PostImage

Sajit Tekam

Today   

PostImage

Amravati News : दुचाकीच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांचा मृत्यू


Amravati News : चांदूर बाजार बोराळा गावानजीक दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळून ठार झाले. शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली.

शरद प्रभाकर जनबंधू (45, रा. अमरावती) व पंकज प्रभाकरराव कडू (35, रा. बेसखेडा) अशी मृतांची नावे आहेत. शरद जनबंधू हे ब्राह्मणवाडा थडी पोलिस ठाण्यात चालक या पदावर कार्यरत होते. त्यांची नाईट ड्युटी संपवून ते पोलिस अधीक्षक कार्यालयात टपाल दिल्यानंतर अमरावती येथील आपल्या घरी जाणार होते. त्याकरिता ते MH 27 - DG 5332 क्रमांकाच्या दुचाकीने निघाले होते.

मूळचे बेलोरा (ता. चांदूर बाजार) येथील शरद जनबंधू हे सैन्यात होते. निवृत्तीनंतर ते ब्राह्मणवाडा थडी पोलीस ठाण्यात रुजू झाले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आहेतपंकज प्रभाकरराव कड्डू (35, रा. बेसखेडा) हे दुचाकीने (MH 27- CD 3385) आपल्या आईला अमरावती येथील हॉस्पिटलमध्ये सोडून गावाकडे जात होते. या दोघांच्या दुचाकींची तालुक्यातील बोराळा गावाजवळ समोरासमोर धडक झाल्यामुळे दोघेही गाडीवरून खाली फेकल्या गेले. अपघातात दोन्ही गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनाकरिता चांदूर बाजार ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday   

PostImage

गडकरी यांच्या फोटोसह कमळाचे चिन्ह स्लिपवरून भाजप-काँग्रेस 'आमनेसामने' भाजपकडून प्रचाराचा …


 

नागपूर : मतदान केंद्रांबाहेर लागलेल्या भाजपच्या बूथवर मिनी प्रिंटरच्या माध्यमातून नितीन गडकरी यांच्या फोटोसह कमळाचे चिन्ह छापलेली स्लिप मिनी प्रिंटरच्या माध्यमातून मतदारांना दिली जात होती. यावर ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. यामुळे काँग्रेस व भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले. काही ठिकाणी पोलिसांनी मध्यस्थी करीत मिनी प्रिंटर जप्त केले व तणाव शांत करण्याचा प्रयत्न केला.

 

सकाळी ११ च्या सुमारास बांगलादेश नाईक तलाव परिसरातील संत कबीर अप्पर प्रायमरी स्कूलच्या समोरील भाजपच्या बूथवर मतदाराच्या चिठ्ठीवर कमळाचे चिन्ह छापून येत असल्याच्या आरोपावरून काँग्रेस आणि भाजपचे नेते व कार्यकर्ते समारोसमोर आले. यामुळे सुमारे ५० मिनिटे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. लगतच्या चौकीतील पोलिसांनी लहान चार प्रिंटर ताब्यात

 

घेताच भाजपचे कार्यकर्ते पोलिसांकडे प्रिंटर परत करण्याची मागणी करू लागले. अखेर आ. प्रवीण दटके यांनी मध्यस्थी करून प्रिंटर परत घेतले. त्यानंतर या बूथवर संबंधित प्रिंटर दिसले नाहीत.

 

झिंगाबाई टाकळी परिसरातील आशीर्वाद शाळेसमोरील भाजपच्या बूथवरही अशाच स्लीप दिल्या जातहोत्या. त्यावर काँग्रेस कार्यकर्ते बंडू ठाकरे यांनी आक्षेप घेतला. यावेळी काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. नंतर प्रिंटर हटविण्यात आले. फ्रेंड्स कॉलनी परिसरातील बूथवरही असाच तणाव झाला.

 

काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार

 

भाजपच्या बूथवर आचारसंहितेचे उघडपणे उल्लंघन करण्यात आले. प्रचारबंदी असताना मतदारांचे नंबर घेऊन त्यांना व्हॉट्सअॅप आणि मॅसेज पाठविण्यात येत होते. अनेक मतदान केंद्राबाहेर भाजपने आपल्या पक्षाचे चिन्ह असलेले पेंडॉलही उभारले होते. हा सर्व प्रकार सुरू असताना मतदान केंद्राबाहेरील पोलिस कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी मात्र बघ्याच्या भूमिकेत हे सर्व बघत होते, अशी तक्रार काँग्रेसचे उमेदवार आ. विकास ठाकरे यांचे निवडणूक प्रतिनिधी अनिल वडपल्लीवार यांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली आहे.

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday   

PostImage

सिरोंचा, कुरखेडा, कढोलीत तांत्रिक बिघाड


गडचिरोली, ब्युरो.

सिरोंचा, कुरखेडा तालुकास्थळासह कढोली येथील ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. मतदारांनाही प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. जिल्ह्याचा शेवटचा टोक असलेल्या सिरोंचा येथील तीन केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने त्वरीत अहेरी येथील हेलिकॉप्टरच्या माध्यमातून नवीन मशीनबोलवाव्या लागल्या. तर कुरखेडा शहरातील एका केंद्रावर ईव्हीएम मशीनबंद पडल्या तब्बल दोन मशिन बदलविण्याची पाळी आली. यामुळे जवळपास दोन तास मतदार रांगेत ताटकळत उभे राहिले. तसेच याच तालुक्यातील कढोली येथील वा) र्ड क्र. 1 व 2 येथील मतदान केंद्रावर सकाळच्या सुमारास काही कारणास्तव मशिनमध्ये बिघाड झाल्याने तब्बल अर्धा तास उशिरा म्हणजे सकाळी 7.30 वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करण्यात आली.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday   

PostImage

कर्मचाऱ्याने भाजपाला मत देण्याचा केला आग्रह देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा मतदान …


 

देसाईगंज : गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राच्या निवडणुकीसाठी आज १९ एप्रिल रोजी मतदानास प्रारंभ झाल्यानंतर देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील बुथ क्रमांक १९४ वर मतदान करताना कार्यरत कर्मचारी दिपक नाकाडे यांनी मतदारांना फुलावर मतदान करायला सांगुन मतदान प्रभावित करीत असल्याचे दिसून आल्याने मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता.

 

 

दरम्यान कोंढाळा येथील जागृत नागरीकांनी उपविभागीय अधिकारी मानसी यांच्याकडे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने नाकाडे यांना तत्काळ निवडणूक कार्यक्रमातुन हटविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. कर्तव्यावरील कर्मचाऱ्याच्या या वर्तणुकीमुळे संताप व्यक्त केला जात आहे.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

April 18, 2024   

PostImage

कभी ना दूंगा उसको वोट,जो बाटेगा दारु और नोट.या घोषवाक्यासह …


कभी ना दूंगा उसको वोट,जो बाटेगा दारु और नोट.या घोषवाक्यासह भामरागड तालुक्यात मतदान जनजागृती.


            भामरागड ता.१८- तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मतदार, मतदानापासून वंचित राहू नये.त्यांना मतांचे महत्त्व कळावे या उदात्त हेतूने सांज मल्टी अॅक्टीव्हीटी डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट यस्टर एरीया,बिनागुंडा स्थीत भामरागड या सामाजिक संस्थेचे संचालक तथा अध्यक्ष कुमार रुपलाल मारोती गोंगले या अवलियांनी सायकलवर मतदान जनजागृतीचे फलक लावून व साऊंड सिस्टिम बांधून गावागावात मतदान जनजागृतीचे कार्य स्वखर्चाने करित आहे.
     "मत आपका अधिकार है, अपने अधिकारपर गर्व करे, मतदान करे."
     "अंगुलीपर लगीन स्याहीका निशान सिर्फ निशानही नही,आपकी शान है, लोकतंत्र की जान है."
       " कभी ना दूंगा उसको वोट,जो बाटेगा दारु और नोट".अशा आशयाचे घोषणा देत गत आठ दिवसांपासून  रुपलाल गोंगले या अवलियांनी मतदान जनजागृतीचे कार्य स्वखर्चाने चालविले आहे.त्यामुळे त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाची चर्चा तालुक्यात सर्वत्र होत आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 17, 2024   

PostImage

हातावरची मेहंदी पुसण्याआधी विवाहितेने संपविले जीवन,


 

 

 

 

आरमोरी: लग्नानंतर अकराव्या दिवशीच विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील शिवणी (बुज) येथे मंगळवारी घडली. मोनाली जगदीश ढोरे (वय २२ वर्षे) असे मयत विवाहितेचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

 

 

शिवणी येथील जगदीश ढोरे यांचा विवाह भंडारा जिल्ह्यातील गौराळायेथील मोनाली संजय शहारे हिच्याशी ५ एप्रिलला झाला होता. शिवणी येथे जगदीशच्याच घरी दोघांनी आप्त स्वकियांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली होती. विवाह समारंभ आटोपल्यानंतर मोनाली ही माहेरवरून सासरी शिवणी येथे नांदायला आली.

 

सुखी संसाराचे स्वप्न रंगवून दोघांनीही आपल्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली. मात्र, १६ रोजी पहाटे मोनाली हिने घरातील आडूला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने आत्महत्येचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण कळू शकले नाही.

 

आरमोरी पोलिसांनी पंचनामा केला. उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.


PostImage

Gadchiroli Varta News

April 16, 2024   

PostImage

शेतकरी पुत्राने काढली बैलगाडीतून लग्नाची वरात


शेतकरी पुत्राने काढली बैलगाडीतून लग्नाची वरात

 

 

 

 

कोरपना तालुक्यातील नारांडा मधील राजेश मोहूले हा राजुरा येथे एका छोट्याशा दुकानात नोकरी करून आपला उदरनिर्वाह करत होता हा युवक रमान नगर राजुरा येथे स्थायी झालात त्यांचे विवाह भुरकुंडा येथील एका पूजा शेंडे या युवतीशी जुडला मात्र त्यांनी आपला हा विवाह हा समाजाला एक आदर्श ठरणार असावा व जुन्या रूढी परंपरेनुसार विवाह करण्याचे ठरविले तेव्हा एक आगळीवेगळी वरात पहायला मिळाली. शेतकरी पुत्राने घोड्यावरून नव्हे तर चक्क बैल गाडीतून वरात काढली. या वरातीची चर्चा राजुरा शहरात व तालुक्यात सुरू आहे.

 एक आगळीवेगळी वरात पहायला मिळाली. शेतकरी पुत्राने चक्क बैलगाडीतून वरात काढली. यावेळी बैलगाडीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. विशेष म्हणजे बैलगाडीतून वरात काढण्यात आली तेव्हा डफळे देखील लावण्यात आले . वऱ्हाडी मंडळी डफडेच्या तालावर चांगलेच थिरकताना दिसते. या आगळ्या -वेगळ्या वरातीची तालुक्यात चर्चा रंगल्याचे पहायला मिळाले. ग्रामस्थांकडून नवरदेवाचे कौतुक करण्यात येत आहे.

अनेक राजकीय मंडळींनी त्या विवाह ला भेटी दिल्या त्यांचाच मोठे बंधू संतोष मोहुर्ले एका राजकीय (भाजपा)पक्षाचे पदाधिकारी असल्याने त्यांच्या या लग्नात अनेक राजकीय मंडळींनी हजेरी लावली


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

April 14, 2024   

PostImage

एकोडी शेतशिवारात वाघाची दहशत.माणसांवर होणारा हल्ला,रेडयांवर झालं !


एकोडी शेतशिवारात वाघाची दहशत.माणसांवर होणारा हल्ला रेडयांवर झाला.भेंडाळा परीसरात एकोडी हा लहानसा लोक वस्ती असलेला गाव आहे.आणि वैनगंगा नदी या गावाच्या काही अंतरावर आहे त्यामुळे येथील शेतकरी कृषी पंपाच्या सहाय्याने दुबार पेरणी करून धान्य व मका असे पिके घेतात.

एकोडी ते बोरघाट रस्त्यावर शेतकरी येणं जाणं करीत असतांना काही शेतकऱ्यांनी पट्टे दार वाघ बघीतला आणि गावातील लोकांना माहिती सांगितली परंतु गावातील लोकांनी हि अफवा आहे,असे समजून त्या कडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला.पण या गेल्या शनिवारी पट्टे दार वाघाचे दर्शन सुध्दा झाले आणि त्याच दिवशी म्हशींचा रेडा अंदाजे एक ते दिड वर्षांचा असेल त्याला वाघाने ठार मारून आपली दिनचर्या भागविली.

रविवारी सायंकाळी शेळ्या चारणारे शेरकी यांच्या ही वस्तु नजरेस पडल्या नंतर पुर्ण पणे विस्वास बसला.वाघाचा वावर असल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली.आणि लगेचच वनसंरक्ष विनोद नैताम यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला.हि शिकार वाघाणेच केली हे त्यांनी पंचासमक्ष कबुल केली.

सदर पंचनामा करताना रमेश चौखुंडे,प्रदिप जगन भोयर,भोजराज पाल,गुणाजी पिठाले,गिरीश धोटे,पुरूषोत्तम रोहणकर,राजुभाऊ पाल, योगेश्वर पाल,उद्धव निकुरे,सतिश पाल आणि कमलाकर भोयर,कुमार निकुरे आणि एकोडी गावातील बरेच नागरिक उपस्थित होते परंतु एकोडी गावात व आजुबाजूच्या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाली आहे.

वाघाने हल्ला केलेला रेडा कुणाच्या मालकीचा आहे अजून पर्यंत समजलेला नाही आहे.ज्या कुणाचं असेल त्यानं आप आपल्या जनावरांची चौकशी करून वनविभागाला सहकार्य करावे.


PostImage

Today Latest News

April 13, 2024   

PostImage

Balaghat News : दर्दनाक सड़क हादसे में एक मासूम छात्रा …


Balaghat News : पुलिस थाना रामपायली के अंतर्गत ग्रामपंचायत नवेगांव कोतुर मार्ग पर बने पुलिया पर 12 अप्रैल की दोपर करीब 3:30 बजे भयानक सड़क हादसा हो गया. जिसमें कक्षा 12वीं की छात्रा 18 वर्षीय बकोड़ी निवासी राणु  यादवराव पंचेश्वर की मौत हो गई.

बताया जा रहा है कि रानू अपने पिता के मोटरसाइकिल के पास नाले के ऊपर रोड किनारे खड़ी थी. तभी तेज रफ्तार से आती एक ट्रक ने मोटरसाइकिल के पास खड़ी रानू को जोरदार टक्कर मार दी.टक्कर इतनी जोरदार थी की सर पर गंभीर चोट आने से रानू की जगह पर मौत हो गई.

घटना को देख घटना की जानकारी तत्काल संजीवनी 108 और पुलिस को दी गई पुलिस ने मौके पर पहुंचकर शव को सामुदायिक अस्पताल रामपली लाया गया. जहां पुलिस के द्वारा शव को सुरक्षित अस्पताल में रखवा दिया गया है. जिसका पोस्ट मोरडम 13 अप्रैल को होगा.


PostImage

Gadchiroli Varta News

April 11, 2024   

PostImage

लोकसभा निवडणुक: भरारी पथकाच्या मदतीला वन नाक्यावरील तपासणी पथके


लोकसभा निवडणुक: भरारी पथकाच्या मदतीला वन नाक्यावरील तपासणी पथके

गडचिरोली दि. 11 : लोकसभा निवडणुक आचारसंहितेच्या अनुषंगाने गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील वन विभागाच्या संपुर्ण तपासणी नाक्यावर 24 तास नाकाबंदी सुरु ठेवावी व दारु, अवैद्य रकम, आणि अंमली पदार्थाची तपासणी करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी वन विभागाला दिल्या.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे पालन होणेसाठी व निवडणूकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याकरिता जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन व वन विभाग यांच्यात समन्वय राखणेबाबत काल जिल्हाधिकारी यांचे अध्यक्ष्यतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री दैने बोलत होते. जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल, उपवनसंरक्षक मितेश शर्मा (गडचिरोली), राहुल टोलीया (आलापल्ली), शैलेश मीना(भामरागड), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके यावेळी उपस्थित होते.

पोलिस, राज्य उत्पादन शुल्क, आयकर विभाग, अमली पदार्थविरोधी विभाग व इतर विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकामार्फत संशयास्पद व्यक्ती व मोटारी थांबवून ठिकठिकाणी नाक्यांवर तपासणी करण्यात येत आहे.आता या मोहिमेत वनविभागाच्या तपासणी नाक्यांचीही मदत होणार आहे.

 तपासणीदरम्यान गैरप्रकार किंवा संशयीत प्रकार आढल्यास वनविभागाच्या तपासणी पथकाने नजीकच्या पोलीस स्टेशन किंवा भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथक यांचेशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

 

दोन कोटी 20 लाख 50 हजार किमतीचे दारू व इतर साहित्य जप्त

जिल्ह्यात 1 मार्चपासून आतापर्यंत वेगवेगळ्या भागात करण्यात आलेल्या कारवाईत एकूण दोन कोटी 20 लाख 50 हजार किमतीचे दारू व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. यात 55 हजार 285 लिटर दारू जप्त करण्यात आली असून त्याची किंमत 95 लाख 47 हजार रुपये आहे. तसेच एक कोटी 25 लाख किमतीच्या इतर मुद्देमालाचा समावेश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 

 


PostImage

Gadchiroli Varta News

April 11, 2024   

PostImage

गडचिरोली-चिमुर मतदारसंघात 1205 गृहमतदारांनी केले मतदान


गडचिरोली-चिमुर मतदारसंघात 1205 गृहमतदारांनी केले मतदान

 

शंभर वर्षीय मतदाराच्या गृहमतदानासाठी तीन राज्यांच्या सीमेवर पोहचले निवडणूक पथक

 

गडचिरोली दि.11: - महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगाणा या तीन राज्यांची सीमा असलेल्या सिरोंचा येथे वयाची शंभरी गाठलेल्या किष्टय्या आशालू मादरबोईना यांनी गृह मतदान सुविधेअंतर्गत लोकसभा निवडणुक -2024 साठी काल आपलं मतदान केलं. त्यांच्या सोबत किष्टय्या लसमय्या कोमेरा या 86 वर्षीय वयोवृद्धानेदेखील गृहमतदान केले. हे मतदान घेण्यासाठी अहेरी विधानसभा मतदार संघातील गृह मतदान चमूने अहेरी ते सिरोंचा हे तब्बल 107 किलोमीटरचे अंतर गाठले व गृह मतदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितल्यानंतर या दोघांचे मतदान नोंदविले. दोघेही वयोवृद्ध एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी गृहमतदानाची निवड करून आपले मत घरातच स्थापन केलेल्या तात्पुरत्या मतदान कक्षात गोपनियता बाळगून नोंदविले. 

कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्या अनुषंगाने गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनात 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत गृह मतदानाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात कालपर्यंत 85 वर्षावरील 923 मतदार आणि 282 दिव्यांग अशा एकूण 1205 मतदारांनी आतापर्यंत गृह मतदानाद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. 

संपूर्ण मतदार संघातून 85 वर्षावरील 1037 व 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेले 338 असे 1375 मतदारांचे गृह मतदानासाठीचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी श्री दैने यांनी मंजूर केले आहेत. 

विधानसभा मतदार संघनिहाय 85 वर्षावरील मतदार व झालेले मतदान आणि दिव्यांग मतदार व झालेल्या मतदानाची (कंसात) माहिती पुढीलप्रमाणे आहे. आमगाव- 133 पैकी 127(दीव्यांग-38 पैकी 38), आरमोरी -88 पैकी निरंक (दीव्यांग-53 पैकी निरंक), गडचिरोली -132 पैकी 132 (दीव्यांग-70 पैकी 70), अहेरी 23 पैकी 21 (दीव्यांग-13 पैकी 10), ब्रम्हपुरी 224 पैकी 224 (दीव्यांग-63 पैकी 63), चिमुर 437 पैकी 419 (दीव्यांग-101 पैकी 101). याव्यतिरिक्त अत्यावश्यक सेवेतील 28 मतदारांचेही अर्ज गृहमतदानासाठी मंजूर करण्यात आले आहे.

सिरोंचा येथील 100 वर्षीय किष्टय्या आशालू मादरबोईना आणि किष्टय्या लसमय्या कोमेरा (वय 86) यांचे मतदान नोंदविण्यासाठी नायब तहसीलदार जनक काडबाजीवार, क्षेत्रीय अधिकारी सागर भरसट, केंद्राध्यक्ष प्रमोद करपते, सहाय्यक मतदान अधिकारी सुरज आत्राम, पोलीस शिपाई प्रशांत मिसरी, प्रमोद तोटापल्लीवार या मतदान अधिकाऱ्यांनी गृह मतदान घेण्याची कार्यवाही पूर्ण केली असल्याचे अहेरी विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी आदित्य जिवने यांनी कळविले आहे.

00


PostImage

Gadchiroli Varta News

April 11, 2024   

PostImage

मार्कंडा कंन्सोबा येथे श्री संत कार्तिक स्वामी महाराजांच्या पालखीचे मोठ्या …


मार्कंडा कंन्सोबा येथे श्री संत कार्तिक स्वामी महाराजांच्या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत 

 

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथील प्रशांत घाम हनुमान मंदीर येथून प्रारंभ होऊन श्री संत कार्तिक स्वामी महाराजांची पालखी सोहळा रामनगट्टा मार्गे तालुक्यातील मार्कंडा कंन्सोबा येथे दिनांक १० एप्रिल रोजी आगमन होताच मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या देवस्थानाचे अध्यक्ष संजय पंदिलवार यांनी स्वतः पालखी सोहळ्याचे स्वागत करून पालखीचे सारथ्य केले. तसेच पंदिलवार यांनी स्वागत केल्यानंतर भजनाचा आनंद लुटला. ते वारकऱ्यां समवेत भजन करीत असताना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली.

 

पालखी सोहळ्याचे मार्कंडा कंन्सोबा येथील वनविभागाच्या नाक्याजवळ आगमन होताच गावातील प्रतिष्ठित नागरिक अमोल पंदिलवार, माजी सरपंच गंगाधर पोटवार, सेवानिवृत्त वनरक्षक आत्माराम मस्के यांच्यासह गावकरी व ग्रामपंचायत पदाधिकारी आदींनी स्वागत केले. यावेळी प्रभाकर बावणे, प्रभाकर लोणारे,‌वसंत बावणे, रवी बुग्गावार आदींसह देखील स्वागत केले. टाळ मृदंगाच्या गजरात अभंगाच्या जयघोषात संपूर्ण मार्कंडा कंन्सोबा परिसर दुमदुमून गेला होता. दुपारपासून रखरखत्या उन्हात पालखी सोहळ्याची आतुरतेने वाट पाहणारे भाविक सायंकाळी पालखीचे दर्शन होताच भक्तीरसात तल्लीन झाले होते. मार्कंडा कंन्सोबा येथील पंदिलवार परिवाराच्या निवासस्थानी पालखी सोहळा पोहचताच प्रमुख व विश्वस्तांचे स्वागत पंदिलवार परिवाराच्या वतीने करण्यात आले. दरम्यान अबाल वृद्धांसह भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मार्कंडा कंन्सोबा गावातील संजय पंदिलवार यांनी वैयक्तिक स्वरूपात वारकऱ्यांसाठी अल्पोपहार, चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था केली.यानंतर पालखी सोहळा चंदनखेडी (खर्डी ) या ठिकाणी मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.


PostImage

Gadchiroli Varta News

April 11, 2024   

PostImage

सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक; जिवीतहानी टळली


 सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक; जिवीतहानी टळली 

आष्टी : -
चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील  आष्टी - आलापल्ली महामार्गावरील Ashti ग्रामीण रुग्णालयाजवळ आष्टी येथील चौकातून येत असलेल्या ट्रकला सूरजागड कडून लोहखनिजाचा कच्च्या माल वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. हि घटना दिनांक दहा एप्रिल रोजी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेतील दोन्ही ट्रक चालक सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे 
ट्रक क्रमांक एम एच ३३ टी ३६८३ हा  आष्टी येथील चौकातून आलापल्ली कडे जात होता व ट्रक क्रमांक एम एच ३४बी झेड ३९७३ हा ट्रक सूरजागड येथून लोहखनिजाचा कच्च्या माल घेऊन येत होता  या महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते त्यामुळे आष्टी कडून येणाऱ्या ट्रक चालकाने त्या वाहनाचा सुसाट वेग पाहून आपले वाहन उभे ठेवले तरी या उभा ठेवलेल्या ट्रकला सूरजागड कडून लोहखनिजाचा कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिली. असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे 
या घटनेची आष्टी पोलिसांना माहिती होताच घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अपघातामुळे खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. या महामार्गावर सूरजागड लोहखनिजाची कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रका मोठ्या सुसाट वेगाने धावत असतात या महामार्गावर तर दुचाकी धारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो या महामार्गावर नेहमी अपघात होतच असतात आजपर्यंत अनेकांचे जीवही गेले आहेत तरी संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात येत नसल्याने सुरजागड लोहखनिजाच्या कच्च्या मालाची वाहतूक करणारे ट्रक चालक हे कोणाच्याच बापाला घाबरत नाही आहेत असे सामान्य नागरिकांकडून बोलल्या जात आहे आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयासमोर एका सुरक्षा रक्षकाची आवश्यकता आहे तरी याठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी अशी मागणी जनसामान्यांतून केली जात आहे


PostImage

Gadchiroli Varta News

April 9, 2024   

PostImage

गुढीपाडव्याच्या दिवशी एका स्कॉर्पीओच्या धडकेत दुचाकीस्वार पोलीस जवान ठार


गुढीपाडव्याच्या दिवशी एका स्कॉर्पीओच्या धडकेत दुचाकीस्वार पोलीस जवान ठार

 

 

अहेरी:-

जवळील गेर्रा महागाव रोडवर एका स्कॉर्पीओने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार पोलीस ठार झाल्याची घटना दि. ९ एप्रिल ला दुपारी १२.३० वा.चे दरम्यान घडली

 पोलीस शिपाई चिन्ना विडपी वय ४० रा.अहेरी असे मृतकाचे नाव असून चिन्ना हे वांगेपल्ली कडून आपल्या दुचाकीने येत असतांना अहेरी कडून महागाव कडे जात असलेल्या एम एच ३२ ए एच ४०५४ स्कॉर्पिओ ने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार पोलीस जवान ठार झाले 

घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व चिन्ना विडपी यांना रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले

चिन्ना विडपी यांच्या पश्चात पत्नी,मुलगी,मुलगा,आई,वडील असा परिवार आहे

त्यांच्या अकाली निधनाने मित्र मंडळ व परीवारात शोककळा पसरली आहे

अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जनार्धन काळे हे करीत आहेत


PostImage

Gadchiroli Varta News

April 9, 2024   

PostImage

पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाने हे पाऊल उचलल्याने मित्रांसह नातेवाइकांनाही …


 

 

आपल्या मित्राला दुरध्वनी ने केला फोन आणि सांगीतले की मी आत्महत्या करतोय

 

 आलापल्ली:+

 असे काय झाले की, त्याला टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करावी लागली हे कोडे आता पोलीसच उलगडणार असे चित्र दिसत आहे

मी आत्महत्या करत आहे, असा कॉल मित्रांना करून पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ७ एप्रिल रोजी रात्री येथील शंकरराव बेझलवार महाविद्यालयाजवळ ही घटना घडली.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, मोहन मोहुर्ले वय ३०, रा.रंगयापल्ली असे मृताचे नाव आहे. अहेरी येथील त्याची सासुरवाडी आहे. त्यामुळे तो अहेरीतच भाड्याने खोली घेऊन पत्नीसह राहत होता. पोलिस होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी तो तयारी करत होता. दरम्यान, कौटुंबिक कारणावरून मोहन मोहुर्ले

त्याचा पत्नीशी वाद होत असे. ७ एप्रिलला रात्री साडेदहा वाजता तो घराबाहेर पडला. गावालगतच्या शंकरराव बेझलवार महाविद्यालयाजवळील एका झाडास गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली.

 

तत्पूर्वी त्याने एका मित्राला फोन करून मी आत्महत्या करीत आहे, असे सांगितले. मित्राने समजावण्याचा प्रयत्न केला व तु कुठे आहेस असे विचारले असता मात्र त्याचे म्हणने न ऐकताच फोन कट केला मित्रांनी रात्री सर्वत्र शोध घेतला पण तो कुठेच आढळला नाही व आठ एप्रिल ला सकाळी महाविद्यालय जवळ असलेल्या झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले 

मोहन मोहुर्ले याने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाने हे पाऊल उचलल्याने मित्रांसह नातेवाइकांनाही हादरा बसला आहे.

 

 आत्महत्येची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे


PostImage

Vaingangavarta19

April 8, 2024   

PostImage

पथदिवे सुरू करण्याचा मुहुर्त केव्हा मिळणार प्रशासनाला


 पथदिवे सुरू करण्याचा मुहुर्त केव्हा मिळणार प्रशासनाला 


आष्टी: -

एक महिन्यापूर्वी पासून पथदिवे बंद असल्याने पथदिवे सुरू करण्याचा मुहुर्त केव्हा मिळणार प्रशासनाला असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे 
चामोर्शी तालुक्यातील आष्टी शहरातील पथदिवे एक महिन्यापूर्वी पासून बंद आहेत. याकडे विज वितरण कंपनी व ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शहरातील नागरिकांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत आहे. आष्टी ग्रामपंचायतीकडून शहरातील विविध मार्गावर दुतर्फा पथदिवे लावण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी शिकवणी वर्गाला जाणाऱ्या लहान मुलांना वनागरिकांना अंधारात चाचपडत जावे लागू नये, असाच त्या मागचा उद्देश आहे परंतु गत एक महिन्यापूर्वी पासून शहरातील काही भागातील पथदिवे बंद आहेत. यामध्ये गावातील मुख्य मार्ग ते आंबेडकर चौकदरम्यानचा मार्ग, तसेच अनेक प्रभागातील परिसरातील काही पथदिवे अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे परिसरात काळोख असतो. या अंधाराचा फायदा चोरटे सुद्धा घेण्याची शक्यता आहे. त्याशिवाय रात्रीच्या वेळी नागरिकांनाही विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील इतरही भागातील काही पथदिवेसुद्धा काही दिवसांपासून बंद आहेत. विज वितरण कंपनी आणि ग्रामपंचायत प्रशासन याकडे लक्ष देऊन शहरातील बंद असलेले पथदिवे त्वरीत सुरू करावे, अशी मागणी आष्टी येथील नागरिकांनी केली आहे