सासुच्या जाचाला कंटाळून विवाहितेने केली आत्महत्या,सासुची कारागृहात रवानगी, मात्र मुले झाली पोरकी
बारामती - पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील नीरा येथील विवाहित महिलेनं सासूच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केलीय. नीता सचिन निगडे (वय ३३) रा. वार्ड क्र. ६ नीरा असं विवाहितेचं नाव आहे. याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी सासू विजया भगवान निगडे हिला अटक केली असून सासवड न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर तिची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नीता निगडे यांचे वडील सुभाष शंकर माने रा. श्रीगोंदा (ता.आहिल्यानगर) यांनी जेजुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. विजया निगडे - जगताप मूळ रहिवासी वाणेवाडी (ता. बारामती) ही नीता यांना वेळोवेळी लाथा बुक्क्यांनी मारहाण करणे, सतत शिवीगाळ करणे, गरीब असल्याने हिणवणे, मुलगा होत नाही म्हणून घालून पाडून बोलणे, नीताच्या साड्या जाळून टाकणे असा त्रास देत होती. नवीन फ्लॅट घेतल्यानंतर तिथे राहायला जाण्याआधी त्यासाठी माहेरून एक लाख रुपये आण म्हणून तगादा लावणे अशा प्रकारचा शारीरिक आणि मानसिक त्रास देत होती. या त्रासाला कंटाळून अखेर नीताने नीरा येथील राहत्या घरात आत्महत्या केली.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी अधिक तपास करत आहेत. विजया निगडे हिला पोलिसांनी अटक करून सासवड न्यायालयात हजर केले असता तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तिला आता येरवडा कारागृहात पाठण्यात आल्याची माहिती तपासी अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.२७ मार्च) रोजी माध्यमांना दिली आहे.
पोलिसांनी संतप्त जमावाला रोखले - नीता यांनी रहत्या घरी आत्महत्या केल्यानंतर नीरा तसंच जेजुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले. नीताच्या माहेरचे लोक नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि नीरा पोलीस दूरक्षेत्रात आल्यावर प्रचंड संतापले होते. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेता नीराचे फौजदार सर्जेराव पूजारी, घनशाम चव्हाण, हरिश्चंद्र करे यांनी माहेरच्या लोकांची समजूत काढत कायदेशीर कारवाई करू असं आश्वासीत केलं. अंत्यविधीवेळीही मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
निताच्या जाण्याने एका मुलासह दोन मुली झाल्या पोरक्या - नीता यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांच्या पतीने नीरा शहरात एक फ्लॅट घेतला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या फ्लॅटमध्ये हे कुटुंब राहण्यासाठी जाणार होते. यावरुन सासू सुनेला कुरबुर करतं होती. आता पत्नीच्या पश्चात फ्लॅटमध्ये या तीन मुलांचं संगोपन कसं करायचं असा प्रश्न आहे. तर या दोन्ही मुली आता आई विना पोरक्या झाल्या आहेत.
आई गेल्यानंतर लेकीन ठेवला मिस यू आईचा स्टेटस - नीता गेल्यानंतर नीताच्या मुलीने मोबाईलच्या व्हाट्सअप स्टेटसवर आणि फेसबुकवर मिस यू आई हा मेसेज करत आईचा फोटो शेअर केला आहे. तिचा हा मिस यू आईचा स्टेटस पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. नीताने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या या दोन कोवळ्या मुलींचा विचार करायला हवा होता, अशी भावना आता लोकांनी व्यक्त केली आहे. क्षणभराचा राग आपल्या आप्तांना आयुष्यभर दुःख भोगायला लावतो अशी भावना अनेकांनी बोलून दाखवली.
गडचिरोली शहरात अत्याधुनिक नाटय / सांस्कृतिक सभागृह उभारावे. - माजी. आमदार डॉ. नामदेव उसेंडी
गडचिरोली:-
गडचिरोली शहरातील लोकसंख्या जवडपास ८०हजार असून गडचिरोली शहराला व जिल्ह्याला झाडीपट्टी नाट्य रंगभूमीचा इतिहास लाभलेला आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यात विकासाला सुरवात झाली असल्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बैठका घेण्यासाठी अद्यावत सभागृह उपलब्ध नाही. हि अडचण लक्षात घेता डॉ . नामदेवराव उसेंडी माजी. आमदार गडचिरोली विधान सभा क्षेत्र यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार ऍंड. आशिष शेलार साहेबची अधिवेशन काळात विधान भवन मुंबई येथे भेट घेतली व चर्चा केली. तसेच निवेदन देऊन गडचिरोली शहरात अद्यावत नाट्य / सांस्कृतिक सभागृह मंजूर करण्याकरिता निवेदन देऊन मागणी केली. यावर मंत्री महोदयांनी साकारातक निर्णय घेऊन गडचिरोली जिल्यातील गडचिरोली शहरात नाट्य / सांस्कृतिक सभागृह मंजूर करण्याचे आश्वासन दिले.
शासनाने बंदी घातलेली कापसाचे बियाणे (चोर बिटी )आष्टीत येण्याची शक्यता?
कारवाईअभावी वापर वाढला :
आष्टी : चोर बीटी (बीजी-३) या कापसाच्या वाणाची लागवड केल्यास शेतजमीन नापीक होते. तसेच मानवाला कॅन्सर होण्याचा धोका संभावतो. त्यामुळे शासनाने या बियाणांवर बंदी घातली आहे. मात्र गुजरात,तेलंगणातून चोरट्या मार्गाने सदर बियाणे गडचिरोली जिल्ह्यात आणली जातात कृषी विभाग, पोलिस विभाग लक्ष देण्याची गरज आहे. मागील काही वर्षांपासून शेतकरी कापूस पिकाकडे वळले आहेत. चामोर्शी, सिरोंचा, मुलचेरा या तालुक्यांमध्ये दरवर्षी कापसाचा पेरा वाढत चालला आहे. कापसाच्या पिकात मोठ्या प्रमाणात गवत उगवत असल्याने गवत काढण्यावर शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. हा खर्च कमी करण्यासाठी शेतकरी तण नाशकांची मोठ्या प्रमाणात फवारणी करतात.तण नाशकाची फवारणी केल्यास त्याचा काही प्रमाणात परिणाम संबंधित पिकावरही होतो. मात्र चोर बीटी या कापसाची लागवड केल्यास तण नाशकाचा काहीच परिणाम पिकावर होत नाही. त्यामुळे चोर बीटीची लागवड करून मोठ्या प्रमाणात शेतकरी तण नाशकांचा वापर करतात. तण नाशकाच्या अतिवापरामुळे शेतजमीन पूर्णपणे नापीक होते. तसेच पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण होतो.अतिशय घातक असलेली तण नाशके वापरली जात असल्याने मानवाला कॅन्सर होतो किंवा त्याचा मृत्यू सुध्दा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने चोर बीटी या बियाणांवर बंदी घातली आहे.चामोर्शी, सिरोंचा या तालुक्यांच्या सीमा तेलंगणा राज्याला लागून आहेत. तेलंगणातही या बियाण्यांवर बंदी आहे. मात्र तेलंगणा राज्यातून प्रतिबंधीत बियाणे गडचिरोली जिल्ह्यात आणले जाण्याची शक्यता आहे. करीता कृषी विभागातील वरिष्ठ अधिकरी व पोलीस विभागाने लक्ष देऊन वेळीच आवर घालण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सुज्ञ नागरिक करीत आहेत.
लक्ष प्राप्ती होईपर्यंत कधीही थांबू नका - अब्दुल जमीर अब्दुल हकीम
आष्टी :- केवळ बाह्य सौंदर्य म्हणजेच व्यक्तिमत्व नसून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात शिस्त अनुशासन अभ्यास रोज नवनवीन ज्ञानात भर टाकून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा व त्यातून आपल्या राष्ट्राची सेवा करावी असे आआवाहन अब्दुल जमीर अब्दुल हकीम( बबलू भैया) यांनी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाद्वारे आयोजित व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानावरून केले
त्यासोबतच विज्ञानाशी मित्रता करून अनेक नवीन आदर्श पुढे ठेवून सातत्य साधना चिकाटी यातूनही व्यक्तिमत्व घडत असतो असे अनेक उदाहरणाद्वारे पटवून दिले या व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेला प्रमुख उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ. डी.जे. मशाखेत्री कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालय चामोर्शी यांनी देखील युवकांनी व्यसन न्युनगंड वाद भौतिकवाद यापासून दूर राहून ज्ञानसाधना करावी व सतत व्यक्तिमत्व घडवत राहावे असे आवाहन केले यावेळेला शून्यातून विश्व निर्माण करणारे राहुल जवादे यांनीदेखील अल्पशा पगारापासून ते उद्योगपती पर्यंत कसा प्रवास केला याविषयी आपले अनुभव कथन केले या व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेला प्राचार्य किशोर पाचभाई यांनी देखील छोट्या छोट्या गोष्टीतून व्यक्ती घडत असतो असे अनेक उदाहरणाद्वारे पटवून दिले त्यासोबतच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय फुलझेले यांनी देखील विद्यार्थ्यांनी अनेक आदर्श पुढे ठेवावे आणि आपल्या समाजाचे नाव लौकिक करावे असे आवाहन केले या व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेची प्रस्तावना प्रा. डॉ. भारत पांडे कार्यक्रम अधिकारी विद्यार्थी विकास विभाग यांनी केले तर संचालन प्रा. डॉ. गणेश खुणे यांनी केले त्यासोबतच ही कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता प्रा. डॉ. राज मुसने,डॉ. रवी शास्त्रकार डॉ. श्याम कोरडे प्रा. रवी गजभिये प्रा. ज्योती बोबाटे, प्रा. विजया सालुरकर,प्रा. नाशिका गबणे ,राज लखमापूरे, निलेश नाकाडे इरफान शेख, मोहम्मद मुस्ताक, प्रभाकर भोयर,संचित बाचाड, दीपक खोब्रागडे संतोष बारापात्रे आदींनी सहकार्य केले
प्रा.आ.केंद्रातील कर्मचाऱ्यांनी केला डॉ. लुबना हकीम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
अहेरी:-
प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. लुबना हकीम यांच्या वाढदिवस आरोग्य केंद्राच्या सर्व कर्मचार्यांनी विशेष उत्साहाने साजरा केला
वाढदिवसाच्या सुरुवातीला डॉ. लुबना हकीम यांनी केक कापले व त्यांचे कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इतर उपस्थित व्यक्तींनी आपल्या मनापासून आदर व्यक्त केला. यावेळी, डॉ. येर्रावार, पर्यवेक्षीका डोगरे मॅडम, पर्यवेक्षीका गोगे मॅडम, चीचघरे सर, दीपक भाऊ, दिनेश भाऊ आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
शेवटी, वाढदिवसाच्या कार्यक्रमात उपस्थित सर्वांना नास्ता व कोल्ड्रिंक देण्यात आले
शेवटी डॉ. लुबना हकीम यांनी माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले
नागभीड : अल्पवयीन मुलीला पाठलाग करत प्रेमासाठी प्रपोज करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. ही घटना बुधवारी (दि. २६) उघडकीस आली. रितेश अविनाश पानसे (२१) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपीने अल्पवयीन मुलीला प्रेमाचे प्रपोज केले होते. मुलीने त्याचा प्रतिकार केला. मात्र आरोपी पिच्छा सोडत नव्हता. सोमवारी पीडित मुलगी शाळेत गेली होती. सोमवारी (दि. २४) दुपारी १ वाजता पेपर सुटल्यानंतर घरी येत असताना कॉलेजसमोर आरोपी आला. तिला कीपॅड मोबाइल हातात देऊन होकारासाठी दबाव टाकला. हा प्रकार मुलीने कुटुंबाला सांगितल्यानंतर नागभीड पोलिसात तक्रारी केली. मंगळवारी (दि. २५) रात्री उशिरा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.पुढील तपास ठाणेदार रमाकांत कोकाटे, सहायक पोलिस निरीक्षक अनुराधा फुकट करीत आहेत.
आरोपीविरूद्ध संताप
माहिती गावात पसरताच नागरिकांनी आरोपीविरूद्ध तीव्र संताप व्यक्त केला. अशा व्यक्तींना कायद्यानुसार कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
अहेरी येथील वसतीगृहात विद्यार्थ्यांना बेदम मारहाण, अधीक्षक व मुख्याध्यापक यांचेवर कारवाई करण्याची मागणी
अहेरी (गडचिरोली): एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, अहेरीच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांवर अमानुष छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसतिगृह अधीक्षक ईश्वर नारायण शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना मारहाण, मानसिक छळ आणि धमकी दिल्याचे गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केले आहेत. या संदर्भात वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांकडे तक्रार अर्ज दाखल केला असून अधीक्षकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. पण मुख्याध्यापकांनी कोणतीही कारवाई केली नाही. या षडयंत्र दाबण्याचे प्रयत्न चालू आहे.
विद्यार्थ्यांचे गंभीर आरोपः
नववीच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाणः
सकाळी ५ वाजता झोपेत असलेल्या विद्यार्थ्यांना बांबूच्या काठीने तंगडीवर जबरदस्त मारहाण करण्यात आली.
► बारावीच्या विद्यार्थ्यांना मानसिक छळ आणि धमकीः
अधीक्षकाने विद्यार्थ्यांना वारंवार धमक्या देत मानसिक दबाव टाकला.
अमन कुलसंगे याला बेदम मारहाणः
७ मार्च २०२५, रात्री ११:१५ वाजता तब्येत खराब असलेल्या अमन कुलसंगे याला स्वतःच्या चप्पलने आणि काठीने तंगडीवर ४० वेळ बेदम मारहाण करण्यात आली.
▶ सहावी-सातवीच्या विद्यार्थ्यांवर कठोर शिक्षाः
रात्री १० नंतर पाढे विचारले जातात, चुकल्यास ४० वेळा हातावर मारले जाते.
▶ विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरणः
सततच्या छळामुळे विद्यार्थी मानसिक तणावाखाली आले असून त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे.
पुरावे स्पष्ट - अमानुष छळाचे प्रत्यक्ष चित्रण
विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचे प्रत्यक्ष छायाचित्र उपलब्ध असून, त्यांच्या पायावर खोल जखमा झालेल्या स्पष्ट दिसत आहेत.
आदिवासी विभागाला इशारा - तात्काळ कारवाई करा !
या अमानुष वर्तनाविरोधात अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, महाराष्ट्र यांनी कठोर भूमिका घेतली आहे. प्रदेश सचिव अॅड. राकेश तोरे आणि गिरीश जोगे, चंद्रकांत वेलादी (सामाजिक कार्यकर्ता) यांनी अधीक्षक ईश्वर शेवाळे यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा
जर प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई केली नाही, तर अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद आणि समाज बांधव विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
लाचखोर वैद्यकीय अधिकारी सापडला लाप्रवीच्या जाळ्यात, एक लाख तीस हजार रुपयांची मागणी
गडचिरोली:-
थकीत वेतनासाचे बिल काढण्यासाठी आरोग्य सहायकडून एक लाख 30 हजारांची रक्कम लाच म्हणून स्वीकारणाऱ्या लाचखोर वैद्यकिय अधिकारी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. हीं कारवाई दिनांक 26 मार्च बुधवारी लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली.
डॉ. संभाजी भोकरे असे लाचखोर वैद्यकिय अधिकाऱ्याचे नाव आहे.
डॉ. संभाजी भोकरे लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होता. याच आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायकाचे फेब्रुवारी ते सप्टेंबर 2024 व नोव्हेंबर महिन्यातील 14 दिवसांचे रोखलेल्या पगाराचे पुरवणी बिल मंजूर करण्याकरिता डॉ. संभाजी भोकरे यांचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. या नाहरकत प्रमाणपत्रासाठी डॉ भोकरे यांनी दिड लाख रूपयांची मागणी केली. लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने आरोग्य सहायकाने लाचलूचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. तडजोडी अंती डॉ भोकरे यांनी एक लाख तीस हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. गडचिरोली लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले, पोलिस निरीक्षक संतोष पाटिल, शिवाजी राठोड व त्यांच्या पथकाने सापळा रचून आरोग्य सहायकडून एक लाख तीस हजार रूपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी डॉ भोकरे यांना रंगेहाथ पकडले
चंद्रपूर येथील तिन तरुणांना बल्लारपूर पोलीसांनी एक देशी कट्टा व जीवंत काळतुसासह केली अटक
बल्लारपूर:-
बल्लारपूर पोलीसांनी एक देशी कट्टा व एक जिवंत काडतूस सह तीन युवकांना अटक केली सदर कारवाई २५ मार्च रोजी करण्यात आली. अभि वाल्मीक साव (२४) रा.दत्त नगर चंद्रपूर, FCविनीत तावाडे (२४) रा. बापट नगर चंद्रपूर, संकेत रविंद्र येसेकर रा.राजनगर पठाणपुरा रोड चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. बल्लारपूर पोलीसांनी एक देशी कट्टा व एक जिवंत काडतूस सह तीन युवकांना अटक केले.२५ मार्च रोजी बल्लारपूर पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथक चे सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे हे डि.बी. स्टॉफसह पेट्रोलींग करित असतांना त्यांना गोपनीय माहिती की साईबाबा वार्ड, बल्लारपुर येथे ३ युवक देशी कट्टा घेऊन फिरत आहेत
त्यावरून त्यांना ताब्यात घेत एक लोखंडी गावठी बनावटीचा देशी कट्टा ज्याची एकुण लांबी २४ सेमी बॅरलची लांबी ११ सेमी, बॅरलची गोलाई ५.५ सेमी, बॅरल पासुन लाकडी मुठेची लांबी १३ सेमी असलेली किंमत २० हजार रुपये व एक नग पितळी धातुचे जिवंत बुलेट ज्याची लांबी ७.५ सेमी बुलेट पितळी धातुचे असुन त्याची गोलाई ४ सेमी बुलेटच्या मागिल बाजुच्या पेंदयावर ८ एम.एम. के.एफ. असे लिहलेले किंमत २ हजार रुपये असे एकुण २२ हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांच्या जवळून जप्त करण्यात आला. आरोपी अभि वाल्मीक साव (२४) रा. दत्त नगर चंद्रपूर, विनीत नानाजी तावाडे (२४) रा. बापट नगर चंद्रपूर, संकेत रविंद्र येसेकर रा राजनगर पठाणपुरा रोड चंद्रपूर यांचा विरुध्द अप क्रं. २२४/२०२५ कलम ३,२५ भारतीय हत्यार कायदा १९५९ अन्वये गुन्हा नोंद करुन तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे, सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, परि.पो.उप.नि. सौरभ साळुखे, परि.पो.उप.नि. सुनिल धांडे, सफौ. आंनद परचाके, पो.हवा. सुनिल कामटकर, पो.हवा. पुरुषोत्तम चिकाटे, पोहवा. संतोष दंडेवार, पो.हवा. संतोष पंडित, पोहवा. सत्यवान कोटनाके, पो.अं. वशिष्ट रंगारी, लखन चव्हाण, शरदचंद्र कारुष, शेखर माथनकर, भास्कर चिचवलकर, चापोअ. कैलास चिचवलकर, म.पो.अं. अनिता नायडु सह गुन्हे शोध पथकांनी केले
आष्टी पोलीसांनी कोनसरी येथे पकडला सुगंधीत(मजा) तंबाखू,१० लाख विस हजार रुपयाचे मुद्देमाल जप्त
तिन आरोपींची कारागृहात रवानगी
आष्टी :-
चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चारचाकी वाहनाच्या साहाय्याने, सुगंधी तंबाखूच्या तस्करीचा डाव आष्टी पोलिसांनी मंगळवारी (दि.25) उधळवून लावला आहे. या कारवाईत 19 हजार 800 रुपयांच्या सुगंधित तंबाखूसह, वाहन असा एकूण 10 लाख 19 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी श्रीकांत नंदकुमार आकुलवार (38) रा. देवापूर वार्ड, ता. गडचिरोली पराग अरविंद रामटेके (38) रा. नागभिड जि. चंद्रपूर, हेमंत देविलाल चव्हाण (38) रा. अहेरी तिघांना अटक करण्यात
आली आहे. आष्टी-चामोशी वाहनातून सुगंधित तंबाखूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने कोनसरी गावातील एका दुकानासमोर सापळा रचला एमएच 19 बीयू-7860 क्रमांकाचं वाहन संशयास्पद अवस्थेत येताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता, वाहनात 19,800 रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू आढळून आला. यावेळी सुगंधित तंबाखूसह चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. तिनही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने कारागृहात रवानगी केली आहे
सदर माल कुठून आणण्यात येत आहे हे गुलदस्त्यातच आहे
विनाशकारी लोह प्रकल्पाची पोलखोल टाळण्यासाठी रोखले : बोगस जनसूनावणी विरोधात तक्रार दाखल करणार
शेकाप, भाकप, माकप या डाव्या पक्षांच्या नेत्यांना जनसूनावणीत सहभागी होण्यास पोलिसांचा मज्जाव
गडचिरोली : वडलापेठा येथे प्रस्तावित स्पाॅंज आयर्न प्रकल्प हा जगातील सर्वात उच्च प्रतीचा प्रदुषण निर्माण करणारा प्रकल्प असून तो पाचव्या अनुसूची क्षेत्रातील अनेक तरतूदी धाब्यावर बसवून बेकायदा पध्दतीने करण्याचा प्रयत्न असून पर्यावरणीय मुद्यांवर आक्षेप नोंदवू नये यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे काॅ.अमोल मारकवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पोलिसांनी जनसूनावणी संपेपर्यंत अडवून ठेवले.
सदर जनसूनावणी ही सर्वांसाठी खुली असतांना केवळ प्रकल्पाची पोलखोल होवू नये यासाठी आम्हाला विविध कारणे सांगून पोलीसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर जनसूनावणी संपेपर्यंत अडवून ठेवले. यापूर्वीही तगडा पोलीस बंदोबस्त लावून जनसूनावणीत सहभागी होण्यासाठी आम्हाला रोखण्यात आलेले होते. त्यामुळे या अशा बोगस जनसूनावण्यांच्या विरोधात वरिष्ठ स्तरावर लवकरच सविस्तर तक्रार दाखल करुन न्याय मागण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे काॅ.अमोल मारकवार यांनी दिली असून हुकूमशाही पध्दतीने घेतलेल्या जनसूनावणीचा निषेध केला आहे.
Love marriage tradition : भारतात आज देखील नातेवाईकांच्या मनाविरोधात जाऊन लग्न करणे सोपे नाही. देशात बहुतकरुन आत्पस्वकियांच्या आणि कुटुंबातील लोकांच्या मर्जीनुसारच विवाह लावले जातात आणि केले देखील जातात. लव्ह मॅरेज किंवा ज्याला प्रेम विवाह म्हणतात ही पद्धत भारतात अद्याप रुजलेली नाही. मात्र, महाराष्ट्राच्या शेजारी राज्यात म्हणजेच गुजरातमध्ये भाटपोर नावाचं एक गाव आहे, या गावातील लोकांचा विचार थोडा वेगळा आहे. या गावातील 90 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी प्रेमविवाह केलाय. इतकचं नाही तर मागील तीन दशकांपासून प्रेमविवाह करण्याची पद्धत या गावात वाढलीये. त्यामुळे हे गाव संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झालंय.
भाटपोर हे गाव गुजरातमधल सूरतजवळ आहे. येथील जवळपास 90 टक्के लोक गावातल्या गावातचं विवाह करतात. येथील लोक त्यांच्या जोडीदाराला स्वत:निवडतात आणि आपल्या कुटुंबियांच्या सहमतीने लग्न करतात. विशेष म्हणजे गावातील ज्येष्ठ आणि वृद्ध लोक सुद्धा या परंपरेला सपोर्ट करतात. आजी-आजोबांनी देखील लव्ह मॅरेज केलेले असते. त्यामुळे तेही विरोध करत नाहीत.
स्वत:च्या गावातील जोडीदारच निवडतात
भाटपोर गावात अनेक पिढ्यांपासून ही परंपरा सुरू आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, "आमच्य गावात प्रेमविवाह करण्याची परंपरा आहे. गावातील मुलं आणि मुली प्रेम विवाहचं करतात. ही परंपरा 2-3 पिढ्यांपासून सुरू आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे." एखाद्याला प्रेमविवाह करायचा असल्यास गावातील वडीलधारी मंडळीही त्याची पूर्णपणे जबाबदारी घेतात. या परंपरेनुसार गावातील लोक गावाबाहेर लग्न करणे टाळतात.
भाटपोरमध्ये प्रेमविवाह हा ट्रेंड नसून परंपरा बनली आहे. इथल्या लोकांचा असा विश्वास आहे की प्रेमाने बनवलेले नाते अधिक घट्ट असते आणि म्हणूनच ते स्वतःचा जोडीदार निवडतात. या गावात होणारे विवाह इतर गावांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत, कारण येथे कुटुंबांना अशा निर्णयांमध्ये हस्तक्षेप करण्याची गरज पडत नाही.
याशिवाय येथील लोक त्यांच्या नात्याकडे पूर्णपणे स्वतंत्रपणे पाहतात. कुटुंबियांचा असा विश्वास आहे की, जर मुलगा आणि मुलगी एकमेकांना पसंत करत असतील तर ते लग्न करण्यास मोकळे आहेत. या गावातील वडीलधाऱ्यांचाही आपल्या मुला-नातवंडांच्या निर्णयावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे येथील नातेसंबंध घट्ट होतात आणि घटस्फोटाचे प्रमाणही खूप कमी आहे. भारतातील बहुतेक लोक लग्नाला योग्य मानतात, भाटपोर गावाचे हे उदाहरण दाखवते की प्रत्येक गावाची स्वतःची परंपरा आणि संस्कृती आहे. येथील लोक अभिमानाने ही परंपरा पुढे चालवत आहेत आणि येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवत आहेत.
शाळा व्यवस्थापन समिती जयनगर यांनी शाळेला ताला ठोको आंदोलन केले सुरू
चामोर्शी:-
तालुक्यातील जयनगर शाळेतील
मुख्याध्यापक व विषय शिक्षिका यां दोन्ही शिक्षकांना बळतर्फ करण्यासाठी जयनगरच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व्यवस्थापक समिती व गावकऱ्यांच्या पुढाकाराने आज मंगळवार दि.25.03.2025 पासून शाळेला ताला ठोको आंदोलनाला सुरवात केली आहे .
मुख्याध्यापक , विशेष शिक्षिका यांना जोपर्यंत जिल्हा परिषद प्रशासन यांना बडतर्फ करणार नाही.तोपर्यंत जयनगर शाळेला तालाबंद आंदोलन सुरू ठेवण्याचा व्यवस्थापन समितीने संकल्प केलेला आहे.
या ताला बंद आंदोलनाला अनेकांनी. आपला पाठिंबा सुध्दा दर्शविलेला असून आंदोलन तीव्र होण्याच्या मार्गावरती असल्याचे सांगितले जात आहे
प्रसंगी न्याय न मिळाल्यास आंदोलन रस्त्यावर येऊन करण्यात येणार असा इशारा देण्यात आला आहे
महागाव येथे जागतिक क्षयरोग दीनानिमीत्य विशेष मार्गदर्शन
महागाव (अहेरी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विशेष मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महागावचे माजी सरपंच विनोद वेलादी होते, तर ग्राम पंचायत सदस्य राजेश दुर्गे आणि महागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. लुबना हकीम, आरोग्य सहायीका शीतल डोंगरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.
डॉ. लुबना हकीम यांनी क्षयरोगाच्या लक्षणे, प्रसार मार्ग आणि उपचार पद्धती याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जिवाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. त्याची लक्षणे म्हणजे दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, संध्याकाळी ताप येणे, रात्री घाम येणे इत्यादी आहेत. उपचार न केल्यास हा रोग इतरांना पसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे उपचार घेणे आवश्यक आहे.
कार्यक्रमात क्षयरोगावर यशस्वीपणे मात केलेल्या रुग्णांचा सत्कार करण्यात आला. सत्कारित रुग्णांमध्ये जनाबाई अलोने, कोंडाया हिरवकर, वसंत तोरण, संतोष आलम, पापाया आत्राम, पार्वती आत्राम आणि मंगेश पेंदाम यांचा समावेश आहे. त्यांच्या अनुभवांनी इतरांना आशा आणि प्रेरणा दिली.
या कार्यक्रमाला आरोग्य साहायीका घोगे , आरोग्य साहायीका शितल डोंगरे व गावातील प्रतिष्ठित नागरिक, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर आणि इतरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या उपक्रमामुळे गावात क्षयरोगाविषयी जागरूकता वाढली असून, रुग्णांना योग्य उपचार मिळविण्यास मदत झाली आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या चामोर्शी तालुकाध्यक्ष पदी कालिदास बन्सोड यांची निवड.
तालुका प्रतिनिधी चामोर्शी..
राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या विदर्भ कार्याध्यक्षपदी नेताजी सोंदरकर तर वडसा तालुका अध्यक्षपदी रजनीकांत गुरनुले, कुरखेडा तालुका अध्यक्षपदी रुपालीताई कावळे, ब्रम्हपुरी ता, अध्यक्षपदी अंकुश कांबडी, चामोर्शी तालुका अध्यक्षपदी कालिदास बन्सोड यांची एकमताने निवड...
चामोशी तालुक्यातील मौजा घोट येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या कार्यकारणीची बैठक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीत वडसा येथील नेताजी सोंदरकर उपसरपंच ग्रामपंचायत गांधीनगर यांची संघटनेच्या विदर्भ कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली,,राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यासाठी सोंदरकर पूर्णवेळ कार्य करणार व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब तळागाळातील शोषित वंचितांना न्याय देण्यासाठी नेताजी सोंदरकर गेल्या अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे काम करीत आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन संघटनेने त्यांना विदर्भ कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे.तर त्यांच्या नेतृत्वामध्ये वडसा तालुकाध्यक्षपदी रजनीकांत गुरनुले, ब्रह्मपुरी तालुका अध्यक्षपदी अंकुश कांबडी, कुरखेडा तालुका अध्यक्षपदी रूपालीताई कावळे,
यांची निवड करण्यात आली आहे व चामोर्शी तालुका अध्यक्षपदी कालिदास बन्सोड यांची नियुक्ती एकमताने करण्यात आलेली आहे. प्रामुख्याने कालिदास बन्सोड गेल्या अनेक वर्षापासून दैनिक वृत्तपत्रात आपल्या कार्यतत्पर लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना संघटनेच्या चामोर्शी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आलेली आहे याबद्दल प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे,राष्ट्रीय प्रवक्ता ग्यानेंद्र विश्वास, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, राहुल झोडे, विदर्भ अध्यक्ष जावेद सय्यद, गोंदिया जिल्हा अध्यक्ष गुड्डू भाऊ खुणे, जिल्हाध्यक्ष मनीषाताई मडावी, जिल्हा संघटिका अनिता रॉय, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी,जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना डहारे, , कृष्णा वाघाडे, नानू भाऊ उपाध्ये, महिला आघाडी तालुका अध्यक्ष विशाखा सिन्हा,शरीफ शेख, किशोर देवतळे, दिनेश मुजुमदार,सुमेन विस्वास, विकास मैत्र, सरपंच कृष्णा मंडल, उपसरपंच प्रकाश सरकार यांनी अभिनंदन केले आहे.
हवाई दौरे करणारे पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार काय ?
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचा सवाल
गडचिरोली जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात पन्नासहून अधिक नागरिकांचे नाहक बळी गेले. मात्र गडचिरोली जिल्ह्यास स्टील हब बनविण्याचा संकल्प करणारे राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री केवळ हवाई दौऱ्यावर भर देत असून ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार काय असा सवाल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी पत्रकातून उपस्थित केला आहे. ब्राम्हणवाडे यांनी पत्रकात म्हटले आहे की, गडचिरोलीस स्टिल हब बनविण्याच्या नावाखाली परप्रांतीयांनाच मोठ्या प्रमाणावर रोजगार दिला जात आहे. येथील भुमीपूत्रांची रोजगाराच्या नावावर फसवणूक केल्या जात आहे. राज्याची सुरवात गडचिरोली पासून होईल अशी ओळख आम्ही निर्माण करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. आता तर गडचिरोलीला दोन पालकमंत्री मिळाले आहेत. पण ते हेलीकॉप्टर ने एखाद्यावेळी येतात अनं इव्हेंटसारखे कार्यक्रम राबवितात. येथील बळीराजांचे अश्रू पुसण्यासाठी ही मंडळी गडचिरोली जिल्यातील शेताच्या बांधावर जाणार का असा सवाल गडचिरोली जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी विचारला आहे.
गडचिरोली जिल्हयात सध्या नागरिकांना, बेरोजगारांना, आदिवासी बांधवाना व बळीराजाला मोठया समस्यांचा सामना करावा लागत आहे.
हत्तीच्या कळपाने तर हैमान घातला आहे. पिकांचे व घरांचेही ते मोठे नुकसान करीत आहेत. नुकतेच तालुक्यातील आरमोरी सुर्यडोंगरी येथील लालाजी मेश्राम यांच्या शेतात हत्तीच्या कळपाने मका पिकाची मोठी नासधूस केली. शेतात असलेली बोअर मशीनही त्यांनी उध्वस्त केली. पण सत्ताधाऱ्यांना याचे काही देणेघेणे नाही. केवळ फॅशन म्हणून गडचिरोलीचे पालकमंत्रीपद घ्यायचे. अनं एखादी वेळी इव्हेंट राबविण्यासाठी हेलीकॉप्टरने येथे यायचे व निघून जायचे असा उपक्रम सध्या सुरू आहे. आता तर जिल्हयाला सहपालकमंत्री लाभले आहेत. पण त्यांनी देखिल हाच फंडा वापरणे सुरू केला आहे. त्यांच्याकडून अपेक्षा करणे गैर आहे असेही ब्राम्हणवाडे यांनी म्हटले आहे.