नागपूर : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याच्या तक्रार अर्जावर गैरअर्जदारावर गुन्हा दाखल न करणे आणि प्रकरण मिटवून देण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकाने २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम स्विकारताना सहायक पोलीस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई दुपारी दोन वाजताच्या सुमारास कोराडी पोलीस ठाण्यात करण्यात आली. परमानंद दादाराव कात्रे असे लाचखोर पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कवठा गावातील जमिनीचा खरेदी-विक्रीचा व्यवहार सुनंदा ठाकरे यांनी केला होता. त्या जमिनीचा संयुक्त मालक असलेल्या गैरअर्जदाराने जमिनीच्या विक्रीपत्रात फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या संदर्भात सुनंदा ठाकरे यांनी कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. तो तक्रार अर्ज कोराडी ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक प्रेमानंद कात्रे यांच्याकडे आला होता. त्यांनी त्यांच्या लेखनिकाला अर्ज निकाली काढण्यासाठी गैरअर्जदाराला पोलीस ठाण्यात बोलविण्यास सांगितले होते.
आठवडाभरापूर्वी तो युवक पोलीस ठाण्यात आला. सहायक निरीक्षक (एपीआय) प्रेमानंद कात्रे यांनी ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल न करणे आणि तपासात सहकार्य करणे तसेच गुन्हा दाखल करण्याऐजवी तक्रार करणाऱ्या सुनंदा ठाकरे यांचीच समजूत घालून तक्रार अर्ज मागे घेण्यास लावण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्या बदल्यात दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी एपीआय प्रेमानंद कात्रे यांनी केली. त्या युवकाने लाचेची रक्कम देण्यास नकार दिला. तसेच प्रकरण आपसातील असून आम्ही गावातच सरपंच आणि पोलीस पाटील यांच्या मदतीने सोडवितो, असे सांगितले. त्यामुळे एपीआय प्रेमानंद हे त्या युवकावर चिडले. त्याला गुन्हा दाखल करुन लगेच अटक करण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली.
कोराडी पोलीस ठाण्यातच अटक
सहायक पोलीस निरीक्षक प्रेमानंद कात्रे हे कोराडी पोलीस ठाण्यातच कार्यरत आहेत. त्यांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी दोन लाखांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदार युवकाने एसीबी कार्यालयात तक्रार केली. बुधवारी दुपारी कोराडी पोलीस ठाण्यात सापळा रचण्यात आला. तक्रारदार युवकाकडून एपीआय प्रेमानंद कात्रे यांनी दोन लाख रुपये स्विकारताच एसीबीने त्यांना अटक केली. लाचेची रक्कम जप्त करुन कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. एसीबीने एपीआय कात्रे यांना कोराडी पोलीस ठाण्याच्याच कोठडीत डांबले. त्यांच्या घरी झडीत घेऊन काही कागदपत्रे जप्त केल्याची माहिती आहे.
गडचिरोली : दारुच्या आहारी गेलेल्या पतीने विद्युत खांबावर आकडा टाकून घरात झोपलेल्या होमगार्ड पत्नीला विद्युत शॉक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पत्नी वाचली. चामोर्शी तालुक्याच्या नागपूर (चक) या गावात ५ फेब्रुवारीला हा थरार घडला. याप्रकरणी चामोर्शी ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला असून पती फरार आहे. आशा माणिक सोयाम (४०) असे त्या होमगार्ड महिलेचे नाव आहे. त्या माहेरी नागपूर (चक) येथे वास्तव्यास आहेत.
पती संतोष मारोती शेडमाके (४५,रा. धानापूर ता. गोंडपिपरी जि.चंद्रपूर) हा मजुरी काम करतो. गेल्या काही दिवसांपासून तो दारुच्या आहारी गेलेला आहे. यातून तो आशा सोयाम यांच्याशी सतत वाद घालायचा.
दरम्यान, ५ फेब्रुवारी रोजी त्या घरी झोपलेल्या होत्या. पहाटे दोन वाजता संतोष शेडमाके हा घराच्या छतावर चढला. त्याने विद्युत खांबावरुन आकडा टाकून वीज घेतली व लाकडी काडीच्या सहाय्याने कवेलू बाजूला सारुन आशा यांना शॉक दिला. त्यांना जाग आल्यावर त्यांनी पाहिले असता कवेलून संतोष डोकावल्याचे दिसले. यानंतर त्यांनी आरडाओरड केली असता त्याने धूम ठोकली. आरोपी पती संतोष हा सतत दारूच्या नशेत असतो. यातूनच दोघात खटके उडायचे. यापूर्वीही त्याने अशाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता.
याबाबत आशा सोयाम यांनी फिर्याद दिली. त्यावरुन चामोर्शी ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) १०९, ३५१ (२) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपी फरार असून तपास उपनिरीक्षक सुमेध बनसोडे करत आहेत.
यापूर्वीही केला प्रयत्न
२९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष शेडमाके याने घराच्या समोरील चाफ्याच्या झाडाला डिझेल टाकून आग लावली, यावेळी आशा सोयाम यांनी आरडाओरड केल्यावर तो पळून गेला. याबाबत त्यांनी तेव्हाच पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आशा सोयाम यांच्या पतीचे २००५ मध्ये निधन झाले, तर संतोष शेडमाके याने पत्नीशी फारकत घेतली. २०१५ पासून या दोघांनी पुनर्विवाह केला व एकत्रित राहू लागले. मात्र, नंतर संतोषला व्यसन जडले व त्यातून दोघांत खटके उडू लागले.
गडचिरोली : जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील मांगली गावातील गावठी कोंबड्यांना बर्ड फ्लू या आजाराची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. बर्ड फ्लूचा जिल्ह्यातही शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तीन वर्षापूर्वी गडचिरोली शहरात बर्ड फ्लू या आजाराने शिरकाव केला होता. त्यावेळी आरोग्य यंत्रणा व पशुसंवर्धन विभागाची चांगलीच धावपळ झाली होती. गडचिरोली शहरातील अनेकांच्या घरी असलेले पाळीव पक्षी मारून टाकण्यात आले होते. तीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातूनच कोंबड्यांचा पुरवठा
गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा या तालुक्यांमध्ये ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथील फार्मवरून बॉयलर व कॉकलेर कोंबड्यांचा पुरवठा होतो. मांगली हे गाव ब्रह्मपुरी तालुक्यातच आहे. या रोगाचा प्रसार गडचिरोली जिल्ह्यातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लागण झालेल्या पक्ष्यांमध्ये दिसतात ही लक्षणे
अंडी उत्पादन कमी होणे, शिंकणे व खोकणे, डोळ्यातून पाणी येणे, डोक्यावर सूज येणे, पंख नसलेला भाग निळसर पडणे, भूक मंदावणे, उदासीनता आदी लक्षणे लागण झालेल्या पक्ष्याला दिसून येतात. तत्काळ पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
असा होतो संसर्ग
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, बर्ड फ्लू हा कुक्कुट पक्ष्यांना विषाणूमुळे होणारा रोग असून, संसर्गजन्य आहे. यात सर्वात संसर्गजन्य 'स्ट्रेन एच ५ एन १' आहे. बर्ड फ्लू विषाणूचा प्रसार एका कुक्कुट पक्ष्यातून दुसऱ्या कुक्कुट पक्ष्यांमध्ये मुख्यतः हवेतून पसरतो.
बर्ड फ्लूबाबत पशुधन विकास अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंत्रणा अलर्ट झाली आहे. नागरिकांनी सुध्दा सहकार्य करावे.
अजय ठवरे,जिल्हा पशुधन विकास अधिकारी
गडचिरोली, ब्युरो. गडचिरोलीवनविभागात मागील अनेक महिन्यांपासून दहशत माजविणारा जी-18 नावाचा वाघ जखमी अवस्थेत असल्याची माहिती मिळताच, शुक्रवारी (दि.7) सकाळच्या सुमारास वनविभाग व आरआरटी पथकाने घटनास्थळ गाठित वाघाचा सुरक्षित रेस्कू केला. जखमी अवस्थेतील वाघाला उपचारार्थ चंद्रपूर येथे रवाना करण्यात आले आहे. सदर यशस्वी रेस्कू आंबेशिवणी शेतशिवारात करण्यात आला. अमिर्झा वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या आंबेशविणी शेतशिवारात जी-18 आष जखमी अवस्थेत फिरत असल्याचा माहिती वनकर्मचाऱ्यांनी गुरुवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार या जखमी वाघाच्या हालचालीवर वनकर्मचाऱ्यांनी करडी नजर ठेवली होती. दरम्यान शुक्रवारी सकाळच्या सुमारास वनविभाग व आरआरटी पथकाने संबंधित घटनास्थळ गाठित जखमी वाघास सुरक्षितरित्या पकडून पिंजऱ्यात कैद केले. जखमी वाघाची पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याद्वारे तपासणी करुन पुढील उपचारार्थ चंद्रपूरला रवाना करण्यात आले. वाघ जखमी होण्याचे निश्चित कारण वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट होऊ शकले नाही. पशुवैद्यकीय अधिकारी टिटीटी चंद्रपूर यांच्या अंतिम अहवालानंतरच वाघाच्या जखमीचे कारण स्पष्ट होणार असल्याचीमाहिती वनाधिकाऱ्यांनी दिली आहे. सदर कारवाई उपवनसंरक्षक शैलेश मीणा, सहाय्यक वनसंरक्षक अंबरलाल मडावी यांच्या मार्गदर्शनात चातगाव वनपरिक्षेत्राधिकारी सुनील सोनटक्के यांचेसह आरआरटी पथकाने पार पाडली.
गडचिरोली वनविभागात घेतले चौघांचे बळी?
आंबेशिवणी शेत परिसरात जखमी अवस्थेत रेस्क्यू करण्यात आलेल्या जी-18 या वाधाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केले असता, या जंगल परिसरात 3 ते 4 नागरीकांचे बळी घेणारा हाच तो वाघ असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. यासंदर्भात उपवनसंरक्षक शर्मा यांना विचारणा केली असता, नागरीकांचे बळी घेणारा तो हाच वाघ असावा अशी शंका आहे. मात्र खात्रिशीर सांगता येणार नसल्याचे सांगितले.
अलोणी शेतशिवारात डीबी पथकाची कारवाई
गडचिरोली, ब्युरो, गडचिरोली पोलीस ठाणे हद्दीतील अलोणी गावातील शेतशिवारात, मोहफुलाची दारूची भट्टी बेकायदेशीरपणे सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळताच डीबी पथकाने गुरुवारी (दि.6) धाड टाकून दारुभट्टी उच्वस्त करीत 36 हजार 500 रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी अरविंद यशवंत मडावी रा. अलोणी याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलोणी गावातील शेत शिवारालगत असलेल्या नाल्याजवळ मोहफुलाची दारु काढल्या जात असल्याची माहिती गडचिरोली शहर पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या डीबी पथकाने सदर शेतशिवारात धडक दिली. यावेळी एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत निदर्शनास आली. अधिक तपासणी केली असता याच आवारात दारूची भट्टी आढळून आली. सदर दारुभट्टी उध्वस्त करीत पोलिसांनी घटनास्थळावरुन सात ड्रममध्ये भरलेला 350 किलो अंदाजे किंमत 24 हजार रुपये किंमतीचा मोहफुल सडवा, 12 हजार रुपये किमतीची 40 लिटर मोहाची दारू, असा एकूण 36 हजार 500 रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी अरविंद मडावी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे धनंजय चौधरी, अविनाश लंजे, तुषार खोब्रागडे, राजेंद्र पुरी, वृषाली चव्हाण यांनी पार पाडली.
गडचिरोली, ब्युरो. भरधाव वेगात असलेल्या बोलेरो वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील शिक्षक ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि.6) रात्री 8 वाजताच्या सुमारास गडचिरोली-चामोर्शी मार्गावर असलेल्या टोल नाक्याजवळ घडली. सदानंद मष्णाजी अब्दागिरे (41) मुळ गाव जि. नांदेड (हल्ली मु. हनुमान वार्ड, चामोर्शी) असे मृतक शिक्षकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार मृतक शिक्षक सदानंद अब्दागिरे हे चंद्रपूर जिल्ह्यातील गेवरा बु. येथील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी रात्रीच्या सुमारास एम. एच. 26 ए. एल. 0710 क्रमांकाच्या
दुचाकीने गडचिरोली येथून चामोर्शीकडे जात होते. दरम्यान गडचिरोली चामोशी मार्गावरील टोल नाक्याजवळ भरधाव वेगात येत असलेल्या एम. एच. 40 एसी 8140 बोलेरोने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती प्राप्त होताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठित पंचनामा केला. अपघात प्रकरणी बोलेरो वाहन चालक राजकी रोशन शेख (37) रा. गणेश कॉलनी, गडचिरोली याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बंडू मारबोनवार करीत आहेत.
दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रोडच्या कडेला दगडावर धडकली दुचाकी , दुचाकीस्वार जागीच ठार
पुसदः शहरासह तालुक्यात अपघाताच्या घटनेत लक्षणीय वाढ होत आहे. दर एक दिवसाच्या अंतराने कुठे ना कुठे अपघात घटना घडत आहे. दोन दिवसा अगोदर काटखेडा व कासोळा येथे भीषण अपघात घडले या घटनेला ४८ तास उलटले असताना आज निंबी जवळील भवानी टेकडी जवळ एका अपघातात हिवाळी (त) येथील दुचाकीस्वाराचा जागेवर दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव मनोज बळीराम आडे वय ३६ वर्ष रा. हिवळनी (त) ता. पुसद जि. यवतमाळ असे आहे.याबाबत पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की, आज दि.६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी अंदाजे ९:०० वाजण्सुयाच्या सुमारास हिवळणी येथील रहिवासी असलेले माजी सरपंच मनोज बळीराम आडे वय ३६वर्ष हा मुलांच्या शिक्षणासाठी पुसद येथे राहत होता. तो सकाळी पुसद वरून हिवाळी येथे आपल्या होंडा यूनिकॉर्न दुचाकी क्रमांक एम एच २९सिजी १७७०गावी जात असताना शहरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या निंबी जवळील भवानी माता मंदिर टेकडीच्या समोरच्या वळणाच्या रस्त्यावर या दुचाकीस्वराचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट रस्त्याच्या खाली गेली. व दुचाकीस्वार दगडावर जाऊन आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती स्थानिक प्रथम दर्शनीनी वसंत नगर पोलीस स्टेशनला कळवली असता पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल विष्णू नालमवार व पोलीस हेड कॉन्स्टेबल ठाकूर यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. असता या अपघातात मृत्युमखी पडलेल्या इसमाची ओळख पटवली व मृतदेह शासकीय उपजिल्हा पुसद येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. जर सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांच्यामार्फत रस्त्याच्या सुरक्षा भिंत किंवा कठडे लावले असते, तर हा अपघात एवढा भीषण झाला नसता. हे सुद्धा तेवढेच सत्य. घटनेचा उर्वरित तपास वसंत नगर पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
जन्मदातेनेच विष देऊन आपल्या मुलाची केली हत्या
गुजरात : गुजरातमधील अहमदाबादमध्ये हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका व्यक्तीने आपल्या १० वर्षांच्या मुलाला पाण्यात विष मिसळून पाजलं. या घटनेत मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलाच्या हत्येनंतर ४७ वर्षीय आरोपीने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. आरोपी पित्याने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला. मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.
अहमदाबादमध्ये एका पित्याने १० वर्षांच्या मुलाला सोडियम नायट्रेट नावाचे विषारी द्रव्य पाजून त्याची हत्या केली. अहमदाबादच्या बापूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. कल्पेश गोहेल याने आपल्या मुलाची हत्या केल्यानंतर स्वतः आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला त्याने तसे केले नाही.
मंगळवारी झालेल्या घटनेनंतर गोहेलला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हे कृत्य करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपीच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार, वडिलांनी उलट्या थांबवण्यासाठी मुलगा ओम आणि १५ वर्षांची जियाला औषध प्यायला दिले होते. यानंतर वडिलांनी सोडियम नायट्रेटयुक्त पाणी ओमला प्यायला दिले.
आरोपीने आपल्या मुलांना विष देऊन आत्महत्या करण्याचा विचार केला होता, परंतु आपल्या मुलाची बिघडलेली प्रकृती पाहून तो घाबरला आणि घरातून पळून गेला. पाणी प्यायल्यानंतर लगेचच मुलाला उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर कुटुंबियांनी मुलाला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यानंतर मुलाला मृत घोषित केले. कल्पेश गोहेल हा त्याची दोन मुले, पत्नी आणि आई-वडिलांसह राहत होता. कल्पेश गोहेलने आधी आपल्या दोन मुलांना औषध दिले आणि नंतर पत्नी बाहेर असताना त्याने आपल्या मुलाला विषयुक्त पाणी प्यायला लावले.
मार्कंडा यात्रेत भाविकांच्या गरजा आणि मागण्यांचा विचार करून नियोजनाचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश
गडचिरोली, दि. 6: महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पिण्याचे पाणी, निवास, विशेषत: स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षेसंबंधी सर्व आवश्यक उपाययोजना भाविकांच्या गरजा आणि मागण्यांचा विचार करून वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
मार्कंडेश्वर तीर्थक्षेत्र व चपराळा देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्त आयोजित होणाऱ्या यात्रेच्या पूर्वनियोजना आढावा जिल्हाधिकारी यांनी आज मार्कंडा येथील धर्मशाळेत घेतला. बैठकीला उपविभागीय अधिकारी रणजित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी प्रसेनजीत प्रधान, उपविभागीय पोलिस अधिकारी जगताप, तहसिलदार प्रशांत गोरूडे, गटविकास अधिकारी सागर पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे तसेच सरपंच आणि मार्कंडा व चपराळा येथील मंदिर व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यात्रेच्या दरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेसह सर्व मूलभूत सोयी सुविधा सज्ज ठेवण्यावर भर देण्यात आला. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश दिले. यात्रेच्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त, नियंत्रण कक्ष, तसेच धर्मशाळांची दुरुस्ती करण्यात यावी. तसेच वैद्यकीय सुविधांसाठी औषधांचा पुरेसा साठा, वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती, तसेच रुग्णवाहिका आणि अग्निशमन यंत्रणा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय, भाविकांसाठी अधिकच्या बसेसची व्यवस्था, अखंडित वीजपुरवठा, पथदिवे, मोबाइल शौचालयांची व्यवस्था आणि स्वच्छतेवर विशेष भर द्यावा असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
स्तनदा माता व वयोवृद्धांसाठी विशेष सोय
महाशिवरात्री यात्रेला हजारो भाविक येतात, त्यामुळे दर्शनासाठी लागणाऱ्या दीर्घ रांगांमध्ये स्तनदा माता व वयोवृद्धांसाठी विशेष रांगेची व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसेच उन्हापासून बचावासाठी शेड आणि जागोजागी पाणपोई उभारण्याचे नियोजन करण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
दर्शनाची वेळ वाढविण्याची मागणी
बैठकीत मार्कंडेश्वर मंदिरात यात्रेदरम्यान दर्शनाची सकाळी ६ ते रात्री १० ही वेळ वाढवून २४ तास सुरू ठेवावी अशी मागणी भाविकांकडून करण्यात आली. यावर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर यंत्रणांसोबत चर्चा करून वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सर्व विभागांना समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश
सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून यात्रेच्या तयारीत कोणताही अडथळा येऊ नये याची काळजी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बैठकीला महसूल, पोलिस, वन, सार्वजनिक बांधकाम, नगरपंचायत, दूरसंचार, अन्न व औषध प्रशासन, ग्रामपंचायत, परिवहन आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अतीवेगात तिहेरी दुचाकीस्वारने दिली उड्डाणपूलाच्या संरक्षक कठड्यास धडक ,एक जागीच ठार तर दोन गंभीर
भद्रावती(दि.6 फेब्रुवारी) :- तिघेजन बसून भरधाव दुचाकी उडान पुलाच्या कठड्यास जोरदार धडकल्याने झालेल्या अपघातात एका युवकाचा घटनास्थळीत मृत्यू झाला. असून दोघे युवक गंभीर जखमी झाले आहे. सदर घटना दि.५ बुधवार ला रात्री ११ वाजता शहरातील हायवे वरील उडान पुलाजवळ घडली. जखमी दोन्ही युवकांना चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.
अमोल भिंगारदिवे वय २२, सुजल बहादे व लहू धोटे हे तीन युवक नंबर प्लेट नसलेल्या एका काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीने शहरातील पंचशील नगरातून हायवे कडे भरधाव वेगाने जात असताना सदर दुचाकी उडान पुलाच्या भिंतीला आदळली.या अपघातात अमोल भिंगारदिवे या युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर सुजल बहादे व लहू धोटे हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले, मृतक ला ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे, शवविच्छेदन साठी पाठवण्यात आले. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
अल्पवयीन मलीचे एका तरुणाने केले अपहरण मात्र पोलिसांनी ठोकल्या बेड्या
राहुरी:-
कोणीही आपल्या मुला, मुलीचे लग्नाचे वय पूर्ण झाल्या शिवाय त्यांचा विवाह करू नये- पो. नि. ठेंगे.काही दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील मोकळ ओहळ येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली होती. राहुरी पोलिस पथकाने या घटनेचा तपास करुन अपहरण करणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळून जेरबंद केले.
राहुरी तालुक्यातील मोकळा येथील विकी उर्फ विकास प्रकाश शिरसाठ या आरोपी तरुणाने एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केल्याची घटना घडली होती. या घटने संदर्भात राहुरी पोलीस ठाण्यात आरोपीवर पॉक्सो गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपीने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले होते.स दरील गुन्ह्यातील आरोपी विकी उर्फ विकास प्रकाश शिरसाठ, वय २४ वर्षे, रा. मोकळ मोहोळ, ता. राहुरी, याला राहुरी पोलिस पथकाने दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी अटक केली. आरोपीस न्यायालयात हजर करून पुढील तपासासाठी पोलीस कोठडी रिमांड घेण्याची तजवीज चालू आहे. सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक चारुदत्त खोंडे हे करीत आहेत.
अशा घटना टाळण्यासाठी राहुरी पोलिसांनी सर्व नागरिकांना आव्हान केले आहे की, कोणीही आपल्या मुला अथवा मुलीचे लग्नाचे वय पूर्ण झाल्या शिवाय त्यांचा विवाह करू नये. अन्यथा त्यांच्यावर व लग्न जुळणारे आई-वडील सासू सासरे यांच्यावर गुन्हा दाखल होतो. सर्व ग्रामपंचायत, पोलीस पाटील, ग्रामसेवक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून आपापल्या क्षेत्रामध्ये जनजागृती करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षक चारुदत्त खोंडे, पोलीस हवालदार सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, सतिष कुऱ्हाडे , गोवर्धन कदम, अंकुश भोसले, इफ्तेखार सय्यद, सचिन ताजने आदि पोलिस पथकाने केली.
घरात का घुसता म्हणून विचारले असता सासू व सुनेला दोघा इसमाने केली मारहाण, पोलीसांनी केला दोघांवरही विनयभंगाचा गुन्हा दाखल
राहुरी:-
तुम्ही शिवीगाळ करु नका, आमचे माणसे घरी नाहीत, असे म्हणालेचा राग आल्याने आरोपींनी सासू व सुनेला शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना दि. २ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे घडली. अनिता विजय बोरकर, वय ३० वर्षे, रा. वांबोरी, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी १०.४५ वा. चे सुमारास अनिता बोरकर व त्यांची सासु उषा अण्णासाहेब बोरकर अशा दोघीजणी त्यांच्या घरात स्वयंपाक करत होत्या. त्यावेळी आरोपी बोरकर यांच्या घरात घुसले व म्हणाले की, तुझा नवरा कोठे आहे, असे म्हणुन ते शिवीगाळ करु लागले. त्यावेळी अनिता बोरकर यांची सासु उषा त्यांना म्हणाल्या की, तुम्ही शिवीगाळ करु नका, आमचे माणसे घरी नाहीत. असे म्हणालेचा त्या दोघांना राग आला. त्यांनी दोघींना शिवीगाळ दमदाटी करत हाथाच्या चापटीने मारहाण केली.
अनिता बोरकर यांच्या गळयातील मनीमंगळसुत्र ओढुन नुकसान केले. तसेच सासु उषा यांच्या गळयातील मणीमंगळसुत्र झटापटीत तुटुन गहाळ झाले आहे. त्यानंतर पुन्हा आमचे नादी लागलातर एका एकाला जिवे ठार मारुन टाकु, अशी आरोपींनी धमकी दिली. अनिता विजय बोरकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी भाऊसाहेब जनार्धन शेळके व राहुल जर्नाधन शेळके, दोघे रा. वांबोरी, ता. राहुरी, या दोघांवर गुन्हा रजि. नं. ७४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ३ (५), ३२४ (४), ३३३, ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
आदिवासी विकासासाठी ४८२ कोटी ३६ लाखांचा प्रारूप आराखडा सादर
प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची हमी आणि गाव तेथे रस्त्याचे नियोजन करा- आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके
गडचिरोली, दि. ६: आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विकासाला गती देण्यासाठी आणि आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी जिल्हा प्रशासनाने ४८२ कोटी ३६ लाख रुपये इतक्या निधीच्या प्रारूप आराखड्याची मागणी शासनाकडे सादर केली आहे. हा आराखडा जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत आदिवासी उपयोजना आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना यासाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. या संदर्भात आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली.
निधीवाढीसह प्रस्ताव सादर
गडचिरोली जिल्ह्यासाठी पूर्वी १९७ कोटी ९६ लाख रुपयांची वित्तीय मर्यादा निश्चित करण्यात आली होती. मात्र, जिल्ह्यातील कार्यान्वयन यंत्रणेकडून २८४ कोटी ३६ लाख रुपयांची वाढीव मागणी करण्यात आल्याने एकूण ४८२ कोटी ३६ लाखांचा आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला. यावेळी मंत्री उईके यांनी गडचिरोली जिल्ह्यात अधिकाधिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.
गाव तेथे रस्ता – आदिवासी विकास मंत्र्यांचे स्पष्ट निर्देश
गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असल्याने येथील प्रत्येक गाव रस्त्याने जोडला जावा, यावर भर देण्याचे व ‘गाव तेथे रस्ता’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम प्रस्तावित करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी बैठकीत दिले.
शिक्षणाला प्राधान्य – प्रत्येक विद्यार्थ्याला संधी
शाळा तसेच वसतीगृहांमध्ये प्रवेशाच्या सुविधा अधिक सुटसुटीत आणि सर्वसमावेशक करून आदिवासी समाजातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी उपाययोजनांवर भर देण्याचे त्यांनी सांगितले.
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीस चालना मिळण्यासाठी पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक विकास यावर भर देवून महत्त्वाकांक्षी योजना आखण्याची गरज असल्याचे मंत्री उईके यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राहुल मीना (गडचिरोली), कुशल जैन (अहेरी), नमन गोयल (एटापल्ली) तसेच विविध कार्यकारी यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आदिवासी वार्षिक उपयोजनेचा सविस्तर आढावा सादर केला. बैठकीत सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते
पुस्तके वाचल्याने ज्ञान मिळते परंतू कला व क्रीडा या क्षेत्राच्या माध्यमातून पुढे जान्याचा मार्ग आहे - डॉक्टर लुबना हकीम
सुंदरनगर:-
पुस्तके वाचल्याने ज्ञान मिळते परंतू कला व क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून आपल्या जीवनात पुढे जान्याचा मार्ग मीळतो असे मनोगत शाळेच्या क्रीडा व सांस्कृतीक कार्यक्रम समारोपप्रसंगी डॉ.लुबना हकीम यांनी व्यक्त केले
नेताजी सुभाषचंद्र प्राथमिक, माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय, सुंदरनगर येथे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. सत्र 2024-2025 मध्ये शिक्षण विभागातर्फे राबवलेले विविध उपक्रम तसेच विद्यालयातर्फे आयोजित क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्र, महागाव (ता. अहेरी) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. लुबना हकीम, राणी दुर्गावती विद्यालयाचे आदर्श मुख्याध्यापक लोनबले, शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे सदस्य पाल, प्रा. रॉय, स्वर्णकार , वांढरे , तसेच प्राचार्य निखुले उपस्थित होते.
डॉ. लुबना हकीम यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा आदर्श ठेवत शिक्षणासोबतच क्रीडा, कला आणि सांस्कृतिक उपक्रमांचा जीवनात महत्त्वाचा भाग असल्याचे सांगितले.
त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करताना सांगितले की,"केवळ पुस्तकांचे ज्ञानच नव्हे, तर कला, नाट्य, संगीत आणि खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व घडते. ज्या विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळत आहेत, ते त्यांची मेहनत, समर्पण आणि जिद्द यामुळे मिळवत आहेत. परंतु प्रत्येक सहभाग देखील महत्त्वाचा असतो, कारण विजयापेक्षा मोठे असते, ते म्हणजे शिकण्याची वृत्ती आणि सातत्याने प्रगती करण्याची जिद्द."त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा दाखला देत विद्यार्थ्यांना "मेहनत करा, सातत्य ठेवा आणि यश निश्चितच मिळेल" असा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शाळेच्या शिक्षक आणि व्यवस्थापनाचे उत्तम आयोजनाबद्दल कौतुक केले.
यावेळी शाळेतील शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कोयत्याने केला वार, तरुण गंभीर सिगारेट न दिल्याचा कारण
पुणे : सिगारेट न दिल्याने तरुणानेएका व्यक्तीवर कोयत्याने वार केले. ही घटना मंगळवारी ४ फेब्रुवारी च्या रात्री साडेसात वाजता सृष्टी चौक, पिंपळे गुरव येथे घडली.रंगनाथ जगदेश गुत्तेदार (४०) रा. पिंपळे गुरव यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संतोष धुळे जाधव (२८) रा. पिंपळे गुरव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रंगनाथ हे सृष्टी चौकात सिगारेट ओढत थांबले होते.
त्यावेळी संशयित संतोष तिथे आला. त्याने रंगनाथ यांच्याकडे सिगारेट मागितली. सिगारेट देण्यास रंगनाथ यांनी नकार दिला. त्या कारणावरून संतोष याने कोयता काढून रंगनाथ यांच्यावर वार करत त्यांना जखमी केले.
लागलीच पोलीसांनी घटना स्थळी धाव घेतली व आरोपीस अटक केली व तपास सुरू आहे
कोकणात लपून बसला तरीही मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाचा पोलीसांनी लावला छळा
पातूर -
चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावातील पिडीतेच्या वडिलांनी काही दिवसा अगोदर पोलीस स्टेशनला दाखल केली होती. की त्यांच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फुस लावून पडून नेले सदर बाबत पोलीस स्टेशनला अज्ञान आरोपी विरुद्ध अप क्र. 396/24 कलम 137 (2) भा न्या संहिता अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
त्यानंतर दि. 30 नोव्हेंबर 2024 रोजी पिडीतेच्या वडिलांनी त्यांच्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणारा इसम हा बलराज संतोष सरकटे वय 20 वर्ष रा. नवेगाव हा इसम असून त्याला त्यांचे वडील संतोष भीमराव सरकटे यांनी पळवून नेण्यास मदत केली आहे.
अशा फिर्यादी यांचे बयानावरून गुन्ह्यात कलम 96 भा.न्या संहिता वाढ करून पिडीतेस फूस लावून पळवून नेण्यास मदत करणारा आरोपींचा वडील संतोष सरकटे यांस ताब्यात घेऊन गुन्ह्याचा तपास करण्यात आला.गुन्ह्याचे तपासा दरम्यान चान्नी पोलिसांनी गोपनीय तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे पीडिता व आरोपी बलराज संतोष सरकटे रा. नवेगाव यांचा शोध घेतला असता पिडीता व आरोपी हे चिपळूण रत्नागिरी येथे असल्याचे समजल्याने चान्नी पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना माहिती देऊन त्यांच्या परवानगी घेऊन तपास पथक नेमले व तपास पथकाने कोकणात जाऊन चिपळूण जि. रत्नागिरी येथून पिडीता व आरोपी बलराम संतोष सरकटे यांना रितसर ताब्यात घेऊन दि. 4 फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशन चान्नी येथे आणले पिडीतेचे पालकासंक्षम तिने बयान नोंदविण्यात आले असून पीडीतेच्या बयानावरून गुन्ह्यात कलम 64 (2) एम भा .न्या.स. सहकलम 3.4.5. (एल) 6.8.1.2. पोक्सो वाढ करण्यात आली असून आरोपी बलराम सरकटे यांस अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय अधिकारी बाळापुर गजानन पडघन, यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. रवींद्र लांडे, संजय कोहळे, पो. अंमलदार उमेश सांगळे, अनिल सोळंके, सुधाकर करवते , पो. अंमलदार राजनर्दिनी निधी पुंडगे, हर्षदा मोरे यांनी केली गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. रवींद्र लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. निरिक्षक संजय कोहळे करीत आहेत.