PostImage

Chunnilal kudwe

Sept. 4, 2024   

PostImage

तालुक्यातील शेतकरी करणार ५ सप्टेंबर उद्याला आमदार भांगडीया यांचा सत्कार


-  शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यात आमदार बंटी भांगडिया यांचा मोलाचा वाटा.

   चिमूर - 

       भाजप महायुती शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी, कल्याणासाठी ऐतिहासिक निर्णय घेतलेले असताना चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात लाभ मिळाला. त्यात आमदार बंटी भांगडिया यांचा मोलाचा वाटा असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आमदार बंटी भांगडिया यांचा सत्कार ५ सप्टेंबर गुरुवारला दु. २ वाजता भांगडीया नविन वाडा पिंपळनेरी रोड, चिमूर येथे करणार असल्याची माहिती संयोजक भाजप किसान आघाडी चिमूर विधानसभा एकनाथ थुटे यांनी दिली आहे.

  महायुती सरकारने दोन वर्षात शेतकऱ्यांना पीक विमा, कापूस, सोयाबीन अनुदान, धान बोनस रक्कम, वीज बिल माफ, दिवसा शेती साठी १२ तास वीज पुरवठा असे अनेक शेतकरी वर्गाला सुखी करणारे निर्णय घेतले आहे. आमदार बंटी भांगडिया यांनी सतत पाठपुरवठा करीत शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शेतकऱ्यांत आमदार भांगडीया विषयी एक आनंदाची पर्वणी आहे. 


PostImage

Avinash Kumare

Sept. 2, 2024   

PostImage

कोंढाळा या गावात पहिल्यांदाच बैलांसोबत चक्क घोड्याला घेऊन " बैल …


कोंढाळा या गावात पहिल्यांदाच  बैलांसोबत चक्क "घोड्याला ''  घेऊन
" बैल पोळा’ साजरा करण्यात आला...!  

My khabar 24 :-  
कोंढाळा :  दिनांक 2 सप्टेंबर २०२४ सोमवार ला बैल पोळ्याचा सण कोंढाळ्या च्या दत्त मंदिर पटांगणात दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला...!  

 सोबतच गडचिरोली जिल्ह्यातील जुन्या परंपरेनुसार चालत आलेली झडत्या पण घेण्यात आलं 
आता तुम्हाला वाटत असेल की झडत्या हा काय प्रकार आहे. तर ही सम्पूर्ण महाराष्ट्राची लोकसंस्कृती आहे 
जी फक्त तुम्हाला विदर्भातच बघायला मिळेल 
बैल पोळ्याचा सण साजरा करताना हे झडती बोलावी लागते. 
आणि कोंढाळा या गावी याचे विशेष परंपरा आहे. 
जी सातत्याने हजारो वर्षांपासून ही संस्कृती
 कोंढाळा या गावच्या लोकांनी जोपासून ठेवली आहे. आणि झडत्या घेतल्या शिवाय तर पोळा पूर्ण होतच नाही..! हीच तर झाडीपट्टीतील खरी संस्कृती आहे. 
जी आपण वर्षानुवर्षे आतापर्यंत टिकवून ठेवलं आहे..!


झडती:   वाटी रे वाटी खोबर्‍याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. 

झडती:  बळी रे बळी लिंब बनी, अशी कथा सांगेल कोणी', 'राम-लक्ष्मण गेले हो वनी, राम-लक्ष्मणाने आणली वनफुले', ते महादेव पारबतीच्या हाती, तिनशे साठ नंदी एक नमन..गौरा पार्वती हर बोला हर - हर महादेव..!  

झडती:  मेंढी रे मेंढी शेंबडी मेंढी ते खाते आला-पाला तिचा गुरू माहा चेला लाथ मरून सरका केला.' एक नमन कवळा पारबती. हर बोला हरहर महादेव 

 

पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो.
सर्जा-राजाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजेच "बैल पोळा''  
अशातच जर गडचिरोली जिल्ह्यातील कोंढाळा या गावात बैलांसोबत घोड्याचाही समावेश झालं तर स्वर्गाहुन सुंदरच  की फक्त घोड्याच कौशल्य 
बघण्याकरिता कोंढाळा या गावातील हजारो लोकांची गर्दी आणि उत्सुकता अजून वाढली आणि  दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा खूप छान प्रकारे हा सण या गावात पार पडलं...!  

स्वप्न भंगले  तरुण मंडळी फडफडले  
सरकारी नोकरीसाठी वाट पाहू पाहू थकले 
जागा नाही निगत म्हणून रडू रडू बसले 
खोट्या भाषणाने बळी पडून माझे मतच वाया गेले
रोजगार द्या म्हणू म्हणू सगळे बेरोजगारच होऊन बसले 
बोला एक नमन गौरा पार्वती हर बोला हर- हर महादेव...!  


 

 

 

 

 


PostImage

Dipak Indurkar

Sept. 2, 2024   

PostImage

Farmers News: शेतकऱ्यांनो सावधान ! धान पिकावर वाढला खोडकिड्याचा प्रादुर्भाव


Farmers News: वातावरणातील बदलामुळे धान पिकावर खोडकिड्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. खोडकिडा हा धानासाठी अतिशय घातक रोग आहे. अगदी खोडाचे रस या किडी शोषून घेत असल्याने धान पीक खोडापासूनच वाळते. त्यामुळे त्याचा वेळीच बंदोबस्त करणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा : Big news for farmers: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! गुलाबी बोंडअळीचा वाढतोय प्रादुर्भाव, अशी करा उपायोजना

धान रोवणीच्या कालावधीपासून खोडकिड्याचा प्रादुर्भाव यावर्षी आढळून येत आहे.
सुरुवातीच्या कालावधीत अत्यंत कमी ठिकाणी याचा प्रादुर्भाव आढळतो.

हे देखील वाचा : Marriage Scheme: प्रेम करून लग्न करा, मिळवा 71 लाख रुपये, सरकारची अनोखी योजना

मात्र वेळीच उपाययोजना न केल्यास त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. शेतकऱ्यांनी या रोगाचा वेळीच बंदोबस्त करावा. अनेक रासायनिक कीटकनाशके  उपलब्ध आहेत. तसेच खतासोबत टाकायची कीटकनाशकेसुद्धा उपलब्ध आहेत. यांचा वेळीच वापर करणे गरजेचे आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Sept. 2, 2024   

PostImage

पोळ्याच्या झडती


पोळ्याच्या झडत्या - १*

 

बैना ओ बैना, लाडाची बहिणा

लाडाच्या बहिणीला पंधराशे महिना

पंधराशे रुपयाचे खावा गोलगप्पे

लाडाच्या भावाला द्या ठपाठप ठप्पे

 

मायबाप सरकार म्हणते लाडाची बैना

पाटलाची पाटी उरली जावयाची दैना

लाडाच्या बहिणीच्या नवऱ्याचे हाल

कुत्रंबी हुंगत नाही शेतातला माल

 

तुर केली आयात, पाडून टाकले भाव

स्वस्तामध्ये सोयाबीन, लुटून नेलं गाव

जावयाच्या छाताडावर कर्जाची रास

पंधराशेत जहर घ्यावं की घ्यावा गळफास

 

जरांगे म्हणतात ते खरं आहे भाऊ

घामाचं दाम नाही तर

अभय आरक्षणच घेऊ

 

बोला! एक नमन‌ गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव

=-=-=-=

*पोळ्याच्या झडत्या - २*

 

हेला रे हेला, राजकारणी हेला

सरकारच्या धोरणापायी

शेतकरी मेला

शेतकरी मेला तर

लाख रुपये देते

जिवंत जगतो म्हणाल तर

खमसून रक्त पेते

शेतमालाला भाव नाही तर

आरक्षण तरी द्या

तुमच्या हिश्याच्या नोकऱ्या

आमच्या लेकराले द्या

प्रेमानं दिलं नाही तर

हिसकून घ्या आता

नव्या दमानं लिहू अभय

शेतकऱ्याची गाथा

बोला! एक नमन‌ गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव

 

*पोळ्याच्या झडत्या - ३*

पोयी रे पोयी पुरणाची पोयी

पवारांच्या पालखीला उद्धवचे भोई

शिंदेसेनेच्या घोड्यांना

भाजप घालते चारा

दादाच्या घड्याळात

वाजून गेले बारा

कपाळावर नाही उरली

निष्ठेची टिकली

खुर्चीसाठी साऱ्यांनीच

लाज शरम विकली

बोला! एक नमन‌ गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव

 

*पोळ्याच्या झडत्या - ४*

वाडा रे वाडा इंद्राचा वाडा

भाजपच्या चड्डीले उद्धवचा नाडा

भाजपने सोडली उद्धवची साथ

तर भाजपचाच झाला सुफडासाफ

बोला! एक नमन‌ गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव

 

*पोळ्याच्या झडत्या - ५*

नवं नवं सरकार नवी नवी थीम

नवी नवी योजना नवी नवी स्कीम

लाडाचा भाऊ लाडाची बहीण

लाडाचा ब्याही लाडाची विहीन

मत द्या आम्हाले

सारं फुकट तुम्हाले

धान्य फुकट, तेलबी फुकट

धोतर फुकट, चोळीबी फुकट

नवऱ्याले एक एक बायको फुकट

बायकोले एक एक नवरा फुकट

फुकट फुकट फुकट

फुकट फुकट फुकट

जोडप्याले दोन दोन लेकरं बी फुकट

मत द्या आम्हाले

सारं फुकट तुम्हाले

बोला! एक नमन‌ गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव

 

*पोळ्याच्या झडत्या - ६*

 

माशी रे माशी,

गांधीलची माशी

शेतकऱ्याच्या नाकात

घुसली गोमाशी

मोदीभाऊ म्हणे

मी काढू कशी

राहुलभाऊ म्हणे

राहू दे तशीच

बोला! एक नमन‌ गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव

 

पोळ्याच्या झडत्या - ७*

 

कॅटली रे कॅटली, दुधाची कॅटली

दुधावरची साय सांगा कोणी चाटली?

शेतमालाले भाव म्हणलं तर

सरकारची चड्डी

मांडीवर फाटते

वेतन आयोगावर सरकार

जम्मुन खिरापत वाटते

उद्योगांचे अरबो खरबो

कर्ज झटक्यात माफ करते

हजाराच्या कर्जासाठी

इकडे शेतकरी मरते

घोरसून सांगा लोकहो

शेतमालाले भाव दे

नायतर

आरक्षण दे जरा

जमत असण तर जमव

नायतर

घ्या म्हणा झोलाझेंडी

अन्

व्हा आपल्या घरी 

बोला! एक नमन‌ गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव

=

पोळ्याच्या झडत्या - १

 

वाडा रे वाडा,

शेतकऱ्याचा वाडा

शेतकऱ्याच्या वाड्यात

चांदीचा गाडा

चांदीच्या गाड्यावर

सोन्याचे मोर

मोरावर बसते

शेतकऱ्याचं पोर

एक नमन‌ गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव

=-=-=-=-=

*पोळ्याच्या झडत्या - ३*

 

आटली रे आटली

तिजोरी आटली

सरकारची चड्डी

मंधामंधी फाटली

फाटलेल्या चड्डीले

ठिगळ काही बसेना

कांदे, टमाटर, सोयाबीनले

काळं कुत्रं पुसेना

इंडिया गेला चंद्रावर

भारताची झाली माती

आगुदर दे आमच्या शेतमालाले भाव

तवा सांग तुही छप्पन इंची छाती

एक नमन‌ गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव

 

 


PostImage

Dipak Indurkar

Aug. 29, 2024   

PostImage

Big news for farmers: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! गुलाबी बोंडअळीचा …


Big news for farmers: चंद्रपूर जिल्ह्यात धान पिकांसह कापूस, सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांचे गुलाबी बोंडअळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या वर्षी कापूस पिकावर बोंडअळी प्रादुर्भाव केला आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रादुर्भाव आढळून आला असून, डोमकळ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच सावध होऊन किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: फवारणी पंपासाठी शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान, असे करा अर्ज

सध्या कपाशी पीक 50 ते 60 दिवसांचे झाले असून, बऱ्याच ठिकाणी फुलावर येत आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव डोमकळ्याच्या स्वरूपात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच दिसून येत आहे. कीटकशास्त्र विभागाच्या चमूने शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी दिल्या असता, कपाशी जेथे फुलावस्थेत आहे अशा ठिकाणी डोमकळ्या आढळून आल्या आहेत.

सततचे ढगाळ वातावरण पिकावरील किडींना पोषक असते. किडींचे व्यवस्थापन करण्यास उशीर केल्यास या किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. शेतकऱ्यांनी त्वरित कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे नियोजन करावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव  देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व  कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: या योजने अंतर्गत लाडक्या बहिणींना मिळणार मोफत गॅस सिलेंडर, जाणून घ्या कधी आणि कसे

 

अशी करा उपाययोजना

पिकातील डोमकळ्या नियमित शोधून त्या अळीसहित नष्ट कराव्यात. दर पंधरा | दिवसांनी 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझेंडिरेक्टिन 300 पीपीएम 50 मिली किंवा 1500 पीपीएम 25 मिली प्रति 10 लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. कामगंध सापळ्याचा वापर करावा. पिकाच्या उंचीनुसार किमान एक फूट उंच अंतर ठेवावे, कामगंध सापळ्याचा प्रभाव वातावरणात पसरण्यास मदत होईल. यासाठी एकरी दोन कामगंध सापळे लावावेत. सतत तीन दिवस या सापळ्यामध्ये आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाचे उपाय करावेत, मास ट्रॅपिंगकरिता हेक्टरी 15 ते 20 कामगंध सापळे लावावेत.

प्रतिनिधित्व करतील, अशी 20 झाडे निवडलेल्या प्रत्येक झाडावरील फुले, पात्या व बोंडांची संख्या मोजून त्यात गुलाबी बोंडअळीग्रस्त फुले, पात्या व बोंडे यांची टक्केवारी काढावी व प्रादुर्भावग्रस्ताची टक्केवारी 5 टक्केपेक्षा जास्त आढळल्यास रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी.

अशाच  माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 28, 2024   

PostImage

Congress 'Nyaya Yatra' and 'Hatla Bol March' against the government …



भिसी, जांबुळघाट आणि नेरी येथून पोहचला चिमूर शहरात शेतकऱ्यांचा बैलबंडी, ट्रॅक्टर व पायदळ मोर्चा


चिमूर - 
            चिमूर तालुक्यात अतिवृष्टी होवून शेत पीके नष्ट झाली. अनेक कुंटूब बेघर होवून उद्धवस्त झाली. परंतू राज्यात असलेल महायुतीच सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. सरकारचे लक्ष वेदण्यासाठी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ नामदेव किरसान व चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉ सतिश वारजूकर यांच्या नेतृत्वात शेतकरी शेतमजूर यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी विरोधी सरकारच्या विरोधात काँग्रेसने विवीध मागण्यासाठी बुधवार ला दहा वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आंबोली चौरस्ता येथून तुकडोजी महाराजाच्या पुतळ्याचे पूजन करून शेतकरी न्याय यात्रा व हल्ला बोल मोर्चाला सुरुवात करण्यात आली. ही न्याय यात्रा भिसी शहरातील महापुरुषाच्या पुतळ्यांना अभिवादन व करून जांबुळघाट, नेरी मार्गे चिमूर पंचायत समिती कार्यालय समोरून श्रीहरी बालाजी देवस्थान येथे दिड वाजता शेतकरी न्याय यात्रा पोहचली. दरम्यान श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान ते चिमूर तहसिल कार्यालय पर्यंत शेतकऱ्यांचा बैलबंडी, ट्रॅक्टर व पायदळ मोर्चा मुख्य रस्त्याने काढण्यात आला.

        तहसिल कार्यालया समोरील मोर्चाचे रुपांतर सभेत झाले दरम्यान उपस्थित मान्यवरांनी शेतकरी मोर्चेकऱ्यांना संबोधीत केले. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी रुपरे 50 हजार तात्काळ मदत करावी, शेतकऱ्यांना पीक विमा तात्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी करावी. अतिवृष्टीमुळे घरे पडलेल्या कुटुंबांना तात्काळ घरकुल मंजूर करण्यात यावे, कृषी पंपांना रात्री मिळणारी वीज दिवस पाळी करून 24 तास पुरविण्यात यावी, शेतकऱ्यांचे प्रलंबित असलेली प्रोत्साहनपर राशीचे 50 हजार रुपये देऊन 2 लाखाचेवर जुने कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे, घरगुती वीज वापरासाठी लावण्यात येणारे स्मार्ट मीटर लावण्यात येऊ नये, मोखाबर्डी उपसासिंचन योजनेचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, रोजगार हमीच्या कामावर असलेल्या मजुरांचे व कुशल कामांचे पैसे तात्काळ देण्यात यावे, वन जमिनींचे पट्टे लाभार्थ्यांना लवकरात-लवकर देण्यात यावे,घरकुल योजनांचे पैसे जराही विलंब न करता लाभार्थ्यांना लवकर देण्यात यावे, अतिवृष्टीमुळे पडलेले घर व गुरांचे गोठे पीडित कुटुंबांना तात्काळ मदत करण्यात यावी, वाढविण्यात आलेली वीज दरवाढ मागे घेण्यात यावी, ताडोबा अभयारण्याला लागून असलेल्या शेतकऱ्यांना शेतमालाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्याकरिता मागेल त्या शेतकऱ्याला सरसकट जाळीचे कुंपण मोफत पुरविण्यात यावे, वन जमिनीवरील शेतकऱ्यांचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही वन विभागाने त्वरित थांबवावी. आदी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार दिनेश पवार मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांना देण्यात आले.
         निवेदन देताना खासदार डॉ नामदेव किरसान, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा माजी. आमदार, अध्यक्ष खनिकर्म महामंडळ (राज्यमंत्री) दर्जा डॉ अविनाश वारजूकर, सेवादल सहसचिव प्रा राम राऊत, समन्वयक  चिमूर विधानसभा काँग्रेस तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश ओबीसी महासंघ डॉ सतिश वारजूकर, महाराष्ट प्रदेश काँग्रेस ओबीसी संघटक धनराज मुंगले, माजी जि प सदस्य पंजाबराव गावडे, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी डॉ विजय गावडे, महासचिव जिल्हा काँग्रेस कमिटी गजानन बुटके, शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी अविनाश अगडे, उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी विवेक कापसे, महासचिव प्रदेश युवक काँग्रेस महाराष्ट्र साईश वारजूकर, काँग्रेस सेवादल किशोर शिंगरे, पप्पू शेख, आदी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व मोर्चात हजारो शेतकरी शेतमजूर उपस्थित होते.


PostImage

Sajit Tekam

Aug. 22, 2024   

PostImage

Ladka Shetkari Yojana: आता सुरु होणार लाडका शेतकरी योजना, मुख्यमंत्री …


Ladka Shetkari Yojana: शेतकऱ्याला थेट मार्केट उपलब्ध करून देण्याचं महायुती सरकारचं काम आहे. कष्टकरी, वारकरी आणि सुखी शेतकरी हेच आमच्या सरकारचं धोरण आहे. आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. त्यानंतर अन्नपूर्णा योजना आणली. लाडका भाऊ योजना आणली. आता आम्ही लाडका शेतकरी योजना राबवणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केली.

सर्व भाऊ लाडके झाले, सर्व बहिणी लाडक्या झाल्या, आता शेतकरही लाडका होणार, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस या पक्षांनी संपर्क मोहिमा सुरू केल्या आहेत.

हे देखील वाचा : Police Bharti 2024 Maharashtra New Update: डिसेंबर मध्ये होणार महाराष्ट्रातील इतक्या पोलीस पदांसाठी भरती, जाणून घ्या माहिती

 

कापूस, सोयाबीनला, हेक्टरी 5 हजार

शिंदे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत की, आमच्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांचंही कल्याण झालं पाहिजे. आज आपण सोयाबीन आणि कापसाला हेक्टरी 5 हजार रुपये देण्याचा निर्णय घेत आहोत. ही मर्यादा 2 हेक्टरपर्यंत असणार आहे.

हे देखील वाचा : Biofortified: उत्पादन वाढविणारे आणि खर्च कमी करणारे 109 बियाणे बाजारात

 

शेतीपंपाची वीज बिलंही माफ

आता आपण ई-पीक पाहणी वगेरे बाजूला ठेवणार आहोत.. ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर सोयाबीन आणि कापसाची नोंद आहे, त्या शेतकऱ्यांना मदत देणार आहोत. एवढंच नाही तर शेतीपंपाची वीज बिलंही माफ करत आहोत. मागेल त्याला शेततळं आणि मागेल त्याला सोलर, अशा अनेक योजना सरकारने सुरु केल्या आहेत", असंही मुख्यमंत्री शिंदे . यावेळी म्हणाले.

अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 21, 2024   

PostImage

माजी खा.अशोक नेते यांचे हस्ते चामोर्शी येथे मोफत खते वाटप …



२१ ऑगस्ट २०२४
चामोर्शी:-संत जगनाडे महाराज ऍग्रो प्रोड्युसर कंपनीच्या सभासद शेतकऱ्यांना मोफत खते व  निविष्ठा वाटप कार्यक्रम दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोज मंगळवारी संताजी क्रीडांगण प्रभाग क्रमांक तीन गोंडपुरा चामोर्शी येथे माजी खासदार तथा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते व प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ते शेतकऱ्यांना मोफत खते  वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या मचांवर प्रमुख पाहुने म्हणुन माजी.खासदार अशोकजी नेते, माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी, कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक  मास्तोडी सर,भाजपा महिला आघाडी च्या प्रदेश चिटणीस सौ. रेखाताई डोळस,भाजपा नेत्या डॉ.चंदाताई कोडवते,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणयजी खुणे,जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी,जेष्ठ नेते श्रावणजी सोनटक्के, प्रतिष्ठित नागरिक कविश्ववर आईंचवार, कृषी विभागाचे पी.पी. गजभिये, मंडळ कृषी अधिकारी बी.बी चापले,कृषी पर्यवेक्षक एच‌.डी यचवाड,बी.एन.गायकवाड, प्रशिल वालदे,सि.एच.जिरतकर  उपस्थित होते.
उपस्थित शेतकऱ्यांना माजी खासदार अशोकजी नेते,माजी आमदार डॉक्टर नामदेवराव उसेंडी,जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी,प्रदेश चिटणीस सौ.रेखाताई डोळस,सौ.डॉ. चंदाताई कोडवते,व कृषी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. 

यावेळी या कार्यक्रमाला माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे  अशोकजी नेते यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत बोलतांना केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांचे हिताचे सरकार असून केंद्र आणि राज्य सरकार तमाम शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे.
शेतकऱ्यांच्या अनेक योजना केंद्र व राज्य शासनाच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी दहा वर्षाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना  अनेक योजना कार्यान्वित केले आहेत.आपल्या जिल्ह्यात यावेळी अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले यात हवालदिल झाला असुन अशावेळी शेतकऱ्यांना दिलासा हातभार देण्यासाठी यावेळी आशिष भाऊ पिपरे यांनी पुढाकार घेऊन चामोर्शी येथे मोफत खत वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला गेला मि उशिरा येऊन सुद्धा अनेक शेतकरी या खत वाटपात उपस्थित आहेत.अशा  कार्यक्रमाची स्तुती करतो तसेच शेतकऱ्यांनी खत घेऊन परिपूर्ण लाभ घ्यावा असे अवाहन करत केंद्र व राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे व  शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत असे प्रतिपादन या खत वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी मा.खा.नेते यांनी केले.

या प्रसंगी संत जगनाडे महाराज ऍग्रो प्रोडूसर कंपनीचे सभासद  तसेच गावातील इतर शेतकरी हे सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात तालुका आरोग्य अधिकारी यांच्या वतीने शुगर व उच्च रक्तदाब तपासणी करण्यात आले व शेतकऱ्यांना मोफत आरोग्य तपासणी करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कंपनीचे अध्यक्षा तथा नगरसेविका सौ.सोनाली पिपरे , मुख्य कार्यकारी अधिकारी तथा नगरसेवक आशिष भाऊ पिपरे , कंपनीचे संचालक तुळशीदास नैताम,रमेशभाऊ अधिकारी , उमाजी वासेकर,भैय्याजी धोडरे, जिवन पिपरे ,शंकर वासेकर, श्रीधर पेशट्टीवार व पदाधिकारी यांनी अथक प्रयत्न केले.


PostImage

M S Official

Aug. 19, 2024   

PostImage

Sarkari Yojana: शेतकऱ्यांसाठी 5000 रुपये प्रति हेक्टरआर्थिक मदत अधिक माहितीसाठी …


Sarkari Yojana: मागील खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन पिकांना कमी भाव मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. काही शेतकऱ्यांना लागवड खर्चसुद्धा भरून निघाला नाही. राज्य सरकारने या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक महत्वाची आर्थिक मदत योजना जाहीर केली आहे.

 

योजनेची वैशिष्ट्ये आणि लाभ

आर्थिक मदत: 2023 खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना प्रतिहेक्टर ₹5000 ची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही मदत दोन हेक्टरपर्यंत मर्यादित आहे.

सामूहिक खातेदारांसाठी नियम: ज्या शेतजमिनीवर एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांची नावे आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांची संमती आवश्यक आहे. एकच शेतकऱ्याचे नाव असलेल्या गट क्रमांकासाठी संमतीपत्राची आवश्यकता नाही.

लाभ घेण्यासाठी पात्रता: या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक पेरा नोंदणी केलेली असावी आणि त्यांचा आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न असावा.

हे देखील वाचा :  या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार सौर पंप बसविण्यासाठी इतका अनुदान

 

तालुकानुसार लाभाचे वितरण

वरोरा, कोरपना, राजुरा, आणि चंद्रपूर या तालुक्यांमध्ये कापूस आणि सोयाबीनचा पेरा अधिक प्रमाणात झाल्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा अधिक फायदा होणार आहे.

राज्य सरकारच्या या आर्थिक मदत योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई होईल आणि आर्थिक स्थैर्य मिळेल.


PostImage

Dipak Indurkar

Aug. 16, 2024   

PostImage

Sarkari Yojana 2024: फवारणी पंपासाठी शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान, असे …


Sarkari Yojana 2024: शेतीमध्ये कीड, रोग, आणि तण यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणी करणे आवश्यक असते. यासाठी आता फवारणी पंप खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना 100% अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. परंतु, याबाबत सर्व शेतकऱ्यांना पुरेशी माहिती नसल्यामुळे, अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास अपयशी ठरत आहेत.

 

फवारणी पंपासाठी अर्ज कसा करावा?

फवारणी पंपासाठी 100% अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे. शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज सादर करावा लागतो. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी लागतात आणि अर्ज वेळेवर सादर करावा लागतो.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: या योजने अंतर्गत लाडक्या बहिणींना मिळणार मोफत गॅस सिलेंडर, जाणून घ्या कधी आणि कसे

 

अर्जासाठी अंतिम तारीख

या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑगस्ट होती. तरीही, या योजनेबद्दल योग्य माहिती नसल्यामुळे फक्त काही निवडक शेतकऱ्यांनीच अर्ज केला आहे. अर्ज सादर करण्याची ही संधी दुरावली आहे, परंतु अशा प्रकारच्या योजनांबद्दल जागरूकता वाढविणे गरजेचे आहे.

 

MahaDBT पोर्टलवर अर्जाची प्रक्रिया

कृषी विभागाच्या MahaDBT पोर्टलवर अर्ज सादर केल्यानंतर, विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. या पोर्टलवर फवारणी पंपांसाठी 100% अनुदानाची योजना सादर केली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी असून, शेतकऱ्यांना अर्ज सादर करण्यासाठी सेतू केंद्रात जावे लागते. ऑनलाइन प्रक्रियेसाठी सुमारे 200 ते 300 रुपये खर्च येऊ शकतो.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: शेतकऱ्यांना गोदाम बांधण्यासाठी सरकार देणार साडे 12 लाखांचे अनुदान

 

इतर कृषी योजना

MahaDBT पोर्टलवर केवळ फवारणी पंपासाठीच नव्हे, तर इतर अनेक कृषी योजनांची माहिती उपलब्ध आहे. यामध्ये कृषी यांत्रिकीकरण, सिंचन योजना, आणि इतर उपक्रमांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी या पोर्टलवर नियमितपणे भेट देऊन विविध योजनांचा लाभ घ्यावा.

अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

M S Official

Aug. 14, 2024   

PostImage

PM KUSUM Yojana: या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार सौर पंप …


PM KUSUM Yojana: अंतर्गत, तुम्हाला सौर पंप बसवण्यासाठी भरघोस अनुदान मिळू शकते. प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान म्हणजेच PM KUSUM Yojana ची सुरुवात 2019 मध्ये झाली, ज्यामध्ये शेतकऱ्यांना सौर पंपाच्या स्थापनेसाठी अनुदान दिले जाते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना वीजेच्या खर्चात मोठी बचत होण्यास मदत मिळते.

 

कोणते शेतकरी घेऊ शकतात या योजनेचा लाभ?

शेतकऱ्यांकडे जर स्वतःची जमीन असेल आणि ते वीज पुरवठ्याच्या समस्यांमुळे त्रस्त असतील, तर या योजनेचा लाभ घेऊ शकतात. PM KUSUM Yojana अंतर्गत, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौर पंप बसवण्यासाठी 60% पर्यंत अनुदान दिले जाते, ज्यामुळे सौर ऊर्जा त्यांच्यासाठी सुलभ होते.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: बीज प्रक्रिया संचासाठी मिळणार 10 लाखांपर्यंत अनुदान

 

सौर पंपावर किती अनुदान मिळणार?

सरकार सौर पंप बसवण्यासाठी एकूण खर्चाच्या 60% पर्यंत अनुदान देते. उर्वरित 30% कमी व्याजदराने कर्जाच्या रूपात दिले जाते, आणि फक्त 10% रक्कम शेतकऱ्यांनी स्वतः भरावी लागते. सोलर पंप अनुदान घेतल्याने, शेतकऱ्यांना त्यांचे ऊर्जेचे खर्च कमी करता येतात.

 

सौर पंपाच्या क्षमतेनुसार खर्च

 

3 HP सोलर पंप:

3 HP सोलर पंपासाठी ₹1,20,000 ते ₹1,30,000 इतका खर्च येतो. तुम्हाला या पंपासाठी फक्त ₹12,000 ते ₹13,000 खर्च करावे लागतील.

 

5 HP सोलर पंप:

5 HP सोलर पंपासाठी ₹1,80,000 ते ₹2,00,000 खर्च येतो. या खर्चातून तुम्हाला फक्त ₹18,000 ते ₹20,000 भरावे लागतील.

 

7.5 HP सोलर पंप:

7.5 HP सोलर पंपासाठी ₹2,50,000 ते ₹2,70,000 खर्च येतो. तुमचा खिशाला फक्त ₹25,000 ते ₹27,000 एवढाच खर्च येणार.

हे देखील वाचा : Majhi Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर रक्षाबंधनापूर्वीच येणार 3 हजार रुपये


सौर पंप अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे

सोलर पंप अनुदानासाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे:

  • शेतजमिनीचा 7/12 उतारा किंवा मालकीचा पुरावा
  • आधार कार्ड किंवा ओळखपत्र
  • बँक पासबुकची झेरॉक्स प्रत
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • वीज बिल

 

सौर पंप अनुदानासाठी अर्ज कसा करावा?

सोलर पंपासाठी अर्ज करणे अगदी सोपे आहे. राज्यातील ऊर्जा विभागाच्या कार्यालयात जाऊन किंवा अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येतो. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि पुढील प्रक्रिया सुरू करा.

PM KUSUM Yojana अंतर्गत, सौर पंपाच्या मदतीने शेतकऱ्यांना ऊर्जेचा खर्च कमी करण्याची संधी मिळते. तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊन तुमच्या शेतीसाठी आर्थिक स्थैर्य निर्माण करू शकता. आजच अर्ज करा.

अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Sajit Tekam

Aug. 12, 2024   

PostImage

Biofortified: उत्पादन वाढविणारे आणि खर्च कमी करणारे 109 बियाणे बाजारात


पंतप्रधान मोदींची ऐतिहासिक घोषणा

Biofortified: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एक महत्वाची घोषणा केली आहे. त्यांनी 109 नवीन बियाणांचे वाण भारतीय कृषी आणि बागायती पिकांसाठी बाजारात आणले आहेत. हे बियाणे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि उत्पादन सुधारण्यासाठी विशेषतः उपयुक्त आहेत.

 

कृषी संशोधन परिषदेने विकसित केलेले वाण

भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR)ने ही 109 जाती विकसित केली आहेत. या वाणांमध्ये 61 पिकांचे 34 शेतातील आणि 27 बागायती पिके समाविष्ट आहेत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मते, हा दिवस शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक आहे कारण या बियाणांच्या माध्यमातून उत्पादन वाढवणे आणि खर्च कमी करणे शक्य होईल.

 

बदलत्या हवामानासाठी अनुकूल वाण

या नवीन बियाणांचा फायदा म्हणजे ते बदलत्या हवामानातही चांगले उत्पादन देतात. त्यात पोषकतत्त्वांची भरपूर मात्रा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळेल आणि खर्च कमी होईल.

 

पिकांची विविधता

या वाणांमध्ये तृणधान्ये, बाजरी, चारा, तेलबिया, कडधान्ये, ऊस, कापूस आणि फायबर पिके यांचा समावेश आहे. तसेच, बागायती पिकांमध्ये फळे, भाज्या, मसाले, फुले आणि औषधी वनस्पतींच्या नवीन जातींचा समावेश आहे.

 

जैव-फोर्टिफाइड वाणांचे महत्व

पंतप्रधान मोदी यांनी जैव-फोर्टिफाइड वाणांवर विशेष लक्ष दिले आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी हे वाण सरकारी उपक्रमांशी जोडले गेले आहेत, जसे की माध्यान्ह भोजन योजना आणि अंगणवाडी सेवा.


PostImage

Shivendra Daharwal

Aug. 4, 2024   

PostImage

Land Registration ID: किसानों को जमीन के डिजिटल आईडी नंबर …


Land Registration ID: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि किसानों को उनकी भूमि का एक डिजिटल आइडेंटिफिकेशन नंबर दिया जाएगा.

पीएम मोदी ने शनिवार को कृषि अर्थशास्त्रियों 32वें अंतरराष्ट्रीय सम्मेलन (आईसीएई) का उद्घाटन किया। इस दौरान उन्होंने कहा कि कृषि सरकार की आर्थिक नीति के केंद्र में है. हम अपने किसानों की मदद के लिए पूरा इकोसिस्टम विकसित कर रहे हैं.

ये भी पढ़ें : Chief Minister Ladli Behna Yojana: मध्यप्रदेश में रक्षाबंधन पर लाडली बहनों को मिलेंगे ये खास उपहार,जानिए वो क्या है खास उपहार

छोटे किसान ही भारत की खाद्य सुरक्षा की सबसे बड़ी ताकत हैं। यही स्थिति एशिया के कई विकासशील देशों में है, इसलिए भारत का मॉडल कई देशों के काम आ सकता है. इस साल के बजट में भी बड़ा फोकस 'सस्टेनेबल फार्मिंग' पर है.

 

वैश्विक खाद्य संकट के समाधान में जुटा भारत

मोदी ने कहा, भारत अब फूड सरप्लस देश है. एक समय भारत की खाद्य सुरक्षा दुनिया की चिंता का विषय थी. आज भारत वैश्विक खाद्य संकट के समाधान में जुटा है.

भारत में इस 6 दिवसीय सम्मेलन का आयोजन 65 वर्ष बाद हुआ है. इसमें 75 देशों के प्रतिनिधि शामिल हो रहे हैं.

 


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 3, 2024   

PostImage

Farmers Crop Insurance - चिमूर विधान सभा क्षेत्रातील नऊ हजार …


 आमदार बंटी भांगडीया यांनी घेतली जिल्हाधीकारी यांची भेट

 दिले सकारत्मक कार्यवाही व अंमलबजावनीसाठी आदेश


चिमूर -
          मागील वर्षी अति पाऊसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. दरम्यान पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली होती. मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम जमा झाली नाही. उर्वरीत शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात खात्यात रक्कम जमा होईल असे सांगीतले गेले मात्र रक्कम जमा झाली नाही. असे चिमूर विधानसभा क्षेत्रातील नऊ हजार शेतकरी पिक विम्यापासून वंचित आहे.
          जिल्ह्यातील ओरिएंटल इंशुरन्स कंपनी व प्रशासन पिक विमा लाभार्थी शेतकऱ्यांना सहकार्य करित नसून पिक विमा संदर्भातील माहीती पुरविण्याची यंत्रणा ठप्प आहे. त्यामूळे चिमूर विधाक्षेत्रातील नऊ हजार शेतकरी पिक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची व्यथा व आपबीती आमदार बंटी भांगडीया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारला जिल्हाधीकारी विनय  गौडा यांची भेट घेत सांगीतली असता  जिल्हाधीकारी गौडा यांनी संबंधीत प्रशासन व विमा कंपनीसी संपर्क साधून पिक विम्याची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात येणार असून यावर्षीच्या अतिवृष्टीमूळे धान सोयाबीन कापूस या पिकांना अन्य रोगांने कीड लागली शेतपिकांचे नुकसान झाले आहे. झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी व पंचनामे पूर्ण झालेले असून संपूर्ण अहवाल पुढील कार्यवाहीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे विवीध प्रश्न व त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी पाच ऑगस्ट ला बैठक बोलावून संबंधीत सर्व प्रशासकीय अधिकारी व यंत्रणेला तातडीने सकारात्मक कार्यवाही तथा अंमलबजावणीसाठी आदेश देण्यात येईल अशी माहिती जिल्हाधीकारी यांनी दिली.
        यावेळी भाजप नेते प्रकाश देवतळे, भाजपा तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा किसान मोर्चा चिमूर विधानसभा संयोजक एकनाथ थुटे आदी उपस्थित होते.


PostImage

Sanket dhoke

Aug. 1, 2024   

PostImage

आज पूर्व वदर्भात जोरदार पावसाचा इशारा, तर चंद्रपुर, गडचिरोली शहराला …


Weather News :- राज्यात आज दि. १ ऑगस्ट पासून पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचे इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोकण, घाटमाथा आणि पूर्व वदर्भात जोरदार पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

 तसेच पूर्व vidarbha आणि कोकणात जोरदार पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात ढगाळ वातवरण आणि हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. 

 मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगर, हिस्सार, दिल्ली, हरदोई, देहरी, पुरूलिया, सागर बेट ते ईशान्य बंगालच्या उपसागरा पर्यंत आहे.

दक्षिण गुजरात पासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, महाराष्ट्राच्या मध्य भागात पूर्व-पश्‍चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र तयार झाले आहे. 

बुधवारी दि. ३१ सकाळ पर्यंतच्या २४ तासांमध्ये घाटमाथ्यावरील ताम्हिणी येथे उच्चांकी ३४० मिलिमीटर, शिरगाव येथे २२६ मिलिमीटर, तर दावडी येथे २०८ मिलिमीटर पाऊस झाला. 

कोकणासह, घाटमाथ्यावर काही ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

आज दि. १ कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्हे, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांचा घाटमाथा आणि विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जरी केला आहे.

 तर ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, यवतमाळ, वर्धा, Nagpur, भंडारा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देत ‘येलो अलर्ट’ जरी केला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या शक्यता आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, यवतमाळ, वर्धा, Nagpur, भंडारा.

अधिक वाचा :- Today Horoscope :- १ ऑगस्ट २०२४ ; स्वतःमध्ये उत्साह आणि उत्साहाचा अभाव वाटेल

अधिक वाचा :- Today Horoscope :- ३१ जुलै २०२४ ; कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे

अधिक वाचा :- Gadchandur News :- गडचांदूर येथे आढळला बॉम्ब, दोन आरोप ताब्यात, याप्रकारे आरोपीने बॉम्ब बनवला होता

अधिक वाचा :- Bhadrawati News :- पुरात वाहुन गेलेल्या तरुणांच मृतदेह आढळला

अधीक वाचा :- Entertainment News :- सलमान खान और अक्षय कुमार के मूवी के बारे बड़े न्यूज

अधिक वाचा :-  Chandrapur News :- स्वयंपाक झाला, जेवायला ताटं वाढली, बसणारच इतक्यात थेट बिट्या घरात….

अधिक वाचा :- Warora News :- वरोरा शहराला हादरे बसत आहे, काय आहे कारण ?

 

अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा.

 

   ⬇️

 

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा

 

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा

 

☎️ : ७७५८९८६७९८

जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.


PostImage

Vaingangavarta19

July 30, 2024   

PostImage

पुराच्या पाण्यात ट्रॉक्टरची झाली आंघोळ


पुराच्या पाण्यात ट्रॉक्टरची झाली आंघोळ 

अशोक वासुदेव खंडारे/मुख्य संपादक 
लगाम:-
रोवणी करीता चिखल करीत असलेल्या ट्रॉक्टरची पुराच्या पाण्यामुळे आंघोळ झाल्याची घटना काल दि.२९ जुलै ला मरपली येथे घडली 
सविस्तर असे की, सुखदेव अलोणे रा मरपली यांच्या शेतात रोवणीचे चिखलटीचे कामाकरीता ट्रॉक्टर लावण्यात आली होती चिखल करीत असताना अचानक ट्रॉक्टर शेतीमध्ये फसली तेव्हा शर्तीचे प्रयत्न करुनही ती निघाली नाही काही वेळातच नदीच्या पुराचे पाणी शेतात घुसले व ट्रॉक्टर पुर्णतः पाण्यात बुडाले सदर ट्रॉक्टर सुनील मोतीराम नैताम रा.मच्छीगट्टा ता.मुलचेरा यांच्या मालकीचे असल्याचे वृत आहे 
पुराचे पाणी कमी झाल्या नंतर ट्रॉक्टर ला बाहेर काढले जाईल असे प्रत्यक्षदर्शी ने कळविले आहे मात्र अजुनही ट्रॉक्टर शेतीमध्ये फसली आहे