Encounter In Chhattisgarh: छत्तीसगड (Chhattisgarh) मधील कांकेरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक (Encounter) सुरू आहे. पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये सुरू असलेल्या भीषण चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, अबुझमदच्या जंगलात चकमक सुरू आहे. चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना एअरलिफ्ट करून रायपूरला नेण्यात आले आहे.
चकमकीनंतर पाच नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. याशिवाय घटनास्थळावरून अनेक शस्त्रे आणि स्फोटक वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. कांकेर डीआरजी, नारायणपूर डीआरजी, बीएसएफ आणि एसटीएफच्या संयुक्त दलाने मोठी कारवाई केली आहे.
सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये ज्या भागात चकमक होत आहे तो भाग प्रभावित आहे. यामुळेच सैनिकांशी संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत. सुरक्षा दलांनी नुकतीच अबुझमदच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली, त्यानंतर आज मोठी कारवाई केली जात आहे. याशिवाय 4 ऑक्टोबर रोजी याच जंगलात नक्षलवाद्यांची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली होती. ज्यामध्ये जवळपास 31 नक्षलवादी मारले गेले होते
नागपूर – गंगाजमुनात मौजमजा करायला एक तरुण आला. त्याने दुचाकी उभी केली अन वस्तीत फेरफटका मारला. एका वारंगणेसोबत एक युवक उभा होता. त्याने त्या युवकाला एक हजार रुपयात सुंदर तरुणीची भेट घालून देण्याचे आमिष दाखवले. त्याच्या आमिषावर युवक भाळल्या गेला. दोघेही दुचाकीने गंगाजमुना वस्तीच्या बाहेर पडले आणि त्याने अन्य एका मित्रालाही बोलावून घेतले. दोघांनीही पारडी परीसरात नेऊन त्या युवकाला मारहाण करुन चाकूच्या पैसे हिसकावून घेतले आणि त्याची दुचाकी घेऊन पळाले. सुंदर तरुणीच्या नादात युवकाला लुटल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली.
पीडित तक्रारकर्ता युवक आशिष हा खापरी चौकातील एका मोठ्या सलूनमध्ये काम करतो. त्याला गंगाजमुनामध्ये मौजमजा करण्याची सवय आहे. त्यामुळे तो नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री साडेदहा वाजता गंगाजमुना वस्तीत आला. त्याला एका वारांगणा महिलेसोबत तरुण उभा असलेला दिसला. त्याने वारंगणेशी चर्चा केली आणि सौदा झाला. परंतु, त्या युवकाने आशिषशी संवाद साधला. ‘मी दलाल असून १८ ते २० वर्षांच्या काही तरुणी माझ्याकडे आहेत. तुला एक हजार रुपयांत सुंदर तरुणीची भेट घालून देतो.’ असे आमिष दाखवले. त्या तरुणाच्या आमिषावर आशिष भाळला. त्याने लगेच सोबत येण्याची तयारी दर्शविली. त्या युवकाने आशिषला त्याच्याच दुचाकीवर बसवले. त्याला पारडी रस्त्याने दुचाकी घेण्यास सांगितले. काही अंतरावर गेल्यानंतर त्याने एका मित्राला फोन केला आणि समोरच्या चौकात बोलावले.
अंधारात नेऊन लुटले
आशिषला अंधारात थांबवले आणि तेवढ्यात दुसरा तरुण तेथे पोहचला. दोघांनी आशिषला चाकू दाखवून मारहाण केली आणि खिशातून काही पैसै काढून घेतले. त्यानंतर त्याची दुचाकी घेऊन दोघांनी पळ काढला. तसेच त्या युवकाने मदतीसाठी कुठे जाऊ नये म्हणून त्याचे कपडेही काढून घेतले. त्यामुळे तो युवक कसाबस एका हॉटेलजवळ पोहचला. त्याला एका युवकाने मदत केली. तो थेट लकडगंज पोलीस ठाण्यात पोहचला. त्याने पोलिसांना आपबिती सांगितली. पोलिसांनी लुटल्याची तक्रार घेतली.
सीसीटीव्ही फुटेजवरुन लागला शोध
आशिषने सांगितलेल्या वारंगणेशी पोलिसांनी चर्चा केली. त्यानंतर रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एक तरुण दिसून आला. त्या तरुणाची ओळख पटवली. त्यानंतर त्या युवकाचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी त्या युवकाला पारडी परीसरातून ताब्यात घेतले. तासाभरात दुसऱ्याही आरोपीला पोलिसांनी अटक केली. आशिषचे पैसे आणि दुचाकी पोलिसांनी त्या युवकांकडून हस्तगत केली. दोघांनीही गंगाजमुनात अशाच प्रकारे ग्राहकांना सुंदर तरुणींचे आमिष दाखवून लुटत असल्याची कबुली दिली. दोन्ही तरुणांवर गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे.
गडचिरोली : सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून ५४ हजार रुपये स्वीकारणाऱ्या व उर्वरित ९६ हजारांची फोनवरून मागणी करणाऱ्या पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ श्रेणी लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने १२ नोव्हेंबरला रात्री ताब्यात घेतले. विकी भास्कर प्रधान (३०) असे त्या लिपिकाचे नाव आहे.
तक्रारदार हा सफाई कंत्राटदार असून, त्याने पोलिस ठाणे, मुख्यालय आदी ठिकाणच्या सेप्टिक टाक्यांच्या सफाईचे काम घेतले होते. याचे बिल काढून दिल्याच्या मोबदल्यात इमारत शाखेचा लिपिक विकी प्रधान याने दीड लाख रुपयांची लाच मागितली होती. आधी दोन टप्प्यांत ५४ हजार रुपये स्वीकारले व उर्वरित रकमेपैकी दहा हजार रुपये आणून दे, अशी मागणी फोन करून केली. शिवाय, राहिलेल्या पैशांची नंतर व्यवस्था करून दे, अशीमागणी केली.
यासंदर्भात २४ ऑक्टोबरला कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर त्याच दिवशी एसीबी पथकाने पडताळणी केली असता, पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर ८ नोव्हेंबरला सापळा लावला, पण संशय आल्याने विकी प्रधानने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. अखेर लाच मागितल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने १२ रोजी विकी प्रधान यास पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गडचिरोली ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि संतोष पाटील, सहायक उपनिरीक्षक सुनील पेद्दीवार, हवालदार शंकर डांगे, अंमलदार सप्नील बांबुर्डे, संदीप घोनमोडे, संदीप उडाण, राजेश पद्मगीरवार, ज्योत्स्ना वसाके, विद्या मशाखेत्री, राजेश्वर कुमरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
लग्नावेळी ५० हजार घेतल्याची कबुली
विकी प्रधानने स्वतःच्या लग्नावेळी कंत्राटदाराकडून ५० हजार रुपये लाच स्वरूपात स्वीकारले होते. त्यानंतर ४ हजार रुपये स्वीकारले. उर्वरित ९६ हजारांची मागणी केली. पडताळणीत त्याने स्वतःच ही बाब मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
आरमोरी:
तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वैरागड येथे मास्तर कॉलनी येथे गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना दिनांक 13 -- 2024 बुधवार ला सकाळी 8-30 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली . मनीष ऊर्फ मुन्ना शंकर खोब्रागडे वय 38 वर्ष असे गळफास घेवून आत्महत्या केलेले युवकाचे नाव आहे .
मिळालेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वैरागड येथे मास्तर कॉलनीमध्ये मनीष खोब्रागडे आपल्या परिवारासमेत राहत होता मात्र दिनांक 12 -11 -2 2024 मंगळवारच्या रात्री जेवण करून तो आपल्या घरी झोपी गेला होता. 13 -- 2024 ला कुटुंब सकाळी झोपेतून उठल्यानंतर खोलीमध्ये बघितले असता. तो झोपलेल्या रूममध्ये दिसला नाही .म्हणून घरच्यांनी खालच्या मजल्याच्या वरती असलेल्या रूम कडे जाऊन बघितले असता त्यांना मनीष हा खोलीच्या आड्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये दिसला. घरच्यांनी लगेच आरमोरी पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे मृतकाचे शव पाठविले .मनीष हा एकांतामध्ये राहत होता आणि त्याचे राज्यशास्त्रीय विषयांमध्ये M .A .पर्यंत शिक्षण पूर्ण झाले होते आणि त्याला रोजगार नसल्याने नैराश्यपोटी टोकाचे पाऊल उचलले असावे अंदाज जनमानसाकडून वर्तवण्यात येत आहे.
मृतक मनीष यांच्या पश्चात तीन भाऊ आई वडील वहिनी दोन भाऊ सुना असा बराच मोठा आप्तपरिवार आहे .घटनेचा तपास पोलीस निरीक्षक गवते यांच्या मार्गदर्शनात पीएसआय दिलीप मोहुरले पोलीस हवालदार छंदक रामटेके पोलीस हवालदार वेस्कडे हे करीत आहेत .परिवारातील सुशिक्षित कर्तबगार तरुण गळफास घेऊन मृत पावल्याने परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गडचिरोली : गावालगतच्या जंगलात झाडाला गळफास घेऊन शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना आरमोरी तालुक्याच्या चुरमुरा येथे शुक्रवार, ८ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.
आनंदराव केवटराम सातपुते (४३), रा. चुरमुरा, ता. आरमोरी असे आत्महत्या केलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे. आनंदराव यांची प्रकृती खंगत असल्याने ते काही दिवसांपासून तणावात होते. दररोज ते गावालगतच्या जंगला जाऊन शेळ्यांसाठी झाडाच्या पाल्याच्या
फांद्या आणत असत. नेहमीप्रमाणे ते शुक्रवारीसुद्धा सकाळी शेळ्यांसाठी चारा आणण्याकरिता गेले होते; परंतु दुपारचे १२ वाजेनंतरही ते घरी परतले नाही. अखेर कुटुंबीयांनी इतरांच्या मदतीने जंगलात शोध घेतला. तेव्हा दुपारी १:३० वाजता एका झाडाला आनंदराव हे गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले. त्यांनी आत्महत्या का केली, याचे कारण कळू शकले नाही. यापूर्वीही त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलिस पाटील सतीश जाम्पलवार यांनी आरमोरी पोलिसांना माहिती दिली.
आष्टी (गडचिरोली) : कोंबडी न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका युवकास जिवंत जाळल्याची घटना आष्टी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या येनापूर जंगल परीसरात काल ६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ ते संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. मनोज आनंदराव मेकर्तीवार (३२) रा. सोमनपल्ली ता. चामोर्शी असे मृतकाचे नाव आहे. तर सचिन राजेश मेकर्तीवार रा. सोमनपल्ली, राहुल गुंजेकर रा. चिंचाळा ता. जि. चंद्रपूर अशी आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार आरोपींनी संगणमत करून मृतक मनोज मेकर्तीवार याच्या घरी जाऊन आम्हाला कोंबडा दे नाहीतर तुला मारून टाकू अशी धमकी दिली. या धमकीस घाबरून मनोज हा सांदवाडीत जाऊन लपला. त्यानंतर आरोपींनी मनोज याला पकडून शंकर पप्पुलवार यांच्या घरी नेले व त्यांच्या घरी लोकांसमोर हाता बुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच त्यांचे समाधान झाले नाही. तर त्याला मोटरसायकलवर बसून
सोमनपल्ली ते येनापूर कडे जाणाऱ्या रस्त्याकडे घेऊन गेले. यानंतर येणापूर नाला जंगल परिसरात नेऊन जीवानिशी ठार मारून मृतकाच्या अंगावर काड्य टाकून जाळून टाकले व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. य संदर्भात संगिता येलगलवाच रा. सावली हल्ली मु. सोमनपर्ल यांनी आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेच् गांभीर्य लक्षात घेता आष्ट पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
येणापूर च्या नाल्याजवळ एका इसमाला चक्क जाळले
आष्टी:-
पोलीस स्टेशन हद्दीत एका इसमाला येणापूर नाल्या शेजारी चक्क जाळून मारल्याची घटना उघडकीस आली आहे.
दि.सहा नोव्हेंबर दुपारच्या दोन वाजताचे सुमारास ही घटना घडली असून मृतकाचे नाव मनोज आनंदराव मेकर्तीवार वय ३५ रा. सोमणपल्ली ता.चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे आहे
आष्टी पोलीसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेहाची ओळख पटवली लागलीच संशयित दोन तरुणांना अटक करण्यात आली
राहुल गुंजनकर रा.चंद्रपूर व श्रीनिवास मेकर्तीवार रा.सोमणपल्ली असे आरोपी
असून त्याचा खुन का करण्यात आला याचा तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे, पोलीस उपनिरीक्षक मानकर व कर्मचारी करीत आहेत मृतकास का मारले प्रश्न अनूत्तरीत आहे
चिमूर : अधिकृत प्रचाराला सुरुवात होण्यापूर्वीच उमेदवाराच्या समर्थनार्थ आयोजित कॉर्नर सभेत प्रश्न विचारल्याने भाजप कार्यकर्त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून मला मारहाण केली, अशी तक्रार केली असता पोलिसांनी स्वीकारली नाही, असा आरोप बोडधा (हेटी) शंकर रामटेके यांनी मंगळवारी (दि.५) पत्रकार परिषदेत केला. भिसी पोलिस ठाणे अंतर्गत बोडधा (हेटी) येथे मांगलगाव येथील सरपंच प्रफुल्ल कोलते यांनी भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी रविवारी सकाळी कॉर्नर सभा घेतली होती.
या सभेत हा प्रकार घडल्याचे रामटेके यांनी यावेळी सांगितले. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांच्याशी संपर्क साधला असता दोन्ही बाजूने बयान नोंदविले असून त्यांनी तक्रार चौकशीत ठेवण्यात आल्याचे सांगितले.
गडचिरोलीत १४ वर्षांचा फरार आरोपी अटक
गडचिरोली : पोलिसांना तब्बल १४ वर्षांपासून डोकेदुखी देणारा लैंगिक अत्याचाराचा आरोपी अखेर पोलिसांच्या हात्यात सापडला आहे. हा आरोपी मुलचेरा तालुक्यातील देशबंधूग्राम येथे राहणारा अनादी अमुल्य सरकार (वय ४०) आहे.
२०१२ साली मुलचेरा पोलिस ठाण्यात याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी अटक झाल्यानंतर न्यायालयात हजर करताना तो पोलिसांना चकमा देऊन फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी मोठे प्रयत्न केले होते, पण तो सापडत नव्हता.
अखेर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आपल्या गावी लपून बसला होता. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली मुलचेरा पोलिस स्टेशनच्या पथकाने ही कारवाई केली.
अटक केलेल्या आरोपीला चामोर्शी येथील न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Read More :- Today Horoscope :- ६ नोव्हेबर २०२४ ; कार्यक्षेत्रा मध्ये नवीन काम करण्याची संधी मिळेल.
घोट : चामोर्शी तालुक्यातील घोट गटग्रामपंचायत अंतर्गत कुर्दुळ येथे एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ३ नोव्हेंबरला रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली. ऋती अनिल पचारे (१७, रा. कर्दळ (घोट) असे मयत मुलीचे नाव आहे. तिचे वडील अनिल पचारे यांनी पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार ऋती व घरातील सर्व जण ३ नोव्हेंबर रोजी रात्री जेवण करून ओठ्यावर बसले होते.
त्यावेळेस ऋती ही मोबाइलवर काहीतरी पाहते म्हणून घरात गेली. काही वेळाने लहान बहीण अनुष्का ही घरात गेली असता तिला ऋती ही घराच्या आळ्याला दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली. तिने कुटुंबीयाला माहिती दिली. तिला फासावरून उतरविले, पण त्याआधीच मृत्यू झाला होता. आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. तपास सहायक निरीक्षक नीलेश गोहणे करीत आहेत.
नागपूर : अजनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ वर्षीय मुलगी दिव्या (बदललेले नाव) सातव्या वर्गात शिकते. तर आरोपी श्रावण हा मूळचा गोंदियाचा असून कामाच्या शोधात नागपुरात आला होता.
दीड वर्षापासून तो अजनीतील एका डेकोरेशन कंपनीत कामाला लागला. त्याच्या वस्तीत राहणारी दिव्या ही शाळेत जात असताना तो तिचा पाठलाग करीत होता. शाळेपर्यंत तो जात होता. तिच्या घरासमोर तासनतास बसत होता. तिच्या घरी कुणी नसताना तो तिला भेटायला घरी गेला. तू मला खूप आवडतेस… मी तुझ्या प्रेमात पडलो… तू जर साथ देशील तर आपण दोघे प्रेमविवाह करु…असे बोलून जाळ्यात ओढले. लग्न करणार असल्यामुळे दिव्यासुद्धा फसली.
दोघांच्याही भेटी-गाठी वाढल्या. घरी कुणी नसताना दोघेही एकमेकांना भेटायला लागले. महिन्याचे वेतन मिळाले की श्रावण तिला चित्रपट, हॉटेल आणि फिरायला घेऊन जायला लागला. त्यामुळे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते.
आई-वडिल गाढ झोपल्यानंतर मुलगी मध्यरात्री एक वाजता प्रियकराच्या दुचाकीवरुन घरातून बाहेर पडली. ती सकाळी पाच वाजता घरी परतली आणि तेवढ्यात वडिलांना जाग आली. मुलीला युवकाच्या मिठीत बघताच वडिल संतप्त झाले. वडिलांनी दम देताच तिने प्रियकराने बळजबरी शारीरिक संबंध केल्याची कबुली दिली. या प्रकरणी तक्रारीवरुन अजनी पोलिसांनी मुलीच्या प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अटक केली. श्रावण राऊत (३०, अजनी) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.
मध्यरात्री भेटण्याचा मोह आला अंगलट
श्रावण आणि दिव्याचे शनिवारी मध्यरात्रीला भेटण्याचे ठरले होते. एक वाजता कुटुंब झोपल्यानंतर हळूच चौकात आली. तेथे श्रावण दुचाकी घेऊन उभा होता. त्याने तिला फुटाळ्यावर फिरायला जाण्यासाठी विचारले. तिने नकार दिल्यामुळे डेकोरेशनच्या गोदामात नेले. तेथे दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पहाटे पाच वाजेपर्यंत थांबल्यानंतर दिव्याने घरी सोडून मागितले.
प्रियकर पळून गेला
श्रावणने पहाटे पाच वाजता दिव्याला घरासमोर सोडले. तिने जाताना प्रियकराला मिठी मारली आणि तेवढ्यात तिचे वडिल लघुशंकेसाठी घराबाहेर आले. मुलीला प्रियकराच्या मिठीत बघताच त्यांचा पारा चढला. दरम्यान, प्रियकर पळून गेला. मुलीला विचारणा केली असता तिने प्रियकर असल्याची कबुली दिली. तसेच प्रियकराने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचेही वडिलांना सांगितले. या प्रकरण अजनी पोलिसांत तक्रार देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन प्रियकराला अटक केली.
दिल्ली, . राजधानी दिल्लीत पतीसोबत भांडण झाल्यानंतर एका महिलेने नवऱ्याचा प्रायव्हेट पार्ट कापून पळ काढला. पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिस आरोपी महिलेचा शोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित पुरुष बिहारच्या मधुबनी येथील रहिवासी आहे. चार-पाच महिन्यांपूर्वीच तो पत्नीसह दिल्लीला शिफ्ट झाला होता. दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर पत्नीने आपले गुप्तांग कापले, असा आरोप पीडित पतीने केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, पीडित पतीला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यातआले आहे. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी महिला सध्या फरार असून तिला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दिवाळीच्या रात्री पती-पत्नीमध्ये भांडण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑक्टोबर आणि 01 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 2:34 वाजता रूप नगर पोलिस स्टेशनला एका महिलेने आपल्या पतीचा प्रायव्हेट पार्ट चाकूने कापून पळ काढल्याची माहिती मिळाली.
दारूच्या नशेत केला नवऱ्यावर हल्ला
दिवाळी पाडव्या दिवशी पीडित विष्णूचा जबाब नोंदवण्यात आला. पीडित विष्णूने आपल्या जबाबामध्ये सांगितले की, तो बिहारमधील मधुबनी येथील रहिवासी आहे. आणि 4-5 महिन्यांपूर्वी पत्नीसह दिल्लीला शिफ्ट झाले. तो शक्तीनगर येथील पीजीमध्ये हेल्पर म्हणून काम करतो. 31 ऑक्टोबरच्या रात्री तो दारूच्या नशेत होता. काही कारणावरून त्याचे पत्नीशी भांडण झाले. भांडणानंतर त्याची पत्नी घरातून निघून गेली आणि तो झोपायला गेला. काही वेळाने त्यांच्या पत्नीने घरात घुसून त्यांच्या प्रायव्हेट पार्टवर धारदार वस्तूने वार केले. या घटनेनंतर त्याची पत्नी फरार झाली. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
कुरखेडा, (ता. प्र.). कुरखेडा तालुक्यातील भगवानपूर येथे सुरू असलेला कोंबडबाजारावर शनिवारी (दि. 2) कुरखेडा पोलिसांनी छापा टाकून 9 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून कोंबड्यांसह जुगारावर लावलेली रोख रक्कमही जप्त केली आहे. कुरखेडा तालुक्यातील भगवानपूर येथे कोंबडबाजार भरवला जातो. हा कोंबडबाजार परिसरात प्रसिद्ध आहे. दरम्यान, शनिवारी (दि. 2) बलिप्रतिपदानिमित्त येथे कोलडबाजार भरविला असल्याची माहिती कराया बाजारावर छापा टाकून 9 आरोपींना अटक केली. यात आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील रहिवासी छोटू अरुण बोदेले (30), कुरखेडा तालुक्यातील शिरपूर येथील रवींद्र चिंतामण मडावी (35), कढोली येथील समीर दिवाकर कोडाप (22), शिरपूर येथील हंसराज रामलाल मडावी (31), गुरनोली येथील रमेश दशरथ काटेंगे (40), देऊळगाव येथील प्रणीत माधव गहाल (29), शिरपूर येथील मनोज गुणाजी कबाडकर (35), देऊळगाव येथील तौमेश्वर गजानन खुणे (41) व भगवानपूर येथील सुखदेव श्रावण कुमरे (38) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून कोंबडे व रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक वाघ यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र कांबळे, प्रभू पिलारे, संतोष कांबळे, संदेश भैसारे यांनी केली. कुरखेडा पोलिसांच्या या कारवाईने तालुक्यातील कोंबड बाजार भरविणाऱ्यांना धडकी भरली आहे.
दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल
कुरखेडा पोलिसांनी अवैध धंद्यांवि रोधात कारवाईचे धाडसत्र सुरू केले आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी दारूविक्रेतेव तस्करांवर कारवाई करून दारूसह मुद्देमाल जप्त केला. तालुक्यातील कुरखेडा-नान्ही मार्गावर कारवाई करत पोलिसांनी अवैध दारूसह 26 हजार 10 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत इडदा रहिवासी धीरज युवराज ताराम व तुषार शामराव नैताम यांच्यावर कारवाई केली. तसेच उराडी जवळील वासी टोला मार्गावर 83 हजार 500 रुपयांची दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी आरमोरी येथील रामनगर वॉर्डातील तुषार देविदास मेश्राम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पीएसआय मोंबे, पोलिस हवालदार नरसिंग कोरे, मेश्राम, शेखलाल मडावी, प्रदीप मासरकर यांनी केली. तालुक्यातील सोनसरी येथे पोलिसांनी कारवाई करून 10,250 रुपयांची दारू जप्त केली. याप्रकरणी राजेंद्र नामदेव दहीकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गेवर्धा मार्गावर कारवाई करत 14 हजार 450 रुपयांची दारू जप्त केली. याप्रकरणी येडापूर येथील सुजित सुशील बिस्वास याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीवर तरुणाने केला अत्याचार
आरोपी तरुणा विरोधात आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
अशोक वासुदेव खंडारे वैनगंगा वार्ता १९
आरमोरी:-
फेसबुक वर ओळख करून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार केल्याची घटना 3 नोव्हेंबरला उघडकीस आली आहे. पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातील आरोपीला बेळ्या ठोकल्या आहेत. सूजीत कैलास गेडाम वय 22 वर्षे राहणार मोहाडी तालुका शिंदेवाही जिल्हा चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका 17 वर्षीय पीडित युवती सोबत सुजित गेडामची काही महिन्या पूर्वी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली एकमेकांना फेसबुकच्या माध्यमातून मेसेज करणे सुरू झाले. दरम्यान याचे रूपांतर प्रेमात झाले एकमेकांची फेसबुक वर ओळख झाली होती अशातच दोघांनी परस्पर एकमेकांना भेटण्याचा निश्चय केला. परस्पर एकमेकांना भेटल्यानंतर सुजित गेडामने युवतीला शरीर सुखाची मागणी करून युवतीवर अत्याचार केला. झालेल्या प्रकारामुळे युवती घाबरुन जावून सोबत
घडलेला सर्व प्रकार युवतीने आपल्या स्वगावी जावून कुटुंबीयांना सांगितला. असता कुटुंबीयांनी लगेच आरमोरी पोलीस ठाणे गाठून सुजित गेडाम विरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय दंड न्याय संहिता 64 (1)64(2)(1),64(2)87 137 (२) अन्वये गुन्हा दाखल करून 31 ऑक्टोबरला आरोपी सूचित गेडाम ला पोलिसांनी त्याच्या स्वगावातून ताब्यात घेतले आणि न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप मोहूर्ले तपास करीत आहेत
पालकांमध्ये खळबळ; जिल्हानजीकच्या नवेगाव येथे प्रयत्न फसला
गडचिरोली, ब्युरो. सद्यः स्थितीत दिवाळीचा उत्सव सुरू असून सर्वसामान्य नागरिक दीपोत्सवात मग्न आहेत. यात बालगोपालांचाही समावेश आहे. पालक वर्ग दीपोत्सवात व्यस्त असताना बच्चेकंपनी मौजमस्तीत दंग आहेत. अशातच जिल्हास्थळ असलेल्या गडचिरोली परिसरात मुले पळविणारी टोळी सक्रिय असल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. 2) दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. जिल्हास्थळपासून अवघ्या पाच किमी अंतरावर असलेल्या नवेगाव येथे अज्ञात इसमाने 12 वर्षीय बालकास बळजबरीने पळवून नेण्याचा प्रयत्न बालकाच्या धाडसामुळे फसला. मात्र, या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लक्ष्मीपूजनानंतर शनिवारी शहरासह ग्रामीण भागात (बलीप्रतिपदा) गायगोधनचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवादरम्यान जिल्हास्थळापासून चंद्रपूर मार्गावर 5 किमी अंतरावर असलेल्या नवेगाव येथे तोंडावर रुमाल बांधलेल्या एका अज्ञात इसमाने घरातील अंगणात खेळत असलेल्या 12 वर्षीय बालकास चॉकलेटचे आमिष दाखविले.
बालक घराबाहेर येताच तोंड तसेच हात दाबून त्याला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान घरापासून काही अंतरावर जाताच बालकाने इज्ञात इसमाच्या हाताला चावा घेत स्वतःची सुटका करून घेत घराकडे धाव घेतली. आपल्यावर घडलेली आपबिती बालकाने कुटुंबीयांना देताच एकच खळबळ निर्माण झाली. गांभीर्य लक्षात घेता पालकाने याची माहिती गडचिरोली पोलिसांना दिली. सद्यःस्थितीत दिवाळी सणानिमित्त प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त आहेत. काही अज्ञात व्यक्ती (मुले पळविणारी टोळी) फायदा घेत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. समयसूचकतेमुळे बालकाला पळवून नेण्याचा प्रयत्न फसला गेला असला तरी या घटनेमुळे जिल्हास्थळ परिसरात मुले पळविणारी टोळी सक्रिय असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने घेत या टोळीचा पर्दाफाश करावा, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.
अज्ञाताने घेतली होती विशेष खबरदारी: मुले पळविणाऱ्या टोळीतील अज्ञात इसमाने बालकास पळवितांना विशेषखबरदारी घेतल्याचे एकंदरीत घटनास्थळावरून स्पष्ट होत आहे. अज्ञात इसमाने नवेगाव येथील संबंधित बालकाच्या घरासमोरील गेटवर येऊन बालकास चॉकलेटचे आमिष दाखवून घराबाहेर बोलाविले. त्यानंतर त्याचे तोंड व हात दाबून घेत त्याला पळवून नेले. यादरम्यान त्याने तोंडाला रुमाल, डोक्यावर टोपी घातली असल्याचे बालकाने सांगितले.
सीसीटीव्हीमध्ये आढळून आला इसम संबंधित बालकाच्या पालकाने घरासमोरील चंद्रपूर मार्गस्थित काही दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता काळा पेंट, हिरवा शर्ट, डोक्यावर टोपी घातलेला तसेच तोंडाला रुमाल बांधलेला स्थितीत असलेला अज्ञात इसम येताना दिसून आले. मात्र फुटेजमध्ये चेहरा स्पष्ट होत नसल्याने इसमाची ओळख पटविणे शक्य होऊ शकले नाही. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजवरुन चंद्रपूर मार्गावर एक चारचाकी उभी असल्याचे तसेच इसम संबंधितांना इशारा करीत असल्याचेही निर्देशनास आले. यावरुन यात आणखी काही आरोपी असल्याचे स्पष्ट होत आहे.
जिल्हा पोलिस प्रशासनाचीअसंवेदनशीलता
बालकास पळविण्याचा प्रयत्न फसल्यानंतर संबंधित पालकाने यासंदर्भात तक्रार देण्यासाठी गडचिरोली पोलिस ठाणे गाठले असता ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांनी तक्रार दाखल न करता उलट पालकास संबंधित घटनेचे फुटेज भागविले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस प्रशासनाने घटनास्थळ गाठून विशेष चौकशी करणे गरजेचे होते. मात्र, याबाबत स्थानिक पोलिस प्रशासनाने दाखविलेली असंवेदनशीलता पोलिस विभागाच्या कार्यप्रणालीवरप्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.
अज्ञाताने चाकू दाखवून मारण्याची दिली धमकी
संबंधित 12 वर्षीय बालकाने सांगितलेलेल्या आपबितीनुसार तोंडाला रुमाल बांधून असलेल्या अज्ञात इसमाने बालकास चॉकलेट आमिष दाखवून घराबाहेर काढले. बालक घराबाहेर येताच हाताने तोंड दाबून तसेच हात बांधून त्याला नेले. दरम्यान घरापासून काही अंतरावर जाताच बालकाने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता इसमाने चाकूचा धाक दाखवित तुझ्यासह तुझ्या आईवडिलांनाही मारून टाकण्याची धमकी दिल्याची माहिती आहे.
आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल, पाच दिवसांची पोलीस कोठडी
आरमोरीः फेसबुकवरून मैत्री झाल्यानंतर शारिरीक सबंध ठेऊन अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस आरमोरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुजित कैलास गेडाम (२२) रा. मोहाडी ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर असे आरोपीचे नांव असून त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राप्त माहितीनुसार, आरोपी सुजित गेडाम व पीडितेची ओळख मागील ४ ते ५ महिन्यापुर्वी फेसबुक वरून झाली. दोघांची बोलचाल सुरू झाली. याचे रूपांतर प्रेमात झाले. आरोपीने पीडित मुलीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून पीडितेला आपले गावी भेटण्यास बोलाविले. तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करून अल्पवयीन पीडितेस पळवून नेले.
या संदर्भात आरमोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. फिर्यादीचे तक्रारीवरून व पीडितेचे बयान ग्राह्य धरून आरमोरी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात पोस्को अंतर्गत कलम ४,६,८,१२ तसेच भारतीय न्याय संहिता ६४(१), ६४ (२) (i), ६४(२) (२)८७, १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरमोरी पोलिसांनी दि. ३१ ऑक्टोबर रोजी आरोपीस त्याच्या मोहाडी गावावरून ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास आरमोरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोहूर्ले करीत आहेत.