PostImage

सुपर फास्ट बातमी

Today   

PostImage

Chandrapur news:मतदारांना आमिष; निवडणुकीच्या मध्यरात्री BJP उमेदवाराचे ६१ लाख जप्त


 

चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांनाआमिष देण्यासाठी पैशाचा वापर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच निवडणुकीच्या मध्यरात्री गडचांदूर येथील एका घरातून तब्बल ६१ लाखांची रोकड आणि प्रचार साहित्य निवडणूक आयोगाने जप्त केली. जप्त केलेले प्रचारसाहित्य भाजपाचे राजुरा विधानसभा क्षेत्राचे उमेदवार देवराव भोंगळे यांचे असल्याचे पोलिस सूत्राने सांगितले.

 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पोलिसांची नजर होती. दरम्यान, गडचांदूर येथील एका घरी निवडणुकीत वाटप करण्यासाठी मोठी रक्कम ठेवून असल्याची माहिती निवडणूक आयोगाला मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी धाड टाकून ती ६१ लाखांची रोकड जप्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजुरा विधानसभा प्रमुख अरुण निमजे यांनी आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आहे. पुढील तपास निवडणूक आयोगाच्या चमूतर्फे सुरू आहे 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Today   

PostImage

घरात पतीचा मृतदेह; तरीही पत्नीने बजावले 'मत' कर्तव्य


 

 अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) : घरातपतीचा मृतदेह, कुटुंबात दुःखाचे सावट सर्वत्र पसरले, जन्मदात्याचे छत्र हरविल्याने मुलीसुद्धा शोकसागरात बुडाल्या. दुःख वियोगात असलेल्या त्या माउलीने व दोन मुलींनी मतदान केंद्रात जाऊन मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. ही घटना येथील वॉर्ड क्रमांक १७ मध्ये घडली.

 

येथील रहिवासी शंकर ग्यानबा लाडे (४७) यांचे बुधवारी सकाळी ६ वाजता निधन झाले. पतीच्या दुःखवियोगात असलेल्या त्या माउलीने मतदान करण्याचा निर्णय घेतला. मृतदेह घरात असताना घरच्या सर्व मंडळींनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. त्यानंतर शंकर लाडे यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

 

पत्नीचा मृतदेह घरात; पतीने केले मतदान

 

कळमडू (ता. चाळीसगाव) : मुलगा लष्करात भरती होऊन कर्नाटकातप्रशिक्षणाला गेलेला, इकडे मतदानाच्या दिवशी पत्नी छायाबाई (४०) यांचे आकस्मिक निधन झाले. हे सर्व दुःख विसरून राजेंद्र नामदेव बच्छे यांनी परिवारातील सदस्यांसह आधी मतदानाचे कर्तव्य पार पाडले, त्यानंतर सायंकाळी चार वाजता पत्नीवर अंत्यसंस्कार केले.

 

● मुलगा देशसेवेसाठी सैनिकी प्रशिक्षणाला बेळगावला असल्याने आईच्या अंत्यविधीला तातडीने येऊ शकत नव्हता. त्यामुळे मुलगी रोहिणी बच्छे हिने मुलाप्रमाणे कर्तव्य पार पाडून आईला अग्नी डाग दिला

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Today   

PostImage

मतदान करून घरी परतताना अपघातात महिला ठार


 

 

देचलीपेठा : अहेरी तालुक्यातील देचली येथे मतदानाचा हक्क बजावून घरी परतताना जीपमधून खाली कोसळल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना २० नोव्हेंबरला दुपारी अडीच वाजता घडली. पोरीयाबाई विजया वेलादी (वय ५०, रा. आसली) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचे देचली केंद्रावर मतदान होते. त्यासाठी एका उमेदवाराने दिलेल्या जीपमधून त्या गेल्या होत्या. आसली ते देचली हे तीन किलोमीटर अंतर आहे. मतदान करून इतर महिलांसमवेत परतत होत्या. वाटेत खड्यात जीप आदळली. यावेळी त्या खाली कोसळल्या. डोक्यातून रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला.

 

मतदानाचा हक्क बजावून आले अन् काळाने गाठले

 

एटापल्ली : येथे मतदानाचा हक्क बजावून घरी परतल्यानंतर एका व्यावसायिकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. शरीफ शेख (वय ५५) असे त्या व्यापाऱ्याचे नाव आहे. सकाळी अकरा वाजता त्यांनी एटापल्लीतील केंद्रावर तासभर रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजाविला. त्यानंतर ते घरी परतले. मात्र, त्यांना छातीत वेदना होत असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेले; परंतु डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Today   

PostImage

Armori news: कर्तव्य बजावण्यास नकार, अधिकाऱ्यावर गुन्हा


 

 

आरमोरी विधानसभा क्षेत्रात ऐनवेळी निवडणूक कर्तव्य बजावण्यास नकार दिल्याने मतदान अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. तहसीलदार प्रिती डुड्डुलकर यांनी १९ नोव्हेंबरला दिलेल्या तक्रारीवरून देसाईगंज ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. मारुती नथ्थुजी बावणकर असे गुन्हा नोंद झालेल्या मतदान अधिकाऱ्याचे नाव आहे. ते येंगलखेडा येथील तुकाराम विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची आरमोरी विधानसभा क्षेत्रातील मतदान प्रक्रियेसाठी केंद्राध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांना याबाबत प्रशिक्षण दिले होते. १८ रोजी त्यांना देसाईगंज येथील वखार महामंडळाच्या गोदामात ईव्हीएम नेण्यासाठी बोलावणे धाडले, परंतु निवडणूक पथकासोबत जाण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करावी लागली. मात्र, निवडणूक कार्यास नकार दिल्याने तहसीलदार प्रिती डुडुलकर यांच्या फिर्यादीवरून मारुती बावणकर यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३४ व भारतीय न्याय संहिताचे कलम २२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक अजय जगताप करत आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday   

PostImage

१११ वर्षाच्या आजीचे उत्साहात मतदान


 

 

गडचिरोली दि .२०: गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मतदार मोठ्या संख्येत उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले आहेत.सकाळी ७ वाजेपासूनच प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. लोकशाहीच्या या उत्सवात तरुण मतदारांनाही लाजवणारा उत्साह दाखवत येथील १११ वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले.

 

फुलमती बिनोद सरकार (वय १११) असे त्या आजींचे नाव असून त्या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी आहेत. फुलमती सरकार यांचा जन्म १ जानेवारी १९१३ रोजी झाला. आजीला चालता येत नसल्याने प्रशासनाने चारचाकी वाहन आणि व्हील चेअरची व्यवस्था केली होती.आजीने प्रत्यक्ष मतदान करत मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला. आजींच्या मतदानाचा उत्साह कौतुकास्पद होता. तर मतदानाकडे पाठ फिरविणाऱ्या तरुण वर्गासाठी १११ वर्षांच्या आजींचा हा उत्साह आदर्शवत होता.

 

भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षावरील मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली होती. त्या कालावधीत गृह मतदान प्रक्रिया सुद्धा राबविण्यात आली. मात्र फुलमती सरकार या वृद्ध आजीने मतदान केंद्रावरच जाऊन प्रत्यक्ष मतदान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी आज प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.

 

लोकशाहीच्या उत्सवात तब्बल १११ वय असलेल्या या आजींनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन मतदान करणे ही अभिमानास्पद बाब आहे. त्यांनी गृह मतदान नाकारून लोकशाहीच्या उत्सवात प्रत्यक्ष सहभाग घेतला.एवढेच नव्हे, तर तिने आपल्या बांगला भाषेत सर्वांना मतदान करण्याचे आवाहन देखील केले हे विशेष.

 

प्रशासनाने शाल-श्रीफळ देऊन केले स्वागत

फुलमती बिनोद सरकार या आजीला प्रशासनाने चारचाकी वाहनातून मतदान केंद्रावर आणले. त्यांनतर शालेय विद्यार्थी,गावकरी तसेच प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्पांचा वर्षाव करत मतदान केंद्राच्या आवारात स्वागत केले.त्यांनतर आजीने उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. प्रशासनाच्या वतीने अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी फुलमती बिनोद सरकार यांना शॉल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत स्वागत केले.यावेळी मुलचेराचे गटविकास अधिकारी एल. बी. जुवारे,पुरवठा अधिकारी इंगोले,तलाठी रितेश चिंदमवार, ग्रामपंचायतचे सचिव अक्षय कुळमेथे तसेच आदी कर्मचारी उपस्थित होते.

 

कोरोना काळात लसीकरणातही पुढाकार

फुलमती सरकार यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये देखील गोविंदपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान कले.एवढंच काय तर देशावर कोरोना महामारीचा संकट असताना सुरुवातीला गडचिरोली जिल्ह्यात लसीकरणासाठी नागरिकांचा विरोध होता. या आजींनी लसीकरणातही पुढाकार घेऊन स्वतः लस घेत लसीकरणासाठी सर्वांनी पुढे यावे असंही आवाहन केलं होतं.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday   

PostImage

नितेश कराळे मास्तरला मिळाला चांगलाच चोप


Wardha: आज निवडणुकीचे मतदान अंतिम टप्प्यात आले असतानाच हाणामारी करण्याचा प्रकार घडला. सर्वत्र खदखद मास्तर म्हणून प्रसिद्ध असलेले व आता राष्ट्रवादी (शरद पवार गट) काँग्रेसचे स्टार प्रचारक नितेश कराळे यांना चांगलाच चोप बसला. सोशल माध्यमावर वऱ्हाडी बोलीने कराळे यांनी चांगलीच लोकप्रियता कमावली. पण आजच्या घटनेत त्यांनाच बदडण्यात आल्याने तेच या माध्यमावर चर्चेचा विषय ठरत आहे. झाले असे की कराळे हे मांडवा या आपल्या गावी मतदान करून वर्धेकडे परत येत होते.

 

समोरच उमरी हे गाव आहे. तिथे त्यांनी मतदान केंद्राची पाहणी सूरू केली. भाजपचे बूथ नियमबाह्य असल्याचा दावा करीत त्यांनी बूथवर उपस्थित भाजप कार्यकर्त्यांशी वाद घातला. तसेच रागावले, असे ऐकायला मिळाले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे नेते असलेले उमरीचे माजी सरपंच सचिन खोसे यांना बोलावून घेतले.

 

 

कराळे यांचे काही बोल खोसे यांना मनाला लागल्याने त्यांनी थेट कराळे यांना पकडून चांगलेच चोपले. तेव्हा काही स्थानिक मंडळींनी मध्यस्थी करीत वाद सोडविला. या घटनेने कराळे चांगलेच हादरून गेल्याचे गावकरी सांगतात. याप्रकरणी दोन्ही गट सावंगी पोलीस ठाण्यात पोहचले आहे. कराळे या संदर्भात बोलतांना म्हणाले की हा गुंडगिरीचा प्रकार आहे. मी उमरी गावातून जात असतांना काँग्रेसच्या बूथवर थांबलो. तेव्हा कार्यकर्त्यांनी भाजप बूथवर नियमापेक्षा अधिक लोकं लॅपटॉप घेऊन बसले असल्याचे सांगितले. तेव्हा सचिन खोसे हा माझा काहीही दोष नसतांना मारायला धावला. मला व माझ्या मुलीला पण मार बसला.

 

 

हे असे गुंडगिरीचे राजकारण आम्ही खपवून घेणार नाही. तर खोसे गटाने स्पष्ट केले की मास्टरला नको तिथे नाक खुपसायची सवय आहे. सर्व शांततेत सूरू असतांना याने वाद घालणे सूरू केले. जर चुकीचे असते तर प्रशासनाने ते बंद पाडले असते. पण सर्व काही मलाच समजते, या गुर्मीत नेहमी राहणाऱ्या आम्ही कां ऐकून घ्यावे म्हणून समजावले, असे खोसे गटाने स्पष्ट केले आहे. प्रकरण झाल्यावर भाजप व काँग्रेसीचे वरिष्ठ नेते घटनास्थळी पोहचले. समजूत काढण्यात आली.

 

पोलीस अधीक्षक अनुराग जैन म्हणाले की हा केवळ दोन व्यक्तीतील वाद आहे. दोन्ही गट पोलीस ठाण्यात आले असून त्यांच्या तक्रारी नोंदवून घेणे सूरू आहे. बाकी मतदान प्रक्रिया नियमित सूरू असल्याचे पोलीस अधीक्षक म्हणाले.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday   

PostImage

गडचिरोली जिल्ह्यात मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद,सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 69.63 टक्के …


 

गडचिरोली,दि.20 (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील 67-आरमोरी, 68-गडचिरोली व 69-अहेरी या तीनही मतदारसंघात आज शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. दुर्गम, नक्षलग्रस्त भागातील अतिसंवेदनशील मतदानकेंद्रांवरही मतदानासाठी नागरिकांची मोठ्या रांगा लागल्या होत्या. कुठल्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडला नाही. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यात सरारी 69.63 टक्के मतदान झाले होते. यात 67-आरमोरी – 71.26 टक्के , 68-गडचिरोली- 69.22 टक्के व 69-अहेरी- 68.43 टक्के इतकी नोंदविण्यात आली आहे. मतदानाची अंतिम टक्केवारी दुर्गम भागातील पथकांकडील आकडेवारी मिळाल्यावर स्पष्ट होणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी कळविले आहे. 

आज सकाळपासूनच मतदारांनी मोठ्या उत्साहाने लोकशाहीच्या या उत्सवात भाग घेतल्याचे जागोजागी लागलेल्या मतदारांच्या मोठमोठ्या रांगेतून दिसून येत होते. शहरी व ग्रामीण भागत मतदारांनी मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. वृद्ध व दिव्यांग मतदारांकरीत व्हीलचेअरची व्यवस्था तसेच सर्वांकरिता पाणी व आवश्यक त्या सर्व प्रकारच्या सोयी सुविधा मतदान केंद्रांवर करण्यात आल्या होत्या. मदतीसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे कर्मचारी नेमण्यात आले होते. अनेक ठीकाणी मतदानाची वेळ संपल्यावरीही नागरिक मतदानासाठी रांगेत उपस्थित होते. अशा ठिकाणी रांगेतील शेवटच्या मतदारापासून सर्वांना टोकन वाटप करून त्यांचे मतदान पूर्ण करण्यात आले.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday   

PostImage

महाराष्ट्राच्या जनतेचा कौल नेमकी कुणाला? महाविकास आघाडीला की महायुतीला?


Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll : महाराष्ट्र विधानसभेसाठी आज (२० नोव्हेंबर) मतदान पार पडले आहे. महाराष्ट्रात आज २८८ विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडलं आहे. आता मतदानाची वेळ संपली असून उमेदवारांचं भवितव्य मतदारपेटीत बंद झालं आहे. या निवडणुकीचा निकाल आता २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. त्यामुळे या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे.

 

दरम्यान, आता महाराष्ट्राच्या जनतेचा कौल नेमकी कुणाला? महाविकास आघाडीला की महायुतीला? तसेच कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात? किती अपक्ष उमेदवार निवडून येतात? या यासंदर्भातील एक्झिट पोल आता समोर आले आहेत. समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये नेमकी काय अंदाज व्यक्त करण्यात आला आहे? जाणून घेऊयात.

 

महायुतीला जास्त जागा मिळतील?

सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती विजय मिळवून महाराष्ट्रात सत्ता कायम ठेवेल असा अंदाज काही एक्झिट पोल्सनुसार वर्तवण्यात येत आहे. यामध्ये मॅट्रीक्स, पोल डायरी, चाणक्य, पी-एमएआरक्यू या एक्झिट पोल्सने महायुतीला जास्त जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे.

 

 

 

कोणत्या एक्झिट पोल्सचा अंदाज काय?

पी-एमएआरक्यू पोल्सचा अंदाज काय?

पी-एमएआरक्यूने महायुती १३७ ते १५७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. तर महाविकास आघाडीला १२६ ते १४६ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे, तसेच इतर २ ते ८ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

 

 

चाणक्यचा एक्झिट पोल काय?.......

महायुती १५२ ते १६० : भाजप-९०, शिवसेना शिंदे-४८, राष्ट्रवादी (अजित पवार) २२महाविकास आघाडी १३० ते १३८ : काँग्रेस-६३, शिवसेना (ठाकरे) ३५, राष्ट्रवादी (शरद पवार) ४० आणि इतर ६ ते ८

 

मॅट्रीक्सचा एक्झिट पोल काय?.......

महायुती १५० ते १७० : भाजप-८९ ते१०१, शिवसेना शिंदे-३७ ते ४५, राष्ट्रवादी (अजित पवार) १७ ते २६

महाविकास आघाडी ११० ते १३० : काँग्रेस-३९ ते ४७, शिवसेना (ठाकरे) २१ ते ३९, राष्ट्रवादी (शरद पवार) ३५ ते ४३

 

 

 

पोल डायरीचा अंदाज काय?......

महायुतीच्या पोल्सनुसार महायुतीला १२२ ते १८६ आणि महाविकास आघाडीला ६९ ते १२१ जागा मिळण्याचा अंदाज. यामध्ये महायुतीत भाजपाला ७७ ते १०८, शिवसेना (शिंदे) २७ -५०, राष्ट्रवादी (अजित पवार) १८ ते २८. तसेच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस २८-४७, शिवसेना (ठाकरे) १६ ते ३५, राष्ट्रवादी (शरद पवार) २५ ते ३९ जागा मिळतील असा अंदाज.

 

 

 

पीपल्स पल्स एक्झिट पोलचा अंदाज काय?.......

पीपल्स पल्स एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजपाच्या नेतृत्वाखालील युती १७५ ते १९५ जागा जिंकेल. तसेच महाविकास आघाडी ८५ ते ११२ जागा जिंकेल. तसेच अपक्ष आणि इतर पक्ष ७ ते १२ जागा जिंकतील.

 

पोलस्टर एक्झिट पोलचा अंदाज काय?........

भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती महाराष्ट्रात १५० ते १७० जागा जिंकेल. तसेच महाविकास आघाडी ११० ते १३० जागा जिंकेल आणि अपक्ष आणि इतर पक्ष ८ ते १० जागा जिंकतील.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday   

PostImage

राज्याच्या जनतेचा कौल कुणाला, एक्झिट पोलमध्ये निकाल काय? जाणून घ्या …


 

मुंबई : गेल्या अनेक दिवासंपासून राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार केला जात होता. आज (20 नोव्हेंबर) या निवडणकुसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. राज्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे या निवडणुकीसाठी मतदान केले.

 

 

 

SAS GROUP HYDRABAD च्या अंदाजानुसार राज्यात कोणाचे सरकार

 

महायुती 127-135

मविआ 147-155

इतर 10-13

 

विदर्भ (एकूण जागा 62)

मविआ 33-35

महायुती 26-27

इतर 2-3

 

पश्चिम महाराष्ट्र (एकूण जागा 70)

मविआ 40-42

महायुती 27-28

इतर 2-3

 

मराठवाडा (एकूण जागा 46)

 

मविआ 27-28

महायुती 17-18

इतर 2-3

 

मुंबई (एकूण जागा 36)

 

मविआ 18-19

महायुती 17-18

इतर 1-2

 

उत्तर महाराष्ट्र (एकूण जागा 35)

 

मविआ 15-16

महायुती 18-21

इतर 2

 

कोकण (एकूण जागा 39)

 

मविआ 14-15

महायुती 22-23

इतर 1-2

 

 

MATRIZE च्या एक्झिट पोलच्या अंदाजनुसार राज्यात कोणाचं सरकार

 

महायुती 150-170

इतर 8-10

 

भाजप 89-101

 

अजित पवार 17-26

 

शिंदे गट 37-45

 

मविआ 110-130

काँग्रेस 39-47

 

उबाठा 21-39

 

राष्ट्रवादी पवार 35-43

 

 

पोल डायरीच्या अंदाजानुसार कोणाला किती जागा? 

 

महायुती- 122-186 जागा

भाजपा- 77-108 जागा

 

शिंदे सेना- 27-50 जागा

 

अजित पवार- 18-28 जागा

 

महाविकास आघाडी- 69-121 जागा

काँग्रेस- 28-47 

 

ठाकरे सेना- 16-35

 

शरद पवार- 25-39

 

इतर- 12-29

 

 

 

MATRIZE च्या पोलनुसार भाजपला 89-101 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

इलेक्टोरल एजच्या अंदाजानुसार कोणाला किती जागा? 

 

महायुती- 121 जागा

भाजपा- 78

 

शिंदे सेना- 26

 

अजित पवार- 14

 

महाविकास आघाडी- 150 जागा

काँग्रेस- 60 

 

ठाकरे- 44

 

शरद पवार- 46

 

इतर- 20 जागा


PostImage

Blogs with Nili

Yesterday   

PostImage

Beed Voting: महाराष्ट्रात मतदानाला गालबोट, बीडमध्ये मतदान केंद्र फोडले, EVM …


Beed Voting: महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असतानाच बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात गंभीर घटना घडली आहे. घाट नांदूरगाव येथे मतदान केंद्रात ईव्हीएम मशीन फोडल्यामुळे मतदान प्रक्रिया ठप्प झाली. या घटनेमुळे शांततेत सुरू असलेल्या मतदानाला गालबोट लागले आहे.

या हिंसक प्रकारात तीन बूथवर तोडफोड झाल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेते माधव जाधव यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे मतदान प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली. हल्लेखोरांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची वाहने फोडण्याचाही प्रयत्न केला आहे, ज्यामध्ये बन्सी शिरसाट यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे.

हे देखील वाचा : Pune News: मोठी बातमी: पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला, निवडणुकीच्या तोंडावर घबाड

या प्रकरणाचे गांभीर्य वाढवणारी घटना म्हणजे, सकाळीच शरद पवार गटाच्या नेत्याला बेदम मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव हे बोगस मतदान रोखण्यासाठी परळी मतदारसंघात गेले होते. यावेळी त्यांच्यावर हल्ला केला. हल्या नंतर कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या नावाच्या घोषणा दिल्या होत्या. चार ते पाच हल्लेखोरांनी जाधव यांना बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे.

घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल चोरमले यांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदुरघाट, चोथेवाडी आणि मुरंबी गावातील काही मतदान केंद्रांवरही तोडफोड झाली आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून, या घटनेत सामील असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.


PostImage

Zadipatti VC News and Business

Nov. 19, 2024   

PostImage

कामगारांच्या पाठिशी पूर्ण शक्तीने उभा राहणार असा सुधीर मुनगंटीवार यांनी …


बल्लारपूर - बल्लारपूर पेपर मिल शहराच्या रोजगाराचा पाया आहे. पेपर मिलला आजवर अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. सरकारच्या माध्यमातून आवश्यक मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेन. येथील कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील, असा शब्द राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

बल्लारपूर पेपर मिल मजदूर संघाच्या 71व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला ना. श्री. मुनगंटीवार उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी कामगारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘बल्लारपूर पेपर मिल मजदूर संघाचा 71 वा वर्धापन दिन साजरा होत आहे, याचा मनस्वी आनंद आहे. माजी खासदार नरेश पुगलिया हे 41 वर्ष या कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत. जेव्हा एखादा नेता कामगार संघटनेला आपले कुटुंब समजून काम करतो, तेव्हा कामगारांना मोठा आधार मिळतो. कामगार संघटनेचे नेतृत्व करताना कामगारांचा विश्वास जपत 41 वर्ष सातत्याने काम करणे कठीण कार्य आहे. नरेशबाबूंनी आपल्या कर्तुत्वाने कामगारांचे मन जिंकत कामगारांचे शोषण दूर करुन त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

पुढे म्हणाले, 1953 मध्ये बल्लारपूर पेपर मिलची स्थापना झाली आणि त्याचवर्षी 23 जुलैला बल्लारपूर पेपर मिल मजदूर संघाची स्थापना करण्यात आली, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. ‘या पेपर मिलने अनेक कुटुंबांना आधार दिला. तर पेपर मिलला माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांनी आधार दिला आहे असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.


PostImage

Zadipatti VC News and Business

Nov. 18, 2024   

PostImage

मिलिंद नरोटे यांच्या प्रचारार्थ अभिनेत्री सई ताम्हणकर यांचा भव्य रोड-शो


गडचिरोली: गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या प्रचारार्थ गडचिरोली शहरात अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या उपस्थितीत भव्य रोड-शोचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर यांचे या रोड-शोमध्ये विशेष आकर्षण ठरले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते, महिला आणि तरुणाईने सहभाग घेतला. गडचिरोली शहरात उत्साहपूर्ण वातावरणात हा रोड-शो पार पडला.

या प्रसंगी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते, उमेदवार डॉ. मिलिंदजी नरोटे, आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार तथा भाजपा नेते डॉ. नामदेवराव उसेंडी, शिवसेना नेते हेमंतजी जब्बेवार,विधा. संयोजक प्रमोदजी पिपरे, भाजपा जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी,भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे,महिला आघाडी च्या शहराध्यक्षा कविता उरकुडे,शिवसेनेचे नेते राजु कावडे, कामगार आघाडीचे प्रदेश सचिव गोवर्धन चव्हाण,मिलिंद घरोटे,संजय बारापात्रे, शिवसेनेच्या निता वडेट्टीवार, वैष्णवी नैताम,जिल्हा सचिव रंजिता कोडाप,जिल्हा सचिव वर्षा शेडमाके  यांच्यासह महायुतीचे अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

सई ताम्हणकर यांच्या उपस्थितीने रोड-शोला एक वेगळाच रंगतदार अनुभव मिळाला. नागरिकांमध्ये माजी खासदार व उमेदवारांप्रती प्रचंड उत्साह आणि आत्मीयता दिसून आली. गडचिरोलीतील हा रोड-शो महायुतीच्या प्रचार मोहिमेत एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.


PostImage

Avinash Kumare

Nov. 16, 2024   

PostImage

Vidhan Sabha Election 2024: राहुल गांधी के हेलीकॉप्‍टर की हुई …


Vidhan Sabha Election 2024: महाराष्‍ट्र में विधानसभा चुनाव का माहौल गरम है। 20 नवंबर को होने वाले मतदान को लेकर सभी राजनीतिक दल पूरी ताकत झोंक रहे हैं। विभिन्‍न दलों के स्‍टार प्रचारक मैदान में उतरकर अपने एजेंडे को जनता तक पहुंचाने की कोशिश कर रहे हैं।

इस चुनावी माहौल में चुनाव आयोग भी पूरी तरह से सतर्क है। चुनाव प्रचार को निष्पक्ष और पारदर्शी बनाए रखने के लिए आयोग की टीमें सक्रिय रूप से काम कर रही हैं। इसी क्रम में शनिवार को कांग्रेस नेता राहुल गांधी के हेलीकॉप्टर की जांच की गई। यह छानबीन अमरावती में स्थित हेलीपैड पर की गई।

राहुल गांधी शनिवार को अमरावती में चुनाव प्रचार के लिए पहुंचे थे। उनके हेलीकॉप्‍टर के लैंड करते ही चुनाव आयोग की टीम वहां पहुंची और हेलीकॉप्टर की जांच शुरू कर दी। सूत्रों के अनुसार, यह जांच नियमित प्रक्रिया का हिस्सा थी, ताकि चुनाव आचार संहिता का पालन सुनिश्चित किया जा सके।

गौरतलब है कि इससे पहले चुनाव आयोग ने उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जैसे दिग्गज नेताओं के हेलीकॉप्टरों की भी जांच की थी। चुनाव को स्‍वच्‍छ और निष्पक्ष बनाने के लिए आयोग लगातार निगरानी कर रहा है।


PostImage

सुपर फास्ट बातमी

Nov. 15, 2024   

PostImage

जातींमध्ये भांडणे लावून काँग्रेस आरक्षण संपवेल ,संभाजीनगरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र …


 

छ. संभाजीनगर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी छत्रपती संभाजीनगर व नवी मुंबई येथे सभा झाल्या. यावेळी त्यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार केला. काँग्रेस आपला स्वार्थ साधण्यासाठी जातीचे राजकारण करीत आहे. जातींमध्ये भांडणे लावून काँग्रेस आरक्षण संपवेल. जाती-जातीत भांडणे लावून सत्ता मिळविणे हे काँग्रेसचे षडयंत्र आहे. काँग्रेसला दलित, अनुसूचित जमाती, इतर मागासांचा तिरस्कार आहे. या समाजातील एकजूट त्यांना तोडायची आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. जम्मू-काश्मीरमध्ये संविधान बदलून ३७९ कलम पुन्हा लागू करण्याचे प्रयत्न कदापि यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत, असा निर्धार व्यक्त करीत मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केले.

 

 

 

शंभूराजांच्या मारेकऱ्याला मसीहा बनविले : ज्यांना संभाजीनगर नावावर अडचण आहे. त्यांना त्यांची हत्या करणाऱ्यांमध्ये मासीहा दिसतो. महाराष्ट्र अशा लोकांचा स्वीकार करेल का?, असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्राची ही निवडणूक केवळ नवीन सरकार निवडायची निवडणूक नाही. संभाजी महाराज यांना मानणारे एकीकडे आहेत तर दुसरीकडे औरंगजेब यांचे गुणगान करणारे लोक आहेत, असेही ते म्हणाले.

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Nov. 15, 2024   

PostImage

Rahul Gandhi: वनवासी नव्हे, आदिवासी तेच देशाचे पहिले मालक संविधानावरून …


 

• नंदूरबार, . संविधानात बुद्ध, गांधींजी, आंबेडकरांचे विचार यांचे विचार आहे. त्याला कोरं म्हणणे म्हणजे या सर्वांचा अपमान आहे, तो पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. आरएसएस आणि भाजपला संविधान मान्य नाही तर संविधान वाचविण्यासाठी आमची लढाई सुरू आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले की, देशातील जमीन, पाणी जगंलावर पहिला अधिकार हा आदिवासींचा आहे. ते देशाचे पहिले मालक आहेत. त्यांना केवळ आदिवासी आहे म्हणून मागे ठेवले जाते. नोकऱ्या दिल्या जात नाही. वनवासी म्हणून त्यांचे सर्व अधिकार काढून घेतले जातात. पण संविधानात असा काही शब्दच नाही. नंदुरबार जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत आणि महाविकास आघाडीतर्फे चारही विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाला उमेदवारी देण्यात आली आहे. या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

 

 

• पंतप्रधान नरेंद्र मोदी  म्हणतात  माझ्या हातातील संविधान कोरं आहे. तुम्ही या संविधानाला कोरं म्हणून गांधीजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करतात. संविधानात तुम्हाला कुठेही वनवासी म्हटले जात नाही. यात तुम्हाला आदिवासी म्हटले जाते. म्हणजे देशाचे पहिले मालक 

- राहुल गांधी, काँग्रेस नेते

 

राहुल गांधी म्हणाले की, वनवासी म्हणजे तुमचा कशावरच अधिकार नाही. जंगल कापून ती जमीन सरकार उद्योगपतींना देण्यात येते. तुमच्या मुलांना नोकरी दिली जात नाही. आदिवासींची संख्या ८ टक्के आहे तर त्यांना ८ भागीदारी मिळावी.

 

राहुल गांधी म्हणाले की, २५ लाख रुपयांचा विमा काढणार, २५ लाखांपर्यंत उपचार मोफत दिला जाणार. अडीच कोटी रोजगार दिले जाणार. पण जो पर्यंत युवकांना रोजगार दिले जाणार नाहीत, तोपर्यंत त्यांना ४ हजार रुपये महिना देणार आहोत. आम्ही ज्या त्या राज्याचे प्रकल्प त्याच राज्यांना देणार देऊन रोजगार उपलब्ध करून देण्याचा आमचा संकल्प आहे..

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Nov. 15, 2024   

PostImage

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने दोन वेळा पराभव का केला?


भारताच्या संविधान निर्मिती दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ओजस्वी आणि तेजस्वी प्रतिभेने कायदे मंडळ पुन्हा पुन्हा प्रभावित झाले.

 

देशाचे पहिले कायदा मंत्री म्हणून त्यांनी केलेली अल्पकालीन पण प्रभावी कामगिरी देखील जणू एक दीपस्तंभ! संविधानाला मूर्तरूप देणारे घटनाकार! 

 

पण त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल ३४ वर्षांनी त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला…. असे का?

 

त्यांचा दोन लोकसभा निवडणुकीत ठरवून का पराभव करण्यात आला? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भीती कोणाला वाटत होती? कोणाला आपल्यापेक्षा प्रभावी मंत्री नको होते? 

 

१)२५ ऑक्टोबर १९५१ रोजी झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पाठिंबा देण्याचे कबूल केलेल्या काँग्रेसने ऐनवेळी दगा दिला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध उमेदवार उभा केला.साम दाम वापरून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे साथीदार फोडले.फारसा परिचित नसलेल्या उमेदवारामागे काँग्रेसने पूर्ण शक्ती उभी केली.तो उमेदवार म्हणजे नारायणराव काजरोलकर! यांनी फक्त 14 हजार 561 मतांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव केला….डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पडलेल्या मतांची संख्या होती १ लाख २३ हजार ५७६!

 

२)पुढं भंडारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीतही बोरकर नावाच्या व्यक्तीला काँग्रेसने पूर्ण शक्ती लावून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचां पराभव केला….विद्वान बाबासाहेब आंबेडकर डोईजड होतील म्हणून ते नको होते. देशाच्या पंतप्रधानांपेक्षा जास्त विद्वान मनुष्य काँग्रेस इकोसिस्टीमला नको होता…

 

देशाच्या घटनेला ज्या महामानवाने मूर्त स्वरूप दिले,त्या महापुरुषांचा राजकीय पराभव काँग्रेसने दोन वेळा केला, पण वैचारिक पराभव मात्र करू शकले नाहीत.केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देऊन मोकळे व्हावं वाटावं असे वातावरण तत्कालीन काँग्रेसच्या इकोसिस्टीम ने निर्माण केले होते…

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर तब्बल 3४ वर्षांनी गैरकाँग्रेसी सरकारने भारतरत्न पुरस्कार दिला.१४ एप्रिल १९९० रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला… इतका उशीर का झाला? का केला गेला? काँग्रेसला असा भारतरत्न पुरस्कार का द्यावा वाटला नाही?

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखे कितीतरी महापुरुष या देशांमध्ये असेच अन्यायाचे शिकार झालेले पाहायला मिळतील….. ! या गोष्टीला काँग्रेसची विचारधारा व घराणेशाही जबाबदार आहे.

 

आभार:NB मराठी news