Chimur News ; येरखेडा येथे आमदार कीर्तिकुमार भांगडीया यांनी घेतले राष्ट्रसंतांचे दर्शन
चिमूर प्रतिनिधी :-
आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांनी चिमूर तालुक्यातील श्री गुरुदेव सेवा मंडळ, येरखेडा येथे वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ५५ वा पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी आमदार बंटी भांगडियानी सर्वप्रथम श्री हनुमानजी व राष्ट्रसंतांच्या अधिष्ठानाचे मनोभावे दर्शन घेतले आणि सर्व संत महात्म्यांना विनम्र अभिवादन करून उपस्थित गुरुदेव भक्तांना विविध विषयांवर संबोधित केले. दरम्यान, समस्त येरखेडा ग्रामवासीयांच्या वतीने आमदार बंटीभाऊंचे आगमनाप्रसंगी उपस्थित माता-भगिनींनी औक्षण करत स्वागत केले.
यावेळी आजीवन प्रचारक गुरुकुंज आश्रम मोझरी ह.भ.प. अशोकरावजी चरडे, ग्रामगीताचार्य हेमंतजी मेश्राम, भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजपा तालुका महामंत्री प्रशांत चिडे, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्रीरंग (बालू) पिसे, माजी भाजयुमो तालुकाध्यक्ष किशोर मुंगले, भाजपा जि.प. सर्कल प्रमुख निलेश गभणे, माजी सभापती/नगरसेवक न.प. चिमूर सतीश जाधव, भाजपा नेते विनोद खेडकर, किशोर नेरलवार, सरपंच ग्रा.पं. येरखेडा संजय गेडाम, उपसरपंच्या ग्रा.पं. येरखेडा वर्षाताई येलेकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष प्रदीप देवतळे, पोलीस पाटील येरखेडा अमृताताई देवतळे, सचिव ग्रा.पं. येरखेडा ढोपरे सर, माजी संचालक - खापरी सेवा सह. संस्था कवडूजी कुबडे, पुंडलिक देवतळे, गोवर्धन नानाजी देवतळे, भालचंद्र नरुले, नीलकंठ देवतळे, उद्धवजी कुबडे, योगिताताई देवतळे, दामुजी कुबडे, मोहन देवतळे, परशुराम नन्नावरे, पुंडलिक नन्नावरे, विनोद खवसे, हर्षल डुकरे व अन्य मान्यवर आणि गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.