:- लाल संविधान किंवा लाल पुस्तक दाखवून राहुल गांधी कोणाला इशारा देत आहात? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना केला आहे. राहुल गांधी आज (6 नोव्हेंबर) महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान, आज त्यांच्या दौऱ्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी भारत जोडो यात्रा संविधान बचाव मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर तोफ डागली. अशातच याच मुद्यावरुन आता विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर देत जोरदार पालटवार केला आहे.
राहुल गांधींना अर्बन नक्षल म्हणणे म्हणजे सामाजिक संस्थांचा अपमान करणे होय. आता हे घाबरले आहे. त्यामुळे फडणवीस असे बोलत आहे. मात्र राज्याचे गृहमंत्री असेलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यंत्रणा आहे, त्यामुळे त्यांनी चौकशी करावी. असे थेट आव्हानही विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.
तर भाजपच्या पोटात दुखायचं कारण काय?
सामाजिक संस्थांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा कुठलाही राजकीय अथवा पक्षाचा कार्यक्रम नाही. या सगळ्या संस्थांनी राहुल गांधींना आमंत्रित केलं आणि त्यांचे निमंत्रण राहुल गांधींनी स्वीकारलं, म्हणून राहुल गांधी नागपुरातील कार्यक्रमाला उपस्थित राहत आहे. राहुल गांधी यांचा आजचा नागपूर दौरा हा अराजकीय कार्यक्रम आहे. नागपूरमधून आज प्रचाराच नारळ फोडला जात नाहीये. प्रचारच नारळ फोडायला वेळ आहे. ओबीसी युवा एकता मंच या सामाजिक संघटनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दरम्यान, आपला नेता येत असल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. आज राहुल गांधी दीक्षाभूमी येथे जात आहे. कारण संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरक्षा कवच दिले. तर भाजपच्या पोटात दुखायचं कारण काय? असा सवाल करत विजय वडेट्टीवार यांनी या विषयावर स्पष्टोक्ती दिली आहे. तर आज मुंबई येथे जाहीर होणारा जाहीरनामा हा ऐतिहासिक राहणार असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
गेल्या दहा वर्षापासून सरकारला या गोष्टी का आठवल्या नाही? गृहमंत्री अमित शहा शेतकऱ्यांचा कर्जमाफीला उघड विरोध केलेला आहे. जर देशाचे गृहमंत्री अमित शहा देशाचा कर्जमाफीला विरोध करत असतील आणि तिथे कर्ज मुक्तीच्या घोषणेला राज्यातील भाजपचा पाठिंबा आहे का? हे भाजपने स्पष्ट केलं पाहिजे. राज्यामध्ये भाजपचे सरकार आहे. त्याचा राज्यात शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालेली नाही. सर्वात जास्त घोटाळे शिंदे सरकारच्या काळात झाले आहे, असा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
आरमोरी : विधानसभा निवडणुकीसाठी एकजुटीने कामाला लागा, कुठल्याही स्थितीत विरोधकांच्या भूलथापांना मतदार बळी पडता कामा नयेत, याची दक्षता घ्या, असे आवाहन ज्येष्ठ सहकार नेते व राज्य सहकार विकास महामंडळाचे अध्यक्ष अरविंद सा. पोरेड्डीवार यांनी केले.
येथे महायुतीचे उमेदवार व आमदार कृष्णा गजबे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ५ नोव्हेंबरला पोरेड्डीवार यांच्या हस्ते फीत कापून झाले. भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सा. पोरेड्डीवार, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, माजी
उपनगराध्यक्ष हैदर पंजवानी, भाजपा जिल्हा सचिव नंदू पेटेवार, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, शिंदेसेना महिला जिल्हाप्रमुख अर्चना गोंदोळे, भाजपा तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिलीप मोटवानी, अमीन लालानी आदींची उपस्थिती होती.
यावेळी अरविंद पोरेड्डीवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने संविधान बदलाबाबत चुकीची माहिती बिंबवली. मात्र, संविधानाचा भाजप कायम आदर करत आहे. अपप्रचार होऊ नये, यासाठी कार्यकत्यांनी दक्ष राहावे, असे आवाहन त्यांनी केले. पंकज खरवडे यांनी संचालन केले तर अक्षय हेमके यांनी आभार मानले.
:- महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या महायुती आणि महाविकास आघाडीसह सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात सभा आणि मेळावे सुरु आहेत. या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच दिनांक ५ नोव्हेंबर रोजी महायुतीची एकत्रित जाहीर सभा कोल्हापूरमध्ये पार पडली. या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी १० मोठी आश्वासने दिली आहेत. यामध्ये लाडक्या बहिणींना १ हजार ५०० रुपयांवरून २ हजार १०० रुपये, शेतकऱ्यांची कर्जमाफी, २५ हजार महिलांची पोलीस भरती अशी १० मोठी आश्वासने दिली आहेत.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“२०१४ साली झालेल्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात याच ठिकाणावरून आम्ही केली होती. आता देखील या ठिकाणाहून प्रचाराची सुरुवात आम्ही करत आहोत. आता २३ तारखेला आम्ही विजयाचा गुलाल घेतल्यानंतर पुन्हा या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाहीत. आमच्या महायुतीचा जो जाहीरनामा आहे, त्या जाहीरनाम्यातील १० प्रमुख आश्वासने आज या ठिकाणी मी तुमच्यासमोर सांगत आहे. आम्ही जे बोलतो ते करतो. त्यामुळे आता आम्ही लाडक्या बहिणींना १ हजार ५०० रुपयांवरून २
हजार १०० रुपये करणार असल्याचं आश्वासन आम्ही देत आहोत”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री शिंदेंनी कोणते १० आश्वासन दिले?
-लाडक्या बहिणींना १ हजार ५०० रुपयांवरून २ हजार १०० रुपये देण्याचं आश्वासन.
– २५ हजार महिलांची पोलीस दलात भरती करण्याचं आश्वासन.
– शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेसह राज्य आणि केंद्राचे मिळून आता १५ हजार करणार.
– तसेच एमएसपीवर २० टक्के अनुदान देण्याचं आश्वासन आम्ही देत आहोत.
– वृद्ध पेन्शन योजनेमध्ये आता १ हजार ५०० रुपयांवरून २ हजार १०० रुपये करण्यात येणार आहेत.
– २५ लाख रोजगार निर्मिती करण्याचं काम आम्ही करणार आहोत, तसेच १० लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्याचं आश्वासन.
– २५ हजार गावात रस्ते बाधण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. शहराच्या विकासाबरोबरच गावाचाही विकास
करण्याचं आश्वासन
– अंगणवाडी आणि आशा सेविकांना १५ हजार आणि विमा सुरक्षा देण्याचं आश्वासन.
– विजबिलामध्ये ३० टक्के कपात करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत.
– महायुतीचं सरकार आल्यानंतर ‘व्हिजन २०२९’ हे १०० दिवसांच्या आत सादर करण्याचं आश्वासन.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची आज एकत्र कोल्हापूरमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. तसेच महायुतीच्या जाहीरनाम्यातील १० प्रमुख आश्वासने मुख्यमंत्री शिंदे यांनी वाचून दाखवली. तसेच हे फक्त ट्रेलर असून सविस्तर जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी सांगितली.
गडचिरोली : भाजप महायुती विरोधात देशपातळीवरील तयार झालेल्या इंडिया अलायन्स आणि राज्यातील महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने राज्यात अधिकृत उमेदवारी दिलेल्या उमेदवारांना आता महाविकास आघाडी - इंडिया अलायन्स पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूकीत उभे राहण्याचे आदेश दिलेले असून गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार जयश्रीताई वेळदा - जराते या आता महाविकास आघाडी - इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत.
शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे चिटणीस भाई ॲड. राजेंद्र कोरडे यांनी पक्षाच्या वतीने राज्यातील सर्व उमेदवारांना याबाबत लेखी पत्राद्वारे कळविले आहे की, शेतकरी कामगार पक्ष हा इंडिया अलायन्स आणि राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाने जे अधिकृत उमेदवार उभे केलेले आहेत ते इंडिया अलायन्स व महाविकास आघाडीचेच पुरस्कृत उमेदवार आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्ष भाजप महायुती विरोधात प्रचाराला सुरुवात करणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके - विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांनी दिली आहे.
जयश्री वेळदा - जरातेंवर दाखल आहेत ३ गुन्हे
शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार जयश्रीताई वेळदा - जराते यांच्यावर वेगवेगळे आंदोलन केल्याबद्दल ३ गुन्हे दाखल असल्याची माहिती त्यांनी आपल्या शपथपत्रात दिलेली आहे.जयश्री वेळदा यांचेवर एटापल्ली पोलीस स्टेशन येथे भांदवी ३६५, भांदवी १८८, १४३, २७९ म.पो.का. ३७(१), (३), १३५ असे दोन तर गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये भादंवी १८८ म.पो.का.१३५ असा एक गुन्हा दाखल असून अहेरी व गडचिरोली न्यायालयात सदर प्रकरणे प्रलंबित आहेत. गडचिरोली विधानसभाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात लोकांसाठी काम करतांना, आंदोलन करतांना गुन्हे दाखल असलेल्या त्या एकमेव महिला उमेदवार आहेत. जल, जंगल, जमीन आणि खदानविरोधी आंदोलनातील प्रमुख कार्यकर्त्यांपेकी एक असलेल्या जयश्री वेळदा यांनी भाई रामदास जराते यांचेसह २०१७ मध्ये चंद्रपूर मध्यवर्ती कारागृहात १५ दिवस न्यायालयीन कोठडीत घालविलेले आहेत हे विशेष!
गडचिरोली दि. 5 (जि.मा.का.) : विधानसभा निवडणूकसाठी आरमोरी मतदारसंघातून 8, गडचिरोलीतून 9 आणि अहेरीतून 12 उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे. या सर्व उमेदवारांना संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक चिन्हाचे वाटप केले आहे.
विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नाव, पक्ष व चिन्ह पुढीलप्रमाणे आहे
67-आरमोरी विधानसभा मतदार संघ:
राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार : अनिल (क्रांती) तुलाराम केरामी-बहुजन समाज पार्टी (हत्ती), कृष्णा दामाजी गजबे- भारतीय जनता पार्टी (कमळ), रामदास मळूजी मसराम- इंडियन नॅशनल काँग्रेस (हात).
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार : चेतन नेवशा काटेंगे-आझाद समाज पार्टी -कांशी राम (किटली), मोहनदास गणपत पुराम-वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर).
इतर उमेदवार : आनंदराव गंगाराम गेडाम,अपक्ष (बॅट), खेमराज भाऊ नेवारे- अपक्ष(ऊस शेतकरी), डॉ. शिलु चिमुरकर पेंदाम- अपक्ष (रोड रोलर).
68-गडचिरोली विधानसभा मतदार संघ:
राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार :
मनोहर तुळशिराम पोरेटी-इंडियन नॅशनल काँग्रेस (हात), डॉ. मिलिंद रामजी नरोटे- भारतीय जनता पार्टी (कमळ), संजय सुभाष कुमरे- बहुजन समाज पार्टी(हत्ती)
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार : जयश्री विजय वेळदा- पीझन्टस् ॲन्ड वर्कर्स् पार्टी ऑफ इंडिया (ऊस शेतकरी), भरत मंगरुजी येरमे- वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर), योगेश बाजीराव कुमरे- गोंडवाना गणतंत्र पार्टी (करवत).
इतर उमेदवार : दिवाकर गुलाब पेंदाम-अपक्ष (ऑटो रिक्शा), बाळकृष्ण वंगणूजी सावसाकडे- अपक्ष(बॅट), डॉ. सोनल चेतन कोवे- अपक्ष (शिट्टी)
69- अहेरी विधानसभा मतदार संघ: अत्राम धर्मरावबाबा भगवंतराव -नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी(घड्याळ), अत्राम भाग्यश्री धर्मरावबाबा – नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार (तुतारी वाजवणारा माणूस), रमेश वेल्ला गावडे- बहुजन समाज पार्टी (हत्ती), संदीप मारोती कोरेत-महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्वे इंजिन).
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार : निता पेंटाजी तलांडी- प्रहर जनशक्ती पार्टी(बॅट).
इतर उमेदवार : आत्राम दिपक दादा – अपक्ष (टेबल), कुमरम महेश जयराम- अपक्ष(अंगठी), गेडाम शैलेश बिच्चू-अपक्ष (स्टूल), नितीन दादा पदा- अपक्ष (कढई), राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवानराव आत्राम- अपक्ष(ऑटो रिक्शा), लेखामी भाग्यश्री मनोहर- अपक्ष (ट्रम्पेट), हनमंतु गंगाराम मडावी- अपक्ष (रोड रोलर).
00000
दिं. ०५ नोव्हेंबर २०२४, गडचिरोली
गडचिरोली: भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), आणि पी. रि. पा. यांच्या महायुतीच्या ६८ गडचिरोली विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंदजी नरोटे यांचे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज उत्साहात पार पडले. माजी खासदार व भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महायुतीच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा जल्लोष अनुभवता आला.
उद्घाटन प्रसंगी अशोकजी नेते यांनी जनसंपर्क कार्यालयाच्या महत्त्वावर प्रकाश टाकत म्हटले की, निवडणुकीत मतदारांशी थेट संपर्क साधण्यासाठी आणि त्यांच्या अडचणींना उत्तर देण्यासाठी हे कार्यालय केंद्रबिंदू ठरेल. त्यांनी पुढे नमूद केले की, आजच्या या उद्घाटनाने निवडणुकीच्या दृष्टीने एक नवा उत्साह निर्माण झाला आहे. महायुतीच्या विजयी मोहिमेची सुरुवात येथेच होत आहे.
कार्यक्रमात अशोकजी नेते यांनी मुख्यमंत्री "लाडकी बहीण" योजनेचा उल्लेख करत, राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या योजना कशा महत्त्वाच्या आहेत, यावर भर दिला. महिला, शेतकरी आणि युवकांच्या कल्याणासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले. यावेळी विरोधकांच्या योजनांविरोधातील भूमिकेवरही त्यांनी टीका केली.
जनसंपर्क कार्यालय निवडणूक प्रचारात एक महत्त्वाचे साधन असल्याचे नमूद करत मि ही दोनदा आमदार व दोनदा खासदार याच प्रचार कार्यालयाच्या माध्यमातुन होऊन या द्वारे जनहित संपर्क वाढला जातोय पुढे बोलत अशोक नेते म्हणाले, मतदारांच्या समस्या, अपेक्षा आणि अडचणींचा प्रत्यक्ष संवाद याच कार्यालयाच्या माध्यमातून साधला जाईल. यामुळे मतदारांना उमेदवाराविषयी विश्वास वाढेल.
प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन करत डॉ. मिलिंदजी नरोटे यांना विजयी करण्याचा संकल्प दृढ केला. डॉ. नरोटे हे प्रगतीशील विचारांचे प्रतिनिधी असून जनहितासाठी कार्यरत असलेल्या उमेदवार असल्याचे नेत्यांनी सांगितले. यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी, महायुतीचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन सोहळ्यात मंचावर उपस्थित मान्यवर महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंदजी नरोटे, जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, माजी आमदार तथा भाजपा नेते डॉ. नामदेवराव उसेंडी, शिवसेना नेते हेमंतजी जब्बेवार, समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,जिल्हा महामंत्री योगिता पिपरे,जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेशजी भुरसे,भाजपा नेत्या डॉ. चंदाताई कोडवते, शिवसेनेचे नेते राजुभाऊ कावडे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ तिडके, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे आणि शिवसेनेच्या नेत्या नीताताई वडेट्टीवार,अविनाशजी वरघंटे, दीपकजी बारसागडे यांसह मोठ्या संख्येने महायुतीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
गडचिरोली :-विधानसभा निवडणूकसाठी आरमोरी मतदारसंघातून 8, गडचिरोलीतून 9 आणि अहेरीतून 12 उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे. या सर्व उमेदवारांना संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक चिन्हाचे वाटप केले आहे.
विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नाव, पक्ष व चिन्ह पुढीलप्रमाणे आहे
67-आरमोरी विधानसभा मतदार संघ:
राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार : अनिल (क्रांती) तुलाराम केरामी-बहुजन समाज पार्टी (हत्ती), कृष्णा दामाजी गजबे- भारतीय जनता पार्टी (कमळ), रामदास मळूजी मसराम- इंडियन नॅशनल काँग्रेस (हात).
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार : चेतन नेवशा काटेंगे-आझाद समाज पार्टी -कांशी राम (किटली), मोहनदास गणपत पुराम-वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर).
इतर उमेदवार : आनंदराव गंगाराम गेडाम,अपक्ष (बॅट), खेमराज भाऊ नेवारे- अपक्ष(ऊस शेतकरी), डॉ. शिलु चिमुरकर पेंदाम- अपक्ष (रोड रोलर).
68-गडचिरोली विधानसभा मतदार संघ:
राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार :
मनोहर तुळशिराम पोरेटी-इंडियन नॅशनल काँग्रेस (हात), डॉ. मिलिंद रामजी नरोटे- भारतीय जनता पार्टी (कमळ), संजय सुभाष कुमरे- बहुजन समाज पार्टी(हत्ती)
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार : जयश्री विजय वेळदा- पीझन्टस् ॲन्ड वर्कर्स् पार्टी ऑफ इंडिया (ऊस शेतकरी), भरत मंगरुजी येरमे- वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर), योगेश बाजीराव कुमरे- गोंडवाना गणतंत्र पार्टी (करवत).
इतर उमेदवार : दिवाकर गुलाब पेंदाम-अपक्ष (ऑटो रिक्शा), बाळकृष्ण वंगणूजी सावसाकडे- अपक्ष(बॅट), डॉ. सोनल चेतन कोवे- अपक्ष (शिट्टी)
69- अहेरी विधानसभा मतदार संघ: अत्राम धर्मरावबाबा भगवंतराव -नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी(घड्याळ), अत्राम भाग्यश्री धर्मरावबाबा – नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार (तुतारी वाजवणारा माणूस), रमेश वेल्ला गावडे- बहुजन समाज पार्टी (हत्ती), संदीप मारोती कोरेत-महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्वे इंजिन).
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार : निता पेंटाजी तलांडी- प्रहर जनशक्ती पार्टी(बॅट).
इतर उमेदवार : आत्राम दिपक दादा – अपक्ष (टेबल), कुमरम महेश जयराम- अपक्ष(अंगठी), गेडाम शैलेश बिच्चू-अपक्ष (स्टूल), नितीन दादा पदा- अपक्ष (कढई), राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवानराव आत्राम- अपक्ष(ऑटो रिक्शा), लेखामी भाग्यश्री मनोहर- अपक्ष (ट्रम्पेट), हनमंतु गंगाराम मडावी- अपक्ष (रोड रोलर).
बल्लारपूर :- एखाद्या अपक्ष उमेदवाराची फार चर्चा होत असेल तर तो उमेदवार प्रस्तापित उमेदवाराला टक्कर देणारा आहे, हा संदेश दुरवर पोहचतोय. लोकसभेत सुधीर मुनगंटीवार यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. कदाचित त्याचमुळे सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात लढण्याची स्पर्धा रंगली होती. आता बल्हारपूर मतदार संघातून बंडखोर आणि काही अपक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होणाऱ्या या मतदार संघात डॉ. अभिलाषा गावातूरे यांच्यामुळे तिहेरी लढत होण्याचं चित्र निर्माण झालं आहे.
भाजपचे सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे संतोष सिंह रावत आणि अपक्ष उमेदवार डॉ. गावातूरे अशी इथे लढत होणार आहे. डॉ. गावतुरे यांनी लोकसभेच्या दरम्यान काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. केवळ काँग्रेसही त्यांची ओळख नाही. सामाजिक कार्यातून त्यांनी आपल्या नावाचा ठसा जिल्ह्यात उमटवला आहे. याचा फायदा त्यांना निवडणूकीत होताना दिसत आहे. संतोष सिंह रावत हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यामुळे काँग्रेसचे परंपरागत मते त्यांना मिळणार आहेत. मूल आणि पोंभुर्णा तालुक्यात त्यांचे कार्यकर्ते पसरले आहेत. याचा फायदा त्यांना होवू शकतो. बल्हारपूर मतदारसंघ मुनगंटीवार यांचा बालेकिल्ला ठरला आहे. या क्षेत्रात त्यांनी भरीव विकासकामे केली आहेत. मात्र त्यांचा विकास अनेकांना रुचलेला दिसत नाही.
लोकसभा निवडणुकीत याची प्रचिती जिल्हाला आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिने कलावंत यांची चंद्रपुरात लोकसभा निवडणुकीत मोठी रेलचेल दिसली होती. मात्र त्याचा फायदा मुनगंटीवारांना झालेला नाही. त्यामुळे लोकसभेपेक्षाही विधानसभा निवडणूक मुनगंटीवार यांना जरा अवघडचं झालेली दिसत आहे . या मतदारसंघात तिहेरी लढत होईल, अशी चर्चा सुरु आहे. तसे झाले तर मुनगंटीवार यांना ती धोक्याची सूचना ठरणार आहे.
:-विधानसभा निवडणूक येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात पार पडणार आहेत. तर त्याचे निकालही २३ नोव्हेंबर रोजी समोर येणार आहे. या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालीये. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावलाय.
विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या उमेदवारांसाठी जाहीर प्रचारसभांचा धडाका लावला आहे. आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील कोल्हापुरातील महायुतीच्या सभेसाठी हजर राहणार आहेत. तर आगामी काळात देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा धडाका लावला असून राज्यभरात फडणवीस हे ६ दिवसांमध्ये २१ सभा होणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे आज नागपूरमधील रॅलीनंतर कोल्हापुरात महायुतीच्या सभेला हजेरी लावणार आहेत. महायुतीचे सरकार आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यभरात २१ सभांचे नियोजन करण्यात आले आहे. यादरम्यान देवेंद्र फडणवीस पश्चिम महाराष्ट्रासह अर्धा महाराष्ट्र ढवळून काढणार आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातही सभा होणार आहेत. दरम्यान, येत्या ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकूण चार ठिकाणी देवेंद्र फडणवीस सभा घेणार आहेत.
29 उमेदवारांमध्ये लढत
आरमोरी-8, गडचिरोली-9 आणि अहेरीतून-12 उमेदवार रिंगणात
गडचिरोली दि. 4 (जि.मा.का.) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अंतिम दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघातून एकूण 11 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज मागे घेतले. यामुळे आता आरमोरीतून 8, गडचिरोलीतून 9 आणि अहेरीतून 12 उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे.
67-आरमोरी मतदारसंघातून माधुरी मुरारी मडावी, वामन वंगनुजी सावसाकडे, निलेश देवाजी हलामी आणि रमेश गोविंदा मानागडे या ४ उमेदवारांनी, 68-गडचिरोली मतदार संघातून आसाराम गोसाई रायसिडाम, डॉ. देवराव मादगुजी होळी, मोरेश्वर रामचंद्र किनाके, वर्षा अशोक आत्राम, विश्वजीत मारोतराव कोवासे या 5 उमेदवारांनी आणि 69- अहेरी मतदारसंघातून अवधेशराव राजे सत्यवानराव आत्राम व आत्राम अजय मलय्या या 2 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
उमेदवार आहेत रिंगणात :नामनिर्देश अर्ज मागे घेतल्यानंतर विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नाव, पक्ष पुढीलप्रमाणे आहे
67-आरमोरी विधानसभा मतदार संघ:
रामदास मळूजी मसराम- इंडियन नॅशनल काँग्रेस, कृष्णा दामाजी गजबे- भारतीय जनता पार्टी, आनंदराव गंगाराम गेडाम-अपक्ष, शिलू प्रविण गंटावार- अपक्ष, मोहनदास गणपत पुराम-वंचित बहुजन आघाडी, चेतन नेवशा काटेंगे-आझाद समाज पार्टी (कांशीराम), अनिल तुलाराम केरामी-बहुजन समाज पार्टी,खेमराज वातूजी नेवारे- अपक्ष.
68-गडचिरोली विधानसभा मतदार संघ: मनोहर तुळशिराम पोरेटी-इंडियन नॅशनल काँग्रेस, डॉ. मिलींद रामजी नरोटे- भारतीय जनता पार्टी, संजय सुभाष कुमरे- बहुजन समाज पार्टी, जयश्री विजय वेळदा- पीजेंट्स ॲन्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया, भरत मंगरुजी येरमे- वंचित बहुजन आघाडी, योगेश बाजीराव कुमरे- गोंडवाना गणतंत्र पार्टी, दिवाकर गुलाब पेंदाम-अपक्ष, बाळकृष्ण वंगणूजी सावसाकडे- अपक्ष, डॉ. सोनल चेतन कोवे- अपक्ष
69- अहेरी विधानसभा मतदार संघ:आत्राम धरमरावबाबा भगवंतराव -नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी, आत्राम भाग्यश्री धर्मरावबाबा – नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), रमेश वेल्ला गावडे- बहुजन समाज पार्टी, संदीप मारोती कोरेत-महाराष्ट्र नवनिर्माण सेना, निता पेंटाजी तलांडी- प्रहार जनशक्ती पार्टी, आत्राम दिपक मल्लाजी- अपक्ष, कुमरम महेश जयराम- अपक्ष, गेडाम शैलेश बिच्चू-अपक्ष, नितीन कविश्वर पदा- अपक्ष, राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवानराव आत्राम- अपक्ष, लेखामी भाग्यश्री मनोहर- अपक्ष, हनमंतु गंगाराम मडावी- अपक्ष
00000
गडचिरोली :: महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे महासचिव ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी सार्वत्रिक विधानसभा निवडूणूक 2024 करीता गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केले होते, मात्र अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव तथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे विदर्भ प्रभारी कुणाल चौधरी , राष्ट्रीय आदिवासी सेलचे उपाध्यक्ष तथा लोकसभा निरीक्षक बेलई नाईक यांनी ऍड. विश्व्जीत मारोतराव कोवासे यांच्या निवासस्थानी भेट देऊन समजूत काढली दरम्यान कुणाल चौधरी यांनी भ्रमनध्वनी द्वारे महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी रमेशजी चेन्निथल्ला, तसेच राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोकजी गहलोत, छत्तीसगड चे माजी मुख्यमंत्री भूपेशजी बघेल, अ. भा. कॉंग्रेस कमिटी सचिव अविनाश पांडे यांच्याशी ऍड. विश्व्जीत कोवासे यांचे बोलणे करून दिले असता पक्षहिताचा व्यापक विचार करून ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
यावेळी उमेदवारी अर्ज मागे घेतांना त्यांच्या सोबत लोकसभा निरीक्षक बेल्लई नाईक, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम सह गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
गडचिरोली :-अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या गडचिरोली विधानसभा क्षेत्राकरिता विद्यमान आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून भारतीय जनता पार्टीची डोकेदुखी वाढवण्याचे काम केले होते. पण पक्षाच्या वरिष्टानी लक्ष घालून डॉ. देवराव होळी यांची यांना समज देऊन आपला नामांकन अर्ज मागे घेण्यासाठी भाग पाडले. आज आमदार डॉ. देवराव होळी यांनी आपला अर्ज मागे घेतला त्याप्रसंगी विधानसभा प्रभारी प्रमोद पिपरे व गडचिरोली भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे हजर होते.
विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी हे पक्षातच राहून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांचा प्रचार करणार आहेत व पक्ष विजयासाठी प्रयत्न करणार आहेत.
आमदार डॉ.देवराव होळी प्रदेश उपाध्यक्षपदी
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी आमदार डॉ. देवराव होळी यांची निवड प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे त्यांच्या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.
पटणा, . प्रशांत किशोर यांनी बिहारच्या मतदारांना एक अनोखे आवाहन केले आहे, ज्यात त्यांनी पैसे घेऊन मतदान करणाऱ्या मतदारांना पैसे घ्या पण पैसे देणाऱ्यांना मतदान करण्याऐवजी योग्य उमेदवाराला मतदान करा असे सांगितलं आहे. मत देण्यासाठी कोणी पैसे देत असेल तर ते घ्या, कारण तो तुमच तुमचाच पैसा आहे, जो राजकारण्यांनी लुटला आहे असा टोलाही प्रशांत किशोर यांनी लगावला. तसेच विरोधी पक्षांनी दिलेला पैसा घेण्यात काही गैर नाही, कारण तो जनतेचा पैसा आहे, मात्र जनतेने मतदानाच्या वेळी आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे असेही म्हटले आहे. प्रशांत किशोर लोकांना म्हणाले की, विरोधक पैसे देत असतील तर ते नक्की घ्या, पण मतदानाच्या दिवशी आत जाऊन जन सुराज्यच्या बाजुने मतदान करा.
कोणी 500 रुपये देतील, कुणी दोन हजार रुपये देतील. मात्र हा पैसा सर्वसामान्य जनतेचा असून, इंदिरा आवास, रेशन कार्ड आणि अन्य योजनांमध्ये लाच म्हणून घेतला गेला आहे. नेत्यांनी 5 वर्षे जनतेचा पैसा लुटला आणि आता तोच पैसा निवडणुकीत थोडा थोडा देऊन मते विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेच्या विश्वासाचा गैरवापरकरणाऱ्या नेत्यांना धडा शिकविण्याची ही संधी असल्याचे प्रशांत किशोर यांनी जनतेला सांगितले.
जन सुराज्यच्या समर्थनार्थ सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन केले आणि जनतेच्या निर्णयानेच नवीन व्यवस्थेची आणि सुशासनाची सुरुवात शक्य असल्याचे आश्वासन दिले.
प्रशांत किशोर यांनी लालू यादव आणि नितीश कुमार यांच्यावर थेट हल्लाबोल करताना म्हटले की, हे लोक बिहारमध्ये 35 वर्षांपासून सत्तेत आहेत, मात्र बिहारच्या शेतकऱ्यांना आजपर्यंत शेतीसाठी जमीन देण्यात आलेली नाही. आता वेळ आली आहे की, बिहारमध्ये एक नवीन व्यवस्था बनवायला हवी, जी प्रत्यक्षात जनतेच्या हिताला प्राधान्य देईल.
निवडणुकीत सल्ला देण्यासाठी 100 कोटी घेतो
जनसुराज्य पक्षाचे संयोजक तथा माजी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी स्वतः संदर्भात एक मोठा खुलासा केला आहे. किशोर म्हणाले, जेव्हा आपण निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करत होतो. तेव्हा केवळ एका निवडणुकीत कुठल्याही पक्षाकडून अथवा नेत्याकडून सल्ला देण्यासाठी 100 कोटी अथवा त्याहूनही अधिक शुल्क घेत होतो. प्रशांत किशोर यांनी विहारच्या बेलागंज येथे होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान गुरुवारी हा खुलासा केला. प्रशांत किशोर हे गुरुवारी बेलागंजमध्ये जन सूराज्यचे उमेदवार मोहम्मद अमजद यांच्या समर्थनार्थ प्रचार करत होते. यावेळी, आपण प्रचारासाठी पैसा कुठून आणतात, असा प्रश्न आपल्याला नेहमीच विचारला जातो? तर आपण निवडणुकीमध्ये पक्षाच्या कोणत्याही नेत्याला सल्ला देण्यासाठी 100 कोटींहून अधिक शुल्क आकारतो, असे त्यांनी म्हटले आहे.
गडचिरोली : लोकसभा असो की विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गडचिरोलीत कायम हस्तक्षेप करतात. जिल्ह्यातील नेत्यांना डावलून परस्पर निर्णय घेतात. इतके वर्ष प्रामाणिकपणे पक्षात कार्य करूनही आमची कोंडी होत असेल तर वेगळा मार्ग का निवडू नये, असा सवाल उपस्थित करून आरमोरीचे माजी आमदार आनंदराव गेडाम ची यांनी आपण अर्ज मागे घेणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेत सर्वाधिक बंडखोरी काँग्रेसमध्ये झाली आहे. उमेदवारी न मिळाल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे. यात आरमोरी विधानसभेतून काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी बंडाचे निशाण कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांच्यावर टीका केली आहे. याठिकाणी काँग्रेसने माजी आमदार गेडाम यांना डावलून रामदास मसराम यांना संधी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून इच्छुक असेलेले माजी आमदार आनंदराव गेडाम, वामनराव सावसागडे, डॉ. शिलू चिमुरकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. ४ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, पक्षाकडून नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न होत आहे. यासंदर्भात माजी आमदार आनंदराव गेडाम यांना विचारणा केली असता त्यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, वडेट्टीवार नेहमीच गडचिरोली जिल्ह्यात हस्तक्षेप करतात. जिल्ह्यातील आदिवासी नेत्यांकडे दुर्लक्ष केल्या जाते. आम्ही देखील इतके वर्ष पक्षासाठी काम केले. पण वडेट्टीवारांकडून आमची कायम कोंडी केल्या जाते. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडीत देखील हाच प्रकार झाला. सर्वच दृष्टीने मी पात्र असताना देखील एका नवख्या आणि निष्क्रिय व्यक्तीला संधी देण्यात आली. हे केवळ वडेट्टीवार यांच्या हस्तक्षेपामुळे झाले. अशी टीका करून गेडाम यांनी अपक्ष अर्ज मागे घेणार नाही, असे स्पष्ट केले. गेडाम यांच्या बंडामुळे आरमोरीत काँग्रेसला मत विभाजनाचा फटका बसू शकतो, असे जाणकार सांगतात. त्यामुळे काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अहेरी, गडचिरोलीतही आव्हान
जिल्ह्यात केवळ आरमोरीच नव्हे तर अहेरी आणि गडचिरोलीत देखील काँग्रेस समोर बंडखोरांचे आव्हान आहे. गडचिरोलीत विश्वजीत कोवासे, डॉ. सोनल कोवे तर अहेरीत हणमंतू मडावी आणि नीता तलांडी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यातून कोवासे, कोवे हे माघार घेऊ शकतात पण मडावी आणि तलांडी ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला याचा फटका बसू शकतो. बंडखोरांची समजूत काढण्यासाठी काँग्रेसचे काही महत्त्वाचे पदाधिकारी उद्या गडचिरोलीत येणार आहे. त्यांच्या भेटीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
वंचित बहुजन आघाडी, गडचिरोली विधानसभेचे तडफदार अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले उमेदवार भरत येरमे यांच्या निवडणूकीची प्लॅनिंग मिटींग संपन्न झाली.
निवडणूकीची प्रचार यंत्रणा, पाम्प्लेट, हॅंडबिल, बिल्ले, जाहिरनामा, बॅनर, गाड्या, प्रचार कार्यालय, आदि विविध विषयावर मुद्देसुध चर्चा करण्यात आली, दोन दिवसात सर्व यंत्रणा उपलब्ध करण्यासाठी जबाबदारीचे नियोजन करण्यात आले, यावेळी पूर्व विदर्भ सदस्य बाळू टेंभुर्णे, उमेदवार भरत येरमे, जेष्ठ नेते जी के बारसिंगे,महिला नेत्या मालाताई भजगवळी, येरमे मॅडम, विलास केळझरकर, तुळशिराम हजारे, युवा नेते कवडू दुधे, भारत रायपूरे, अशोक पेटकर, भोजराज रामेके, वासुदेव मडावी, आदि महत्वपूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणातील प्रभावी मतदार संघ अशी अहेरी विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे .या मतदार संघातून राज्याचे कॅबिनेट मंत्री विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अपेक्षेप्रमाणे उमेदवारी जाहीर झाली. भाजपच्या कोट्यात असलेल्या या मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री राजे अंबरीश राव महाराज इच्छुक होते आता महायुतीकडून अजित पवार गटाची उमेदवारीचा जाहिर झाल्याने अंबरीश राव महाराज आत्राम यांना अन्य पर्याय शोधावे लागणारं आहे. रोहीत पवार नाना पटोले यांच्या संपर्कात असलेले राजे आता कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेतात की अपक्ष राहतात याकडे लक्ष लागून आहे.
विद्यमान आमदार मंत्री धर्मरावबाबा हे लोकसभेसाठी इच्छुक होते मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने आणि कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेता ते ही माझी शेवटची निवडणुक राहणार अशी साद घालत पुन्हा एकदा निवडणुकींच्या मैदानात उतरले. त्यांची मोठी कन्या भाग्यश्री ही विधानसभा लढण्यास इच्छुक असल्याने तिने वडीलाविरोधात बंड करीत तुतारी हाती घेतली.. त्यामुळे धर्मराव आत्राम यांच्यासमोर राजकीय विरोधकासोबतच कौटुंबिक कलहाला सामोरे जावे लागत असल्याने त्यांच्यासमोर फार मोठे आव्हान आहे .
समस्याग्रस्त मतदार संघ अशी अहेरी मतदार संघाची ओळख आहे . या मतदार संघात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. आरोग्य सुविधांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. गेल्या पाच वर्षात तर या मतदार संघातील नागरीक अनेक समस्यांनी हैराण झाले . अपघाताचे प्रमाण वाढले मात्र लोकप्रतिनिधी मतदार संघातील समस्या सोडविण्यात अपयशी ठरल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. एटापल्ली तालुक्यातील सूरजागड लोहखनिज उत्खननासबंधी स्थानिकानी अनेकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला माञ धर्मराव बाबांनी नेहमी उत्खनन करणाऱ्या कंपनीला अनुकूल भुमिका घेतली त्यामुळे स्थानिकामद्ये नाराजीची भावना आहे. स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देत नसल्याची ओरड आहे. असे असले तरी कोणत्याही परिस्थीतीत हा मतदार संघ आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी ते मतदार संघ पिंजून काढत आहे. विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना त्यांनी आपल्या गळालालावले आहे.मतदार संघात प्रचारात आघाडीही घेतली आहे. वडलापेठ येथील लोहखनिज प्रकल्पाला जमिन दान दिली असून मतदार संघातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याची हमीही त्यांनी घेतली आहे यासाठी त्यांनी रोजगार मेळावेही घेतले. लोकसभा निवडणूकीतअहेरी मतदार संघात महायुतीच्या उमेदवाराला बारा हजारांच्या आसपास या मतदार संघात पिछाडी मिळाली आहे.. त्यामुळे महायुतीमद्ये धाकधुक आहे.आता मतदार संघातील मतदार माझी शेवटची निवडणुक आहे अशी साद घातलेल्या धर्मरावबाबांना प्रतिसाद देऊन पुन्हा संधी देतात की विरोधात कौल देतात हे 23 नोहेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.