रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
F
08-02-2025
Crime News : अनैतिक संबंधांचे प्रकार अलीकडे खूप घडू लागले आहेत. हे प्रकार समाजस्वास्थ्य बिघडल्याचं लक्षण आहे. तसंच, त्यातून कौटुंबिक स्वास्थ्यही बिघडतं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला 28 वर्षांची असून, तिचे पतीशी संबंध बिघडले. त्यानंतर ती नितनवास गावात राहणाऱ्या रामराज केवट याच्या संपर्कात आली. रामराज तिला आपल्याबरोबर तमिळनाडू राज्यात कोईमतूरमध्ये घेऊन गेला. तिथे ते दोघं जण बराच काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले; मात्र त्यानंतर तो अचानक तिला तिथेच ठेवून आपल्या घरी परतला. येताना तो तिचा मोबाइल फोनही आपल्याबरोबर घेऊन आला. पीडित महिलाही नंतर त्याला शोधत त्याच्या घरी आली. तेव्हा त्याच्या घरच्यांनी तिला पकडून ठेवलं. मध्य प्रदेशातल्या श्योपूर इथल्या वीरपूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ही घटना घडली. त्या पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी या घटनेबद्दल माहिती दिली.
आरोपी रामराज याची पत्नी आणि त्याच्या अन्य कुटुंबीयांनी पीडित महिलेला पकडून ठेवलं. तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिला मारून टाकण्याचं नियोजनही ते करू लागले. नशिबाने तेवढ्यात त्या महिलेच्या मुलाने प्रसंगावधान राखून 100 नंबर डायल केला आणि पोलिसांना घटनास्थळी बोलावलं. त्यानंतर पोलिसांनी पीडित महिलेला आरोपींच्या तावडीतून सोडवलं. त्यानंतर चौघांविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. त्या पीडित महिलेने असा आरोप केला आहे, की आरोपी तिला मारून तिचा मृतदेह चंबळ नदीत फेकण्याचं प्लॅनिंग करत होते.
पोलिसांनी आरोपी प्रियकराच्या विरोधात लैंगिक अत्याचाराची केस दाखल केली नाही; मात्र त्याच्या कुटुंबातल्या तीन महिलांसह चौघांवर केस दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितलं, की आरोपीच्या कुटुंबातल्या महिलांनी पीडितेला मारहाण केली आहे. तसंच, तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मारहाणीचा एक व्हिडिओही मिळाला आहे. त्यामुळे या प्रकरणी आरोपींवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार असून, अधिक तपास सुरू आहे.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments