सासुच्या जाचाला कंटाळून विवाहितेने केली आत्महत्या,सासुची कारागृहात रवानगी, मात्र मुले झाली पोरकी
बारामती - पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील नीरा येथील विवाहित महिलेनं सासूच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केलीय. नीता सचिन निगडे (वय ३३) रा. वार्ड क्र. ६ नीरा असं विवाहितेचं नाव आहे. याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी सासू विजया भगवान निगडे हिला अटक केली असून सासवड न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर तिची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नीता निगडे यांचे वडील सुभाष शंकर माने रा. श्रीगोंदा (ता.आहिल्यानगर) यांनी जेजुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. विजया निगडे - जगताप मूळ रहिवासी वाणेवाडी (ता. बारामती) ही नीता यांना वेळोवेळी लाथा बुक्क्यांनी मारहाण करणे, सतत शिवीगाळ करणे, गरीब असल्याने हिणवणे, मुलगा होत नाही म्हणून घालून पाडून बोलणे, नीताच्या साड्या जाळून टाकणे असा त्रास देत होती. नवीन फ्लॅट घेतल्यानंतर तिथे राहायला जाण्याआधी त्यासाठी माहेरून एक लाख रुपये आण म्हणून तगादा लावणे अशा प्रकारचा शारीरिक आणि मानसिक त्रास देत होती. या त्रासाला कंटाळून अखेर नीताने नीरा येथील राहत्या घरात आत्महत्या केली.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी अधिक तपास करत आहेत. विजया निगडे हिला पोलिसांनी अटक करून सासवड न्यायालयात हजर केले असता तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तिला आता येरवडा कारागृहात पाठण्यात आल्याची माहिती तपासी अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.२७ मार्च) रोजी माध्यमांना दिली आहे.
पोलिसांनी संतप्त जमावाला रोखले - नीता यांनी रहत्या घरी आत्महत्या केल्यानंतर नीरा तसंच जेजुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले. नीताच्या माहेरचे लोक नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि नीरा पोलीस दूरक्षेत्रात आल्यावर प्रचंड संतापले होते. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेता नीराचे फौजदार सर्जेराव पूजारी, घनशाम चव्हाण, हरिश्चंद्र करे यांनी माहेरच्या लोकांची समजूत काढत कायदेशीर कारवाई करू असं आश्वासीत केलं. अंत्यविधीवेळीही मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
निताच्या जाण्याने एका मुलासह दोन मुली झाल्या पोरक्या - नीता यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांच्या पतीने नीरा शहरात एक फ्लॅट घेतला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या फ्लॅटमध्ये हे कुटुंब राहण्यासाठी जाणार होते. यावरुन सासू सुनेला कुरबुर करतं होती. आता पत्नीच्या पश्चात फ्लॅटमध्ये या तीन मुलांचं संगोपन कसं करायचं असा प्रश्न आहे. तर या दोन्ही मुली आता आई विना पोरक्या झाल्या आहेत.
आई गेल्यानंतर लेकीन ठेवला मिस यू आईचा स्टेटस - नीता गेल्यानंतर नीताच्या मुलीने मोबाईलच्या व्हाट्सअप स्टेटसवर आणि फेसबुकवर मिस यू आई हा मेसेज करत आईचा फोटो शेअर केला आहे. तिचा हा मिस यू आईचा स्टेटस पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. नीताने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या या दोन कोवळ्या मुलींचा विचार करायला हवा होता, अशी भावना आता लोकांनी व्यक्त केली आहे. क्षणभराचा राग आपल्या आप्तांना आयुष्यभर दुःख भोगायला लावतो अशी भावना अनेकांनी बोलून दाखवली.
नागभीड : अल्पवयीन मुलीला पाठलाग करत प्रेमासाठी प्रपोज करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. ही घटना बुधवारी (दि. २६) उघडकीस आली. रितेश अविनाश पानसे (२१) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपीने अल्पवयीन मुलीला प्रेमाचे प्रपोज केले होते. मुलीने त्याचा प्रतिकार केला. मात्र आरोपी पिच्छा सोडत नव्हता. सोमवारी पीडित मुलगी शाळेत गेली होती. सोमवारी (दि. २४) दुपारी १ वाजता पेपर सुटल्यानंतर घरी येत असताना कॉलेजसमोर आरोपी आला. तिला कीपॅड मोबाइल हातात देऊन होकारासाठी दबाव टाकला. हा प्रकार मुलीने कुटुंबाला सांगितल्यानंतर नागभीड पोलिसात तक्रारी केली. मंगळवारी (दि. २५) रात्री उशिरा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.पुढील तपास ठाणेदार रमाकांत कोकाटे, सहायक पोलिस निरीक्षक अनुराधा फुकट करीत आहेत.
आरोपीविरूद्ध संताप
माहिती गावात पसरताच नागरिकांनी आरोपीविरूद्ध तीव्र संताप व्यक्त केला. अशा व्यक्तींना कायद्यानुसार कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
अहेरी येथील वसतीगृहात विद्यार्थ्यांना बेदम मारहाण, अधीक्षक व मुख्याध्यापक यांचेवर कारवाई करण्याची मागणी
अहेरी (गडचिरोली): एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, अहेरीच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांवर अमानुष छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसतिगृह अधीक्षक ईश्वर नारायण शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना मारहाण, मानसिक छळ आणि धमकी दिल्याचे गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केले आहेत. या संदर्भात वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांकडे तक्रार अर्ज दाखल केला असून अधीक्षकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. पण मुख्याध्यापकांनी कोणतीही कारवाई केली नाही. या षडयंत्र दाबण्याचे प्रयत्न चालू आहे.
विद्यार्थ्यांचे गंभीर आरोपः
नववीच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाणः
सकाळी ५ वाजता झोपेत असलेल्या विद्यार्थ्यांना बांबूच्या काठीने तंगडीवर जबरदस्त मारहाण करण्यात आली.
► बारावीच्या विद्यार्थ्यांना मानसिक छळ आणि धमकीः
अधीक्षकाने विद्यार्थ्यांना वारंवार धमक्या देत मानसिक दबाव टाकला.
अमन कुलसंगे याला बेदम मारहाणः
७ मार्च २०२५, रात्री ११:१५ वाजता तब्येत खराब असलेल्या अमन कुलसंगे याला स्वतःच्या चप्पलने आणि काठीने तंगडीवर ४० वेळ बेदम मारहाण करण्यात आली.
▶ सहावी-सातवीच्या विद्यार्थ्यांवर कठोर शिक्षाः
रात्री १० नंतर पाढे विचारले जातात, चुकल्यास ४० वेळा हातावर मारले जाते.
▶ विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरणः
सततच्या छळामुळे विद्यार्थी मानसिक तणावाखाली आले असून त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे.
पुरावे स्पष्ट - अमानुष छळाचे प्रत्यक्ष चित्रण
विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचे प्रत्यक्ष छायाचित्र उपलब्ध असून, त्यांच्या पायावर खोल जखमा झालेल्या स्पष्ट दिसत आहेत.
आदिवासी विभागाला इशारा - तात्काळ कारवाई करा !
या अमानुष वर्तनाविरोधात अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, महाराष्ट्र यांनी कठोर भूमिका घेतली आहे. प्रदेश सचिव अॅड. राकेश तोरे आणि गिरीश जोगे, चंद्रकांत वेलादी (सामाजिक कार्यकर्ता) यांनी अधीक्षक ईश्वर शेवाळे यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा
जर प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई केली नाही, तर अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद आणि समाज बांधव विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
लाचखोर वैद्यकीय अधिकारी सापडला लाप्रवीच्या जाळ्यात, एक लाख तीस हजार रुपयांची मागणी
गडचिरोली:-
थकीत वेतनासाचे बिल काढण्यासाठी आरोग्य सहायकडून एक लाख 30 हजारांची रक्कम लाच म्हणून स्वीकारणाऱ्या लाचखोर वैद्यकिय अधिकारी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. हीं कारवाई दिनांक 26 मार्च बुधवारी लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली.
डॉ. संभाजी भोकरे असे लाचखोर वैद्यकिय अधिकाऱ्याचे नाव आहे.
डॉ. संभाजी भोकरे लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होता. याच आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायकाचे फेब्रुवारी ते सप्टेंबर 2024 व नोव्हेंबर महिन्यातील 14 दिवसांचे रोखलेल्या पगाराचे पुरवणी बिल मंजूर करण्याकरिता डॉ. संभाजी भोकरे यांचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. या नाहरकत प्रमाणपत्रासाठी डॉ भोकरे यांनी दिड लाख रूपयांची मागणी केली. लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने आरोग्य सहायकाने लाचलूचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. तडजोडी अंती डॉ भोकरे यांनी एक लाख तीस हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. गडचिरोली लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले, पोलिस निरीक्षक संतोष पाटिल, शिवाजी राठोड व त्यांच्या पथकाने सापळा रचून आरोग्य सहायकडून एक लाख तीस हजार रूपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी डॉ भोकरे यांना रंगेहाथ पकडले
चंद्रपूर येथील तिन तरुणांना बल्लारपूर पोलीसांनी एक देशी कट्टा व जीवंत काळतुसासह केली अटक
बल्लारपूर:-
बल्लारपूर पोलीसांनी एक देशी कट्टा व एक जिवंत काडतूस सह तीन युवकांना अटक केली सदर कारवाई २५ मार्च रोजी करण्यात आली. अभि वाल्मीक साव (२४) रा.दत्त नगर चंद्रपूर, FCविनीत तावाडे (२४) रा. बापट नगर चंद्रपूर, संकेत रविंद्र येसेकर रा.राजनगर पठाणपुरा रोड चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. बल्लारपूर पोलीसांनी एक देशी कट्टा व एक जिवंत काडतूस सह तीन युवकांना अटक केले.२५ मार्च रोजी बल्लारपूर पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथक चे सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे हे डि.बी. स्टॉफसह पेट्रोलींग करित असतांना त्यांना गोपनीय माहिती की साईबाबा वार्ड, बल्लारपुर येथे ३ युवक देशी कट्टा घेऊन फिरत आहेत
त्यावरून त्यांना ताब्यात घेत एक लोखंडी गावठी बनावटीचा देशी कट्टा ज्याची एकुण लांबी २४ सेमी बॅरलची लांबी ११ सेमी, बॅरलची गोलाई ५.५ सेमी, बॅरल पासुन लाकडी मुठेची लांबी १३ सेमी असलेली किंमत २० हजार रुपये व एक नग पितळी धातुचे जिवंत बुलेट ज्याची लांबी ७.५ सेमी बुलेट पितळी धातुचे असुन त्याची गोलाई ४ सेमी बुलेटच्या मागिल बाजुच्या पेंदयावर ८ एम.एम. के.एफ. असे लिहलेले किंमत २ हजार रुपये असे एकुण २२ हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांच्या जवळून जप्त करण्यात आला. आरोपी अभि वाल्मीक साव (२४) रा. दत्त नगर चंद्रपूर, विनीत नानाजी तावाडे (२४) रा. बापट नगर चंद्रपूर, संकेत रविंद्र येसेकर रा राजनगर पठाणपुरा रोड चंद्रपूर यांचा विरुध्द अप क्रं. २२४/२०२५ कलम ३,२५ भारतीय हत्यार कायदा १९५९ अन्वये गुन्हा नोंद करुन तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे, सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, परि.पो.उप.नि. सौरभ साळुखे, परि.पो.उप.नि. सुनिल धांडे, सफौ. आंनद परचाके, पो.हवा. सुनिल कामटकर, पो.हवा. पुरुषोत्तम चिकाटे, पोहवा. संतोष दंडेवार, पो.हवा. संतोष पंडित, पोहवा. सत्यवान कोटनाके, पो.अं. वशिष्ट रंगारी, लखन चव्हाण, शरदचंद्र कारुष, शेखर माथनकर, भास्कर चिचवलकर, चापोअ. कैलास चिचवलकर, म.पो.अं. अनिता नायडु सह गुन्हे शोध पथकांनी केले
आष्टी पोलीसांनी कोनसरी येथे पकडला सुगंधीत(मजा) तंबाखू,१० लाख विस हजार रुपयाचे मुद्देमाल जप्त
तिन आरोपींची कारागृहात रवानगी
आष्टी :-
चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चारचाकी वाहनाच्या साहाय्याने, सुगंधी तंबाखूच्या तस्करीचा डाव आष्टी पोलिसांनी मंगळवारी (दि.25) उधळवून लावला आहे. या कारवाईत 19 हजार 800 रुपयांच्या सुगंधित तंबाखूसह, वाहन असा एकूण 10 लाख 19 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी श्रीकांत नंदकुमार आकुलवार (38) रा. देवापूर वार्ड, ता. गडचिरोली पराग अरविंद रामटेके (38) रा. नागभिड जि. चंद्रपूर, हेमंत देविलाल चव्हाण (38) रा. अहेरी तिघांना अटक करण्यात
आली आहे. आष्टी-चामोशी वाहनातून सुगंधित तंबाखूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने कोनसरी गावातील एका दुकानासमोर सापळा रचला एमएच 19 बीयू-7860 क्रमांकाचं वाहन संशयास्पद अवस्थेत येताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता, वाहनात 19,800 रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू आढळून आला. यावेळी सुगंधित तंबाखूसह चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. तिनही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने कारागृहात रवानगी केली आहे
सदर माल कुठून आणण्यात येत आहे हे गुलदस्त्यातच आहे
मोहफुले संकलनासाठी जंगलात गेलेल्या महीलेचा वाघाने घेतला नरडीचा घोट
– घटनास्थळी बघ्यांची झुंबड, वाघ तब्बल तीन तास मृतदेहाजवळ बसून
गोंदिया / अर्जुनी (मो) , दि. २३ : मोहफुले संकलन करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने प्राणघातक हल्ला करून ठार केल्याची थरारक घटना रविवारी (दि. २३) रोजी सकाळी शिवरामटोला येथे घडली. या हल्ल्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनुसया धानु कोल्हे (वय ५०) , रा. शिवरामटोला असे मृत महिलेचे नाव आहे.
अनुसया कोल्हे सकाळी गावाशेजारील वनविकास महामंडळाच्या जंगलात (कक्ष क्र. 332) मोहफुले वेचत असताना दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने तिच्यावर मागून झडप घातली. वाघाने तिला तब्बल १०० मीटरपर्यंत फरफटत नेले आणि ठार केले.
घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी पोहोचले. आश्चर्याची बाब म्हणजे वाघ तब्बल तीन तास मृतदेहाजवळ बसून होता. त्यामुळे नागरिकांना वाघाचे थेट दर्शन झाले. वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने अथक प्रयत्नांनंतर वाघाला जंगलात परतवले. मात्र, तो पुन्हा घटनास्थळाच्या आसपास फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. या घटनेमुळे शिवरामटोला गावात शोककळा पसरली असून, वाघाच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. वनविभागाने हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्यासाठी मोहिम सुरू केली असून, नागरिकांना जंगलात एकटे न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ट्राक्टरची ट्राली सोडण्यास पोलीस उपनिरीक्षकाने मागीतली लाच
अमरावती:- ट्राक्टरची ट्राली सोडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक याने लाचेची मागणी केली म्हणून त्यांचेवर व वाहण चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
दर्शन पुंडलीक दिकोंडवार,वय -३८ वर्ष, पोलीस उपनिरिक्षक, नेमणुक पो.स्टे. नांदगांव खंडेश्वर, ह्याने पोलिस स्टेशनच्या आवारातच लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती.मात्र वेळेवर संशय आल्याने ती रक्कम ठरलेल्या वेळी न स्वीकारता टाळाटाळ केल्याने सदरहू दोघांवरही अखेर लाचेची मागणी केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आल्याने अमरावती पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार यांनी दि.१२/०३/२०२५ रोजी दिलेल्या तक्रारीवरुन दि.१३/०३/२०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान तक्रारदार यांना लोकसेवक दर्शन पुंडलीक दिकोंडवार, वय -३८ वर्ष, पोलीस उपनिरिक्षक, नेमणुक पो.स्टे. नांदगांव खंडेश्वर, अमरावती ग्रामिण रा.शिरे लेआउट,चौधरी हॉस्पीटल रोड,अवधुतवाडी,यवतमाळ जि. यवतमाळ यांनी तक्रारदार यांचे वडीलांच्या नावे असलेली ट्रक्टरची ट्रॉली सोडुन देण्याकरीता ५००० रूपये लाचेची मागणी केली. तसेच सदर ५,००० रुपये लाच रक्कम सुकेश सारडा याचेजवळ देण्यासाठी सांगितले. त्यावेळी सुकेश सारडा याने तक्रारदार यांना सांगितले की, मी तुला फोन केल्यावर येवुन जा.असे बोलुन सदरचे पैसे लाच रक्कम असल्याचे माहीत असताना सुध्दा लाचेची रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शवली व दर्शन दिकोंडवार यांस गुन्हा करणेकामी मदत केली.मात्र दि.१३/०३/२०२५ रोजी दुपारी ३/३५ ते ४/४८ वाजेपर्यंतच्या दरम्यान आयोजीत सापळा कार्यवाही बाबत दिकोंडवार यांस तकारदार यांचेवर संशय आल्यामुळे त्यांने तकारदार यांचेकडुन लाच रक्कम ५००० रुपये घेतले नाहीत. त्यामुळे काल दि १८/०३/२०२५ रोजी दर्शन पुंडलीक दिकोंडवार व सुकेश अनिल सारडा या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचे विरूध्द लाचेची मागणी केल्यावरून पोस्टे. नांदगाव खंडेश्वर,अमरावती ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध दारू विक्री विरोधात,महीलांनी गाठले पोलीस स्टेशन
जिवती:- आपल्या गावातील अवैध दारू विक्री विरोधात महिलांनी चक्क पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन गावातील अवैध दारू विक्री बंद करावी अशी मागणी केली आहे
जीवती तालुक्यापासून सुमारे पंधरा किमी अंतरावर असलेल्या गुडसेला या गावात मागील बऱ्याच दिवसापासून अवैध देशी दारू विक्री सुरू आहे. गावातील ज्येष्ठ व्यक्ती कडून दारू विक्रेत्यांना दारु विक्री करु नका असे समजावून सांगितले असता ते ऐकत नाहीत. गावात अशांतता पसरली आहे. दारूचे दुकान हे सार्वजनिक हातपंपाचे बाजूला असून तळीराम हे दुकानातून बॉटल घेऊन हातपंप वर येऊन दारू ढोसतात
तेथेच महिला, मुली पाणी भरण्यास आलेल्या असताना त्यांना बाजूला व्हावे लागते. जर एखाद्या महिलेने तेथे दारू पिण्यास विरोध केला तर दारू विक्रेता म्हणतो की हा हातपंप माझ्या जागेत आहे. हातपंप करिता मी जागा दिली आहे. मी काही करू शकतो. माझ्या मालकीचा हातपंप आहे. असे म्हणत महिलांना अश्लील शिवीगाळ करतो. याच्या गुंड प्रवृत्ती मुळे कोणी महिला पुढे जात नाहीत. मात्र बहुतांश लोकांचे संसार दारूच्या पुरात वाहून जात आहेत. आणि गावातील अल्पवयीन पिढी बिघडत जात आहे हे पाहून महिलांनी पुढाकार घेऊन पोलिस स्टेशन जिवती येथे ठाणेदार यांना निवेदन देऊन ही अवैध देशी दारू बंद करण्याची विनंती केली. यावेळी गावातील मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.आता पोलीस काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे
पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने केला काठीने प्रहार, पती जागीच ठार
भामरागड तालुक्यातील घटना, दोघांवर गुन्हा दाखल
भामरागड:-
पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने काठीने प्रहार केला तेव्हा पती जागीच ठार झाल्याची घटना भामरागड तालुक्यातील दोबुर गावात घडली
भामरागड तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर गटग्रामपंचायत मिरगुळवंचा अंतर्गत येत असलेल्या दोबूर या गावाचा समावेश आहे. दोबूर येथील प्रीतम बहादूर एक्का वय ५० वर्षे याला त्याची पत्नी मानती प्रीतम एक्का वय ४० व मुलगा जोसेफ प्रीतम एक्का वय २२ यांनी काठीने मारहाण केल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रीतम एक्का हा नेहमी मद्यप्राशन करून कुटुंबीयांना त्रास द्यायचा. शारीरिक छळ करायचा. याबाबत २०२२ साली त्याचावर दोन गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, १७ मार्च रोजी सकाळी मृतक प्रीतम हा स्वस्त धान्य दुकानातून धान्य आणण्यासाठी आरेवाडा येथे गेला होता. त्यानंतर दुपारी तो १२ वाजेच्या सुमारास मद्यप्राशन करून घरी परतला. यावेळी त्याची पत्नी घरी जेवायला बसली होती. दरम्यान, घरात धिंगाणा घालून तो पत्नीला मारायला गेला. त्यामुळे चिडून जाऊन पत्नीने लाकडाने त्याच्यावर वार केला. नंतर मुलानेही वार केला. यात प्रीतमचा मृत्यू झाला. सध्या तेंदू हंगामाच्या बेलकटाईचे काम सुरू असल्याने गावातील बहुतांश नागरिक बेलकटाईकरिता जंगलात गेले होते. त्यामुळे प्रीतमची आई मानकुवारी बहादूर एक्का (६५) ही शेतात बेलकटाईला गेली होती. ती घरी परतल्यावर हा प्रकार तिच्या लक्षात आला. तोपर्यंत प्रीतमची जीवनयात्रा संपली होती. यासंदर्भात मंगळवार, १८ मार्च रोजी सकाळी भामरागड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर प्रीतमची पत्नी व मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास भामरागडचे पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत
आश्रमशाळेतील शिपाई यांचे आढळले तलावात मृतदेह
मार्कंडादेव येथील आश्रम शाळेत होते कार्यरत
स्वगावातील मुरखडा (चक) तलावात मृतदेह
आष्टी :-
मार्कंडा देव येथील आश्रम शाळेत कार्यरत शिपाई हे रात्रीच्या सुमारास कुटुंबीयांना शौचास जातो म्हणून घराबाहेर पडले मात्र दुसऱ्या दिवशी तलावात मृतदेह आढळून आल्याची घटना सोमवारी (दि.17) ला सकाळच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील मुरखळा (चक) येथे येथे उघडकीस आली आहे मृतकाचे नाव तुमदेव पिटाले वय ५७, रा. मुरखळा (चक) असे आहे.
मृतक तुमदेव पिटाले हे चामोर्शी तालुका मुख्यालयांतर्गत असलेल्या मार्कंडादेव येथील आश्रमशाळेत शिपाई म्हणून कार्यरत होते. ते तालुका मुख्यालयालगत असलेल्या मुरखळा (चक) या आपल्या स्वगावावरुनच कर्तव्य बजावित होते. दरम्यान, रविवारी
पहाटे 3 वाजताच्या सुमारास शौचास जातो म्हणून ते घराबाहेर पडले. मात्र, सकाळ होऊनही ते घरी न परतल्याने कुटुंबीयांसह ग्रामस्थानी सोमवारी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, सकाळी 11 वाजताच्या सुमारास गावालगतच असलेल्या तलावात त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती प्राप्त होताच चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळ गाठूत पंचनामा केला. याप्रकरणी चामोर्शी पोलिस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चामोर्शी पोलिस करीत आहेत
“मंगळसूत्र चोरांच्या" हल्ल्यात जखमी हेमंत गावंडेचा “मृत्यू”... रेल्वे पोलिस करतात तरी काय?
अकोला : अकोला रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर एका महिलेच्या गळ्यातील "मंगळसूत्र हिसकावून" पळ काढणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करीत असताना त्या चोरट्याने पळणे थांबवून उलट पाठलाग करणाऱ्या महिलेच्या पतीवरच प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात तो इसम गंभीर जखमी झाल्याने त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच काल सायंकाळच्या सुमारास त्या दुर्दैवी व्यक्ती हेमंत गावंडेचा मृत्यू झाला असून झालेल्या घटनेमुळे रेल्वे पोलिसांविरुद्ध जनसामान्यांच्या "भावना तीव्र" झाल्या आहेत.पत्नीच्या गळ्यातील "मंगळसूत्र" हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्या पतीला मंगळसूत्र चोरट्यांनी बेदम मारहाण करीत पूर्ण "चेहरा दगडाने ठेचून" काढल्याचा जीवघेणा प्रकार काल रात्री घडला होता. अकोल्याच्या रेल्वे स्थानक परिसरातीलच ही घटना घडली आहे. अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर मंगळसूत्र चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून पळ काढला होता.
त्यानंतर महिलेचा पती हेमंत गावंडे यांनी ह्या मंगळसूत्र चोरट्यांचा "पाठलाग" केला. याच दरम्यान चोरट्यांनी पाठलाग करणाऱ्या गावंडे यांना बेदम मारहाण केली, इतकेच नाही तर त्यांचा चेहरा देखील दगडानी ठेचून काढण्याचा "अंगावर शहारे" आणणारा प्रकार काल रात्री अकोला रेल्वे स्थानक परिसरातच रेल्वे पोलिसांच्या "बेफिकिरी" वृत्तीने घडला होता. हेमंत गावंडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना "सर्वोपचार" मधून अकोल्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गंभीर स्वरूपात जखमी झाल्याने सुरू असलेल्या उपचारांना प्रतिसाद न दिल्याने "निष्पाप व निर्दोष" हेमंत गावंडेची प्राणज्योत मालवली आहे.हेमंत गावंडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने रेल्वे पोलिसांच्या "बेजबाबदार" आणि "कामचोरी" चा विषय ऐरणीवर आला असून ही घटना घडली त्यावेळी ज्यांची "ड्युटी" स्टेशनच्या प्लेटफॉर्म वर होती ते खरेच त्यांची ड्युटी करत होते का.? हा ही प्रश्न उपस्थित होत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील गावात अल्पवयीन मुलीवर केला दोघा नराधमांनी अत्याचार
कुरखेडा:-
तालुक्यातील बेलगांव येथील एका अल्पवयीन मुलीवर दोघ्या नराधमांनी अन्याय अत्याचार करून अब्रु लुटण्याचा प्रयत्न केल्यामुळे अल्पपवयीन मुलीच्या रिपोर्ट वरून त्याच गावातील दोघावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी जेल मधे करण्यात आली. दि. १५ मार्च २०२५ दुपारी दोन चे सुमारास बेलगांव येथील अनु. जातीची अत्यवयीन मुलगी दुकानात चॉकलेट घेण्याकरीता गेली व घराकडे जातांना याच गावातील भावेश राजु कोरेटी वय २४ वर्ष व कोरेटी मोरेश्वर नामदेव कोरेटी वय २४ वर्ष या दोघांनी त्या अल्पवयीन मुलीचा हात धरून छेडछानीकरून नालीवर झोपवले व तिच्यावर बळजबरीने अन्याय अत्याचार केला. ९ व्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीच्या रिपोर्ट वरून व प्रत्यक्ष साक्षीदार यांच्या बनायानुसार कुरखेडा पोलीसांनी भावेश व मोरेश्वर यांच्या विरोधात कलम ७४,३ (५) व पोस्को अर्तगत कलम ८ व १२ अर्तगत गुन्हा दाखल करून आता त्या दोघाची रवानगी कारागृहात करण्यात आली असून गावात शांततेचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून कुरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्रा वाघ गावात बैठका घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील शबरी विकास महामंडळाचा लेखापाल लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
गडचिरोलीः बरोजगार युवकास वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज मंजूर करण्यासाठी त्याच्याकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज गडचिरोली येथील शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या कंत्राटी लेखापालस रंगेहाथ पकडून अटक केली आहे रुपेश वसंत बारापात्रे (४०) असे आरोपी लेखापालाचे नाव आहे
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता युवक हा देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथील रहिवासी असून, त्याला माल वाहतुकीकरिता वाहन खरेदी करावयाचे होते. त्यासाठी त्याने गडचिरोली येथील शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे अर्ज केला. त्याअनुषंगाने तक्रारकर्त्यास १० लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्याकरिता कार्यकारी लेखापाल रुपेश बारापात्रे याने शाखा व्यवस्थापक हर्षल बोरोले यांच्या नावाने १२ मार्चला ५० हजार रुपयांची मागणी केली. परंतु लाच देण्याची मूळीच इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता रुपेश बारापात्रे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून तक्रारकर्त्याकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रुपेश बारापात्रे यास रंगेहाथ पकडून अटक केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या पर्यवेक्षणात पोलिस निरीक्षक संतोष पाटील, शिवाजी राठोड, सहायक फौजदार सुनील पेद्दीवार, हवालदार किशोर जौंजाळकर, राजेश पद्मगिरवार, पोलिस नाईक स्वप्नील बांबोळे, संदीप घोरमोडे, संदीप उडाण, हितेश जेट्टीवार, विद्या म्हशाखेत्री, ज्योत्स्ना वसाके, राजेश्वर कुमरे यांनी ही कारवाई केली.
स्वतःहाच्या मुलाचा विचार न करता त्याने केली गळफास घेऊन आत्महत्या
धानोरा:-
तालुक्यातील विवाहित तरुणाने आपल्या मुलाचा भविष्यात काय होईल याचा विचार न करता गळफास घेऊन आपली संपविली जीवनयात्रा ही घटना धानोरा तालुक्यातील येरकड येथे घडली
पत्नी काही दिवसापूर्वी माहेरी जातो म्हणून घरून निघून गेल्याने आणि तिचा इतरत्र कुठेही शोध न लागल्याने ही बाब त्याला खटकत होती त्यामुळे शीलवंत आनंदराव सहारे वय 27 वर्षे राहणार येरकड असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार धानोरा तालुक्यातील येरकळ येथील शीलवंतआनंदराव सहारे व 27 वर्ष याची पत्नी काही दिवसापूर्वी माहेरी जातो म्हणून घरून अचानक निघून गेली मात्र ती आपल्या माहेरी पोहचली नाही इतरत्र कुठे शोध घेतला असता तिचा पत्ता लागला नाही. मात्र ही बाब शीलवंत आनंदराव सहारे यांनी मनावरती चांगलीच घेतल्याने त्याच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार आल्याने त्याने 15 मार्च रोजी आपल्या स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. शीलवंत सहारे यांनी नैराशेतून आत्महत्या केली असावी असे जनतेमधून बोलले जात आहे. मात्र आत्महत्या मागचे स्पष्ट कारण सखोल चौकशी केल्यानंतरच कळेल.अधीक तपास पोलीस करीत आहेत
धानोरा : माहेरी जाते, असे सांगून पत्नी घरातून निघून गेली. मात्र, ती माहेरी पोहोचलीच नाही. तिचा शोध घेतला. मात्र, ती आढळून आली नाही. ही बाब मनावर घेत पतीने गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना १५ मार्च रोजी धानोरा तालुक्याच्या येरकड येथे घडली.
शीलवंत आनंदराव सहारे (२७, रा. येरकड) असे आत्महत्या करणाऱ्यायुवकाचे नाव आहे. मयताची आई शेजारच्या शेतात मजुरीला गेली होती. ती पाणी पिण्याकरिता घरी आली. परंतु, आतमधून दार बंद होते. तिने मागच्या दाराने घरात प्रवेश केला तेव्हा मुलगा गळफास घेतलेल्या स्थितीत दिसला.
शीलवंतने नैराश्येतून आत्महत्या केली असावी, असा कयास लावला जात आहे. परंतु सखोल चौकशीनंतर कारण स्पष्ट होईल.