PostImage

Vaingangavarta19

Oct. 19, 2024   

PostImage

लिटील हार्ट्स विद्यालयाच्या विद्यार्थ्याची गोळाफेक स्पर्धेत राज्यस्तरावर झाली निवड


लिटील हार्ट्स विद्यालयाच्या विद्यार्थ्याची गोळाफेक स्पर्धेत राज्यस्तरावर झाली निवड

अशोक खंडारे/ मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

आष्टी:- लिटिल हार्ट्स विद्यालयाच्या विद्यार्थ्याची गोळाफेक स्पर्धेत राज्यस्तरीय निवड झाली आहे 
जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या विभागस्तरिय मैदानी स्पर्धेत तन्मय चंद्रमणी फुलझेले या विद्यार्थ्यानी 14 वर्षे वयोगटातील गोळाफेक या स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त करत रजत पदक पटकावले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे .
तन्मय चंद्रमणी फुलझले या    विद्यार्थ्यानी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष अनिल आल्लूरवार, सचिव रमेश आरे, मुख्याध्यापक  कृष्णमुर्ती गादे, क्रीडा शिक्षक नितेश पुंगाटी यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी कौतुक केले.


PostImage

Avinash Kumare

Oct. 18, 2024   

PostImage

खुदीरमपल्ली येथील फुटबॉल सामन्याचे बक्षिस वितरण सोहळा संपन्न..!


खुदीरमपल्ली येथील फुटबॉल सामन्याचे बक्षिस वितरण सोहळा संपन्न..!

अहेरी : तालुक्यातील खुदीरामपल्ली येथील खुदीराम बोस स्पोर्टींग क्लब खुदीरामपल्ली द्वारे भव्य फुटबॉल स्पर्धेची आयोजित केले आहे.सदर फुटबॉल स्पर्धेसाठी काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजय कंकडालवार यांचा कडून पहिला पारितोषिक देण्यात येत आहे.दुसरा पारितोषिक आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी कडून तसेच तिसरा पारितोषिक ग्रामपंचायत सदस्य शुभम शेंडे आणि सुकुमार दास पण चौथा पारितोषिक पिनाकी चौधरी कडून देण्यात येत आहे.फुटबॉल स्पर्धेसाठी असे चार पुरस्कार ठेवण्यात आले.

सदर स्पर्धेचे परिसरातील अनेक संघ भाग घेतले होते.शेवटचा दिवस अंतिम सामना गणेशनगर विरुद्ध खुदीरामपल्ली यांच्यात रंगला असुन प्रथम पारितोषिक गणेशनगर संघाला तर दूसरा पारितोषिक खुदीरामपल्ली संघाला तिसरा पारितोषिक मथुरनगरला मिळाला असुन काँग्रेसनेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवर यांच्या मार्गदर्शनखाली येथील काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांचा हस्ते विजेता संघला बक्षीस वितरण करण्यात आली आहे.

सदर बक्षीस वितरण कमलेश सरकार,शुभम शेंडे,सुकमार दास,हार्पित दास,सूखुमार दास,हरिपंत दास,परेश बर्मन,पो.पा.विनोद दास,विमल बाला,कार्तिक दास,रमेन दास,बप्पी चौधरी,परेश विश्वास,रंजन सेन, तपस दास उपस्थित वितरण करण्यात आली.यावेळी मंडळचे अध्यक्ष,उपअध्यक्ष मंडळचे सदस्यगण व गावातील महिला व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.


PostImage

Zadipatti VC News and Business

Sept. 26, 2024   

PostImage

आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी युवकांनी मैदानी खेळ खेळावे- मा.खा.अशोक नेते यांचे …


 

दिं. २६ सप्टेंबर २०२४

आष्टी:-  युवकांचा मैदानी उत्साह वाढविण्यासाठी आज दिं. २६ सप्टेंबर ला श्री..छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था,व श्री.छत्रपती शिवाजी महाराज फुटबॉल क्लब आष्टी द्वारा भव्य  फुटबॉल सामन्याचे आयोजन महात्मा ज्यो.फुले हाँय.च्या पटांगणात करण्यात आले होते.

माजी खासदार अशोकजी नेते यांनी फित कापुन व दीपप्रज्वलन करत  पायाने फुटबॉल उडवून सामन्यांचे उद्घाटन केले. या फुटबॉल सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांनी बोलतांना आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आजच्या काळी मैदानी खेळ अतिशय महत्त्वाचे आहे.कारण आजचे अनेक युवक वर्ग हे दिवसेंदिवस  मोबाईल मध्यें व्यस्त असतांना दिसते अशावेळी त्यांच्या शरीराची हालचाल होत नाही.यासाठी शरीर तंदुरुस्तीसाठी व निरोगी राहण्यासाठी अशा मैदानी खेळाचे अतिशय आवश्यक आहे. आपण हा फुटबॉलचे सामन्यांचा खेळ एक हप्ता चालतोय आपण चांगल्या पद्धतीने व वादविवाद न करता पंचांचा निर्णय अंतिम मानून खेळ खेळावे.असे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी माजी खासदार अशोकजी नेते यांनी केले.

या फुटबॉल प्रतियोगितेचे प्रथम पुरस्कार मा.खा.श्री. अशोकजी नेते यांचेकडून ५१,००१/- व शिल्ड पोलीस निरीक्षक काळे यांचेकडून द्वितिय पुरस्कार जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी मोर्चाचे जिल्हा प्रभारी डॉ.मिलिंदजी नरोटे यांच्याकडून ३१,००१/- व शिल्ड तृतीय पुरस्कार आमदार देवरावजी होळी यांचेकडून २१,००१/- व शिल्ड महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गिताताई हिंगे ह्यांचेकडून चतुर्थ पुरस्कार ॲड.विश्वजीत कोवासे यांचेकडून ११,००१/-व शिल्ड एफ.डी. सी एम यांचेकडून अशा पद्धतीने आयोजन करण्यात आले.

यावेळी फुटबॉल प्रतियोगितेच्या कार्यक्रमाला मंचावर प्रामुख्याने प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव जी कोहळे,भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिलजी तिडके, सहकार आघाडीचे प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष भाऊ पिपरे,आष्टीच्या सरपंच बेबीताई बुरांडे,आष्टीचे पोलीस निरिक्षक विशाल काळे,पांडे सर,बैस सर, प्राचार्य साहेब व शिक्षकवृंद, रतन पोतगंटवार,अशित बैरागी,योगेश बिशवास, शुभम हावलादार, तसेच मोठया संख्येने गावातील नागरिक व खेळाडू तसेच विद्यार्थीनी उपस्थित होते.


PostImage

Vidharbh News

Aug. 7, 2024   

PostImage

Vinesh Phogat को पेरिस ओलंपिक २०२४ से अयोग्य क्यों घोषित …


Olympics 2024 :-  एक आश्चर्यजनक घटनाक्रम में, भारतीय पहलवान Vinesh Phogat को 50 किलोग्राम स्वर्ण पदक मैच के लिए आवश्यक वजन पूरा न करने के कारण पेरिस ओलंपिक से अयोग्य घोषित कर दिया गया है।

 रिपोर्ट्स से पता चलता है कि Vinesh Phogat ने स्वीकृत वजन सीमा से 100 ग्राम अधिक वजन उठाया, जिसके कारण उन्हें अयोग्य घोषित किया गया। नतीजतन, वह रजत पदक के लिए पात्र नहीं होंगी, जिससे 50 किलोग्राम वर्ग में केवल स्वर्ण और कांस्य पदक ही उपलब्ध होंगे।

भारतीय Olympic संघ ने कहा, "यह खेदजनक है कि भारतीय दल महिला कुश्ती के ५० Kg वर्ग से Vinesh Phogat के अयोग्य घोषित होने की खबर साझा कर रहा है। पूरी रात टीम के प्रयासों के बावजूद, आज सुबह उनका वजन ५० Kg  से कुछ ग्राम अधिक था।

 दल द्वारा इस समय कोई और टिप्पणी नहीं की जाएगी। भारतीय दल विनेश Phogat की निजता का सम्मान करने का अनुरोध करता है और चल रही प्रतियोगिताओं पर ध्यान केंद्रित करेगा।"

 

विनेश फोगाट को अयोग्य क्यों घोषित किया गया?

 Vinesh Phogat ने मंगलवार के मुकाबलों के लिए शुरू में वजन सीमा को पूरा किया, लेकिन प्रतियोगिता के दोनों दिनों में उन्हें अपनी श्रेणी में ही रहना था। 

मंगलवार की रात को कथित तौर पर उनका वजन 2 किलो अधिक था। रात भर जॉगिंग, स्किपिंग और साइकिल चलाने सहित गहन प्रयासों के बावजूद, वह अंतिम 100 ग्राम वजन कम नहीं कर पाईं।


भारतीय प्रतिनिधिमंडल ने फोगट को वजन मानदंड पूरा करने के लिए अतिरिक्त समय देने का अनुरोध किया, लेकिन उनके अनुरोध को अस्वीकार कर दिया गया। यह चुनौती Vinesh Phogat के लिए जानी-पहचानी है, जो आमतौर पर 53 किलोग्राम वर्ग में प्रतिस्पर्धा करती हैं और ओलंपिक क्वालीफायर के दौरान उन्हें इसी तरह की समस्या का सामना करना पड़ा था।

विनेश फोगाट: घटनाओं की क्रूर श्रृंखला

मंगलवार को विनेश Phogat ने ओलंपिक फाइनल में पहुंचने वाली पहली भारतीय महिला पहलवान बनकर इतिहास रच दिया। उन्होंने जापान की विश्व की नंबर 1 यूई सुसाकी और यूक्रेन और क्यूबा की पहलवानों के खिलाफ उल्लेखनीय जीत हासिल की। 

​​फाइनल में उनका मुकाबला सारा हिल्डेब्रांट से होना था, एक पहलवान जिसे उन्होंने पहले हराया था। हालांकि, वजन संबंधी समस्या के कारण हिल्डेब्रांट को स्वर्ण पदक मिलेगा और फोगट बिना पदक के प्रतियोगिता से बाहर हो जाएंगी।


यह पहली बार नहीं था जब उन्हें झटका लगा हो। घटनाओं की एक क्रूर श्रृंखला में, वह 2016 में रियो ओलंपिक में चोटिल हो गईं, 2020 में टोक्यो ओलंपिक क्वार्टर फाइनल में बाहर हो गईं और पेरिस ओलंपिक में उन्हें अयोग्य घोषित कर दिया गया।

अधिक वाचा :- एक बडे शराब कारोबारी के बेटे ने शराब मुक्त जीवन के ६ साल पूरे किए, जनिये कोण हैं ये

अधिक वाचा :- E Rupee क्या है और Google Pay, PhonePe RBI के डिजिटल रुपया प्रोजेक्ट से क्यों जुड़ना चाहते हैं?

अधिक वाचा :- Olympic 2024 :- विनेश फोगट फाइनल में पहुंचने वाली पहली भारतीय महिला पहलवान बनीं

अधिक वाचा :- Today Horoscope :- ७ ऑगस्ट २०२४ ; आत्मविश्वासाने कोणताही निर्णय घ्याल 

अधिक वाचा :- जब Vicky Kaushal ने सलमान के सामने कैटरीना को किया प्रपोज तो सलमान ...

अधिक वाचा :- Abhishek Bachchan ने कहा था कि करीना कपूर ने मुझे 'बर्बाद' कर दिया

अधिक वाचा :- Gold Price Decrease :- शेअर बाजारातील वाढीमुळे सोन्याचे भाव विक्रमी पातळीवरून घसरले

अधिक वाचा :- Amitabh Bachchan इस अभिनेत्री के 'सबसे बड़े फैन' हैं, कभी उनके जूते उठाते थे, बाद में उनसे थप्पड़ खाए थे...

अधिक वाचा:- टाटा की नई इलेक्ट्रिक कर्व ईवी कल लॉन्च होगी, इसमे हैं ये खस फिचर 

अधिक वाचा :- Salman Khan के घर गोलीबारी मामले में आरोपी ने जमानत मांगी, दावा किया कि अभिनेता को नुकसान ....

अधिक वाचा :- Today Horoscope :- ६ ऑगस्ट २०२४ ; नकारात्मक विचारांपासून दूर राहा

अधिक वाचा :- रात्री झोपताना Mobile उशेकडे ठेवता, तर मग हे नक्की वाचा

 

अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा.

 

 ⬇️

 

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा

 

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा

 

☎️ : ७७५८९८६७९८

 

जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.


PostImage

Vidharbh News

Aug. 7, 2024   

PostImage

Olympic 2024 :- विनेश फोगट फाइनल में पहुंचने वाली पहली …


Olympic 2024 :- पेरिस :-  Vinesh Phogat ( 50 किग्रा) मंगलवार को यहां क्यूबा की युस्नेलिस गुजमान लोपेज पर 5-0 की आसान जीत के साथ Olympic 2024 खेलों के फाइनल में पहुंचने वाली पहली भारतीय महिला पहलवान बन गईं।

सेमीफाइनल में इस जीत के साथ Vinesh Phogat ने अपने लिए कम से कम रजत पदक सुनिश्चित कर लिया।

दोनों पहलवानों ने सतर्क शुरुआत की, लेकिन लोपेज पर निष्क्रियता घड़ी के कारण विनेश को एक तकनीकी अंक मिला, क्योंकि क्यूबा की पहलवान ने जोखिम नहीं उठाया।

पहले पीरियड के अंत में विनेश 1-0 से आगे थीं।

दूसरे पीरियड में उन्होंने अपना दबदबा कायम रखते हुए चार और अंक लेकर मुकाबला अपने पक्ष में कर लिया।

इससे पहले, Vinesh Phogat ने दो अविश्वसनीय जीत के साथ सेमीफाइनल में प्रवेश किया था। उन्होंने जापान की मौजूदा ओलंपिक चैंपियन यूई सुसाकी और यूक्रेन की आठवीं वरीयता प्राप्त ओक्साना लिवाच को हराया। यह दिन इस जुझारू भारतीय पहलवान के लिए यादगार रहा।

Vinesh Phogat रियो 2016 और टोक्यो 2020 संस्करणों में क्वार्टर फाइनल से बाहर होना पड़ा।

अधिक वाचा :- Today Horoscope :- ७ ऑगस्ट २०२४ ; आत्मविश्वासाने कोणताही निर्णय घ्याल 

अधिक वाचा :- Abhishek Bachchan ने कहा था कि करीना कपूर ने मुझे 'बर्बाद' कर दिया

अधिक वाचा :- Gold Price Decrease :- शेअर बाजारातील वाढीमुळे सोन्याचे भाव विक्रमी पातळीवरून घसरले

अधिक वाचा :- Amitabh Bachchan इस अभिनेत्री के 'सबसे बड़े फैन' हैं, कभी उनके जूते उठाते थे, बाद में उनसे थप्पड़ खाए थे...

अधिक वाचा:- टाटा की नई इलेक्ट्रिक कर्व ईवी कल लॉन्च होगी, इसमे हैं ये खस फिचर 

अधिक वाचा :- Salman Khan के घर गोलीबारी मामले में आरोपी ने जमानत मांगी, दावा किया कि अभिनेता को नुकसान ....

अधिक वाचा :- Today Horoscope :- ६ ऑगस्ट २०२४ ; नकारात्मक विचारांपासून दूर राहा

अधिक वाचा :- रात्री झोपताना Mobile उशेकडे ठेवता, तर मग हे नक्की वाचा

 

अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा

 

 ⬇️

 

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा

 

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा

 

☎️ : ७७५८९८६७९८

 

जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.


PostImage

Chandrawar Media Service

July 12, 2024   

PostImage

खेल के लिए खिलाड़ियों से ली जा रही शुल्क मामले …


 

 एस्ट्रोटर्फ मैदान और मुलना मैदान निरीक्षण में मिली खामियों को लेकर विधायक ने जाहिर की नाराजगी 

 

बालाघाट :- 

 विधायक अनुभा मुंजारे ने जिले में हॉकी खिलाड़ियों के लिए बनाए जा रहे एस्ट्रोटर्फ मैदान और मुलना मैदान का निरीक्षण किया. दोनो ही स्थलो के निरीक्षण मं मिली खामियों को लेकर नाराजगी जाहिर की. हालांकि सबसे ज्यादा नाराजगी उनकी मुलना मैदान में होने वाले खेल में ली जाने वाली फीस और वर्चुअली प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी के कार्यक्रम में सांसद निधि की राशि से मिले एक करोड़ रूपए के स्वीमिंग पुल के भूमिपूजन को लेकर दिखाई दिया. जिस पर उन्होंने नगरपालिका और जिला खेल अधिकारी की भूमिका पर सवाल खड़े किए.

विधायक अनुभा मुंजारे ने निरीक्षण के बाद स्टेडियम में पत्रकारों से चर्चा करते हुए कहा कि जिले में स्टेडियम का इतना बड़ा स्वरूप, दानवीर मुलना जी की देन है. उन्होंने जिले के खिलाड़ियों को यह खेल की तैयारियों को लेकर, स्टेडियम की जगह दान की थी लेकिन उनकी भावना पर आज प्रशासनिक अधिकारी और जिम्मेदार कुठाराघात कर रहे है. उन्होंने कहा कि यहां बैडमिंटन हो या अन्य खेल, उसमें खिलाड़ियों से राशि ली जा रही है. खेलो मं जिले की प्रतिभाएं कोने-कोने में है, ऐसे में जिले के खिलाड़ियों को खेल के बेहतर अवसर उपलब्ध कराने के बजाए, उनसे खेल के लिए राशि ली जा रही है. जिसका वह कड़ा विरोध करती है और इस मामले में वह मुख्यमंत्री को शिकायत करेगी और जरूरत पड़ी तो वह खिलाड़ियों के लिए सड़क पर आकर आंदोलन भी करेगी. उन्होंने कहा कि जब हमने खेल अधिकारी की गैरमौजूदगी के बारे में जानकारी ली तो पता चला है कि वह नहीं आए है. खेल अधिकारी अपने मनमाफिक स्टेडियम को चला रहे है, ऐसा अब नहीं चलेगा.

खास बात यह है कि स्टेडियम में निरीक्षण के दौरान विधायक के जिला खेल एवं युवा कल्याण अधिकारी की गैरमौजूदगी पर मातहत कर्मचारियों ने उनके नहीं आने की बात कही, जबकि स्टेडियम की जिम में नई मशीनों के कलेक्टर डॉ. मिश्रा के शुभारंभ कार्यक्रम के दौरान खेल अधिकारी मौजूद थे. फिर विधायक के निरीक्षण में वह क्यों नहीं पहुंचे?

विधायक अनुभा मुंजारे ने अपने निरीक्षण के दौरान स्वीमिंग पुल निर्माण के लिए तत्कालीन सांसद बिसेन द्वारा दिए गए एक करोड़ रूपए पर सवाल खड़े किए गए. विधायक अनुभा ने कहा कि फरवरी में प्रधानमंत्री के वर्चुअली कार्यक्रम में परिषद के परिसर मं आयोजित कार्यक्रम में स्वीमिंग पुल का भूमिपूजन किया गया. जबकि वर्तमान में स्वीमिंग पुल की जमीनी हकीकत कुछ और है, ना तो इसके लिए स्थान का चयन किया गया है और ना ही कोई टेंडर लगाए गए है. तत्कालीन सांसद बिसेन द्वारा दी गई राशि भी नगरपालिका को नहीं है. इसके बाद भी नगरपालिका में सत्ताधारी भाजपा की परिषद ने बैठक में स्वीमिंग पुल निर्माण का प्रस्ताव ले लिया. जिससे साफ है कि भाजपा की सत्ताधारी नगरपालिका परिषद, नगर की जनता और खिलाड़ियों को गुमराह कर रही है. विधायक अनुभा के निरीक्षण के दौरान नगरपालिका सीएमओ निशांत श्रीवास्तव, महिला नेत्री अंजु जायसवाल, नपा विधायक प्रतिनिधि शफकत खान, पार्षद आशुतोष डहरवाल, महिला कांग्रेस नगर अध्यक्ष शानू राय सहित अन्य कांग्रेसी मौजूद थे.


PostImage

Chandrawar Media Service

July 11, 2024   

PostImage

मॉइल के सहयोग से 5 लाख की मशीनें मुलना स्टेडियम …


खेल विभाग की जिम में नई मशीनों का कलेक्टर ने किया शुभारंभ

बालाघाट कलेक्टर डॉ. गिरीश कुमार मिश्रा ने गुरुवार को खेल विभाग की जिम में मॉइल के सहयोग से प्रदान की गई मशीनों का शुभारंभ किया। मुलना स्टेडियम स्थित जिम के लिए मॉइल ने करीब 5 लाख रुपये की नई मशीनें प्रदान की है। खेल अधिकारी श्री केके चौरसिया ने इस सम्बंध में बताया कि जिले के युवाओं के स्वास्थ्य के प्रति बढ़ावा देने के उद्देश्य से विभाग की कई वर्षों से जिम संचालित है। युवाओ के उत्साह को देखते हुए कलेक्टर डॉ. मिश्रा के निर्देशानुसार मॉइल के सहयोग से जिम को नई मशीनें प्रदान की गई। शुभारम्भ के दौरान मॉइल के डीजीएम श्री राजेश सिंह,जिम ट्रेनर श्री डेक्कन मरकाम मौजूद रहें।

हर तरह के एक्सरसाइज के लिए उपयुक्त होगी नई मशीनें

खेल अधिकारी श्री चौरसिया ने नई मशीनों के सम्बंध में जानकारी देते हुए बताया कि विभाग की जिम में अब हर तरह के एक्सरसाइज किये जा सकेंगे। ट्रायसेफ, बायसेफ के अलावा थाई व फिटनेश के शौकीन के लिए भी जिम में मशीनें है। जिम में एक ट्रेनर नियुक्‍त है जो सुबह 5 बजे से 9 बजे तक तथा शाम को 4 से 9 बजे तक मौजूद रहते है। उनके निर्देशन में जिम की जा सकती है। अब जिम में ओलम्पिक डिक्लाइन, इनलाइन और फ्लैट बैंच, मल्टी बेंच,यूटिलिटी स्टूल, वर्टिकल रो, एडजस्टेबल क्रोस ओवर व अन्य मशीनें उपलब्ध हो गई है।


PostImage

pran

July 10, 2024   

PostImage

गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती


बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी संध्याकाळी गंभीरच्या नियुक्तीची घोषणा केली.

 

माजी भारतीय खेळाडू आणि विश्वचषक विजेता गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडच्या रवानगीनंतर नियुक्ती करण्यात आली आहे.

 

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी संध्याकाळी गंभीरच्या नियुक्तीची घोषणा केली. “भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून मी श्री @ गौतम गंभीर यांचे स्वागत करतो याचा मला खूप आनंद होत आहे. आधुनिक काळातील क्रिकेट झपाट्याने विकसित झाले आहे आणि गौतमने या बदलत्या लँडस्केपचा जवळून साक्षीदार आहे. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत विविध भूमिकांमध्ये दमछाक सहन करून आणि उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे, मला विश्वास आहे की गौतम भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी आदर्श व्यक्ती आहे. #TeamIndia साठी त्याची स्पष्ट दृष्टी, त्याच्या अफाट अनुभवासह, त्याला ही रोमांचक आणि सर्वाधिक मागणी असलेली कोचिंग भूमिका पार पाडण्यासाठी उत्तम प्रकारे स्थान देते. या नवीन प्रवासाला सुरुवात करताना @BCCI त्याला पूर्ण पाठिंबा देते, ”शहाने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर लिहिले.

 

भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून श्री @गौतमगंभीर यांचे मी अत्यंत आनंदाने स्वागत करतो. आधुनिक काळातील क्रिकेट झपाट्याने विकसित झाले आहे आणि गौतमने या बदलत्या लँडस्केपचा जवळून साक्षीदार आहे. धीर सहन करून आणि विविध भूमिकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली... pic.twitter.com/bvXyP47kqJ— जय शाह (@JayShah) 9 जुलै, 2024

 

गंभीर हा एक मालिका विजेता म्हणून ओळखला जातो आणि भारतीय संघाचा नवीन प्रशिक्षक म्हणून त्याचा अफाट अनुभव आणि धैर्य आणेल, ज्याने कॅरेबियनमध्ये ICC T20 विश्वचषक 2024 ची नवीनतम आवृत्ती जिंकली ती आउटगोइंग कोच द्रविडला अलविदा भेट म्हणून.

 

गंभीरची मागील असाइनमेंट आयपीएल चॅम्पियन कोलकाता नाइट रायडर्समध्ये होती कारण दिल्लीत जन्मलेल्या दक्षिणपंजेने कोलकाता-आधारित संघासाठी मार्गदर्शकाची जबाबदारी स्वीकारली आणि शाहरुख खानच्या मालकीच्या युनिटसाठी दशकाहून अधिक प्रतीक्षा केल्यानंतर त्यांना चांदीच्या भांड्यात नेले. . तो निळ्या रंगाच्या पुरुषांच्या सुकाणूवर आपली सुवर्ण धावणे सुरू ठेवण्याचा प्रयत्न करेल.

 

गंभीर 2011 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता आणि त्याने जवळपास तीन दशकांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर प्रतिष्ठेचे विजेतेपद मिळवण्यासाठी मायदेशात आयसीसी शोपीसच्या शिखर सामन्यात 97 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

उच्च-प्रोफाइल नोकरीसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींसह, 42-वर्षीय हे आगामी वर्षांमध्ये भारतीय युनिटचे नेतृत्व करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.

 

 

 


PostImage

MH 33 NEWS

June 30, 2024   

PostImage

🏆गड आला पण दोन्ही सिंह गेले!


 

⭕विराटनंतर कॅप्टन रोहित शर्माचीही निवृत्तीची घोषणा

 

मुंबई:- टीम इंडियाने कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली साऊथ आफ्रिकेला हरवून 2024 चा टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे. बार्बाडोस येथे झालेल्या फायनल सामन्यात टीम इंडियाने 7 धावांनी साऊथ आफ्रिकेचा पराभव करून विजय मिळवला. यामुळे तब्बल 17 वर्षांनी टी 20 वर्ल्ड कप जिंकण्यात भारताला यश आले. या ऐतिहासिक कामगिरी नंतर कॅप्टन रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर भारत विरुद्ध द. आफ्रिका यांच्यात फायनल सामना खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाने फलंदाजी करून साऊथ आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 177 धावांचे आव्हान दिले होते. मात्र साऊथ आफ्रिका विजयाचे टार्गेट पूर्ण करण्यात अयशस्वी ठरली. ज्यामुळे टीम इंडियाने 7 धावांनी हा सामान जिंकला. या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहली पाठोपाठ कॅप्टन रोहित शर्मा याने टी 20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे

फायनल सामन्यात विराटने 59 बॉलमध्ये 76 धावांची कामगिरी केली. यामुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना विराटने आपला हा शेवटचा टी 20 वर्ल्ड कप आहे असे जाहीर करून यानंतर टी 20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तर विराटनंतर रोहित शर्माने सुद्धा सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आपण टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 17, 2024   

PostImage

गडचिरोली पोलीस भरतीची (२०२३-२४)ची शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी प्रक्रिया …


 

आमदार डॉ देवरावजी होळी यांच्याकडे जिल्ह्यातील उमेदवारांची निवेदनाच्या माध्यमातून  मागणी.

दिनांक १७ जुन २०२४ गडचिरोली

  गडचिरोली पोलीस भरती (२०२३-२४) ची शारीरिक परीक्षा आणि मैदानी चाचणी प्रक्रिया दि.  १९ जून २०२४ पासून घेण्यात येत असल्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परंतु आता पावसाळ्याला सुरुवात होत असून  दरवर्षी गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडतो व जिल्ह्यातील असंख्य मार्ग अनेक दिवस बंद पडतात तसेच पावसाळयात  उमेदवारांना राहण्याची व ईतर सोयीच्या दृष्टीने अत्यंत अडचणीचे ठरणार आहे परिणामी  भौतिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेपासून या उमेदवारांना वंचित राहण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.करिता सदर  चाचणी प्रक्रिया पावसाळा संपल्यानंतर घेण्यात यावी अशी मागणी गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवारांनी निवेदनाच्या माध्यमातून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडे केली आहे.
यावेळी  अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद गडचिरोलीचे जिल्हा अध्यक्ष कुणाल कोवे,  उमेश उईके, सुरज मडावी, स्वप्निल मडावी, भारत अलाम , निखिल वाकडे, रुपेश चौधरी, प्रज्वल गेडाम, यांच्या नेतृत्वात  सहभागी उमेदवारांनी आमदार डॉ देवरावजी होळी यांना निवेदन दिले .याप्रसंगी लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री योगीताताई पिपरे ,शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे , प स माजी उप सभापती विलासजी दशमुखे प्रामुख्याने उपस्थित होते.

 एक दिवस आधी भरतीच्या ठिकाणी जाणाऱ्या मुलांना पावसाळा राहिल्यास झोपायला अडचण निर्माण होईल.  मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील उमेदवारांसाठी रस्ते व मार्ग बंद पडतात .  दळणवळणाची साधनेही  बंद राहतात परिणामी चाचणीच्या ठिकाणीं वेळेवर पोहचणे कठिण होईल. वर्षभर जमिनीवर १०० मीटर धावण्याचा सराव केल्यानंतर, रस्त्यावर चाचणी घेतल्यास पाय अडकल्यामुळे गुडघा आणि पायाला कायमची दुखापत होऊ शकते.  पावसात चेंडू फेकल्याने चेंडू कोरडा राहू शकत नाही, प्रगतीशील चेंडू हातातून निसटू शकतो किंवा दुखापत होऊ शकते.  कधी पाऊस पडतो तर कधी नाही, मुलांना समान संधी मिळत नाही.  भेदभाव होईल आणि गुण कमी जास्त येतील.  तसेच, मैदानी चाचणी पावसात घेतल्यास १६०० मीटर धावणे आणि शेतात चिखल असल्यास १०० मीटर धावणे शक्य होणार नाही.  तसेच मैदानी चाचणीच्या तयारीनुसार येणाऱ्या गुणांपेक्षा पावसात घेतल्याने मुलांना खूप कमी गुण मिळतील.  हा मुलांवर अन्याय होईल.

 करिता ही  शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी प्रक्रिया पावसाळा संपल्यानंतर घेण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांनी निवेदनाच्या माध्यमातून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आपली मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून आपल्यावर अन्याय होणार नाही या संदर्भात पत्र व्यवहारद्वारे पाठपुरावा करू असे आश्वासन त्यांनी निवेदकाना दिले.


PostImage

Ramdas Thuse

June 4, 2024   

PostImage

चिमूर स्केटिंग अकॅडमी ने पटकाविले 3 पदकं


चिमूर:-

           दि.२/६/२४ नागपूर येथे इंडियन स्केटिंग अकॅडमीच्या वतीने
स्केटरेसर्स  इंडिया ओपन रोलर स्केटिंग चैपीयनशीप NMC स्केटिंग रिंक नंदनवन नागपूर  येथे स्केटिंग  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 
या स्केटिंग स्पर्धेत नागपूर, उमरेड, चिमूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली, अचलपूर, संभाजीनगर, नाशिक येथून स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेत चिमूरच्या स्पर्धकांनी उत्कृष्ट कामगिरी करीत ३ पदके पटकावलीत. त्यात २  रौप्य पदक व १ कास्यपदकांचा समावेश आहे. 
8 ते 10 वयोगटातील हृदयांश उमेश काटेकर याने रौप्यं पदक पटकाविले.  तसेच १४ वर्षवरील वयोगटातील स्वर्णीका श्रीकांत मार्गोनवार हिने रौप्य पदक पटकाविले. 6 - 8 वयोगटातील पीहल प्रशांत सूर्यवंशी हिने कास्यं पदकं पटकाविले.
10 ते 12 वयोगटातील अनुष श्रीकांत मार्गोनवार व ४-६ वयोगटातील रिध्दीशा उमेश काटेकर यांनी छान प्रयत्न केलेत. सर्व विजेते स्केटर्स चिमूर स्केटिंग अकॅडमी चिमूर चे नियमित खेळाडू आहेत. सर्व खेळाडू आपल्या सफलतेच श्रेय आपल्या आई-वडिलांना तसेच कोच सौ रोशनी उमेश काटेकर यांना देत आहेत. स्केटिंग अकॅडमी चिमूर चे व सर्व विजयी खेळाडूंचे आणि प्रशिक्षकांचे सर्व पालकांकडून तसेच चिमूरवासीयांकडून अभिनंदन केल्या जात आहेत.


PostImage

pran

May 30, 2024   

PostImage

बीसीसीआयने गौतम गंभीरची भारताच्या पुढील मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करणे 'डन …


वृत्तानुसार, बीसीसीआयशी संबंध असलेल्या उच्च-प्रोफाइल व्यक्तींनी म्हटले आहे की गंभीरची सर्वोच्च पदावर नियुक्ती जवळजवळ अपरिहार्य आहे.

 

या कथेच्या आणखी एका वळणात, ताज्या अहवालात असे म्हटले आहे की गौतम गंभीर, ज्याला भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेसाठी सर्वात आघाडीवर म्हणून ओळखले जाते, निःसंशयपणे बीसीसीआय लवकरच त्याची नियुक्ती करेल.

 

Cricbuzz च्या अहवालानुसार, BCCI शी संबंध असलेल्या उच्च-प्रोफाइल व्यक्तिमत्त्वांनी असे म्हटले आहे की, BCCI ने माजी भारतीय फलंदाज आणि WC-विजेता गंभीर यांच्यासाठी कठोर भूमिका घेतल्याने गंभीरची सर्वोच्च पदावर नियुक्ती जवळजवळ अपरिहार्य आहे.

 

हे देखील नोंदवले गेले आहे की आयपीएल फ्रँचायझीच्या एका उच्च-प्रोफाइल मालकाने, बीसीसीआयच्या उच्च पदाधिकाऱ्यांच्या जवळ, वेबसाइटला सांगितले की मुख्य प्रशिक्षक म्हणून गंभीरची नियुक्ती एक 'पूर्ण करार' आहे आणि आयपीएल फायनलनंतर त्याची घोषणा केली जाईल.

 

तथापि, गंभीरने उघडपणे या प्रकरणावर मौन बाळगले आहे, अगदी त्याच्या KKR सहकारी आणि सदस्यांच्या श्रेणींमध्ये, ज्यांना खांदे सरकवून आणि हसत उत्तर देण्यात आले होते.

 

राहुल द्रविडचा विस्तारित कार्यकाळ पूर्ण होत असताना BCCI ने मुख्य प्रशिक्षकपदासाठी नवीन अर्ज मागवल्याची जय शाह यांनी घोषणा केल्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

 

प्रामुख्याने, हे कळले की राहुल द्रविड, ज्याचा विस्तारित कार्यकाळ T20 विश्वचषकानंतर संपतो, तो या पदासाठी पुन्हा अर्ज करू इच्छित नाही.

 

अनेक अहवालांमध्ये या पदासाठी स्टीफन फ्लेमिंगच्या नावांचा समावेश आहे.

 

पण ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते दुसरे कोणी नसून माजी भारतीय फलंदाज आणि WC-विजेता गौतम गंभीर होते.

 

गंभीरच्या सेवा घेण्यामध्ये बीसीसीआयची स्वारस्य असल्याचे अनेक अहवालांसह, असे मानले जाते की दोन्ही संस्थांना एकत्र आणणारा घटक म्हणजे 'देश के लिए करना है' ही कल्पना आहे, राष्ट्रासमोर आव्हान स्वीकारण्याची गरज आहे. .

 

जरी, व्यावसायिक स्तरावर कोचिंगचा अनुभव नसतानाही, गंभीरचे गूढ व्यक्तिमत्व आणि मार्गदर्शन निःसंशयपणे यशस्वी ठरले आहे, कारण कोलकाता नाईट रायडर्सने या मोसमात तिसरे आयपीएल विजेतेपद पटकावले आहे. 

 

 

 


PostImage

News mh33 live

April 13, 2024   

PostImage

पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांची धनुर्विद्या खेलो इंडिया सेंटर आष्टीला …


पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांची धनुर्विद्या खेलो इंडिया सेंटर आष्टीला सदिच्छा भेट

 

भारतीय खेळ प्राधिकरण द्वारा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने केंद्र तथा राज्य सरकारच्या मान्यतेनुसार महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आष्टी येथील जिल्हयात नावलौकिकास आलेल्या धनुर्विद्या खेलो इंडिया सेंटरला भारत सरकार द्वारे पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. परशुराम खुणे यांची खेलो इंडिया सेंटर आष्टी येथे दिनांक तेरा एप्रिल रोजी दुपारी दिड वाजताच्या सुमारास भेट घेऊन सेंटर बद्दल सविस्तर माहिती घेऊन धनुर्विद्या खेळाडूंना मार्गदर्शन केले व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी यावेळी तुलाराम सीताराम नखाते साहित्यिक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले सर तथा धनुर्विद्या मार्गदर्शक डॉ. श्याम कोरडे व महाविद्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते


PostImage

Unity news

March 20, 2024   

PostImage

Indian Premier League: ipl के बारे मै कुछ महत्व पूर्ण …


 

Indian Premier League (ipl) : हॅलो दोस्तो ipl ke बारे aap सभी जाणते ही होगे. केकीन आपको पता है ipl कोणसे साल मै शुरु  हुवा था?  और ipl को क्यू शुरु  किया था? नाही जाणते तो आज जाण जाओगे..

भारतीय प्रीमियर लीग (IPL) का इतिहास 2008 में शुरू हुआ था। यह भारतीय क्रिकेट का एक प्रमुख टूर्नामेंट है जो टीमों के बीच ट्वेंटी20 क्रिकेट प्रतियोगिता का आयोजन करता है। इस लीग का मुख्य उद्देश्य क्रिकेट को अन्य खेलों की तुलना में एक नए, आकर्षक और एकाधिकारिक उपाय में प्रस्तुत करना है।

Indian Premier League: (IPL) में कुल 8टीम होती हैं, जो एक दूसरे के खिलाफ मुकाबले करती हैं। ये टीमें विभिन्न शहरों या राज्यों को प्रतिनिधित्त्व करती हैं और प्रत्येक टीम के पास अपना खुद का नाम, लोगो, और खिलाड़ियों की समृद्धि के लिए एक टीम का प्रबंधक होता है।

IPL में विभिन्न भारतीय शहरों के लिए टीमें होती हैं, जैसे कि मुंबई इंडियंस, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कैपिटल्स, कोलकाता नाइट राइडर्स, राजस्थान रॉयल्स, बैंगलोर रॉयल चैलेंजर्स, सनराइज़र्स हैदराबाद, पंजाब किंग्स XI लखनो सुपर जाईंट,और गुजरात लायंस।

IPL के दौरान खिलाड़ियों को विभिन्न आयोजनों में शामिल होने का मौका मिलता है, जो उन्हें अंतरराष्ट्रीय स्तर पर उनकी क्रिकेट करियर को सुधारने का अवसर प्रदान करता है। इसका पॉपुलैरिटी और महत्व दिन पर दिन बढ़ता जा रहा है, और यह भारतीय क्रिकेट के लिए एक महत्वपूर्ण प्रतियोगिता बन चुका है।

        टीम  के खिलाडीयोंके  नाम..

 

1: Gujarat Titans 

1: अभिनव मनोहर : Right-Handed बॅट्समन 

2: डावीड मिलर : Left-Handed बॅट्समन 

3:  विलियामसन : Right-Handed बॅट्समन 

4:साई सुधारसाण Left-Handed बॅट्समन 

5:शुभमन गिल (C) : Right-Handed बॅट्समन 

6: राहुल तेवतिया :Left-Handed बॅट्समन • Right-Arm Leg स्पिन Bowler

7: शाहरुख खान : Right-Handed बॅट्समन 

8: विजय शंकर : Right-Handed बॅट्समन • Right-Arm मेडीयम Bowler

9: मॅटहेव वाडे (Wk): Left-Handed बॅट्समन 

10: रशीद खान : Right-Arm लेग स्पिन Bowler

 

2: dc

players: Rishabh Pant( c), David Warner, Prithvi Shaw, Yash Dhull, Abishek Porel, Axar Patel, Lalit Yadav, Mitchell Marsh, Pravin Dubey, Vicky Ostwal, Anrich Nortje, Kuldeep Yadav, Lungi Ngidi, Khaleel Ahmed, Ishant Sharma, Mukesh Kumar

3: pbks

Shikhar Dhawan(c),  Matthew Short, Prabhsimran Singh, Jitesh Sharma, Sikandar Raza, Rishi Dhawan, Liam Livingstone, Atharva Taide, Arshdeep Singh, Nathan Ellis, Sam Curran, Kagiso Rabada, Harpreet Brar, Rahul Chahar, Harpreet Bhatia, Vidwath Kaverappa, Shivam Singh.

4:Lsg

Quinton de Kock , KL Rahul(c ), Nicolas Pooran . Devdutt Padikkal, Ayush Badoni, Ashton Turner, Deepak Hooda, K. Gowtham, Krunal Pandya, Kyle Mayers, Marcus Stoinis, Prerak Mankad, Yudhvir Singh Charak, David Willey , Arshin Kulkarni, Md. Arshad Khan,  Mark Wood , Mayank Yadav, Mohsin Khan, Ravi Bishnoi, Yash Thakur, Amit Mishra, Naveen-ul-Haq, Shivam Mavi, Manimaran Siddarth.

5:csk

MS Dhoni (c), Moeen Ali, Deepak Chahar, Devon Conway, Tushar Deshpande, Shivam Dube, Ruturaj Gaikwad, Rajvardhan Hangargekar, Ravindra Jadeja, Ajay Mandal, Mukesh Choudhary, Matheesha Pathirana, Ajinkya Rahane, Shaik Rasheed, Mitchell Santner, Simarjeet Singh, Nishant Sindhu, Prashant Solanki, Maheesh Theekshana, Rachin Ravindra, Shardul Thakur, Daryl Mitchell, Sameer Rizvi, Mustafizur Rahman, Avanish Rao Aravelly

6:mi

Ishan Kishan, Vishnu Vinod.Rohit Sharma, Tim David , Suryakumar Yadav, N. Tilak Varma, Dewald Brevis Hardik Pandya, Romario Shepherd , Nehal Wadhera, Shams Mulani, Gerald Coetzee, Mohammad Nabi, Shivalik Sharma, Naman Dhir, Jasprit Bumrah, Jason Behrendorff, Kumar Kartikeya, Akash Madhwal, Arjun Tendulkar, Piyush Chawla, Dilshan Madushanka , Nuwan Thushara , Anshul Kamboj, Shreyas Gopal.

7:Rcb

Faf du Plessis (c) 

Glenn Maxwell

Virat Kohli

Rajat Patidar

Anuj Rawat

Dinesh Karthik

Suyash Prabhudessai

Will Jacks

Mahipal Lomror

Karn Sharma

Manoj Bhandage

Mayank Dagar

Vijaykumar Vyshak

Akash Deep

Mohammed Siraj

Reece Topley

Himanshu Sharma

Rajan Kumar

Cameron Green

Alzarri Joseph

Yash Dayal

Tom Curran

Lockie Ferguson

Swapnil Singh

Saurav Chauhan.

 

8: hrs

Aiden Markram (Captain)

Washington Sundar

Rahul Tripathi

Mayank Agarwal

Abhishek Sharma

Heinrich Klaasen

Bhuvneshwar Kumar

Marco Jansen

Abdul Samad

T Natarajan

Umran Malik

Shahbaz Ahmed

Glenn Phillips

Fazalhaq Farooqi

Mayank Markande

Upendra Yadav

Anmolpreet Singh

Nitish Kumar Reddy

Sanvir Singh

Pat Cummins

Travis Head

Jaydev Unadkat

Wanindu Hasaranga

Jhathavedh Subramanyan

Akash Singh

 

9:RR

Yashasvi Jaiswal, Shimron Hetmyer, Rovman Powell, Riyan Parag, Shubham Dubey, Sanju Samson (c), Jos Buttler, Dhruv Jurel, Tom Kohler-Cadmore*, Kunal Singh Rathore

 

ये कुछ प्रमुख खिलाड़ी हैं, जो अपने अपने टीम के साथ खेलते हैं। टीम में अन्य भी कई उत्कृष्ट खिलाड़ियों के मौजूद होते हैं।

Thank you.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 15, 2024   

PostImage

निश्चित ध्येय गाठण्यासाठी लक्ष केंद्रित करणे गरजेचे:भाग्यश्री ताई आत्राम


 

स्व.राकेश कन्नाके स्मुर्ती प्रीत्यर्थ रात्रकालीन व्हॉलीबॉल स्पर्धा

आलापल्ली: क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून ज्यांनी नैपुण्य प्राप्त केले ते यशस्वी झाल्याची दिसून येत आहे. खेळाच्या माध्यमातून केवळ मनोरंजन न करता आपल्याला गतिमान चातुर्य टिकवून ठेवण्यासाठी कसरत करावी लागते. क्रीडा क्षेत्रात नावलौकिक करायचे असेल तर कठोर परिश्रमाची गरज आहे. जे अडचणीवर मात करून पुढची पायरी शोधतात तेच यशस्वी होतात.त्यामुळे निश्चित ध्येय गाठण्यासाठी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले.

आलापल्ली येथील क्रीडा संकुल मैदानात स्व.राकेश कन्नाके स्मुर्ती प्रीत्यर्थ एकता व्हॉलीबॉल क्लब,आलापल्ली तर्फे आयोजित भव्य रात्र कालीन व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सह उद्घाटक म्हणून माजी प स सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम,प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच शंकर मेश्राम, उपसरंच विनोद अक्कनपल्लीवार, माजी जि प सदस्य लैजा चालुरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, ग्रा.प.सदस्य पुष्पा अलोने,मनोज बोलूवार,सोमेश्वर रामटेके,स्वप्नील श्रीरामवार,छाया सप्पीडवार, प्रतिष्ठित नागरिक तथा राकॉचे वासुदेव पेद्दीवार,नागेपल्लीचे ग्रा प मलरेड्डी येमनूरवार,सदस्य कैलास कोरेत, सांबय्या करपेत,बालाजी गावडे,पराग पांढरे,सुचिता खोब्रागडे,इरफान शेख,संजय मडावी,इम्रान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आपल्या भागात विविध खेळ खेळले जातात.काही खेळाडू विविध खेळात सातत्य ठेवतात तर काही खेळाडू केवळ स्पर्धा असलं की खेळतात.कुठल्याही खेळात नियमित सराव आवश्यक असते.उत्कृष्ट खेळाडूंना आता चांगली संधी उपलब्ध झाली आहे.व्हॉलीबॉल,कबड्डी आणि क्रिकेट सारख्या खेळांना विशेष महत्त्व आहे.प्रो कबड्डी आणि आयपीएल मुळे खेड्यापाड्यातील खेळाडू समोर येत आहेत.त्यामुळे कुठलही खेळ असो नियमित सराव करा आणि मिळालेल्या संधीचा सोनं करा असे आवाहन भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले.

या स्पर्धेसाठी उत्कृष्ट असे पारितोषिक आणि शिल्ड देण्यात येणार असल्याने मोठ्या प्रमाणात व्हॉलीबॉल चमुंनी सहभाग घेतला.उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी व्हॉलीबॉल खेळत मैदान गजविले.दरम्यान पाहुण्यांचा क्रीडा संकुल येथे आगमन होताच एकता व्हॉलीबॉल क्लब तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.आयोजकांनी चांगलं नियोजन केले होते.


PostImage

MH 33 NEWS

March 11, 2024   

PostImage

*नेहरू युवा केंद्राच्या वतीने आयोजित नारीशक्ती फिटनेस स्पर्धेत धावल्या नारी*


 

गडचिरोली : 21 व्या शतकातील नारी ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, क्रीडा क्षेत्रासह इतरही क्षेत्रात आजच्या स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समोर जात आहेत. परिवारिक जबाबदाऱ्यांसह इतर जबाबदाऱ्या महिला पार पाडत असताना त्यांचे आरोग्यसुद्धा सुदृढ राहणे अत्यंत महत्वाचे आहे. त्याकरिता नेहरू युवा केंद्र गडचिरोलीच्या वतीने जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांच्या मार्गदर्शनात फिटनेस रन स्पर्धेचे आयोजन केले होते.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नारी शक्ती अभियानांतर्गत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात 50 पेक्षा जास्त मुलींसह काही युवकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यात प्रथम क्रमांक ख़ुशी एडलावार, द्वितीय गौरी चौधरी, तृतीय पल्लवी कुमरे यांनी पटकाविला. विजेत्या स्पर्धकांना टी-शर्ट, कॅप आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेचे यशस्वी आयोजन नेहरू युवा केंद्र समन्वयक अनुप कोहळे, नेहरू युवा केंद्र समन्वयक पुजा निंदेकर, इशिका देठेकर, गुरुकुल अकॅडमी गडचिरोलीचे संचालक पुष्कर सेलोकर, अश्विन दुर्गे, अमित सुरजागडे, सुदर्शन जाणकी, प्रज्वल बोधनकर आणि संपूर्ण गुरुकुल अकॅडमीच्या समुहाने मिळून केले.