नाही.

 लेखक – मिलिंद मानकर सर.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींचे संग्राहक


PostImage

Vaingangavarta19

April 11, 2025    Follow

PostImage

गडचिरोली जिल्ह्यातील चार नामवंत व्यक्तींना "महाराष्ट्र रत्न" पुरस्काराने केले सन्मानित


गडचिरोली जिल्ह्यातील चार नामवंत व्यक्तींना "महाराष्ट्र रत्न" पुरस्काराने केले सन्मानित

 

प्रविण तिवाडे/कार्यकारी स़ंपादक वैनगंगा वार्ता १९

चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील चार नामवंत व्यक्तींना त्यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल "महाराष्ट्र रत्न" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे  दर्पण पत्रकार व संपादक संघटना, रेल्वे यात्रा मजदूर संघ आणि विश्व ह्यूमन राईट्स यांच्या संयुक्त विद्यमाने समृद्ध सीडीसीसी बँक, वरोरा नाका, नागपूर रोड, चंद्रपूर येथे भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्यातील विविध भागांतील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, कलाकार आणि सेवाभावी संस्था प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सन्मानित करण्यात आलेल्या व्यक्तीः

मोहम्मद आरिफ पटेल वरिष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्तेप्रल्हाद मेश्राम - कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानमेरी विल्सन - समाजसेवा क्षेत्रातील कार्यबाबू कुरेशी - सामाजिक कार्य व पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदान या चारही व्यक्तींनी गडचिरोली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले असून त्यांच्या कार्यामुळे जिल्ह्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर सकारात्मक बदल घडून आले आहेत. पुरस्कार प्रदान कार्यक्रमात त्यांचे विशेष सत्कार करण्यात आले आहेत 


PostImage

Vaingangavarta19

April 11, 2025    Follow

PostImage

निकृष्ट नाली बांधकामावर कारवाईची मागणी - माहिती अधिकार कार्यकर्त्याची गटविकास …


निकृष्ट नाली बांधकामावर कारवाईची मागणी - माहिती अधिकार कार्यकर्त्याची गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार

 

 

प्रवीण तिवाडे ) कार्यकारी स़पादक वैनगंगा वार्ता १९

अहेरी:- गडचिरोली जिल्ह्यातील आंबटपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत पंधरावा वित्त आयोगाच्या निधीतून भिका नंदा सिडाम ते गणपत तलांडे यांच्या घरापर्यंत करण्यात आलेल्या नाली बांधकामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ता विश्वदीप वाळके यांनी केला आहे. त्यांनी दिनांक ९ एप्रिल २०२५ रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मूलचेरा यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करत दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, सदर नाली बांधकाम अंदाजपत्रकानुसार न करता अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून, या कामात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यांनी सरपंच, ग्रामसेवक, कंत्राटदार आणि अभियंता यांची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

सदर तक्रारीची प्रत विभागीय आयुक्त नागपूर, जिल्हाधिकारी गडचिरोली तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही माहितीस्तव पाठवण्यात आली आहे.

या तक्रारीमुळे आंबटपल्ली ग्रामपंचायतीतील निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 11, 2025    Follow

PostImage

४ लाख २० हजाराची लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता, वरीष्ठ सहायक …


४ लाख २० हजाराची लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता, वरीष्ठ सहायक व परीचर या यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक


चंद्रपुर :- ठेकेदाराचे काढुन दिलेली बिले व बाकी असलेली बिले काढून देण्याकरिता ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद चंद्रपुर हर्ष यशोराम बोहरे, वरिष्ठ सहाय्यक सुशील मारोती गुंडावार, परिचर मतीन शेख यांना ४ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक.


तक्रारदार हे जिवती, जि. चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांचा ठेकेदारीचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी नुसार त्यांचे महाराष्ट्र शासनाच्या "जल जीवन मिशन" कार्यक्रम अंतर्गत तालुका जिवती आणि राजुरा येथील एकूण २३ गावांमध्ये पाणीपुरवठा संबंधी केलेल्या कामांपैकी १० गावांतील कामांचे बिले ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर येथे मंजुरीकरीता सादर केले होते, त्यापैकी ५ गावांचे कामांचे एकुण ४३ लाख रूपयांचे बिले तक्रारदार यांना मिळाले. सदर काढुन दिलेली बिले व बाकी असलेली बिले काढून देण्याकरिता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर येथील कार्यकारी अभियंता बोहरे यांनी स्वतः करीता ४,००,०००/-रूपयेची मागणी करून सदर रक्कम त्यांचे वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांचेकडे देण्यास सांगीतले. तसेच वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांनी स्वतः करीता २०,०००/- रूपयेची मागणी केली. असे दोघांचे मिळून एकुन ४,२०,०००/-रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची बोहरे, कार्यकारी अभियंता व वरिष्ठ सहायक. सुशील गुंडावार, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर यांना ४,२०,०००/-रु. लाच देण्याची ईच्छा नसल्याने बोहरे व सुशील गुंडावार, यांचे विरुध्द ला.प्र.वि. कार्यालय चंद्रपूर येथे तक्रार दिली.

प्राप्त तक्रारीवरून दिनांक ०७/०४/२०२५, ०९/०४/२०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान आलोसे. हर्ष बोहरे, कार्यकारी अभियंता व वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी तक्रारदार यांना ४,२०,०००/-रु. लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून दिनांक १०/०४/२०२५ रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान आलोसे क्र. २ सुशील गुंडावार यांनी लाच रक्कम ४,२०,०००/- रूपये पंचासमक्ष स्वतः स्विकारून त्यापैकी २०,०००/- रूपये स्वतः करीता वेगळे काढुन उर्वरीत ४,००,०००/-रूपये आलोसे क्र. ३) मतीन शेख यांना आलोसे क्र. १) हर्ष बोहरे यांना देण्यास सांगीतल्याने आलोसे क्र. ३) मो. मतीन शेख यांनी आलोसे क्र. २) श्री. सुशील गुंडावार यांचे सांगणेवरून आलोसे क्र. १) श्री. हर्ष बोहरे यांचे घरी नेउन दिली. सदरची लाचरक्कम स्वीकानारे आलोसे क्र. १ व २ यांना ताब्यात घेण्यात आले असुन आलोसे क्र. १ यांना लाचरक्कम नेउन देणारे आलोसे क्र. ३ यांना ताब्यात घेण्यात आले असून आज दिनांक ११/०४/२०२५ रोजी पो.स्टे. रामनगर, जि. चंद्रपूर येथे आरोपी लोकसेवक यांचे विरूध्द गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु आहे.

सदरची कार्यवाही ही डॉ. श्री. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर, सचिन कदम कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर, संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, ला.प्र.वि. चंद्रपूर, तसेच कार्यालयीन स्टॉफ पो. नि. जितेंद्र गुरनूले, पो. हवा. हिवराज नेवारे, नरेशकुमार नन्नावरे, रोशन चांदेकर, पो.अं. अमोल सिडाम, प्रदीप ताडाम, वैभव गाडगे, म.पो.अं. पुष्पा काचोळे, चा.पो.अं. सतिश सिडाम, संदिप कौरासे यांनी यशस्वी पार पाडली आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 11, 2025    Follow

PostImage

स्री शिक्षणाचे जनक: महात्मा जोतीराव फुले


 

स्री शिक्षणाचे जनक: महात्मा जोतीराव फुले 

 

कृष्णकुमार आंनदी -गोविंदा निकोडे गुरुजी गडचिरोली 

(11 एप्रिल: महात्मा जोतीराव फुले जयंती विशेष.)

गडचिरोली:-
        महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म दि.११ एप्रिल १८२७ रोजी झाला. हे एक भारतीय समाजसुधारक, समाजप्रबोधक, विचारवंत, समाजसेवक, लेखक, तत्त्वज्ञ आणि क्रांतिकारी कार्यकर्ते होते. त्यांना महात्मा फुले आणि जोतिबा फुले म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. सप्टेंबर 1873मध्ये त्यांनी महाराष्ट्रात सत्यशोधक समाज नावाची संघटना स्थापन केली. त्यांनी स्त्रियांच्या आणि मागासलेल्या आणि अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी अनेक कामे केली. समाजातील सर्व घटकांना शिक्षण देण्याचे ते खंबीर पुरस्कर्ते होते. ते भारतीय समाजात जात-आधारित विभाजन आणि भेदभावाच्या विरोधात होते.
           स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणे, बालविवाहाला विरोध करणे, विधवा विवाहाला पाठिंबा देणे हे त्यांचे मूळ उद्दिष्ट होते. म.फुले यांना समाजाला कुप्रथा, अंधश्रद्धेच्या पाशातून मुक्त करायचे होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांना शिक्षण देण्यात, महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यात घालवले. १९व्या शतकात महिलांना शिक्षण दिले जात नव्हते. फुले यांना स्त्री-पुरुष भेदभावापासून वाचवायचे होते. त्यांनी पुण्यात मुलींसाठी भारतातील पहिली शाळा बांधली. त्यावेळच्या स्त्रियांच्या दयनीय अवस्थेमुळे फुले खूप व्यथित आणि दु:खी झाले होते, म्हणूनच त्यांनी समाजात क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचा दृढ निश्चय केला. त्यांनी स्वतः त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या.
           सुरुवातीचे जीवन: महात्मा ज्योतिबा फुले एका वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचे कुटुंब अनेक पिढ्यांपूर्वी साताऱ्याहून पुण्यात आले आणि फुलांचे गजरे बनवू लागले. त्यामुळे माळीच्या कामात गुंतलेली ही माणसे 'फुले' म्हणून ओळखली जायची. ज्योतिबांनी काही काळापूर्वीपर्यंत मराठीतून शिक्षण घेतले, ते सोडून दिले आणि नंतर वयाच्या २१व्या वर्षी इंग्रजीमध्ये सातवीचे शिक्षण पूर्ण केले. सन १८४०मध्ये त्यांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी झाला, त्यानंतर त्या स्वत: प्रसिद्ध समाजसेविका झाल्या. पती-पत्नी दोघांनीही दलित आणि स्त्री शिक्षण क्षेत्रात एकत्र काम केले. ते एक कष्टकरी आणि सामाजिक कार्यकर्ता होते.
           कार्यक्षेत्र: त्यांनी विधवा आणि महिलांच्या कल्याणासाठी खूप काम केले, त्यासोबतच त्यांनी शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठीही खूप प्रयत्न केले. ज्योतिबांना संतांची चरित्रे वाचण्याची खूप आवड होती. जेव्हा देवासमोर सर्व स्त्री-पुरुष समान असतात, तेव्हा उच्च-नीच असा भेद का असावा, हे त्यांना कळून चुकले होते. स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी फुले यांनी सन १८४८मध्ये शाळा उघडली. या कामासाठी देशातील पहिली शाळा होती. मुलींना शिकवण्यासाठी त्यांना शिक्षक मिळाला नाही, म्हणून त्यांनी स्वतः काही दिवस हे काम करून पत्नी सावित्री फुले यांना पात्र बनवले. काही लोकांनी सुरुवातीपासूनच त्यांच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, पण फुले पुढे सरकत असताना त्यांनी वडिलांवर दबाव आणून पती-पत्नीला घराबाहेर काढले, यामुळे त्यांचे काम काही काळ थांबले, पण लवकरच त्यांनी मुलींसाठी एकामागून एक तीन शाळा उघडल्या.
          महात्मा पदवी: गरीब आणि दुर्बलांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्योतिबांनी सन १८७३मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांची समाजसेवा पाहून सन १८८८मध्ये मुंबईत एका विशाल सभेत त्यांना "महात्मा" ही पदवी देण्यात आली. ज्योतिबांनी ब्राह्मण-पुरोहिताविना विवाह विधी सुरू केला आणि त्याला मुंबई उच्च न्यायालयानेही मान्यता दिली. ते बालविवाहाच्या विरोधात होते आणि विधवा पुनर्विवाहाचे समर्थक होते. आपल्या हयातीत त्यांनी गुलामगिरी, तृतीय रत्न, छत्रपती शिवाजी, राजा भोसलेंचा पवाडा, शेतकऱ्यांचा आसूड, अस्पृश्यांचा टाहो अशी अनेक पुस्तकेही लिहिली. महात्मा ज्योतिबा आणि त्यांच्या संघटनेच्या संघर्षामुळे सरकारने "कृषी कायदा" मंजूर केला. धर्म, समाज आणि परंपरा यांचे सत्य समोर आणण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली.
           सन 1८८३मध्ये स्त्रियांना शिक्षण देण्याच्या महान कार्यासाठी, त्यांना तत्कालीन ब्रिटिश भारतीय सरकारने "स्त्री शिक्षणाचे जनक" म्हणून गौरवले. दि.२८ नोव्हेंबर १८९० रोजी वयाच्या ६३व्या वर्षी पुणे येथे त्यांचे दुःखद निधन झाले.
// पावन जयंतीपर्वावर म. राष्ट्रपितामह जोतीराव फुलेजींना शतदा विनम्र अभिवादन //

              


PostImage

Vaingangavarta19

April 11, 2025    Follow

PostImage

चारचाकीच्या धडकेत सायकलस्वार दूध विक्रेता जागीच ठार


चारचाकीच्या धडकेत सायकलस्वार दूध विक्रेता जागीच ठार

 

गडचिरोली-चामोर्शी महामार्गावरील वाकळी फाट्यावर अपघात

 

प्रवीण तिवाडे 

गडचिरोली : गडचिरोली ते चामोर्शी महामार्गावरील वाकडी फाट्याजवळ भरधाव वेगाने चामोर्शीकडे जाणाऱ्या कारने गडचिरोली येथे दूध विकायला जात असलेल्या सायकलस्वाराला जोरदार धडक दिली. यात सायकलस्वार जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवार (दि.11) आज सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, सकाळी गडचिरोलीकडून चामोर्शीकडे जात असलेल्या मारुती कंपनीच्या वॅगनार (क्रमांक सीजी 08, एयू 8932) कारने गडचिरोली येथे दूध विकायला जात असलेल्या वाकडी येथील विनायक भोयर यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. यात भोयर यांना जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर कार ही छत्तीसगड राज्यातील असून चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.अधीक तपास गडचिरोली पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक करीत आहेत 


PostImage

Vaingangavarta19

April 11, 2025    Follow

PostImage

पोलीसच जर ड्रग्स चा व्यवसास करीत असतील न्याय तरी मागायचे …


पोलीसच जर ड्रग्स चा व्यवसास करीत असतील न्याय तरी मागायचे कुठे?

भाईंदर : एकीकडे देशात ड्रग्स विरोधात कारवाई करून समूळ नष्ट करण्यासाठी शासन काम असताना कुंपनच शेत खात असल्याचा प्रकार मुंबई महसूल गुप्तचर संचनालय यांनी कारवाई केल्यानंतर समोर आला आहे. मिरा- भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालयात नयानगर पोलीस ठाण्यात काम करणार्‍या एका पोलीस हवालदाराच्या लातूर जिल्ह्यातील मूळ गावी शेतात पत्राशेडमध्ये ड्रग्स फॅक्टरी उभारण्यात आली होती. त्यानंतर मुंबई येथे अंमली पदार्थ दाखल गुन्ह्यात तपास करत असताना एका पोलीस कर्मचार्‍याला अटक करण्यात आली आहे. तर दुसर्‍या पोलिसाचा शोध सुरू आहे. तर यात काही वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांचा सहभाग असल्याचा दाट संशय असल्याचा व्यक्त केला जात आहे.( Bhayander News: Drug factory in police officer’s field)

मुंबई येथील महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) पुणे येथील त्यांच्या प्रादेशिक युनिट्सच्या मदतीने लातूर जिल्ह्यात ड्रग्स बनविण्याचा कारखान्यासह मुद्देमाल जप्त करत कारवाई केली आहे. त्यात पोलिसांनी कारखान्यात काम करणार्‍या तिघांना आणि मिरारोड आणि मुंबई परिसरात ड्रग्स पुरवठा करून विक्री करणार्‍या मुद्दू नावाच्या व्यक्तीला हटकेश येथून मंगळवारी ताब्यात घेतले आहे. तर नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेत काम करणारे पोलीस हवालदार प्रमोद केंद्रे हे आपल्या मूळ गावी रोहिना येथून मागच्या १५ दिवसांपासून वैद्यकीय रजेवर होते. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

अपघात करून पळण्याचा प्रयत्न फसला

पथकाने छापा टाकून संशयितास पकडले आणि शेतात छापा टाकला. त्यात येथील एका शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये ड्रग्ज बनविण्यासाठीचे साहित्य आढळले. त्यानंतर या पथकाने एकास ताब्यात घेतले. त्यानंतर कारमधून लातूरच्या दिशेने ते निघाले होते. लातूररोड येथील एका हॉटेलजवळ आल्यानंतर कारमध्ये पाठीमागे बसलेल्या संशयित आरोपीने अचानक चालकाला मारहाण करण्यास सुरूवात केली. कारचे स्टेअरिंग वळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कारमधील पथक प्रमुखांच्या प्रसंगावधानामुळे त्यास पळून जाता आले नाही. मात्र, भरधाव वेगातील कारने एका दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीचे नुकसान झाले आणि महसूल गुप्तचर संचनालयाच्या अधिकार्‍यांना थोडीफार किरकोळ जखमा झाल्या. त्यानंतर याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय कार्यालय चाकूरचे सहाय्यक पोलीस अधिक्षक, बी. चंद्रकांथ रेड्डी यांनी माहिती दिली आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 9, 2025    Follow

PostImage

हिश्याच्या वाटणी वरुण स्वताच्या भावाला जीवानीशी केले ठार


हिश्याच्या वाटणी वरुण स्वताच्या भावाला जीवानीशी केले ठार 

 

 

भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बाळद खुर्द येथे घराचे वाटणीत जास्त हिस्सा मागतो या कारणावरून धक्काबुक्की करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.  हातात लाकडी दांडके घेऊन तरुणाच्या चेहऱ्यावर व छातीवर मारहाण करून त्याच जीवे ठार मारल्याची घटना दि.८ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी भडगाव पोलिसांनी तातडीने धाव घेऊन संशयित बाप आणि मयताच्या भावाला अटक याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी- सुनिल लोटन पाटील वय (५४) धंदा शेती व पोलीस पाटील, रा. बाळद खु. ता भडगांव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,बाळु राजेंद्र शिंदे (नाईक) (वय २६)रा. बाळद खु ता. भडगांव जि. जळगांव हा घराचे वाटणीत जास्त हिस्सा मागतो याकारणावरुन बाळु राजेंद्र शिंदे (नाईक) यास धक्काबुक्की करुन लाथाबुक्कयांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच हातात लाकडी दांडके घेवून बाळु राजेंद्र शिंदे (नाईक) याच्या चेहऱ्यावर व छातीवर मारहाण करुन त्यास जीवे ठार मारले.

भडगाव पोलीस स्टेशनला बाप व भाऊ १)भारत राजेंद्र शिंदे, वय २२ वर्ष २) राजेंद्र रामचंद्र शिंदे, वय ४८ वर्ष, दोन्ही रा. बाळद खु ता. भडगांव जि.जळगांव. यांच्याविरुद्ध गु.र.न १२३/२०२५ बी.एन.एस.१०३(१), ११५ (२), ३५२,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश म्हस्के व पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र चव्हाण हे करीत आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 9, 2025    Follow

PostImage

डीपी खाली कचरा कुंडी खाली कचरा कुंडी असल्यागत नागरिकांनी कचरा …


डीपी खाली कचरा कुंडी खाली कचरा कुंडी असल्यागत नागरिकांनी कचरा टाकून जाळल्यामुळे इलेक्ट्रिक वायर जळाले ,  सहा तास विद्युत पुरवठा ख़डीत

 

 


आष्टी (प्रतिनिधी)## येथील वार्ड क्रं.१ मध्ये बाजारवडी जवळ असलेल्या डीपी च्या खाली नागरिकांनी कचराकुंडी असल्यासारखे  कचरा टाकून जाळला त्यामुळे इलेक्ट्रिक वायर जळाले . आणि बराच वेळ विद्युत पुरवठा खंडित झाला त्यामुळे नागरिकांना गर्मीमुळे चांगलाच त्रास सहन करावा लागला. 
येथील बाजार वाडीत असलेल्या इलेक्ट्रिक डिपी मधून या वॉर्डातील नागरिकांना विद्युत पुरवठा केला जातो. या डीपी च्या खाली नागरीक घरातील केरकचरा आणून टाकतात . बराच कचऱ्याचा ढीग जमा झाल्याने तो जाळण्यात आला त्यामुळे डीपी मधून आलेले वायर जळुन खाक झाले. आणि विद्युत पुरवठा खंडित झाला. नागरिकांना बराच काळ गर्मी मध्ये बसून उष्णतेचा त्रास सहन करावा लागला. 
येथील वॉर्डातील काही नागरीक डीपी च्या खाली कचरा जमा करीत आहे. ग्राम पंचायती मार्फत  त्या ठिकाणी कचरा कुंडी ठेवण्याची व्यवस्था करावी . याबाबत ग्राम पंचायत चे सरपंच यांना विचारणा केली असता येथील नागरिकांना वारंवार डीपी च्या खाली कचरा न टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या.तरी पण नागरीक त्याच ठिकाणी कचरा टाकत आहे. याबाबत पोलिसांना सूचना देऊन कचरा टाकण्याऱ्यावर कारवाही करण्याची मागणी केली आहे.