PostImage

Avinash Kumare

Today   

PostImage

Sarkari Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदानावर मोफत फवारणी …


Sarkari Yojana: सन 2024-25 मध्ये राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी महत्वाची योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत ‘बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचा’ पुरवठा करण्यात येणार आहे, ज्याचा 100% खर्च शासन उचलणार आहे. या योजनेचा थेट फायदा राज्यातील हजारो शेतकऱ्यांना होईल.

 

योजनेचे उद्दिष्ट

कापूस, सोयाबीन, आणि इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न अधिक करणे, तसेच या पिकांशी निगडित मूल्यसाखळीला चालना देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. विशेष कृती योजना 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षांसाठी आखण्यात आली असून, या काळात राज्यभरात शेतकऱ्यांना मोफत फवारणी पंप उपलब्ध करून दिले जातील.

 

असे करा अर्ज

शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  • mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जा.
    ‘Farmer Login’ वर क्लिक करा.
  • आवश्यक ती माहिती भरून अर्ज सादर करा.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा
शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी त्यांच्या जवळच्या खालील कार्यालयांशी संपर्क साधावा:

  • जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
  • उप विभागीय कृषी अधिकारी
  • तालुका कृषी अधिकारी

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

Sujata Awachat

Yesterday   

PostImage

Gadchiroli News: ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक


Gadchiroli News: सध्या सोशल मीडियाचे युग सुरू आहे. नागरिक ऑनलाईन खरेदी विक्री करतात. विविध कॉल्स किंवा मेसेजद्वारे नागरिकांची फसवणूक होत असते मात्र नागरिकांची आर्थिक लुबाडणूक करण्याची नवीन पद्धत आता आली असून जिल्ह्यातील हजारो नागरिकांना ऑनलाईन ट्रेडिंगने लाखो रुपयांचा गंडा घातला असून आणखी अनेक नागरिकांची नागरिकांची लुबाडणूक होण्याची शक्यता आहे.

ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली काहीजण व्हॉट्सअॅपवर ग्रुप तयार करून दररोज रात्री 8 वाजता ग्रुपमध्ये मेसेज टाकतात. पिपिमी एक्सचेंज, एआयजी (नाव बदललेले आहे) सारख्या अॅपमध्ये पैसे टाकण्यास सांगतात.

सुरुवातीला कमीत कमी एक हजार, दोन हजार, पाच हजार आणि जास्तीत
जास्त कितीही रूपये आपण टाकू शकता असे सांगण्यात येते. त्यानंतर दररोज आपण टाकलेल्या रकमेवर व्याज किंवा कमिशन मिळते असे

सांगण्यात येते. सुरुवातीला काही जणांना पैसेही मिळाले त्यांनी आणखी जास्ती गुंतवणूक केली. काही जणांनी पाच दहा लोकांना जोडून साखळी तयार केली.
मात्र मागील काही दिवसांपासून दोन्ही अॅप मधून लोकांना पैसे येणे बंद झाले असून आपली आर्थिक फसवणूक झाली आहे असे नागरिकांना कळत आहे. काही जणांनी पोलिस तक्रार करण्याची तयारी दर्शविली आहे. 

विशेष म्हणजे या दोन्ही अॅपमध्ये पैसे टाकताना फोन पे किंवा गुगल पे व पेटीएम सारख्या अॅपचा वापर करण्यात आला. त्यामुळे अशा अनोळखी आणि अनधिकृत अॅपकडे सर्वांची पूर्ण बँक डिटेल्स गेल्या आहेत. त्यामुळे भविष्यात मोठी आर्थिक हानी होणार काय याची भीती सर्वांना लागली आहे.


PostImage

Blogs with Nili

Dec. 10, 2024   

PostImage

Sarkari Yojana: या योजने अंतर्गत सरकार देणार व्यवसाय सुरू करण्यासाठी …


Sarkari Yojana: जर तुम्ही तुमच्या नोकरीतून त्रस्त असाल आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असले तरी तुमच्याकडे पुरेसे पैसे नसतील, तर भारत सरकार तुमच्यासाठी एक उत्तम संधी देत आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी 75 ते 80 टक्के कर्ज आणि सबसिडी मिळू शकते. यासाठी तुम्हाला फक्त अर्ज प्रक्रिया समजून घ्यावी लागेल.

 

प्रधानमंत्री मुद्रा योजना

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत, छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला तुमच्या बँकेशी संपर्क साधावा लागेल. या योजनेतून मिळणाऱ्या कर्जाच्या रकमेचा उपयोग विविध व्यवसायांसाठी केला जाऊ शकतो.

 

व्यवसाय कल्पना आणि कर्जाची सुविधा

हे देखील वाचा : Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार पैसे, जाणून घ्या सविस्तर माहिती

पापड मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय: पापड बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमची प्रारंभिक गुंतवणूक 2.05 लाख रुपये असावी लागेल. सरकार 8.18 लाख रुपये कर्ज आणि 1.91 लाख रुपयांची सबसिडी देईल. हे कर्ज प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत उपलब्ध होईल.

करी आणि तांदूळ पावडर व्यवसाय: देशात करी आणि तांदूळ पावडरची मागणी वाढत आहे, आणि यासाठी तुम्हाला 1.66 लाख रुपयांची प्रारंभिक गुंतवणूक करावी लागेल. सरकार तुम्हाला 3.32 लाख रुपयांचे मुदत कर्ज आणि 1.68 लाख रुपयांचे खेळते भांडवल कर्ज देईल.

हे देखील वाचा : Ladaki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडकी बहीण योजना राहणार सुरू, पण या महिलांना मिळणार नाही आता लाभ, जाणून घ्या कारण

अर्ज प्रक्रिया

या योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी, तुम्हाला बँकेशी संपर्क साधावा लागेल. तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन कर्जासाठी अर्ज करू शकता. यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी बँकेतून मिळवता येईल.

जर तुम्हाला छोट्या व्यवसायाची सुरूवात करायची असेल, तर प्रधानमंत्री मुद्रा योजना एक उत्तम संधी आहे. यामुळे तुम्हाला सशक्त वित्तीय आधार मिळेल, आणि तुम्ही कमी गुंतवणुकीत आपला व्यवसाय सुरू करू शकाल.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

Sujata Awachat

Dec. 8, 2024   

PostImage

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! आता या लाडक्या बहिणींना …


Ladki Bahin Yojana: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. महिलांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे महायुतीला बहुमत मिळालं असल्याचं सांगितलं जात आहे, विशेषतः लाडकी बहीण योजनेमुळे या निवडणुकीत महायुतीला लाभ मिळाल्याचं बोललं जात आहे.

मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेसंबंधी एक मोठी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. यावर फडणवीस यांनी सांगितले, "आम्हाला लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची आहे. आम्ही महिलांना 2100 रुपये देणार आहोत. आम्ही या बाबत अर्थसंकल्पात विचार करू.

हे देखील वाचा : Sarkari Yojana: खुशखबर! या योजने अंतर्गत सरकारकडून मिळणार आता 20 लाखापर्यंत कर्ज, असे कर अर्ज

त्यानंतर त्यांनी स्पष्ट केले की, "आम्ही वित्तीय साधनांच्या योग्य चॅनलायझेशननंतरच ही मदत देऊ शकतो. आम्ही सर्व दिलेल्या आश्वासने पूर्ण करू आणि यासाठी योग्य ती व्यवस्था करू." योजनेतील महिला लाभार्थ्यांच्या नोंदींची तपासणी केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. काही महिलांना या योजनेतून बाहेर काढलं जाऊ शकतं.

फडणवीस यांचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता - "जर कोणी योजनेच्या निकषांचं पालन न करताच लाभ घेतला असेल, तर त्यावर विचार केला जाईल. ज्या महिलांनी नियमांचं पालन केलं आहे, त्या महिलांचं नाव काढलं जाणार नाही."

राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सुमारे 2.43 कोटी महिलांना लाभ मिळाला आहे, आणि दरमहा 1500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होत आहेत. यासाठी राज्य सरकारला प्रत्येक महिन्याला 3700 कोटी रुपये खर्च करावे लागतात. आता, लाभार्थ्यांच्या नोंदींची तपासणी आणि अर्थसंकल्पानंतरच महिलांना वाढीव रक्कम दिली जाणार आहे.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

Blogs with Nili

Dec. 7, 2024   

PostImage

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! या दिवशी लाडक्या बहिणींच्या …


Ladki Bahin Yojana: राज्यातील महिलांसाठी सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेतून मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत दर महिन्याला पात्र महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये थेट जमा केले जातात. जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेचा लाभ नोव्हेंबरपर्यंत नियमितपणे मिळाल्याचे सांगण्यात आले. मात्र, डिसेंबर महिन्याचा हफ्ता कधी जमा होईल, याकडे महिलांचे लक्ष लागले होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही अधिकाऱ्यांना योजनेचा डिसेंबर हफ्ता लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत." यामुळे लाडक्या बहिणींसाठी डिसेंबर महिन्याचा हफ्ता येत्या काही दिवसांत खात्यात जमा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

ही योजना महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी मोठा आधार ठरत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लाभार्थी महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. लाडकी बहीण योजना महिलांसाठी सशक्तीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.


PostImage

Blogs with Nili

Dec. 6, 2024   

PostImage

Ladaki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडकी बहीण योजना राहणार सुरू, …


Ladaki Bahin Yojana: महाराष्ट्रातील बहुचर्चित लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याची चर्चा विरोधकांनी जोरदारपणे सुरू केली होती. निवडणुकीआधी महायुती सरकारने सुरू केलेल्या या योजनेबाबत पुढे काय होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. मात्र, महायुती सरकारच्या शपथविधीनंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व शंका दूर केल्या.

हे देखील वाचा : RBI News Today: RBI चा मोठा निर्णय! या नागरिकांचे बँक खाते आता होणार कायमचे बंद, जाणून घ्या कारण

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, उलट महिलांना मिळणाऱ्या रकमेची वाढ करण्याचा विचार सुरू आहे. त्यांनी सांगितले की, सध्याच्या 1500 रुपयांऐवजी लवकरच महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचा निर्णय घेतला जाईल.

ही योजना केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी लागू आहे. 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळतो. तसेच, ज्या महिलांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळते.

हे देखील वाचा : Sarkari Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! या शेतकऱ्यांना होणार आता लाखोंचा फायदा, जाणून घ्या माहिती

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दिलासा मिळणार असून, योजना अधिक प्रभावीपणे राबवली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

Avinash Kumare

Dec. 5, 2024   

PostImage

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे …


Ladki Bahin Yojana: राज्यातील महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकूण 3 हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच जमा होणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे 3 हजार रुपये एकत्र मिळाले होते. मात्र, निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे डिसेंबरचा हप्ता रखडला होता.

निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन सरकार सत्तेत आले असले तरी महिलांना डिसेंबरचा हप्ता कधी मिळेल, याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळत नव्हती. यामुळे अनेक महिलांनी नाराजी व्यक्त केली होती. आता प्रशासनाकडून मकर संक्रांतीपूर्वी म्हणजेच 14 जानेवारीच्या आधी डिसेंबर आणि जानेवारीचे दोन हप्ते एकत्र दिले जातील, असे सांगितले जात आहे.

राज्यातील सुमारे अडीच कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. सरकारने अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र, निवडणुकीमुळे अर्जांची प्रक्रिया स्थगित झाली होती. सध्या आचारसंहिता संपल्यानंतर अर्जांची छाननी सुरू असून काही दिवसांत यापूर्वी दाखल केलेल्या अर्जांचीही पडताळणी होईल.

एप्रिल महिन्यानंतर प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेला दरमहा 2100 रुपये देण्यात येतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी योजनेचा लाभ मिळेल, असा विश्वास आहे.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 4, 2024   

PostImage

ती म्हणते, मला पाहिजे फक्त सरकारी नोकरी वाला नवरा


 

गडचिरोली, ब्युरो. तुळशी विवाह आटोपताच लग्नसोहळ्यांना सुरुवात झाला आहे. यामुळे उपवर मुला-मुलींसह स्थळ शोधण्याच्या कार्यक्रमाला वेग आला आहे. ग्रामीण भागात मंडईच्या माध्यमातून उपवर-वधू शोधण्यासाठी आप्तेष्ट, नातेवाईकांना विचारणा होऊ लागली आहे. मात्र आता ग्रामीण भागातील वधु मुलींच्या अपेक्षा खुप वाढल्या असल्याने शेतकरी मुलांची चांगलीच कुचंबणा होत असून, त्यांना मुलगी मिळणे कठीण झाले आहे.

 

शिकलेल्या मुली व त्यांचे पालक मुलीसाठी शिकलेला, सरकारी नोकरी व घरी थोडीफार शेती असलेल्या मुलांनाच पसंती देत आहेत. खासगी नोकरी आणि सध्या कमी पगार असला, तरी चालेल पण तो शहरात राहणारा असावा, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. जुन्या काळामध्ये उत्तम शेती, मध्यम व्यापार, तर कनिष्ठ नोकरी समजली जायची. मात्र, आता उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि शेतीला कनिष्ठ दर्जा दिला जात आहे. सध्या नोकरी करणाऱ्यांसह व्यावसायिकांना मुलीच्या कुटुंबीयांकडून प्राधान्य दिले जात आहे. परिणामी, अनेक शेतकरी तरुणांची फरफट होत आहे.

 

अलीकडे जोडीदारनिवडताना मुलींना नोकरीसह मुलाकडे शेतीही हवी असते मात्र शेतकरी नवरा त्यांना नको आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सामाजिक समस्या जटील झाली आहे. मुलींसह त्यांचे पालक मुलींसाठी शिकलेला, सरकारी नोकर व घरी थोडीफार शेती असलेल्या मुलांना पसंती देत आहेत. यामुळे मात्र, शेतकरी, शेतमजूर वरांची कुचंबणा होत आहे.

 

ग्रामीण भागातही वाढल्या अपेक्षा

सद्यःस्थितीत ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुली सुशिक्षित झाल्या असल्याने त्यांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. उच्अशिक्षित नोकरी, निर्व्यसनी, घरंदाज, कमविता वर मिळावा, अशी त्यांची इच्छा असते. शेतकरी. शेतमजूर वरांना त्यांचेकडून नाक मुरडल्या जात असल्याने ग्रामीण भागातील लग्नाळूना कारभारीन मिळणे कठीण झाले आहे.

 

वधू-वर सूचक केंद्रांमध्ये नोंदणी वाढली!:

पूर्वी ग्रामीण भागातील तरुण वधू-वर सूचक केंद्रांमध्ये सहसा नोंदणी करीत नव्हते. मात्र, आता वधू मिळत नसल्याने समाजातील वधू-वर सूचक केंद्रामध्ये नोंदणी वाढली आहे. शेतकरीही नातेवाइकांना एखादी मुलगी पाहा हो' असा सूर आळवत आहेत.

 

फसवणुकीच्या प्रमाणात वाढ :

लग्नासाठी मुलगी मि मिळत नसल्याने ग्रामीण भागात अनेक तरुणांची फसगत होण्याचे प्रमाणही वाढले आहे. फसवणूक करणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय झाल्या असून, पैसे, दागिने घेऊन लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच वधू फरार होण्याचे प्रमाण वाढले आहे. यातील काही टोळ्यांना पकडण्यात पोलिसांना यशही आले आहे.

 


PostImage

Dipak Indurkar

Dec. 4, 2024   

PostImage

Post Office Scheme For Women: खुशखबर! महिलांसाठी पोस्टाची खास योजना, …


Post Office Scheme For Women: आजच्या काळात महिलांचा बचतीकडे कल वाढलेला आहे. भविष्यासाठी थोडीफार रक्कम बाजूला ठेवण्यास महिलांची प्राधान्यता असते. याच पार्श्वभूमीवर, पोस्ट ऑफिसने महिलांसाठी एक आकर्षक योजना सादर केली आहे – महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना.

 

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची वैशिष्ट्ये

ही योजना महिलांसाठी विशेषतः डिझाइन केलेली आहे, जिथे महिलांना सुरक्षित गुंतवणुकीसोबतच चांगला परतावा मिळतो.

हे देखील वाचा : PM Vishwakarma Yojana: या योजने अंतर्गत मिळणार ₹ 15 हजार, आणि व्यवसायासाठी 3 लाखापर्यंत कर्ज, असे करा अर्ज

  • व्याजदर: या योजनेत वार्षिक 7.5% व्याजदर मिळतो.
  • कालावधी: योजना दोन वर्षांसाठी असते.
  • गुंतवणूक मर्यादा: कमाल ₹2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.
  • टीडीएसमुक्त: या योजनेवर टीडीएस कपात होत नाही.
  • करसवलत: 40,000 ते 50,000 रुपयांपर्यंतच्या व्याजावर टॅक्स नाही.

 

कोण अर्ज करू शकते?

  • भारतातील कोणतीही महिला या योजनेत गुंतवणूक करू शकते.
  • 10 वर्षांखालील मुलीसाठीही ही योजना उपयुक्त आहे.

 

मॅच्युरिटीवर परतावा

जर तुम्ही ₹2 लाखांची गुंतवणूक केली, तर दोन वर्षांनंतर तुम्हाला ₹32,044 व्याजासह एकूण ₹2,32,044 मिळतील.

 

अर्ज कसा करावा?

तुमच्या नजीकच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या आणि खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करा.

ही योजना महिलांसाठी एक मोठी संधी असून भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक करण्याचा आदर्श पर्याय ठरू शकतो. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक करून तुमच्या बचतीला सुरक्षित आणि फायदेशीर बनवा.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 3, 2024   

PostImage

लाडकी बहीण' चे पैसे पुढील वर्षी वाढविणार


 

भाऊबीजेपासून शक्यः माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्ट संकेत

 

 

मुंबई : लाडकी बहीण योजनेतील मानधनात १५०० रुपयांवरून २१०० रुपये इतकी वाढ पुढील वर्षी दिवाळीपासून केली जाईल असे स्पष्ट संकेत माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी दिले.

 

मुनगंटीवार म्हणाले की, आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आणि - जाहीरनाम्यात आम्ही मानधन वाढीचेआश्वासन दिले होते. ते आश्वासन आम्ही पूर्ण करू. हे आश्वासन पूर्ण केले नाही तर आमची प्रतिमा देशभरात खराब होईल. मी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. आपण शब्दावर ठाम राहायला हवे. 

 

मी महायुतीच्या जाहीरनामा समितीचा अध्यक्ष होतो. त्यामुळे आम्ही दिलेली आश्वासन पूर्ण करणार आहोत. आमच्या महायुती सरकारमध्ये लाडक्या बहिणांना २१०० रुपये देण्याची क्षमता आहे. जानेवारी की जुलै किंवा कोणत्या महिन्यापासून वाढ करायची याबाबत चर्चा करण्यात येईल. आम्ही गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना सुरू केली होती. त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो.

 

 


PostImage

Blogs with Nili

Nov. 28, 2024   

PostImage

Sarkari Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! या शेतकऱ्यांना होणार आता लाखोंचा …


Sarkari Yojana: केंद्र सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकत्याच झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान सुरू करण्यात येणार आहे, ज्यासाठी तब्बल 2,481 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या अभियानामुळे देशभरातील सुमारे 1 कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ होईल.

हे देखील वाचा : Ration Card Rule: सरकारने रेशन कार्डच्या नियमांमध्ये केले मोठे बदल! फक्त 450 रुपयात मिळणार गॅस सिलेंडर, जाणून घ्या सविस्तर माहिती

 

नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे

  • मातीची गुणवत्ता सुधारेल: रासायनिक खतांचा कमी वापर केल्याने मातीची पोत सुधारेल, ज्यामुळे शेतीतून अधिक उत्पादन घेता येईल.
  • आरोग्यदायी अन्न: नैसर्गिक पद्धतीने तयार झालेले अन्न अधिक पोषणमूल्ययुक्त आणि सुरक्षित असेल.
  • खर्चात बचत: रासायनिक खतांचा खर्च कमी होऊन शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होईल.

 

युवकांसाठी 'वन नेशन वन सबस्क्रिप्शन' योजना

युवकांना अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ योजना जाहीर केली आहे. या योजनेसाठी 6,000 कोटी रुपये मंजूर झाले असून, विविध शासकीय सेवांचा लाभ युवकांना एका ठिकाणी मिळेल.

या निर्णयांमुळे शेतकरी, युवक आणि उद्योजकांना मोठे लाभ होणार असून, भारताचा विकास वेगाने होण्याची शक्यता आहे.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

Sajit Tekam

Nov. 28, 2024   

PostImage

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना डिसेंबर …


Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना ठरली आहे. डिसेंबर महिन्यात या योजनेतून तब्बल 13 लाख महिलांना रिटर्न गिफ्ट मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे बँक खाते आधारशी लिंक नसलेल्या महिलांचे अर्ज प्रलंबित होते, मात्र आता हे सर्व अर्ज मंजूर होणार आहेत.

हे देखील वाचा : Sarkari Yojana: खुशखबर! या योजने अंतर्गत नागरिकांच्या खात्यात जमा होणार 3000 रुपये, असे करा अर्ज

राज्यातील 2.34 कोटी महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जात आहेत. महायुतीच्या निवडणूक जाहीरनाम्यानुसार ही रक्कम 2,100 रुपये करण्यात येणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यापासून महिलांना वाढीव रक्कम मिळण्यास सुरुवात होईल.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी यापूर्वीच 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र वाढीव निधीसाठी आणखी तरतूद करावी लागणार आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर, महिलांच्या भल्यासाठी निधीवाढीचा पहिला निर्णय घेतला जाऊ शकतो.

डिसेंबर महिन्यात होणारी ही वाढ महिला सक्षमीकरणासाठी मोठी पाऊल ठरेल. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी येणारा डिसेंबर महिना आर्थिकदृष्ट्या आनंददायी ठरणार आहे.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

M S Official

Nov. 27, 2024   

PostImage

New Rules: 1 डिसेंबर पासून या नियमांमध्ये होणार मोठे बदल, …


New Rules: दर महिन्याच्या सुरुवातीला देशभरात अनेक नियमांमध्ये बदल होतात, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक जीवनावर होतो. 1 डिसेंबर 2024 पासून काही महत्वाचे बदल होणार असून त्यामध्ये गॅस सिलिंडरच्या किमती, बँकिंग नियम आणि डिजिटल व्यवहारांचे नवीन नियम यांचा समावेश आहे.

 

एलपीजी आणि इंधन दर बदल:

हे देखील वाचा : Dairy Farming Loan: खुशखबर! शेतकऱ्यांना डेअरी फार्म उघडण्यासाठी सरकार देणार 12 लाख रुपयांचे कर्ज, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया 

1 डिसेंबरपासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 48 रुपयांची वाढ झाली होती, तर घरगुती गॅसच्या किमतीत कोणताही बदल नव्हता. तेल कंपन्या एअर टर्बाइन इंधन (ATF), सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीही दर महिन्याला पुनरावलोकित करतात, त्यामुळे डिसेंबरमध्येही या इंधनांच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे.

 

SBI क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल:

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 1 डिसेंबरपासून काही क्रेडिट कार्ड नियम बदलणार आहे. SBI च्या 48 क्रेडिट कार्डांवर डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म किंवा व्यापाऱ्यांसोबतच्या व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत. याशिवाय, 1 नोव्हेंबरपासून लागू असलेल्या एका नियमानुसार, 50,000 रुपयांपेक्षा जास्त युटिलिटी बिल भरण्यासाठी 1% अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे, जे 1 डिसेंबरनंतरही लागू राहील.

हे बदल सर्वसामान्यांच्या आर्थिक नियोजनावर मोठा परिणाम करू शकतात. त्यामुळे नवीन नियमांबाबत जागरूक राहणे आणि आपल्या आर्थिक व्यवहारांची तयारी करून ठेवणे आवश्यक आहे.

अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

Sujata Awachat

Nov. 27, 2024   

PostImage

Sarkari Yojana: खुशखबर! या योजने अंतर्गत सरकारकडून मिळणार आता 20 …


Sarkari Yojana: जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल, पण भांडवलाचा अभाव असेल किंवा तुमचा चालू व्यवसाय वाढवायचा असेल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या Pradhan Mantri Mudra Yojana मदतीने आता तुम्हाला 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.

हे देखील वाचा : Indian Railways News: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 1 डिसेंबर पासून होणार बदल, प्रवाशांना मिळणार ही नवीन सुविधा

2015 साली सुरू झालेली ही योजना लघु आणि सूक्ष्म उद्योजकांसाठी खास आहे. यामध्ये बिगर-कृषी, बिगर-कॉर्पोरेट उद्योगांना कर्ज दिले जाते, जेणेकरून नव्या उद्योजकांना संधी मिळावी आणि लहान व्यवसायांना विस्ताराची ताकद मिळावी.

 

कर्ज प्रकार आणि मर्यादा

मुद्रा योजनेत तीन प्रमुख श्रेण्या आहेत:

  1. शिशु श्रेणी: रु. 50,000 पर्यंत
  2. किशोर श्रेणी: रु. 5 लाखांपर्यंत
  3. तरुण प्लस श्रेणी: रु. 20 लाखांपर्यंत

विशेष बाब म्हणजे, ज्यांनी यापूर्वी कर्ज घेतले आहे आणि वेळेत परतफेड केली आहे, त्यांना "तरुण प्लस" श्रेणी अंतर्गत 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळण्याची शक्यता आहे.

 

अर्ज कसा करायचा?

  1. Mudra.org.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. अर्ज डाउनलोड करा आणि तपशील भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  3. नंतर तुम्ही जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करू शकता.

 

या योजनेचे फायदे

  • कमी व्याजदर
  • लवचिक परतफेड योजना
  • नवीन उद्योजकांसाठी आर्थिक पाठबळ

तर, आता तुमचा व्यवसाय सुरू करण्याचा किंवा विस्तार करण्याचा विचार करत असाल, तर ही संधी सोडू नका! प्रधानमंत्री मुद्रा योजनेची मदत घेऊन तुमच्या स्वप्नांना पंख द्या.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

Dipak Indurkar

Nov. 26, 2024   

PostImage

PM Vishwakarma Yojana: या योजने अंतर्गत मिळणार ₹ 15 हजार, …


PM Vishwakarma Yojana: गावगाड्यातील पारंपरिक व्यवसायांचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पारंपरिक कारागिरांना व्यवसायासाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण केल्यावर लाभार्थींना 15,000 रुपये प्रोत्साहन निधी दिला जातो, तसेच व्यवसाय उभारण्यासाठी 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे.

हे देखील वाचा : Adhar Card Update: आधार धारकांसाठी मोठी बातमी! लवकर करा हे काम नाही तर, तुमचे आधार कार्ड होणार बंद, जाणून घ्या संपूर्ण माहिती

गावगाड्याच्या अर्थव्यवस्थेचा आधार असलेल्या 18 बलुतेदारांचे महत्त्व पुन्हा जागृत करण्याचा उद्देश या योजनेमागे आहे. आधुनिकीकरणामुळे हरवत चाललेल्या या व्यवसायांना नवसंजीवनी देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.

 

योजनेच्या प्रमुख वैशिष्ट्या

  1. व्यवसाय प्रशिक्षण: पारंपरिक व्यवसायांमध्ये आधुनिक कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.
  2. प्रोत्साहन निधी: प्रशिक्षण पूर्ण केल्यावर 15,000 रुपये दिले जातात.
  3. कर्ज सुविधा: व्यवसाय उभारण्यासाठी 5% व्याजदरावर 1 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे.

 

योजना कोणासाठी आहे?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सुतार, लोहार, धोबी, शिंपी, मूर्तिकार, कुंभार, सोनार, चांभार, गवंडी, न्हावी, जाळे विणणारे कारागीर अशा विविध पारंपरिक व्यवसायांतील व्यक्तींना पात्र ठरवले आहे.

 

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • जातीचे प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साइज छायाचित्र
  • बँक पासबुक
  • मोबाइल क्रमांक

पंतप्रधान विश्वकर्मा योजना पारंपरिक व्यवसायांमध्ये नव्या संधी निर्माण करून रोजगार निर्मितीला चालना देईल. आर्थिक दृष्ट्या सशक्त होण्यासाठी ही योजना ग्रामीण भागातील कारागिरांसाठी वरदान ठरत आहे.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

Sajit Tekam

Nov. 22, 2024   

PostImage

Sarkari Yojana: खुशखबर! या योजने अंतर्गत नागरिकांच्या खात्यात जमा होणार …


Sarkari Yojana: भारत सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण योजना e-Shram Card योजना सुरू केली आहे. ऑगस्ट 2021 मध्ये लाँच झालेली ही योजना विशेषत: बांधकाम कामगार, स्थलांतरित मजूर, टमटम कामगार, घरगुती कामगार आणि प्लॅटफॉर्म कामगार यांसारख्या असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या कामगारांना वयाच्या 60 नंतर मासिक 3000 रुपयांपर्यंत पेन्शन, अपघात विमा आणि इतर सरकारी योजनांचा लाभ मिळतो.

हे देखील वाचा : Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! डिसेंबर महिन्याचे 2100 रुपये या दिवशी होणार जमा

या कार्डामध्ये 12-अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (UAN) असतो, जो संपूर्ण भारतात मान्य असतो. यामुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवणे सुलभ होईल.

आजच्या या आर्टिकल मध्ये, आपण ई-श्रम कार्ड योजना कशी कार्य करते, यासाठी अर्ज प्रक्रिया काय आहे, आणि त्याचे फायदे व पात्रता काय आहेत यावर सखोल माहिती घेऊ.

 

e-Shram Card: योजनेचे फायदे

  • वयाच्या 60 नंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन.
  • अपघात विमा योजना, ज्यात मृत्यू अथवा कायमस्वरूपी अपंगत्वासाठी ₹2 लाख आणि अंशतः अपंगत्वासाठी ₹1 लाखचा लाभ आहे.
  • सरकारी योजनांचे लाभ मिळवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त दस्तऐवज.

 

e-Shram Card: पात्रता निकष

e-Shram Card कार्डसाठी अर्ज करण्यासाठी पुढील अटींचे पालन आवश्यक आहे:

  1. अर्जदाराचे वय 16 ते 59 वर्षे दरम्यान असावे.
  2. अर्जदाराचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असावा.
  3. अर्जदार आयकर भरणारा नसावा.
  4. अर्जदार कोणत्याही EPFO/ESIC किंवा सरकारी पेन्शन योजनेचा सदस्य नसावा.
  5. अर्जदार असंघटित क्षेत्रात कार्यरत असावा.

 

e-Shram Card: ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

e-Shram Card कार्डसाठी अर्ज करणे सोपे आहे. खालील पद्धतीने तुम्ही नोंदणी करू शकता:

  1. e-Shram Card पोर्टल वर जा.
  2. "नोंदणी करा" (Register) वर क्लिक करा.
  3. आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर प्रविष्ट करा.
  4. आवश्यक माहिती आणि कागदपत्रे अपलोड करा.
  5. युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (UAN) तयार झाल्यावर त्याची डिजिटल किंवा प्रिंट कॉपी घ्या.

 

e-Shram Card: महत्त्वाचे फायदे

e-Shram Card असलेल्या कामगारांना केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ सहज मिळतो. तसेच, राष्ट्रीय स्तरावरील असंघटित कामगारांचा डेटा तयार होत असल्याने भविष्यात अधिक योजनांची अंमलबजावणी करता येईल.

जर तुम्ही पात्र असाल, तर उशीर न करता आजच अर्ज करा आणि 3000 रुपयांच्या मासिक पेन्शनसह अन्य लाभ मिळवण्याची संधी साधा.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.