ProfileImage
140

Post

1

Followers

1

Following

PostImage

युवाक्रांती समाचार

April 5, 2024

PostImage

ब्रेकिंग न्युज.!इसमाची तलावात उडी घेवून केली आत्महत्या.! ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना


ब्रम्हपुरी:-

 तालुक्यातील मुख्य महामार्गावर असलेल्या गांगलवाडी येथील  तलावात इसमाने उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक:-५/४/२०२४ ला अंदाजे सकाळी ५ ते ६ वाजताच्या दरम्यान घडली.
पुरुषोत्तम सूर्यवंशी वय वर्ष ५५ गांगलवाडी येथील रहिवाशी आहे.
सविस्तर वृत्तांत असे आहे की, मृतक पुरूषोत्तम चा केस कर्तनालयाचा व्यवसाय होता. सकाळी दररोज ८ ते ९ वाजता केस कर्तनालयाचे दुकान सुरू करायला जायचा माञ आज सकाळी ५ ते ६ वाजता घरून केस कर्तनालय दुकानाकडे गेला आणि केस कर्तनालय दुकानाचे शटर थोडे उघडून सायकलने तलावाकडे गेला.सायकल आणि  चप्पल तलावाजवळ ठेवून तलावात उडी घेतली. ही माहिती कुटुंबीयांना माहिती होताच घटनेची माहिती पोलिस विभागाला देण्यात आली. एका पाणबुड्याच्या साह्याने तलावातील पाण्यात पुरुषोत्तम चा शोध घेतला असता दूपारी १ वाजताच्या दरम्यान पुरुषोत्तमचा शोध लागला.तलावातील पाण्याच्या बाहेर पुरुषोत्तमचा मृतदेह बाहेर काढून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालय ब्रम्हपुरी येथेनेण्यात आले. मृतक पुरुषोत्तम च्या पच्छात्य पत्नी, मुले सुन नातवंडं असा आप्त परीवार आहे.

घटनेचा पुढील तपास संबधित पोलिस विभाग करीत आहेत.

 


PostImage

युवाक्रांती समाचार

March 13, 2024

PostImage

विधवा महिलांना कर्जमुक्ती केव्हा ?शासनाकडून विधवा महिलांची अवहेलना होत असल्याचा प्रा. येलेकर यांचा आरोप


रुमदेव सहारे सहसंपादक 

Covid-19 मुळे विधवा झालेल्या महिलांना थकीत कर्जातून मुक्तता देण्यासंदर्भात शासन स्तरावर निर्णय घेण्यासाठी सहकार आयुक्तांनी राज्यातील सर्व विभागीय निबंध व जिल्हा निबंधकांना 11 नोव्हेंबर 2022 व 16 जानेवारी 2023 च्या आदेशान्वये माहिती गोळा करून ती माहिती 20 जानेवारी 2023 पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले होते  या आदेशामुळे मृतकर्जदाराच्या विधवा महिलांच्या कर्जमुक्त होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.  परंतु आता एक वर्ष उलटून सुद्धा विधवा महिलांना कर्जमुक्तीचा दिलासा मिळाला नाही. त्यामुळे आता हे कर्ज कसे  फेडायचे ? असा मोठा प्रश्न त्या विधवा महिलांसमोर आहे.  राज्य सरकारने येणाऱ्या लोकसभा डोळ्यासमोर ठेवून मते मिळवण्यासाठी 11 व 12 मार्च या दोन दिवसात जवळपास 250  चे वर शासन निर्णय निर्गमित करून हजारो करोड रुपयाच्या सोयी सुविधा जनतेला दिल्यात. तर केंद्र सरकारने उद्योगपतींचे 16 लाख कोटींचे कर्ज माफ केले. परंतु मृतक कर्जदारांच्या विधवा महिलांच्या  कर्जमुक्ती कडे मात्र  मागील एक वर्षापासून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप गडचिरोली जिल्हा सहकारी पतसंस्था संघाचे मानद सचिव तथा सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष प्रा. शेषराव  येलेकर यांनी केला आहे. एकीकडे  महिलांच्या उन्नतीसाठी राज्यात महिला धोरण जाहीर करून आम्ही महिलांचे तारणहार असल्याचा गाजावाजा करायचा आणि दुसरीकडे मात्र त्याच राज्यातील विधवा महिलांना मागील एक वर्षापासून कर्जमुक्तीचे गाजर दाखऊन त्यांची  अव्हेलना करायची हा कुठला न्याय आहे ?  असा सवाल प्रा येलेकर यांनी केला आहे.

    कोविड 19 या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेकांवर आर्थिक अडचणी  ओढविल्या.ज्या कुटुंबातील कर्तापुरुष कोरोनात मृत्यू पावला त्या कुटुंबांना मोठी आर्थिक झड बसली आहे. त्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी कर्ता पुरुषाच्या विधवा पत्नीवर आली आहे. मयत कर्जदाराचे राहते घर इतर मालमत्ता तारण असल्यास अशावेळी त्याच्या कुटुंबावर बेघर होण्याची पाळी आली आहे, या संदर्भात जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून विचारणा केली असता शासनाने मागितलेली माहिती दिलेल्या वेळेत सहकार आयुक्त कार्यालय पुणे येथे पाठवण्यात आली, परंतु अजून पर्यंत कोणताही निर्णय शासन स्तरावर झाला नसल्याचे त्यांच्याकडून  सांगण्यात आले. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्न निकाली लागून मृतकर्जदाराच्या विधवा महिलांना थकीत  कर्जातून  मुक्तता मिळेल असे वाटत होते, परंतु त्या अभागी महिलांच्या पदरी मात्र निराशाच आली. पुढील लगतच्या काळात तरी विशेष बाब म्हणून सदर विधवा महिलांना कर्जमुक्ती मिळेल काय ? असा प्रश्न प्रा. शेषराव येलेकर यांनी  शासनाला केला आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

March 13, 2024

PostImage

EWS व खुला प्रवर्गाला गडचिरोली पोलीस भरतीत मा.तनुश्री ताई धर्मराव आत्राम व पोलीस बॉईज असोसिएशनच्या प्रयत्नाला यश   


रुमदेव सहारे सहसंपादक 

गडचिरोली :-
तब्बल 170 जागेची झाली वाढ पोलीस भरती युवकांसाठी आनंदाचे वातावरण    
    सध्या गडचिरोली जिल्हा पोलिस भरती मध्ये 742 शिपाई पदाच्या जागा निघाल्या  त्यात EWS आणि खुला प्रवर्गाला एकही जागा  गृहविभागाने दिला नव्हता त्या अनुषंगाने पोलीस बॉईज असोसिएशन गडचिरोली यांनी पोलीस भरती तयारी करणारे युवकांना घेऊन मा. तनुश्री धर्मराव बाबा आत्राम यांचेमार्फत मा. ना मंत्री धर्मरावा बाबा आत्राम यांना 4 मार्च रोजी भेट घेतली व निवेदन दिले तात्काळ बाबा यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली व पोलीस  शिपाई पदाच्या तब्बल 170 जागेची वाढ खालील प्रमाणे  केली ई डब्ल्यूएस 50, खुला 70, एसिबिसी 50 जागेची वाढ केली त्याकरिता पोलीस भरती तयारी करणारे युवकांकडून मा.तनुश्री धर्मराव बाबा आत्राम व पोलीस बॉईज असोसिएशन चे जिल्हा अध्यक्ष गिरीश कोरमी व जिल्हा उपाध्यक्ष  आकाश ढाली ,कार्यकारी अध्यक्ष रजत कुकुडकर , व प्रंतोष विश्वास ,रणजित रामटेके,निखिल बरसगडे ,अशुतोष चांगलानी  यांच्यावर शुभेच्छांच्या वर्षाव होत आहे .


PostImage

युवाक्रांती समाचार

March 10, 2024

PostImage

ब्रेकींग न्युज.!ठकाबाई तलाव जवळ कच्चेपार रोड मार्गावर  ट्रेक्टर पलटी झाल्याने  भीषण अपघातात 1 ठार तर 3  जखमी


(प्रशांत गेडाम) सिंदेवाही प्रतिनिधि 

सिंदेवाही -सिंदेवाही शहरालगत ठकाबाई तलाव जवळ कच्चेपार रोड मार्गावर लाकड़ाने भरलेला ट्रेक्टर पलटी झाल्याने 1 जागिच ठार तर 3 गंभीर जख्मी झाल्याची घटना आज दि. 10/3/2024 रोज रविवार ला दुपारी 12-30 वाजता दरम्यान  घडली आहे.
सविस्तर वृत असे की आज दि. 10।3।2024 रोज रविवार ला दुपारचा सुमारास कच्चेपार सिंदेवाही रोडवर लाकुड़ घेऊन येणाऱ्या ट्रेक्टर चे समोर चे दोन्ही चाक अचानक फुटल्याने चालकाचे ट्रेक्टर वाहना वरुन नियंत्रण सुटले व ट्रेक्टर एका झाडाला जाऊन धडकले ही धडक ईतकी जोरदार होती कि, भीषण अपघात घडला
यात उमेश अशोक आदे वय 32 राहणार महात्मा फुले चौक सिंदेवाही हा जागिच ठार झाला असुन गंभीर जखमी मध्ये ट्रेक्टर चालक मुन्ना देवराव गावतुरे  हमाल अनिल सदाशिव मोहुर्ले व सुखदेव विट्ठल गावतुरे हे सर्व राहणार सिंदेवाही हे तिघेही गंभीर जख्मी झाले याची माहिती पुलिस स्टेशन सिंदेवाही ला मिळताच तात्काळ  पोलीस ठाणेदार चव्हाण आपल्या पथकासह घटना स्थळी जाऊन ट्रेक्टर अपघातल्या ट्रेक्टर मध्ये फसलेल्या  जेसीबी च्या सहाय्याने मृतक व जख्मीना बाहेर काढले. व लगेच एम्बुलेंस चा सहाय्याने शहरातील ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे दाखल केले. सदर घठणेचा  पुढील तपास पोलिस ठाणेदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

March 3, 2024

PostImage

कारंजा शहर पोलीसांच्या तिक्ष्ण नजरेने हरिश्चंद्र मेश्राम यांच्या हत्येच्या आरोपीच्या पाच तासातच मुसक्या आवळल्या.


कारंजा : शुक्रवार दि. 01 मार्च रोजी,नागरीकांची वर्दळ असणाऱ्या तहसिल परिसरात दस्तऐवज लेखक हरिश्चंद्र विश्राम मेश्राम यांची धारदार शस्त्राने हत्या करून हत्याऱ्याने पळ काढला होता. या संदर्भात दिनकर विश्राम मेश्राम राहणार ग्राम मेहा यांनी दिलेल्या फिर्यादी वरून शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून कारंजा शहरचे कर्तव्यतत्पर पोलीस निरिक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांनी समयसुचकता दाखवीत ताबडतोब तपासाची चक्रे फिरवून चौकशी केली असता सदर गुन्ह्यामध्ये हत्या झालेली मृतक व्यक्ती हरिश्चंद्र मेश्राम हे ग्राम मेहा ता.कारंजाचे रहिवाशी असून त्यांचे घराशेजारील प्रेमदास उद्वव भगत यांचेशी सरकारी अतिक्रमित जागेवर हातपंप काढल्यामुळे वादविवाद होऊन त्याची तक्रार मृतक व्यक्तीने मेहा ग्रामपंचायतला दिली होती. त्यामुळे प्रेमदास उद्धव भगत यानी दि 04 डिसेंबर 2023 रोजी मृतक हरिश्चंद्र मेश्राम यांचेशी भानगड करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार मृतक व्यक्तीने  धनज पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली होती. पुढे या तक्रारीच्या रागामधूनच शुक्रवारी, संगनमताने मिथुन विठ्ठल शिरसाट या आरोपीने मृतक हरिश्चंद्र मेश्राम यांचे मानेवर व गळ्यावर प्राणघातक शस्त्राने हल्ला करीत त्यांना जीवानिशी ठार मारले. या घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे ,अप्पर पोलीस अधिक्षक भारत तागडे,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाडवी यांच्या मार्गदर्शनात व सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला  यांनी करून, वेगवेगळी पोलीस पथके चोहीकडे पाठवून सदर गुन्हाच्या आरोपीला केवळ पाच तासात अटक करून त्याच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवीले.त्याबद्दल कारंजा शहर पोलीसाच्या हजरजवाबी कर्तव्यतत्परता पूर्ण यशस्वी कामगीरीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अधिक तपास सुरु असल्याचे कळविण्यात आले असल्याचे वृत्त आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळविले आहे .


PostImage

युवाक्रांती समाचार

March 1, 2024

PostImage

दिवसाढवळ्या चाकू हल्ल्यात तहसिल आवारात दस्तलेखकाची निघृण हत्या.


संजय कडोळे वाशिम जिल्हा विशेष प्रती.

सदर हत्येने करून दिली 30 वर्षापूर्वीच्या कारंजा बसस्थानकावरील सरपंच स्व. खटेश्वर करडेच्या हत्येची आठवण."

कारंजा : आज शुक्रवार दि . 01 मार्च 2024 रोजी, कारंजा तहसील कार्यालय परिसरात कार्यालयीन कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर दस्तऐवज लेखक (अर्जनविस) सुद्धा परिसरात आपले टेबल मांडून बसले असतांना अचानक दुपारी दोन वाजताच्या दरम्यान  हरिश्चंद्र विलास मेश्राम वय 38 वर्ष यांचे मानेवर कुण्यातरी अज्ञात मारेकऱ्यानी प्राणघातक शस्त्राने हल्ला चढवून हरिश्चंद्र मेश्राम या दस्तऐवज लेखकाची हत्या केली. व मारेकरी फरार होण्यात यशस्वी झाला. सदर मृतक कारंजा तालुक्यातील मेहा येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. प्राप्त माहितीनुसार दुपारी मृतक दस्तलेखक आपले काम करीत असताना अचानक पणे एका अज्ञात इसमाने येऊन त्याच्या मानेवर चाकूने वार केले त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच त्याला कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तपासणी दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक दिनेशचंद्र शुक्ला व पोलीस पथकानी देखील घटनास्थळी धाव घेतली व पुढील तपास सुरु आहे . घटनेची माहिती घेतली दरम्यान वृत्त लिहेस्तोवर या संदर्भात पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली नव्हती .चाकू हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाला. सदर घटना तहसिल कार्यालया समोरच्या वर्दळीच्या परिसरातील असूनही आरोपी पळून गेल्याने, तीस वर्षापूर्वी कारंजा बसस्थानकासमोर वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून येत आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 26, 2024

PostImage

संत निरंकारी मिशन तर्फे बारई तलावाची स्वच्छता


ब्रह्मपुरी:- संत निरंकारी मिशन अंतर्गत दर वर्षी २३ फेब्रुवारी गुरू पूजा दिवस संपूर्ण विश्वात आयोजित केल्या जाते त्या अंतर्गत विविध उपक्रम राबविला जातात या वर्षी सुद्धा  प्रोजेक्ट अमृत अंतर्गत  स्वच्छ जल स्वच्छ मन या मिशन अंतर्गत विविध जलस्रोतांची स्वच्छता राबविण्यात आली यात संत निरंकारी मिशन ब्रम्हपुरी तर्फे स्थानिक बारई तलावाची साफ सफाई मिशन च्या सेवादल - अनुयायी यांच्या तर्फ करण्यात आली यात नगरपरिषद ब्रम्हपुरी यांचे सुद्धा योगदान लाभले. सर्व प्रथम सकाळी 8 वाजता सेवादल प्रार्थना करून सद्गुरू माता सविंदर हरदेवसीहजी महाराज यांना नमस्कार करून स्वच्छता अभियानाला सुरू झाली व 12 वाजता स्वच्छता अभियानाची सांगता लंगर करून समाप्त करण्यात आली. या प्रसंगी ब्रम्हपुरी ब्रांच प्रमुख सुयोग बाळबुधे, डॉ.सतीश कावळे,सेवादल इंचार्ज नितीन रासेकर, तसेच बेटाळा,रानबोथाली,वाढोना,मालडोंगरी, नागभीड,बोरगाव,उदापुर,आदी गावातील निरंकारी मिशनचे शेकडो अनुयायी उपस्थित होते.


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 26, 2024

PostImage

दरबारातील सत्कार माझा नसून  माझ्या कार्याचा सत्कार आहे :- प्रकाश सावकर पोरेड्डीवार सहकार महर्षी  


ब्रम्हपुरी/ प्रतिनिधी-  माणसाने नेहमी चांगले कार्य करीत राहिले पाहिजेत. आपल्या चांगल्या कार्याची पावती समाज आपोआप देत असतो. आज पर्यंत माझ्या हातून सत्कार्य करीत आहे व पुढे पण करीत राहीन.त्यामुळे आज माझ्या कार्याची पावती म्हणुन दरबारने दिली आहे.अल्हाज हजरत सैय्यद मोहम्मद ईकबलशाहा बाबा उर्फ बाबाजान कादरी चिस्ती चिंचोलीच्या उर्स मुबारक कार्यक्रमात जो सत्कार करण्यात आला तो सत्कार माझा नसून माझ्या कार्याचा सत्कार आहे असे प्रतिपादन प्रकाश सावकार पोरेड्डीवार सहकार महर्षि तथा अध्यक्ष गड.डिस्ट्रिक्ट सेंट्रल को. आफ बैंक गडचिरोली यानी केले.                                                                         अल्हाज हज़रत सैय्यद मोहम्मद इकबालशाह बाबा उर्फ बाबाजान कादरी चिस्ती चिंचोली (बु) ता.ब्रम्हपुरी आयोजित " उर्स मुबारक " व शानदार कव्वाली कार्यक्रमाच्या  प्रसंगी विशेष अतिथि म्हणून अम्मासाहेबा, शफिबाबा ,शरीफबाबा,मनोहरजी पाटिल पोरेटी मा.उपाध्यक्ष जी.प.गडचीरोली ,कृष्णाभाऊ गजभे आमदार आरमोरी,प्रकाश सावकार पोरेडीवार सहकार महर्षि तथा अध्यक्ष गड.डिस्ट्रिक्ट सेंट्रल को. आफ बैंक गडचिरोली, मा.मनोहरजी चंद्रिकापुरे आमदार  अर्जुनी-मोरगांव, तुषार सोम भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य, राजेश जयस्वाल, नानाभाऊ नाकाडे वडसा, मोतीलाल कुकरेजा उपाध्यक्ष भाजपा गड़चिरोली मा.घनश्याम कावळे नागपुर,मा.रामदासजी मसराम काँगेस नेता वडसा, अरविंद जयस्वाल, प्रल्हादजी धोटे वडसा,नामदेवजी कुथे जेष्ट नागरिक चिंचोली,मा.रोशन दीवटे.  चिचोली,परसरामजी टीकले माजी स.पं.स.वडसा व अन्य मान्यवरानी बाबाजान संदर्भात अनेक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.                                                                                            अल्हाज हजरत सैय्यद मोहमद ईकबलशाहा बाबा उर्फ बाबाजान चिशती चिंचोली येथे अम्मासाहेबा, शफीबाबा, शरीफबाबा यांच्या मार्गर्शनाखाली दरवर्षी उर्स् मुबारक व दरबारी सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विजेंद्रजी बत्रा तर आभार प्रदर्शन वसंतराव गोगल सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अल्हाद हजरत सैय्यद ईकबलशाहा बाबा उर्फ बाबाजान  दरबारी सेवक, सार्वजनिक मंडळ चिंचोली बु., पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार व पोलिस कर्मचारी, गावातील पुरुष, महीला, युवक मंडळ तसेच भक्तगण यांनी मोलाचे सहकार्य केले....


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 23, 2024

PostImage

लोकशाही संवर्धन आणि सामाजिक साधनेची लोकस्वातंत्र्यची अभिनंदनिय वाटचाल !- प्रा.अंजलीताई आंबेडकर


विचारमंथनात अंजलीताईंचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघात प्रवेश!

हार्ट अटॕकच्या शक्यतांवर प्रतिबंध करणाऱ्या ईमरजन्सी किटचे वाटप

शहीद जवान,मराठा आरक्षण व अपघात बळींना श्रध्दांजली

 अकोला:--- देशातील लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जतन आणि समृध्द लोकशाहीतून संविधानाचे संवर्धन करीत पत्रकार व समाजाच्या हक्कांसाठी संघर्षरत राहणाऱ्या  लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची सर्वसमावेशक सामाजिक वाटचाल कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे,असे गौरवपूर्ण प्रतिपादन अग्रेसर सामाजिक नेत्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रबुध्द भारतच्या संपादिका प्रा.सौ.अंजलीताई आंबेडकर यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या नियमित मासिक विचारमंथन तथा सन्मान समारंभात त्या बोलत होत्या.त्यांनी लोकस्वातंत्र्यचे सभासदत्व स्विकारून या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेत प्रवेश केला.त्यासाठी विचारमंथन मेळाव्यात त्यांना कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विराजमान करून केन्द्रीय कार्यकारिणी कडून त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी त्यांना महासंघाच्या विशेष मार्गदर्शिका तथा राज्य संघटन प्रमुख  म्हणून नियुक्तीपत्रासह,खास सन्मानपत्र,शाल,ग्रामगीता आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी उपस्थित सभासदांना हार्ट अटॕकच्या लक्षणांवर प्रतिबंध करणाऱ्या ईमरजन्सी किटचे वाटप लोकस्वातंत्र्यच्या वतीने करण्यात आले.

       सर्वप्रथम संघटनेच्या सामाजिक साधनेचे अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांना नेहमीप्रमाणे हारार्पण करून वंदन करण्यात आले.अतिथींचे सत्कार व उपस्थितांची स्वागतं करण्यात आली.शहिद जवान,मराठा आरक्षण प्रश्नाततील बळी आणि अपघात व आपत्तींमधील बळींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

              याप्रसंगी बोलतांना अंजलीताईंनी या पत्रकार महासंघाच्या "लोकस्वातंत्र्य" या  नावातूनच सर्वसमावेशक आणि समतावादी लोकशाहीची वाटचाल लक्षात येते.पत्रकार कल्याणासोबतच सामाजिक उपक्रमातून कृतिशील पत्रकारिता आणि त्यासाठी सामाजिक क्षेत्रातील ईतर नामवंतांनाही सोबत घेऊन चालण्याची अभिनव संकल्पना ही वैचारीक परिवर्तनातून सामाजिक विकासाची खरी वाटचाल आहे,असे विचार व्यक्त करून उपक्रम,शिस्तबध्द नियोजन आणि महाराष्ट्र आणि बाहेर सुरू केलेल्या करणाऱ्या संघटन कार्याचे कौतुक करून शुभेच्छा व्यक्त केल्या.
      
         लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या संघटन कार्याच्या व्दितीय अभियानातील ४ था मासिक विचारमंथन मेळावा स्थानिक जैन रेस्ट्रो मध्ये संपन्न झाला.याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिका आणि रजधुळ मासिकाच्या संपादिका देवकाताई देशमुख,आयएमए पदाधिकारी,अस्थिरोग तज्ञ, ओम हॉस्पिटलचे डॉ.रणजित देशमुख हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.तर लोकस्वातंत्र्यचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,प्रा.डॉ.संतोषजी हूशे,उपाध्यक्ष प्रदिप खाडे,सचिव राजेन्द्र देशमुख अरविंद देशमुख(नागपूर) यांची प्रमुख उपस्थिती होती. संजय देशमुख यांनी प्रास्ताविकातून संघटनेच्या वाटचालीची माहिती दिली‌.तर प्रा.संतोषजी हूशे यांनी सुध्दा मनोगतातून संघटनेच्या ३ वर्षाच्या व्याप्तीमधील अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या योगदानाची माहिती दिली.याप्रसंगी देवकाताई तथा डॉ.रणजित देशमुख आणि उपस्थितांनी संघटनेच्या गतिमान कार्याबद्दल आनंद व्यक्त करून शुभेच्छा दिल्यात.

             प्रा.मनोज देशमुख व सौ.दिपाली बाहेकर यांच्या बहारदार संचलनाखाली झालेल्या  या कार्यक्रमाला प्रा‌‌.राजाभाऊ देशमुख,रावसाहेब देशमुख,गजानन जिरापूरे,संदिप देशमुख, (अमरावती) नंदकिशोर चौबे, अकोला जिल्हाध्यक्ष मोहन शेळके, सागर लोडम(ग्रामीण), देवेन्द्र बन्सोड,देवेन्द्र मेश्राम (जि.प्रसिध्दी प्रमुख,पालघर) सुरेश डाहाके,मनोहर मोहोड,दिपक देशपांडे,पंजाबराव वर,संतोष धरमकर,अॕड.राजेश कराळे,सतिश देशमुख,(निंबेकर),विजय बाहकर, मनोहरराव हरणे,शामराव देशमुख,राजाभाऊ देशमुख(रामतिरथकर) रामराव देशमुख,सौ.सोनल अग्रवाल,सौ.सुलभा देशमुख,सौ.राजश्री देशमुख,(खामगाव) वसंतराव देशमुख (नारखेडकर),.प्रा‌.आर.जी.देशमुख (माजी संपादक पिकेव्ही) कैलास टकोरे,अशोक भाकरे,शशिकांत हांडे, प्रा.विजय काटे, डॉ.विजयकुमार बढे,सुरेश भारती, सुरेश पाचकवडे,अशोककुमार पंड्या,के‌‌.एम. डॉ.अशोक तायडे,कृष्णा देशमुख,सुनिल देशमुख (निंबेकर), गौरव देशमुख,प्रा.सुरेश कुलकर्णी,सुरेश पाचकवडे,देवीदास घोरळ,शिवचरण डोंगरे, ओरा चक्रे,वासुदेव चक्रनारायण,आत्माराम तेलगोटे,ज्ञानदेव खंडारे,रामराव खंडारे,व ईतर बहूसंख्य पत्रकार व समाजसेवी उपस्थित होते.  आभारप्रदर्शन विजयराव बाहकर यांनी केले.


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 22, 2024

PostImage

मेंडकी एसबिआय बँके कडुण दोन लाखाचा विमा परतावा


मेंडकी:-

भारतीय स्टेट बँकेच्या वतीने ग्राहकांच्या संरक्षणा , सुरक्षितते करीता पैश्या च्या देवाण- घेवाना सोबतच विविध विमा योजणा मधुन बँक खातेदारांचें विमा काढण्यात येते . त्यामध्ये मेंडकी एसबीआय शाखे तर्फे पंतप्रधाण जीवण ज्योती , विमा संरक्षण योजणा, अमृत कलश योजणा , पंतप्रधान विमा , अटल पेंशन योजणा अश्या विविध विमा योजणाचीं अंमलबजावणी केली जाते. यामध्ये ग्राहक आपल्या आर्थीक व्यवहार करताना वित्तिय वर्षात वेगवेगळया वयोगटा नुसार वर्षातुण एकवेळा एकल किश्त भरूण स्वतःचा विमा काढतात . याप्रमाणेच मेंडकी भारतीय स्टेट बँके कडुण प्रधाणमंत्री जीवण ज्योती विमा योजणे अंतर्गत मृतक महिला पोर्निमा पांडुरंग लिंगायत वय ४३ राहणार रानबोथली यांनी सन २२-२३ ह्या आर्थिक वर्षात ३३०/- रुपये वार्षीक भरुण स्वतःचा विमा काढला . मागील काही महिन्या पुर्वी प्रदिर्घ आजाराने पोर्निमा लिंगायत यांचा मृत्यु झाला. वारसदार त्यांचे पती पांडुरंग लिंगायत शेतमजुर व सुतारकाम करतात . नुकतेच मेंडकी स्टेट बँकेचे व्यवस्थापक ईशान दयालवार यांचे हस्ते दोन लाखाचा धनादेश देण्यात आले . यावेळी शाखा व्यवस्थापक यांनी मेंडकी एसबीआय च्या समस्त ग्राहकाणां शाखे मार्फत आर्थीक व्यवहारा सोबतच विमा काढण्याचे आवाहण केले.


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 21, 2024

PostImage

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी


ब्रम्हपुरी/प्रतिनीधी:-  स्थानिक डाॅ.पंजाबराव देशमुख कन्या कनिष्ठ महाविद्यालय तथा डॉ.पंजाबराव देशमुख कॉन्व्हेंन्ट ब्रम्हपुरी यांच्या संयुक्त विद्यमानाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,जाणता राजा, रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती साजरी करून त्यांना व त्यांच्या कार्यांना अभिवादन करण्यात आले.                                                     याप्रसंगी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रकाशजी बगमारे, संस्थेच्या उपाध्यक्षा तथा कान्व्हेंन्टच्या प्राचार्या सौ मनीषाताई बगमारे, महाविद्यालयाच्या प्राचार्या शारदाताई ठाकरे, उपप्राचार्य श्री.सौरभजी खांदे सर प्रामुख्याने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.उपस्थित पाहुण्यांनी शिवचरित्राचा व्यापक इतिहास हा विद्यार्थ्यांना व उपस्थितांसमोर आपल्या भाषणाद्वारे सांगितला.सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती गुरनुले  तर आभार प्रतिक्षा निहाटे  यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता प्रा.खोब्रागडे , प्रा.एच के.बगमारे , गोवर्धन दोनाडकर,निलीमा गुज्जेवार,निशा मेश्राम, अश्विता सयाम, वैशाली सोनकुसरे, प्रियंका करंबे,प्रतिक्षा निहाटे,ज्योती गुरनुले,संजय नागोसे तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 21, 2024

PostImage

चिंचोली (बु.) येथे उर्स मुबारक व शानदार दुय्यम कव्वालीचा कार्यक्रम.  


ब्रम्हपुरी /प्रतिनिधी - अल्हाज हजरत सैय्यद मोहम्मद ईकबालशाह बाबा उर्फ बाबाजान कादरी चिशती चिंचोली(बू) ता. ब्रम्हपुरी येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी दि.23 फेब्रुवारी 2024रोज शुक्रवारला रात्रौ 8 वाजता अम्मासाहेब , शफीबाबा, शरीफबाबा यांच्या मार्गद्शनाखाली ऊर्स मुबारक व मान्यवरांचे जाहीर सत्कार तसेच शानदार दुय्यम कव्वालीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.      

                          सदर कार्यक्रमास महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा श्रेत्राचे  आमदार विजयभाऊ  वडेट्टीवार ,खासदार अशोक नेते , आमदार बंटीभाऊ भांगडीया, आमदार किष्णा गजभे , आमदार किशोर जोरगेरवार,आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी नगराध्यक्ष इतेश्याम अली वरोरा, तुषारभाऊ सोम भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य, सतिश वाजूरकर उपाध्यक्ष ओबीसी महासंघ प्रदेश, माजी आमदार अतुलभाऊ देशकर, किसनजी नागदेवे जिल्हाध्यक्ष भाजपा गडचिरोली, विनोद संकत, शंकरलाल अग्रवाल चंद्रपूर, भास्कर डांगे, राकेश जयस्वाल, नानाभाऊ नाकाडे, डा. नामदेव किरसान, महेद्र ब्राम्हणवाडे,उषाताई चौधरी  तहसीलदार ब्रम्हपुरी, दिनकर ठोसरे उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपरी, ठाणेदार अनिल जिट्टवार,स्मिताताई पारधी व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.                          

  अल्हाज हजरत सैय्यद मोहमद ईकबलशाह बाबा उर्फ बाबाजान कादरी व सार्वजनिक मंडळ चिंचोली( बू ) यांच्या वतीने. दरबारी सत्कार सत्कारमूर्ती प्रकाशभाऊ सावकार पोरेद्दीवार अध्यक्ष गडचिरोली ग्रामीण बँक,मोतीलाल कुकरेजा उपाध्यक्ष भाजपा गडचिरोली,घनश्याम जीवनजी कावळे नागपूर , प्रल्हाद धोटे वडसा, नामदेव कुथे जेष्ठ नागरिक चिंचोली(बु) तसेच पाल्य पुरस्कार कु. कूनिका लालाजी पारधी ब्रम्हपुरी, कू. यामिनी किशोर मेश्राम आरमोरी, आलाप तुषार सोम चंद्रपूर, रोशन देविदास दिवटे चिंचोली (बू) यांचा दरबारच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. रात्रौ दहा वाजताच्या दरम्यान असलम मुकरम साबरी सहारनपूर (युपी )व राजा सर्फराज साबारी रायपूर (युपी )यांची दुय्यम कव्वालीचा शानदार कार्यकम होणार आहे. आलेल्या भाविक भक्तांना स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तरी समस्त जनतेनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अल्हाद हजरत सैय्यद ईकबलशाह बाबा उर्फ बाबाजान कादरी च्या वतीने करण्यात आले आहे..


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 18, 2024

PostImage

जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज सेवा समितीतर्फ रक्तदान


ब्रम्हपुरी/ तालुका प्रतिनिधी:- जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज व.प. पु. कानिफनाथ महाराज सेवा समितीतर्फे १७ फेब्रुवारी २०२४ पिपळगाव (भोसले) ता. ब्रम्हपुरी येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाध मिळाला सदर शिबिरात १०७ रक्तदात्यांनी रक्तदान केले सदर शिबीरात् जिवन ज्योती ब्लड बँक नागपुर रक्तपेढी रक्तसंकलन करण्याक्रीता उपलब्ध होती सर्व रक्तदात्यांचे खुप खुप अभिनंदन व आभार तालुक्याचे तालुकाध्यक्ष व त्यांची तालुका कमेटी, सेवा केंद्र कमेटी, आरती कमेटी व सर्व जिल्यांच्या कमेटीने व कार्यकर्त्यांनी परिश्रम करून शिबिर यशस्वी केले त्याबद्दल सर्वांचे खुप खुप अभिनंदन अशिच सेवा आपल्या हातून निरंतर घडत राहो अशी स्वामी चरणी प्रार्थना..


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 17, 2024

PostImage

विदर्भकन्याअपूर्वा देशमुख हिची अभिनय कलेतील अपूर्व वाटचाल!


अकोला:-अभिनय क्षेत्रात आपल्या कलासाधनेतील कौशल्याने प्रगतीचं उल्लेखनीय स्थान कायम करण्यासाठी अविरत मेहनत करणारी  अपूर्वा कला क्षेत्रात अपूर्व वाटचाल करीत आहे.ही उदयोन्मुख कलाकार सिरियलच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात* आपल्या क्षमता सिध्द करीत पुढे आलेली आहे. ती नागपूरातील अपूर्वा मिनरल्स या कंपनीचे संचालक व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे विदर्भ विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख श्री अरविंदराव देशमुख,भामोदकर  यांची कन्या आहे.

    तिने नागपूर येथून आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अॕन्ड रिसर्च सेंटर मधून एमबीए पूर्ण केले.प्रथमपासून अभिनयाची असलेली आवड जोपासत नंतर किशोर नमिता कपूर अॕक्टींग इन्स्टिट्यूटमधून दोन वर्षांचा अभिनय प्रशिक्षण कोर्स पूर्ण केला.आपल्या आवडीच्या क्षेत्रातच प्रगती करून  स्थिरावण्याचे ध्येय घेऊन अॕक्टींग प्रशिक्षणाचे धडे घेत ती सध्या मुंबईमध्ये अनेक सिरियलमध्ये सक्रिय आहे.जाहिरात शुटींगमध्ये ती दुबईला पण होती.यापूर्वी *"जय जय स्वामी समर्थ",*"परशुराम" " अहिल्याबाई नंतर सध्या स्टार प्लसच्या *"आंख मिचौली"* सिरिजच्या शुटींमध्ये ती सक्रिय आहे! स्वतःच्या अभिरूचीला न्याय देत सर्व क्षमतांनी प्रयत्नातील सातत्य,मेहनतपूर्ण सरावाने विविध भूमिकांमधून अभिनय क्षेत्रात आपले आगळे वेगळे स्थान निर्माण करण्याचा तिचा मनोदय आहे.या यशाकडे जाणाऱ्या प्रवासासाठी तिला समाजातून अनेकांनी स्नेहपूर्ण शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.


    तिच्या अभिनय क्षेत्राच्या वाटचालीचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या महाराष्ट्र राज्य संघटन व संपर्क प्रमुख,महाराष्ट्र २४ तास च्या संपादिका अमिता कदम यांनी तिची मुलाखत घेऊन तिच्या धडाडीच्या संघर्षशील प्रवासाचा प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 16, 2024

PostImage

26 वा वर्धापन दिन  मोठ्या उत्साहात साजरा.!विद्यार्थ्यांच्या कलगुणांचा सत्कार कार्यक्रम


ब्रह्मपुरी -

ब्रम्हपुरी येथे युवापरिवर्तन संस्था ही मागील अनेक वर्षांपासून आसपासच्या तालुक्यातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून टेलरिंग, ब्युटीशियन, कॉम्पुटरचे बेसिक व ऍडव्हान्स कोर्सेस, बेसिक नर्सिंग कोर्स आणि असे विविध कौशल्य विकास प्रशिक्षण अगदी माफक दरात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून, त्यांना योग्य रित्या प्रशिक्षण देऊन बेरोजगार युवक - युवतींना रोजगार देण्याचे उत्तम कार्य युवा परिवर्तन संस्था करीत आहे.

दि.15 फेब्रुवारी 2024 रोजी गुरुवारला युवा परिवर्तन संस्थेचा 26 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मोहन वाडेकर सर होते., तर मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.क्रिष्णा राऊत सर, प्रमुख अथिती म्हणून डॉ.अंजली वाडेकर मॅडम, डॉ.उदयकुमार पगाडे सर (युवा समाजसेवक), प्रा.लालाजी मैंद सर., प्रा.श्रीकांत कळसकर सर., सचिन दिघोरे सर (व्यवस्थापक - युवा परिवर्तन ब्रम्हपुरी) यांच्या उपस्थितीत पार पडला. 

ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सावन सहारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ.कुंदा निकुरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता वर्षा भानारकार, रमाकांत बगमारे, पियुष यांनी व आदी लोकांनी उत्तमरित्या सहकार्य केले..


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 13, 2024

PostImage

शुल्लक वादातून पतीने केली पत्नीची हत्या.! ब्रम्हपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथील घटना


ब्रम्हपुरी (ता.प्र.):-

     तालुक्यापासून अवघ्या 2 किमी. अंतरावर असलेल्या मालडोंगरी येथे पतीनेच पत्नीची हत्या केल्याची घटना दि.12 फेब्रुवारी ला सकाळी उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार सदर घटनेतील आरोपी जयदेव पिल्लेवान (60)रा.मालडोंगरी व मृतक पत्नी यांच्यात मागील 2-3 दिवसापासून रोज भांडण होत होते दरम्यान दि.11 फेब्रुवारी ला रात्री 11.00 वा दरम्यान फिर्यादी मजलग जॉकीस जयदेव पिल्लेवान (30)याला आरोपी व मृतक भांडण करताना दिसले.हे भांडण नेहमीचेच  समजून फिर्यादीने लक्ष्य दिले नाही.मात्र  सकाळी 7.00 वा जॅकीस ला त्याची आई हिरकण्या जयदेव पिल्लेवान (50)  ही मृतावस्थेत पडलेली दिसली. त्यामुळे आरोपीने त्याला शिवीगाळ केल्याचे कारणावरून त्याचे पत्नीला हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याने डोक्याला व चेहऱ्याला मार लागल्याने ती मरण पावली अशी माहिती पोलीस ठाण्यात दिली.
        फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी  जयदेव पिल्लेवान वय (60)याचेवर  अ.क्र. 71/24 कलम 302 भादवी नुस गुन्हा दाखल करून. आरोपीला अटक करण्यात अली.घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात ब्रम्हपुरी पोलीस करत आहेत.


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 11, 2024

PostImage

शाळेच्या टेरेसवर आढळले नवजात मृत अर्भक, अभ्रकाचे चार तुकडे, निर्दयपणाचा कळस


अकोला (प्रतिनिधी- प्रज्ञानंद थोरात) अकोला येथील रतनलाल प्लॉट चौकातील जिल्हा परिषद उर्दू शाळेजवळ एक नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आला आहे. जिल्हा परिषद उर्दू शाळा ही जिल्हा महिला रुग्णालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. नवजात अर्भकाच्या मृतदेहाचे चार तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. 

 घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. शाळेच्या छतावर हा अर्भक कुठून आला? याचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे. खळबळजनक घटनेनं अकोल्यासह संपूर्ण जिल्हा हादरला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "जिल्हा परिषद शाळेल्या आवारात एक अर्भक आढळून आलं आहे आणि त्याच्या बाजूला मांसाचे तीन भाग आढळून आले आहेत. मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील खुलासा होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.  शाळेच्या मैदानाजवळ काही मुलं क्रिकेट खेळत होती. खेळता खेळता त्यांचा बॉल शाळेच्या छतावर गेला. काही मुलं बॉल आणण्यासाठी तिथे गेली. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला. मुलं घाबरुन गेली आणि त्यांनी तिथे जवळच राहणाऱ्या काही लोकांशी संपर्क साधला. लोकांनी या धक्कादायक प्रकाराबाबत पोलिसांना तात्काळ माहिती दिली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महत्त्वाची बाब म्हणजे, जिल्हा स्त्री रुग्णालय जिल्हा परिषदेच्या शाळेपासून जवळच आहे. तसेच, सापडलेलं अर्भक स्त्री अर्भक आहे की, पुरूष अर्भक आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. असे वृत्त आमचे प्रतिनिधी प्रज्ञानंद थोरात यांनी वाशिम जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांचेकडे कळवीले आहे .


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 11, 2024

PostImage

हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांच्या अंदाजाप्रमाणे वर्धा,अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात झाला अवकाळी पाऊस


संजय कडोळे जिल्हा विशेष प्रती.

वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : आमचे वर्धा,अमरावती, यवतमाळ प्रतिनिधी यांनी दिलेल्या वृत्तानुसार,वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात असणाऱ्या ग्राम रुईगोस्ता  येथील हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांच्या अचूक अंदाजानुसार, शनिवार दि. 10 फेब्रुवारी 2024 रोजी, वर्धा,अमरावती, यवतमाळ जिल्हयात कोठे रिमझिम तर कोठे दमदार अवकाळी पाऊस सर्वदूर झाल्याचे वृत्त मिळाले असून, दुपारी झालेल्या पावसाने नागरिकाची दाणादाण झाली आहे. या पावसाने अमरावती जिल्हयातील धामणगाव रेल्वे,चांदूर भागात वर्धा जिल्हयातील हिंगणघाट, वडनेर येथे ,देवळी तालुक्यातील इसापूर, भिडी, सैदापूर , काजळसरा, दुर्गुडा, आकोली, तांबा, विजयगोपाल, दापोरी, अडेगाव, गौळ, इंझाळा भागात बोरासारखी गारपिट झाली आहे.यवतमाळ जिल्हयातूनही गारपिटीचे वृत्त मिळाले असून भाजीपाला पिकासह,गहू-हरभरा या रब्बी पिकाचे नुकसान झाले आहे. विदर्भातील शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच यावर्षीचा हंगाम शेतकऱ्याच्या हातून गेल्यात जमा होता.त्यात सोयाबीन,कपाशीला भाव नाही. तरीही संकटाना मात देत असलेल्या भुमिपूत्राच्या रब्बीच्या हंगामला अवकाळीचा फटका बसल्यामुळे शेतकरी राजा संकटात सापडून काळजीग्रस्त झाला आहे.हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांच्या अंदाजाप्रमाणे आजपासून पाच दिवस पावसाचे असून,भाग बदलून हा अवकाळी पाऊस दि. 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत होण्याची शक्यता आहे. तसेच या काळात थंडगार वारे,वादळ, विजाचा वर्षाव आणि गारपिट होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी ग्रामस्थांनी दुपारी शेतात जाणे, झाडाखाली उभे रहाणे टाळावे,शेळ्यामेंढ्या,गुरेढोरे झाडाखाली न बांधण्याचा सल्ला त्यांनी दिला असल्याचे वृत्त आमचे वाशिम जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी दिले आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 11, 2024

PostImage

प्रेम प्रकरण मान्य नसल्याने; सखां बाप व मोठा भाऊच निघाले वैरी.! लहाण्याची केली गळा आवळून हत्या


बापाने व मोठ्या भावानेच लहाण्याची केली गळा आवळून हत्या अन् केला कोणीतरी मारल्याचा बनाव

स्वान पथकाच्या साह्याने असा झाला धक्कादाय घटनेचा उलगडा

अकोला :

महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा गावात एक खळबळजनक घटना समोर आली आहे.येथे एका तरुणाचा बापाने आणि मोठ्या भावाने गळा आवळून खुन अन् पिंजर पोलीस ठाणे गाठून मुलाला कोणीतरी मारल्याचे सांगितले मात्र तपासा दरम्यान प्रकरण उघडकीस आले.

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा गावातील संदीप गावंडे या  तरुणाची बापाने व त्याच्या मोठ्या भावाने मिळून गळा आवळून हातपाय बांधून  हत्या केली.संदीप चे गावातीलच एका अनुसूचित जातीच्या मुलीशी प्रेम प्रकरण जुळले होते.व तो तिच्याशी लग्न करणार होता.हे प्रकरण घरातील लोकांना पसंद नसल्याने त्यांनी संदीपला टोकले असता त्यांच्यात वाद निर्माण झाला.या वादाचे  रूपांतर एकदम टोकाच्या भूमिकेवर गेल्याने सखां बाप व मोठा भाऊ वैरी झाला व त्यांनी संदीपचा गळा आवरून हातपाय बांधून त्याला संपविल्याचे उघड झाल्याने सध्या पोलिसांनी आरोपी बाप आणि मोठ्या भावाला अटक करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बार्शिटाकळी तालुक्यातील टिटवा गावात वास्तव्यास असणारे नागोराव गावंडे यांना दोन मुले असून लहान मुलगा संदीप गावंडे हा पुणे येथील एका कंपनीत काम करीत होता.त्याचे गावातील एका अनुसूचित जाती गटातील मुलीशी प्रेम संबंध जुळल्याने तिच्याशीच लग्न करण्याचा कायमचा हट्ट धरला होता.त्याचे वडिलांना हे प्रेम प्रकरण मान्य नसल्याने  याबद्दल त्यांच्या घरात नेहमीच वादविवाद व्हायचे.यामुळे संदीप ने पळून जाऊन लग्न करण्याचे वडील नागोराव गावंडे यांना समजले यावरून त्यांनी संदीपला तू तिच्याशी प्रेम का करतो व आता लग्न करू लागलाय असे म्हणून त्यांच्यात वाद वाढल्याने गुरुवार आठ फेब्रुवारी च्या दिवशी वडील नागोराव गावंडे यांनी  मोठ्या मुलाला सोबत घेऊन संदीप चा गळा आवळून हत्या केली व त्याचे हात पाय बांधून बाहेरगावी चालले गेले.दुसऱ्या दिवशी शुक्रवार 9 फेब्रुवारीला दुपारच्या दरम्यान घरी आले असता संदीप चा मृतदेह पाहून एकच टाहो फोडला व पिंजर पोलीस स्टेशन गाठून माझ्या मुलाला कोणीतरी मारल्याचे बनाव करून सांगितले. पिंजर पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मुर्तीजापुर उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे व अकोला श्वान पथकाला सदर घटनेची माहिती दिली. घटनास्थळी श्वान पथकाच्या सहाय्याने पोलिसांनी तपास केला असता श्वान वडील व मोठ्या भावा जवळ येऊन थांबले यावरून पोलिसांनी वडील नागोराव गावंडे व मोठ्या भावाला ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली. असा झाला घटनेतील हत्या करणाऱ्या आरोपींचा उलगडा झाला.याप्रकरणी अधिक तपास मुर्तीजापुर उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ यांच्या नेतृत्वात पिंजर पोलीस करीत आहे.असे वृत्त प्रतिनिधी प्रज्ञानंद भगत यांनी कळविल्याचे आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी सांगितले .


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 10, 2024

PostImage

आरटीई २५% चा खर्च शासनास परवडत नसल्याने, आता जिल्हा परिषद सह अनुदानित शाळांमध्ये मिळणार मोफत प्रवेश . .?


राज्य सरकारचा शिक्षण क्षेत्रातील विकास थांबविण्याचा घाट!

संजय कडोळे   वाशिम जिल्हा विशेष प्रती.

वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे): केंद्र शासनाने २००९ साली आरटीई चा कायदा आणला. मात्र राज्यात प्रत्यक्षात २०१२ पासुन सुरू झाला. त्याद्वारे अ.जा., अ.ज. व ओबीसीतील आर्थीक दुर्बल घटक (कमी ऊत्पन्न असणारा) घटकातील ६ वर्षाच्या मुली मुलांना वर्ग ८ वी पर्यंत इंग्रजी शाळेत मोफत शिकण्याची सोय आहे. त्यास १२ वर्षापासून चांगला प्रतिसाद सुद्धा मिळात आहे. या योजनेनुसार केंद्र सरकार ६०% तर राज्य सरकार ४०% रक्कमेचा निधी संबंधीत शाळांना वितरीत करते. त्याअंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी व पालकांना आपण दर्जेदार शाळेत शिक्षण घेत असल्याचा आनंद मिळत आहे. असे असतांना मात्र राज्य सरकार या योजनेमधे आधीच अनुदानीत असणार्‍या शाळांना समाविष्ट करून या योजनेद्वारे खर्च होणारी रक्कम बचत करून पालकांच्या इंग्रजी शिक्षणाच्या अपेक्षांना सुरुंग लावण्याच्या तयारीत दिसत आहे. याबाबत शासन नवा प्रस्ताव मंजुरीसाठी लवकरच आणत असल्याची माहीती आहे.
————————————
मुलींची इंग्रजी शिक्षणाची लाॅटरी बंद?
 आरटिई' २५ टक्के मोफत प्रवेशाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रीयेस शालेय शिक्षण विभागाचे "लाॅटरी पद्धतीने प्रवेश" असे नावं आहे. अर्थात ज्या पालकांनी आपल्या पाल्याचा याद्वारे प्रवेशाकरीता अर्ज केला, त्यांचा नंबर लागल्यास लाॅटरी लागली असे म्हटले जाते. सदर पालकांना याचा लॉटरी लागल्यागत आनंद होतो सुद्धा होतो. मात्र राज्य शासनाकडून ६०-७० कोटींच्या निधी वितरणासाठी या योजनेत अडथळे निर्माण करणे योग्य नाही. सद्याच्या योजनेचा इंग्रजी शिक्षणाकरीता विशेषत: मुलींना लाभ होत आहे. आज पालकांची इंग्रजी शिक्षणाची चढाओढ पाहता या योजनेतील प्रवेशाची व्याप्ती २५% वरून ५०% करावी अशी आमची मागणी आहे.असे
राहुलदेव मनवर, उपाध्यक्ष मावळा संघटना यांनी कळविले आहे.
'आरटीई'च्या नव्या नियमानुसार वर्ग पहिलीच्या मुलीमुलांचे प्रवेश सरकारी शाळांमधे घेणे बंधनकारक असणार!
   वास्तवीक पाहता सरकारी शाळा ह्या अनुदानीत असल्यामूळे त्यामधे सर्वांसाठीच मोफत शिक्षणाची सोय असते. सद्या 'आरटीई' अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क सरकारी तिजोरीतून खासगी इंग्रजी शाळांना दिले जाते. सद्याचा 'आरटीई'चा पॅटर्न सरकारला  परवडणारा नसल्याने इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यास त्याच्या घरापासून एक कि.मी. अंतरावरील जि.प., खासगी, अनुदानित किंवा अंशत: अनुदानित शाळेत प्रवेश दिला जाईल. त्यावेळी त्या मुलाच्या पालकांच्या पसंतीला प्राधान्य राहील. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालीका किंवा शासकीय अनुदानित शाळा त्या परिसरात नसेल तरच संबंधीत मुलांसाठी खासगी इंग्रजी शाळांचा पर्याय असणार आहे. आरटीई'च्या नव्या नियमानुसार वर्ग पहिलीच्या मुलीमुलांचे प्रवेश सरकारी शाळांमधेच घेणे बंधनकारक असणार आहे. प्रवेश न घेतल्यास त्या विद्यार्थ्यास दुसर्‍या कुठल्याच शाळेत मोफत शिक्षणाचा पर्याय नसेल.
*——————————————*
सरकारी शाळातील शिक्षणाचा दर्जा खालावल्याने साडेबारा हजारांहून अधिक शाळांची पटसंख्या कमी झाली आहे. यामूळे हजारो शिक्षक अतिरीक्त झाले आहेत. मात्र आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना सरकारच्या माध्यमातून खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो.
▪️यामूळे दरवर्षी केंद्र शासनाचा ६०% व राज्य शासनाचा ४०% दोन्ही मिळून 'आरटीई' प्रवेशापोटी वितरीत केले जातात. मात्र राज्य सरकारला हे परवडणारे नसल्याचे राज्य शासनाचे मत आहे.
सद्या २०२२-२३ पर्यंतचे खासगी इंग्रजी शाळांचे १६०० कोटी रुपयांचे शुल्क थकलेले आहे.

सरकार का संपवू पाहते ही योजना?
▪️मराठी शाळांची पटसंख्या कमी होऊन सात ते आठ हजार शाळा बंद पडण्याच्या मार्गावर; खासगी इंग्रजी शाळांकडून शासन दरबारी शुल्क वाढीची मागणी आहे.
'आरटीई'तून पहिली ते आठवीपर्यंत इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिकलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाचा खर्च परवडत नाही; त्यांना पुन्हा मराठी माध्यमातूनच शिकावे लागते. त्यातून अनेकजण नैराश्याचे शिकार होवू शकतात असे शासनाचे म्हणणे आहे.असे रहुलदेव,उपाध्यक्ष मावळा संघटना यांनी कळवीलेहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 9, 2024

PostImage

मोठी बातमी.महीला मजुरांना घेवुन जाणारी पिकअप पलटली..!चार महिला मजुरांचा मृत्यू.!ब्रम्हपुरी तालुक्यातील माहेर गावात दुःखाचे डोंगर कोसळले


ब्रम्हपुरी:-

ब्रम्हपुरी तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली असून माहेर(खरबी)गावातील १७ महिला मजूर चना कापणीसाठी दिनांक:-८ फेब्रुवारीला २०२४ ला बाहेर गावी जात असताना या महिला मजुरांना घेऊन जाणारा पिकअप वाहन उमरेड तालुक्यातील सिर्सी गावाजवळ पलटी झाल्याने या घटनेत चार महिला मजुरांचा मृत्यू झाला आहे .तर काही महिला गंभीर जखमी आणि इतर महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत.गंभीर जखमी महीला मजुरांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे उपचाराकरीता हलविण्यात आले आहे.

या घटनेने माहेर गावासह सभोवतालील गावपरिसरात शोककळा पसरली आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 7, 2024

PostImage

जगदगुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांचा प्रत्यक्ष दर्शन व मार्गदर्शन सोहळा १२ व १३ फेब्रुवारी ला