पुस्तके वाचल्याने ज्ञान मिळते परंतू कला व क्रीडा या क्षेत्राच्या माध्यमातून पुढे जान्याचा मार्ग आहे - डॉक्टर लुबना हकीम
सुंदरनगर:-
पुस्तके वाचल्याने ज्ञान मिळते परंतू कला व क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून आपल्या जीवनात पुढे जान्याचा मार्ग मीळतो असे मनोगत शाळेच्या क्रीडा व सांस्कृतीक कार्यक्रम समारोपप्रसंगी डॉ.लुबना हकीम यांनी व्यक्त केले
नेताजी सुभाषचंद्र प्राथमिक, माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय, सुंदरनगर येथे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. सत्र 2024-2025 मध्ये शिक्षण विभागातर्फे राबवलेले विविध उपक्रम तसेच विद्यालयातर्फे आयोजित क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्र, महागाव (ता. अहेरी) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. लुबना हकीम, राणी दुर्गावती विद्यालयाचे आदर्श मुख्याध्यापक लोनबले, शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे सदस्य पाल, प्रा. रॉय, स्वर्णकार , वांढरे , तसेच प्राचार्य निखुले उपस्थित होते.
डॉ. लुबना हकीम यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा आदर्श ठेवत शिक्षणासोबतच क्रीडा, कला आणि सांस्कृतिक उपक्रमांचा जीवनात महत्त्वाचा भाग असल्याचे सांगितले.
त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करताना सांगितले की,"केवळ पुस्तकांचे ज्ञानच नव्हे, तर कला, नाट्य, संगीत आणि खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व घडते. ज्या विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळत आहेत, ते त्यांची मेहनत, समर्पण आणि जिद्द यामुळे मिळवत आहेत. परंतु प्रत्येक सहभाग देखील महत्त्वाचा असतो, कारण विजयापेक्षा मोठे असते, ते म्हणजे शिकण्याची वृत्ती आणि सातत्याने प्रगती करण्याची जिद्द."त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा दाखला देत विद्यार्थ्यांना "मेहनत करा, सातत्य ठेवा आणि यश निश्चितच मिळेल" असा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शाळेच्या शिक्षक आणि व्यवस्थापनाचे उत्तम आयोजनाबद्दल कौतुक केले.
यावेळी शाळेतील शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सेवा निवृत्तीचा सन्मान करणे शिक्षण संस्थेचे कर्तव्य - शाहीन ताई हकीम
अहेरी:-
आज दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी डॉ. सी. व्ही. रमण सायन्स कॉलेज आणि भगतराव कला महाविद्यालय, सिरोंचा मध्ये एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये दोन महत्त्वपूर्ण व्यक्ती – प्राध्यापक ए. व्ही. कांताराव आणि वरिष्ठ लिपिक एफ. एम. शेख यांच्या सेवानिवृत्तीचा सन्मान करण्यात आला
कार्यक्रमाचे अध्यक्ष वन वैभव शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष बबलू भैया हकीम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विभागीय अध्यक्ष शाहीन ताई हकीम, आणि डॉ. लुबना हकीम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला आणखी महत्त्व प्राप्त झाले. बबलू भैया हकीम यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या मनोगतात प्रकट केले की, सेवानिवृत्तीचा प्रत्येक क्षण साधारणत: एक नवीन अध्याय सुरू करतो. शिक्षक व कर्मचारी यांच्या समर्पणाची आणि त्यांच्याद्वारे केलेल्या योगदानाची नेहमीच कदर करायला हवी. त्यांच्या मनोगतात शिक्षणाचे महत्त्व आणि समाजात शिक्षणाचा प्रभाव यावर देखील त्यांनी भाष्य केले
शाहीन ताई हकीम यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत शिक्षण क्षेत्रातील योगदान आणि सेवानिवृत्त होणाऱ्या सदस्यांचे आभार मानले. त्या वेळी, त्यांनी विद्यार्थ्यांसाठी एक संदेश दिला की, शिक्षक व कर्मचारी आपल्या जीवनातील आदर्श असतात आणि त्यांचा आदर्श जीवनभर पाठलाग करणे आवश्यक आहे असे भाष्य केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक उरकुडे सर यांनी केले. त्यात, त्यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या दोन्ही व्यक्तींच्या कामगिरीचा उल्लेख केला
यावेळी त्यांनी एक गोष्ट खूप महत्त्वाची सांगितली की, "शिक्षकांची भूमिका विद्यार्थ्यांच्या जीवनात केवळ शाळेतील शिक्षण पुरवणे नाही, तर त्यांचा मानसिक, सामाजिक आणि आचारधर्मात्मक विकास होण्यासाठी मार्गदर्शन करणे हेसुद्धा आहे
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन प्राध्यापक जक्कु सर यांनी केले. त्यामध्ये, त्यांनी सर्व उपस्थितांचा, विशेषतः बबलू भैया हकीम, शाहीन ताई हकीम, आणि डॉ. लुबना हकीम यांचे आभार मानले व उपस्थितांचे आभार मानले
लिटिल हर्ट्स विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
आष्टी :- चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील लिटिल हर्टस इंग्लिश मिडीयम हायस्कूल येथे दि. २८ ते ३० जानेवारी २०२५ रोजी तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन समारोह आयोजित करण्यात आला. त्यानिमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईराम बहुद्देशीय शिक्षण संस्था सिरोंचा चे अध्यक्ष श्री. अनिल आल्लुरवार तर कार्यक्रमाचे उद्घाटक आष्टी पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री. विशाल काळे साहेब तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. बेबीताई बुरांडे, सरपंच ग्रामपंचायत आष्टी, मा. रविंद्र ओल्लालवार माजी अध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली, मा. रमेश आरे सचिव, साईराम बहुद्देशीय शिक्षण संस्था सिरोंचा, मा. कृष्णमुर्ती गादे मुख्याध्यापक लिटील हर्टस इंग्लिश मिडीयम हायस्कूल आष्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून लेझीम पथक व परेडद्वारे पाहुण्यांना पाचारण केले. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते महात्म्यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत मुख्याध्यापक श्री. कृष्णामूर्ती गादे यांनी विद्यालयात होणाऱ्या विविध उपक्रमाविषयी उपस्थितांना माहिती दिली. दरवर्षी विद्यालयातील विद्यार्थी नवोदय विद्यालय, शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र होतात. दरवर्षी शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के असून मागील वर्षी दहावीतून शिवम पोलोजीवार हा विद्यार्थी आष्टी केंद्रातून प्रथम आला. तसेच गोळाफेक या स्पर्धेत इयत्ता आठवीतील तन्मय फुलझेले हा विद्यार्थी शारीरिक शिक्षक नितेश पुंगाटी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागस्तरावर गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. तसेच जिल्हास्तरावर विविध खेळात विद्यालयातील विद्यार्थी प्राविण्य पटकाविले. असे बोलून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून सहकार्य केल्याबद्दल सर्व पालकवर्गाचे आभार मानले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक मा. विशाल काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्रथमत: लेझीम व परेड द्वारे केलेल्या पाहुण्यांच्या स्वागताविषयी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात अभ्यासाबरोबर खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमाची तितकीच आवश्यकता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या उज्वल भविष्याकरिता मेहनत करणे आवश्यक आहे.
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अनिल आल्लूरवार यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले की, विद्यालयाद्वारे आयोजित तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साह विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन मिळावे व त्यांना मिळणाऱ्या पारितोषिकच्या रुपाने आवडत्या क्षेत्राची निवड त्याविषयी जिद्द व चिकाटी निर्माण व्हावी या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
विद्यालयात आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन समारोह म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांची वाढ व्हावी, आणि त्यांच्या असलेल्या विविध गुणांना वाव मिळावा, स्टेज डेअरिंग निर्माण होऊन विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने जगता यावे तसेच शालेय जीवनात आवश्यक मूलभूत बाबी च्या माध्यमातून व विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना सामाजिक क्षेत्रात आपले स्थान निश्चित करता यावे यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी मंचावर साईराम बहुद्देशीय शिक्षण संस्था सिरोंचा चे अध्यक्ष श्री. अनिल आल्लुरवार, आष्टी पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री. विशाल काळे साहेब तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. बेबीताई बुरांडे, सरपंच ग्रामपंचायत आष्टी, मा. रविंद्र ओल्लालवार माजी अध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली, मा. दिलीप बारसागडे केंद्र प्रमुख आष्टी, मा. रमेश आरे सचिव, साईराम बहुद्देशीय शिक्षण संस्था सिरोंचा, संस्थेच्या सहसचिव सौ. दिपा आल्लूरवार, सदस्या सौ. भवानी निलम, सौ. सरिता गादे, तसेच शिक्षक पालक समितीचे उपाध्यक्ष श्री. रविंद्र पाल, सदस्या सौ. सपना पांडे, सदस्य श्री. जितेंद्र निमसरकार, म.ज्यो. फुले महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. श्याम कोरडे, श्री. कपिल मसराम, शारी. शिक्षक सावित्रीबाई फुले विद्यालय आष्टी, कु. श्वेता कोवे राष्ट्रीय धनुर्विद्या खेडाळू, श्री. कृष्णमुर्ती गादे मुख्याध्यापक लिटील हर्टस इंग्लिश मिडीयम हायस्कूल आष्टी, श्री. प्रमथ मंडल मुख्याध्यापक शिशु मंदिर पब्लिक स्कूल आष्टी, डॉ. ओ. पी. सिंग प्राध्यापक महिला महाविद्यालय आष्टी, डॉ. पी. के. सिंग सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालय आष्टी, श्री. शरद कोदेट्टीवार, श्री. अनिल बोमकंटीवार, श्री. गणेश सिंगाडे पत्रकार आष्टी, तसेच पालकवर्ग, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठीचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश
जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
गडचिरोली, दि.३० – मराठी भाषा ही संत ज्ञानेश्वर, तुकाराम आणि समर्थ रामदास यांची भाषा असून तिचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा, असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा न्यायालयात आयोजित "मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा" निमित्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वसंत भा. कुलकर्णी यांनी केले.
गडचिरोली जिल्हा न्यायालयाच्या कक्ष क्रमांक ३०६ मध्ये दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. न्या. कुलकर्णी यांनी अध्यक्षस्थान भूषविले, तर गोंडवाना विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. निलकंठ पंढरी नरवाडे हे प्रमुख पाहुणे व मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर.आर. पाटील यांचीही विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमात मुख्य न्यायिक दंडाधिकारी एस.पी. सदाफळे, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), सी.पी. रघुवंशी, सह-दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्री. भैसारे आणि इतर न्यायाधीश मंडळींनी आपली उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाचे संचालन सह-दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती पठाण यांनी केले. प्रा. डॉ. नरवाडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मराठी भाषेचे न्यायालयीन कामकाजातील महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी प्रत्येक मराठी भाषिकाने आपल्या भाषेचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले.
यावेळी न्या. कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषा समृद्ध, श्रेष्ठ आणि अभिजात असल्याचे स्पष्ट करत पु. ल. देशपांडे, वि. वा. शिरवाडकर, संत ज्ञानेश्वर व तुकाराम यांच्या कार्याचा उल्लेख केला. मराठी भाषा लोप पावण्याची भीती दूर करण्यासाठी तिचा रोजच्या जीवनात अधिकाधिक वापर व्हावा, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अधिक्षक एस.जे. शेंडे यांनी परिश्रम घेतले. सह-दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्री. भैसारे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला न्यायालयीन कर्मचारी तसेच वकील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती.
लिटील हर्टस विद्यालयात फॅन्सी ड्रेस स्पर्धा संपन्न
विज्येत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्राचे वितरण
आष्टी :- चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील लिटील हर्टस इंग्लिश मिडीयम हायस्कूल आष्टी येथे तीन दिवसीय (दि. २८ ते ३० जाने.) वार्षिक स्नेहसंमेलन समारोहाचे आयोजन करण्यात आले असून प्रथम दिवशी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली असून संस्थेचे अध्यक्ष अनिल आल्लूरवार, सचिव रमेश आरे यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थी शालेय जीवनात घडतो त्यांच्या आत असलेले सुप्तगुण प्रदर्शित करण्याची त्यांना प्राप्त व्हावी व विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा या हेतूने विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेत इयत्ता नर्सरी ते दहावीतील पूर्व प्राथमिक, प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक अश्या चार गटात १५० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले असून विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारून प्रदर्शन केले.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ प्रदर्शन सादर करीत पूर्व प्राथमिक गटातून प्रथम मास्ट. द्विज अलोणे, द्वितीय कु. अगस्त्या आभारे, तृतीय कु. परी खामनकर, प्राथमिक गटात कु. तमना कडते, द्वितीय मास्ट. श्रीहीत आरे, तृतीय कु. वंशिका बामनकर, उच्च प्राथमिक गटात कु. लिजा हलदार, कु. अंजली वेलादी, तृतीय मास्ट. निवृत्ती नागरगोजे तर माध्यमिक गटात कु. अर्नवी रोहनकर, द्वितीय कु. तनवी मंडल, तृतीय मास्ट. आर्यन मुद्रिकवार अश्याप्रकारे क्रमांक पटकाविला विज्येत्या विद्यार्थ्यांना उपस्थित कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे मंडळीच्या शुभहस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
आयोजित कार्यक्रमाला साईराम बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अनिल आल्लूरवार, सचिव रमेश आरे, सदस्या भवानी आरे, सरिता गादे, मुध्याध्यापक कृष्णमूर्थी गादे तसेच या स्पर्धेला पर्यवेक्षक म्हणून रोशनी अवथरे, सपना पांडे, सुहासिनी बोरकर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमची शोभा वाढविली.
गरीबीवर मात करीत पल्लवी चिंचखेडे हिने गाठले यशोशिखरावर,आयएएस परीक्षेत केले सुयश प्राप्त
अमरावती:-
अमरावतीच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर गरीब वस्तीत राहणारी कु. पल्लवी देविदास चिंचखेडे ही मुलगी युपीएससीची आयएएस ही परीक्षा पास झाली आहे. तिचे वडील घराला रंगकाम देण्याचे काम करतात. तर तिची आई मशीनवर शिलाई काम करते. कुमारी पल्लवी ही अमरावती कॅम्प विभागातील बिच्छू टेकडी चपराशी पुरा या स्लम एरियामध्ये राहते. बिच्छू टेकडीतून पाहणाऱ्या नाल्याच्या काठावर तिचे घर आहे. एवढ्या आधुनिक काळातही तिच्या घराला जायला अद्यापही रस्ता नाही.
ती जेव्हा सातव्या वर्गात होती तेव्हा मिशन आयएएस अमरावती या संस्थेने आयोजित केलेल्या सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळेसाठी ती गेली होती. तिचे वडील तिला या कार्यशाळेला घेऊन गेले होते. या कार्यक्रमातून प्रेरणा मिळाल्यामुळे तिचे वडील तिला दुसऱ्या दिवशी अमरावतीच्या विद्यापीठ रोडवरील महापौरांच्या बंगल्यासमोरील जिजाऊ नगरातील डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी मध्ये घेऊन गेले. तिथे त्यांनी संस्थेचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांची भेट घेतली. काठोळे सर हे गेल्या पंचवीस वर्षापासून गरीब व होतकरू विद्यार्थी यांना नाममात्र एक रुपया प्रतिदिन एवढ्या कमी शुल्कात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करतात. पल्लवीने त्यांचे मार्गदर्शन घेतले. प्रा. काठोळे यांनी तिला स्पर्धा परीक्षेची काही पुस्तके सप्रेम भेट दिली. त्यानंतर जेव्हा जेव्हा अमरावतीला स्पर्धा परीक्षा कार्यशाळा व्हायच्या तेव्हा तेव्हा तिने त्या स्पर्धा तुकाराम मुंढे यांच्यापासून तसेच त्यांच्या भाषणापासून प्रेरणा घेऊन कुमारी पल्लवीने मी आयएएस अधिकारी होणारच असा निर्णय पक्का केला व त्या दृष्टिकोनातून तिने सातव्या वर्गापासूनच परीक्षेला तयारीला सुरुवात केली. तिच्या आजूबाजूला साधारणता मजूर वर्ग सामान्य कुटुंबातील लोक राहतात. त्यामध्ये सर्व समाजाचे लोक समाविष्ट आहेत. घरात पुरेशी जागा नाही. अभ्यासाचे वातावरण नाही पण त्या परिस्थितीवर मात करून तिने युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून अमरावती शहराच्या इतिहासात एक मैलाचा दगड रोवला आहे. ती ज्या भागात राहते त्या भागात अगोदर रान वन होते. त्या भागात विंचू जास्त निघायचे म्हणून त्या भागाला आजही बिच्छू टेकडी या नावाने ओळखले जाते. या टेकडी जवळच वडाळी नावाचा तलाव आहे. परीक्षा कार्यशाळेमध्ये भाग घेतला.पल्लवीच्या घरासमोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा गेलेला आहे. या मार्गावरून सतत ट्रकची येजा सुरू असते. त्यामुळे अभ्यास करताना सतत व्यत्यय येत असतो. पण अशा विपरीत परिस्थितीवर मात करून आज पल्लवी यूपीएससीची परीक्षा पास झाली आहे. आपल्या यशाचे श्रेय तिने आपले वडील देवीदासजी चिंचखेडे यांच्या प्रोत्साहनाला दिले आहे. अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून तिने पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिने एका खाजगी कंपनीमध्ये तीन वर्ष नोकरी केली. परंतु त्यामध्ये तिचे मन रमले नाही. तिला तुकाराम मुंढे यांचे शब्द आठवत होते. मी आयएएस अधिकारी होणारच, व अखेर तीने यशोशिखरावर गाठलेच.
स्कुल बसच्या अपघातात एका चिमुकलीचा करुन अंत तर बरेच विद्यार्थी जखमी
यवतमाळ:-
जिल्ह्यात स्कुल बस चा अपघात होऊन एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे पालकांत चिंतेचे वातावरण आहे. तर अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळमधील उमरखेडमध्ये स्कूल बसला अपघात झाला आहे. यात अपघातात एक विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. या विद्यार्थिनीचे नाव महिमा आप्पाराव सरकटे असं नाव आहे. ती दिवटीपिंपरी येथे राहात होती. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील दिवटीपिंपरी ते दहागाव दरम्यान ही घटना घडली आहे. उमरखेडच्या दिवटीपिंपरीवरून ही स्कूल बस दहागाव येथील शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन येत होती. यावेळी हा अपघात घडला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. त्वरित वैद्यकीय सेवा बोलवून जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पालकांनी धाव घेतली. मुलांच्या गाडीचा झालेला अपघात पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. लहान मुलांचा आक्रोश अंगावर काटे आणणारा होता. यात एका मुलीचा दुर्दैवी अंत झाला आहे.
गडचिरोली:- आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी आज रात्री गडचिरोली येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वस्तीगृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या सोयीसुविधांबाबत आस्थेने विचारपूस केली. विद्यार्थिनींच्या अडचणी जाणून घेत त्यांच्या शिक्षण आणि राहणीमानाच्या विकासासाठी शासनाकडून त्यांना कोणत्या सुविधा अपेक्षित आहेत, याबाबत मंत्री उईके यांनी माहिती घेतली.
यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल मीना उपस्थित होते.
गडचिरोली :- आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आणि शासकीय आश्रम शाळांच्या वेळेत 1 फेब्रुवारीपासून बदल होणार असून, शाळा आता सकाळी 11 वाजेपासून सुरू होतील, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.
धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय माध्यमिक कन्या आश्रम शाळेत आयोजित आदिवासी पालक व लाभार्थी मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आदिवासी विकास विभाग नागपूरचे सहआयुक्त दिगांबर चव्हाण, सरपंच पूनम किरंगे, तसेच प्रकल्प अधिकारी राहुल मीना (गडचिरोली), नमन गोयल (भामरागड), कुशल जैन (अहेरी) व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र गरिबांच्या कल्याण आणि विकासासाठी वाटचाल करीत आहे, त्यांचेसोबत राज्याचा आदिवासी विकास विभाग देखील भरारी घेईल, याबाबत मी आपणास आश्वस्त करतो असे त्यांनी सांगितले. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व आश्रम शाळा तसेच वसतिगृहांमध्ये आवश्यक सुविधांसाठी लागणारा निधी उपलब्ध केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. उईके यांनी 7 फेब्रुवारी रोजी विविध शाळांमध्ये अधिकाऱ्यांचा मुक्काम होईल, असे जाहीर करताना प्रकल्प अधिकाऱ्यांना स्वायत्त निर्णय घेण्यासाठी सर्वाधिकार देण्याचा शासन निर्णय लवकरच निर्गमित होईल, असे सांगितले. "एकही आदिवासी विद्यार्थी शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहणार नाही, यासाठी अधिकाधिक शाळा व वसतिगृहे उभारण्यात येतील," असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात विद्यार्थिनींनी व पालकांनी मनोगत व्यक्त केले. तसेच विविध योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आर्थिक मदतीमुळे व्यवसाय सुरू करूंन रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल आदिवासी विकास विभागाचे आभार व्यक्त केले. तसेच घरकुलाची रक्कम वाढविण्याचीही मागणी केली.
यावेळी शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या वित्तीय सहाय्याचे व जात प्रमाणपत्रांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी राहुल मीना यांनी केले.
मेळाव्याला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते.
एक फेब्रुवारीपासून आदिवासी आश्रमशाळेत नवीन वेळापत्रक लागू होणार – आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके
गडचिरोली:-
आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आणि शासकीय आश्रम शाळांच्या वेळेत 1 फेब्रुवारीपासून बदल होणार असून, शाळा आता सकाळी 11 वाजेपासून सुरू होतील, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.
धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय माध्यमिक कन्या
आश्रम शाळेत आयोजित आदिवासी पालक व लाभार्थी मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आदिवासी विकास विभाग नागपूरचे सहआयुक्त दिगांबर चव्हाण, सरपंच पूनम किरंगे, तसेच प्रकल्प अधिकारी राहुल मीना (गडचिरोली), नमन गोयल (भामरागड), कुशल जैन (अहेरी) व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र गरिबांच्या कल्याण आणि विकासासाठी वाटचाल करीत आहे, त्यांचेसोबत राज्याचा आदिवासी विकास विभाग देखील भरारी घेईल, याबाबत मी आपणास आश्वस्त करतो असे त्यांनी सांगितले. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व आश्रम शाळा तसेच वसतिगृहांमध्ये आवश्यक सुविधांसाठी लागणारा निधी उपलब्ध केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. उईके यांनी 7 फेब्रुवारी रोजी विविध शाळांमध्ये अधिकाऱ्यांचा मुक्काम होईल, असे जाहीर करताना प्रकल्प अधिकाऱ्यांना स्वायत्त निर्णय घेण्यासाठी सर्वाधिकार देण्याचा शासन निर्णय लवकरच निर्गमित होईल, असे सांगितले. "एकही आदिवासी विद्यार्थी शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहणार नाही, यासाठी अधिकाधिक शाळा व वसतिगृहे उभारण्यात येतील," असे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमात विद्यार्थिनींनी व पालकांनी मनोगत व्यक्त केले. तसेच विविध योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आर्थिक मदतीमुळे व्यवसाय सुरू करूंन रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल आदिवासी विकास विभागाचे आभार व्यक्त केले. तसेच घरकुलाची रक्कम वाढविण्याचीही मागणी केली. यावेळी शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या वित्तीय सहाय्याचे व जात प्रमाणपत्रांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी राहुल मीना यांनी केले. मेळाव्याला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते.
गडचिरोली :: आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथे आदर्श फाउंडेशन च्या वतीने सुरु करण्यात आलेल्या अभ्यासिकेचे लोकार्पण गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
मोबाईल सोशल मीडिया च्या काळात तरुण पिढीचा वेळ चुकीच्या गोष्टीसाठी खर्ची होत असून तरुणांना सोशल मीडिया चे वेळ लागले आहे, तरुनांचा वेळ सत्कामी खर्ची करण्याकरीता त्यांच्यामध्ये वाचणाची गोडी निर्माण करावी लागेल आणि त्यासाठी गाव तिथे वाचनालय संल्पना रुजवून गावागावात अभ्यासिका निर्माण करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी यावेळी केले.
तर महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी अभ्यासिकेच्या माध्यमातून चांगले अधिकारी घडून फक्त आपल्या गावाचाच नाही तर जिल्ह्याचाही नाव लौकिक करणारे अधिकारी घडावे अशी इच्छा व्यक्त केली.
या उदघाट्न सोहळ्यास तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी आरमोरी मिलिंद खोब्रागडे, पोलीस निरीक्षक प्रताप लामतुरे, सरपंच देलनवाडी प्रियंकाताई कुमरे, माजी सरपंच रामनंदन गेडाम, उपसरपंच देलनवाडी त्रिलोकजी गावतुरे,विजयजी ठवरे, प्रदीपजी बोळणे, उपसरपंच उराडी राधेश्याम दडमल, रत्नाकर धाईत, व्ही.डी. बावणकर, दिगेश्वर धाईत, जांभळे साहेब सह इतर मान्यवर गावातील प्रतिष्ठित नागरिक व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
विद्यापीठांमध्ये ‘पर्यावरण संवर्धन’ हा विषय शिकविला जावा - राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन
लोकशिक्षण, संशोधन, अंमलबजावणी हीच पर्यावरण संवर्धनाची त्रिसूत्री - आ. मुनगंटीवार
इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज - २०२५’चे उद्घाटन
चंद्रपूर - शिक्षणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे धडे देण्याची गरज आहे. त्यासाठी पर्यावरण शिक्षणाला प्राधान्य द्यावे लागेल. पर्यावरण संवर्धन किंवा संरक्षण असा विषय प्रत्येक विद्यापीठात शिकविला जावा त्यातून पर्यावरणतज्ज्ञ तयार होतील. पर्यावरण रक्षणाच्या नव्या कल्पना जन्माला येतील. नवे प्रयोग होतील आणि त्यातूनच संवर्धनाचे नवनवे मार्गही गवसतील, असा विश्वास महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.
एसएनडीटी महिला विद्यापीठातर्फे आयोजित ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज-2025’चे गुरुवारी (दि. १६ जानेवारी २०२५) महामहीम राज्यपाल यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. या तीन दिवसीय संमेलनाला राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच एसएनडीटीच्या कुलगुरू डॉक्टर उज्वला चक्रदेव,आमदार देवराव भोंगळे, जलपुरुष राजेंद्रसिंह, एसएनडीटीचे विलास नानीवाडेकर, युएसचे कॉन्सिलेट जनरल सलील कादेर, कुणी युनिव्हर्सिटी न्यूयॉर्कचे प्राध्यापक नील फिलिप, प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, एसएनडीटी बल्लारपूर कॅम्पस संचालक राजेश इंगोले, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, गोंडवानाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे आदींची यावेळी उपस्थिती होती.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले, ‘चंद्रपूरमध्ये होत असलेल्या परिषदेतून मोठी जनजागृती होईल असा मला विश्वास आहे. कुठलेही चांगले काम करण्यासाठी पहिले चांगली मानसिकता आणि मनाची तयारी आवश्यक असते. तसे असेल तर नक्कीच यश मिळते. कुणी एका रात्रीत जग बदलू शकत नाही. प्रत्येक छोटा प्रयत्न मोठ्या यशाच्या दिशेने सुरू झालेली वाटचाल असते. भविष्यातील पिढ्यांना सुरक्षित करण्यासाठी अविरत कष्ट करावे लागणार आहेत.’लोकसंख्या वाढत आहे आणि त्यानुसार गरजाही वाढत आहेत. आपण आधुनिकतेकडे वळतोय. पण त्याला मर्यादा असली पाहिजे. निसर्गाने दिलेल्या संसाधनांचा वापर वाढल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पाण्याची बचत आणि वृक्षांचे रक्षण या पर्यावरणाचे संवर्धन अवलंबून आहे. आपण या दोन्हींकडे दुर्लक्ष करता कामा नये,’ असेही राज्यपाल महोदय म्हणाले.
सुधीर मुनगंटीवार यांनी दिली त्रिसूत्री
पर्यावरण संवर्धनासाठी लोकशिक्षण, संशोधन, अंमलबजावणी हीच त्रिसूत्री असल्याचे प्रतिपादन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते म्हणाले, ‘यंदा संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. संविधानाने आपल्याला दिलेले हक्क सर्वांना माहिती आहेत. पण संविधानाने दिलेल्या जबाबदारीचा, आपल्याला सांगितलेल्या कर्तव्यांचा विसर पडला आहे. तीन दिवसांच्या परिषदेत पर्यावरण संवर्धनाच्या कर्तव्यावर चर्चा होईल असा विश्वास आहे. त्यासाठी लोकशिक्षण, संशोधन, कृती आणि अंमलबजावणी यावर भर दिला पाहिजे.’ सी फॉर चंद्रपूर, सी फॉर क्लायमेट चेंजच्या युद्धात सर्वांत आघाडीवर राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन भेट देऊन केला आपला वाढदिवस साजरा
आष्टी:-
येथून जवळच असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुधोली ता.चामोर्शी येथील मुख्याध्यापक संतोष नागरगोजे यांनी आपला वाढदिवस ते कर्तव्यावर असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन भेट देऊन साजरा केला. तेव्हा विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज झाडे, सरपंचा सौ.रेखा कलसार , उपसरपंच दिलीप वर्धलवार, ग्रामसेविका कुंदा कोडापे या मान्यवरांच्या हस्ते शालेय उपयोगी साहीत्य २७ विद्यार्थ्यांना देण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षकवृंद, बहुसंख्य पालक उपस्थित होते
स्वतःचा वाढदिवस अश्या पद्धतीने साजरा केल्याने मुख्याध्यापक संतोष नागरगोजे यांचे कैतूक करण्यात येत आहे
सामजिक बांधिलकीने सेवेचे व्रत अंगिकारा ,
मा. शाहीनभाभी हकीम
आष्टी: राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिर हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाला चालना देणारे त्यांच्यात सेवेचे बीजारोपण करणारे असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून श्रमसंस्काराची रुजवणूक करत सामाजिक बांधिलकी जोपासावी आणि सेवेचे व्रत्त अंगीकारण्याचे मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नागपूर विभागीय अध्यक्षा मां.शाहीन यांनी प्रतिपादन केले त्या वन वैभव शिक्षण मंडळ अहेरीद्वारा संचलित गोडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथील राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कडोली कढोली येथे बोलत होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वनवैभव शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मा.अब्दुल जमीर अब्दुल हकीम उर्फ बबलू भैय्या हे होते. यावेळी सरपंच जितेंद्रजी हुलके, उपसरपंच अलका हुलके, प्राचार्य डॉ.संजय फुलझेले ,प्राचार्य किशोर पाचभाई, रासेयो विभागीय समन्वयक डॉ. राजकुमार मुसने जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कोडापे सर, सदस्य मंगलाताई कोवे, बंडोजी इजमनकर, आबाजी हुलके , खुशाबराव कुकुडकर, ललित इजमानकर, लहुजी हुलके, फकीरा कनाके ,अशोक कस्तुरे, संतोष वाकुडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना शाहीन हकीम यांनी डिजिटल साक्षरता या अनुषंगाने विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिवाय मोबाईलचा अतिरेकी वापर टाळत नवीन नवीन संधी शोधत विद्यार्थ्यांनी करिअरकडे अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे आणि वेगवेगळ्या संधीचे सोने करून आपले आयुष्य यशस्वी करावे ,असे आवाहन केले.
यावेळी मा. बबलूभैयाजी हकीम यांनी विद्यार्थ्यांना दिवसेंदिवस तंत्रज्ञानाच्या प्रचंड वापरामुळे होणाऱ्या सायबर क्राईम विषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सजग राहून कोणत्याही फसवणुकीला किंवा गैरप्रकाराला बळी पडू नये याविषयी मौलिक सल्ला दिला. सरपंच जितेंद्र हुलके, डॉ .राजकुमार मुसने, प्राचार्य संजय फुलझेले, मुख्याध्यापक किशोर पाचभाई व मुख्याध्यापक श्री लालदेवजी कोडापे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयाची खेळाडू श्वेता भास्कर कोवे हिने जयपूर येथील सहावी पारा राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत सांघिक रोप्यपदक प्राप्त केल्याबद्दल तिचे मा. शाहीनभाभी हकीम व मा. बबलू भैयाजी हकीम व मान्यवरांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ. गणेश खुणे यांनी केले तर प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. रवी गजभिये यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा. ज्योती बोबाटे यांनी मांनले. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक ग्रामस्थ व जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते.
आता शिक्षकांना सुद्धा बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक, अन्यथा शाळेच्या वेतन अनुदानाला लागणार ब्रेक.
पुणे:-
ज्यातील अनुदानास पात्र असलेल्या शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती तत्काळ बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदवण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहेत.
बायोमेट्रिक, चेहरा ओळख प्रणालीतून उपस्थितीची अट पूर्ण करण्यासाठी स्वतः अंशतः अनुदानित शाळांना दिलेल्या मदतीचे पालन न करणाऱ्या शाळांचे वेतन अनुदान रोखले जाईल असा सज्जड दम शिक्षण विभागाने दिला आहे. राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या, वेतन अनुदानाचे टप्पा घेत आलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तुकड्यांना विहित अटी व शर्तीनुसार प्रत्यक्ष अनुदानासाठी पात्रता तपासून एक जानेवारी २०२३ पासून टप्पा अनुदान मंजूर करण्यात आलेला आहे.
अनुदान पात्र शाळांमधील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदविण्यात येत असल्याची खात्री करावी. मुदतीत अटीचे पालन न करणाऱ्या शाळेचे वेतन अनुदान रोखून ठेवण्याचे अधिकार संबंधित शिक्षण संचालक यांना प्रदान करण्यात आले आहेत. अटीची पूर्तता होईपर्यंत वेतन अनुदान रोखून ठेवण्याचे अधिकार शिक्षण आयुक्त यांना दिले असून, याबाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी डॉक्टर स्मिता देसाई यांनी शिक्षण आयुक्तांना दिले आहेत.
शाळांना बायोमेट्रिक प्रणालीची सर्व माहिती देण्यात आली असून त्या अनुषंगाने काही अडचणी किंवा समस्या आल्यास त्याची माहिती १३ जानेवारी पर्यंत सादर करावी असे ही सांगितले आहे. मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर व डिसेंबर २०२४ च्या बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थितीचे रिपोर्ट, शाळेतील विद्यार्थ्यांचे सप्टेंबर व डिसेंबर २०२४ चे रिपोर्ट सादर करावेत, असे स्पष्ट निर्देश पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक हरून आतार व पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांनी दिले आहेत.
शाळेने अहवाल सादर करावेत
'अनुदानास पात्र शाळेतील विद्यार्थ्यांची माहिती विद्या समीक्षा केंद्र या प्रणालीवर अपलोड करण्यात आली आहे का? शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड संग्रहित अपहर आयडी कार्य कार्यान्वित करण्यात आले आहेत का? याबाबत अहवाल सादर करावा. सर्व माहिती पूर्णपणे यादी मुदतीत प्राप्त न झाल्यास संबंधित शाळा तुकडी अनुदानापासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संस्था मुख्याध्यापक यांची राहील, असेही शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे."
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शनी
आष्टी (अशोक खंडारे):-
वाचन संकल्प महाराष्ट्र या संकल्प ने वर आधारित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात आष्टी येते, वाचन संस्कृती पंधरवडा महाविद्यालयातील ग्रंथालय व माहिती शास्त्र विभागाच्या वतीने “ग्रंथप्रदर्शनी “आयोजित करण्यात आले. ग्रंथप्रदर्शनीच्या माध्यमातून ग्रंथालयात उपलब्ध संदर्भ ग्रंथ,चरित्र,स्पर्धापरीक्षा,विश्वकोष, मासिके इत्यादी वाचन साहित्याचे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अवलोकन केले. आणि त्यातून विविध विषयांवरील ग्रंथा विषयी माहिती दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ. संजय फुलझेले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्याच्या मनात वाचनाविषयी उत्सुकता ,वाचन संस्कृती निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले . कार्यक्रमाला उपस्थिती डॉ. राज मूसने,डॉ. रवि शास्त्रकार ,प्रा.नाशिका गभने .कार्यक्रमाचे संचालन प्रा.ज्योती बोबाटे तर आभार प्रदर्शन प्रा.रवि गजभिये यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.राजकुमार लखमापुरे,श्री. निलेश नाकाडे,श्री. आय.आर.शेख, श्री.एम.डी. मुश्ताक, संजित बच्चाड,श्री.प्रभाकर भोयर, दिपक खोब्रागडे,संतोष बारापात्रे, महा.विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.