PostImage

MH 33 NEWS

Oct. 16, 2024   

PostImage

आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करा जिल्हाधिकाऱ्यांचे विभाग प्रमुखांना निर्देश



ग‍डचिरोली :- भारत निवडणूक आयोगाने 15  ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाने निवडणुकीचे गांभिर्य लक्षात घेऊन आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी तसेच सोपविलेली जबाबदारी गांभिर्याने पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित नोडल अधिकारी व विभाग प्रमुखांच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री दैने बोलत होते. यावेळी  जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी,  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
निवडणुक कार्यक्रमांतर्गत प्रत्येक कामासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने तत्पर राहावे व कोणत्याही विभाग प्रमुखाने जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये अथवा रजेवर जावू नये असे निर्देशही श्री दैने यांनी दिले. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे वाचन करून त्यानुसारच त्याची अंमलबजावणी करावी. कार्यालय व परिसरातील विकास कामांचे भूमिपूजन फलक, कोनशीला, राजकीय व्यक्तींची छायाचित्रे व पक्षाची चिन्हे असलेले बॅनर, होर्डिंग्ज तात्काळ काढण्यात यावे. रस्ते व सावजनिक जागेवर प्रचार साहित्य लागणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी दैने यांनी दिल्या.
 निवडणूकीच्या तसेच अत्यावश्यक सेवेत कर्तव्यावर असलेले कोणताही कर्मचारी पोस्टल बॅलेट मतदानापासून वंचित राहणार नाही, यांची दक्षता संबंधीत कार्यालय प्रमुखांनी घ्यावी यासाठी कार्यालयात एक समन्वयक अधिकारी नेमून मतदानासाठीचे विहित फॉर्म भरून घ्यावे. 
जिल्ह्यात कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मतदानासाठी मतदार नोंदणी करून घ्यावी. ज्यांची मतदार नोंदणी इतर जिल्ह्यात आहे मात्र ते आता या जिल्ह्यात कार्यरत आहेत त्यांनीही आपली मतदार नोंदणी गडचिरोली जिल्ह्यात स्थलांतरीत करण्यासाठी अर्ज करावे व सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी 100 टक्के मतदान करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दैने यांनी दिल्या.  
बैठकीला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 16, 2024   

PostImage

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष, बँकर्स व प्रिटींग प्रेसची …



गडचिरोली:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय पक्षाची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांचे अध्यक्षतेखाली आज आयोजित करण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार तसेच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी निवडणूक आचारसंहितेबाबत माहिती दिली. वाहनाचा वापर, प्रचार सभा, लावूडस्पिकर, राजकीय जाहिराती व अनुषंगीक बाबींना राजकीय पक्षाने घ्यावयाच्या पूर्व परवानग्या तसेच निवडणूक खर्चाच्या नोंदी, काय करावे व काय करू नये याबाबत त्यांनी राजकीय पक्षाच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांना नियमांची माहिती दिली.
बँकर्सनी संदिग्ध व्यवहाराची माहिती कळवावी
निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांना बँकेचे नवीन खाते त्यांचा अर्ज प्राप्त झाल्यावर आवश्यक कार्यवाही पूर्ण करून त्याच दिवशी तात्काळ सुरू करून द्यावे. तसेच बँकेत जमा व खर्चाच्या संदिग्ध व्यवहाराबाबत विशेषत: १० लाखावरील रकमेच्या व्यवहाराबाबत निवडणूक विभागाला तत्काळ अवगत करावे. बँकेची रकम वहन करणाऱ्या वाहनावर विहित क्युआर कोड लावावा तसेच जीपीएस यंत्रणा सुरू ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी बँकर्सच्या सभेत दिल्या.
प्रिटींग प्रेसला सूचना
राजकीय उमेदवारांचे प्रचार साहित्य छापतांना प्रिटींग प्रेस मालकांनी निवडणूक विभागाकडून पूर्व परवानगी घ्यावी. छापील साहित्यावर प्रकाशक व मुद्रकाचे नाव असावे तसेच उमेदवारांकडून छपाईसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जाची प्रत, प्रकाशीत प्रतीची संख्या याबाबत निवडणूक खर्च समितीस वेळोवेळी माहिती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संजय दैने यांनी प्रिंटींग प्रेसच्या प्रतिनिधींना दिल्या.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 16, 2024   

PostImage

विधानसभा निवडणूकीत 80 टक्के मतदानासाठी प्रयत्न - जिल्हाधिकारी संजय दैने


 


गडचिरोली  :- लोकसभा निवडणूकीत राज्यात सर्वाधिक ७२ टक्के मतदान गडचिरोलीतून झाले होते याचा उल्लेख भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या पत्रकार परिषदेतही केला होता. आता विधानसभा निवडणूकीत जिल्हा प्रशासनाद्वारे ८० टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिली.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री दैने बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी दैने यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या कार्यक्रमाचा तपशील देतांना निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक २२ ऑक्टोबर, नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक २९ ऑक्टोबर,  नामनिर्देशन पत्राची छाननी ३० ऑक्टोबर रोजी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक ४ नोव्हेंबर, मतदान २० नोव्हेंबर रोजी आणि मतमोजणी दिनांक २३ नोव्हेंबर, २०२४ रोजी होणार असल्याचे निवडणूक आयोगाने काल जाहिर केले असल्याचे सांगितले. तेव्हापासूनच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून सर्वांनी आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 67-आरमोरी, 68-गडचिरोली व 69-अहेरी या तीन विधानसभा मतदारसंघातील 972 मतदान केंद्रांवर 20 नोव्हेंबर रोजी सुमारे 8 लाख 19 हजार 570 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात सुमारे 7 हजार कर्मचारी कर्तव्यावर राहणार आहेत. 
मतदान केंद्र : मतदारांच्या सुविधेसाठी प्रत्येक मतदार संघात 8 याप्रमाणे जिल्ह्यात एकूण 24 मतदान केंद्र वाढविण्यात आले आहे. यात आरमोरी विधानसभा क्षेत्रात 310, गडचिरोली क्षेत्रात 362 तर अहेरी क्षेत्रात 300 असे एकूण 972 मतदान केंद्र राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिली
जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या : जिल्ह्यात एकूण 8 लाख 19 हजार 570 मतदार असून यात पुरुष मतदार 4 लाख 11 हजार 384, स्त्री मतदार 4 लाख 8 हजार 132, इतर मतदार 9 यांचा समावेश आहे. आरमेारी विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 130820, स्त्री मतदार – 131347,  इतर -1, एकूण -262168), गडचिरोली विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार –154284, स्त्री मतदार – 152086,  इतर -2, एकूण -306417), अहेरी विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 126280, स्त्री मतदार – 124699, इतर-6, एकूण -250985) . जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील नवमतदारांची संख्या- पुरूष 9639, स्त्री 7549 व इतर 1 अशी एकूण 17 हजार 189 इतकी आहे. तसेच दिव्यांग मतदारांची संख्या 6012 इतकी आहे. मतदार नोंदणी प्रक्रीया नामनिर्देशन सादर करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत सुरू राहणार आहे.

उमेदवारास खर्चाची मर्यादा : उमेदवारास निवडणूक कालावधीत जास्तीत जास्त 40 लक्ष रुपये खर्चाची मर्यादा राखणे बंधनकारक आहे. निवडणूक कालावधीत दैनंदिन झालेल्या खर्चाचा हिशोब दररोज देणे आवश्यक असून निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत संपूर्ण खर्चाचा हिशोब शपथपत्रासह सादर करणे बंधनकारक आहे.

जिल्ह्यात विविध कक्ष कार्यान्वित : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली तसेच सर्व विधानसभा मतदारसंघ स्तरावर तक्रार निवारण /मतदार मदत केंद्र, एक खिडकी कक्ष, नियंत्रण कक्ष, आदर्श आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे.

सी-व्हीजीलचा उपयोग करण्याचे आवाहन : निवडणूक प्रक्रियादरम्यान आचारसंहिता उल्लंघन संबंधाने कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवायची झाल्यास त्याकरिता सी-व्हीजील या ॲपद्वारे ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदविता येऊ शकेल. अशा तक्रारी प्राप्त झाल्यापासून 100 मिनिटांच्या आत निकाली काढण्यात येईल
सोशल मीडियावर लक्ष : सोशल मीडिया, फेक न्यूजवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. मतदानाच्या काळात सोशल मीडियावर प्रसारित होणारे, गैरसमज पसरविणारे संदेश व इतर घटनांवर लक्ष ठेवून अशा घटनांचे त्वरीत खंडन करण्याची व कारवाई करण्याची खबरदारी घेणार असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

पोलिस विभागाची माहिती देतांना जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल यांनी सांगितले की विविध दलाचे सुमारे 17 हजार सुरक्षा कर्मचारी निवडणूक शांततने पार पाडण्यासाठी तैनात राहणार आहेत. यादरम्यान 750 कि.मी. रोड ओपनिंग करण्यात येणार असून संवेदनशील क्षेत्रात मतदान कर्मचारी व साहित्य पोहोचविण्यासाठी ५ हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली  आहे तसेच छत्तीसगड व तेलंगना राज्यसिमेवर 11 तपासणी नाके कार्यान्वित राहणारअसल्याचे त्यांनी सांगितले

००००००


PostImage

Raj Thakre

Oct. 15, 2024   

PostImage

CSC की नई अपडेट: जानें महत्वपूर्ण सेवाओं और योजनाओं के …


CSC (Common Service Centres) ने ग्रामीण और शहरी क्षेत्रों के लोगों तक सरकारी और डिजिटल सेवाओं की पहुंच को आसान बनाने के लिए कई नई अपडेट्स और सेवाओं की शुरुआत की है। इस आर्टिकल में, हम आपको CSC की नवीनतम सेवाओं और योजनाओं के बारे में विस्तृत जानकारी देंगे, जो आपके लिए महत्वपूर्ण हो सकती हैं।
1. Tele-Law Services: मुफ्त कानूनी सलाह
CSC ने ग्रामीण और दूरदराज़ के इलाकों में कानूनी सलाह की पहुंच को और बेहतर बनाने के लिए Tele-Law Service शुरू की है। इसके तहत लोग अब वकीलों से मुफ्त या कम शुल्क में कानूनी परामर्श ले सकते हैं। यह सेवा भारत सरकार के न्याय विभाग द्वारा CSC के माध्यम से चलाई जा रही है।
2. PM Vishwakarma Scheme: कारीगरों के लिए विशेष योजना
PM Vishwakarma Yojana का उद्देश्य पारंपरिक कारीगरों और दस्तकारों को लाभ पहुंचाना है। इसके तहत CSC केंद्रों से जुड़कर कारीगरों को डिजिटलीकरण, प्रशिक्षण, और आर्थिक सहायता प्रदान की जा रही है। इससे कारीगरों के व्यवसाय को आधुनिक बनाने और उनकी आय बढ़ाने में मदद मिलेगी।
3. DigiPay सेवाओं का विस्तार: आसान और सुरक्षित डिजिटल भुगतान
ग्रामीण क्षेत्रों में DigiPay सेवाओं का विस्तार किया गया है, जिससे लोग आसानी से डिजिटल भुगतान कर सकते हैं। आधार-आधारित पेमेंट सिस्टम से अब नकदी रहित लेनदेन संभव हो रहा है। DigiPay के माध्यम से लोग बैंकिंग सेवाओं, मोबाइल रिचार्ज, और बिल भुगतान की सुविधाओं का लाभ उठा सकते हैं।
4. स्वास्थ्य सेवाएं: टेलीमेडिसिन और आयुष्मान भारत
CSC के माध्यम से अब टेलीमेडिसिन सेवाओं का लाभ उठाया जा सकता है, जिससे लोग दूर से ही डॉक्टर्स से परामर्श ले सकते हैं। इसके अलावा, आयुष्मान भारत योजना और अन्य स्वास्थ्य बीमा योजनाओं का पंजीकरण भी CSC के माध्यम से किया जा रहा है, जिससे ग्रामीण इलाकों के लोग स्वास्थ्य संबंधी सेवाओं का आसानी से लाभ उठा सकें।
5. किसान और शिक्षा सेवाएं
CSC ने किसानों के लिए एक विशेष पोर्टल लॉन्च किया है, जिसमें कृषि संबंधित परामर्श और सेवाएं प्रदान की जाती हैं। इसके साथ ही शिक्षा सेवाओं में भी CSC ने कदम बढ़ाया है, जिससे छात्र डिजिटल लर्निंग और सर्टिफिकेट कोर्स का लाभ उठा सकते हैं।
6. कौशल विकास कार्यक्रम
CSC के कौशल विकास पहल के तहत युवाओं को डिजिटल मार्केटिंग, कोडिंग, और अन्य तकनीकी प्रशिक्षण प्रदान किया जा रहा है। इससे युवा पीढ़ी को रोजगार के बेहतर अवसर मिल रहे हैं।
CSC सेवाओं का लाभ कैसे लें?
यदि आप इन सेवाओं का लाभ उठाना चाहते हैं, तो अपने नजदीकी CSC केंद्र पर जाकर या CSC के आधिकारिक पोर्टल digitalseva.csc.gov.in पर रजिस्ट्रेशन कर सकते हैं।
निष्कर्ष
CSC की ये नई सेवाएं और योजनाएं ग्रामीण और शहरी क्षेत्रों में डिजिटल सशक्तिकरण के लिए एक बड़ा कदम हैं। चाहे कानूनी सलाह हो, स्वास्थ्य सेवाएं, या डिजिटल भुगतान, CSC ने हर क्षेत्र में सुधार और सुविधा को बढ़ावा दिया है।
CSC की नवीनतम अपडेट्स के बारे में अधिक जानने के लिए, हमारे ब्लॉग को सब्सक्राइब करें और अपने नजदीकी CSC केंद्र से संपर्क करें।


PostImage

Vaingangavarta19

Oct. 14, 2024   

PostImage

वनमंत्री यांच्या निर्वाचन क्षेत्रात चक्क बिबट्याने घरात शिरुन महिलेवर केला …


वनमंत्री यांच्या निर्वाचन क्षेत्रात चक्क  बिबट्याने घरात शिरुन महिलेवर केला हल्ला

चंद्रपूर :- . वनमंत्री यांच्या निर्वाचन क्षेत्रात आता चक्क घरात शिरून बिबट्याने महिलेस जखमी केले असल्याची घटना मूल तालुक्यातील मौजा शिवापूर चक येथे काल शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. झोपेत असलेल्या महिलेवर बिबट्याने चक्क घरात शिरून हल्ला केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. वंदना परशुराम निमगडे वय ४८, रा. शिवापूर चक, असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. मूल तालुक्यातील मौजा- शिवापूर चक येथे परशुराम आबाजी निमगडे आपल्या कुटुंबीयासह राहतात. घराला लागूनच बगिचा तसेच काही अंतरावर बफर क्षेत्राचे जंगल आहे. निमगडे यांचे कुटुंबीय रात्री झोपेत असताना शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास बिबट्याने घरात शिरून वंदना परशुराम निमगडेवर हल्ला केला. काही अंतरावर असलेल्या कुत्र्यांनी बिबट्याला बघून भुंकण्याचा आवाज केल्याने निमगडे कुटुंबीय जागे झाले. दरम्यान,बिबटया वंदनावर हल्ला करीत असल्याचे दृश्य बघुन इतरांनी घाबरलेल्या अवस्थेत आरडाओरड केल्याने बिबट पळुन गेला. मात्र, बिबट्याच्या हल्यात वंदना निमगडे ही जखमी झाली. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन जखमी वंदना निमगडे हिला मूल येथील उपजिल्हा रूग्णलयात उपचारार्थ दाखल केले. वनविभागाने पंचनामा करून पुढील तपास करीत आहेत.

मुल तालुका हा बल्लारपूर मतदार संघात येतो. या क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री असल्याने चक्क वनमंत्र्याच्या गृहक्षेत्रातच वन्यप्राण्यांची एवढी दहशत निर्माण झाल्याने तालुक्यातील नागरिकांनी कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न निर्माण झालेला आहे. वनमंत्र्यांनी विधानसभा क्षेत्रातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यावर तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे.


PostImage

Vaingangavarta19

Oct. 13, 2024   

PostImage

तलावात नेले देवी विसर्जनाला मात्र खड्ड्यात पडून 3 तरुणांना झाली …


तलावात नेले देवी विसर्जनाला मात्र खड्ड्यात पडून 3 तरुणांना झाली जलसमाधी 

 

गोंदिया : देवी विसर्जन दरम्यान तलावात खोदलेल्या खड्ड्यात तोल गेल्याने तीन तरुणांचा त्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सावरी टोला (रावणवाडी) येथील संकुलात शनिवारी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास घडली.

आशीष फागुलाल दमाहे वय, 22 वर्ष, अंकेश फागुलाल दमाहे वय, 19 वर्ष, यश गंगाधर हिरापुरे वय, 19 वर्ष तिघे रा. सावरी ता. गोंदिया असे या घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गावातील तलावात रस्त्याच्या कामासाठी मे 2024 मध्ये खोदण्यात आलेल्या खड्ड्यात देवीच्या मूर्तीचे विसर्जन करताना तीन तरुणांचा तोल जाऊन खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना सावरी येथे घडली.

12 ऑक्टोबर रोजी रात्री 10:30 वाजता रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत हा प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळतात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने रात्री 3 तास तलावात मृतदेह शोधून एक मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले आणि दुसरा मृतदेह रविवारी सकाळी सापडला आणि एक उपचारासाठी घेवून जात असताना तिसऱ्या तरुणाचा मृत्यू झाला.

शनिवारी सावरी गावातील इतर रहिवासी दुर्गा देवी मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन कार्यक्रमात सहभागी झाले होते. अंतिम टप्प्यात सावरी टोला येथील तलावात मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गावातील 9 तरुण देवीची मूर्ती घेऊन तलावाकडे गेले असता.

यश हिरापुरे, आशिष दमाहे, अंकेश दमाहे आणि मागून मूर्ती धरून बसलेला आणखी एक युवक पुढे आला. तलावात खोदलेल्या खड्ड्यात तीन तरुणांची जलसमाधी झाली आणि दुसऱ्या तरुणाने कशी तरी वरून मूर्ती हलवून त्यांचे प्राण वाचवले.

या घटनेत मृत्यू झालेल्या आशिष दमाहे या तरुणांची नुकतीच लष्करात निवड झाली होती आणि काही प्रशासकीय प्रक्रियेनंतर तो सरकारी सेवेत रुजू होणार होता.

तलावाच्या खोल खड्ड्यात बुडून या तिन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच रावणवाडी पोलीस व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चे पथक घटनास्थळी दाखल झाले. या हृदय द्रावक घटनेमुळे रावणवाडी, सावरी, सावरीटोला परिसरात शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे. रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास रावणवाडी पोलिस ठाणे चे पोलिस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 13, 2024   

PostImage

काँग्रेसचे नेत्या सोनाली कंकडालवार यांची पांचाळ समाज शारदा देवी मंडळाला …


 

अहेरी : शहरातील ब्राम्हमगरु मंदिर येथे पांचाळ समाज शारदा देवी मंडळाला काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी भेट देऊन शारदा मातेच्या विधिवात पूजा अर्चना,आरती देऊन देवीची दर्शन घेतले.दर्शना दरम्यान सोनालीताईंनी शारदा मातेच्या चरणी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना केले.यावेळी सोनालीताई सोबत शहरातील समस्त महिला वर्ग उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 13, 2024   

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या …


 

अहेरी : तालुक्यातील जामगाव येथील जिल्हा परिषद शाळेजवळील चौकात हिंदवी स्वराज्य संस्थेचे संस्थापक व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविणार असून याचे भूमिपूजन काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजय कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी या दोघांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी जामगांव येथे शिवाजी महाराजांचा पुतळ्या उभारण्यात यावी म्हणून जामगांव येथील समस्त नागरिकांनी काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांच्याकडे अनेकदा मागणी केले होते.जामगाव येथील नागरिकांच्या मागणीला दाद देत अजयभाऊ कांकडलवार यांनी स्व:खर्चाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याची ग्रामस्थांना आश्वासन दिले होते.

ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनानुसार  शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे बांधकामाचे भूमिपूजन केले.महापुरुषांच्या पुतळे बसविण्यासाठी शासन कडून निधी उपलब्ध न झाल्याने शेवटी काँग्रेसनेते अजय कंकडालवार यांनी पुढाकार घेत स्व:खर्चाने पुतळा बांधकाम सामोरे आले.अजयभाऊ कंकडलवार यांचे या कामाप्रती येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त आश्वासन पूर्ती केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

यावेळी माजी उपसरपंच अशोक येलमुले,वांगेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप मडावी,ग्रामपंचायत सदस्य वंदना दुर्गे,माजी जि.प.सदस्य सुनीता कूसनाके,ग्रामपंचायत सदस्य राजू दुर्गे,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,ग्रामपंचायत सदस्य गर्गमताई,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,ओमकार पोट्टे,व्यंकटेश धानोरकर,अरविंद निखाडे,सुरेश आत्राम,हनुमंतू डोके,शंकर आर डोके,मधुकर सांमरे,सदाशिव धानोरकर,श्रीनिवास डोके,अशोक जुनघरे,प्रवीण पिपरे,शुभम धानोरकर,राकेश ठोंबरे,राजेश ठोंबरे,श्रावण पोटे,विनोद डोके,सत्यनारायण सामरे,सुनील चापले,राहुल निखाडे,आनंदराव धानोरकर,अक्षय पोटे,चंपत चौधरीसह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 13, 2024   

PostImage

काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजय कंकडालवार यांनी गिताली येथील …


 

मुलचेरा : तालुक्यातील गिताली येथील दरवर्षी प्रमाणे यंदाही जय मॉ दुर्गा मातेचे प्रतिष्ठापणा केले आहे.काल काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार गिताली येथील दुर्गा मंडळाला भेट घेऊन दुर्गा मातेचे विधिवात पूजा अर्चना,आरती देऊन दुर्गा मातेच्या दर्शन घेतले.

त्यावेळी अजय कंकडालवार यांची जय मॉ दुर्गा मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांकडून अजयभाऊंची स्वागत केले.तसेच अजय कंकडालवार दुर्गा मंडळाला वर्गणी दिले.दर्शना दरम्यान कंकडालवारांनी दुर्गा मातेच्या चरणी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना केले.तसेच स्थानिक नागरिकांना समस्या जाणून घेतले.

यावेळी मंडळाचे गोपाल कविराज सोशल मीडिया काँग्रेस कमिटी,प्रशांत संजीत बिश्वास,अमित मुजुमदार,बासू मुजुमदार,आशिम अधिकारी,तेजन मंडल,परतो मंडल,जोतिष मंडल,महादेव पाईक,सुरज सरकार,विवेक बिश्वास,विजय शील,धीरज शील,दीपक बिश्वास,विजय सरकारसह आदी उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 13, 2024   

PostImage

धम्म चक्र प्रवर्तन दिनी अहेरीत भीम रॅली मंत्री ना. धर्मराव …


 

अहेरी:- येथील बौद्ध विहाराच्या प्रांगणात ज्ञान प्रसारक मंडळाच्या वतीने शनिवार 12 ऑक्टोबर रोजी 68 वे धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आले.
   सकाळी पंचशील ध्वजचे ध्वजारोहण पुष्पा चांदेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्या नंतर सामूहिक रित्या त्रिशरण -,पंचशील ग्रहण करण्यात आले.
     सायंकाळी शहरातून भीम रॅली काढण्यात आले. जय भीम व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जय घोषणी अहेरी राजनगरी दुमदुमली. दरम्यान मुख्य चौकात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या रथाचे दर्शन घेऊन मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन केले आणि धम्म चक्र प्रवर्तन दिनाचे शुभेच्छा दिले. यावेळी ज्ञान प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते.


PostImage

art of living

Oct. 12, 2024   

PostImage

खरे वृत्तांत दिवाळी विशेषांकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन...


प्रसार माध्यम हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे भारतामध्ये लोकशाही मुल्य रुजविण्याचे महत्त्वाचे कार्य प्रसार माध्यमाद्वारे करण्यात येते आहे जनसामान्यांचे प्रश्न शासनासमोर मांडण्याचे व सोडविण्याचे महत्त्वाचे कार्य खरे वृत्तान्त न्यूज पोर्टल तथा यूट्यूब चैनल त्याचा अर्थ साप्ताहिक च्या माध्यमातून सोडवण्याची कसोशीने प्रयत्न केले आहे व समाज जडणघडण मध्ये प्रसार माध्यमांची भूमिका ही शासनाला मार्गदर्शन करण्याचे व शासन चुकत असल्यास शासनाला धारेवर धरताना मागेपुढे न बघता राष्ट्र उभारणीचे कार्य प्रसार माध्यमाद्वारे सतत केली जात आहे खरे वृत्तांत दिवाळी विशेषांक 2024 ला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा ...

चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ अमरावती,जिल्ह्यात खरे वृत्तांतने आपल्या वृत्ताच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न घेऊन त्यांना सर्वसामान्यपणे न्याय देण्याचा कार्य केले खरे वृत्तांत न्यूज नेटवर्कची लोकप्रियता घराघरात पोहोचविली  पुरोगामी पत्रकार संघ (भारत) व महाराष्ट्र राज्य पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव निलेशजी ठाकरे चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात खरे वृत्तांत दिवाळी विशेषअंक  तयार करण्यात आलेला आहे व या खरे वृत्तांत दिवाळी विशेषांकचे विमोचन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आहे.

बल्लारपूर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला विशाल रंगारी जिल्हा प्रतिनिधी खरे वृत्तांत काशिनाथ सिंह बल्लारपूर तालुका प्रतिनिधी संजय हाटे उपजिल्हा प्रतिनिधी या सह अनेक पदाधिकारी  आदी उपस्थित होते.

खरे वृत्तांत दिवाळी विशेषांक 2024 वरून प्रसार माध्यमे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे व भारतामध्ये लोकशाही मूल्य रुजविण्याचे महत्त्वाचे प्रसार कार्य प्रसार माध्यमांद्वारे करण्यात येते व जनसामानचे प्रश्न शासनासमोर मांडायचे सोडवण्याचे महत्त्वाचे कार्य आपल्या या खरे वृत्तांत न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून केले जावे विश्वास व्यक्त करीत जिल्ह्यामध्ये खरे वृत्तांत न्यूज नेटवर्क तर्फे सामाजिक उपक्रमातून केलेली कामे ही स्तुतनीय आहे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रसंगी गौरवउद्गार केले.
खरे वृत्तांत दिवाळी विशेषांक २०२४ च्या माध्यमातून बेरोजगारांना एक व्यवसायभीमूख रोजगाराची संधी म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक जिल्हा आत्मा प्रकल्प संचालक, उपविभागीय कृषी अधिकारी राजुरा  यांचा दुधी भोपळ्याच्या अप्रतिम कलाकृती तुंबा आर्ट लेख हा मार्गदर्शक ठरणार असून रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहे यांसह दिवाळीचे विविध व्यंजनांसह मान्यवरांचे पत्रकारितेवर तथा डिजिटल मीडिया या विषयावर विशेष लेख व खरे वृत्तान्त न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून १ जनवरी ते १५ ऑगस्ट २०२४ दरम्यान झालेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती सुद्धा या दिवाळी विशेषांका मध्ये दिसणार असून बेरोजगारीवर मात करण्याकरिता व डिजिटल मीडिया म्हणजे काय या विषयासह समाजात नित्य घडत असलेल्या ज्वलंत प्रश्नावरील लेख यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे तो सर्वांसाठी व्यापक ठरेल


PostImage

MH 33 NEWS

Oct. 11, 2024   

PostImage

फ्रेंड्स क्लब नवदुर्गा मंडळ जवळ कंकडालवार परिवाराकडून महाप्रसाद कार्यक्रम आयोजित...!


 

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील दरवर्षी प्रमाणे यंदाही नवदुर्गाचे प्रतिष्ठापणा केले आहे.काल नवदुर्गा मंडळ येथे महाआरती कार्यक्रम आयोजित केले.आयोजित महाआरती कार्यक्रमला काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार आणि काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनाली कंकडालवार यांनी उपस्थित दर्शवून दुर्गा मातेच्या विधिवात पूजा अर्चना,आरती देऊन दर्शन घेतले.

विशेष म्हणजे या वर्षी फ्रेंड्स क्लब नवदुर्गा मंडळ जवळ माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचा कडून महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केले आहे.महाप्रसाद कार्यक्रमला परिसरातील व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसाद आस्वाद घेतले.त्यावेळी आरती दरम्यान अजय कंकडालवार व सोनाली कंकडालवार यांनी दुर्गा मातेच्या चरणी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना केले.तसेच नवदुर्गा मंडळाला वर्गणीही देण्यात आली.

यावेळी अजय कंकडालवार सोबत अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,चंदू बेझालवार,स्वप्नील मडावी,बबलू शेख,चिंटू आत्राम,जावेदभाऊ,रिंकू आत्राम,वाहन चालक सचिन पंचार्य,वाहन चालक प्रमोद गोडसेलवारसह परिसरातील भाविक तसेच गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 10, 2024   

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व हणमंतू मडावी यांनी आगामी विधानसभा …


 

मुलचेरा : तालुक्यातील शांतीनगर येते काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी शांतीनगर येथील नागरिकांची भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुक बाबत तसेच गावातील विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली आहे.

त्यावेळी अजयभाऊंनी येथील स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांना तसेच गावातील युवक,नागरिकांना सांगितले की'काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिली आहे.शांतीनगरसह जिल्ह्यातील तसेच परिसरातील गावांच्या विकासासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे.

आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकित दलबदलुंना रस्ता दाखविण्यासाठी काँग्रेसचा कार्यकर्त्यांनी पॅनलचे उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे असे आव्हान काँग्रेसचेनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजय कंकडालवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तसेच नागरिकांना केले.त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी येथील नागरिकांची विविध समस्या जाणून घेतले.

यावेळी प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक,अजय नैताम माजी जि.प.सदस्य,श्रीकांत हलदर माजी उपसरपंच शांतिग्रम,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,सचिन पांचार्यासह स्थानिक कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 9, 2024   

PostImage

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांचे फलित ब्रह्मपुरी तालुक्यात यशवंतराव …


 


ब्रम्हपुरी:-महाविकास आघाडी सरकार काळात विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजातला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे करिता राज्याचे तत्कालीन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कार्यान्वित केली. या योजनेतून अनेक लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळाले. तर आज विरोधी बाकावर बसूनही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजातील लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून शासन स्तरावर मागणी भेटून धरल्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील एकूण ४४७ घरकुलांना मंजूरी मिळाली. यामुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.

समाजातील हातावर आणून पानावर खाणे अशा प्रचंड संघर्ष जीवन जगणाऱ्या भोई समाजाला आजवर कुठल्याही योजनेमार्फत हक्काचे घर मिळाले नाही. तर पोटाची भूक भागविण्यात संपूर्ण मिळकत खर्च होत असल्याने तसेच बचत शिल्लक राहत नसल्याने फार विवंचनेच सापडलेल्या या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून या समाजाचा सर्वांगीण विकास साधावा या उदांत हेतूने महाविकास आघाडी सरकार काळात राज्याचे तत्कालीन इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री तथा कॅबिनेट मंत्री तसेच विद्यमान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ता काळात समाजातील दुर्बल घटकांकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंमलात आणली. सदर योजनेमार्फत राज्यातील लाखो लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला व त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले. यात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील हजारोच्या संख्येने लाभार्थ्यांचा सहभाग आहे. मात्र मागील वर्षी उद्दिष्ट पूर्तीत काही तांत्रिक अडचणी व कागदी त्रुट्यांमुळे जे लाभार्थी अपात्र ठरले व ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. अशा अपात्र व गरजू लोकांना हक्काचे घरकुल मिळावे याकरिता राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी शासन स्तरावर सतत पाठपुरावा सुरू ठेवला. त्यांनी चालवलेल्या प्रयत्नांना आज फलश्रुती मिळाली असून ब्रह्मपुरी तालुक्यात ४४७ नव्याने घरकुलांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे . सत्ता काळ ते विरोधी बाका पर्यंत च्या प्रवासात सर्वसामान्यांची नाळ जुळून असलेला नेता म्हणून सर्व दूर परिचित असलेले राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांमुळे आज विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना आपल्या हक्काचे घर मिळणार असून त्यांच्या या यशाच्या फलश्रुतीमुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


PostImage

Zadipatti VC News and Business

Oct. 9, 2024   

PostImage

चुडाराम बल्हारपुरे यांना मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणेचा पुरस्कार जाहीर


गडचिरोली -                

              जगप्रसिद्ध असलेल्या व गेल्या सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे  या संस्थेतर्फे  दरवर्षी मराठी साहित्यिकांना त्यांच्या विविध उत्कृष्ट  वांड्.मय निर्मीतीसाठी श्रीस्थानक राज्यस्तरीय पुरस्काराने पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना नामवंत मराठी साहित्यिकांचे हस्ते  सन्मानित करण्यात येते. 
        महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात विशेष मानाचा समजल्या जाणाऱ्या या  पुरस्काराकरीता नाट्यवांड्.मय प्रकारात यावर्षी झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा: क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास नाट्यलेखनाचे  पारितोषिक जाहीर करण्यात आल्याचे मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथील कार्यवाह तसेच पुरस्कार समिती सदस्य व साहित्यिक चांगदेव काळे यांनी पत्राद्वारे कळविले असून दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता मराठी ग्रंथ संग्रहालय, सरस्वती मंदिर, वा.अ.रेगे सभागृह , पहिला मजला, जिल्हा परिषद कार्यालयासमोर, स्टेशन रोड, ठाणे(पश्चिम),  येथे होणाऱ्या संस्थेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात हा पुरस्कार सरस्वती पुरस्काराने सन्मानित मा. श्री शरणकुमार लिंबाळे, सुप्रसिद्ध साहित्यिक यांचे हस्ते अनेक मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. 
      या  पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मान वस्त्र, व सन्मानपत्र  असे आहे. विशेष म्हणजे या नाटकास यापूर्वी साहित्य सेवा प्रज्ञामंच , पुणे यांचा 'उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार -२०२३'  प्राप्त झाले आहे.
      यापुर्वी त्यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास नाट्यलेखनाचे पाच पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यात राधानगरी (जि. कोल्हापूर) येथील 'गगनगिरी महाराज साहित्य गौरव पुरस्कार - २०२३ ', मौजा फलटण (जिल्हा- सातारा येथील धर्मविर संभाजी महाराज उत्कृष्ट साहित्य पुरस्कार- २०२४ व तितिक्षा इंटरनॅशनल, पुणे यांचे तितिक्षा उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार- २०२४ झाडीबोली साहित्य मंडळ, शाखा- गडचिरोली यांचे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार-२०२४ इ. पुरस्कार प्राप्त झाले आहे . या नाटकांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयोग सुरू असून नुकत्याच भोपाळ (मध्यप्रदेश) येथे झालेल्या जनयोद्धा राष्ट्रीय समारोहात  या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला आहे.
             चुडाराम बल्हारपुरे हे झाडीपट्टीतील राज्य पुरस्कार प्राप्त नाटककार आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार प्राप्त झालेले आहे. आजपर्यंत त्यांची विविध १३ पुस्तके प्रकाशित झाली असून विविध स्तरावरील अनेक पुरस्काराने ते सन्मानीत आहेत. महामृत्युंजय मार्कंडेश्वर, महापूजा, बहूढंगी समाधीवाले बाबा, स्पेशल रिपोर्ट, धरती आबा-क्रांतीसुर्य बिरसा मुंडा ,व गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके ही त्यांची गाजलेली नाटके आहेत.
                चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा. अरुण बुरे, योगेश गोहणे, प्रा.यादव गहाणे, प्रा. डॉ. श्याम मोहरकर, प्रा. डॉ. जनबंधू मेश्राम, प्रा. डॉ. योगीराज नगराळे, डॉ. दिपक चौधरी, नाट्यश्रीचे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, राजेंद्र जरुरकर, दै. लोकमतचे संजय तिपाले, दै. हितवादचे रोहिदास राऊत, दै. देशोन्नतीचे नरेश बावणे, दै. सकाळचे मिलिंद उमरे,  दै. पुण्यनगरीचे प्रल्हाद म्हशाखेत्री व प्रमोद गेडेकर, प्रा. नवनीत देशमुख (साहित्यिक),  मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर (प्रकाशक),  व इतर साहित्यिक व कलावंतांनी अभिनंदन केले आहे.


PostImage

Avinash Kumare

Oct. 8, 2024   

PostImage

कर्नाटकातील एका थिमिक्का नावाच्या महिलेने 4 किलोमीटर अंतरावर चक्क २८४ …


दगडाच्या खाणीत काम करणाऱ्या थिमक्काने लग्नानंतर मुलं झाली नाहीत म्हणून कर्नाटकातील एका रस्त्याच्या दुतर्फा 4 कि.मी.पर्यंत चक्क 284 वडाची झाडं लावली अन त्या झाडांवरच तिने मुलांसारखं प्रेम केलं. त्या झाडांना वर्षानुवर्षे रोज पाणी घालून वाढवलं अन आज त्या झाडांचं रूपांतर डेरेदार वृक्षामध्ये झालंय. 

थिमक्काच्या त्या नेत्रदीपक कार्याची दखल तिकडे अमेरिकेत घेतली गेलीय आणि पर्यावरणावर कार्य करत असलेल्या एका संस्थेचे नामकरण "थिमक्का रिसोर्सेस फॉर एनवायरनमेंट एज्युकेशन" असं करण्यात आलंय. 

प्रत्येकाने आयुष्यात एक जरी झाड लावलं आणि वाढवलं तर जगातील पर्यावरणाचे अर्धे अधिक प्रश्न सुटतील. तसं होत नाही म्हणून थिमक्का सारख्या अशिक्षित महिला अशी शेकडो झाडं लावून ती वाढवतात म्हणून पर्यावरण अजूनही समतोल राखून आहे. ज्या दिवशी असे लोक पर्यावरणाकडे दुर्लक्ष करतील तेव्हा पृथ्वीचा विनाश अटळ असेल. म्हणूनच माझं सर्वाना कळकळीचं आवाहन आहे तुम्हाला जर शक्य असेल तर आपल्या परिसरात एक तरी झाड अवश्य लावा अन त्याचा सांभाळ करा. थिमक्का जर 284 वडाची झाडं लावून वाढवू शकते तर तुम्ही एक तरी झाड नक्कीच लावून वाढवू शकता. 

झाडे_लावा_झाडे_जगवा🌳🌳🌳

 अश्याच प्रकारच्या नवनवीन ताज्या बातम्यासाठी सरकारी माहिती व अन्य खाजगी नोकरी व रोजगार संदर्भातील सम्पूर्ण माहिती विस्तृतपणे जाणून घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा...! 

https://chat.whatsapp.com/HqM9utVvLSwAcJ1h2kxYfO